शरदातला स्वित्झर्लंड : ११ : र्हाईन धबधबा (र्हाईनफाल्)
===================================================================
शरदातला स्वित्झर्लंड : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११... १२...(समाप्त)
माझे मिपावरचे इतर लेखन...
===================================================================
प्रेमात पडावे असे शहर ! नाईलाजाने पदयात्रा संपवून बस थांब्यावर परतलो आणि लुत्सर्नकडे जाणारी बस पकडली. सहलीच्या पुढच्या गंतव्याकडे जाणारी रेल्वे लुत्सर्न बानहोफवरून सुटली आणि र्हाईनच्या धबधब्याबाबतच्या विचारांची गर्दी मनात सुरू झाली.
.
मध्य स्वित्झर्लंडमधल्या लुत्सर्नवरून निघालेली रेल्वे झ्युरिक् मार्गे स्वित्झर्लंडच्या जर्मनीबरोबरच्या उत्तर सीमेला लागून असलेल्या श्लोसलाउफन (schlosslaufen) कडे निघाली. या दोन तासांच्या प्रवासात झ्युरिक् आणि विंटरथुर या दोन थांब्यांवर गाडी बदलून पुढे जायचे होते. या दोन्ही स्टेशनवर १४ मिनिटे आणि ७ मिनिटे अश्या फरकाने एकमेकांपासून दूर असलेल्या प्लॅटफॉर्म्सवरून पुढची गाडी पकडायची होती. आतापर्यंत स्विस रेल्वे आणि खुद्द माझ्यावरचा माझा विश्वास इतका वाढलेला होता की हे काम मी रोज लोकल/बस बदलत कामाला जाणार्या मुंबईकराच्या सफाईने केले !
गाडी आल्प्सचा निरोप घेऊन सुरुवातीला लहानमोठ्या टेकड्यांचा मधून आणि त्सुग व झ्युरिक् अशी (त्यांच्या काठावरच्या शहरांची) नावे दिलेल्या मनोहर सरोवरांच्या काठाने झ्युरिक् पर्यंत जाते. त्यामुळे हा प्रवास जरा भरकन संपतो. इतक्या दिवसांनंतर या प्रवासात प्रथमच मोठी सपाट शेते दिसायला सुरुवात झाली होती...
र्हाईन धबधब्याच्या दिशेने
र्हाईन धबधबा : ०१
र्हाईन धबधबा : ०२
र्हाईन धबधबा : ०३
र्हाईन धबधबा : ०४ : निरिक्षणमनोरा असलेला सुळका
थुर्बो (टर्बो) रेल्वे ०१
थुर्बो (टर्बो) रेल्वे ०२
Book traversal links for शरदातला स्वित्झर्लंड : ११ : र्हाईन धबधबा (र्हाईनफाल्)
💬 प्रतिसाद
(19)
प
पद्मावति
गुरुवार, 07/30/2015 - 21:34
नवीन
काय मस्तं दिसतोय फॉल. तुम्ही केलेले वर्णन आणि फोटो पाहून प्रत्यक्ष तो धबधबा डोळ्यासमोर उभा राहिला.
लव इन पॅरिस मधे जो क्लाइमॅक्स चा सीन आहे तो याच फॉल्स वर शूट केलाय का? मूवी मधे तो नायगारा म्हणून दाखवला आहे पण हे फोटो बघून समहाउ ते दृष्य इथलच वाटतय.
- Log in or register to post comments
म
मधुरा देशपांडे
गुरुवार, 07/30/2015 - 22:10
नवीन
र्हाईनफॉल्स हे माझे पहिले स्विस दर्शन होते. नावाला फक्त जर्मनीतुन स्विसमध्ये शिरलो, त्यामुळे फारसा फरक जाणवला नव्हता आणि स्विस इफेक्ट असा काही खूप दिसला नव्हता. त्यात आम्ही गेलो तेव्हा तापमान ३५ हुन जास्त असल्याने वैताग आला होता. व्यक्तीशः मला थोडी अतिरंजित जागा वाटली. म्हणजे छान आहे, पण जर कुणी स्विस फिरायला येणार असतील, तर त्यात र्हाईनफॉल्स मस्ट नाही, सहज जमले तर जावे असे.
फोटो मस्तच.
- Log in or register to post comments
अ
अर्धवटराव
गुरुवार, 07/30/2015 - 22:46
नवीन
तुस्सी सिंपली ग्रेट हो !!
- Log in or register to post comments
अ
अजया
Fri, 07/31/2015 - 03:45
नवीन
-हाईन फाॅलला भेट म्हणून पर्यटन संस्था खूप जाहिरात करतात.माझ्याही डोळ्यासमोर तेच 'धबाबा आदळे तोय' असे दृश्य होते.बरे झाले कळले.म्हणजे अपेक्षाभंग न होता एंजाॅय करता येइल!
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Fri, 07/31/2015 - 05:36
नवीन
र्हाईन धबधबा पाहून निराशाच झाली. इतके वेळा त्याचे नाव ऐकलेय की प्रचंड मोठा धबधबा असेल असे वाटले होते. स्विस लोकांनी एका साध्याश्या सपाट धबधब्याचे रुपांतरही मोठ्या पर्यटनस्थळात केल्याचे पाहून त्यांच्या कल्पनाशक्तीचे कौतुक करावेसे वाटले.
बाकी लेख आणि वर्णन नेहमीप्रमाणेच अप्रतिम.
- Log in or register to post comments
व
वेल्लाभट
Fri, 07/31/2015 - 07:27
नवीन
सुरेख वर्णन. स्विस पर्यटन, तिथेले सुखद अनुभव हे म्हणजे क्लास.
वर मधुराताई आणि प्रचेतस वगैरे म्हणाल्याप्रमाणे खूप हाइप्ड ठिकाण म्हटलं जाऊ शकतं. तरीही एकदा बघायला हवा. डेफनिंग साउंड ऑफ वॉटर...
ऑन अ लाईटर नोट.... काय नाय हो -हाईन बिईन.... आडवा केलेला दूधसागर आहे जल्ला !
- Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे
Fri, 07/31/2015 - 12:56
नवीन
पद्मावति, मधुरा देशपांडे, अर्धवटराव, अजया, प्रचेतस आणि वेल्लाभट : अनेक धन्यवाद !
र्हाईनफाल् या ठिकाणाला मोठे पर्यटनस्थल म्हणून भेट न देता "एक दिवसाचा मोकळा वेळ आरामात घालवून श्रमपरिहार करण्याचे स्थान" या कारणाने भेट दिल्यास ती सार्थकी लागेल. तसा मोकळा वेळ नसल्यास, तेथे न गेल्याने फार काही मुकले, असे निश्चित होणार नाही.
- Log in or register to post comments
म
मधुरा देशपांडे
Fri, 07/31/2015 - 13:01
नवीन
हाहा. तिथे वडा पाव मिळतो हे आमचे जाण्यामागचे मुख्य कारण होते, ते सफल झाले. त्याला भारतातल्या वडापावची चव नसली तरीही नेहमी घरी करण्यापेक्षा तिथे गरम वडापाव आणि चहा खाण्यातच समाधान वाटले होते. ;)
- Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे
Fri, 07/31/2015 - 20:18
नवीन
काय हे !? मी तेथे गेलो असताना एंन्गेलबर्ग आणि र्हाईनफाल् या दोन्ही ठिकाणचे वडापाववाले संपावर का गेले होते ? णीषेढ ! ;)
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Fri, 07/31/2015 - 21:05
नवीन
मस्स्स्स्स्स्स्त!
- Log in or register to post comments
ज
जुइ
Fri, 07/31/2015 - 23:19
नवीन
हा भाघही चांगला झाला आहे. धबधब्याचा फोटो आवडला!
- Log in or register to post comments
स
सुधीर कांदळकर
Mon, 08/03/2015 - 13:32
नवीन
धबधबा चारही चित्रे आवडली. पिलाट्स कुल्म खरेच कल्मिनेशन होते.
स्विस पर्यटन झिंदाबाद.
धन्यवाद, पुभाप्र.
- Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे
Tue, 08/04/2015 - 22:18
नवीन
अत्रुप्त, जुइ आणि सुधीर कांदळकर : धन्यवाद !
- Log in or register to post comments
प
पैसा
Wed, 08/05/2015 - 08:57
नवीन
खूप छान लिहिलंय! फोटो तर नेहमीप्रमाणे अप्रतिम आहेतच!
- Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी
Wed, 08/05/2015 - 22:44
नवीन
हा भागही खूप आवडला.
लहानपणी शाळेत 'मी पाहिलेले अमुक अमुक' असे निबंध लिहिताना 'केल्याने देशाटन मनुजा चातुर्य येतसे फार' ही ओळ लिहिली जायची. ही लेखमालिका त्या ओळीचे माहात्म्य पुन्हा एकदा पटवून देत आहे.
या लेखातला शेवटचा भाग विशेष भावला.
- Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे
Wed, 08/05/2015 - 22:49
नवीन
पैसा आणि श्रीरंग_जोशी : अनेक धन्यवाद !
- Log in or register to post comments
अ
अरुण मनोहर
Sat, 08/08/2015 - 07:38
नवीन
वाह! मजा आली वाचायला! फ़ोटो पण उत्तम !
- Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे
Sat, 08/08/2015 - 12:35
नवीन
धन्यवाद !
- Log in or register to post comments
भ
भटक्या फोटोग्राफर
Fri, 12/08/2017 - 22:07
नवीन
२०१३ ला धबधब्यास दिलेली भेट आठवली त्या आठवणी ताज्या झाल्या . गेलो तेव्हा काही जण मासे पकडायला गळ टाकून निवांत बसले होते बरोबर कॉफीचा मग घेऊन.
- Log in or register to post comments