Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ब्रिटिश राज आणि नुकसानभरपाई

म
मंदार कात्रे
Fri, 07/24/2015 - 12:56
🗣 90 प्रतिसाद
http://www.bbc.com/news/world-asia-india-33618621?ocid=fbindia नुकतेच माजी परदेशमंत्री शशी थरूर यांनी ब्रिटन मध्ये आयोजित एका कार्यक्रमात केलेल्या भाषणात ब्रिटन कडून त्यांच्या सत्ताकालात भारतीय जनतेच्या झालेल्या अपरिमित नुकसानीबद्दल ब्रिटन ने भारताची माफी मागून नुकसानभरपाई देण्याची मागणी केली . त्याबद्दल संपूर्ण देशात थरूरजी यांचे कौतुक होत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही थरूर यांच्या धाडसाचे कौतुक केले आहे. भारत स्वतंत्र झाल्यानंतर आजतागायत कोणी हा मुद्दा उचलून धरला होता का? इथे तर अशी परिस्थिति आहे की ब्रिटीशांनीच भारताचे कल्याण केले ,विकास घडवला , रेल्वे /पोस्ट /तार आणि इतर आधुनिक तंत्रज्ञान आणून पुराणकथात रमणार्या भारतीय /हिंदू समाजाचा उद्धार (?) केला अशी मते बाळगणारे आणि व्यक्त करणारे लोकही आज भारतात सापडतात , त्यांना सणसणीत चपराक हाणत शशी थरूर यांनी ब्रिटीशांनी भारताला किती व कसे लुटले? भारतीय सैनिकांचा वापर करून पहिले व दुसरे महायुद्ध जिंकताना भारताच्या हाती मात्र धुपाटणेच कसे आले ?बंगाल मध्ये 1943 साली पाडलेल्या भीषण दुष्काळाच्या वेळी ब्रिटिश सरकारने केलेले अक्षम्य दुर्लक्ष, जालियानवाला बागेत क्रौर्या ची परिसीमा गाठणारे अमानुष हत्याकांड याचा समग्र ऊहापोह थरूर यांनी केला . ब्रिटिश येण्यापूर्वी जगाच्या व्यापारातील भारताचा हिस्सा 24% होता ,परंतु 1947 साली तो हिस्सा फक्त 4% राहिला होता. देशी उद्योगधंद्याना पद्धतशीरपणे मारून टाकायचे, भारतीय कच्चा माल स्वस्त दरात विकत घेवून ब्रिटनमध्ये त्यावर प्रक्रिया करून पुन्हा चढया दराने भारतात आणि जगात विकायचा ,असा अव्यापारेषू व्यापार ब्रिटीशांनी केला . या आणि अशा अनेक "गुन्ह्यांसाठी" ब्रिटन जबाबदार असून त्याची जबाबदारी ब्रिटनला टाळता येणार नाही ! त्याचबरोबर भारतातून “चोरलेला” कोहिनूर हिरा त्वरित भारतास परत करावा आणि ब्रिटिश सत्ताकालात भारतीय जनतेच्या झालेल्या अपरिमित नुकसानीबद्दल ब्रिटन ने भारताची माफी मागून नुकसानभरपाई देण्याची ,अशी रास्त मागणीही केली . परखड मत व्यक्त करून खर्या इतिहासाची जाणीव ब्रिटीशांना ,जगाला आणि भारतीयांनादेखील करून दिल्याबद्दल शशी थरूर यांचे (ते कोंग्रेसवासी असूनही ) माझ्याकडून जाहीर आभार व अभिनंदन !

प्रतिक्रिया द्या
25571 वाचन

💬 प्रतिसाद (90)
स
स्पंदना Fri, 07/24/2015 - 13:02 नवीन
Sun never sets on British Empire because even God does not trust British in Darkness. टाळ्या!! चर्चिल ने They are dying any way असा दाखवलेला अमानुष attitude, येथुन नेलेलं अन्न्धान्य यांच्या रक्तपिपासू सैनिकांना म्हणे. आला एकदाचा लेख. मला वाटल मिपाने दुर्लक्ष केलं की काय या बातमीकडे.
  • Log in or register to post comments
म
मृत्युन्जय Fri, 07/24/2015 - 13:14 नवीन
ते भाषण पुर्ण ऐकायचे आहेच. पण शशी थरूर यांच्या भाष्णाचा साधारण आशय कळला आहे. त्या भाषणाबद्दल त्यांचे सणसणीत अभिनंदन. त्यांनी कधी पुण्यातुन निवडणुक लढवलीच तर बाकीच्या सगळ्या गोष्टी विसरुन त्यांना एक मत तरी नक्की देइन. :)
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Fri, 07/24/2015 - 13:21 नवीन
त्याचबरोबर भारतातून “चोरलेला” कोहिनूर हिरा त्वरित भारतास परत करावा
<< पु.ना मोड ऑन >> अहों कोहिनुर काय कोहिनुर ? सम्यंतक मणी आहे तो आमच्या भगवान श्री कृष्णांचा <<पु.ना मोड ऑफ्फ>> =))
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Fri, 07/24/2015 - 13:31 नवीन
सम्यन्तक नाही स्यमन्तक! उच्चारात फरक झाला की पावर कमी होते, काय समजलेत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
D
dadadarekar Sat, 07/25/2015 - 01:59 नवीन
तो हिरा भिक्कारडा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Mon, 07/27/2015 - 08:58 नवीन
हिरा म्हणजे तरी काय, पारदर्शक दगड फक्त. त्याला लोक किंमत देतात इतकेच. अन्यथा इट्स जस्ट अनदर दगड.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: dadadarekar
न
नाखु Tue, 07/28/2015 - 12:58 नवीन
सगळ्या धुराळी प्रतिसादासाठी तू हे गाणं म्हण पाहू दगड म्हणजे सगळे दगड आनंदतील बॅट्या शेजारील "पायथ्याचा दगड"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Tue, 07/28/2015 - 13:05 नवीन
पाहतो नाखु'नकाका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
प
प्रसाद गोडबोले Tue, 07/28/2015 - 14:49 नवीन
"पायथ्याचा दगड"
वापरलेला ? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
न
नाखु Wed, 07/29/2015 - 04:53 नवीन
उरलेला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
ख
खटपट्या Wed, 07/29/2015 - 09:35 नवीन
पूसून उरलेला. उगाच तो ऐतीहासीक पुसायचा धागा आठवला..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
ज
जडभरत Wed, 07/29/2015 - 10:12 नवीन
कृपया धागा व्यनि कराल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
प
प्रसाद गोडबोले Wed, 07/29/2015 - 10:12 नवीन
येणार येणार आमचा स्यमन्तक !! http://maharashtratimes.indiatimes.com/international/international-news/kohinoor-diamond-back-to-india/articleshow/48260369.cms =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बाळ सप्रे Fri, 07/24/2015 - 13:24 नवीन
भाषण ऐकलं.. छानच होतं पण ते कशानिमित्ताने होतं ते समजलं नाही..
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Fri, 07/24/2015 - 13:46 नवीन
काहीही म्हणा, that man earned himself a million salutes !
  • Log in or register to post comments
प
पुण्याचे वटवाघूळ Fri, 07/24/2015 - 14:27 नवीन
बरोबर आहे. इंग्लंडने भारताला लुटले त्याची नुकसानभरपाई दिलीच पाहिजे. आणि भारतानेही इंग्लंडला सगळा सावळागोंधळ संपवून युनिव्हर्सिटी एज्युकेशन, राजकीय स्थैर्य, प्रशासन आणि विशेष म्हणजे इंग्रजी ही जागतिक भाषा दिली त्याबद्दल पैसे दिलेच पाहिजेत.
  • Log in or register to post comments
प
पद्मावति Fri, 07/24/2015 - 14:37 नवीन
शशी थरूर यांचे आभार आणि अभिनंदन. वेल डन.
  • Log in or register to post comments
प
पुण्याचे वटवाघूळ Fri, 07/24/2015 - 15:28 नवीन
शशी थरूर यांनी हे स्टेटमेन्ट मनापासून दिले आहे असे वाटणार्‍यांच्या भाबडेपणाची किव आली. एकमेकांच्या गळ्यात एकमेकांचे हितसंबंध कसे गुंतले आहेत बघा-- थरूर-- सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणातून सुटणे हा उद्देश. तो सोडवू कोण शकेल किंवा चौकशीचा ससेमिरा कोण कमी करू शकेल? तर मोदी. म्हणून मोदींना सुखावणार्‍या गोष्टी मधूनमधून करायच्या. मग ते स्वच्छ भारताचे आमंत्रण स्विकारणे असो की मधूनमधून मोदींची स्तुती करणे असो. मधूनच राष्ट्रवादाचा राग आळवला की मोदी खूष होतील असे थरूर यांना वाटायची शक्यता आहेच. मोदी-- काँग्रेसच्या ताब्यात राहिलेल्या राज्यांमध्ये सगळ्यात लवकर निवडणुक आहे केरळ आणि आसामात. केरळात थरूर हे काँग्रेसचे महत्वाचे नेते म्हणून उद्यास येत होते. चंडी आणि अ‍ॅन्टनी भांडणात काँग्रेस दमली झाली आहे केरळात. अशावेळी काँग्रेसचे अधिक खच्चीकरण करायचे थरूर यांना हाताशी धरून. त्यातूनच भाजपला केरळात वाढायला वाव मिळेल. मध्यंतरी सोनिया गांधींनी थरूरना खडसावणे आणी मोदींनी कौतुक करणे या दोन्ही गोष्टी एकाच वेळी अशा उगीचच घडलेल्या नाहीत.
  • Log in or register to post comments
ज
जडभरत Fri, 07/24/2015 - 15:53 नवीन
हं वाघुळराव बात में दम है.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुण्याचे वटवाघूळ
न
निनाद मुक्काम … Fri, 07/24/2015 - 17:43 नवीन
@शशी थरूर यांनी हे स्टेटमेन्ट मनापासून दिले आहे तुमच्या भापडे पणाची कीव आली मुळात शशी थरूर ह्यांनी हे वक्तव्य भाजपला खुश करण्यासाठी वापरले नाहि येथे भाजप व नमो ह्यांचा संबंध येत नाहि ही बातमी वाचा. शशी थरूर हे जागतिक स्तरावर नावाजलेले व्यक्तिमत्व असून जागतिक व्यासपीठावरून विविध इतिहास राजकारण ह्या विषयांवर त्यांनी अनेक भाषणे तीही तगडे मानधन घेऊन दिली आहेत. आणि ह्या विषयावर ह्या आधी फार वर्षापूर्वी कांगारूंच्या देशात त्यांनी भारताने सोफ्ट पॉवर का व्हायला पाहिजे हे सोफ्त पॉवर म्हणजे काय हे समजून सांगत ब्रिटीश वसाहतवादाला कोपर खळ्या मारत सविस्तर समजावून सांगितले आहे ते भाषण देखील ह्या भाषणं इतकेच महत्वाचे आहे मिपाकरांनी जरूर वाचावे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुण्याचे वटवाघूळ
प
पुण्याचे वटवाघूळ Sat, 07/25/2015 - 07:06 नवीन
मुळात शशी थरूर ह्यांनी हे वक्तव्य भाजपला खुश करण्यासाठी वापरले नाहि येथे भाजप व नमो ह्यांचा संबंध येत नाहि
हे तुमचे मत झाले. पूर्वी वाचाळपणासाठी नोटोरिअय असलेले शशी थरूर (आठवा कॅटल क्लास, सौदी अरेबियात जाऊन तो देश भारत आणि पाकिस्तानमध्ये इंटरलोक्यूटर कसा होईल असे म्हणणे) सुनंदा पुष्करच्या मृत्यूनंतर मात्र एकदम बदलले आहेत. मोदी पंतप्रधान झाल्यानंतर एका आठवडयातच आता नरेंद्र मोदी हे मोदी २.० व्हर्जनमध्ये कसे बदलले आहेत हा लेख त्यांनी लिहिला ( http://www.huffingtonpost.com/shashi-tharoor/narendra-modi-shashi-tharoor_b_5434302.html?ir=India&adsSiteOverride=in) मोदींनीही त्रिवेंद्रममधून लोकसभा निवडणुक जिंकल्याबद्दल शशी थरूरचे स्पेशल अभिनंदन केले होते. मोदींनी इतर ५४५ खासदारांपैकी किती जणांचे अभिनंदन केले होते कुणास ठाऊक. स्वच्छ भारत अभियानासाठी अगदी पहिल्या दिवशी मोदींनी ९ पैकी एक म्हणून शशी थरूर यांना नॉमिनेट केले आणि ते थरूर यांनी लगोलग स्विकारले. त्याबद्दल काँग्रेस स्पोक्समन पदावरूनही त्यांची उचलबांगडी झाली. एकीकडे मणिशंकर अय्यर सारखे वाचाळ्वीर मोदींविरूध्द हवे तसे बरळत असताना मात्र थरूर एकीकडे मोदींना सपोर्टच करतात आणि मोदी पण ते रेसिप्रोकेट करत आह्ते. हे सगळे फिक्सिंग आहे असे का म्हणू नये?
ही बातमी वाचा.
याच स्वरूपाची बातमी भारतीय न्यूजमध्येही आली होती.तीच बातमी वॉल स्ट्रिट जरनलमधून देऊन तुम्ही नक्की काय सिध्द करायचा प्रयत्न करत आहात?
शशी थरूर हे जागतिक स्तरावर नावाजलेले व्यक्तिमत्व असून जागतिक व्यासपीठावरून विविध इतिहास राजकारण ह्या विषयांवर त्यांनी अनेक भाषणे तीही तगडे मानधन घेऊन दिली आहेत.
बरं मग?
ह्या विषयावर ह्या आधी फार वर्षापूर्वी कांगारूंच्या देशात त्यांनी भारताने सोफ्ट पॉवर का व्हायला पाहिजे हे सोफ्त पॉवर म्हणजे काय हे समजून सांगत ब्रिटीश वसाहतवादाला कोपर खळ्या मारत सविस्तर समजावून सांगितले आहे ते भाषण देखील ह्या भाषणं इतकेच महत्वाचे आहे
मुद्दा एवढाच-- की थरूर यांनी मोदीस्तुतीची जपमाळ ओढणे, मोदींनी ते रेसिप्रोकेट करणे आणि भाजपमधील कट्टर राष्ट्रवादी गटाला सुखावणारे भाषण करणे-- आणि ते कांगारूंच्या देशात नव्हे तर इंग्लंडमध्ये आणि ते पण ऑक्सफर्डसारख्या ब्रिटिश अभिमानाच्या ठिकाणी जाऊन करणे यात वरकरणी दिसते त्यापेक्षा बरेच काही जास्त आहे असे म्हणायला वाव आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी
प
पैसा Sat, 07/25/2015 - 12:42 नवीन
शशि थरूर यांचा सगळा इतिहास वाचून फक्त तिरस्कारच वाटतो. त्यांच्यापेक्षा शतमूर्खपणा करणारे लोक परवडले. जोपर्यंत सुनंदा पुष्करच्या खुन्याला शिक्षा होत नाही तोपर्यंत या सरकारवर विश्वास ठेवता येत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुण्याचे वटवाघूळ
क
कैलासवासी सोन्याबापु Fri, 07/24/2015 - 16:36 नवीन
त्याबद्दल संपूर्ण देशात
थरूरजी
यांचे कौतुक होत असून ठळक अन अधोरेखित केलेल्या शब्दाची अंमळ गंमतच वाटली बाकी काही नाही, कोहिनूर किंवा स्यमंतक हिर्या बद्दल बोलायचे झाले तर तो हीरा दळभद्री आहे शब्दशः, त्याचा इतिहास (पौराणिक दृष्टया) हा की तो हिरा कृष्ण भगवानाच्या हाती आला तर त्यांचा अवतार संपला, यादव वंशी लोक प्रभासक्षेत्री डोकी फोडून चचले, द्वारका नगरी समिंदराने गिळंकृत केली , मोगलांकड़े जाता त्यांच्या सगळ्यां डुया चचल्या राज्य उसवले , लेटर मुग़ल तर उपाशी ही राहिले, त्यानंतर फ्रांस मार्गे बहुतेक इंग्लॅण्ड ला गेला अन स्थिरावला कारण तो मणि फ़क्त बाईच्या हाती टिकतो! काय करायची असली पनवती माघारी आणून असू देत तिकडच!!! बाकी वाघुळ बुआ नेमके बोललेच हैती!
  • Log in or register to post comments
ज
जडभरत Fri, 07/24/2015 - 17:00 नवीन
हा इतिहास म्हैत नव्हता सोन्याबापू. छानच अपडेट दिलात.धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
ब
बन्डु Fri, 07/24/2015 - 17:55 नवीन
त्यांना ईटलीची (नौक??)राणी असे म्हणतात,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
D
dadadarekar Wed, 07/29/2015 - 10:22 नवीन
mahàaraajaa रणजितसिंहांचा मुलगा द्लिप्सिंह याने इंग्रजांना भेट दिला. तो हिरा राणीच्य मुकुटात आहे ना ? मग तो कसा काढणार ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
व
वॉल्टर व्हाईट Fri, 07/24/2015 - 18:14 नवीन
इच्छुकांसाठी ओक्स्फ़र्ड युनिअनच्या रेपरेशन डिबेट मधले काही महत्वाचे व्हिडिओ
  • Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन Fri, 07/24/2015 - 18:26 नवीन
थरुर यांचे आर्ग्युमेंट पाहिले. बरेच देशभक्त लोक इंग्रजांनी माफी मागितली पाहिजे वगैरे आता म्हणू लागतील. थरुर यांचे आर्ग्युमेंट जोरदार आहे. ते म्हणतात "यू कॅननॉट ऑप्रेस पीपल फॉर टू हन्ड्रेड यिअर्स ॲन्ड ॲट द एन्ड ऑफ इट सेलिब्रेट दॅट दे आर डेमॉक्रॅटिक" पण हेच आर्ग्युमेंट जर भारतीय समाजाला लावले तर त्यात जातींच्या नावावर जे २००० वर्षांचे शोषण झाले आहे त्याचा हिशोब कोण देणार? ६०-७० वर्षांच्या आरक्षणाविरुद्ध छाती पिटणारे लोक थरुर यांच्या भाषणाचे समर्थन करताना विचार करतील? मला नाही वाटत. यू कॅननॉट ऑप्रेस पीपल फॉर २००० यिअर्स ॲन्ड ॲट द एन्ड ऑफ इट सिम्पली डिक्लेअर दॅट ऑल आर इक्वल.
  • Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु Fri, 07/24/2015 - 18:29 नवीन
जबरी पॉइंट!!! _/\_ एखाद्या तर्कसंगत प्रतिवादाच्या प्रतीक्षेत असलेला (काजीसाहेब) बाप्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन
अ
अर्धवटराव Fri, 07/24/2015 - 19:02 नवीन
आणि या व्यवहारात बेनिफिशिअरी/सप्रेस्ड कसे विभागले होते ? ज्या देशात थरुर साहेबांनी हे आर्ग्युमेण्ट केलय त्यातल्या सर्वकालीन व्यवस्था कशा वेगळ्या होत्या? सिरीयसली विचारतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन
ग
गुलाम Sat, 07/25/2015 - 00:12 नवीन
"यू कॅननॉट ऑप्रेस पीपल फॉर टू हन्ड्रेड यिअर्स ॲन्ड ॲट द एन्ड ऑफ इट सेलिब्रेट दॅट दे आर डेमॉक्रॅटिक" पण हेच आर्ग्युमेंट जर भारतीय समाजाला लावले तर त्यात जातींच्या नावावर जे २००० वर्षांचे शोषण झाले आहे त्याचा हिशोब कोण देणार?
यात "पण" पेक्षा "आणि" जास्त बरोबर वाटलं नसतं का? हे म्हणजे जातीच्या नावावर हजारो वर्षे शोषण झालेच की मग साम्राज्यवाद्यांनी २०० वर्षे केले म्हणून काय बिघडलं असं वाटतंय. दोन्हीही तेवढंच निंदनीय आहे.
६०-७० वर्षांच्या आरक्षणाविरुद्ध छाती पिटणारे लोक थरुर यांच्या भाषणाचे समर्थन करताना विचार करतील? मला नाही वाटत.
हे अतिसामान्यीकरण होतंय. मुख्य म्हणजे याचा प्रत्यास असा होतो की; आरक्षणाचे समर्थन करणारे, पुरोगामी हे कुणी देशभकत नसतात आणि त्या सगळ्यांचा इंग्रज सत्तेला पाठिंबा होता. मला नाही वाटत तुमचं असं मत असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन
न
नगरीनिरंजन Sat, 07/25/2015 - 09:30 नवीन
बरोबर. दोन्ही निंदनीय आहेत; पण इंग्रज आले नसते तर पहिला प्रकार सहजासहजी थांबला असता का असा प्रश्न पडतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गुलाम
स
स्वधर्म Tue, 07/28/2015 - 16:37 नवीन
सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन
प
पाटीलअमित Fri, 07/24/2015 - 18:29 नवीन
आर्य लोक पण बाहेरुच्नच आले आपण द्रविड लोकांचे dene lagato
  • Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु Fri, 07/24/2015 - 18:30 नवीन
ही थ्योरी डिस्प्यूटेड असल्याचे वाचले आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाटीलअमित
च
चौकटराजा Sat, 07/25/2015 - 08:27 नवीन
अगदी मानवी समूहांच्या टोळ्या या काळापासून राजकारणी-नोकरशहांच्या टोळ्या या अवार्चिन स्थितीपर्यंत एकाने दुसर्यास गिळावे हीच जगाची परंपरा राहिलेली आहे. त्यात सगळे आले. राजे आले,पातशहा आले किंग आले अर्ल आले सगळेच आले.जगाचा नकाशा, भाषा, हे सारे बदलतच असते. ब्रिटीश भारतात आले म्हणून अनेक कारणानी तुकडे तुकडे असलेला भारत नावाचा देश निर्माण झाला हे कटू असले तरी सत्य आहे. भारतात सोन्याचा धूर निघत होता.ते ब्रिटीशानी लूटून नेले असे म्हणण्याची एक पद्धत आहे. सोन्या पेक्षाही जनांची शोधक वृती , उद्योजकता, कल्पकता, ही देशाला मोठे करीत असते. आज भारतीय स्वतंत्र असले तरी १९४७ ते २०१५ या कालात किती पेटंटचा धूर भारतातील उद्योजकानी, जनांनी काढला आहे याची काही आकडेवाडी शशी आहेब देतील काय?
  • Log in or register to post comments
च
चिनार Sat, 07/25/2015 - 12:31 नवीन
थरूर साहेबांचे या भाषणाबद्दल अभिनंदन ! पण थरूर परराष्ट्र मंत्री असताना त्यांना हे का सुचले नसेल ? नुकसानभरपाईसाठी ब्रिटीश सरकारला अधिकृत पत्र सुद्धा पाठवता आलं असतं त्यावेळी.
  • Log in or register to post comments
प
पुण्याचे वटवाघूळ Sat, 07/25/2015 - 12:35 नवीन
पण थरूर परराष्ट्र मंत्री असताना त्यांना हे का सुचले नसेल
तोच तर मुद्दा आहे. त्यावेळी सुनंदा पुष्कर हयात होत्या आणि सत्तेत काँग्रेसच होती.त्यामुळे चौकशीचा ससेमिरा मागे लागायचे काहीच कारण नव्हते. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिनार
न
निनाद मुक्काम … Mon, 07/27/2015 - 20:38 नवीन
माझा प्रतिसाद नीट वाचला असता तर हा प्रतिसाद खरडायची गरज भासली नसती बर मग चे उत्तर देतो माझ्या पहिल्या प्रतिसादात थरूर हे मंत्री असतांना कांगारूंच्या देशात भाषण केले होते ज्याची क्लिप माझ्या प्रतिसादात आहे त्यात त्यांनी ब्रिटीश साम्राज्यावर कोरडे ओढले आहेत. त्यांची ही मते त्यांनी वेगवेगळ्या व्यासपीठांवर वेगवेगळ्या देशात मांडली आहेत अगदी मोदी हे मुख्य मंत्री होते व ते देशाच्या पंतप्रधान पदाचे उमेदवार नव्हते तेव्हा ही भाषणे थरूर ह्यांनी केली आहेत तेव्हा त्यांची मते व भाषणे ह्यांचा मोदींशी संबंध जोडू नये त्यांना मी चेपू वर फोलो करतो . मोदी सरकार विरुद्ध त्यांच्या निर्णयाविरुद्ध लिहिण्यात आघाडीवर असणाऱ्या कॉंग नेत्यांच्या मध्ये थरूर ह्यांचे नाव आघाडीवर आहे ,
  • Log in or register to post comments
न
निनाद मुक्काम … Mon, 07/27/2015 - 21:21 नवीन
थरूर ह्यांचे भाषण त्याला सोशल मिडीयावर मिळालेली प्रसिद्धी विषेतः गेल्या काही वर्षात व इतक्यात इंग्लिश सरकारने भारतीय विद्यार्थ्यांवर जाचक बंधन लादणारे निर्णय घेतले असेच निर्णय भारतीय कंपन्यांना भारतातून नोकरीसाठी लोकांना आणण्यास आडकाठी करणारे घेतले गेले त्या पार्श्वभूमीवर ठरूर ह्यांचे १५ मिनिटाचे भाषण तुफान गाजले , ज्यांना भक्त म्हणून हिणवले जाते अश्या लोकांनी सुद्धा ते डोक्यावर घेतले त्यात नमो ह्यांनी त्यांची स्तुती केली व अनेक लोकांनी शशी व नमो असा संबंध जोडून पहिला माझ्या पहिल्या प्रतिसादात मी जे लिहिले होते त्या प्रमाणे थरूर ह्यांनी वेगवेगळ्या प्रसंगी आपली ही मते मांडली आहेत प्रत्येक वेळेला त्यास प्रसिद्धी व नमो कडून शाबासकी मिळाली नाही ह्याचा पुरावा म्हणून नव्हे तर प्रत्येक भारतीयाने पहावी असे शशी ह्यांच्या भाषणाची लिंक येथे अडकवत आहे. भाषणाचा विषय तोच ब्रिटीश वसाहत वादाने केलेली भारताची हानी कार्यक्रमाचे शीर्षक द एम्पायर डिबेट सुप्रीम कोर्ट लंडन स्थळ इंग्लंड काळ २०१४ येथे सुद्धा थरूर ह्यांनी तडाखेबंद भाषण करून वादविवाद स्पर्धा जिंकली त्याबद्दल भारतीय वृत्तपत्रात व्यवस्थित बातमी आली तेव्हाही थरूर ह्यांनी नमो ह्यांना खुश करण्यासाठी हे भाषण केले असे म्हणायचे का कारण हिंदू सह अनेक वृत्त पात्रांच्या मध्ये ही बातमी आली पण नमो ह्यांचा साधा उल्लेख सुद्धा नाही. म्हणूनच माझ्या पहिल्या प्रतिसादाच्या सुरवातीला म्हटले होते की कीव आली.
  • Log in or register to post comments
अ
अभिजित - १ Sat, 08/01/2015 - 15:26 नवीन
मला पण तुमच्या भाबडे पणाची कीव येते. वाचा .. काही समजतेय का ? http://maharashtratimes.indiatimes.com/nation/congress-has-not-appreciated-my-work-shashi-tharoor/articleshow/48307228.cms काँग्रेसमध्ये मी बेदखल: शशी थरुर Maharashtra Times| Aug 1, 2015, 03.10 PM IST
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 07/27/2015 - 22:37 नवीन
इथल्या बर्‍याच प्रतिसादांमध्ये एक महत्वाचा मुद्दा विसरला जात आहे. ती म्हणजे... कोणती व्यक्ती बोलत आहे त्यापेक्षा ती व्यक्ती काय बोलत आहे हे जास्त महत्वाचे असते. या धाग्याच्या संदर्भात शशी थरून यांच्या भाषणातले मुद्दे बरोबर/सत्य आहेत की नाहीत हे जास्त महत्वाचे आहे. ते सत्य कोणत्या कारणाने बाहेर येत आहे किंवा शशी थरूर यांची पूर्वीची आणि आताची राजकिय पार्श्वभूमी किंवा त्यांचे सद्या चालू असलेली कायद्याची समस्या या तीनही गोष्टींचा या भाषणातील तथ्यांशी काही संबंध नाही... त्या गोष्टींबद्दल थरूर यांना जी काही योग्य राजकिय अथवा कायदेशीर किंमत चुकवावी लागेल व त्याचे विवेचन इतरत्र योग्य व्यासपिठांवर केले जावेच यात वादच नाही... पण त्यामुळे त्यांच्या सदर भाषणांतील मुद्द्यांतील तथ्यांची किंमत कमी होत नाही. वर निनाद मुक्काम प... यांनी दिलेल्या दुव्यातल्या २०१४ मध्ये ब्रिटीश न्यायव्यवस्थेतील धुरीणांसमोर केलेल्या भाषणातही थरूर यांनी तेच मुद्दे जवळजवळ तसेच उल्लेखलेले आहेत ही एक गोष्टही सद्याच्या भाषणाच्या कारणपरंपरेचा अंदाज लावताना ध्यानात घेणे जरूरीचे आहे.
  • Log in or register to post comments
म
मंदार कात्रे Tue, 07/28/2015 - 16:43 नवीन
धन्यवाद निनादजी आणि डॉक्टर साहेब
  • Log in or register to post comments
D
dadadarekar Wed, 07/29/2015 - 03:26 नवीन
सीताहरणाबद्दल व शेकडो वानरांच्या मृत्युबद्दल श्रीलंकेच्या अध्यक्षाकडून माफीनामा कधी घ्यायचा ?
  • Log in or register to post comments
ज
जडभरत Wed, 07/29/2015 - 04:05 नवीन
काहीही हां दादा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: dadadarekar
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 07/29/2015 - 09:22 नवीन
शेकडो वानरांच्या मृत्युबद्दल श्रीलंकेच्या अध्यक्षाकडून माफीनामा कधी घ्यायचा ? आमचे अनुमोदन आहे ! पण, त्यासाठी इथल्या वानरांनी त्यांच्या मर्कटलीला थांबवून त्या महत्वाच्या मुद्द्याकडे लक्ष केंद्रित करायची गरज आहे ना ! :) ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: dadadarekar
च
चिनार Wed, 07/29/2015 - 12:40 नवीन
बरोबर काका ! पण आपल्या इथल्या वानरांना माफीनाम्यापेक्षा 'राजीनामा' मागण्यातच जास्त रस आहे.. आजची स्वाक्षरी वानरांचा संसदेत उच्छाद..!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
स
सुनील Wed, 07/29/2015 - 10:32 नवीन
सीताहरणाबद्दल व शेकडो वानरांच्या मृत्युबद्दल श्रीलंकेच्या अध्यक्षाकडून माफीनामा कधी घ्यायचा ?
अणुमोदन! गझनीच्या मुहम्मदाने लुटून नेलेली सोमनाथाची संपत्ती अफगाणिस्थानातून परत कधी आणायची?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: dadadarekar
क
कपिलमुनी Wed, 07/29/2015 - 12:59 नवीन
त्यांनी सोन्याची लंका जाळली म्हणून भरपाई मागितली तर अवघड होईल ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: dadadarekar
व
विद्यार्थी Wed, 07/29/2015 - 05:07 नवीन
शशी थरूरांच्या Oxford मधील भाषणाच्यानिमित्ताने माझ्या एका इंग्रज मित्राशी चर्चा करण्याचा योग आला. इंग्लंडमधील लोकांचे मुख्य दोन गट पाहायला मिळतात, एक ज्यांना त्यांच्या पूर्वजांनी केलेल्या अन्याय, आक्रमण आणि अत्याचाराबद्दल लाज आणि वाईट वाटते आणि दुसरा ज्याला याबद्दल कुठलीही भावना नाही. पण माझ्या मित्राने विचारलेल्या एका प्रश्नाने मी थोडा अंतर्मुख झालो. तो म्हणाला की भूतकाळातील चुकांसाठी माफी मागितली तर त्याने आजच्या इंग्रज पिढीच्या मनाचा मोठेपणा पण दिसेल. पण इंग्रजांनी काही देश वगळता बहुतेक सर्व जगावरच राज्य केले होते. जर आजचे सरकार अशी माफी मागू लागले तर किती देशांची माफी ते मागणार? यातूनसुद्धा काही चुकीचे पायंडे पडण्याचा धोका आहे. त्यातून आजची इंग्रज पिढी या इतिहासापासून पूर्णपणे अनभिज्ञ आहे आणि या इतिहासामध्ये त्यांचे काहीच योगदान नाही त्यामुळे माफी का मागायची हा प्रश्न त्यांना पडला तर ते पूर्णपणे गैर नाही. काही भारतीय लोकांच्या इंग्रजांविषयीच्या भावना थोड्या तीव्र असणे मला अगदी स्वाभाविक वाटते. भारतीय स्वातंत्र्याचा जो इतिहास आपण शाळेमध्ये आणि अवांतर वाचनातून शिकलो, तो पाहता स्वातंत्र्यपूर्व काळातील इंग्रजांनी भारतीयांवर केलेल्या अन्याय आणि अत्याचाराची मोजदाद होऊ शकणार नाही. वादविवाद आणि चर्चांसाठी हा विषय उत्तम आहे. या ऐतिहासिक घटनांचे पैशात मुल्य करून भरपाई मागणे उचित नाही असे मला वाटते. शशी थरूरांनी म्हटल्याप्रमाणे जर आजच्या इंग्रज पिढीने त्यांच्या पूर्वजांनी केलेल्या ऐतिहासिक चुकांची नुसती जाणीव ठेवली तरी पुरेसे आहे.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा