Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

सार्वजनिक संभोगालये

स
स्वामी संकेतानंद
Mon, 08/10/2015 - 19:53
🗣 108 प्रतिसाद
काही दिवसांपूर्वी सफदरजंग चा मक़बरा पाहायला गेलो होतो. छान आहे. वीकडे होता. मक़बरा बघायला म्हणून फार कमी लोक आलेले. मला धरून 7. बाकी सगळे कपल्स हिरवळीवर झाडाखाली. मोठा परिसर आहे आणि गर्दी नसते. फारसे कुणी जात नाही.5 रूपयात दिवसभर फूल प्राइवेसी. ऐसी आझादी और कहाँ! मनात आले की दिल्लीतल्या अशा जागांवर एक अभ्यासपूर्ण लेख लिहावा. म्हणजे स्वस्तात मस्त प्राइवेसी कुठे मिळेल ह्याचे रेडी रेक्नॉर बनेल. मराठी पोरे पोरी दिल्लीला जातील तेव्हा कामी येईल. पुराना किल्ला गेलो तेव्हा तर शोधून शोधून सांदिकोपरे पाहून ठेवले होते. Occupied! तेव्हा अशी पॉपुलर, overcrowded स्थळे वगळता प्रेमी जीवांना काही अनवट वाटा कळाल्या तर उत्तमच अशी कल्पना होती. सध्याच्या व्यापात हा प्रकल्प तडीस नेणे कठीणच आहे म्हणा. पण आमच्या एका व्हाट्सऐप ग्रुपवर या मुद्द्यावर जरा चर्चा झाली तेव्हा. परवा अचानक मढ़ आइलैंड च्या बातमीमुळे ती चर्चा परत आठवली. आपल्याकड़े, विशेषतः मोठ्या शहरांत प्राइवेसी ही एक मोठी समस्या आहे. मोठे कुटुंब किंवा लहान घर असेल तर घरांमध्ये जागेअभावी प्राइवेसी मिळत नाही, होटल बुक करावे तर ह्या धाडी पडण्याची शक्यता, बहुतेक पर ऑवर बेसिस वाली होटल्स अवैध असतात. काही काही छुपे कैमरे लावतात असे ऐकिवात आहे. बहुतेक तरुणतरुणी आपले प्रकरण घरी सांगू शकत नाहीत, मग लपतछपत भेटणे वगैरे. एकदंर बरीच कुचंबना होते. तेव्हा मग नाइलाजाने ऐतिहासिक स्थळे, राखीव जंगले, बगीचे वगैरे जागी शक्य तेवढी क्षुधाशांती केली जाते. सरसकट समस्या नाकरण्यात अर्थ नाही, किंवा संस्कृती बुडते म्हणून कंठशोष करण्यातही अर्थ नाही. शेवटी प्राइवेसीच्या शोधात इकडेतिकडे जाणारे फ़क्त लफडी करणारेच असतात असे नव्हे तर विवाहित जोडप्यांनाही नाइलाज म्हणून हां उपाय करावा लागतो. तर आपल्याकडे जसे सार्वजनिक शौचालय असते तसे सार्वजनिक संभोगालय का असू नये? सध्या असलेल्या अवैध होटल्सना एक वैध, नियमबद्ध स्वरूप देता येईल. खात्रीने प्राइवेसी मिळेल. ह्या इमारती ख़ास कपल्ससाठीच असणार. हफ्तावसूली, धाडी यांपासून मुक्ती मिळेल. इथे वेश्या व्यवसाय चालू नये यासाठी संबंधित कायदे उभारून त्यावर आणि इतर संभाव्य समस्यांवर तोडगा काढता येईल. भारताचे शहरीकरण वाढत जाणार आहे. पुरेशी प्राइवेसी लाभेल अशा जागा कमी कमी होत जातील. वन रूम किचन किंवा एका खोलीत संसार करणाऱ्यांची संख्या वाढत जाईल. तेव्हा वरवर पाहता विचित्र वाटणारी ही संकल्पना तेवढी विचित्र वाटणार नाही. बगीचे किंवा ऐतिहासिक स्थळांमध्ये पोरांसोबत,कुटुंबासोबत फिरताना अवघडल्यासारखे वाटणार नाही. ओंगळवाणी दृश्ये दिसणे कमी होईल. आडवाटेला खासगी जागा शोधण्यातले धोके(लूटमार, बलात्कार,कधी कधी खून) वगैर कमी होतील. सामाजिक स्वास्थ्याकरिता भविष्यात सार्वजनिक संभोगालये सुद्धा आवश्यक ठरतील असे वाटते. 1. मिपाकरांचे काय मत आहे? 2. संभाव्य अडचणी काय असू शकतात? 3. इतिहासात अशी उदाहरणे आहेत का? (इथे वेश्यागृहांची उदाहरणे नकोत.) 4. आणि मोठा प्रश्न, हे शक्य आहे का? ह्याला किती विरोध होणार. विरोध होणार हे नक्की, पण तीव्रता किती असणार? 5. धाडी टाकून पोलिसांचे हफ्ता वसुलण्याचे धंदे बंद पडतील असे वाटते काय? की तिथेही कायद्यात पळवाट शोधतील?

प्रतिक्रिया द्या
29352 वाचन

💬 प्रतिसाद (108)
स
सूड Tue, 08/11/2015 - 11:00 नवीन
अशाच एका विषयावर एक जुना { कॄष्ण धवल } मराठी चित्रपट
मुंबईचा जावई!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
म
मदनबाण Tue, 08/11/2015 - 11:59 नवीन
येस्स करेकट... ठांकू ! :) मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- तुझे जीवन की डोर से बाँध लिया है... :- Asli Naqli
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
प
पद्मावति Tue, 08/11/2015 - 16:45 नवीन
पिया का घर मधे पण थोडेफार असेच दाखवले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
प
प्यारे१ Tue, 08/11/2015 - 17:24 नवीन
तो त्याच चित्रपटाचा रीमेक आहे. (लै जुनं प्रकरण आहे रीमेक म्हणजे) वपुंची कथा होती बहुतेक. मराठीत अरुण सरनाईक नायक होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पद्मावति
ज
जगप्रवासी Tue, 08/11/2015 - 10:11 नवीन
एकत्र कुटुंबात प्रायवसी भेटत नाही म्हणून नवीन घर घेऊन वेगळे राहायला जाणार्या कुटुंबाच्या कथेवर मराठी चित्रपट येतोय "डबल सीट"
  • Log in or register to post comments
क
कोमल Tue, 08/11/2015 - 10:48 नवीन
प्रायवसी मिळत नाही असं ऐकलं होतं. ;-) प्रायवसी भेटत नाही म्हणजे?? कोण प्रायवसी? कुठे राहाते? का नाही भेटत ती?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जगप्रवासी
प
प्यारे१ Tue, 08/11/2015 - 11:32 नवीन
मुंबईची मराठी आहे ती मावशी! तिथे खायला, प्यायला, फिरायला वगैरे सगळं 'भेटतं'!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोमल
अ
अत्रन्गि पाउस Tue, 08/11/2015 - 10:23 नवीन
ह्यांनी हि कल्पना मांडली होती ... प्राचीन संस्कृत काव्यात सुद्धा अशी मिलन केंद्रे असल्याचे उल्लेख आहेत का ? (चिं वी जोशींच्या एका लेखनात असे वाचल्या सारखे वाटते )
  • Log in or register to post comments
च
चिगो Tue, 08/11/2015 - 10:38 नवीन
चांगला मुद्दा आहे. विचार करण्यासारखी कल्पना.. प्रतिसाद वाचतोय..
  • Log in or register to post comments
स
सूड Tue, 08/11/2015 - 11:11 नवीन
कल्पना चांगली आहे, पण लोकांची मानसिकता? त्याचं काय करणार!! आपल्याला एकदा वस्तू सार्वजनिक म्हटली की त्याची किंमत नसते. पाचेक वर्षांपूर्वी मुंबईत पांढर्‍या शुभ्र लोकलगाड्या दाखल झाल्या, महिन्याभरातच त्यांचे दरवाजे पान खाणार्‍या रसिकांनी रंगवून ठेवले होते. तुम्ही म्हणताय त्या बाबतीत ज्यांची खरोखरच ज्यांची गैरसोय होते त्यांची सोय होण्यापेक्षा हवशे आणि गवशे येण्याची शक्यता अधिक!! जिथे स्वच्छ भारत अभियान म्हणताना पान-तंबाखूच्या पिचकार्‍या रस्त्यावर उडवू नयेत याची अक्कल आपल्याला नाही तिथे इतक्या संवेदनशील बाबतीतली वास्तू लोक विवेकबुद्धी शाबूत ठेवून वापरतील अशी अपेक्षा करण्यात अर्थ नाही.
  • Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु Tue, 08/11/2015 - 11:36 नवीन
मुद्दा वाचला पटला, प्रतिसाद ही अतिशय प्रगल्भ आहेत त्यात वादच नाही, जितके मला आकलन झाले त्यानुसार "प्राइवेसी नसणे" "संभोगालाये आईडिया फोल ठरणे" अन "ह्या संकल्पनेला वेश्यावृत्ती ने टेक ओवर करायची भीती" हे तीन मुद्दे इंटेरसेक्ट होत आहेत किमान ह्यांच्यातली लाइन फार पुसट आहे असे वाटते, ह्यावर कितीही उहापोह झाला म्हणजे संभोगालय उभारणे किंवा अगदी वेश्याव्यवसाय कायदेशीर करणे, काहीही म्हणले तरी प्रथम नादखुळा साहेब म्हणाले तशी मानसिकता नसल्यास आईडिया फोल जाणार अन अनुषंघाने येणारे एड्स वगैरे प्रॉब्लम सुद्धा तसेच राहणार , नुसते एक असे आस्थापन स्थापन करून काय होणार? आमचा एक मित्र जर्मनी ला राहतो त्याने सांगितले की तिथे सेक्स ला एक गरज म्हणुन ट्रीट करतात फ़क्त ते इतके सब्जेक्टिव विचार करतात की आपल्या जाहिराती असलेले fliers (पत्रके, हैंडबिल) हॉस्टल च्या नोटिस बोर्ड ला लावायला आलेल्या मुलींना पाहून किंवा पुरुष वेश्याना पाहून कोणीही घृणेने पचकन थुंकत नाही किंवा त्यांना विरोध करत नाही उलटे त्यांना अगदी बिच्चारे ह्यूमन ट्रैफिकिंग चे शिकार म्हणुन सिम्पेथी सुद्धा नाही , तर एका सामान्य नागरिकासोबत जो सार्वजनिक व्यव्हार असतो तसाच ठेवला जातो, संभोगालय ते वेश्यालय भारतात लीगल केले तरी जोवर मानसिकता नाही तोवर हे विषय असेच taboo राहणार अन त्यातून कोणाचेच काही भले होणार नाही असे वाटते -बाप्या
  • Log in or register to post comments
श
शिव कन्या Tue, 08/11/2015 - 11:58 नवीन
+१
  • Log in or register to post comments
च
चंबा मुतनाळ Tue, 08/11/2015 - 12:22 नवीन
शिवाय अशा स्थळांमधे गैरप्रकार होउ नयेत म्हणून CCTV क्यामेरे लावेत आणी चव्वीस तास मॉनीटर करावेत असे सुचवू ईच्छीतो!
  • Log in or register to post comments
च
चिगो Tue, 08/11/2015 - 14:14 नवीन
शिवाय अशा स्थळांमधे गैरप्रकार होउ नयेत म्हणून CCTV क्यामेरे लावेत आणी चव्वीस तास मॉनीटर करावेत असे सुचवू ईच्छीतो!
नेमके कुठे लावायचे हे कॅमेरे? मॉनिटर करणारा मरायचा नाहीतर..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंबा मुतनाळ
G
gogglya Wed, 08/12/2015 - 12:07 नवीन
औनलाईन प्रक्षेपण करून अवांतर पैसे मिळवावे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंबा मुतनाळ
ड
डायवर Tue, 08/11/2015 - 13:32 नवीन
अशी काही व्यवस्था किमान मुंबई /पुण्यात तरी आज काळाची गरज झाली आहे. पण खेड्यांमध्ये, तालुक्यांच्या ठिकाणी तसेच इतर छाेट्या शहरांमध्ये देखील लोकलज्जास्तव वा इज्जत जाण्याच्या भयामुळे म्हणा, अशी व्यवस्था जास्त काळ प्रतिसादाअभावी टिकणार नाही, असे वाटते. मुंबई /पुण्यात शहराच्या अवाढव्य आकारामुळे 'ओळखीचं कोणी मला तिथे पाहिल का? ' ही धास्ती जवळपास नसते, त्यामुळे आदर्श परस्थितीत तिथे हे शक्य वाटते. बाकी काहिका असेना, भविष्यात असे काही खरच अस्तित्वात आल्यास इञ-तञ-सर्वञ लावण्यात येणार्या छुप्या क्यामेर्यांच्या पुण्याईमुळे दररोज शेकडो जिबी भारतीय निलफिती उपलब्ध होतील, हे माञ नक्की.
  • Log in or register to post comments
स
सूड Tue, 08/11/2015 - 14:25 नवीन
लोकलज्जास्तव वा इज्जत जाण्याच्या भयामुळे म्हणा,
मुंबई /पुण्यात शहराच्या अवाढव्य आकारामुळे 'ओळखीचं कोणी मला तिथे पाहिल का? ' ही धास्ती जवळपास नसते, त्यामुळे आदर्श परस्थितीत तिथे हे शक्य वाटते.
कठीण आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डायवर
म
मालोजीराव Tue, 08/11/2015 - 13:53 नवीन
हि कन्सेप्ट ऑलरेडी आहे जपान मध्ये, "लव्ह हॉटेल्स" म्हणतात तिकडे
  • Log in or register to post comments
प
पद्मावति Tue, 08/11/2015 - 17:12 नवीन
बरोबर आहे. जपान मधे अशी लव हॉटेल्स खूप दिसतात. दुरूनही अगदी ओळखू येतील अशी विचित्र गुलाबी रंगाची असतात. फारच भडक प्रकार आहे पण तिथे सर्रास चालतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मालोजीराव
द
द-बाहुबली Wed, 08/12/2015 - 10:35 नवीन
अन्न वस्त्र निवारा आणी संभोग या मुलभुत गरजा मानल्या गेल्या आहेत जापान मधे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मालोजीराव
ख
खटपट्या गुरुवार, 08/13/2015 - 10:28 नवीन
यात वाय फाय अ‍ॅडवा..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: द-बाहुबली
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 08/11/2015 - 15:02 नवीन
कल्पना काही वाईट नाही, स्वरुप कसं असेल सांगता येत नाही. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
त
तुडतुडी Wed, 08/12/2015 - 10:10 नवीन
सार्वजनिक शौचालय असते तसे सार्वजनिक संभोगालय का असू नये>> शाब्बास . हेच राहिलं होतं . नैसर्गिक गोष्टी आणि शरीराचे चोचले पुरवणार्या अनैतिक गोष्टी ह्यांच्यातला फरक पण कळेनासा झालाय
  • Log in or register to post comments
उ
उगा काहितरीच Sun, 08/16/2015 - 21:54 नवीन
नैसर्गिक गोष्टी आणि शरीराचे चोचले पुरवणार्या अनैतिक गोष्टी ह्यांच्यातला फरक पण कळेनासा झालाय
या वाक्याचा तीव्र शब्दांत निषेध ! कामासारख्या अत्यावश्यक क्रियेला फक्त शरीराचे चोचले कसे काय म्हणू शकतात लोक ? ताई/भाऊ थोडे स्पष्ट बोलतोय राग मानू नका ! पण कामाशिवाय तुमचा , माझा जन्म तरी झाला असता काय ? माझ्या दृष्टीने काम ही अतिशय पवित्र क्रिया आहे. (त्यामुळेच बहुधा आपल्या प्राचीन मंदिरात तशा मुर्त्या वगैरे आहेत.) पण मधल्या काळात मुस्लीम राज्यकर्ते व त्यांची पडदा पद्धत , स्त्रीयांना दूय्यम मानन्याची वृत्ती यामुळे व रानटी पणा मुळे आपली पण दृष्टी कामाकडे एक टाबू म्हणूनच पाहू लागली, जगाला कामशास्त्र शिकवीणार्या देशातच कामाकडे एका कुत्सीत नजरेने पाहाण्यात येते आहे , यापेक्षा दुर्दैव ते काय !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुडतुडी
स
संदीप डांगे Mon, 08/17/2015 - 06:28 नवीन
वा वा वा! हिंदूंच्या प्रत्येक प्रश्न/समस्यांचे मूळ मुस्लिमांमधेच आहे असे ठाम विश्वास आहे काही लोकांचा. बंधो, जरा अपनेही गिरेबान में झांक कर देखो. स्त्री नरकाचे द्वार आहे, कामवासना मोक्षापासून भरकटवणार्‍या असतात. असल्या अफलातून कल्पना आपल्याच हिंदूलोकांनी पसरवलेल्या आहेत. मी वरच सांगितलेलं की कामवासनेवर नियंत्रण हा भारतीय समाजाच्या मते सर्वोच्च सद्गुण आहे. कामक्रिडेबद्दल घृणा पसरवण्याचे पवित्र कार्य आपल्या सो कॉल्ड साधुसंतांनी केलंय. हिंदू समाज नेहमीच सर्वसंगपरित्याग करणार्‍यांना आदर्श मानत आलाय. त्यातूनच असले विचार उपजले आहेत. इथे मुस्लिमांचा आणि त्यांच्या संस्कृतीचा काहीही संबंध नाहीये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच
उ
उगा काहितरीच Mon, 08/17/2015 - 07:15 नवीन
कामवासनेवर नियंत्रण हा भारतीय समाजाच्या मते सर्वोच्च सद्गुण आहे. कामक्रिडेबद्दल घृणा पसरवण्याचे पवित्र कार्य आपल्या सो कॉल्ड साधुसंतांनी केलंय. हिंदू समाज नेहमीच सर्वसंगपरित्याग करणार्‍यांना आदर्श मानत आलाय.
हे अलिकडच्या काळातील जैन, बुद्ध ही लाट आल्यानंतर . त्याअगोदर काम हे जीवनाचा अविभाज्य अंग होते. व सर्वसंगपरीत्यागला ग्लॅमर तर अशोकाच्या काळानंतरच आले. त्याआधी ऋषीपण संसार करत असत. (काही थोडे जे सर्वसंगपरीत्याग करीत ते समाजात रहातच नव्हते ) -‘यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः ' अशा संस्कृतीचा आदर असलेला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Mon, 08/17/2015 - 07:29 नवीन
आता तुम्ही जैन, बुद्धापर्यंत पोचले का...? बरं बरं. थोड्यावेळाने अजून मागे जाल... नाही? असो. ऋषी हे साधु, संत, सन्यासी ह्याच कॅटेगीरीत येतात हा हिंदू संस्कृतीबद्दल प्रचंड माहिती असल्याचा गैरसमज असलेल्या हिंदूंचा एक फार मोठा गैरसमज आहे महाराजा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच
उ
उगा काहितरीच Mon, 08/17/2015 - 09:22 नवीन
गैरसमज दूर करण्याच्या तुमच्या प्रयत्नासाठी आभार ! मे बी तुम्ही म्हणताय तसा माझा गैरसमज होत असेल कदाचित ! पण मला एवढेच म्हणायचे होते कि पुरातन हिंदू संस्कृतीला काम हा विषय त्याज्य नव्हता . मधल्या काळात (जैन, बुद्ध व त्यानंतर मुस्लीम ) हा विषय असा तिरस्करणीय झाला . (मांसाहारी अन्नाबद्दलही तेच. असो तो वेगळा विषय असल्या कारणामुळे येथे चर्चा करणे योग्य नाही)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Mon, 08/17/2015 - 09:59 नवीन
पुरातन हिंदू ते सद्यस्थितीतले हिंदू यांच्या काम ह्या विषयीच्या बदलणार्‍या मताला इतरधर्मीय विचार कारणीभूत आहेत हा विचित्र दावा काही पटला नाही बुवा! कारण बौद्ध, जैन यांची धर्मतत्त्वे ही मूळ हिंदू विचारपद्धतीतूनच आली आहेत असा कर्मठ हिंदूंचा दावा असतो. मुस्लिम धर्मातही कामवासना ह्या वाईट आहेत, त्यांचा त्याग करणेच इष्ट असं काही आहे असं दिसत नाही (संदर्भः चार-चार विवाह. असंख्य पोरांची पैदास). आपल्या धर्मातल्या चुकीच्या चालीरितींचे खापर दुसर्‍या धर्मावर फोडणे व भारतातल्या स्त्रियांच्या स्थानाचा आणि कामक्रिडेच्या स्थानाचा बादरायण संबंध जोडणे विस्मयकारक आहे इतकेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच
उ
उगा काहितरीच Mon, 08/17/2015 - 10:38 नवीन
पुरातन हिंदू ते सद्यस्थितीतले हिंदू यांच्या काम ह्या विषयीच्या बदलणार्‍या मताला इतरधर्मीय विचार कारणीभूत आहेत हा विचित्र दावा काही पटला नाही बुवा!
हिंदू संस्कृती ही प्रवाही आहे. त्यामुळे नवीन धर्मातील काही गोष्टी अंगीकारण्यात आल्या त्यात नवल नाही. शिवाय धाकदपटशहा ही होताच . त्यामुळे काही चांगल्या/वाईट गोष्टी अंगीकारण्यात आल्या .
कारण बौद्ध, जैन यांची धर्मतत्त्वे ही मूळ हिंदू विचारपद्धतीतूनच आली आहेत असा कर्मठ हिंदूंचा दावा असतो.
माझ्या एका लेखात उल्लेख आला होता कि universal set व sub set मधे समानता असणारच की !
मुस्लिम धर्मातही कामवासना ह्या वाईट आहेत, त्यांचा त्याग करणेच इष्ट असं काही आहे असं दिसत नाही (संदर्भः चार-चार विवाह. असंख्य पोरांची पैदास).
मुस्लीम धर्माबद्दल माझा जास्त अभ्यास नाही आहे त्यामुळे बोलू इच्छित नाही , माफी असावी .
आपल्या धर्मातल्या चुकीच्या चालीरितींचे खापर दुसर्‍या धर्मावर फोडणे व भारतातल्या स्त्रियांच्या स्थानाचा आणि कामक्रिडेच्या स्थानाचा बादरायण संबंध जोडणे विस्मयकारक आहे इतकेच.
मला कालखंडाबद्दल बोलायचे होते.स्त्रियांच्या स्थानाचा व कामक्रिडेच्या स्थानाचा काय संबंध लावला मी ? (रच्याकने यापुढचा माझा प्रतिसाद रात्री मिळेल )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
स्वामी संकेतानंद गुरुवार, 08/13/2015 - 00:51 नवीन
हां धागा इथे टाकताना उथळपणाकडे तर सरकणार नाही ना अशी भीती होती, पण वर उत्तम चर्चा झाली आहे. अनेक मुद्दे आले आहेत. अनेकांनी ही एक समस्या आहे हे मान्य केले आहे आणि संयतपणे या संकल्पनेवर चर्चाही केली आहे. मिपावरून संपूर्ण भारतीय जनतेचा कौल घेणे बरोबर होणार नाही, पण आपल्या विचारांत हळूहळू का होईना, पण बदल होत आहेत. आपण थेट शॉक्ड न होता त्यावर चर्चा करतोय हे दृश्य सुखावह आहे. मला वाटते भारतात शहरीकरण आणि जागेची, प्राइवेट स्पेस ची कमी जाणवू लागेल तेव्हा वर प्रतिसादात आल्याप्रमाणे लवर्स पार्क किंवा जापान्यांसारखे लव होटल्स ही येतील आणि त्यांना अगदीच तीव्र विरोढ होणारही नाही कदाचित. समाजाच्या मानसिकतेमध्ये हळूहळू बदला होत राहील. धर्म अर्थ आणि मोक्षाच्या मागे उर फूटेस्तोवर धावताना काम कड़े ही लक्ष द्यायला पाहिजे हे लक्षात येईलच कधीतरी. वर तुडतुड़ी ह्यांनी शरीराचे चोचले हा शब्द वापरला आहे. आपण जीभेचे चोचले पुरवतो तर शरीराचे चोचले का पुरवू नये? त्यात काय वाईट नेमके? रोजरोज आंघोळ करणे, केस विंचरणे, हलकेच पण नटणे हे पण शरीराचे चोचले पुरवणे आहे ना? काम ही पण शरीराची एक गरज असेल तर ती भागवणे ह्याला चोचले पुरवणे कसे म्हणावे? त्यात अनैसर्गिक काय आहे?आणि वर डॉ खरे आणि अजून कुणीतरी म्हटल्याप्रमाणे ह्यांचा वापर विवाहित जोडपीच कदाचित जास्त करतील,कारण त्यांना खरेच प्राइवेट स्पेस मिळत नाही. तर हे नैसर्गिक नव्हे का? (नेट च्या समस्येमुळे मला फ़क्त रात्री उशीरा किंवा पहाटे मिपावर येणे शक्य होते(वारंवार पेज लोड करावा लागतो), त्यामुळे चर्चेत भाग घेता आला नाही. तरी सबकु थैक्यू वेरी मच.)
  • Log in or register to post comments
त
तुडतुडी गुरुवार, 08/13/2015 - 08:48 नवीन
जीभेचे चोचले पुरवतो तर शरीराचे चोचले का पुरवू नये? >>> जीभेचे चोचले प्रमाणाबाहेर पुरवणं धोक्याचं तसाच शरीराचे चोचले पुरवणंहि . काम ही पण शरीराची एक गरज असेल तर ती भागवणे ह्याला चोचले पुरवणे कसे म्हणावे?>> काम ही पण शरीराची एक गरज आहे ह्याच्याची सहमत आहे . म्हणून तर लग्न व्यवस्था आहे . लग्न काय फक्त वंश वाढवा , म्हातारपणाची काठी मिळावी एवढ्याच हेतूने केलेलं असतं का ? शरीराची गरज पुरवणं हा एक मोठा हेतू असतो ना त्यात . विवाहित जोडप्यांना प्रायव्हेट स्पेस मिळत नाही हा बिनबुडाचा युक्तिवाद आहे . किती विवाहित जोडप्यांना पुरेशी प्रायव्हसी नसते ? तशी नसेल तर लोक लग्नच करणार नाहीत . लपून छपून करणाऱ्यात अविवाहित आणि व्यभिचार करणारे असतात . ह्यांचा वापर विवाहित जोडपीच कदाचित जास्त करतील>>> गैरसमज आहे .
  • Log in or register to post comments
आ
आस्तिक शिरोमणि गुरुवार, 08/13/2015 - 16:34 नवीन
@सार्वजनिक संभोगालये , वाचायला विचित्र वाटत आहे.. पण एकंदर सगळा विचार केल्यावर अश्या गोष्टींची आवश्यकता आहे.. हे पटतय.
  • Log in or register to post comments
ऋ
ऋत्विका Fri, 08/14/2015 - 02:09 नवीन
एका कॉमन समस्येला वाचा फोडल्याबद्दल धन्यवाद. फक्तं यात एकच धोका आहे - अशा जागा हा ब्लॅकमेलर्सचा अड्डा बनण्याची शक्यता आहे. समोरच्या पानटपरीवर किंवा हॉटेलमध्ये कॅमेरा घेऊन बसायचं आणि तिथून बाहेर पडणार्‍यांचे फोटो काढून त्यांना ब्लॅकमेल करायचं.
  • Log in or register to post comments
ड
डायवर Sat, 08/15/2015 - 18:06 नवीन
सार्वजनिक संभोगालयात प्रवेशासाठी दोघांनाही प्रौढ असल्याचा म्हणजे वयाचा पुरावा द्यावा लागेल. याची सरकार दफ्तरी कायमस्वरूपी नोंद राहील. आपल्या देशात " प्राइवेसीचा अधिकार " घटनेने दिलेला नाही. म्हणजे माहितीच्या अधिकारामुळे हे सर्व उघड होणार. जर दोघेही अविवाहित असतील आणि भविष्यात पुढे दुसर्याच व्यक्तीशी या प्रकारांची कल्पना 'न' देता विवाह झाला तर तो संसार जास्त काळ टिकणार नाही. जर दोहोंपैकी एक विवाहित अन एक अविवाहित असेल किंवा दोघेही विवाहित असून एकमेकांचे नवरा बायको नसतील तरीपण संसार टिकणार नाही आणि विवाह बाह्य सम्बधाच्या केसेस होतील . हे टाळण्यासाठी मग आज जसे जमीन खरेदी करण्यापूर्वी वकिलांकडून सर्च रिपोर्ट काढतात अगदी तसेच भावी जोडीदाराबद्दलचे सर्च रिपोर्ट खाजगी गुप्तहेरांकडून काढण्यात येतील. आजपण वर उल्लेख केलेले प्रकार समाजात चालतात पण लपून छपून. सा. सं. मुळे हे प्रकार अगदीच खुले होतील आणि आधीच मेटाकुटीला आलेली लग्न संस्था कोलमडून पडेल, असे वाटते. किंवा असे काही घडू शकते याचा अंदाज आधीच असल्यामुळे तिकडे कोणी फिरकणार नाही अन हि संकल्पनाच फोल जाईल. दुसरे असे कि " लग्नाच्या आमिषाखाली बलात्कार " हा प्रकार सर्रास सा. सं.मध्ये घडताना दिसेल. फसवून किंवा काहीतरी आमिष दाखवून मुली आणणे अन नंतर अत्याचाराची केस झालीच तर ती एक प्रौढ होती व स्वमर्जीने आली होती हे तिथल्या कर्मचार्यांच्या साक्षी पुराव्यांसकट न्यायालयात सिध्द होताना दिसेल.
  • Log in or register to post comments
क
कहर Mon, 08/17/2015 - 10:59 नवीन
मुलगी सज्ञान असेल तर लग्नाच्या अमिषाखाली बलात्कार हा नक्की काय प्रकार असतो आणि त्या मागचे logic काय कोणी सांगेल का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डायवर
द
द-बाहुबली Mon, 08/17/2015 - 11:19 नवीन
एखादी मुलगी पटवायची. तिला तुच माझी प्रियतमा म्हणायचे. लवकरच लग्न करु असे अश्वासन देउन विश्वास संपादन करुन जवळीक साधायची. मग शरीसुखाला नकार देणे उमलत्या नात्यातील अविश्वास ठरेल असे भासवुन अप्रत्यक्ष दडपण अथवा भावी नवराच आहे काय फरक पडतो म्हणुन परस्पर-सहमतीने शरीर संबंध निर्माण करायचे नंतर काहीतरी कारण सांगुन तुझ्याशी लग्न करणे शक्य नाही म्हणून मोकळे व्हायचे म्हणजे लग्नाच्या अमिषाखाली बलात्कार होय. अर्थात असा पुढाकार स्त्रिने घेतला तर तो पुरुषावर बलात्कार ठरावा असा कयास आहे... जाण्कारांच्या प्रतिक्षेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कहर
स
संदीप डांगे Mon, 08/17/2015 - 11:50 नवीन
लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार ही भारतीय दंड संहितेतले एक जुने कलम आहे. प्रेमविवाहात घरून पळून जाणार्‍या मुलींच्या पालकांचे हे एक आवडते कलम होते. एवढ्यातच माननीय सर्वोच्च न्यायालयाने ह्या कालबाह्य कलमाला बाहेरचा रस्ता दाखवल्याचे स्मरते. सज्ञान व सक्षम स्त्रीला असा दावा दाखल करता येणार नाही असे न्यायालयाच्या निकालात म्हटले होते. उलटी केस झाल्याचे ऐकिवात नाही. भारतीय कायदे स्त्री-धार्जिणे असल्याने अशी काही केस पोलिस दाखलच करत नाहीत. असो. सज्ञान असो व अज्ञान. लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार ही केसच मुळात कुठे स्टँड करू शकत नाही. तरी इतकी वर्षे यासंबंधी खटले चालू होते हे विशेष.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: द-बाहुबली
क
कहर Mon, 08/17/2015 - 12:03 नवीन
प्रतिसादाबद्दल दोघांचे धन्यवाद … मी तेच म्हणत होतो कि यात logic काय ? जर सज्ञान मुलगी आई वडिलांच्या संमती शिवाय विवाह करू शकते तर (हे)हि करू शकेल…मग बलात्काराचा काय संबंध
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
स्वामी संकेतानंद Mon, 08/17/2015 - 12:08 नवीन
बरोबर.. अगदी बंडल कायदा आहे असे माझेही मत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कहर
द
द-बाहुबली Mon, 08/17/2015 - 13:00 नवीन
जर सज्ञान मुलगी आई वडिलांच्या संमती शिवाय विवाह करू शकते तर (हे)हि करू शकेल…मग बलात्काराचा काय संबंध
मुलगी सज्ञान आहे हे वास्तव आहेच, पण ज्याच्याशी शरीर संबंध ठेवले तो भामटा निघाला केवळ शरीरसंबंध निर्माणकरण्यापुरते त्याने नाते निर्माण करायचे आमिष दाखवले व नंतर हात झटकले तर तर त्याची / तिची ती कृती बलात्कारच ठरते.
प्रेमविवाहात घरून पळून जाणार्‍या मुलींच्या पालकांचे हे एक आवडते कलम होते.
असणारच. पण स्त्रियांची लैंगीक फसवणूक करणारे कमी नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कहर
ज
जडभरत Mon, 08/17/2015 - 13:18 नवीन
बरोबर! कृपया ही बाजू देखील लक्षात घेणे आवश्यक आहे. विकसनशील देशात स्त्रिया अजून पुरेशा जागरूक नाहीत तिथे ही फसवणूक सहज शक्य आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: द-बाहुबली
क
कहर Mon, 08/17/2015 - 13:24 नवीन
सज्ञान चा अर्थच योग्य अयोग्य कृतींची जाण असणारी असा होतो. एखाद्या दुकानदाराने स्वतः एखाद्या लहानग्याला चोकलेट दिले तर नंतर त्याला चोरी केली म्हणले तर पटते का ? (इथे दुकानदार सज्ञान समजावा )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: द-बाहुबली
द
द-बाहुबली Mon, 08/17/2015 - 15:00 नवीन
ठीक आहे आपण म्हणत आहात तर यापुढे या जगात कोणत्याही सज्ञान व्यक्तिबाबत घडणार्‍या कोणत्याची गुन्हा गुन्हा धरु नये अशी मागणी करुया. त्यांच्याबाबत एखादा गुन्हा घडुच कसा शकतो ? कारण सज्ञानचा अर्थच योग्य अयोग्य कृतींची जाण असणारी व्यक्ती असा होतो. त्यांच्याबाबत मिसहॅप होउच कशी शकेल ? त्यामुळे यापुढे तुरंगांचीही गरज नाही... कारण सज्ञा व्यक्ती तुरुंगात जातीलच कशा ? मुळात सज्ञान व्यक्तळागुन्हा करतीलच कशा सज्ञानचा अर्थच योग्य अयोग्य कृतींची जाण असणारी व्यक्ती असा होतो ? यापुढे फक्त बालसुधारगृहे तेवडी चालु राहुदे अज्ञानी जिवांसाठी. कहर आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कहर
ज
जडभरत Mon, 08/17/2015 - 16:24 नवीन
ब्बरोब्बर बक्षीजी! विकसनशील देशात स्त्री पुरुषाच्या हातातील खेळण्यासारखी असू शकते. ही वस्तुस्थिती नाकारणे बरोबर नाही. अवांतर: आपल्या नात्यातील स्त्री गुन्ह्यास बळी पडली तर खूप कांगावा होतो. पण जेव्हा असे पुरुष स्वतः एका स्त्रीवर अन्याय करतात तेव्हा? कायद्याचा खीस पाडून पुरुषच कसा बरोबर हे सिद्ध केले जाते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: द-बाहुबली
प
प्यारे१ Mon, 08/17/2015 - 16:28 नवीन
इट्स बॅक्षी, बॉमकेस बॅक्षी ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जडभरत
ज
जडभरत Mon, 08/17/2015 - 16:42 नवीन
साॅरी प्यारेजी!!! ;););)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
द
द-बाहुबली Mon, 08/17/2015 - 16:58 नवीन
अवांतरः- हा yaa धाग्यावरील १०० वा प्रतिसाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जडभरत
स
संदीप डांगे Mon, 08/17/2015 - 18:05 नवीन
सज्ञान व्यक्तीसोबत बलात्कार आणि लग्नाचे वचन देऊन केलेला संमतीसंभोग यात आपण गल्लत करत आहात ब्योमकेसबाबू. मुलींना फूस लावून पळवणे हे ही एक लोकप्रिय कलम आहे पालकांचे. पण त्यातही जर पोलिसांसमोर जर मुलीने माता-पित्यांसोबत जायचे नसून ह्या मुलासोबतच जायचे आहे असा कबुली जबाब दिला तर पोलिस काहीच करू शकत नाहीत. लग्न झालेले असो वा नसो. सज्ञान म्हणजे अठरा वर्षे पूर्ण व्यक्ती स्वत:च्या मर्जीने कुणासोबतही जाऊ राहू शकते. त्यास कोणीच आडकाठी करू शकत नाही. (मुलगी अल्पवयीन असल्यास प्रकरण वेगळे) आता लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार ही केसच स्टँड होत नाहीयेना ह्या संदर्भात. ओळखीतली एक केस आहे अगदी अशीच. मुलगी आठ दिवस आजोळी गेली. रिक्षावाल्या पोराने पटवली. नवव्या दिवशी घरून पळून गेली. दहाव्या दिवशी आर्यसमाजमंदिरात लग्न केले. बाराव्या दिवशी स्वतः पोलिसात दाखल झाले आणि मुलीने पालकांसोबत जाण्यास स्पष्ट नकार दिला. तीन महिने मुलगी सो कॉल्ड नवर्‍यासोबत राहिली. चौथ्या महिन्यात चूक उमगून परत आली घरी. मुलगा नालायकच होता. पण कायदा काहीच करू शकला नाही. कारण मुलगी २१ वर्षे वयाची सज्ञान होती. तीला तीचे पूर्ण अधिकार होते. लग्नाचे आमिष दाखवून शारिरिक-मानसिक गैरफायदा घेता येतो. बलात्कार ही व्याख्याच मुळात वेगळी आहे. शारिरिक भोग म्हणजेच बलात्कार असा अर्थ लावून तत्कालिन कायदा मो़कळा झाला. यात आधी शरिराचे आमिष दाखवून नंतर लग्नासाठी मागे लागली असेही आरोप मुलीवर करता येतात पण कायदा स्त्री-धार्जिणा असल्याने असे घडत नाही. सज्ञान व्यक्ती गुन्हा करत नाही असे कुणीच म्हटले नाही. दोन सज्ञान व्यक्तिंमधला शारिरिक संबंध जर परस्परसंमतीने झाला असेल तर तो बलात्कार ठरत नाही असे म्हणायचे आहे. आपले इप्सित साध्य होत नाही असे समजल्यावर मागाहून बलात्कार केला असा कांगावा करता येत नाही. न्यायालयानेही ह्याच गोष्टीवर बोट ठेवून निर्णय दिला आहे. अगदी २५ वर्षेपेक्षा जास्त वय असलेल्या आणि पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या शहरी स्त्रीयांनीही असे खटले दाखल केले आहेत. यात त्यांना संबंध ठेवतांना लग्नाचे आमिष हे फसवे आहे हे ओळखता येत नव्हते असे मानणे म्हणजे अगदी.... असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: द-बाहुबली
क
कहर Tue, 08/18/2015 - 11:54 नवीन
मी सज्ञान लोकांनी केलेला गुन्हा किंवा त्यासाठी होणारी शिक्षा याबद्दल बोलतच नाहि. मी म्हणतोय ज्या गोष्टीचा आनंद दोघांनी मिळून घेतला त्यात नंतर अचानक एकटाच दोषी कसा ठरू शकतो सज्ञान झाल्यावर पळून जाउन लग्न केल्यास त्यावर कोणते कलम लावावे ?तो गुन्हा का समजू नये हेही स्पष्ट करा. समजा "जे" झाले ते दोघांच्या संमतीने झाले आणि नंतर अशा गुन्हाच्या नावाखाली मुलांना blackmail करण्यात आले तर ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: द-बाहुबली
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा