Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

सार्वजनिक संभोगालये

स
स्वामी संकेतानंद
Mon, 08/10/2015 - 19:53
🗣 108 प्रतिसाद
काही दिवसांपूर्वी सफदरजंग चा मक़बरा पाहायला गेलो होतो. छान आहे. वीकडे होता. मक़बरा बघायला म्हणून फार कमी लोक आलेले. मला धरून 7. बाकी सगळे कपल्स हिरवळीवर झाडाखाली. मोठा परिसर आहे आणि गर्दी नसते. फारसे कुणी जात नाही.5 रूपयात दिवसभर फूल प्राइवेसी. ऐसी आझादी और कहाँ! मनात आले की दिल्लीतल्या अशा जागांवर एक अभ्यासपूर्ण लेख लिहावा. म्हणजे स्वस्तात मस्त प्राइवेसी कुठे मिळेल ह्याचे रेडी रेक्नॉर बनेल. मराठी पोरे पोरी दिल्लीला जातील तेव्हा कामी येईल. पुराना किल्ला गेलो तेव्हा तर शोधून शोधून सांदिकोपरे पाहून ठेवले होते. Occupied! तेव्हा अशी पॉपुलर, overcrowded स्थळे वगळता प्रेमी जीवांना काही अनवट वाटा कळाल्या तर उत्तमच अशी कल्पना होती. सध्याच्या व्यापात हा प्रकल्प तडीस नेणे कठीणच आहे म्हणा. पण आमच्या एका व्हाट्सऐप ग्रुपवर या मुद्द्यावर जरा चर्चा झाली तेव्हा. परवा अचानक मढ़ आइलैंड च्या बातमीमुळे ती चर्चा परत आठवली. आपल्याकड़े, विशेषतः मोठ्या शहरांत प्राइवेसी ही एक मोठी समस्या आहे. मोठे कुटुंब किंवा लहान घर असेल तर घरांमध्ये जागेअभावी प्राइवेसी मिळत नाही, होटल बुक करावे तर ह्या धाडी पडण्याची शक्यता, बहुतेक पर ऑवर बेसिस वाली होटल्स अवैध असतात. काही काही छुपे कैमरे लावतात असे ऐकिवात आहे. बहुतेक तरुणतरुणी आपले प्रकरण घरी सांगू शकत नाहीत, मग लपतछपत भेटणे वगैरे. एकदंर बरीच कुचंबना होते. तेव्हा मग नाइलाजाने ऐतिहासिक स्थळे, राखीव जंगले, बगीचे वगैरे जागी शक्य तेवढी क्षुधाशांती केली जाते. सरसकट समस्या नाकरण्यात अर्थ नाही, किंवा संस्कृती बुडते म्हणून कंठशोष करण्यातही अर्थ नाही. शेवटी प्राइवेसीच्या शोधात इकडेतिकडे जाणारे फ़क्त लफडी करणारेच असतात असे नव्हे तर विवाहित जोडप्यांनाही नाइलाज म्हणून हां उपाय करावा लागतो. तर आपल्याकडे जसे सार्वजनिक शौचालय असते तसे सार्वजनिक संभोगालय का असू नये? सध्या असलेल्या अवैध होटल्सना एक वैध, नियमबद्ध स्वरूप देता येईल. खात्रीने प्राइवेसी मिळेल. ह्या इमारती ख़ास कपल्ससाठीच असणार. हफ्तावसूली, धाडी यांपासून मुक्ती मिळेल. इथे वेश्या व्यवसाय चालू नये यासाठी संबंधित कायदे उभारून त्यावर आणि इतर संभाव्य समस्यांवर तोडगा काढता येईल. भारताचे शहरीकरण वाढत जाणार आहे. पुरेशी प्राइवेसी लाभेल अशा जागा कमी कमी होत जातील. वन रूम किचन किंवा एका खोलीत संसार करणाऱ्यांची संख्या वाढत जाईल. तेव्हा वरवर पाहता विचित्र वाटणारी ही संकल्पना तेवढी विचित्र वाटणार नाही. बगीचे किंवा ऐतिहासिक स्थळांमध्ये पोरांसोबत,कुटुंबासोबत फिरताना अवघडल्यासारखे वाटणार नाही. ओंगळवाणी दृश्ये दिसणे कमी होईल. आडवाटेला खासगी जागा शोधण्यातले धोके(लूटमार, बलात्कार,कधी कधी खून) वगैर कमी होतील. सामाजिक स्वास्थ्याकरिता भविष्यात सार्वजनिक संभोगालये सुद्धा आवश्यक ठरतील असे वाटते. 1. मिपाकरांचे काय मत आहे? 2. संभाव्य अडचणी काय असू शकतात? 3. इतिहासात अशी उदाहरणे आहेत का? (इथे वेश्यागृहांची उदाहरणे नकोत.) 4. आणि मोठा प्रश्न, हे शक्य आहे का? ह्याला किती विरोध होणार. विरोध होणार हे नक्की, पण तीव्रता किती असणार? 5. धाडी टाकून पोलिसांचे हफ्ता वसुलण्याचे धंदे बंद पडतील असे वाटते काय? की तिथेही कायद्यात पळवाट शोधतील?

प्रतिक्रिया द्या
29352 वाचन

💬 प्रतिसाद (108)
आ
आशु जोग Mon, 08/10/2015 - 20:12 नवीन
बाप रे
  • Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज Mon, 08/10/2015 - 20:33 नवीन
काय भन्नाट आयडीया येतात एकेकाच्या डोक्यात ...
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी Mon, 08/10/2015 - 20:37 नवीन
या समस्येवर सह्याद्री वाहिनीवर चर्चा झालेली आठवते. कार्यक्रम होता विश्वास मेहंदळे यांचा वाद-संवाद. तेव्हा पोलिस, सामाजिक कार्यकर्ते, टॅक्सी चालक यांनी आपापली निरिक्षणे व मते मांडली होती. समस्येवर काय उपाय असावा हे ठरवणे सोपे नसले तरी किमान समस्या आहे हे मान्य करायला कुणाची हरकत नसावी.
  • Log in or register to post comments
स
स्वामी संकेतानंद Mon, 08/10/2015 - 20:46 नवीन
बरोबर. पाल झटकावी तसे "छे छे! थेरं आहेत ही नुसती!" असे म्हणून दुर्लक्ष करणे योग्य नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी
श
श्रीरंग_जोशी Mon, 08/10/2015 - 21:02 नवीन
या विषयावरून द्वारकानाथ संझगिरी यांचा लोकप्रभेत काही वर्षांपूर्वी वाचलेला एक लेख आठवला. खरं तर त्या लेखात वर्णन असलेला न्युझिलंडमधल्या एका तरुणीबरोबरचा त्यांचा संवाद आठवला. माझी बाहेरख्याली
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वामी संकेतानंद
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 08/10/2015 - 21:03 नवीन
स्वामिज्जी... +++१११ धाडसी विषयात चांगली मुद्देसूद मांडणि केलीत. अश्या गोष्टींची गरज असणारच आहे.... अर्थात विरोध भरपूर होइल. आम्ही धर्म,अर्थ आणि मोक्षावर भरपूर काम केलेले आहे.. पण कामा'चा धर्म , अर्थ आणि मोक्ष मात्र उपेक्षेच्या वाळवंटातच सोडलेला आहे! त्याला स्वार्थापुरता हात लावण्या इतकाच आम्ही जवळ घेतो. त्याची ही अशी काही व्यवस्था लागत असेल,तर त्याच्या इतके चांगले दुसरे काहीही नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वामी संकेतानंद
स
सायकलस्वार Mon, 08/10/2015 - 20:46 नवीन
काही आदिवासी समाजात 'घोटूल' नामक एक वास्तू असते ती अशाच प्रकारची व्यवस्था पुरवते असं वाटतं. लेखाशी सहमत आहे. नाना-नानी पार्कसारखीच केवळ कपल्ससाठी काही पार्क्स असावीत असं माझं मत आहे. त्यामुळ निदान सार्वजनिक ठिकाणी कुटुम्बवत्सल लोकांना कानकोंडे न करता कपल्सना काही प्रायव्हसी मिळेल असं वाटतं. संभोगासाठी इमारती असाव्यात की नाही ते सांगता येत नाही. आपल्याकडे प्रेमिकांपेक्षा बर्‍याच विवाहित जोडप्यांनाच अशा व्यवस्थेची जास्त गरज आहे.
  • Log in or register to post comments
ज
जडभरत Tue, 08/11/2015 - 04:08 नवीन
मस्तच या भौंनी कपल पार्क हा छान शब्द सुचवला. कल्पना खूप चांगली आहे. नाके मुरडणार्यांना मुरडू देत. एखाद्याला सामाजिक भान पाळून अशा ठिकाणी एकांत प्रेमाचे क्षण मिळणार असतील तर त्यात गैर काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सायकलस्वार
अ
अभिदेश Mon, 08/10/2015 - 23:57 नवीन
तुमचा आयडि तुम्ही अगदि योग्य निवडलाय. जसे नाव तसाच विचार...
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Tue, 08/11/2015 - 00:38 नवीन
घराला जर घर म्हणुन प्रायव्हसी द्यायची क्षमता नसेल, तर तासाभरापुरती अशी सोय जोडप्यांना देण्यात काहीच गैर ना ही. दिल्लीच काय मुंबईत पण अशीच अवस्था झाली आहे. प्रेमप्रकरण सोडाच, पण वैवाहिक जीवन सुद्धा अतिशय कुचंबीत झाले आहे. कल्पनेचे स्वागत आहे. फक्त गटवुन आणणे हा प्रकार वाढीस लागण्याची शक्यता जास्त! तरीही जर फोटो आयडेंटीटी अन ही माहिती अश्या सर्व स्थळांवर शेअर करुन काही उपाय काढता येतील.
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Tue, 08/11/2015 - 02:23 नवीन
सार्वजनिक संभोगालये ही कल्पना कागदावर छान आहे. प्रत्यक्षात फोल ठरेल. संदर्भः महाराष्ट्रातील एका शहरात एका पार्कची ओळख लवर्स पार्क म्हणून होऊ लागली तेव्हा तिथे प्रेमीयुगुलांचे जाणे झपाट्याने कमी झाले. स्पष्टीकरणः मध्यंतरी सायबरकॅफेच्या उदयकाळात तिथले केबिन्स या कामासाठी वापरले जाऊ लागले. त्याआधी काही रेस्टॉरंट्स नी छोटे छोटे केबिन्स बनवून कॉलेजीयन विद्यार्थ्यांची बैठी सोय केली होती. त्याचे दर त्याच रेस्टॉरंट्स च्या इतर दरांपेक्षा तिप्पट होते. पण हे सर्व बोंबाबोंब झाल्यावर बंद पडले. गावोगावी लॉज्/बोर्डींग याच कामासाठी वापरले जातात. पण तिथून बाहेर पडतांना कोणी ओळखीच्याने बघणे हे नाइटमेअर (दु:स्वप्न?) समजले जाते. यात बेकायदेशीर किंवा अनैतिकचा संबंध नसून सामाजिक प्रतिष्ठेचा आहे. काही प्रश्नः ग्राहकांची वैधता तपासणे: १. प्रेमीयुगुल म्हणजे नक्की कोण? लग्नाचे सर्टीफिकेट मागता येते. प्रेमप्रकरणाचे कसे मागणार? २. लपवाछपवी हाच मूळ हेतू असतांना राजरोस ओळखपत्रं कोण देईल. दिली तरी ती खरी कशावरून मानायची? कायदे व सुव्यवस्था: १. प्रेमप्रकरणांकडे संभाव्य धोका म्हणूनच बघणारी संपूर्ण यंत्रणा आहे. ती बदलणे कसे शक्य आहे? २. पुरुषांबरोबर आलेल्या स्त्रिया ह्या वेश्या किंवा बळजबरीने आणलेल्या नाहीत हे कोण व कसे तपासणार? ३. यंत्रणेस अपेक्षित धोका (प्रेमप्रकरणातून मारहाण, आत्महत्या, खून, बलात्कार, इत्यादी) प्रत्यक्षात एखाद्या संभोगालयात घडला तर एकूण व्यवस्था, समाज त्याला कसे सामोरे जातील? आयटीतल्या अशाच समस्यांना इतर लोक काय नजरेने बघतात हे आपल्याला ठावूकच आहे. सामाजिक प्रतिष्ठा: १. टोलेजंग घर आहे पण त्यात शौचालय नाही म्हणून दहा किलोमीटर दूर जाऊन सार्वजनिक शौचालयांचा वापर कोणी करत असेल तर त्याला ज्या सामाजिक अप्रतिष्ठेला सामोरे जावे लागेल तीच सार्वजनिक संभोगालयात जाणार्‍यांना वाट्याला येईल. त्याचे काय करावे? २. लग्न झाले असून इथे येताय म्हणजे घरी नक्की काय समस्या आहे हे कुठेतरी सरकारी व्यवस्थेत नोंदवावे लागणार. ही माहीती सर्वत्र उपलब्ध असेल. हे कितपत झेपेल? ३. लग्न झाले नसून इथे येताय म्हणजे नक्की काय प्रकरण आहे हे कुठेतरी सरकारी व्यवस्थेत नोंदवावे लागणार. ही माहीती सर्वत्र उपलब्ध असेल. ते ही कितपत झेपण्यासारखे आहे? शौचालय/मुतार्‍या ही एका अशा शारिरिक प्रतिक्रियेचा निचरा करण्याची जागा आहे जिच्यावर मानवी मनाचे फार क्वचित काळासाठी नियंत्रण असते. त्या नियंत्रणाबाहेर जाऊन ह्या शारिरीक क्रियेचे समाजात वावरतांना दर्शन, अभिव्यक्ती झाली तर सर्वांचीच कुचंबणा होते व हे सर्वांना ठावूक असल्याने सार्वजनिक शौचालये ठिकठिकाणी उभारली आहेत. याउप्परही कुणाकडून असे विसर्ग झालेच तर त्यात त्याचा काही दोष नाही असे मानण्याचा मोठेपणा बहुसंख्य वेळा समाज दाखवु शकतो. याउलट संभोगक्रियेत मनाचे नियंत्रण बलवान असल्याने व त्याबाहेर ते वर्तन कदापि न जाण्याचे समाजास माहित असल्याने, त्याबरोबरच याच विशिष्ट क्रियेवर मनाचे नियंत्रण मानवाचा सर्वोच्च सद्गुण मानला गेला असल्याने असे वर्तन लोकांसमोर, किंवा स्वत:च्या जागेअभावी, सामाजिक अनुमतीअभावी, इतर काही सुस्पष्ट्/अस्पष्ट कारणामुळे अगदी कायदेशीर मान्यताप्राप्त संस्थेत जाऊन करणे समाजसंमत नाही. त्यास (दारू पिण्यासारखी, मांस खाण्यासारखी) छुपी प्रतिष्ठाही नाही. त्यामुळे समाजातून थेट विरोध वैगेरे होण्याऐवजी ग्राहकच तयार होणार नाहीत.
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी Tue, 08/11/2015 - 04:10 नवीन
संदीप - तुमचा प्रतिसाद वास्तवावर आधारीत असला तरी ही समस्या कधी ना कधी आपल्या समाजाला मोठेपणा दाखवून स्वीकारावी लागणारच आहे. यापूर्वीच्याही सामाजिक सुधारणा सहजपणे घडलेल्या नाहीत. तुमचा प्रतिसाद वाचून नऊ-दहा वर्षांपूर्वी लोकप्रभेत वाचलेला सातच्या आत घराबाहेर हा लेख आठवला. आता तो लेख उघडला असता जुन्या काळातला मिलेनियम वरुण फॉन्ट चालत नसल्याने वाचता आला नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे गुरुवार, 08/13/2015 - 17:25 नवीन
श्रीरंग, मी फक्त वास्तवतेतून ह्या समस्येकडे लोक कसे बघतील ते मांडलंय. प्राप्त परिस्थितीतली समस्या सोडवायची असल्यास ज्या आदर्श वागणूकीची अपेक्षा समाजाकडून, यंत्रणेकडून करतोय ती मानसिकता तयार झाली तर मग अशा जागांची गरजच उरणार नाही. जोडप्यांच्या किंवा तरूणांच्या लैंगिक/भावनिक कोंडमार्‍याबद्दल सहानुभूती व मोकळेपणा आला तर यापेक्षा अनेक उत्तम व समाजमान्य मार्ग निघू शकतील. आज भारतीय समाज फार विचित्र त्रांगड्यात अडकलाय. योग्य वयात लग्ने लावायची नाहीत वर लग्नापर्यंत कुठल्याही प्रकारे लैंगिक संबंधही करू नये ही तिरपागडी विचारसरणीच समस्यांचे मूळ आहे. माझा ३२ वर्षिय एक मित्र आहे, अजून वर्जिन आहे. माझ्या एका मामेभावाने ३६व्या वर्षी लग्न केले. हे काय आयुष्य आहे? माझ्या मते लग्न कुठल्याही वयात करा किंवा करू नका. योग्य काळजी घेऊन वयाच्या किमान अठराव्या वर्षापासूनतरी शास्त्रशुद्ध पद्धतीने संभोगसुख प्राप्त करण्याची मोकळीक असली पाहिजे. ती राजरोस नसेल तरी निसर्ग थांबत नाही. तो मार्ग काढतोच आणि ह्या समस्या उभ्या राहतात. गंमत म्हणजे ज्यांनी तरूणपणी ह्याच समस्या भोगल्या असतात, त्यावर उपाय शोधण्याचे प्रयत्न केलेले असतात तेच प्रौढ झाले की 'कसली तरुणांची थेरं' म्हणून झिडकारतात. आजचा भारतीय समाज ६० टक्क्यांवर तरूण आहेत पण पगडा शेकडो वर्षांआधी मरून गेलेल्या पुर्वजांच्या कसल्यातरी फडतूस कल्पना, परंपरा आणि संस्कार यांचाच आहे. इथल्या समाजावर अजून मेलेले लोकच राज्य करतायत. मला ही सा.सं. न पटण्याचे कारण तेच आहे. हा पळपुटेपणा आहे, वरवर मलमपट्टी आहे जी जखमेला अजून चिघळवण्यास हातभार लावू शकते. समस्येला सरळ भिडण्याची वृत्ती आवश्यक आहे. तरूणांनी ती दाखवावी. जग त्यांचंच आहे. समस्या त्यांच्या आहेत, त्यांनीच सोडवाव्या. पण तंग कपडे घालते म्हणून समवयस्क बहिणीचा खून करणारा तरूण जोपर्यंत इथे आहे तोवर हे सगळं स्वप्नंच आहे. इतरांचं माहित नाही पण माझ्या मुलांसाठी तरी ते जेव्हा वयात येतील तेव्हा हा मोकळेपणा दाखवायला मी तयार असेन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी
श
श्रीरंग_जोशी गुरुवार, 08/13/2015 - 17:31 नवीन
आपल्या समाजाला याबाबतीत प्रगल्भ व्हायला अजुन बराच काळ लागणार आहे. अशाच मानसिकतेमुळे अमेरिकन नागरिकत्व मिळालेले काही भारतीय लोक मुले वयात येऊ लागली की भारतात परतताना पाहिले आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे गुरुवार, 08/13/2015 - 17:40 नवीन
खरे आहे. नमस्ते लंडन या चित्रपटात ही मानसिकत उत्तम दाखवली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी
स
सुजल Mon, 08/31/2015 - 22:43 नवीन
अतिशय मुद्देसूद प्रतिसाद :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
ज
जडभरत Tue, 08/11/2015 - 04:17 नवीन
तुमचा प्रतिसाद उशिराच वाचला. पण मुद्दा पटला. ही दुसरी बाजू देखील लक्षात घ्यावयास हवी. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
प
प्यारे१ Tue, 08/11/2015 - 09:48 नवीन
+१ मुद्देसूद प्रतिसा/वाद आवडला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
क
कोमल Tue, 08/11/2015 - 10:37 नवीन
"समाजातून थेट विरोध वैगेरे होण्याऐवजी ग्राहकच तयार होणार नाहीत." +१ पुण्यात Z ब्रीजवर बसणार्‍या युगुलांना बाकी मंडळी अन् पोलीस खूप छळतात. आम्ही पण कॉलेज मध्ये असतांना कोणी ओळखीचा/ची इथे बसलेले आढळले की त्यांना तुफान चिडवायचो. जर अशा मान्यताप्राप्त संस्था सुरु जरी झाल्या तरी 'अगायायायायाया, तिकडं गेल्तसं होय रं' असे संवाद हमखास ऐकू येतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
द
द-बाहुबली Tue, 08/11/2015 - 13:50 नवीन
बेकायदेशीर किंवा अनैतिकचा संबंध नसून सामाजिक प्रतिष्ठेचा आहे.
करेक्ट, चार चौघात काँडम मागायला लाजणारे प्रतिष्ठीत.. संभोगालयात काय घंटा जाणार ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
स्वामी संकेतानंद गुरुवार, 08/13/2015 - 00:33 नवीन
प्रतिसाद आवडला. काही नवे मुद्दे कळले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
थ
थॉर माणूस गुरुवार, 08/13/2015 - 06:40 नवीन
सहमत... आणि बरेच कष्ट वाचवलेत त्याबद्दल ठांकू. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
क
कैलासवासी सोन्याबापु Tue, 08/11/2015 - 04:32 नवीन
स्वामीजी डांगे साहेबांचे विचार सुद्धा पटण्या सारखे आहेत, एकांत प्रदान करणाऱ्या आस्थापनेला जर तुम्ही "अशी आम्ही सुविधा देतो" हे लेबल चिकटवलेस ग्राहक कमीच येतील
  • Log in or register to post comments
त
तीरूपुत्र Tue, 08/11/2015 - 05:03 नवीन
तुमचा विषय छान आहे, पण समाज या विषयाला मान्यता देणार नाही.
  • Log in or register to post comments
न
नाखु Tue, 08/11/2015 - 05:37 नवीन
नैतीक-अनैतीक या संकल्पना कायमच सापेक्ष राहिल्या आहेत. वरती अदिवासींच्या प्रथेबाबत उल्लेख आला आहे, कुणी पुराणकालीन अगदी वेदकालीन दाखले देईल.मुळात इंग्रजी चित्रप्टातील चुंबन द्रुश्ये आणि मराठी/हिंदी मधील हिच द्रुश्ये सारख्या नजरेतून पाहिली जातात काय? नसतील मग आधी मानसीकता तपासणे गरजेचे आहे.(पण मोकळीकचा मुद्दा ताणून, लोक प्राण्यांसारखा रस्त्यात केला तर काय फरक पडतो असा अजब तर्कट युक्तीवाद करण्यास कचरणार नाहीत हेही खरे) लेखातील कुचंबणा आणि वस्तुस्थीती न नाकारता ही इतकेच म्हणावे लागेल ही समस्या फक्त जागेअभावामुळे उगवली नसून,आणखी इतरही सामाजीक् अनास्था/लैंगीक शिक्षण कमतरता/असलेच तर जास्त चुकीचे आणि विपर्यास असलेले/टोकाची मत भिन्नता.समस्या आहे हे मान्य करणे आणि त्याकरीता पुरेसा एकांत देणे हे पहिले पाउल ठरेल. अगदी नवपरीणित दांपत्यालाही एकमेकांशी मोकळेपणाने बोलताही येत नाही हे मी पाहिले/अनुभवले आहे तर उपरोक्त विना-विवाह, बाबतची बातच सोडा. पण अशी व्यवस्था केल्याबरोबर गैरफायदा घेणार्यांची संख्या वाढू शकते आणि आत्ता जो चोरून आणि "हप्ता"बंद व्यवसाय (कल्याणी देशपांडे पुरसकृत) तो उघड आणि जोमाने फोफावेल.खर्या प्रेमी जीवांकडेही तश्याच नजरेने पाहिले जाईल हे लख्ख सत्य आहे.मिपावर व्यवसायामुळे आणि व्यासंगाने सम्रुद्ध अनुभव असलेले बरेच मिपाकर आहेत, तेच अश्या स्फोटक सामाजीक विषयाबाबत सांगोपांग माहीती आणि नात्यांची भावनीक गुंतागुंत याबाबत माझ्यापे़क्षा नक्कीच जास्त मुद्देसूद आणि विवेचनात्मक लिहितील. आपण किमान मुला-मुलींची मैत्री (संशयविरहीत) निकोप मनाने स्वीकारली पाहिजे. बालक असलेला पालक नाखु
  • Log in or register to post comments
G
gogglya Tue, 08/11/2015 - 08:57 नवीन
सुक्या बरोबर ओले पण जळण्याचीच जास्त शक्यता आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
D
dadadarekar Tue, 08/11/2015 - 08:21 नवीन
हमरा लाडला मोघल राजा बाबर अगदी लाजाळू असल्याने बायकोला आठ दहा दिवसाने एकदा भेटायचा ! बाबराची आई सतत रागवून त्याला बायकोला वारंवार भेटण्यास सांगायची . https://en.m.wikipedia.org/wiki/Aisha_Sultan_Begum .....
  • Log in or register to post comments
प
पैसा Tue, 08/11/2015 - 09:08 नवीन
दादुस, तुम्ही रंग बदललात का! या बाबतीत बाबराबद्दल कमी बोलाल तेवढे बरे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: dadadarekar
स
सुबोध खरे Tue, 08/11/2015 - 09:10 नवीन
हा प्रश्न टाकाऊ किंवा निरर्थक नक्कीच नाही तर खरोखरच विचार करण्यासारखा आहे. काही वर्षापूर्वी एका अशाच हॉटेल वर वेश्या व्यवसाय चालतो म्हणून धाड पडली असता तेथे दोन लग्नाचे नवरा बायको सापडले. एक वरळीच्या चाळीत राहणारे निम्न मध्यमवर्गीय तरुण मराठी कुटुंब ज्यांच्या दीड खोलीत आई वडील, भाऊ आणि त्याचे कुटुंब यासहीत राहत होते आणि केवळ तेथे संबंधासाठी संधी मिळत नाही म्हणून या स्वस्त हॉटेलात एक खोली घेऊन राहिले होते. दुसरे कुटुंब असेच माहीमच्या एका चाळीत एका खोलीत आई वडील आणि मुलांसोबत राहत असलेले. एका खोलीत पडदा लावूनही वडील रात्री कधीही लाघवी साठी उठत असल्याने पाहिजे तेवढा एकांत मिळत नसे यासाठी काही तास फक्त एकमेकासोबत राहण्यासाठी आलेले होते. पोलिस स्टेशन मध्ये प्रत्यक्ष ओळख पटल्यावर पोलिसांनी उदार मनाने( आणि गरम खिशाने) त्यांना सोडून दिले. तरुण लग्न झालेल्या जोडप्यांना साधा एकांत हि मिळू नये हि परिस्थिती मुंबईत ६०% जोडप्यांची आहे हे सांगून पटणार नाही. तेंव्हा एकत्र कुटुंब पद्धतीत तरुण माणसांचा आणि मनांचा किती कोंडमारा होतो हे आपल्याला कळत नाही. मागे कुणीतरी चाळीतील जीवनाबद्दल गहिवर काढला होता तेथे रसभंग नको म्हणून मी अशा घटना टाकल्या नव्हत्या. परंतु लग्न झालेल्या जोडप्यांचे नोकरीवर जातो म्हणून दोघांनी दांडी मारून अशी जीवाची मुंबई करणे हे लोकांना वाटते तितके कमी प्रमाणात नाही हेही नमूद करू इच्छितो. मुलाचे लग्न करून दिले पण मुलगा आणि सुनेच्या मध्ये झोपणारी सासू मी पहिली आहे. अशा परीस्ठीतित्त त्या जोडप्याने काय करावे अशी अपेक्षा आहे? हि कल्पना वास्तवात येईल कि नाही ते माहित नाही आणि वास्तवात उतरली तरी धन्द्य्च्य गणितात टिकेल कि नाही हेही माहित नाही.परंतु हे केवळ कल्पना रंजन आहे असे मात्र नाही असे मी नम्रपणे नमूद करू इच्छितो
  • Log in or register to post comments
म
मृत्युन्जय Tue, 08/11/2015 - 09:26 नवीन
मुलाचे लग्न करून दिले पण मुलगा आणि सुनेच्या मध्ये झोपणारी सासू मी पहिली आहे. मुलाच्या खोलीबाहेर खुर्ची टाकुन बसणारी आणि दोन तास झाल्यावर दार ठोठावुन "आता बास झाले उघडा दार आता" असे म्हणणारी बाई मी बघितली आहे. (अर्थात ती अश्या रम्य अवस्थेत खुर्ची टाकुन बसलेली असताना नाही बघितली).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
प
प्यारे१ Tue, 08/11/2015 - 09:49 नवीन
बसवला टेम्पोत च्यायला! अशा वेळी सुनेने औद्धत्य पत्करुन निमंत्रण द्यावं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
म
मास्टरमाईन्ड Tue, 08/11/2015 - 20:27 नवीन
काय प्रतिक्रिया द्यावी तेच समजंना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
प
प्रसाद गोडबोले Tue, 08/11/2015 - 09:32 नवीन
खतरनाक कन्सेप्ट ! मी मुंबैत होतो तेव्हा ..... रिक्षामधे बिन्धास्तपणे चाललेले अगदी बेस १ , बेस २ पर्यंतचे प्रकार अगदी ह्याची देही ह्याची डोळा पाहिले आहेत .... ते आठवले ! .
  • Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु Tue, 08/11/2015 - 09:55 नवीन
अरे बाप रे. हे कसे शक्य आहे ? तेव्हा एक तर तुम्ही तिसर्या सीटवर असणार किंवा रिक्षा चालवत असणार.(मागे बघत बघत.) ह.घ्या.! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
प
प्रसाद गोडबोले Tue, 08/11/2015 - 09:59 नवीन
हा हा हा ! हलके घेतले आहे =)) आम्ही 'पहिल्या' किंव्वा 'दुसर्‍या' सीटवर असण्याची शक्यता आपण का बरे लक्षात घेतली नाहीत ;) अ‍ॅक्च्यली , मुंबईट ट्रॅफिक इतके असते की गाडी अगदी १०-२० च्या स्पीड ने चालवावी लागते , तेव्हा हे सारे प्रकार पहाय्ला मिळतात . तसेही अक्क्षा बीच , बॅन्डस्टॅन्ड , मुंबई टाऊन मधील काही काही ठिकाणे तर जाहीर बेस १ लये आहेत =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कानडाऊ योगेशु
प
प्यारे१ Tue, 08/11/2015 - 11:11 नवीन
'बेस१, बेस२' बोले तो? थोडा ग्यान प्रदान करे प्रभु पोपशास्त्री. व्यनि करेंगे तो भी चलेगा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
ट
टवाळ कार्टा Tue, 08/11/2015 - 11:15 नवीन
ऐला हे नै म्हैती...हैट्ट आहे...का निरागसतेचा आव =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
ख
खटपट्या Tue, 08/11/2015 - 11:23 नवीन
मीपण निरागस हाये. मलापण व्यनी करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
प
प्यारे१ Tue, 08/11/2015 - 11:29 नवीन
या प्रकाराला अमुकअमुक म्हणतात असं नाव माहिती नाय रे. कृती माहिती असेलच्च. ;) तुझी शप्पथ टक्कुमक्कुसोनु!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Tue, 08/11/2015 - 13:29 नवीन
बेस १ = मधाच्या पाकळ्या बेस २ = हेडलाईट्स बेस ३ = अता हे पण सांगायला लागत असेल तर मग कैच न करता हिमालयात जाउन हरी-हरी करत बसा =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
प
प्रसाद गोडबोले Tue, 08/11/2015 - 14:06 नवीन
अधिक विस्त्रुत माहीतीकरिता हे पहा बेसबॉल कन्सेप्ट्स
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
प
प्यारे१ Tue, 08/11/2015 - 14:51 नवीन
___/\___ चान चान!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
ट
टवाळ कार्टा Tue, 08/11/2015 - 14:54 नवीन
खिक्क
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
ट
टवाळ कार्टा Tue, 08/11/2015 - 13:30 नवीन
टक्कुमक्कुसोनु
टक्कुमक्कुशोनु असे आहे ते...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
स
सस्नेह Tue, 08/11/2015 - 09:33 नवीन
मेट्रो सिटीज मधला ज्वलंत प्रश्न ! पण याचा गैरफायदा घेऊन वेश्यालये बोकाळू नयेत म्हणजे झाले !!
  • Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध.वैद्य Tue, 08/11/2015 - 09:38 नवीन
+१ बहुतही क्रांतिकारी!! असे विचार केले होते कॉलेजमध्ये असतांना की एक पेशल गार्डन किंवा हॉटेल काढायचे खास प्रेमीलोकांसाठी.
  • Log in or register to post comments
प
पैसा Tue, 08/11/2015 - 09:40 नवीन
असे काहीतरी स्वामीजींनाच सुचणार! कल्पना चांगली आहे. पण आम्ही "इंडियन" लोक कोणत्याही चांगल्या कल्पनेची वाट लावू शकतो. या संभोगालयांची वेश्यागृहे व्हायला अज्जिबात वेळ लागणार नाही हे एक. आणि ज्यांच्याकडे पयशे नाहीत ती कॉलेजची पोट्टी पुन्हा पुरान्या किल्यातच दिसतील.
  • Log in or register to post comments
स
संजय पाटिल Tue, 08/11/2015 - 10:28 नवीन
कॉलेगची आयडी असेल तर सूट किंवा मोफत अशी स्कीम ठेवत येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
ट
टवाळ कार्टा Tue, 08/11/2015 - 10:50 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
म
मदनबाण Tue, 08/11/2015 - 10:08 नवीन
मला वाटतं अशाच एका विषयावर एक जुना { कॄष्ण धवल } मराठी चित्रपट आहे मी पाहिला आहे,पण आत्ता काय त्याचे नाव आठवेना ! नवरा बायकोला "एकांत" मिळत नसतो आणि त्यामुळे त्यांची होणारी तगमग... कोणाला आठवल्यास त्या चित्रपटाचे नाव कळवावे. मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- तुझे जीवन की डोर से बाँध लिया है... :- Asli Naqli
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा