Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

"कॉन्व्हेण्ट" मुलांच्या पालकांवर कारवाई करा .. - भालचंद्र नेमाडे बडबडले !

ह
हेमन्त वाघे
Sat, 08/15/2015 - 18:15
🗣 88 प्रतिसाद
भालचंद्र नेमाडे या व्यक्तीबद्दल कधीही फारसा आदर नवता. आता त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्यावर म्हतार् चळ लागलेला दिसतो हे पहा त्यांची मुक्ताफळे http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/punished-those... ‘कॉन्व्हेण्ट’ मुलांच्या पालकांवर कारवाई करा Maharashtra Times| Aug 14, 2015, 03.49 AM IST इंग्रजी माध्यमांच्या शाळेत प्रवेश घेतल्याने आपल्या पाल्याचे भवितव्य घडते, ही पालकांची अंधश्रद्धा आहे. उलट पालक आपल्या पाल्याचे भविष्य बिघडवत असून, कॉन्व्हेण्ट शाळांच्या 'कत्तलखान्या'तील घोकंपट्टीमुळे ते आपल्या संस्कृतीपासून दूर जात आहेत. याला सर्वस्वी पालक जबाबदार आहेत. त्यामुळे आपल्या मुलांना कॉन्व्हेण्ट शाळेत घालणाऱ्या पालकांवर कारवाई करण्यासाठी सरकारने कठोर कायदा करावा, असे मत ज्ञानपीठ पुरस्कार विजेते डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी मुंबईत व्यक्त केले. मुंबई विद्यापीठाच्या राजीव गांधी समकालीन अध्ययन केंद्राने कलिना संकुलातील फिरोजशहा मेहता सभागृहात 'समकालीन साहित्य आणि समाज' या विषयावर व्याख्यान झाले. त्यावेळी ते बोलत होते. देशी भाषांची जननी संस्कृत नाही 'देशात एक हजार ६५७ भाषा आहेत, मात्र, यापैकी एकाही भाषेची जननी ही संस्कृत भाषा नाही. उलट भारतीय भाषांमधून संस्कृत भाषेचा जन्म झाला. मात्र, संस्कृत भाषेला भारतीय भाषांची जननी असल्याचे काही प्रस्थापित भाषांमधून ​बिंबवले जात असले, तरी संस्कृत भाषा ही कधीही भारतीय मूळ भाषांची जननी नव्हती,' असे ठाम वक्तव्य डॉ. नेमाडे यांनी यावेळी केले. मराठी भाषेच्या साहित्याचा उगम हा इसवी सनाच्या दुसऱ्या शतकात झाला. त्या काळात जैन मराठी व्याकरणकारांनी मराठी भाषा पुढे आणली. परंतु, त्यांचा इतिहास हिंदूंकडून पुसला गेल्यानेच मराठीचा उगम बाराव्या शतकात झाल्याचे सांगण्यात येते. ही बाब इतिहासाला धरून नसल्याचेही नेमाडेंनी यावेळी स्पष्ट केले. साहित्याचे समाजीकरण आणि विस्तारीकण होणे ही काळाची गरज असून, समकालीन साहित्य आणि समाज या दोन्ही परस्पर पूरक बाबी असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. ---------------------- आपले मत काय ? बाय द वे यांना कॉन्व्हेण्ट शाळा अपेक्षित आहेत कि सर्व इंग्लिश माध्यमाच्या शाळा ? यांना त्यातला फरक तरी माहित आहे ना ? सध्याच्या अनेक चांगल्या शाळा जसे कि जमनाबाई , मानेकजी , रायन , DPS , पोदार या कॉन्व्हेण्ट नाहीत. आणि माझी मुलगी इंग्लिश शाळेत शिकते कारण मला ते आवयाषक वाटते. भले मराठी माध्यमातून अनेक महान लोक निघाले असतील .. पण मी जेवा मराठी माध्यमातून आलेले DJ , VJ , इंग्लिश लेखक ( मराठी लेखनात पैसा मिळत नाही - जातो !) , सुपर मोडेल ( मधुताई साप्रेंचा अपवाद वगळता - आणि अनेकजणी तीचापेक्षा मोठ्या हत्या) कोण विचारतो - तेवा मला कोणीच समाधानकारक उत्तर देत नाही ..
वर्गीकरण
भाषा शिक्षण

प्रतिक्रिया द्या
17914 वाचन

💬 प्रतिसाद (88)
त
तुमचा अभिषेक Sat, 08/15/2015 - 18:33 नवीन
असे काही करायला गेल्यास लोकं धर्मांतर करून ख्रिश्चन होतील पण मुलांना कॉन्वेंटमध्येच टाकतील :)
  • Log in or register to post comments
व
विद्यार्थी Sat, 08/15/2015 - 18:47 नवीन
आपल्या देशात भाषा आणि तथाकथित संस्कृतीच्या ठेकेदारांची कमी नाही. भाषा आणि संस्कुती टिकावी म्हणून ही माणसे फार काही करताना दिसत नाहीत. खळबळजनक विधाने करून हे लोक स्वतः प्रसिद्धी मात्र मिळवतात. इंग्रजांनी जगावर राज्य करून त्यांची भाषा जगभर पोहोचवली. आपल्याला असे करण्यापासून कोणी हो अडवले होते? आम्ही कोणावर आक्रमण करीन नाही म्हणून स्वतःला शाबासकी देवून इतरांना संस्कृती नाशाचा दोष द्यायचा यातच हे लोक धन्यता मानतात. आज इंग्रजी ही जागतिक भाषा आहे आणि भारतीय लोकांनी ती उत्तम प्रकारे अंगिकारली असल्यामुळे जगात भारतीय लोक देशाचा लौकिक वाढवीत आहेत. लोकांना इंग्रजी शिकण्यापासून परावृत्त करण्यापेक्षा इंग्रजीबरोबरच आपल्या भाषेचे आणि संस्कृतीचे रक्षण कसे होईल याबद्दल काही पर्याय सुचवण्याचे काम नेमाडे आणि तत्सम साहित्यिकांनी करावे असे मला वाटते. याबरोबरच संस्कृत भारतीय भाषांची जननी आहे किंवा नाही हा वाद निरर्थक आहे. यापेक्षा नेमाडेंनी त्यांचा अधिकार आणि वजन वापरून मराठीच्या प्रसाराचे काम करावे यातच मराठी भाषेचे आणि संस्कृतीचे भले आहे असे मला वाटते.
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Sat, 08/15/2015 - 18:48 नवीन
या विषयावर मिपावर भरपूर चर्चा झाल्या आहेत. ज्यांचे पाल्य इंग्रजीत आहेत त्यांना आपला निर्णय योग्य वाटतो. ज्यांचे मराठीत आहेत त्यांना इंग्रजीवाल्यांचा चुकीचा वाटतो. बरोबर काय, चूक काय हे येणारा काळच ठरवणार आहे. बाकी चालू द्या.
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर Sun, 08/16/2015 - 01:26 नवीन
मला नाही वाटत बरोबर किंवा चुक असं एकच उत्तर आहे.. असतं.. शाळेचे माध्यम हा एकच मुद्दा आयुष्य घडवत नसतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Sun, 08/16/2015 - 16:36 नवीन
इंग्रजीत मुलांना शिकवणार्‍यांना असंच वाटतं की शाळेच्या माध्यमाने आयुष्य घडण्यावर फरक पडतो. तर मराठीवाल्यांचं मत आहे की शाळेच्या माध्यमाने आयुष्य घडण्यावर फरक पडत नाही. म्हणून म्हटलं काळंच ठरवेल योग्य काय आणि अयोग्य काय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
प
पिलीयन रायडर Mon, 08/17/2015 - 06:33 नवीन
इंग्रजी माध्यमात शिकणार्‍या "सगळ्या"च पाल्यांच्या पालकांना असं वाटत नाही की मराठीत न शिकता इंग्रजीमध्ये शिकलं तर फार फरक पडणारे (किंवा व्हाईस व्हर्साही..) "आयुष्य घडवणे" हा एकच मुद्दा नसतो शाळेचे माध्यम निवडताना. आणि पुन्हा एकदा.. कुणीच कधीच निश्चित ठरवु शकणार नाही की काय योग्य होतं नि काय अयोग्य कारण त्यात "आयुष्य घडणे" ह्याची व्याख्या, माध्यमाखेरीज मुलांवर मोठा प्रभाव टाकु शकणारे इतर घटक (आई-वडीलांचा सहभाग, बुद्धिमत्ता, आवड / कल, शिक्षक, शाळा इ....) अशा खुप गोष्टींचा अभ्यास व्हायला हवा. आणि मला खात्री आहे की सरते शेवटी शाळेचे माध्यम आणि आयुष्याचा आलेख ह्यांचा फारसा संबंधच नाही असंच उत्तर निघेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Mon, 08/17/2015 - 07:12 नवीन
मी तरी काय वेगळं बोलतोय? एकतर "सगळ्याच" पालकांना असं वाटतं असं सरसकटीकरण मी केलेलं नाही. प्रत्येक बाबतीत अपवाद असतातच. पण त्याने नियमास बाधा येत नाही. शाळेचं माध्यम आयुष्यावर प्रभाव टाकू शकतं असं बहुसंख्य पालकांना वाटतं कारण या शाळांसमोर रात्र-रात्र रांगा लावून बसलेले हेच लोक दिसतात. फक्त इंग्रजी माध्यम आहे म्हणून भरमसाठ फिया भरणारे हेच लोक दिसतात. आता जर ह्यांना असं वाटत नाही असं जर तुम्हाला म्हणायचं असेल तर म्हणजे असं झालं की आपलं मूल बोर्नविटामुळे सुदृढ होणार नाही असं माहीत असतं तरी आई आपली बोर्नविटाचा ग्लास घेऊन मुलामागे धावत असते. हे म्हणजे ताकाला जाऊन भांडे लपवणे प्रकार झाला. असो. पण 'शाळा व शिक्षणाचे माध्यम हे आयुष्य घडवण्यास एकमेव जबाबदार नाही ही पालकांना मान्य असतं की नसतं' हा विचार या विषयावरील चर्चेसाठी नवीन आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
प
पिलीयन रायडर Mon, 08/17/2015 - 14:47 नवीन
म्हणून म्हटलं काळंच ठरवेल योग्य काय आणि अयोग्य काय.
तुमच्या ह्या वाक्यावर मी प्रतिवाद करतेय की असं योग्य किंवा अयोग्य ठरवता येणार नाही. ते कायमच संदिग्ध रहाणार. कारण शेवटी ह्यात प्रत्येकाचा दृष्टीकोन हा एक सापेक्ष घटक आहे. बाकी रांगा लावुन आणि भरमसाठ फिया भरुन बद्दल; त्या केवळ शाळेचे माध्यम बघुन नाही तर शाळेची गुणवत्ता, बोर्ड (एस.एस.सी / सीबीएएस्सी इ), इतर उपयोगी सोयी जसे की घराजवळ असणे / आपल्या भागातील सर्वात उत्तम शाळा असणे / पाळणाघर किंवा डे बोर्डींग उपलब्ध असणे (आईवडील दोघंही काम करणारे असतील तर), शाळेची बस खात्रीलायक असणे (काही शाळा सध्या बदनाम आहेत), मोठे भावंड तिथेच असणे म्हणुन सोय (अत्यंत महागड्या शाळेत मोठे भावंड अनेक वर्षांपुर्वी टाकले आणि आता त्याला दुसरीकडे अ‍ॅडमिशन मिळत नाही, म्हणुन धाकटेही तिथेच अशी उदाहरणे पाहिली आहेत), शाळेतच इतर छंदांचे वर्ग उपलब्ध असणे म्हणजे मुलांना अजुन चार ठिकाणी न्यायला नको इ इ इ.... अन्नेक गोष्टी असतात शाळा पहाताना. मी वर लिहीलेला एक एक मुद्दा इथे एक एक काथ्या म्हणुन कुटत बसता येईल. पण मला खरंच इच्छा नाही कारण असे कितीही काथ्ये कुटले तरी ज्याला जे करायचंय तो तेच करतो, मिपावरची चर्चा माणसाचे इतके मोठे निर्णय बदलत नसते. शिवाय प्रत्येकाची पालक म्हणुन आपल्या पाल्याला घडवण्याची वेगवेगळी पद्धत असते. कुणाला छंदवर्ग लावणं महत्वाचं वाटतं, कुणाला तो मुलांवर अकारण लादलेला ताण वाटतो. एक गट दुसर्‍याकडे बोट दाखवुन "त्यांच बघा कसं.. आम्ही नै बै.." टाईप नेहमीच बोलणार. मला मातृभाषेचा भयंकर अभिमान आहे. पण तरीही माझ्या आयुष्यात अशी काही कारणं आहेत की माझा मुलगा आज इंग्रजी माध्यमात शिकतो. आणि हो, नाईलाज हे त्यातलं एक कारण अजिबात नाही. माझ्या परिस्थितीमध्ये मला तेच सर्वात जास्त सोयीचं / फायद्याचं आहे. आता इथे कितीही चर्चा झाली तरी माझी परिस्थितीतर बदलत नाही ना. असो.. ह्या मुद्द्यावर खरंच खुप चर्चा झालीये. मी वाचलेत तिथले तुमचे प्रतिसाद. छान लिहीलं आहे तुम्ही. पण मी तरी माझ्या मुद्द्यांवर ठाम आहे. तस्मात, अजुन कोणत्याही चर्चेत रस नाही. धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Mon, 08/17/2015 - 17:36 नवीन
ताई, वैयक्तिक घेऊ नका. मिपावरील चर्चा अजिबात वैयक्तिक नसाव्या असं मला नेहमीच वाटत आलंय. तुम्ही मांडलेले मुद्दे याआधीही मांडून झालेत हेही माझ्या लक्षात आहे. मिपावर चर्चा करणारे बहुतांश लोक सुज्ञ आहेत आणि त्यांचे निर्णय काही विशिष्ट विचारांतीच घेतले असतात असेही लक्षात येतं वेळोवेळी. आताही या विषयावर काथ्या कुटायची इच्छा नाहीये आणि गरजही. तुम्ही म्हणताय तेही बरोबर आहे की एक गट दुसर्‍याला मूर्ख (किंव तत्सम आणखी काही) लेखण्याचा प्रयत्न करतो. आणि हे 'मुलगा मराठी शाळेत असणारा पालक' म्हणून जास्त बोचरेपणाने अनुभवले आहे. माझं जे विधान आहे की 'काळच ठरवेल' ते फक्त अशा पालकांना उद्देशून आहे जे आयुष्य घडवण्याचा एकमेव पर्याय असल्यागत मुलांना इंग्रजीत घालत आहेत. तुम्ही मांडलेले मुद्दे बहुसंख्य पालकांच्या प्राथमिकता यादीवर नाहीत असे निरिक्षण आहे. आपलं आयुष्य हे अनेक शक्यतांवर अवलंबून घडत असतं, एकच एक शक्यता धरून राहणार्‍यांना काळच उत्तर देतो असे मला म्हणायचे होते. त्यात केवळ मराठीच उत्तम किंवा केवळ इंग्रजीच उत्तम असे म्हणणारे दोघेही आलेत. ह्या अनुषंगाने आपण दोघेही एकच कथन करत आहोत असं मला म्हणायचे होते. असो. माझे इतरत्र दिलेले प्रतिसाद तुम्हाला आवडले हे कळवल्याबद्दल मनापासून धन्यवाद! :-) चला, चणे-फुटाणे वा पॉपकॉर्न घेऊया आणि ह्या नव्या भिडूंच्या चर्चेचा आस्वाद घेऊया..!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
आ
आदूबाळ Sat, 08/15/2015 - 20:18 नवीन
आजोबांना आवरा!
  • Log in or register to post comments
म
मास्टरमाईन्ड Sat, 08/15/2015 - 20:38 नवीन
अशा यडचाप निवृत्तांची कमी नाहीये आपल्या समाजात. अशांना फार महत्त्व न देता अनुल्लेखानं मारणंच योग्य आहे. आमची मुलं कुठल्या माध्यमाच्या शाळेत घालावीत किंवा शाळेतच घालावीत की नाही हे आमचं आम्ही बघू हो. विषय कुठला, तर 'समकालीन साहित्य आणि समाज' आणि हा माणूस बोलतोय काय तर ‘कॉन्व्हेण्ट’ मुलांच्या पालकांवर कारवाई करा. आपण यावर काथ्याकूट करून मात्र उगीचच अशा यडचापांना महत्त्व देतोय असं वाटतंय
  • Log in or register to post comments
क
कोमल Sat, 08/15/2015 - 20:43 नवीन
माझी मुलगी इंग्लिश शाळेत शिकते कारण मला ते आवयाषक वाटते पण मी जेवा मराठी माध्यमातून आलेले DJ , VJ ,[म्हणजे] इंग्लिश लेखक ( मराठी लेखनात पैसा मिळत नाही - जातो !)[वाक्य कळाले नाही] , सुपर मोडेल (अगं बै, कधी मोडेल??) ( मधुताई साप्रेंचा अपवाद वगळता - आणि अनेकजणी तीचापेक्षा मोठ्या हत्या [अत्यंत हादरलेले आहे] ) कोण विचारतो - तेवा मला कोणीच समाधानकारक उत्तर देत नाही ..[काहीच कळाले नाही] प्रगती बद्दल म्हणत असाल तर नक्की कसली प्रगती? माझ्या मराठी माध्यमाच्या शाळेने मला त्यावेळी कित्येक स्पर्धा, स्पर्धापरिक्षा यांच्यासाठी मंच मिळवून दिला होता ज्याचा माझ्या पुढच्या शिक्षणात आणि आत्ताच्या आयुष्यातही खूप उपयोग होत आहे. प्रगती इंग्लिश बोलण्याची असेल तर माझ्या ओळखीचे अशी कित्येक मित्रमंडळी इंग्रजी माध्यमातून शिकले आहेत की ज्यांच्या पेक्षा मी उत्तम आणि शुद्ध इंग्लिश बोलते. माझी आई २९-३० वर्षे इंग्रजी माध्यमाच्या शाळेत (आमच्या शहरातील इंग्रजी माध्यामाची 'टॉप'ची शाळा, कॉन्व्हेंट नाही) माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्द्यार्थ्यांना शिकवत आहे. तिच्या मते मराठी माध्यम मुलांच्या सर्वांगी विकासाला उपयुक्त असते. मला नाही वाटत की मराठी माध्यमाच्या शाळेत शिकल्याने माझ्या आयुष्यात मी काही गमावले आहे. दृश्यम मधल्या "जिसे सचमे पढना होता है वो किसीभी स्कूलमे पढके बडा आदमी बन सकता है." या डायलॉगशी मी पूर्णपणे सहमत आहे. राहता राहीला नेमाडेंच्या वक्तव्याचा मुद्दा, त्यांच्या मतांशी फारशी कधी सहमत नव्ह्तेच त्यामुळे 'कत्तलखान्या'तील घोकंपट्टी, आणि कायदेशीर कारवाई वगैरे वगैरे हा भाग अलाहिदा. अवांतर: तुम्हीपण आंग्ल माध्यमात शिकला आहात का? कारण तुमच्या मराठीवरून तसं वाटत आहे. आणि तुम्ही लिहिलेल्या प्रत्येक वाक्यात काहीतरी गंडले आहे. फक्त "मटा"चा भाग ओके दिसतोय. टायपिंगसाठी खालील दुवे पाहा: http://www.misalpav.com/node/31920 http://www.misalpav.com/node/1312 अतिअवांतर : मराठी माध्यमांचा आणि पर्यायाने आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे. आम्ही हमरी-तुमरी वर येऊ शकतो..
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे Sun, 08/16/2015 - 07:52 नवीन
कोमलताई तुमचा प्रतिसाद आवडला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोमल
उ
उगा काहितरीच Sat, 08/15/2015 - 21:39 नवीन
नेमाडेंनी आत्ता कुठे मत व्यक्त केलंय . जर त्यांनी यासाठी कदाचित आंदोलन चालू केलं तर काही वर्षांनी सरकार कदाचित यावर विचार करेल . त्यानंतर काही वर्षांनी कदाचित त्यावर विधेयक आणले जाईल . त्यानंतर काही वर्षांनी कदाचित संमत होईल . तोपर्यत सध्याची पिढी म्हातारी होईल . म्हणून द्याना सोडून .
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर Sun, 08/16/2015 - 01:29 नवीन
नेमाडे काहीही बोलतात, ते सोडा. तुम्ही कधी नीट टाईप करायला शिकताय? तुम्ही, तुमची लेकरं कोणत्याही माध्यमात शिकलेले / शिकत असाल तरी आपण मराठी आहोत तर नीट मराठी लिहीता / बोलता / टंकता यायला हवं. अगदी १००% शुद्धलेखन नाही जमलं तरी चालेल. थोडे प्रयत्न करा, नक्कीच छान लिहु शकाल.
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Mon, 08/17/2015 - 09:27 नवीन
+ १ आणि जर मराठीची लाज/कमीपणा/कॉम्प्लेक्स वाटत असेल, तर प्लीज एखाद्या इंग्रजी भाषेतील फोरम वर तुमची ही मते मांडा. (धागाकर्त्यासाठी) अवांतरः १) भालचंद्र नेमाडेंचं मी काहीही वाचलेलं नाही. त्यांच्याबद्दल माझं कसलंही वैयक्तिक मत नाही. पण ज्ञानपीठ विजेत्या लेखकाचा इतका अपमानास्पद उल्लेख होऊ नये असं वाटतं. २) मराठी माध्यामातून शिक्षणाची गुणवत्ता डीजे, व्हीजे आणि "मोडेल" वरून कधीपासून ठरायला लागली?? ३) तुम्हाला नावे माहिती असण्याची शक्यता शून्य आहे, तरी काही प्रातिनिधिक उदाहरणे: रघुनाथ माशेलकर, जयंत नारळीकर, डॉ नरेंद्र जाधव, प्रकाश आमटे, विकास आमटे, मंदाकिनी आमटे, यशवंत चंद्रचुड, नीळकंठराव कल्याणी, (ही सद्यकालीन नावे आहेत. थोडी जुनी नावे दिली -स्वातंत्र्यपूर्व उदा=डॉ बाबासाहेब आंबेडकर, वीर सावरकर इ- तर यादी भरपूर मोठी होईल.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
अ
अत्रुप्त आत्मा Sun, 08/16/2015 - 01:36 नवीन
Nema de
  • Log in or register to post comments
स
सामान्यनागरिक Sun, 08/16/2015 - 04:58 नवीन
जर आपल्या पिढीने याबाबत काही केले नाहीतर ही पिढी बरबाद होइलं आधी आठवी पर्यंत पारेक्षा बंद करून वाट लावली आहे . गंमत अशी आहे की शिक्षण मातृभाषेतूनच व्हायला पाहिजे हे खुप लोकांना पटतं पण कोणीच काही करू शकत नाही, इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणावर २५% कर लावा म्हणजे पालकांनाही शिक्षा होईल. मातृभाषेतून न शिकणाऱ्या लोकाना राज्य सरकारी नोकरी मिळु नये.
  • Log in or register to post comments
म
मास्टरमाईन्ड Sun, 08/16/2015 - 07:14 नवीन
मातृभाषेतून न शिकणाऱ्या लोकाना राज्य सरकारी नोकरी मिळु नये.
तत्त्वतः मान्य. पण आधी राज्य सरकारचा १००% व्यवहार मातृभाषेत आहे का? नसेल तर वरील वाक्य विनोदार्थीच घ्यावे लागेल.
इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणावर २५% कर लावा म्हणजे पालकांनाही शिक्षा होईल.
आधी मराठी शिक्षणाचा दर्जा सुधारा (काही सन्माननीय अपवादात्मक शाळा सोडून.) आणि मग इतर माध्यमांवर कर लावण्याची भाषा करा. मी स्वतः १००% शालेय शिक्षण मराठीतून घेतलंय. तेसुद्धा शहरी, ग्रामीण आणि सीमाभागातल्या शाळांमधून. माझ्या आईवडिलांनी वेळोवेळी व्यक्तिगतरित्या माझ्या अभ्यासावर लक्ष दिलं म्हणून बरंय नाहीतर फक्त शाळेच्या जिवावर बसलो असतो तर आज नक्की काय झालो असतो काय माहित. आपले लोक मातृभाषेला सोडून इंग्रजी माध्यमाकडे का वळतायत याचा शास्त्रीय अभ्यास गरजेचा आहे. शालेय शिक्षणानंतर पुढच्या संधी आहेत का मराठीत? ११वी १२वी ला इंग्रजीच माध्यम आहे. अगदी काही ठिकाणी ११वी १२वी मराठी माध्यमातून असलं तरी पदवी अभ्यासक्रम? आज मराठीचा पुळका आलेल्या तथाकथित संस्कृतीरक्षकांपैकी एकानं तरी आपापल्या व्यावसायिक क्षेत्रात मराठी भाषेतून व्यवहार करण्याचा साधा प्रयोग तरी केलाय का? कधीतरी इन्व्हॉईस मराठीत पाठवून बघा ग्राहकाला. त्यानं स्वीकारलं तरी सी ए स्वीकारेल का? सी ए नं स्वीकारलं तर सेल्सटॅक्सवाले स्वीकारतील का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सामान्यनागरिक
स
सामान्यनागरिक Mon, 08/17/2015 - 11:47 नवीन
माझ्या आईवडिलांनी वेळोवेळी व्यक्तिगतरित्या माझ्या अभ्यासावर लक्ष दिलं म्हणून बरंय नाहीतर फक्त शाळेच्या जिवावर बसलो असतो तर आज नक्की काय झालो असतो काय माहित. या बाबतीते मी आपल्याशी पूर्णतया सहमत आहे. कुठल्याही माध्यामाच्या शाळेत घातले तरी आपल्या पाल्याकडे पालकांनी पूरेसे लक्ष देणे अनिवार्य आहे.आणी जेंव्हा लोक म्हणतात की मी बिगरी ते म्यट्रीक मराठीतुनच शिक्षण घेतले आणि माझे भलेच झाले तेंव्हा पालकांचे लक्ष आणि काही अंशी परिस्थीतीने निर्माण केलेली शिक्षणाची गरज कारणीभूत असते. बाकी मुद्दे : पुढे असलेल्या संधी आणि राज्य सरकारचे कामकाज ई., आपण जर पहिलेपासून लक्ष दिले असते तर हे सगळे आपोआपच झाले असते. जर चीनी/जपानी लोक संपूर्ण आपल्या भाषेतुन कारभार करु शकतात तर आपण का नाही ? आणि इवलीशी का होईना सुरुवात करायला हवी. मोदींच्या भाषेत सांगायचे झाले तर ' जेंव्हा अकरा कोटी लोक एक पाऊक चालतील तर नक्कीच फरक पडेल.' मी मिपा कडे का वळलो याचे हेही एक कारण आहे. वेगवेगळ्या शब्दांना मराठी प्रतिशब्द शोधण्याचा प्रयत्न ईथे चालु असतो. आता सगळ्या मिपाकरांनी शक्यतो इंग्रजी शब्द वापरणार नाही असे ठरवावे. काही वेळेस शक्य नसेल पण सुरुवात करायलाच हवी. या बाबतीत मी इंग्रजी हेलिकाप्टर शब्दाला 'चक्रपंख यान हा शब्द वापरलेली बघितला. अवघड आहे. पण प्रयत्न करायला पाहिजेच्ज. हळु हळु होईल सवय !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मास्टरमाईन्ड
ग
गुलाम Sun, 08/16/2015 - 07:53 नवीन
नेमाडेंचे विचार तुम्हाला पटत नसतील हे मान्य आहे. पण ते एक ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ (वयाने आणि कर्तुत्वाने देखील) साहित्यीक आहेत. त्यामुळे त्यांच्याविषयी 'म्हातारचळ', 'यडचाप'(लै शाना यांच्या प्रतिसादात) वगैरे शब्द वापरणं बरोबर नाही, असं वाटतं. बाकी, ज्याची-त्याची समज/पातळी वगैरे वगैरे..
  • Log in or register to post comments
उ
उगा काहितरीच Sun, 08/16/2015 - 08:47 नवीन
सहमत ! रच्याकने आपले विचार बरोबर असतील तर समोरच्या व्यक्तीला उगाच आदरार्थी बोलण्याची मजा वेगळीच असते . ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गुलाम
ग
गुलाम Sun, 08/16/2015 - 09:25 नवीन
हा हा हा!!! जसं श्री. हाफीज सईद??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच
म
मास्टरमाईन्ड Sun, 08/16/2015 - 10:45 नवीन
आवडलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गुलाम
स
सुबोध खरे Mon, 08/17/2015 - 06:45 नवीन
न्यायालयात प्रतिस्पर्धी वकिलांची "अक्कल" काढायची असेल तरी त्यांचे उल्लेख आमचे विद्वान वकील( LEARNED COUNSEL) असाच केला जातो.याची इथे आठवण झाली
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मास्टरमाईन्ड
व
वेल्लाभट Sun, 08/16/2015 - 08:19 नवीन
ते मराठी इंग्लिश माध्यम राहूद्या बाजूला तो वेगळाच विषय आहे. पण संस्कृत ही कुठल्याही भारतीय भाषेची जननी नाही............. भैसटलंय कुणीतरी :ड
  • Log in or register to post comments
व
विशाखा पाटील Sun, 08/16/2015 - 09:36 नवीन
रावसाहेब कसबे यांनी या मोठ्या लेखात भालचंद्र नेमाडे यांचा खरपूस समाचार घेतला आहे. त्याला उत्तर देण्याऐवजी ते नेहमीप्रमाणे असे लक्षवेधी वक्तव्ये करतायत. http://divyamarathi.bhaskar.com/news/MAG-article-on-nativism-by-dr-5049721-NOR.html
  • Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम Sun, 08/16/2015 - 17:46 नवीन
कसब्यांनी अगदी मोजून हाणलेलं आहे नेमाड्यांना. आणि तेही कुठेही मर्यादा न सोडता किंवा आक्रस्ताळेपणा न करता. एखाद्याची रेवडी उडवून तो कसा धन्यवाद आहे (या शब्दाचा अर्थ पुणेकरांना नक्कीच माहित असेल ;) हे कसं दाखवून द्यावं आणि तेही कुठेही तोल न सोडता, किंवा इथेच नमकीन यांनी म्हटल्याप्रमाणे गटारात न उतरता - त्याच्यासाठी हा लेख आदर्श आहे. This is a perfect example of how to expose someone!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशाखा पाटील
म
मारवा Mon, 08/17/2015 - 09:10 नवीन
बोकोबा कसबे नी तुम्ही म्हणताय तसा प्रतिवाद केलेलाच आहे नेमाड्यांचा पण सर्वोत्त्म प्रतिवाद म्हणजे असामान्य म्हणावा इतका खोलवर विलास सारंग यांनी केलेला आहे एकदा वाचुन बघावा नेमाडे ज्या संकल्पना देशीवादाचा मुलाधार म्हणुन वापरतात त्यांच्या पाश्चात्य मुळांचा उलगडा आणि इतर बरच काहि सारंग सप्रमाण दाखवुन देतात. http://scroll.in/article/749071/away-from-cricket-indias-archers-make-it-an-independence-weekend-worth-celebrating आणि हो विलास सारंग आणि नेमाडे परस्परांचे मित्र होते व एकमेकांच्या प्रोजेक्ट्स वर काम हि केलेले आहे आणि विरोध हि कायम ठेवलेला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
व
विशाखा पाटील Mon, 08/17/2015 - 09:38 नवीन
लिंक चुकली आहे. शक्य झाल्यास परत द्याल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
म
मारवा Mon, 08/17/2015 - 11:50 नवीन
विशाखा जी काहितरी गोची झाली होती अगोदरच्या लिंक मध्ये निदर्शनास आणुन दिल्याबद्दल आभार http://scroll.in/article/720798/the-perils-of-nativism-an-essay-by-vilas-sarang-1942-2015
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशाखा पाटील
य
यशोधरा Mon, 08/17/2015 - 05:58 नवीन
ह्या लेखासाठी धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशाखा पाटील
स
सौंदाळा Sun, 08/16/2015 - 09:44 नवीन
पुरंदरेंना महाराष्ट्रभुषण देऊ नये म्हणुन नेमाडेंनी पत्र पाठवल्याची बातमी पाहिली. वर म्ह्टल्याप्रमाणे म्हातारचळच लागलय असं वाटतय. यांचेच ज्ञानपीठ काढुन घ्यायला पाहिजे.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sun, 08/16/2015 - 11:34 नवीन
@यांचेच ज्ञानपीठ काढुन घ्यायला पाहिजे. >> अगदी अगदी.. ज्ञान संपलं,आणि पीठच राहिलय..असच दिसतय यांचं एकंदरीत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौंदाळा
इ
इरसाल Mon, 08/17/2015 - 13:28 नवीन
ज्ञानपीठ आणी मुक्तपीठ मला एकच वाटतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौंदाळा
ब
बोका-ए-आझम Sun, 08/16/2015 - 10:35 नवीन
भालचंद्र नेमाडे स्वतः इंग्रजीचेच प्राध्यापक आहेत. माझ्या एक माजी सहकारी डाॅ.प्राची खांडेपारकर यांनी त्यांच्याच मार्गदर्शनाखाली इंग्रजी साहित्यात Ph.D. केलेली आहे. असा माणूस जेव्हा इंग्रजी माध्यमाच्या शाळांवर बंदी घाला आणि काॅनव्हेंट शाळांमध्ये शिकणा-या पालकांवर कारवाई करा असं म्हणतो तेव्हा मजा वाटते, हसू येतं आणि नंतर कीवही वाटते. त्यांच्या वयाचा आणि कर्तृत्वाचा मान ठेवायचा असं म्हटलं तर त्यांनी असं काही खास कर्तृत्व गाजवलं आहे का? कोसला ही एक चांगली कादंबरी आहे, पण असामान्य वगैरे काही नाही. त्या वेळी असं लिखाण दुर्मिळ होतं म्हणून त्याचं कौतुक झालं असावं. वयामुळे आदर दाखवायचा असं म्हटलं तर त्यातही त्यांचं काय कर्तृत्व आहे? असे अनेक वयाने वाढलेले लोक आहेत अाजूबाजूला. त्यांनी उद्या काहीही नाही केलं तरी त्यांचं वय वाढणारच आहे. मला वाटतं, नेमाड्यांकडे आपण सहानुभूतीने पाहायला पाहिजे.मनोरूग्णांना त्याचीच जास्त गरज असते.
  • Log in or register to post comments
म
मास्टरमाईन्ड Sun, 08/16/2015 - 10:44 नवीन
पटलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
श
श्रीरंग Sun, 08/16/2015 - 12:04 नवीन
१००% सहमत. ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्यानंतर तर जास्तच चेकाळला आहे हा प्राणी. प्रत्येक विषयावर विनाकारण स्वतःची मतं थुंकण्याचा अधिकार मिळाल्यासारखा वागू लागला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
न
नमकिन Sun, 08/16/2015 - 12:06 नवीन
नेमाडेंचा नेम चुकला की नाहीं हे आपण ठरवतांना स्वत:ची लायकी तपासुन पहाणे गरजेचे आहे, नव्हे क्रमप्राप्त आहे. विचारधारा ही आपल्या मनाप्रमाणे वाहिली, वळविली पाहिजे अन्यथा तो प्रलयंकारी पुर असा कंठशोष ( येथे टंकधोप) काय कामाचा? समोरच्याला नावे ठेवून, मूळ विषयास बगल देऊ इच्छिना-यांनी कृपया विषयाला धरुन (प्रसंगी चिकटून) रहावे. जर समोरचा गटारात उतरला तर आपण नाल्यात उतरायचं का? श्री डांगे यांनी सांगितल्याप्रमाणे याविषयास धरुन स्वतंत्र चर्चा आहेतंच. वैज्ञानिक /वैद्यकीय क्षेत्रात देखील नवीन संकल्पना वर ऊहापोह घडतोच तेव्हा संबंधित जानकार त्या क्षेत्रीय असूनही काही निराळे आग्रही मत/भावना /निरीक्षण प्रकट केल्यास कुणीही त्यावर टीका करतांना तारतम्य ठेवतात. असो! नेमाडे निर्भीडपणे रोखठोक नेहमीच होते, तेव्हा काय नवीन असेल तर बोला!
  • Log in or register to post comments
स
सामान्य वाचक Sun, 08/16/2015 - 18:01 नवीन
बोका यांच्या मताशी पूर्ण सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नमकिन
स
संदीप डांगे Sun, 08/16/2015 - 18:30 नवीन
निर्भीड म्हणजे कोणाची भीड न बाळगणारे. सवंग, बाष्कळ हा आपआपला दॄष्टिकोण आहे. असो. धागालेखकाला काय म्हणायचे आहे ते काही स्पष्ट झाले नाही. नेमाड्यांच्या मूल्यविहिन्/निरुपद्रवी विधानांना सनसनाटी प्रसिद्धी देणे मटा सारख्या सवंग्/बाष्कळ वर्तमानपत्रांचे नेहमीचेच कार्य. त्यात नवीन काहीच नाही. मुद्दा कॉन्वेंटमधे जाणार्‍या मुलांचा आहे. त्यावर चर्चा न होता नेमाडेंबद्दलचे वैयक्तिक राग-लोभ बाहेर पडत आहेत. आता काही लोकांना नाही नेमाड्यांबद्दल आदर तर ठिकेय ना. मलाही लता मंगेशकरबद्दल तसंच वाटतं पण आता गाण्यांचा आस्वाद घ्यायचा तर कुणी गायलंय यापेक्षा गाणं मला आनंद देतंय का नाही याचा विचार मी करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सामान्य वाचक
म
मदनबाण Mon, 08/17/2015 - 06:23 नवीन
नेमाडे ? माझा पास ! ;) जाता जाता :- अनेक वेगवेगळ्या ख्रिचन संतांच्या नावाने शाळा उघडलेल्या जागोजागी दिसतात, परंतु याच महाराष्ट्रात मराठी शाळांची संख्या वाढत नसुन कमीच होताना दिसते ! जवळ मराठी शाळा नसल्यास पालकांना पर्याय उरतो ? मदनबाण..... आजची स्वाक्षरी :-Live: PM Narendra Modi interacts with Indian workers at ICAD PM Modi in UAE: Abu Dhabi has deep pockets, but will it loosen purse strings for India?
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Mon, 08/17/2015 - 06:46 नवीन
अरेरे... नेमांडेंचे महान विचार पोहचवण्याचे कार्य राहुन गेले हो माझ्या हातुन ! दुवा :- नवरा, बायकोला एक प्रेयसी आणि प्रियकर असायला काय हरकत - भालचंद्र नेमाडे नेमाडे कधी आणि काय बोलतील हे बहुधा त्यांनाच ठावुक नसावे असे एकंदर वाटते ! मदनबाण..... आजची स्वाक्षरी :-Live: PM Narendra Modi interacts with Indian workers at ICAD PM Modi in UAE: Abu Dhabi has deep pockets, but will it loosen purse strings for India?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
ग
गॅरी ट्रुमन Mon, 08/17/2015 - 06:53 नवीन
भालचंद्र नेमाडे ना? मग माझा पास :)
  • Log in or register to post comments
र
राही Mon, 08/17/2015 - 07:53 नवीन
नेमाडेंची वक्तव्ये काहीही असोत, 'मराठी आणि तत्सम अनेक भाषांचा उगम संस्कृतातला नाही, मात्र संस्कृतावर त्या पुष्ट झाल्या आहेत' ह्या मताला आज मोठा विद्वत-आधार आणि जनाधारही मिळतो आहे. प्राकृत भाषा संस्कृताच्या आधीपासून अस्तित्वात होत्या आणि संस्कृत आणि प्राकृत दोन्ही परस्परपोषित्वाने (सिम्बायॉसिस्) काही काळ वाढल्या, पुढे संस्कृताची वाढ खुंटली आणि प्राकृतांमध्येही बदल होऊन आजच्या भाषा निर्माण झाल्या असा काहीसा सिद्धांत आज लोकमान्य-विद्वन्मान्य होतो आहे.
  • Log in or register to post comments
ज
जेपी Mon, 08/17/2015 - 07:54 नवीन
इथे लिहीणारे कितीजण नेमाडे सायबांसारख्या फेंदारलेल्या मिशा ठेवतात. जर तुम्हाला नेमाडे सायबांसारख्या फेंदारलेल्या मिशा नसतील तर तुम्ही त्यांच्यावर टिका करण्यास अपात्र आहात. (मुछवाला)-जेपी
  • Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु Mon, 08/17/2015 - 08:00 नवीन
मी स्वतः कॉन्वेंट (नुसते इंग्रजी माध्यम नाही तर खुद्द क्रिस्चियन कॉन्वेंट) शाळेत शिकलो आहे! मग? मला बर्खास्त करावे का माझ्या नोकरीमधुन आत्ताच्या आत्ता? मुळात प्रश्न माध्यमाचा कधीच नव्हता असे वाटते कारण पोरे शाळेत ६ तास असतात गृहपाठ अन इतर कार्यकलाप मिळून ४ तास धरा, उरलेले चौदा तास घरी असतात, जबाबदारी पालक अन शाळा दोघांची आहे, कॉन्वेंट वर हिंस्र टिका करणाऱ्या किती लोकांनी मराठी थर्ड लैंग्वेज च टेक्स्ट बुक वाचले आहे? अमर शेख ते विंदांच्या कविता उत्तमोत्तम गद्य अन पद्य असलेली ती पुस्तके असतात पहिले तिकडे सुद्धा लक्ष दिले पाहिजे टिकेला कोणी कोणाला मज़्ज़ाव करू शकत नाही पण टिका सुद्धा डोळस असावी असे माझे म्हणणे आहे उरता उरला मराठी शाळांचा प्रश्न तर प्रत्येक शाळा काही पार्ले टिळक किंवा हुजूरपागा होऊ शकत नाहीत, महाराष्ट्र सरकार ला भाषा अन संस्कृतीद्रोही ठरवताना किती मराठी शाळा उघडल्या आहेत त्यांचा आजचा गुणात्मक दर्जा काय आहे हे तपासल्या शिवाय सरकार ला कसे दूषण देता येईल हे मला कळत नाही, कीती लोकांनी ग्रामीण महाराष्ट्रातल्या मराठी शाळा संस्थाचालकांची खाबुगिरी पाहिली आहे किंवा त्यावर काही संशोधन केले आहे? नसल्यास तुम्हाला कल्पना नाही शाळा तिही मराठी काढणे हा कसा बिनभांडवली धंदा झालाय (ह्यावर एक स्वतंत्र लेख होईल) अहो अनुदानाचे पैसे संस्थाचालक लुटायला लागले म्हणुन सरकार ने विनाअनुदानित तत्वावर शाळा मंजुरी द्यायला सुरुवात केली तर ह्या महाभागांनी शिक्षक परमानेंट करणे ते खिचड़ी सगळ्यात ओरबाडायला सुरुवात केली , ह्या सगळ्यापासून इंग्रजी शाळा मुक्त आहेत असा माझा दावा नाही पण मग दोहोत जर तुलनात्मक फरक नसला तर एकाच बाजुला संस्कृतीबुड्वे म्हणून मारण्यात काय हशील??
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Mon, 08/17/2015 - 08:05 नवीन
नेमाडे, अमर्त्य सेन, काटजू, प. बा. सावंत इ. ना म्हातार्‍या वयात नव्याने अक्कल दाढ यायला सुरूवात झाली आहे असे वाटतेय. काहीही करून प्रसिद्धी मिळविणे या एकमेव उद्देशाने ते मुद्दाम वादग्रस्त वक्तव्य करीत असतात. असल्यांकडे संपूर्ण दुर्लक्ष करावे.
  • Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु Mon, 08/17/2015 - 08:32 नवीन
यादीत दीनानाथ बात्रा सुद्धा ऐड करावे काय? (बाकी अजूनही नावे आहेत फ़क्त भावना ठोक च्या भावात दुखावतील लोकांच्या म्हणुन जोड़त नाही )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
त
तुडतुडी Mon, 08/17/2015 - 08:30 नवीन
कॉन्व्हेण्ट मधल्या मुलांच्या पालकांवर कारवाई होणं योग्य आहे . फक्त हे म्हणण्याचा अधिकार नेमाड्यांना नाही . कॉन्व्हेण्ट मध्ये काय काय शिकवलं जातं ह्याचा विचार करावा . कॉन्व्हेण्ट म्हणजे इंग्लिश मिडीयम नव्हे . ८ वी यत्ते पर्यंत मातृभाषा आणि मग सेमी इंग्लिश आणि मग इंग्लिश असं केलं तरी मुलाचं आयुष्य उत्तम घडू शकतं . शाळेत नित्य पाठांतरासाठी गीतेचा एखादा अध्याय मुलांकडून म्हनवून घेतला तर धार्मिक संस्कार होतात म्हणून ओरड करणारयांना पोरं ख्रिश्चन होवून कॉन्व्हेण्ट मधून बाहेर पडलेली चालतात . अश्या पालकांना सरकारी नोकरी देवू नये ,त्यांना जास्तीचा कर लावावा , सरकारी सुविधा देवू नयेत, चांगल्या कॉलेज मध्ये प्रवेशासाठी प्राधान्य देण्यात येवू नये असे काही उपाय करता येतील .
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा