पॉर्न साइट्सवरील बंदी ; किती योग्य, किती अयोग्य ?
राम राम मंडळी. मंडळी शतशब्दकथांच्या स्पर्धेच्या गर्दीत पॉर्नसाइट्सच्या बंदी विषयी काथ्याकुट आज येईल, उद्या येईल अशी वाट पाहात बसलो. रविवार उजाडला तरी अजूनही काही काही हालचाल दिसेना म्हटलं आपणच काथ्या घ्या आणि कुटा.
मंडळी. पॉर्न साइट्सवर बंदी आणि पुन्हा सरकारने विरोधात उमटणार्या पॉर्न विरोधातील बातम्यामुंळे हलकेच चोरपावलांनी मागे येत ''चाइल्ड पॉर्न आणि ब्ल्यू फिल्म'' सोडून सर्व एडल्ट्स साइटवर बंदी हटविण्याचा निर्णय घेतला. सरकारने घोषणा केलेले असली तरी आता मोबाईल वर अशा साइट्स आता जवळ जवळ ब्लॉक केल्याचे दिसते. अश्लिल चित्रे, अश्लिल व्हिडियोज, अश्लिल लेखन, यामुळे समाजात वाईट परिणाम होतो म्हणजे कामुकता वाढते आणि स्त्रीयांना सार्वजनिक ठिकाणी वावरणे कठीण जाते आणि विविध अशी कारणे सांगितली जातात. विशेषतः लहान मुले अशा साइट्सवर रमु लागली तर काय परिणाम होईल असा एक विचार मांडला जातो.
लहान मुला -मुलींच्या शरीराची जसजशी वाढ होत जाते तस तसे शरिरात अनेक बदल होतात आणि मग परस्पर भिन्न लिंग आकर्षण, उत्सुकता, यातून चित्र, व्हिडियोमधे, अश्लिल लेखन यात एक आनंद मिळायला लागतो. अशा माहितीतून विकृतीच निर्माण होते याचा काही माझ्याकडे विदा नाही. पण, अशा माहितीतून काही गैरसमज, भितीही दूर होते असे मला वाटते.
आजच्या इतकं जाल जेव्हा मुक्त नव्हतं तेव्हा मुलांमधे कोणाच्या घरची मंडळी कुठे बाहेर गेलेली असली की अशा व्हिडियोज पाहण्याचा प्रचंड आटापिटा असायचा. आश्चर्य, भिती, न्युनगंड निर्माण व्हावा अशा प्रकारचे व्हिडियोज बघण्याची एक क्रेज असायची. लेखनातही असे लेखन आलं की दम घ्यावा लागायचा. मला आठवतं. मला शिकत असतांना अभ्यासक्रमाला ना.धो. महानोरांची 'गांधारी' नावाची कादंबरी होती. या कादंबरीतील नायिका केळीच्या बनात स्वतःला निर्वस्त्र करुन स्वतःच्या शरिराकडे बघते आणि लेखनाने त्या शरीराचं एकुण वर्णन त्यात केलेलं होतं. वाचतांना मला कोणी पाहात तर नाही, इतकी भिती वाटल्याचे स्मरते. बाकी अजून काही पुस्तकांवर तर बोलायलाच नको. कारण संस्काराखाली आपण दबले गेलेले असल्यामुळे अशा विषयावर चर्चा तरी कशाला करावी, असाही विचार येऊ शकतो. वेरुळ लेणीतील काही शिल्प, खजुराहो, या शिल्पांकडे बघतांना शिल्प अश्लिल आहेत म्हणुन पाहावे की कला म्हणुन पाहावे असाही विचार येऊ शकतो. अशीच बंदी घालावी लागत असेल तर भविष्यकाळात या शिल्पांवर काळा पडदा टाकावा लागेल.
आता संकेतस्थळे वाढली. आंतरजाल आता सर्वांच्या घराघरात पोहचले आहे. चित्रपट, मालिका, यातून माणसांवर जे काही परिणाम व्हायचे ते होतातच, ते जसे थांबविता येतात तसे पॉर्न साइट्सच्या बाबतीत किती बघायचं, काय बघायचं याचंही भान असलं पाहिजे. सध्या वाट्सपच्या काळात काय काय व्हिडियोज येतात ते काही सांगायची गरज नाही. आपण बघतो पण दुसर्यांनी बघु नयेत. एकुणच जालमुक्त झालंय. समाजावर अश्लिल साइट्स खरच परिणाम करतात का ? त्याच स्वरुप कसं आहे ? सरकारची बंदी किती योग्य आणि किती अयोग्य त्यासाठी हा काथ्याकुट प्रपचं. (भाजप सरकार, काँग्रेस सरकार इकडे चर्चा घेऊन जाऊ नये)
💬 प्रतिसाद
(211)
स
सव्यसाची
Mon, 08/10/2015 - 09:54
नवीन
केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालायामध्ये दिलेले उत्तर:
http://www.ndtv.com/india-news/cant-be-present-in-everyones-bedroom-centre-to-supreme-court-on-banning-porn-sites-1205677?pfrom=home-lateststories
On a petition asking for a ban on porn sites, the government today told the Supreme Court that while child pornography must be banned, "we cannot be present in everyone's bedroom."
Attorney General Mukul Rohtagi said that a larger debate was required in the society or in Parliament on banning porn.
"However we cannot become a totalitarian state," the government's top lawyer said.
- Log in or register to post comments
म
मदनबाण
Mon, 08/10/2015 - 10:24
नवीन
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- लिख्खे जो खत तुझे, वो तेरी याद में हज़ारो रंग के नज़ारे बन गये... :- Kanyadaan
- Log in or register to post comments
आ
आनन्दा
Mon, 08/10/2015 - 12:29
नवीन
जरा विस्तारून सांगितलेत तर बरे होईल.. व्हिडिओ बघता येत नाही..
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 08/10/2015 - 13:15
नवीन
चित्रफितीत काय म्हटलेलं आहे ते लिहून मग दुवा दिला पाहिजे असे मला वाटते.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर
Mon, 08/10/2015 - 17:37
नवीन
मी दुसरा व्हिडीओ पाहिलाय. त्याबद्दल थोडक्यात सांगते.
ह्या मनुष्याने पॉर्न का पाहु नये हे सांगितलं आहे. त्याचं लॉजिक असं की शेवटी जेव्हा तुम्ही पॉर्न पहाता तेव्हा डिमांड तयार करता. मग अजुन बायका मुलींचं ट्रॅफिकिंग केलं जातं. कुणाचंही स्वप्न पॉर्नस्टार बनणं नसतं. ह्या बायका ह्यात नाईलाजास्तवच असतात. पुढे ह्यांच काय होतं. शक्यतो दुर्दैवी मृत्युच. रोग लागुन, कुणीतरी मारलं म्हणुन किंवा आत्महत्या. अथवा "सोशल डेथ" - म्हणजे तुम्ही वेश्येकडे जाऊन येणार्यासोबत हॉटेलात जाल, पण वेश्ये सोबत नाही. तिच्यासाठी ही सोशल डेथ आहे.
जेव्हा पॉर्न बनवलं जातं तेव्हा त्यात काहीही इमोशन्स नसतात. कथा नसते, फोकस असतो "पेनिट्रेशन". ते कसं नीट दिसेल ह्यासाठी तशा हिशोबानेच कॅमेरा असतो. ते ब्लॉक होऊ नये म्हणून पुरुष स्त्रीला हात न लावता अवघडुन उभा असतो. ती पण अवघडुन पोझ घेऊन असते. प्रत्यक्षात असं होतं का? एखाद्याला हातही न लावता आपण संबंध ठेवतो का?
पॉर्नमधली अजुन एक गोष्ट म्हणजे (जनरली) पुरुषाचे स्त्रीवर केलेले "डोमिनेशन". पॉर्नपाहुन हीच भावना वाढीस लागते.
पॉर्न पाहुन कल्पनाशक्तीवर त्याचा परिणाम होणं हा एक मुद्दा त्याने मांडलाय. आपण २० मिनिटं जर एखादी फालतु गोष्ट पाहिली तरी आपल्या मनात त्याचे विचार यायला सुरवात होते. गरज नसताना आपण तशा कल्पना करु लागतो. मग जर पॉर्न बघत राहिलो तर तसेच विचार येणार नाहीत का?
मी हा व्हिडिओ पाहुन बरेच दिवस आले. काही मुद्दे सुटले असतो. पण बघण्यासारखा आहे हे नक्की.
- Log in or register to post comments
फ
फुलथ्रॉटल जिनियस
Mon, 08/10/2015 - 13:23
नवीन
इंडीयन जर्नल ऑफ सायकॉलॉजील मेडीसीन या प्रथितयश नियतकालिकात ,पोर्नोग्राफी आणि लैगिक गुन्हे यावर बेंगलोरस्थित संस्थेने केलेला स्टडी प्रसिद्ध झाला आहे.त्यांचे कन्क्लुजन असे आहे की पोर्नचा आणी लैगिक गुन्हांचा फारसा संबंध नाही.
http://www.ijpm.info/article.asp?issn=0253-7176;year=2014;volume=36;issue=2;spage=147;epage=152;aulast=Math
Conclusion: Results
presented needs to be interpreted with extreme care and
caution. Nevertheless, the results from this study suggest
that easy access to pornography did not have a significant
impact on rape rates and crime rate against women.
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Mon, 08/10/2015 - 13:50
नवीन
कसे आहात?
आज जर वेळ असेल तर, http://misalpav.com/comment/reply/31763/712577, ह्या प्रतिसादात उल्लेख केलेला,
"शिवरायांच्या बदनामीचे कटकारस्थान कसे घडले याचे दाखले येतील,"
असा उल्लेख आहे.
तर कृपया "शिवरायांच्या बदनामीचे कटकारस्थान कसे घडले?" विषयी जरा सांगाल का?
आपलाच,
मुवि.
- Log in or register to post comments
ग
गवि
Mon, 08/10/2015 - 14:07
नवीन
सर्वत्र "सरकारकडून बंदी" असा शब्द वापरला जातोय. ही शब्दरचना केवळ इंटरनेटवरच्या साईट्सविषयी योग्य ठरेल.
एरवी तश्यासुद्धा सरळसोट पॉ र्न म्हणता येईल अश्या चित्रफिती भारतात कायदेशीर नाहीच आहेत. समजा त्यांना सेन्सॉर बोर्डातर्फे विशिष्ट A+ किंवा तत्सम रेटिंग देऊन रीतसर बाजारात येऊ दिल्या आणि (जसं दारु लहान मुलांना विकण्यावर बंदी आहे तसं) काहीतरी करुन विक्री फक्त प्रौढांनाच केली गेली तर कदाचित जास्त रास्त पर्याय स्वीकारल्यासारखं होईल. कंटेंटही नियंत्रणात ठेवता येईल.
- Log in or register to post comments
द
द-बाहुबली
Mon, 08/10/2015 - 18:46
नवीन
A++ रेटींग देउनही काही उपयोग नाही कारण मुळातच कोणतेही रेंटीग प्रदर्शकाला लागु करता येउ शकते, दर्शकाला नाही.
दर्शकावर बंदी लागु करणे अक्षरशः अशक्य आहे. उदा. समजा एखाद्याने फेसबुकवर आक्षेप घेण्याजोगी कमेंट टाकली आणी मी ती वाचली तर गुन्हा अर्थातच कमेंट पोस्ट करणार्यावर दाखल होणे उचीत आहे ती वाचणार्यावर न्हवे....
...अगदी नेमके हेच तत्व पोर्न कंटेंटला लागु आहे. व कायदाही हेच सांगतो, ज्याने ते ठेवले आहे दोष त्याचा आहे. पहाणार्याचा नाही. वर गंमत अशी आहे की त्याने ते स्वतःच्या राखीव जागेत ठेवले आहे दुसर्याच्या नाही... म्हणजे झाली का बोंब ? (भलेही पहाणारा स्वतः क्लिक करुन तेथे जातो हा युक्तीवाद केला तरी.) याच कारणाने आज ११ वर्षाचं कार्टं त्याच्या मोबाइलमधे पोर्न क्लिप डाउनलोड करुन ठेवत असेल तर त्याला गुन्हा ठरवता येत नाही. तो फक्त दर्शक आहे प्रदर्शक न्हवे. अर्थत जर त्याने ती इतरांना सेंड केली नाही तरच, अर्थात त्याने सेंड केली तरी त्याची तक्रार कोण करणार ? तो त्यांनाच सेंड करणार ज्यांना ती हवी आहे... ज्यांना नकोय त्यांना सेंड केली की बुडाला फटके बसलेच समजा :)
असो, दर्शक जेव्हां एखादे मनोरंजन वारंवार बघतो तेंव्हा त्याला एकसुरी ठरवतो व त्याला तो कंटाळतो आणी त्यात वैवीध्य आणायचा प्रयत्न करतो. हा एकसुरीपणा अॅडीक्शनमुळे(वारंवारतेमुळे) निर्माण झाला असेल तर त्याविषयाबाबत जिवाच्या संवेदना हमखास बोथट झाल्या(होत गेलेल्या) असतात... अन एकदा कोणत्याही भावाप्रती/ विषयाप्रती संवेदना बोथट झाल्या की त्यात योग्य काय अन अयोग्य काय हे कसल्याच पातळीवर ठरवता येणे अशक्य बनुन जाते... तीथे स्विकृती अन विकृती कसलाच फरक नाही. म्हणून.. विक्रुतीला गिर्हाइक नाही असेही कधीच होणार नाही...
मग... काय करावे बरे ? यावर मिपाजनांचा काथ्याकुट हवाच.
- Log in or register to post comments
प
पैसा
Mon, 08/10/2015 - 19:01
नवीन
प्रतिसाद आवडला.
- Log in or register to post comments
स
सव्यसाची
Mon, 08/10/2015 - 17:57
नवीन
जॉन ऑलिवर याचा लास्ट वीक टूनाईट हा शो कायमच आवडतो.
भारतात पोर्न साईटस वर बंदी घातली त्यासाठीचा दोन मिनिटाचा शो: https://www.youtube.com/watch?v=bepS_JMBcck
तसेच अमेरिकेमधील सेक्स एज्युकेशन बद्दलच त्याचा नेहमीचा एपिसोड: https://www.youtube.com/watch?v=L0jQz6jqQS0
- Log in or register to post comments
म
मितान
Mon, 08/10/2015 - 19:01
नवीन
लेखाच्या नि खरेंच्या प्रतिसादाच्या आशयाशी सहमत.
>>>विकृत स्वरुपात पॉर्न (बलात्कार किंवा लहान बालकांबरोबर किंवा प्राण्यांबरोबर संभोग सारखे ज्यात त्या दुसर्या पक्षाच्या समती विरुद्ध संभोग केला असेल) यावर बंदी असावी याचे कारण या गोष्टी जगमान्य आहेत असा तरुण संवेदनशील मनांचा गैरसमज होण्याची शक्यता असते किंवा बलात्कार करण्यात गैर काही नाही असे वाटू शकते. >>>
यासाठी +१००
मुलांनी या साइट्स बघण्या न बघण्यावर आपण पूर्ण नियंत्रण ठेवू शकत नाहीत. त्याचे दुष्परिणाम झालेल्या केसेस खूप मोठ्या संख्येनी पाहण्यात आहेत. अॅडिक्शन लेवलला पोहोचलेला एक तरुण मुलगा आत्महत्येच्या दारातून परत आलेला पाहिलाय. १२ वर्षाच्या मुलाने साइट्स बघून शाळेत केलेले प्रयोग पाहिलेत. न्यूनगंडाने पछाडलेल्या आणि त्यातून डिप्रेशन मध्ये गेलेल्या मुली पाहिल्यात. लग्नानंतर जोडप्याच्या भिन्न लैंगिक आकांक्षा मॅच न झाल्याने घटस्फोट पाहिलाय. वि़कृत संभोग बघून त्यानुसार अमानुष लैंगिक छळाला कंटाळून हे कोणाशी शेअर न करू शकलेली एक मुलगी आत्ता समोर आहे. या सगळ्यामध्ये पोर्नोग्राफी बघणे हा धागा समान होता. संभोगाबद्दलची धारणा तयार करण्यात या फिल्मस् चा मोठा प्रभाव होता. यापैकी कोणीही निरामय लैंगिक जीवन जगूच शकत नाही.
अश्लील आणि विकृत विडिओ क्लिप्स, फोटो, व्हाट्सप वर बघणे ढकलणे यातून सर्वच बाबतीतली संवेदनशीलता कमी व्हायलाच हातभर लागतोय असं मनापासून वाटतं. मेंदूचं कंडिशनिंग होताना नकळत वाईट गोष्टींबद्दलचा रेजिस्टन्स कधी कमी कमी होत जातो ते कळतही नाही. आपल्यापेक्षा लहान मुलांमध्ये याचा वेग प्रचंड जास्त आहे.
म्हणून माझ्या मते जोवर अशा गोष्टी निरामयतेने वापरण्याचा विवेक आपण रुजवत नाही तोवर यावर बंदी हवी. किमान या साइट्स पेड साइट्स असाव्या.
- Log in or register to post comments
प
पैसा
Mon, 08/10/2015 - 19:03
नवीन
प्रतिसाद आवडला. पेड साईट्स निदान मुलांपर्यंत आताच्या इतक्या मोठ्या प्रमाणात पोचू शकणार नाहीत.
- Log in or register to post comments
क
कहर
Tue, 08/11/2015 - 13:07
नवीन
या साईट्स पेड केल्या तर अक्खा पगार बारगर्ल वर उडवणाऱ्या सारखे आक्खा पगार पोर्न साईटवर उडवणारी पिढी अस्तित्वात यायला वेळ लागणार नाही.
- Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे
Mon, 08/10/2015 - 19:50
नवीन
मानवी नीतिमत्तेच्या सीमारेखा या स्थल-कालाप्रमाणे बदलत राहिलेल्या आहेत... त्या सीमारेखा एकाच कालात अनेक स्थलांवर वेगवेगळ्या असू शकतात, असतात. शिवाय, एकाच काल-स्थालाच्या जोडीमध्येही या सीमारेखा ओलांडून अलिकडे-पलिकडे जाणारे बरेच बहिर्गामी (आउटलायर) मतप्रवाह असतातच. मानवी इतिहासात, या सीमारेखा कधीच आखीव-रेखीव नव्हत्या आणि (मानवी स्वभावातील विविधता पाहता) त्या तशा राहू शकतही नाहीत.
ज्या गटाचे मत सद्य वस्तूस्थितीत इतर सर्व गटांवर जेव्हा आणि जितक्या प्रमाणात मात करू शकते तेव्हा त्या गटाच्या मताप्रमाणे ही सीमारेखा बदलत राहते.
उदा: तीन चार दशकांपूर्वी, "कोणत्याही प्रकारच्या पोर्न वर बंदी" या विषयावर न्यायालयाने फारशी चर्चा न करता, खटला बंदीच्या बाजूने निकालात काढावा, असे मत दिले असते आणि बहुसंख्य लोकांना त्यामुळे मानवी अधिकारांवर घाला घातला गेला आहे असे वाटले नसते... हे जेवढे भारतात शक्य होते, तितकेच ते पाश्चिमात्य देशांतही शक्य होते* ! शिवाय, त्याकाळी तसा निर्णय न्यायालयाने दिला नसता तरच लोकांना धक्का बसला असता आणि (त्याचा आपल्या मतांवर कितपत विपरीत परिणाम होईल या विचाराने) राजकीय धुरीणांना घाम आला असता व त्यांनी मतदारांच्या नाराजीने आपल्यावर गंडांतर येऊ नये या दिशेने कायदे बदलण्याची तयारी सुरू केली असती !
थोडक्यात, मानवी नीतिमत्ता ही स्थल-कालसापेक्ष संकल्पना असते... किंवा दुसर्या शब्दांत "सतत बदलणारी अस्थायी (टेम्पररी) आणि स्वरूपविहीन (फॉर्मलेस) गोष्ट आहे"... पण अश्या अनेक संकल्पनांवर माणसे जीव टाकतात; आणि तिच्यासाठी जीव देतात व घेतात... हे बहुतेक लोकांना पटते आणि ज्यांना पटत नाही त्यातले बहुतेक (कुरबुरत का होईना पण) सहन करतात... ही वर्तणूक मानवप्राण्यातच दिसते, किंबहुना हीच गोष्ट मानवाला इतर प्राण्यांपासून वेगळी करते !
यासंदर्भात, दुसरे सार्वकालीक मानवी सत्य हे आहे की, ज्या गोष्टींविरुद्ध कडक बंधने असतात त्याच गोष्टींचा फायदेशीर काळाबाजार होऊ शकतो ! याबाबत अधिक काही विषद करण्याची गरज नाही.
======
* : किंबहुना, धर्माच्या नावाखाली लैंगीक कारणांमुळे जेवढे "कायदेशीर" बळी पाश्च्यात्य देशांच्या इतिहासात गेलेले आहेत तेवढे बाकी सर्व जग मिळूनही गेलेले नसतील. परंतू, आजकाल आपण त्यांच्याकडून लैंगिक नीतिमत्तेचे धडे घेत असतो, हे उपरोधिक वाटले तरी सत्य आहे !
======
अवांतरः
विकीवर शोध घेतला तर हिंदीत रतिचित्रण (pornography) या विषयावर लेखन दिसले नाही. पण, मराठीत त्रोटक का होईना (जेमतेम अर्धे पान) माहिती आहे. म्हणजे "या विषयांत मराठी भाषिक हिंदी भाषिकांच्या पुढे आहेत" असे समजावे का ? :)
======
- Log in or register to post comments
म
माहितगार
Tue, 08/11/2015 - 07:45
नवीन
तुमच्या कॉमेंट नंतर हिंदी विकिवर शोध घेतला वेगळ्या शीर्षकाने तेथेही जवळपास मराठी विकिपीडिया एवढेच ज्ञानकोशीय लेखन झालेले आहे. कदाचित कोणता प्रदेश कोणत्या शोधात पुढे आहे हे पहाण्याचा अधिक चांगला मार्ग म्हणजे गूगल ट्रेंड्स असेल. विकिपीडिया इंग्रजी असो हिंदी अथवा मराठी लैंगिकता विषयक लेखपानांना वाचक मोठ्या प्रमाणावर भेटी देतात नाही असे नाही, तरीही प्रोपोर्शनेटली त्या प्रमाणात विकिपीडियांवर या विषयावरचे मजकुर उर्वरीत आंतरजालापेक्षा फारच कमी भरतो. बहुधा ज्ञानकोशीय परिघाच्या ज्ञानकोशीय उल्लेखनीयतेच्या, कॉपीराइट, आणि ससंदर्भ लेखन करण्याच्या मर्यादा /अटींमुळे असेल अथवा ऑदरवाईजही मानवी जिज्ञासेला इतर माहिती आणि ज्ञानाचीही तेवढीच भूक असते म्हणून असेल विकिपीडियावरील लेखक मंडळी विकिपीडियावर अभिव्यक्ती स्वांतंत्र्यविषयक अडथळे/बंधन फारसे नसूनही लैंगिक विषयांवर इतर विषयांशी तुलना करता फार कमी लेखन करताना दिसतात. रादर कुणाला लैंगिक वाचनाची सवय कमी करून घेण्यासाठी लक्ष डायव्हर्ट करून घ्यायचे असेलतर विकिपीडियावर लेखन हा एक उत्तम रचनात्मक रामबाण उपाय ठरावा.
- Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे
Tue, 08/11/2015 - 08:04
नवीन
माझ्या प्रतिसादातले अवांतर इतके गंभीर नव्हते, ते एक थोड्याश्या विकीउत्खननानंतर केलेले विधान होते, म्हणुनच ते अवांतरात आणि स्माईलीसह टाकले होते ! :)
- Log in or register to post comments
म
माहितगार
Tue, 08/11/2015 - 09:54
नवीन
तुमचे बरोबर आहे मला विकि जाहिरातीची आयती संधी मिळाली आणि मी ती साधली एवढेच :)
- Log in or register to post comments
व
विकास
Mon, 08/10/2015 - 20:30
नवीन
सर्व प्रथम, पॉर्न म्हणून नाही तर सरकारने एकंदरीतच नैतिकतेचा आव आणून पोलिसी (moral policing) करू नये. त्या अर्थाने असल्या वाईटसाईट :) म्हणत बंदी घालू नये असे म्हणेन. पण मग हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य बाँब कसे करावेत, गोळ्या कशा माराव्यात, अमली पदार्थ कसे सेवावेत असल्या साईट्सना पण लागू करायचे का? हा एका वेगळ्या चर्चेचा मुद्दा होऊ शकतो. पण तुर्तास विचार करायला लावायला म्हणून प्रश्न विचारतोय इतकेच. नक्की मर्यादा कुठे आणि कशी असावी?
पॉर्न पहाणे चांगले आहे का वाईट हा माझ्या लेखी मुद्दा नाही. ज्याला जे आवडते ते इतरांना त्रास न देता आणि प्रस्थापित कायदा न मोडता करता येत असले तर करता यावे. "मला पॉर्न बघणे आवडते" अथवा "मला पॉर्न बघणे आवडत नाही" - यातील कुठलेही वाक्य म्हणणारी व्यक्ती जो पर्यंत स्वतःपुरतेच बोलत आहे आणि दुसर्याला (आपल्यासारखे नाही म्हणून) तुच्छ लेखत नाही तो पर्यंत सगळे उत्तम आहे. उगाच इतरांना काय आवडते अथवा काय आणि का आवडायला पाहीजे ह्यावर मते मांडणे म्हणजे सरकारने नव्हे तर पब्लीकनेच इतरांच्या खाजगी बेडरूम्स मधे प्रवेश करण्यासारखे वाटते. असो.
आता सरकारने पॉर्नवर बंदी आणली असे कुठेही आधी देखील म्हणले नव्हते. आता तर त्यांनी भुमिका अतिशय स्पष्ट केली आहे. त्यासंदर्भात दोन गोष्टी वाटतातः जर व्यवस्थित संवाद साधला नाही तर गैरसमज वाढतील. तसेच जर काही निर्णय घेयचाच असेल तर तो स्पष्टपणे घ्यावा आणि चर्चा होउंन द्यावी... पण असल्या अराजकीय गोष्टीसंदर्भात संवाद न घडवून जेंव्हा काहीतरी (दुसरा शब्द सुचत नसल्यामुळे) पुचाट निर्णय घेतले जातात तेंव्हा सरकार आणि सरकारातील निर्णयशक्ती असलेले हे मुद्दामून तर (वेडा बनके पेढा) करत नसावेत न असे वाटते. या प्रकरणात तमाम स्वयंघोषित तथाकथीत लिबरल थयथय नाचायला लागले. त्यात त्यांचे आणि त्यांना कव्हर करणार्या माध्यमांचे लक्ष इतरत्र हलवण्याचा तर हेतू नसावा ना? असल्यास आणि त्याला जर हे बळी पडले असले तर पडूंदेत झालं. ;)
दुसरा मुद्दा वर एक दोन ठिकाणी प्रतिसादांमधे आलेला आहे. मला वाटते वर एक टेडएक्सचा दुवा पण आहे. सर्वाचा मतितार्थ या चित्रिकरणात वापरल्या जाणार्या (विशेष करून) स्त्रिया. त्यांच्यावर कसे अत्याचार केले जातात अथवा कसे पळवून आणून या कामाला लावले जाते या संदर्भात त्यात चर्चा आहे. वादापुरते आणि सांख्यिकीच्या तत्वाने असे म्हणूयात की किमान काही स्वेच्छेने येत असतील. पण तसे १००% जाउंदेत पण बहुतांशी म्हणणे पण धार्ष्ट्याचे ठरेल. म्हणजे एकीकडे त्या स्त्रीयांना कसे फसवले या कडे दुर्लक्ष करत पॉर्न बघण्याचे समर्थन करायचे, आणि दुसरीकडे निर्भयाच्या नावाने मेणबत्त्या लावत नक्राश्रू ढाळायचे...
माझं म्हणणं आहे, त्यापेक्षा जर कुणाला हौसच असेल तर या विषयातील पुस्तके - कथाकादंबर्या वाचाव्यात. त्या निमित्ताने कुणाचा गैरवापर केलेला पहावा लागणार नाही, कल्पनाशक्ती वाढेल आणि स्क्रिन टाईम कमी होऊन वाचायची आवड लागेल, सवय होईल. ;) कधी ना कधी त्या सवयीचा योग्य उपयोग देखील होईल. (वैधानिक इशारा: हा परीच्छेद उपरोध आहे. सल्ला म्हणून घेऊ नये!)
- Log in or register to post comments
अ
अर्धवटराव
Mon, 08/10/2015 - 21:17
नवीन
तसंही बंदी घालण्यात, व ति उठवण्यात सरकारी धुरीणांनी फार काहि बुद्धी खर्च केली असं वाटत नाहि.
मुळात या सामाजीक प्रश्नाला समाजानेच उत्तर शोधुन अगदी शेवटी कायद्याचं अस्तर लावणं ठीक होतं. पण इथे मडकं भट्टीत नीट भाजलच नाहि, तर त्यात पाणि भरण्यावर अंकुश ठेवुन काय फायदा.
बाकि या सर्व प्रकरणात (सो कॉल्ड) पुरोगाम्यांनी परत आपली जी बौद्धीक दिवाळखोरी दाखवली त्याकरता त्यांचं अभिनंदन करायलाच हवं. या बंदी प्रकरणाचा थेट खजुराहो वगैरे शिल्पांशी संबंध जोडुन काय काय सर्कस चालली आहे.
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Mon, 08/10/2015 - 23:52
नवीन
खालील मुद्दे वरील काही प्रतिक्रियांमधेही आले असतीलच.
१. सरकारतर्फे केलेला स्टंट पाहता 'पोर्न साइट्सवरील बंदी' हा खप वाढवण्याचा एक प्रकार आहे.
२. पोर्नचे दुष्परिणाम फायद्यापेक्षा हजारो पटीने जास्त आहेत.
३. पोर्न 'फक्त आणि फक्त' खोट्या लैंगिक समस्या निर्माण करून त्यावर खोटे समाधान विकणार्या एका मोठ्या वर्तुळाचा भाग आहे.
४. पोर्न अतिव्यक्तिगत (कल्पनापातळीवर) मनोरंजनात्मक कार्य असेल तर विकृती ठरत नाही पण अभिव्यक्ती स्तरावर (दुसर्या व्यक्तीशी वागतांना) भयंकर विकृती ठरते. तसेच कोण कसे वागेल याची कोणीच खात्री देऊ शकत नाही.
५. पोर्नचा मनावर होणारा अजाणता प्रभाव कल्पनेच्या (प्युअर फँटसी) च्या पातळीवर ठेवणे प्रत्येकाला शक्य होत नाही. बघितले ते करायची इच्छा होतेच होते. त्यातून भयंकर प्रसंग उभे राहू शकतात. व्यक्तिगत पातळीवर असंख्य लोकांना या समस्यांशी काहीही दोष नसतांना सामोरे जावे लागते.
६. 'अजिबात गरज नसतांना उत्पादन फुकट विकायचे, त्यातून जीवनावश्यक गरज बनेल अशी परिस्थिती बनवायची, त्याचा पुरवठा झाला नाही तर अराजक माजेल असे खोटे चित्र तयार करायचे. बंदी-विरोध-जाहिरात यातून अधिकाधिक लोकांपर्यंत पोचायचे. भाव वाढवून अधिक नफा कमवायचा.' हेच सूत्र ऑनलाईन पोर्न इंडस्ट्रीबद्दल आहे.
समांतरः कोणी पोर्नजगतात स्वखुषीने येत नसतो हे वाक्य तद्दन भंपक आहे. कोर्टाने डान्सबारवरील बंदी उठवल्यावर बारमालक असोशिएशनच्या कुणा पदाधिकार्याचे हे एक वाक्य कायम डोक्यात गेलेले आहे. "अब ये लडकीयां इज्जत की रोटी कमा सकेगी".
- Log in or register to post comments
अ
अर्धवटराव
Tue, 08/11/2015 - 00:29
नवीन
पॉर्न जगतात स्वखुशीने येणार्यांचे प्रमाण त्यात नाइलाजाने येणार्यांपेक्षा निश्चितच फार कमि असावं. शिवाय, एकदा त्यात पडल्यानंतर उत्तरायुष्याचे प्रश्न इतर व्यवसायीकांपेक्षा जास्त गंभीर असावेत.
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Tue, 08/11/2015 - 00:56
नवीन
पॉर्न जगतात स्वखुशीने येणार्यांचे प्रमाण त्यात नाइलाजाने येणार्यांपेक्षा निश्चितच फार कमि असावं
अक्षरशः कुठल्याही व्यवसायाबद्दल खरे ठरेल असे हे वाक्य आहे पण लैंगिक व्यवसायांशी निगडीत व्यावसायिकांबद्दल नेहमीच वापरले जाते. हे विधान वेश्याव्यवसायाबद्दल बर्याच अंशी खरे असले तरी पोर्नव्यवसायाबद्दल कितपत योग्य आहे याची नक्की आकडेवारी आपल्या कुणालाच देता येणार नाही. पण ज्याप्रकारे पोर्नजगत आहे किंवा दिसते त्यावरून तरी परिस्थिती नेमकी उलट असल्याचे समजते. त्यांची देशांतर्गत नागरी परिस्थिती, त्यांचे इरॉटीका एक्झीबीशन्स, कलाकारांच्या स्वत:च्या पेड साइट्स, प्रमोशन्स आणि मार्केटींग, इत्यादी पाहता 'शादी बनाके ले गये और पोर्नमें धकेल दिया' असे म्हणणार्या लाजो किंवा सलमा फार क्वचितच असतील असे माझे मत आहे.
एकदा त्यात पडल्यानंतर उत्तरायुष्याचे प्रश्न इतर व्यवसायीकांपेक्षा जास्त गंभीर असावेत.
याची जाण असल्यामुळे कोणी स्वखुषीने यात येत नसेल असं म्हणायला वाव आहे का? कारण पुन्हा एकदा हे विधानही अनेक (प्रतिष्ठेच्या) व्यवसायांबद्दल तंतोतंत खरे ठरते तरी लोक तिथे स्वखुषीने जातात असे दिसते.
तसे बघितले तर पोर्नफिल्म तयार करणे, त्यात काम करणे यासारखे स्वस्त आणि मस्त काम लैंगिकतेशी निगडीत धंद्यांमधे शक्यतो मिळणार नाही. त्यामुळे त्या इतर व्यवसायापेक्षा इथे कमी धोका व जास्त पैसा आहे.
- Log in or register to post comments
अ
अर्धवटराव
Tue, 08/11/2015 - 02:54
नवीन
पॉर्न इंडस्ट्रीची इतर व्यवसायांशी तुलना करतो म्हटलं तर आजघडीला पॉर्न एक व्यवसाय म्हणुन क्वालीफायच होत नाहि...जरी त्याचं टर्नओव्हर इतर व्यवसायांच्या तोंडात मारेल इतकं असलं तरी. त्यामुळे इतर व्यवसायांशी त्याची तुलना साधक बाधकच करायला हवी. अनिश्चीतता, वर्क सॅटीस्फॅक्शन, यश आणि अनुभवाच्या बेरजेचं गणित इ. बाबी लक्षात घेता इतर व्यवसाय स्पायरल आहेत तर आजघडीला तरी पॉर्न टॅण्जण्ट आहे.
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Tue, 08/11/2015 - 03:16
नवीन
तांत्रिक व्याख्या थेट समजल्या नाहीत तरी आशयाशी सहमत आहे.
पण मी फक्त 'व्यवसाय प्रवेश: स्वखुषीने की नाइलाजाने' हा एवढाच निकष लावला आहे. आपली चर्चाही बहुधा त्या निकषावरच आधारित आहे.
बाकी एक व्यवसाय म्हणा किंवा आणि काही, कुणीतरी काहीतरी काम करतो त्याचे त्याला पैसे मिळतात एवढेच बघितले जाते. फक्त शोषणच होत असेल तर त्याला व्यवसाय म्हणता येणार नाही. प्रत्येक व्यवसायाच्या आपल्या खाचाखोचा असतात हा भाग निराळा.
पोर्नमधे शोषण होतं व अक्खी इंडस्ट्री फक्त शोषणाधारित अर्थव्यवस्थेवर चालते असं दिसत नाही. जे वेश्याव्यवसायात प्रामुख्याने आढळून येतं. दोन्हीमधे मूलभूत फरक आहे.
- Log in or register to post comments
ब
बबन ताम्बे
Tue, 08/11/2015 - 14:15
नवीन
समांतरः कोणी पोर्नजगतात स्वखुषीने येत नसतो हे वाक्य तद्दन भंपक आहे.
सनी लियॉनने म्हटल्याचं (म्हणजे पेपरात वाचल्याचं) आठवतंय, की तिने हा व्यवसाय स्वतःहून निवडला म्हणून.
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Tue, 08/11/2015 - 14:18
नवीन
ती ज्या पोझिशनला आहे तिथे पोचल्यावरसुध्धा तिने तिच्यावर जबरदस्तीने या व्यवसायात यावे लाग्ले असे म्हटलेले नाहीये
- Log in or register to post comments
स
स्पंदना
Tue, 08/11/2015 - 01:38
नवीन
नक्की काय लिहावं हा एक मोठा प्रश्न आहे. उलट सुलट प्रतिक्रिया, ह्यावं अन त्यांव!!
यात एक मुद्दा विचार करण्याजोगा आहे, पण तोसुद्धा अर्धा आहे. पै ने विचारलय, तुमचा ११ वर्षाचा मुलगा पॉर्न पहाताना सापडला तर तुम्हाला काय वाटेल?
हाच प्रश्न मुलगी हा शब्द वापरुन लिहायची सुद्धा गरज वाटली नाही.
आता पॉर्न!
एकूण जी सगळी चर्चा चाललीय ती हार्ड कोअर पॉर्नबद्दल अस गृहीत धरु. कारण हे प्रकारच सॅडीस्टिक असतात. वर दिलेलेया एका प्रतिसादात लोकसत्ताचा लेख चांगला वाटला अस लिहीलं आहे. नक्की काय आवडल असावं त्या लेखात? बढाया? मी माझ्या घरात काय करतो/करते याचा सरकारशी संबंध नाही म्हणताना, निवांत त्याची पुरोगामी म्हणवून घेण्यासाठी केलेली जाहीर वाच्यता? देव जाणे.
सेक्स एज्युकेशन्साठी पॉर्न ही तर अतिशय हास्यास्पद कल्पना आहे. स्वत:च्या अन भिन्न लिंगी व्यक्तीच्या शरीराबद्दलची स्पष्ट अन सुयोग्य शब्दात दिलेली माहिती म्हणजे सेक्स एज्युकेशन. अस करा अन तस करा हे सांगत नाहीत त्यात. जे काही माझ्या शरीराबाबत घडतय, ते नैसर्गिक आहे याचा अॅश्युअरन्स म्हणजे सेक्स एज्युकेशन, बरोबरीच्यांपेक्षा मी काही वेगळा/वेगळी नाही हा अॅश्यरन्स, अन भिन्न लिंगीयाच्या बद्दलची माहिती समजून घेतल्याने कमी होणारे औस्त्युक्य, या ३ गोष्टी सेक्स एज्युकेशन पुरवत. मग पुढे जाउन यात याचे नैसर्गिक्त्व, अन त्यद्वारे घडणारे प्रजनन. याचे दुष्परीणाम त्यातल्या मुक्त वावराने संभवणारे धोके न रोग हे स्गळ सेक्स एज्युकेशन मध्ये येत!! वाकड्या तिकड्या जिमनॅस्टिकला सुद्धा लाजवतील अश्या हाड मोडणार्या पोझेस नाहीत शिकवत यात. शिक्षण अन त्या मुळे येणारी समज, मनातल्या अधांतरी प्रश्नांची योग्य उत्तरे अन त्याद्वारे कमी होणारे न्युनत्व, एंक्झायटी. भिन्न लिंगीयांच्या शारीरिक बदलांची जाणिव अन पूर्ण माहिती मुळे उगा इकडे तिकडे डोकावण कमी होतं या शिक्षणाने. अर्थात हे झाले साधे सोपे विचार. उगा मिरवायला जाण्याजोग यात काही नाही, त्यामुळे ही बातमी होउ शकत नाही! ;)
मुळात वासना ही नैसर्गिक असते. जशी भूक, तहान, निद्रा! तशीच मैथुन ही भावना. पण झालय काय, तर एक निद्रा सोडली; तर बाकिच्या स्गळ्याच वासनांचे अतिरेकी लाड वाढलेत. भुकेसाठी बर्गर, तहानेसाठी कोक, अन मैथुनासाठी पॉर्न! सगळ अस झटपट!! अन त्याची अतिरेकी चटक. त्या लोकसत्तेच्या लेखात म्हणे पति-पत्नीला उद्दीपित करण्यासाठी पॉर्न मदतीचे ठरू शकते??????? प्रेम, जिव्हाळा, आकर्षण?????? ह्यांच तेरावं घालण्याचा प्रकार आहे हा चक्क!!
शारिरीक गरजांना नाकारणं जसं वाईट, तसच त्यांचा उदोउदो करणं सुद्धा वाईटच. कलासक्त मनाला कोणतीही गोष्ट सजवायला सांगाव लागत नाही, ते मन आपल्या आपण प्रत्येक गोष्टीत सुंदरतेचा प्रत्यय घडवत जाते. एकमेकाच्या सहवासाची ओढ, एकमेकाला पूर्ण सुख देण्याची आस, विश्वास याची कमतरता असणारी जोडपी (विवाहीत) मग अस पॉर्न मुळे उद्देपित व्हायची वाट पहात असावीत. असो.
बंदी घालून कोणतीच वाईट गोष्ट थांबत नाही, पण योग्य जाणीव जागृत करण्याने बराच फरक पडेल. त्यातल्या त्यात सॉफ्ट पॉर्न असायला हरकत नाही, वर कुणी म्हंटल्याप्रमाणे पेड साईटस असाव्यात, ज्यायोगे स्वकमाई शिवाय हे पहाण्याचे धाडस होणार नाही. अनैसर्गिक गोष्टी दाखवायच्या बंद कराव्यात. लहाण अजाण मुलांच्या अस्तित्वाला धोका येउ नये, लहाण मुला-मुलींकडे पहाण्याची नजर बदलू नये एव्हढच एक साध्य व्हावं अस वाटत, बाकी सगळं ज्याच्या त्याच्यापुरत वैयक्तीक!!
- Log in or register to post comments
प
पैसा
Tue, 08/11/2015 - 07:25
नवीन
प्रतिसाद आवडला.
नाही, मुली पोर्न बघत नाहीत वगैरे कोणताही दावा मी करत नाही. किती प्रमाणात बघतात यावर मतभेद असू शकतात. माझा भर "मुलगा" यावर नव्हता. तुमच्या घरातलं ११ वर्षांचं मूल यावर होता. मग तो मुलगा असो की मुलगी.
- Log in or register to post comments
स
स्पंदना
Tue, 08/11/2015 - 08:23
नवीन
प्रश्न तुझ्या लिहिण्याचा नाही पै तै स्विकारण्याचा आहे। ३ दिवसापूर्वी भावाने बहिणीला तिचे वागणे आवडत नाही म्हणून सरळ मारून टाकले। दोघेही कोवळ्या वयाची। म्हणजे घरातल्या स्त्री ने अस काही पाहील तर तुम्हाला काय वाटेल हा प्रश्न सुद्धा सहन होणार नाही अस मला म्हणायचे आहे।
- Log in or register to post comments
प
पैसा
Tue, 08/11/2015 - 08:31
नवीन
आलं लक्षात.
- Log in or register to post comments
अ
अजया
Tue, 08/11/2015 - 03:42
नवीन
प्रतिसाद आवडला.
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
Tue, 08/11/2015 - 03:48
नवीन
आता नीट मुद्देसुद लिहितो. भारतामधे पॉर्नबंदी म्हणा किंवा इतर बंदी का काम करत नाहीत?
पॉर्नबंदी घालणे आणि उठवणे ह्या एका गोष्टीला अनेक पैलु आहेत. कायदेशिर बाजु, व्यावसायिक बाजु, व्यक्तीसापेक्ष बाजु, आर्थिक हितसंबंध आणि सगळ्यात शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे भारतीय लोकांची भिकार वृत्ती.
कायदेशिर बाजुंचा विचार करायचा झाला तर मुळामधे सरकारनी हा निर्णय का घेतला ह्याची कुठलीही कारणं दिलेली नाहित. सार्वजनिक ठिकाणी पॉर्न बघणं किंवा बघायला भाग पडणं हा गुन्हा "पब्लिक इंडिसेन्सी" खाली मोडत असावं. मिपावरच्या कायदे क्षेत्रामधील मंडळींनी ह्याविषयी लिहिणं योग्य ठरेल. ठराविक वयोमर्यादेखालच्या व्यक्तीने अॅडल्ट मटेरिअल हाताळणं (१८-) ह्याला बालगुन्हेगारीखाली जबाबदार धरलं जातं का? समजा एखादी व्यक्ती पकडली गेली तरी चिरीमिरी देउन सुटते. रेल्वे पोलिस मोबाईल्स ची तपासणी करतात अधुन मधुन. किती जणांवर खटले चालवुन शिक्षा झाल्या आहेत? हा अंमलबजावणी करणार्या यंत्रणेमधला दोष झाला.
व्यावसायिक बाजु म्हणाल तर ऑनलाईन पॉर्न वरती किती व्यवसाय आधारित असतील ह्याची काही कल्पना करु शकता? इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर्स, पॉर्न इंडस्ट्रीमधली मंडळी, ब्राउझरवर अॅडव्हर्टाईझ होणारी उत्पादनं ही प्रातिनिधिक उदाहरणं झाली फक्त. एवढे सगळे लोकं हा "ईझी मनी" सहजासहजी सोडुन देतील असं वाटतं नाही. पॉर्नबंदी हटवण्यामागे ह्यामधल्या लॉबीचा दबाव असायची शक्यताही असु शकते. ह्यामधले इंटरनेट लॉबी वाले जे FUP (Fair Usage Policy) नंतर डेटा ला चार्ज असणारे आपले प्लान्स गाळामधे जातील ह्या भितीने कुठल्या थराला जातील ह्याचा भरवसा नाही. आर्थिक हितसंबंधांमधे हयच्या अजुन काही काळ्या बाजु मांडतोचं.
व्यक्तीसापेक्ष बाजु मी वरच्या मुद्द्यात मांडली आहेच. सद्विवेकबुद्धी, पर्सनल चॉईसेस वगैरे वगैरे. एका व्यक्तीचं आयुष्य जोपर्यंत ती दुसर्याला कुठल्याही प्रकारचा त्रास देत नाही तोपर्यंत नियंत्रणाखाली आणायचा नैतीक अधिकार कोणालाही नसावा.
आर्थिक हितसंबंध ही ह्या धंद्यामधली सगळ्यात काळी बाजु:
ह्या इंडस्ट्रीमधे गुंतवणुक कोणाची असते हो? :) ही लोकं स्वत:चे हितसंबंध जपायला काय करतात हे काय नव्याने सांगायला हवं का?
आजपर्यंत सरकारने बंदीचे अनेक निर्णय घेतले. प्रातिनिधिक उदाहरण म्हणुन गुटकाबंदीविषयी बोलु. काय झालं हो गुटकाबंदीनंतर? रुपया दोन रुपयाला मिळणार्या पुड्या सरळ सरळ दहा रुपयाला टपरी टपरीवर मिळायला लागल्या. महसुल/ एफ.डी.ए. ला हि गोष्ट माहित नसेल असं वाटतं? चिर्यामिर्या. पोती भरभरुन चिर्यामिर्या. ह्याला म्हणतात माफियाराज.
परवा पॉर्नबंदी घातली त्यावेळेला नॉर्थ इंडियन स्टेट्समधल्या "धंदे"वाल्यांनी काय करावं? एरवी १००-१५० रुपयाला विकली जाणार्या पॉर्न डीव्हीडीज काळ्याबाजार भावानी विकायला सुरुवात केली. ऑपॉर्च्युनिस्ट्स :P. (ref: सकाळमधली बातमी)
सगळ्यात शेवटी भिकार भारतीय मनोवृत्ती. कायदा केला रे केला की "बिन खड्ग बिना ढाल" वाल्यांचा आधीच चुकीचा असणारा "आदर्श" डोळ्यासमोर आणुन लग्गेचं सविनय कायदेभंग करायला जातील. अरे जिथे लोकांना सिग्नल पाळणं हा अपमान वाटतो तिथे साक्षात पॉर्नबंदी घातली तर पौरुषत्वावर घाला घातल्याचा आव आणुन तावातावाने वाद घालणारे ह्या दोन आठवड्यांमधे ढिगाने भेटले. ज्यादिवशी बंदी घातली गेली तेव्हापासुन ४८ तासांच्या आतमधे ह्या बंदीला प्रॉक्सी सर्व्हर्स वापरुन कसं मोडावं ह्याचे मेसेजेस फेसबुक म्हणा व्हॉट्स अॅप म्हणा सगळीकडे फिरत आहेत. कुठल्या वेबसायटी चालु आहेत ह्याची भली मोठी यादी पाठवली गेली. ह्या समाजप्रबोधनाचा परिणाम काय म्हणे तो? ज्या लोकांची पॉर्न डिक्शनरी १०=१२ वेबसायाटींपुर्ती मर्यादित होती त्यांना ८००-९०० वेबसायटींचा खजिना सापडला. सापडतील का तुम्हाला ह्यापेक्षा भिकार मनोवृत्तीची लोकं कुठं?
त्यापेक्षा कायद्याच्या चौकटीत राहुन लोकांना "हैदोस" घालायची परवानगी असणं काय वाईट आहे? बंदी घाला नाहितर नका घालु लोकं ते बघणारचं.
मला पॉर्न बघायचं किंवा त्यावर बंदी घालणं अश्या दोन्ही गोष्टींचं समर्थन करायचं नाहिये. लाईफ शुड बी ऑलवेज बॅलन्स्ड विथ डार्क डिसिजन्स अँड फेअर डिसिजन्स. अदरवाईज लाईफ विल बी रिडंडंट अँड बोरिंग.
- Log in or register to post comments
अ
अस्वस्थामा
Tue, 08/11/2015 - 13:48
नवीन
मस्त हो चिमणराव.. :)
प्रतिसाद आवडलाय..
अति अवांतर : सा.सं.ची जबाबदारी आल्यापासून चिमणरावांच्या प्रतिसादांची लांबी वाढत चाललीय असे नमूद करतो (ते चांगलंच आहे तरी पण) त्याच बरोबर "लाईफ शुड बी ऑलवेज बॅलन्स्ड विथ डार्क डिसिजन्स अँड फेअर डिसिजन्स. अदरवाईज लाईफ विल बी रिडंडंट अँड बोरिंग" अशी देवनागरीतील इंग्रजी वचने पाहून आम्हास राहून राहून सरांची आठवण येतेय.. ;)
(स्स्सsssर !! अशी आर्त हाक कल्पावी आणि ह.घ्यावे)
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
Tue, 08/11/2015 - 14:32
नवीन
ळोळ!!!
- Log in or register to post comments
श
श्रीकृष्ण सामंत
Tue, 08/11/2015 - 04:14
नवीन
"मनुष्यप्राणी,बोनोबो-एक माकडाची जात आणि डॉलफीन्स हे तीन प्राणी प्रजोत्पत्ति व्यतिरीक्त सेक्स करण्यात लय आनंद घेतात. नव्हेतर माणसाला मेंदुत अचाट कल्पनाशक्तीचं वरदान असल्याने विकृत कल्पनेतून तो प्रचंड आनंद घेऊ शकतो हे दाखवण्यातही तो आनंद घेत असतो."प्रो.देसाई मला म्हणाले.
- Log in or register to post comments
अ
अद्द्या
Tue, 08/11/2015 - 07:14
नवीन
बंदी असावी कि नाही यावर चर्चा आहेच आणि ती चालूच राहील .
माझ्या डोक्यात वेगळाच विषय आहे .
अतीच अवांतर होत असेल तर प्रतिसाद उडवून टाकावा
मुळात या सगळ्याची गरज लहान मुलांमध्ये का तयार होते ? त्यांना योग्य वयात योग्य ती माहिती दिली तर पोर्न बघणं टाळू शकतील का मुलं ? माझ्यामते हो . कारण बहुतेकदा वाढत्या वयातली उत्सुकता हे एकाच कारण असतं . नंतर त्याचं व्यसनात रूपांतर होतं . हो याचं हि व्यसन लागतं.
इथे बरेच पालक आहेत ज्यांनी मुलगी १२-१४ वर्षाची झाल्यावर तिला सध्या तिच्या शरीरात होत असलेल्या किंवा पुढे होणार असलेल्या बदलांबद्दल माहिती दिली असेल किंवा देणार असाल . पण जेव्हा हीच वेळ मुलांच्याबाबतीत येते तेव्हा "समजेल त्याचा तो " असं म्हणून टाळून दिली जाते . (असे लोक माहितीतले आहेत).
एका ओळखीच्या काकांनी मला त्यांच्या सिस्टम वर अडल्ट फ़िल्टर चालू करण्यासाठी बोलावलं होतं . का तर म्हणे त्यांचा सातवीतला मुलगा "काहीबाही" बघतोय . घरातले वडिलधारेच जेव्हा सरळ शब्द वापरून बोलू शकत नाहीत . तर ते मुलांना काय आणि कसं समजावणार ?
- Log in or register to post comments
प
पैसा
Tue, 08/11/2015 - 07:28
नवीन
व्यक्तिस्वातंत्र्याबद्दल बोलणारे बरेचजण या विषयात मुलांबद्दल विचार करत नाहीयेत.
- Log in or register to post comments
अ
अद्द्या
Tue, 08/11/2015 - 07:31
नवीन
"व्यक्तिस्वातंत्र्याबद्दल बोलणारे"
ते फक्त स्वतःच्या प्रसिद्धीचा विचार करतात . मग तिथे इतर valid (मराठी शब्द? ) कायमच गौण ठरत आलेले आहेत
- Log in or register to post comments
प
प्यारे१
Tue, 08/11/2015 - 11:46
नवीन
>>>> व्यक्तिस्वातंत्र्याबद्दल बोलणारे बरेचजण या विषयात मुलांबद्दल विचार करत नाहीयेत.
करवत नसेल!
- Log in or register to post comments
क
कहर
Tue, 08/11/2015 - 07:33
नवीन
सहमत
एखाद्या मुलाला घरीच चांगल्या तेलात केलेले वडे दिले आणि बाहेरचे तेल खराब असते हे त्याच्या मनावर योग्य वेळी बिंबवले तर बाहेरचे वडे खाण्याचा त्याच्या मोहावर बऱ्याच प्रमाणात आळा बसेल. या उलट घरी एखादी गोष्ट ban आहे तर ती का ban आहे हि उत्सुकता आणि ती चोरून करण्याची इच्छा (एखादी गोष्ट चोरून करण्याची नशा वेगळीच असते मग ते चोरून लाडू खाणे असो व प्रेम करणे) यातून अशा गोष्ट फोफावतात (उद. एखाद्याच्या घरी शाकाहारी असतील तर बाहेर जाउन मांसाहार करण्याची सवय).
यावर मानसोपचार तज्ञ जाणकार अधिक माहिती पुरवतीलच
- Log in or register to post comments
अ
अजया
Tue, 08/11/2015 - 07:30
नवीन
अद्दयाच्या मुलग्यांबाबतच्या मुद्दयाबाबत सहमत.माझ्या मुलाशी तो सातवीत गेल्यावर याबाबतीत त्याच्याशी बोलले होते.कदाचित माझ्या वैद्यकीय पार्श्वभूमीमुळे मला त्याच्याशी बोलण्यात संकोच वगैरे वाटला नाही. त्यातच माझ्या घरात चोवीस तास वायफायमुळे नेट अॅक्सेस आहे.तेव्हा मुलाशी काय बघ काय नको हे मला दुष्परिणामांसकट बोलावेच लागले होते.त्याला पासवर्ड न सांगुन अविश्वास ठेवावासा वाटत नव्हता हेही खरं.अगदी याच्या उलट घटना माझ्या एका डाॅ मैत्रिणीच्या मूलाबाबत घडल्यावर मला आपण जे केले ते बरोबरच याची खात्री मुलाच्या बाबालाही पटवता आली!त्याला वाटतं मुलांना सांगावे लागत नाही.आपोआप कळतं सर्व!
तर याच मैत्रिणीच्या मुलाने सातवीत असताना एका वर्गातल्या मुलाच्या मोठ्या भावाने नेटवर लावलेला पाॅर्न व्हिडिओ पाहिला.नंतर मात्र आपण काहीतरी चुकीचं केलंय ,घाण पाहिलंय वाटून घुसमटायला लागला.त्यात त्याला सारखं हात धुण्याची सवय लागली.सारखं गप्प राहतो,हात धुतोय म्हणून चिंतित आईने जवळ घेऊन विचारल्यावर पोरगं रडायला लागलं.आणि सर्व सांगितलं.
त्यानंतर बरेच दिवस त्याचे काऊन्सेलिंग करावे लागले.हे सर्व माझ्या मुलाला मला सांगून त्याच्याशी यावर बोलता आले.
आईवडील मुलाच्या नात्यात तेवढी मित्रता असेल तर मुलांशी यावर बोलता येऊ शकते.बोलावेच.
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Tue, 08/11/2015 - 07:42
नवीन
+ १
- Log in or register to post comments
अ
अद्द्या
Tue, 08/11/2015 - 08:00
नवीन
आईवडील मुलाच्या नात्यात तेवढी मित्रता असेल तर मुलांशी यावर बोलता येऊ शकते.बोलावेच.
अगदी खरं .
पण जसा मी आधीच्या प्रतिसादात किस्सा सांगितला . बव्हंशी पालक सध्या याच विचारांचे आहेत . कि मुलांशी (इथे मुलगा मुलगी हा फरक नाही ) हे सगळं बोलणं म्हणजे काही तरी गंभीर गुन्हा करतोय, एक दोनदा तर योग्य माहिती देणाऱ्या पालकांना हेच लोक "तुम्ही मुलांना लहान वयात बिघडवताय " असं हि ऐकवताना पाहिलंय.
जर योग्य त्या वयात योग्य ती माहिती आणि खरी माहिती (त्याच्याशी निगडीत सगळ्या शारीरिक सामाजिक आणि वैज्ञानिक गोष्टींसहित जर सांगितली ) तर पोर्न काय किंवा इतर व्यसनं काय हि सगळीच टाळता येऊ शकतात . कमीत कमी तो किंवा ती शारीरिक आणि मानसिक दोन्ही बाजूनी २१+ होत नाही तोपर्यंत तरी. त्यानंतर ते काय करतील तो त्यांच्या त्यांचा प्रश्न आहे.
- Log in or register to post comments
स
स्पंदना
Tue, 08/11/2015 - 08:28
नवीन
+१ माझ्या मुलांची टीचर म्हणाली its better to know it from the person they trust, love and rely on instead of getting the wrong impression through Google. आश्चर्य वाटेल पण बऱ्याच श्रीलंकन आया objetion घेत होत्या या विषयावर।
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Tue, 08/11/2015 - 07:47
नवीन
पॉर्न चे फायदे --
वि. सु. - यात पॉर्नचे कुठलेही समर्थन नाही किंवा त्याच्याबद्दल कोणताही आकस नाही. हे त्याचे फक्त वस्तुनिष्ठ वर्णन आहे.
बहुसंख्य व्यक्तींच्या जोडीदाराची शरीरबोली आणी शरीरसौष्ठव हे त्यांना आकर्षित करेल किंवा काळानुसार आकर्षित करून ठेवेल असे राहत नाही (पुरुष नि स्त्रिया दोन्ही).काही काळानंतर आपल्या जोडीदाराच्या शरीराचे आकर्षण कमी झाले/ नाहीसे झाले तर त्या व्यक्तीबरोबर शरीर संबंध ठेवणे हे जास्त जास्त कठीण होत जाते. मानवी मन हे अशावेळेस कल्पनारम्यतेचा( FANTASY) आधार घेत असते. आपल्या जोडीदारा ऐवजी दुसर्या तरुण नट किंवा नटी बरोबर आपण प्रणय करीत आहोत( यात संभोगच असेल असे नाही) अशा कल्पना विलासाचा आधार घेऊन प्रत्यक्ष प्रणय क्रीडा चालू राहू शकते. यावेळेस बायका नवर्याऐवजी दुसर्या तरुण आणी देखण्या पुरुषाची आणी नवरे बायको ऐवजी एखाद्या सुंदर नटीची कल्पना डोक्यात ठेवून शृंगार करत असतात. (सनातनी लोक याला मानसिक व्यभिचार म्हणू शकतील). परंतु हि परिस्थिती ९० % जोडप्यांच्या बाबतीत त्यांच्या आयुष्यात कधीतरी घडतेच.अशा कल्पना विलासाचा मूलाधार अश्लील साहित्य असू शकते. आपली बायको कमनीय आहे किंवा आपला नवरा तारुण्याने मुसमुसलेला आहे आणी तो अर्धा तास "संबंध" ठेवू शकतो अशा तर्हेचा कल्पनाविलास या जोडप्याला एकत्र ठेवण्यास मदत करू शकतो. या कल्पनाविलासामुळे भावनिक/ मानसिक निचरा होण्यास मदत मिळते. सम्भोगासक्ती( मैथुन) हि आद्य प्रेरणा आहे तेंव्हा ती दडपणे हे अनैसर्गिक आहे अशावेळेस कोंडून ठेवलेल्या भावनांचा निचरा होण्यास बरेच लोक पॉर्नचा आधार घेतात हि वस्तुस्थिती आहे. त्याच्या समर्थनार्थ कोणी आमची "कामसूत्र संस्कृतीच" आहे याचा आधार घेतात.
बायको ढिगार्या सारखी पडलेली असते किंवा नवरा बटाट्याच्या पोत्यासारखा कळकट आहे ( हि प्रत्यक्ष रुग्णांनी केलेली वर्णने आहेत) असे असताना संबंध कसा ठेवणार असे प्रश्न रुग्णांकडून बर्याच वेळेस येतात. वंध्यत्वा वर उपचार करताना आपल्या शारीरिक संबंधांची वारंवारता किती आहे? हा एक नैसर्गिक प्रश्न येतोच. हि वारंवारता वाढवणे हे हि आवश्यक आहे. मग अशा वेळेस त्यांना उपाय सांगताना दोघांची शारीरिक आकर्षकता वाढवायचे उपाय सांगण्याबरोबर चावट आणी अश्लील( यात फरक श्रेणीचा आहे) साहित्य वाचणे/ पाहणे हेही सांगावे लागते. पुरुषांची परिस्थिती फारच वाईट असे.(कारण प्रत्यक्ष कार्य पुरुषाला करावे लागते. स्त्रिया थंडपणे पडून राहू शकतात)
बायको लठ्ठ असल्याने आकर्षणच वाटत नाही त्यातून ती कायम घामाने थबथबलेली असते त्यामुळे "इच्छा'च होत नाही आणी "इच्छा" झाली तरीही लिंग ताठरता येत नाही हि परिस्थिती फार वेळा आढळून येते . मुळात लठ्ठ पणामुळे स्त्रीला PCOS(POLYCYSTIC OVARY SYNDROME-- PCOS is the most common endocrine disorder among women between the ages of 18 and 44. It affects approximately 5% to 10% of this age group. It is one of the leading causes of poor fertility स्त्रोत विकी) हा आजार झाल्याने वंध्यत्व आलेले असता हा "अजून" असलेला प्रश्नही( लिंगशैथिल्य) सोडवावा लागतो. त्यातून ज्या दिवशी स्त्रीबीज तयार होईल( हे स्त्रीबीज २४-३६ तासच कार्यक्षम असते आणी यानंतर संबंध केला तर तो निरुपयोगी ठरतो) त्या विविक्षित दिवशी त्यांना संबंध ठेवा हे सांगावे लागते. यामुळे मुळात कठीण असलेला शरीर संबंध हा अजूनच कृत्रिम होतो. अशा वेळेस पुरूषाला उद्दीपित करण्यासाठी चावट आणी अश्लील साहित्याचा वापर करावा लागतो किंवा पुरुषाला कल्पनाविलासाचा( FANTASY) आधार घ्या हे सांगावे लागते. हे कितीही सोपे असले तरी आपली बायको ८७ किलो ची असताना तिला चवळीची शेंग "समजणे" किती कठीण आहे हे जो त्यातून गेलेला आहे त्यालाच विचारा.
गर्भाशयात शुक्राणू रोपण (INTRAUTERINE INSEMINATION) या क्रियेसाठी पुरुषाला वीर्य दान करावे लागते परंतु हस्तमैथुन करून वीर्य देणे हि गोष्ट अपरिचित वातावरणात सोपी नसलेली गोष्ट आहे. १९९४ साली आमच्या वंध्यत्व केंद्राला यासाठी दिलेली खोली जुनी इंग्रजांच्या काळातील होती (३० X २० फुट आणी तिचे छप्पर १८ फुट होते) अशा ठिकाणी तुम्ही कितीही पडदा लावा माणसाला लिंग ताठरता येणे फार कठीण होत असे. अशा वेळेस आम्ही सरकार कडून एक व्हिडियो प्लेयर शैक्षणिक अनुदानातून विकत घेतला आणी अशा उपचारातून यशस्वी झालेल्या पहिल्या माणसाला अश्लील साहित्यःच्या कॅसेट्स "भेट " देण्यास सुचवले.यानंतर अशा १२ कॅसेट आम्हाला भेट म्हणून मिळाल्या होत्या( या कॅसेट चोरीच्या भीतीने कुलुपबंद ठेवाव्या लागत असत). जे लोक त्यातून गेले होते त्या लोकांना त्याची गरज किती आहे ते व्यवस्थित समजलेले होते.
वि सू-- यात कोणत्याही वजनाच्या किंवा आकाराच्या अथवा रंगाच्या व्यक्तींचा अधिक्षेप करणे हा हेतू नसून प्रत्यक्ष आलेल्या अनुभवांचा उल्लेख आहे
मूळ मुद्दा सरकारने त्यात हात घालावा कि नाही हे मी वर दिलेल्या इतर प्रतिसादात माझे मत दिलेले आहेच त्याची द्विरुक्ती नको.
- Log in or register to post comments
ग
गवि
Tue, 08/11/2015 - 07:55
नवीन
अफलातून इनसाईट .. विस्तृत प्रतिसादाबद्दल आभार..
- Log in or register to post comments
अ
अद्द्या
Tue, 08/11/2015 - 08:03
नवीन
+१००
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 08/11/2015 - 08:00
नवीन
प्रतिसाद आवडला.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
च
चौकटराजा
Tue, 08/11/2015 - 09:19
नवीन
फार वर्षांपूर्वी एक नाटक आले होते. लेखक बहुदा सुरेश खरे. त्यात एका पुरूषाला काही लैंगिक समस्या असते . परस्त्रीच्या संबंधातून तो त्या समस्येवर मात करतो असा काहीसा प्रकार त्या नाट्कात होता. वरील कॅसेटचा प्रकार वाचून त्या संदर्भाची
आठवण झाली.
माझ्या निरिक्षणातून असे मी म्हणू शकतो की प्रौढ पुरूषाना असा चित्रपट पाहाण्याचा फायदा होत असतो. यात आपल्या लैंगिक
भागीदाराच्या मर्जीचा सवालच पैदा होत नाही. फक्त १८० ते २४० व्होल्टस चा विद्युत प्रवाह , चित्रफित व स्क्रीन या लहर
नसणार्या गोष्टीचे सहकार्य अपेक्षित असते. कदाचित असा फायदा स्त्रीयाना देखील होत असेल.ज्या देशात असे काही पहाण्याची
मुभा असते त्या देशातील नवराबायकोतील लैंगिक बाबतीतील धुस्फूस व बलात्काराच्या प्रकारांचे प्रमाण कमी असेल तर
वारांगनांप्रमाणे पोर्न ही देखील समाजाची गरज आहे असे म्हणावे लागेल. एक बाब १०० टक्के दिसून आली आहे की
चित्रपट समाजाचे प्रतिबिंब असतो समाज चित्रपट पाहून घडत नसतो.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- ›
- »