बाहुबलीच्या निमित्ताने …
कालच आंतरजालावर बाहुबली (हिंदी) बघितला आणि ज्या scale वर तो चित्रपट बनवला आहे ते पाहून आवक झालो. नकळत मराठी चित्रपटाची तुलना करायचा मोह अनावर झाला. मराठीमध्ये एवढ्या मोठ्या scale चा चित्रपट कधी बनणार ? आपण फक्त story आणि containt वरचा किती दिवस तरणार ? आपली मराठी मानसिकता कधी बदलणार? TP2 च्या वेळेस त्याच्या promotion वर टीका झाली . हीच आपली कोती मनोवृत्ती आपल्याला घातक आहे . बाहुबली हा regional फिल्म असूनही तो एवढ्या मोठ्या scale वर बनवला गेला आणि जगभर प्रदर्शित झाला . आता कोणी त्यावर टीकाही करतील कि हा बाजारू आहे , असू दे बाजारु … त्यांनी केवढा मोठ्या प्रमाणावर तो बनवला आणि promot केला , हे निशित्तच कौतुकास्पद आहे आणि मराठी Film Industry आणि प्रेक्षकांनी ह्यातून बोध घ्यायला हवा. तुम्हाला काय वाटते ?
💬 प्रतिसाद
(132)
प
पैसा
Tue, 07/28/2015 - 11:03
नवीन
लोकांना स्वप्नं विकायचं आपलं काम तो सिनेमा चोख करतो आहे. अजून एक गोष्ट कोणाच्या लक्षात आलेली दिसली नाही, दिग्दर्शकाचे काम. अगदी एक्स्ट्रा नटांकडून त्यांनी उत्तम मुद्राभिनय करून घेतला आहे. कोणत्याही फ्रेममधे एक्स्ट्राज चे वागणे विसंगत वाटत नाही.
मारियोच्या उड्यांबाबत चिगोशी सहमत! पण बाकी उत्तम दृश्य अनुभवासाठी ते माफ करून टाकले आहे!
- Log in or register to post comments
स
समीरसूर
Tue, 07/28/2015 - 11:22
नवीन
आगाऊ म्हाद्या यांचा प्रतिसाद सुंदर आहे.
'बाहुबली' मला खूप आवडला. काय सुंदर आणि प्रभावी चित्रपट बनवला आहे!! वाह! सोपी कथा, जबरदस्त कलादिग्दर्शन, डोळ्यांचे पारणे फिटावे अशी अफलातून आणि भव्य दृश्ये, सगळ्यांचा खणखणीत अभिनय आणि उत्सुकता ताणून धरायला लावणारे दिग्दर्शन! प्रभास आणि राणा तर उत्तम आहेतच पण कटाप्पाच्या भूमिकेत सत्यराजने जान ओतली आहे. नासीरचा कुटील बाप जबरदस्त. अनुष्का, रम्या, आणि नाजूक तमन्ना यांनीदेखील जीव तोडून अभिनय केला आहे. स्पेशल इफ़ेक्ट्स जाणवतात पण एकंदरीत चित्रपटाचा आवाका प्रचंड मोठा आहे; त्यामुळे उणीवांकडे फारसे लक्ष जात नाही. चित्रपट बघतांना आपण काहीतरी भव्य-दिव्य, श्वास रोखून धरायला लावणारे बघतोय असे वाटत राहते.
डिटेलिंग इतके मस्त की मोठ्या मोठ्या महालांच्या ग्राफिक्समध्ये दुरून छोटी छोटी हालचाल करणारी माणसे, उडणारे पक्षी, फडकणारे झेंडे, बुरुजांच्या सावल्या, इत्यादी सगळे कुशलतेने टिपले आहे. धबधबा आणि पर्वतराजी तर निव्वळ अप्रतिम!
एकदा मोठ्या पडद्यावर पहायलाच हवा असा चित्रपट.
- Log in or register to post comments
स
सत्याचे प्रयोग
Tue, 07/28/2015 - 13:11
नवीन
मराठीत मला वाटतंय पानिपत वरच असा होवू शकतो .
- Log in or register to post comments
स
सिरुसेरि
Wed, 07/29/2015 - 07:19
नवीन
"मुद्दा पैशाचा नसून ज्या कामासाठी दिला आहे त्या कामावर ते काम चांगले होण्याकरता खर्च होण्याचा/करण्याचा आहे. जर या चित्रपटाच्या कला दिग्दर्शकाला मिळालेला पैसा घेऊन तो त्याने शक्य तितके चांगले काम करण्यात लावला नसता तर तुम्हाला खड्डे पडलेल्या रस्त्यांसारखा चित्रपट दिसला असता."
-- बाहुबली बाबत आतापर्यंत प्रतिक्रिया या संमिश्र , परस्पर विरोधी अशा वाचायल्या मिळाल्या आहेत . काही जण त्यांतील तांत्रिक करामतींनी भारावून गेले आहेत , तर काहींना या तांत्रिक करामतींमध्ये त्रुटी आहेत असे दिसते .
"जर कोणाला उपदेश द्यायची गरज असेल तर ती दर्शकांना आहे. कारण खिशातले ८० ते २००० हजार रुपये हा दर्शकच उधळत असतो"
-- सर्वात वाईट तर तेथिल दर्शकांबद्दलच वाटते . कारण रणरणते उन , वादळ , पाउस , पाणी / वीज टंचाई , प्रदुषण , ट्रॅफिक हा सर्व त्रास सहन करीत लोक येतात व २ , ३ तास स्वताला गंडवून घेतात . यातूनच वास्तवापासून पलायनवादाची भावना वाढीस लागते .
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Wed, 07/29/2015 - 08:15
नवीन
मनोरंजनाला 'पलायनवाद' म्हणणे म्हणजे...
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Wed, 07/29/2015 - 09:13
नवीन
अगदी असेच.
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Wed, 07/29/2015 - 11:34
नवीन
येथील दर्शकांबद्दल काय वाटते ?
- Log in or register to post comments
D
dadadarekar
Wed, 07/29/2015 - 11:46
नवीन
दर्शक शब्द योग्य आहे की प्रेक्षक ?
- Log in or register to post comments
अ
अस्वस्थामा
Wed, 07/29/2015 - 13:35
नवीन
अहो.. बाकीच्या मुद्द्यांबद्दल काहीच बोलत नाही आहात तुम्ही. असो.
इथे "काहींना या तांत्रिक करामतींमध्ये त्रुटी आहेत असे दिसते" बर मग ? निर्मात्याने जमेल तितका पैसा घातला तसा त्याला परतावा मिळाला असे समजा हवे तर. अगदी विहिर/बंधारा गायब होते तसे झालेय का हो ?
मुद्दा समजून घ्या आणि बोला की.
परत तेच. त्यास २५० कोटी घालणारा निर्माता कसा जबाबदार ? हे म्हणजे इतके लोक उपाशी असताना मिठाई बनवायला चितळे इ. हलवायांना लाज नाही का वाटत ? असे म्हटल्यासारखे वाटतेय. तुम्ही भलतीच निराशावादी मांडणी करत आहात आणि तिही सदोष.
- Log in or register to post comments
अ
अर्धवटराव
Wed, 07/29/2015 - 18:53
नवीन
भारी आए... पन लय भारी नाय. ट्रॉय बीय च्या तर आसपास बी येत नाय.
दुसरा पारट पन फानार... अन असाच काइसा परतिसाद देनार :)
- Log in or register to post comments
स
सिरुसेरि
गुरुवार, 07/30/2015 - 07:22
नवीन
"येथील दर्शकांबद्दल काय वाटते ? "
--- मराठी दर्शक / प्रेक्षक हा केवळ १०० , २०० कोटींना व तांत्रिक करामतींना भुलून जाणारयांमधला नाही .तसेच तो चित्रपट / चित्रपट कलाकार / निर्माते / दिग्दर्शक यांना डोक्यावरही चढवणारयां मधला नाही . मराठी प्रेक्षक हा मराठी चित्रपटांच्या बाबतीत खुप चुझी / चोखंदळ आहे . त्यामुळे जे मराठी चित्रपट त्याला काळजाला भिडले नाहीत व क्रुत्रिम वाटले ते मराठी प्रेक्षकांनी नाकारले आहेत . म्हणुन त्याला ग्रुहित धरुन कसे पण मराठी चित्रपट बनवू नयेत . उदाहरणादाखल - सतिश राजवाडे यांचा 'मुम्बई पुणे मुम्बई' जेवढा चालला , तेवढे त्यांचे नंतरचे चित्रपट चालले नाहीत . स्वप्निल जोशीचे 'मुम्बई पुणे मुम्बई' , दुनियादारी जेवढे स्विकारले गेले , तेवढे इतर चित्रपट स्विकारले गेले नाहीत . सचिन खेडेकर यांचे 'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय ', काकस्पर्श हे जेवढे गाजले तेवढे इतर चित्रपट गाजले नाहीत.
-- येथील -->(महाराष्ट्रातील ). तेथिल --> (तामिळनाडू , आंध्रा / दक्षिण भारतीय प्रदेश)---
"त्यास २५० कोटी घालणारा निर्माता कसा जबाबदार ? हे म्हणजे इतके लोक उपाशी असताना मिठाई बनवायला चितळे इ. हलवायांना लाज नाही का वाटत "
--- २५० कोटी घालणारा निर्माता हा काही सर्व साधारण नसतो . त्यांची सर्व क्षेत्रांत सर्वांपर्यंत पोहोच असते . हे जे २५० कोटी त्याच्याकडे जास्तीचे असतात ते कोठुन आलेले असतात .यांतील थोडे फार कोटी त्याने हवेत ऊडविले काय किंवा सामाजिक विकासासाठी खर्च केले काय , त्याचे फारसे काहीच बिघडणार नसते .
- Log in or register to post comments
अ
अस्वस्थामा
गुरुवार, 07/30/2015 - 11:43
नवीन
असले बालिश प्रश्न/विचार पाहून आमचा __/\__ .
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Fri, 07/31/2015 - 09:02
नवीन
अगदी अगदी, आमचेही एक लोटाङ्गण. _/\_
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
गुरुवार, 07/30/2015 - 11:54
नवीन
हाच मराठी प्रेक्षक सगळ्या खानावळीच्या बिनडोक चित्रपटांना कसा काय हजार असतो बॉ ?
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
गुरुवार, 07/30/2015 - 12:32
नवीन
चित्रपट ह्या विषयासंबंधी तुमचे आकलन बघुन धन्य जाहलो या जन्मी.
मराठी प्रेक्षकांच्या वतीने त्यांना गृहीत धरून तुम्ही जी विधानं केली आहेत ती वादग्रस्त आहेत हे सांगू इच्छितो. कारण 'मी शिवाजीराजे..' 'दुनियादारी' 'टाइमपास', 'लयभारी' हे तद्दन बाजारू चित्रपट होते. सुरवातीच्या दिवसांत दादा कोंडके व सचिन प्रभृतींचे चित्रपटांनी सिल्वर जुबिल्या दाखवल्यात महाराजा. 'नॉट ओन्ली मिसेस राउत', 'विहिर', 'किल्ला', 'हजाराची नोट' ने नाही. त्यामुळे तुमचे ते चोखंदळ, चुजी मराठी प्रेक्षक कुठे आहेत त्यांचा जरा शोध घेऊन पहा आधी. आणि कपिलमुनि यांनी म्हटल्याप्रमाणे हेच चुजी, चोखंदळ मराठी प्रेक्षक ज्यांना भुलवल्या जाऊ शकत नाही ते खाणावळींच्या चित्रपटांना डोक्यावर घेत आहेत त्याचं काय?
तुम्ही म्हणताय अमूक गाजले, तमूक नाही गाजले, गृहीत धरून कसेही चित्रपट बनवू नये वैगेरे. जर यशाचा अचूक फॉर्मुला तुम्हाला कळला आहे तर जे इंडस्ट्रीत आहेत त्यांनाही तो तुमच्या आधीच कळला असेल. पण असे काही होतांना दिसत तर नाही. मुळात चित्रपट बनवणेच जर तुमच्या दॄष्टीने उधळपट्टी आहे तर तुम्ही चित्रपट बनवा असे तरी का सांगताय? की कायम झोपड्यांमधे चित्रीकरण करत गरीबांचे गचाळ आयुष्य दाखवणारेच चित्रपट बनवावे असे तुमचे मत आहे? तिथेही भरपूर लाईट्स लागतात. त्यापेक्षा उघड्या माळरानावर दुपारी बनवावे, महागडे कॅमेरे नको मोबाईल कॅमेरा चालेल. साउंड इंजिनीअरची गरज नाही. मूक चित्रपट बनवू. चांगले कलाकारही नकोत. खूप पैसे घेतात. गाणीपण नकोत, कथा चांगली असली म्हणजे झाले. पण चांगल्या कथेला चांगले पैसे मिळत नाहीत म्हणून कथाकार देणार नाही. प्रसिद्धीला खूप पैसे जातात. कशाला करायची प्रसिद्धी? एवढे कॉस्ट कटींग पुरे की अजून काही करायचे? नाही चित्रपट कसे बनवायचे सांगताय म्हणून विचारले. मग मराठी चित्रपट चालले नाही की बोंब मारायलाही आपण मोकळेच आहोत. हा कसा चांगला, तो कसा जमला नाही अशी चर्चा चघळायला तयार. नाही का?
तुमच्या माहितीसाठी सांगतो कुठल्याच मराठी चित्रपटाचा बजेट २ कोटीपेक्षा जास्त जात नाही. (अपवादः लय भारी- ८ कोटी, प्रकाश आमटे- २.५, हरिश्चंद्राची फॅक्टरी- ६ कोटी, इत्यादी. बोटांवर मोजण्याइतके). हे ही टॉपलाईन निर्माते/दिग्दर्शकांबद्दल आहे. ९० टक्के तर २५ लाखाचाही टप्पा पार करत नाहीत. उद्या शिवाजी महाराजांवर चित्रपट बनवायचा झालाच तर त्याचे बजेट २०० कोटीच्या आसपासच असेल कारण कथेची गरज आहे म्हणून. निर्मात्याला उधळायचे आहेत म्हणून नाही. तुम्ही म्हणाल एवढा भव्य कशाला बनवायचा? ठिक आहे, शिवाजींची भूमिका करणार्याला घरच्या कपड्यात शूट करू. महाल, राजवाडे नकोत. जे भग्न किल्ले आहेत तिथेच मोबाइलने शूट करू. तिथे जायचा खर्च तरी कशाला. एखादं खेळाचं मैदान (असेल तर) घेऊ. ओके? त्या काळाची, पेहरावाची, हत्यारांची, वास्तुंची कल्पना ज्याने त्याने मनातल्या मनात करून घ्या म्हणा कारण आम्हाला पैसे 'उधळायचे' नाहीत.
२५० कोटी घालणारा निर्माता हा काही सर्व साधारण नसतो. त्यांची सर्व क्षेत्रांत सर्वांपर्यंत पोहोच असते . हे जे २५० कोटी त्याच्याकडे जास्तीचे असतात ते कोठुन आलेले असतात
एक कलाकार व व्यावसायिक म्हणून माझा वरिल विधानांवर जोरदार आक्षेप आहे. चित्रपट व्यवसायाविषयीचे पुर्वदूषित आकस असल्यामुळे कदाचित असे अज्ञानमूलक विचार प्रसवत असावेत.
कुठल्याही निर्मात्याकडे स्वतःचे पैसे शिल्लक झालेत म्हणून किंवा चैन करावी म्हणून चित्रपट काढत नसतो. कारण कुणीही पैसे जास्त झाले म्हणून करूया धंदा असे म्हणून व्यवसायात उतरत नसतो. कुणाकडे १००० कोटी आहेत म्हणून बाहुबलीपेक्षा चांगला सिनेमा निघणार नसतो. परताव्यावर डोळा ठेवून केलेली ही एक व्यावसायिक गुंतवणूक आहे. शिल्लक पडलेली रक्कम नाही. मध्यमवर्गीय विचारसरणीच्या लोकांना इथे फक्त खर्च होणारा पैसा दिसतोय. त्याच्यापेक्षा लाखपटीने मौल्यवान अशी हजारो लोकांची मेहनत दिसत नाही. निर्मात्यांनी पैशातून पैसा निर्माण करायचा, रोजगार निर्माण करायचा धवल राजमार्ग (खरे देशकार्य/समाजकार्य) सोडून ज्या लोकांना आपल्या भविष्याची चिंता नाही, नागरी कर्तव्याची फिकर नाही, त्यांच्या परिस्थितीस सर्वस्वी तेच जबाबदार असलेल्या त्यांना हे पैसे पुरवून काय फरक पडणार आहे? मुळात ह्या दोन वेगळ्या क्षेत्रांचा तसा काय संबंध?
वरीलप्रमाणे विचार असणार्यांना कलाकारांच्या, तंत्रज्ञांच्या कामाची कदर नाही, किंमत नाही. कलाकार्/तंत्रज्ञांनी फुकट राबावे, चांगली गाणी, चित्रपट बनवावे, ते फुकट इंटरनेटवरून डाउनलोड करून ऐकावे, पाहावे अशी काही फुकट्या लोकांची इच्छा असते. स्वतः ज्या व्यवसायात/नोकरीत आहोत ते क्षेत्र सोडून इतर सर्व क्षेत्रातले लोक बसून खातात अशी भावना असते बर्याच जणांची. असे बरेच लोक मलाही माझ्या व्यवसायत भेटत असतात. ज्यांना फुकट काम करून हवे असते किंवा लाख रुपये किमतीचे काम दोन-पाच हजारात हवे असते. तेही ते उपकार करून देतोय अशी भावना असते. ही भावना इथूनच येते. उत्तम कलाकारांच्या मौल्यवान कलाकृती ह्या फुकटात, सहज मिळाल्या की असे विचार उपजायला सुरुवात होते. ह्या विचारांना वेळीच विरोध करणे माझ्यादॄष्टीने आवश्यक आहे.
मागे डॉक्टरांना मिळणार्या फीबद्दल आक्षेप घेणार्यांना मी हेच म्हणत होतो की कुणी कमावतंय त्याच्या कमाईवर डोळा ठेवू नये.
सिनेमा निर्मिती ही गुंतवणूक नसून उधळपट्टी आहे हे सिद्ध करा. जर जमत नसेल तर इतकंच म्हणतो- गल्ली चुकलं की तुमचं वो.
- Log in or register to post comments
र
रेवती
Fri, 07/31/2015 - 15:10
नवीन
कुठल्याच मराठी चित्रपटाचा बजेट २ कोटीपेक्षा जास्त जात नाही.
असे असेल तर त्या हिरो हिरविनीच्या हातात काय पडत असेल? बिचार्यांचा खर्च तरी निघत असेल का? २ कोटी म्हणजे काहीच नाहीत.
नाही, मी कोणाच्या कमाईवर डोळा ठेवून नाहीये पण त्या मराठी पोरापोरींचा मेंटेन्सचा खर्च तरी निघायला हवा ना! जिम, सत्राशेसाठ कपडे, केस, चेहर्याची निगा, चपला, ब्यागा, पर्सा यांचे खर्च, शिवाय हे काही पब्लिक ट्रान्सपोर्टने प्रवास करत नसणार. मान्य आहे की शिनेमाचे शूटींग, प्रमोशन्सवेळी खर्च निर्माता करत असेल पण इतरवेळी काय?
तळटिप- माझे प्रश्न हे उत्सुकतेपोटी विचारलेत. त्यांचा आणि सिरुसेरी यांच्या प्रतिसादाचा संबंध नाही.
- Log in or register to post comments
प
पाटीलअमित
Fri, 07/31/2015 - 15:13
नवीन
म्हणच तर ह्या सई आणि राधिका हिंदी मध्ये hunter सारखे चित्रपट करतात
================================================
आजची स्वाक्षरी
बाहुबली बघा व्यवस्थापन नीती शिका
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Fri, 07/31/2015 - 15:44
नवीन
कमाईच्या मानाने जो खर्च ज्या प्रमाणात करणे शक्य आहे तेवढाच केला जाणार. कत्रिना कैफ/प्रियंका येता जाता सहज मर्सिडीज ऑडी घेणार तर सोनाली/सई होंडा सिटी वैगेरे घेणार. त्या गुची/वित्तों वापरणार ह्या आपल्या काहीतरी सॅम्सोनाईट वापरणार. त्यांच्या घरीच दोन-तीन करोडची जीम असणार वर ट्रेनर असणार. ह्या कॉलनीतल्या जीममधे जाणार. त्यांची ब्युटीशियन लाखात फिया घेणार यांची हजारात.
शेवटी ज्या प्रमाणात पैसा कमवायचा तसं स्टेटस मेंटन करावं लागतं. जसं स्टेटस मेंटेन केलं तसा पैसा मिळतो. म्हणून कलाकाराला आधीच कुठल्या वर्तुळात काम करायचंय हे नक्की करायला लागतं नाही तर एकदा शिक्का बसला की सुटका होत नाही सहज. म्हणून माधुरी/उर्मिला मराठी चित्रपट करत नाही. राधिका आपटे आता कुठल्या भंगार मराठी सिरियल मधे दिसणार नाही. सई ताम्हणकर तर नाहीच नाही.
नवाजुद्दीन सिद्दिकी/इरफान खान आता आता खालच्या वर्तुळात येणारच नाहीत.
- Log in or register to post comments
र
रेवती
Fri, 07/31/2015 - 16:04
नवीन
हम्म.............पटतय.
प्रतिसादाबद्दल आभार.
- Log in or register to post comments
प
पाटीलअमित
Fri, 07/31/2015 - 16:07
नवीन
नाना पाटेकर दिलीप प्रभावळकर ह्यांना ढिगाने हिंदी च्या ऑफर्स आहेत
म्हणून मराठीची कास नाहे सोडली
- Log in or register to post comments
र
रेवती
Fri, 07/31/2015 - 16:38
नवीन
होय की! पण हिरो आणि हिरविनीचा प्रश्न वेगळा असतो असे वाटते. मी काही या क्षेत्रातील माहितगार नव्हे. भारतातही आजकाल सामान्य मनुष्यासाठी सगळे खर्च भरपूर वाढलेत असे लक्षात आल्याने शेलिब्रिटींबद्दल विचारले होते इतकेच! जास्त माहिती घेऊन काय करणार? जाऊ द्या!
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Fri, 07/31/2015 - 17:50
नवीन
+१ :-)
- Log in or register to post comments
य
यमगर्निकर
गुरुवार, 07/30/2015 - 11:03
नवीन
वीज टंचाई , प्रदुषण , ट्रॅफिक हे सर्व त्रास जर लोकांना होत असतील तर त्यांनि सरकार ला जाब विचारावा, सिनेमाच्या दिग्दरशकाला कस काय जबाबदार धरु शकता?
- Log in or register to post comments
स
सिरुसेरि
Fri, 07/31/2015 - 07:05
नवीन
"आणि कपिलमुनि यांनी म्हटल्याप्रमाणे हेच चुजी, चोखंदळ मराठी प्रेक्षक ज्यांना भुलवल्या जाऊ शकत नाही ते खाणावळींच्या चित्रपटांना डोक्यावर घेत आहेत त्याचं काय"
-- खान मंडळींचे चित्रपट डोक्यावर घेण्यात तर इतर राज्यांतील प्रेक्षकांचाही मोठा वाटा आहे , मग तो गुन्हा केवळ मराठी प्रेक्षकांवर लादता येणार नाही .
"सुरवातीच्या दिवसांत दादा कोंडके व सचिन प्रभृतींचे चित्रपटांनी सिल्वर जुबिल्या दाखवल्यात महाराजा.""
-- निखळ विनोदाला मराठी प्रेक्षक नेहमीच दाद देतो .
--'मी शिवाजीराजे..' 'दुनियादारी' 'टाइमपास', 'लयभारी' या चित्रपटांना कथा , संगीत , चित्रीकरण ,अभिनय अशा घटकांचा योग्य समन्वय साधता आला . तसेच हे चित्रपट आवडलेले आणी न आवडलेले असे दोन्ही लोक मोठ्या संख्येने आहेत . बाहूबलीच्या बाबतीतही नेमके हेच झालेले आहे . हा चित्रपट आवडलेले आणी न आवडलेले असे दोन्ही लोक मोठ्या संख्येने आहेत . आवडण्याची आणी न आवडण्याची प्रत्येकाची मते , कारणे वेगवेगळी आहेत . आणी प्रत्येक जण हा त्याच्या त्याच्या जागी योग्य आहे . "आम्हाला डिडिएलजे , हम आपके है कौन , कुछ कुछ होता है हे असले हाय फाय चित्रपट आवडले नाहीत . त्यापेक्षा थोडा हळूवार थोडा रफ टफ असा अजय देवगण - काजोल यांचा 'प्यार तो होनाही था' हाच आवडला " असे सांगणारे बरेच जण आहेत . ते त्यांच्या जागी बरोबरही आहेत .
-- तर 'नॉट ओन्ली मिसेस राउत', 'विहिर', 'किल्ला', 'हजाराची नोट' हे चित्रपट यामधील काही घटकांमध्ये कुठेतरी कमी पडले .
हिंदीमध्ये सूद्धा असे प्रकार झाले आहेत ( गाईड , कागज के फूल ) . जसे की गाईड हा चित्रपट सुरुवातीला लोकांना उमगलाच नाही . २ ,३ वेळा पाहिल्यावर मग प्रेक्षकांना त्यातील अर्थ / आशय समजू लागला . अजुनही समजुन घेत आहेत .
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Fri, 07/31/2015 - 09:35
नवीन
मुद्द्यापासून कोलांट्याउड्या? भव्य चित्रपट हे उधळपट्टी आहेत, ते पैसे समाजसेवेसाठी खर्च करावे हा तुमचा मुद्दा होता. सोयिस्कर स्मृतिभ्रंश?
कोणते चित्रपट चाललेत आणि त्यामागची कारणे , ते आवडणे, न आवडणे हा सर्वस्वी वेगळा विषय आता घुसडता आहात.
- Log in or register to post comments
स
सिरुसेरि
Fri, 07/31/2015 - 10:08
नवीन
चित्रपट हा भव्य आहे म्हणुन तो सर्वांना आवडलाच पाहिजे हा हट्ट धरण्यात काहीही अर्थ नाही .
तसेच एकाला एखादा चित्रपट आवडला म्हणुन तो दुसरयालाही आवडलाच पाहिजे हा अट्टाहास धरून उपयोग नाही .
हा चित्रपट आवडलेले आणी न आवडलेले असे दोन्ही लोक मोठ्या संख्येने आहेत . आवडण्याची आणी न आवडण्याची प्रत्येकाची मते , कारणे वेगवेगळी आहेत . आणी प्रत्येक जण हा त्याच्या त्याच्या जागी योग्य आहे .
भव्य चित्रपट हे उधळपट्टी आहेत, ते पैसे समाजसेवेसाठी खर्च करावे - हे एखाद्याचे वैयक्तीक मत असू शकते . मग ती दुसरयाला पटोत वा ना पटो .
१."चित्रपट बनवणे हे म्हणजे पुस्तक वाचण्याएवढे सोपे काम नाही हे एकदाचे समजून घेतले पाहिजे. एक दहा सेकंदाचा शॉट बघायला आपल्याला दहाच सेकंद जरी लागत असले तरी तो शॉट आपल्यापर्यंत पोचवायला हजारो तंत्रज्ञ, कलाकार आणि व्यावसायिक झटलेले असतात. तो शॉट पर्फेक्ट येण्यासाठी कदाचित त्यांनी शेकडो तास घालवले असतात. एक उडी नीट मारली गेलेली अचूक पद्धतीने येण्यासाठी कदाचित नायकाला अक्षरशः दिवसभर तेच करत राहायला लागलेले असते. पडद्यावर दिसते तेवढे सोपे ते खचितच नसते. तेच काम न थकता, न चिडता, अचूक येण्यासाठी कमालीची सहनशिलता आणि कामामधे अढळ श्रद्धा लागते. तुम्ही आम्ही ज्या सहज भावनेने आणि क्षुल्लक महत्त्व देऊन एखादा चित्रपट बघत असतो त्याच सहजतेने तो तयार झालेला आहे असे आपल्याला वाटत असते. पण तसे नसते.""
२."कारण 'मी शिवाजीराजे..' 'दुनियादारी' 'टाइमपास', 'लयभारी' हे तद्दन बाजारू चित्रपट होते."
--- जेव्हा तुम्ही वरिल चित्रपटांवर बाजारूपणाचा आरोप करता , तेव्हा या चित्रपटांतील कलाकार , तंत्रज्ञ , सर्व टीम या सर्वांचाच , व त्यांच्या कष्टांचा अपमान करता . मग तेव्हा स्वताच्या सोयीने मारलेल्या दुतोंडीपणाच्या कोलांट्याउड्या चालतात का ?
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Fri, 07/31/2015 - 10:53
नवीन
१. तुम्ही परत तेच ते गोंधळ घालताय. चित्रपटाच्या भव्यतेचा आणि व्यक्तिगत आवडीचा काय संबंध? तुमचा पहिला मुद्दा होता की असे भव्य चित्रपट ही पैशाची उधळपट्टी आहे. ते पैसे समाजकार्यावर खर्च करावे. आता तुम्ही व्यक्तिगत आवडीचा, जो कायमच वादातीत आहे असा, अगदी गैरलागू मुद्दा घेताय जो या चर्चेत मांडलाच नव्हता. दोन वेगवेगळ्या मुद्द्यांची केविलवाणी घुसळण करून तुमच्या प्रतिसादांची अवस्था अधिकाधिक वाईट होत जात आहे. तुम्ही आधी म्हणता की मराठी प्रेक्षक असे भव्य चित्रपट स्विकारणार नाहीत. तुम्हाला उदाहरण दिले तर म्हणता की काही लोकांना आवडतं, काहिंना नाही आवडत. अरे काय चाल्लंय तरी काय?
चित्रपटाच्या भव्यतेचा, गरिबीचा, हिट/फ्लॉप जाण्याचा, आवडीचा, नावडीचा, अभिरुचीचा, त्या पैशातून समाजकार्य करण्याचा एकमेकांशी मस्त बादरायण संबंध लावून ह्या सगळे मुद्द्यांची खिचडी करून तुम्ही नक्की काय सुचित करू इच्छित आहात?
२. बाजारू म्हणजे कमर्शियल/व्यावसायिक ही व्याख्या आहे. तुमची काही वेगळी आहे का? जे बाजारात खपू शकतं असं प्रॉडक्ट बाजारूच असणार. त्यात लागणार्या मेहनतीचा अपमान कुठे होतोय? तीन प्रकारचे चित्रपट असतात. एक कलात्मक - आर्ट फिल्म आणि दुसरे बाजारू - कमर्शियल - व्यावसायिक. तीसरे समांतर. आर्ट्फिल्म मधे सर्व निर्णय दिग्दर्शकाच्या हाती असतात. त्याला काय आवडेल तेच तो बनवतो, पब्लिकला काय आवडेल त्याचा विचार होत नसतो. बाजारू-व्यावसायिक चित्रपटात दिग्दर्शकासह इतर टीम आपले उच्च कौशल्य/ज्ञान वापरून पब्लिकला काय पाहायला आवडेल याचा अंदाज घेऊन अभ्यास करून चित्रपट बनवत असतो. चित्रपट उद्योग हा व्यवसाय आहे. तो बाजारू असणारच. बाजारू म्हटला म्हणजे त्यात मेहनत लागत नाही असं काही आहे का? उलट त्यातच जास्त मेहनत लागते. मी तो शब्द त्या मराठी प्रेक्षकांना उद्देशून वापरला आहे ज्या (तुमच्या मते) चुजी, चोखंदळ, अभिरूची संपन्न वैगेरे प्रेक्षकांनी हे चित्रपट डोक्यावर घेतले. कोर्ट सारखा चित्रपट डोक्यावरून जाणारे टाइमपास ला भरभरून प्रतिसाद देतात. म्हणजे बाजारात टाइमपास सारख्या चित्रपटांची मागणी आहे. जो चित्रपट 'मास'ला आवडतो त्याला बाजारू म्हटले तर कुणाचा अपमान झाला?
असो. शब्दांचे खेळ करून तुमचा मूळ मुद्दा तुम्ही विसरून जाऊ नका. लक्षात आहे ना "भव्य चित्रपट नको, समाजकार्य हवे"? आधी आपले प्रतिसाद नीट करा मग दुसर्यांची पिसं काढा.
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Fri, 07/31/2015 - 11:41
नवीन
हे तुमचे वैयक्तीक मत आहे . गुड ! पण हे तुम्ही सार्वजनिक पटलावर मांडला आणि त्याचा समर्थन केलात की की प्रतिवाद होणार
- Log in or register to post comments
प
पाटीलअमित
Fri, 07/31/2015 - 14:48
नवीन
बाहुबली मधून व्यवस्थापन विद्या पण चांगली शिकवली आहे
========================
आजची स्वाक्षरी
बाहुबली बघा व्यवस्थापन नीती शिका
- Log in or register to post comments
स
सिरुसेरि
Fri, 07/31/2015 - 19:41
नवीन
"हे तुमचे वैयक्तीक मत आहे . गुड ! पण हे तुम्ही सार्वजनिक पटलावर मांडला आणि त्याचा समर्थन केलात की की प्रतिवाद होणार"
"आता तुम्ही व्यक्तिगत आवडीचा, जो कायमच वादातीत आहे असा, अगदी गैरलागू मुद्दा घेताय जो या चर्चेत मांडलाच नव्हता. "
--- सार्वजनिक पटलावर बहुतेकजण आपापले व्यक्तिगत / वैयक्तीक मत / द्रुष्टीकोणच मांडत असतो. त्या प्रमाणे मी आपले वैयक्तीक मत मांडले . व पुढील प्रतिसादांतून त्याबद्दल उपस्थित झालेल्या शंकांना उत्तरे देताना या मताबद्दलचे विचार मांडले .
"असो. शब्दांचे खेळ करून तुमचा मूळ मुद्दा तुम्ही विसरून जाऊ नका. लक्षात आहे ना "भव्य चित्रपट नको, समाजकार्य हवे"
-- या बद्दल मी लिहिलेच आहे . भव्य चित्रपट हे उधळपट्टी आहेत, ते पैसे समाजसेवेसाठी खर्च करावे - हे एखाद्याचे वैयक्तीक मत असू शकते . मग ती दुसरयाला पटोत वा ना पटो .
"बाजारू म्हणजे कमर्शियल/व्यावसायिक ही व्याख्या आहे. तुमची काही वेगळी आहे का "
--इथे शब्दांचे खेळ कोण खेळत आहे ? आधी नको ते शब्द वापरायचे आणि नंतर सारवासारव करून त्याचे केविलवाणे समर्थन करायचे हा प्रकार जूना झाला . स्वताच्या आवडत्या चित्रपटांच्या तंत्रज्ञांची भलावण करायची आणी नावडत्या चित्रपटांना बाजारू संबोधून त्यातील तंत्रज्ञांची , त्यांच्या कष्टांची हेटाळणी करायची . आणी हा
दुटप्पीपणा ढोंगीपणा उघडकीस आला की शब्दांची फिरवाफिरव करून पळवाट काढायची आणी वारा येईल तशी पाठ फिरवायची . अशा दुतोंडीपणाला काय बोलणार
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Sat, 08/01/2015 - 09:18
नवीन
सार्वजनिक पटलावर बहुतेकजण आपापले व्यक्तिगत / वैयक्तीक मत / द्रुष्टीकोणच मांडत असतो. त्या प्रमाणे मी आपले वैयक्तीक मत मांडले . व पुढील प्रतिसादांतून त्याबद्दल उपस्थित झालेल्या शंकांना उत्तरे देताना या मताबद्दलचे विचार मांडले .
>> वैयक्तिक मताचे स्वागतच आहे. फक्त ते मराठी प्रेक्षकांचे सार्वजनिक मत आहे असे म्हणून खपवणे योग्य नाही. व्यक्तिगत दृष्टीकोण सार्वजनिक पटलावर मांडल्यावर त्याबद्दल अधिक विचारणा होणारच. त्यातून एखाद्याचा दॄष्टीकोण कितपत अभ्यासावर, निरिक्षणावर आधारित आहे की बस दिले ठोकून टाईप आहे हे उघडकीस येते. आपल्या दृष्टीकोणास साजेसे स्पष्टीकरण विचार मांडणार्याकडून अपेक्षित असते. टाळाटाळ नाही.
भव्य चित्रपट हे उधळपट्टी आहेत, ते पैसे समाजसेवेसाठी खर्च करावे - हे एखाद्याचे वैयक्तीक मत असू शकते . मग ती दुसरयाला पटोत वा ना पटो .
>> हे तुमचे वैयक्तिक मत आहे. ओके. मग त्याचे बील तमाम मराठी प्रेक्षकांवर का फाडले? आपले वैयक्तिक मत सार्वजनिक मत आहे असे कुठल्या निकषांवर आपणास वाटले?
स्वताच्या आवडत्या चित्रपटांच्या तंत्रज्ञांची भलावण करायची आणी नावडत्या चित्रपटांना बाजारू संबोधून त्यातील तंत्रज्ञांची , त्यांच्या कष्टांची हेटाळणी करायची . आणी हा दुटप्पीपणा ढोंगीपणा उघडकीस आला की शब्दांची फिरवाफिरव करून पळवाट काढायची आणी वारा येईल तशी पाठ फिरवायची. अशा दुतोंडीपणाला काय बोलणार
>> मला कुठले चित्रपट आवडतात आणि कुठले आवडत नाहीत हे तर मी बोललोच नाही. ज्यांची उदाहरणे दिली त्यातले कित्येक तर मी पाहिले सुद्धा नाही. माझी विधाने त्या चित्रपटांना मिळालेल्या प्रेक्षकांच्या प्रतिसादांवर आधारित आहेत. व्यक्तिगत मत नव्हे. उलट तुमची व्यक्तिगत मते समाजावर लादून आपण फार समाजाभिमुख व थोर विचारवंत आहोत हा जो आव आणता आहात तो हास्यास्पद आहे. 'भव्य चित्रपट हे उधळपट्टी आहेत' हे विधान अतिशय बालिश आणि अभ्यासहिन तर आहेच त्यातून गरिबांचा खोटा कळवळा दाखवण्याचा प्रयत्नही केविलवाणा आहे. शिवाय ते बुद्धीभ्रम निर्माण करून सकारात्मक घटनांना नकारात्मक लेपन करणारे आहे. २५० कोटींतून ज्यांना रोजगार मिळाला त्यांना तुमची ही मते कशी वाटतील याबद्दल थोडा विचार करून बघा.
तुमच्या कुठल्याच मुद्द्याबद्दल तुमच्याकडे कसलेही समर्थन नाही. कोण ढोंगी, कोण दुटप्पी हे ठरवण्याचा तुमचा वैयक्तिक अधिकार मान्य आहे. पण त्याने सिद्ध काहीच होत नाही हे सत्य आहे.
चर्चेबद्दल धन्यवाद!
- Log in or register to post comments
स
सिरुसेरि
Mon, 08/03/2015 - 18:00
नवीन
माझे वैयक्तीक मत हे माझ्या वैयक्तीक विचार / अनुभव / निरिक्षण यांवर आधारीत आहे .
कुणा दूतोंडी इसमाने टुकार दमबाजी , भंपक दमदाटी व पुचाट अरेरावी केली म्हणून मी ते बदलणार नाही.
माझ्या प्रतिसादातून मी मराठी प्रेक्षकांचे , मराठी सिनेमांचे , मराठी तंत्रज्ञांचे कौतूक केले आहे . तुमचा मात्र मराठी सिनेमांवर , मराठी तंत्रज्ञांवर त्यांच्या यशाबद्दल असणारा राग , जळफळाट , दूटप्पीपणा बाहेर पडला आहे . एकिकडे सिनेमा बनविण्यामागील तंत्रज्ञांचे कष्ट यांवर गळा काढायचा व दुसरीकडे वरील सिनेमांना हिणवून त्यातील तंत्रज्ञांच्या कष्टांचा अपमान करायचा , व परत त्याचेच रेटून समर्थन करायचे यांतून तुमच्या दूतोंडीपणाबरोबरच तुमचा निर्ढावलेपणा ही उघडकीस आला आहे .
दूसरयाला दांभिकपणे अक्कल शिकवण्यापेक्षा स्वताचा फालतू दूटप्पीपणा कमी करा . कुणा दूतोंडी इसमाकडून बिनकामाची अक्कल शिकण्याइतके बूरे दिन सुदैवाने आलेले नाहीत .
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3