"कॉन्व्हेण्ट" मुलांच्या पालकांवर कारवाई करा .. - भालचंद्र नेमाडे बडबडले !
भालचंद्र नेमाडे या व्यक्तीबद्दल कधीही फारसा आदर नवता.
आता त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्यावर म्हतार् चळ लागलेला दिसतो
हे पहा त्यांची मुक्ताफळे
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/punished-those...
‘कॉन्व्हेण्ट’ मुलांच्या पालकांवर कारवाई करा
Maharashtra Times| Aug 14, 2015, 03.49 AM IST
इंग्रजी माध्यमांच्या शाळेत प्रवेश घेतल्याने आपल्या पाल्याचे भवितव्य घडते, ही पालकांची अंधश्रद्धा आहे. उलट पालक आपल्या पाल्याचे भविष्य बिघडवत असून, कॉन्व्हेण्ट शाळांच्या 'कत्तलखान्या'तील घोकंपट्टीमुळे ते आपल्या संस्कृतीपासून दूर जात आहेत. याला सर्वस्वी पालक जबाबदार आहेत. त्यामुळे आपल्या मुलांना कॉन्व्हेण्ट शाळेत घालणाऱ्या पालकांवर कारवाई करण्यासाठी सरकारने कठोर कायदा करावा, असे मत ज्ञानपीठ पुरस्कार विजेते डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी मुंबईत व्यक्त केले.
मुंबई विद्यापीठाच्या राजीव गांधी समकालीन अध्ययन केंद्राने कलिना संकुलातील फिरोजशहा मेहता सभागृहात 'समकालीन साहित्य आणि समाज' या विषयावर व्याख्यान झाले. त्यावेळी ते बोलत होते.
देशी भाषांची जननी संस्कृत नाही
'देशात एक हजार ६५७ भाषा आहेत, मात्र, यापैकी एकाही भाषेची जननी ही संस्कृत भाषा नाही. उलट भारतीय भाषांमधून संस्कृत भाषेचा जन्म झाला. मात्र, संस्कृत भाषेला भारतीय भाषांची जननी असल्याचे काही प्रस्थापित भाषांमधून बिंबवले जात असले, तरी संस्कृत भाषा ही कधीही भारतीय मूळ भाषांची जननी नव्हती,' असे ठाम वक्तव्य डॉ. नेमाडे यांनी यावेळी केले. मराठी भाषेच्या साहित्याचा उगम हा इसवी सनाच्या दुसऱ्या शतकात झाला. त्या काळात जैन मराठी व्याकरणकारांनी मराठी भाषा पुढे आणली. परंतु, त्यांचा इतिहास हिंदूंकडून पुसला गेल्यानेच मराठीचा उगम बाराव्या शतकात झाल्याचे सांगण्यात येते. ही बाब इतिहासाला धरून नसल्याचेही नेमाडेंनी यावेळी स्पष्ट केले. साहित्याचे समाजीकरण आणि विस्तारीकण होणे ही काळाची गरज असून, समकालीन साहित्य आणि समाज या दोन्ही परस्पर पूरक बाबी असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
----------------------
आपले मत काय ?
बाय द वे यांना कॉन्व्हेण्ट शाळा अपेक्षित आहेत कि सर्व इंग्लिश माध्यमाच्या शाळा ? यांना त्यातला फरक तरी माहित आहे ना ? सध्याच्या अनेक चांगल्या शाळा जसे कि जमनाबाई , मानेकजी , रायन , DPS , पोदार या कॉन्व्हेण्ट नाहीत.
आणि माझी मुलगी इंग्लिश शाळेत शिकते कारण मला ते आवयाषक वाटते. भले मराठी माध्यमातून अनेक महान लोक निघाले असतील .. पण मी जेवा मराठी माध्यमातून आलेले DJ , VJ , इंग्लिश लेखक ( मराठी लेखनात पैसा मिळत नाही - जातो !) , सुपर मोडेल ( मधुताई साप्रेंचा अपवाद वगळता - आणि अनेकजणी तीचापेक्षा मोठ्या हत्या) कोण विचारतो - तेवा मला कोणीच समाधानकारक उत्तर देत नाही ..
💬 प्रतिसाद
(88)
क
कैलासवासी सोन्याबापु
Mon, 08/17/2015 - 08:39
नवीन
मी कॉन्वेंट मधे शिकल्याने माझ्या रामरक्षा ते रूद्रपठन उचारात अन दासबोध ते गीता वाचनात अन इतर धार्मिककार्यांत काही ही फरक पडलेला नाही (जे मला निदान तुमच्यासमोर तरी सिद्ध करायची गरज वाटत नाही), आमच्या शाळेत क्रिस्चियन करण्यालायक आम्हाला काहीही बप्तिस्मा नव्हता किंबहुना दहिहंडी च्या दिवशी कृष्णलीलांवर अन कृष्णचरित्रावर एक उत्तम लेक्चर होई जे सुद्धा एक नन घेत असे, त्यामुळे तुमच्या ह्या सरसकटीकरणाचा निषेध मी करतो. जिथे चुक तिथे बोलले गेले तर संयुक्तिक आहे सरसकटीकरण करणे तद्दन अतिरेकी विचार आहे
- Log in or register to post comments
म
मास्टरमाईन्ड
Mon, 08/17/2015 - 13:41
नवीन
एक नंबर. ११०% सहमत.
- Log in or register to post comments
प
प्यारे१
Mon, 08/17/2015 - 17:14
नवीन
>>> रूद्रपठन उचारात
इज इट? ;)
(हलकं घ्याल याची खात्री आहे. तुमचे प्रतिसाद आवडतात बर्का!)
बाकी भालचंद्र नेमाडे कोण?
- Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु
Mon, 08/17/2015 - 18:43
नवीन
यस सर इट इज!! पठन सुद्धा म्हणतात
- Log in or register to post comments
व
वेल्लाभट
Mon, 08/17/2015 - 14:10
नवीन
हे अतीच. नेमाड्यांचं आणि तुमचंही. हे बघा जोवर असा कायदा सरकार आणत नाही तोवर हे अतर्क्यच ठरेल. कारवाई कसली? गुन्हा आहे असं कायदा म्हणूदे मग कारवाईचं बोला.
मराठी शाळा, मातृभाषेतून शिक्षण याचा तात्विक प्रचार करा ना असली वक्तव्य करत बसण्यापेक्षा !
--------------------------------------
मराठी शाळा आणि मातृभाषेतून शिक्षणाचा पुरस्कर्ता,
- Log in or register to post comments
त
तुडतुडी
Mon, 08/17/2015 - 08:34
नवीन
सोन्याबापु
आपण अपवाद असू शकतात . आणि असे अजूनही अपवाद असतील . पण ते फक्त अपवादच . मराठी शाळांचा गुणात्मक दर्जा म्हणजे नेमकं काय ? आम्ही पार्ले टिळक किंवा हुजूरपागा शाळेत शिकलो नाही पण आमची शाळा उत्तम गुणात्मक दर्जाची होती . मराठी शाळा दर्जाहीन आणि कॉन्वेंट तेवढं दर्जेदार असं असतं तर मराठी शळेत शिकलेले सगळेच लोक दर्जाहीन झाले असते
- Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु
Mon, 08/17/2015 - 08:42
नवीन
मी ग्रामीण भागातल्या बहुतांशी म्हणतो आहे सगळ्या म्हणुन सरसकटीकरण करणे मला रुचत नाही त्यात दर्जाचा अपमान आहेच. भुछत्रा सारख्या उगवलेल्या मग त्या कॉन्वेंट असो वा मराठीशाळा ह्या दोन्ही ही मराठी च्या दैन्याला कारणीभूत आहेत
- Log in or register to post comments
व
वेल्लाभट
Mon, 08/17/2015 - 08:57
नवीन
आज तर अजूनच भारी वक्तव्य केलंय...
लग्नानंतर नवराबायकोला प्रियकर्/प्रेयसी असायला काय हरकत आहे.... ! असं म्हणतायत
ही.... मात्र एकदम विचार करण्यासारखी गोष्ट बोललेत बरं का ते.... जबर.
अधोगामित्वाला चिरत जाणारे विचार.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Mon, 08/17/2015 - 10:12
नवीन
नेमाड्यांनी आता स्वतःकरीता एक प्रेयसी शोधावी आणि आपल्या अर्धांगिनीसाठी एक प्रियकर. एवढे झाल्यावर ते पुरोगामित्वाचे सर्वोच्च शिखर गाठतील.
- Log in or register to post comments
र
राही
Mon, 08/17/2015 - 09:06
नवीन
आपले सर्व प्रतिसाद आवडले. एरवीही आवडतात.
कुठल्याही गोष्टीत घाऊकपणे देशप्रेम/संस्कृतिप्रेम/मातीशी नाळ वगैरे गोष्टी घुसवणार्यांबद्दल काय लिहावे? इंग्लिश भाषा शिकण्याचा किंवा त्या भाषेतून शिक्षण घेण्याचा आणि संस्कृतिविसर्जनाचा काडीचाही संबंध नाही. संस्कृतीतले जे तकलादू, निरुपयोगी असेल ते आपोआपच नष्ट होईल. त्यासाठी इंग्लिशची जरूरी नाही.
शिक्षणभाषेबद्दल इथे इतरत्र बरेच लिहिले गेले आहे. त्यामुळे चर्वितचर्वण नकोसे वाटल्याने लिहीत नाही.
नेमाडे विद्वान आहेत आणि त्यांनाही मतस्वातंत्र्य आहे, याचे भान राखून त्यांच्या 'इंग्लिश हटाओ'शी असहमत आहे इतकेच लिहिता येईल.
आपली मते स्पष्टपणे आणि कुचाळक्या, टिंगलटवाळ्या न करता मांडता आहात त्या बद्दल धन्यवाद.
- Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु
Mon, 08/17/2015 - 09:24
नवीन
राही जी ,
मी फ़क्त मला जे येते ते प्रमाणिकपणे कोणाला ही न दुखावता मांडायचा प्रयत्न करतो, बाकी इंग्लिश शिक्षण ह्या विषयाबद्दल खुद्द इंग्लॅण्ड मधे काय बोंब होते आहे (होत असल्यास) हे पाहणे ही मजेशीर ठरेल, कारण त्या लोकांनी ही आता "दाऊ" "दी" वगैरे ची भाषा शेक्सपियर ची नाटके इतकीच मर्यादित ठेवली आहे बहुतेक! त्यांच्याकडे ही conservative लोक ह्यावर काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे मजेदार ठरेल
- Log in or register to post comments
ए
एस
Mon, 08/17/2015 - 09:30
नवीन
सहमत. बापूसाहेबांचे प्रतिसाद आवडले.
- Log in or register to post comments
स
सामान्यनागरिक
Mon, 08/17/2015 - 12:01
नवीन
मी स्वत। सुद्धा मराठी माध्यमाच्या शाळेत शिकलो. आज संगणक क्षेत्रात जेथे संपूर्णतया ईंग्रजीतच कारभार चालतो तेथे काम करतो. उत्तम इंग्रजी लिहु वाचु शकतो. आंतरराष्ट्रीय कंपन्या आणी लोकांशी सुद्धा पत्रव्यवहार करतो.
इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकल्याने काही खास फरक पडतो असे नाही. शवटी ईंग्रजी ही सिद्धा एक भाषा आहे. जसे आपण हिंदी शिकु शकतो, गुजराती शिकु शकतो किंवा चीनी शिकु शकतो तसेच इंग्रजीही शिकु शकतो. त्या साठी ते शिक्षणाचे माध्यमअसण्यास्ची आवश्यकता नाही
- Log in or register to post comments
त
तुडतुडी
Mon, 08/17/2015 - 12:26
नवीन
कुठल्याही गोष्टीत घाऊकपणे देशप्रेम/संस्कृतिप्रेम/मातीशी नाळ वगैरे गोष्टी घुसवणार्यांबद्दल काय लिहावे?>>.
देशप्रेम, संस्कृतिप्रेम कशाशी खातात हे माहित नास्नार्यान्बद्दल काय लिहावे ? इंग्रजीचे गुलाम असणार्या त्यांचे पाय चाटनार्यांबद्दल काय लिहावे ?
इंग्लिश भाषा शिकण्याचा किंवा त्या भाषेतून शिक्षण घेण्याचा आणि संस्कृतिविसर्जनाचा काडीचाही संबंध नाही. >>>
हो का ? म्हणून जर्मनी , जपान , चीन , फ्रांस सारखे विकसित लोक मातृभाषेचा आग्रह धरतात .
प्रश्न केवळ इंग्रजीतून शिक्षण घेण्याचा नसून कॉन्वेंट मधून घेण्याचा आहे .कॉन्वेंट शिक्षण घेण्याचा आणि संस्कृतिविसर्जनाचा, देशप्रेमाचा , धर्मप्रेमाचा निश्चित संबंध आहे .
- Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर
Mon, 08/17/2015 - 13:40
नवीन
बाई ग तुडतुडे, त्या देशांत इंग्रजी कधी नव्हतीच.ब्रिटिशांनी दीडशे वर्षे राज करून इंग्रजी चांगलीच रुजवल्यानी येथे. सर्वोच्च न्यायालयाचा कारभार इंग्रजीत्,भले मोठे कायदेपंडीत्,डॉक्टर्स्,अभियंते.. बोलणार चालणार इंग्रजीत..तुझ्या त्या आय.आय.एम्समध्ये जो कोणी इंग्रजीत पोपटपंची करतो त्याची बाजू वर..अशावेळी नेमाडे सांगतात म्हणून मुलांना मराठी माध्यमात घालायचे ?नारळीकर्,माशेलकर ..अशी हाताच्या बोटावर मोजता येण्यासारखी उदाहरणे द्यायची व मराठी माध्यमात शिका म्हणून आग्रह करायचा...
कोणी कुठच्या भाषेत शि़क्षण घ्यायचे हे ज्याचे त्याला ठरवू द्या असे ह्यांचे मत.
कॉन्वेंटमधून शिक्षण घेणार्या होमी भाभा,राजा रामण्णा.. गेला बाजार अरूण जेटली ह्यांच्याबद्दल काय म्हणणे आहे?
- Log in or register to post comments
र
राही
Mon, 08/17/2015 - 14:03
नवीन
मिशनर्यांनी दीडशे वर्षांपासून अतिदुर्गम भागात स्वतः राहून तिथे सोयी उभारल्या. अनेक भारतीयांना पुढच्या चार पिढ्या मिळू शकले नसते ते अन्नौषधे, हॉस्पिटले, आधुनिक शिक्षण असे लाभ कित्येक लोकांना मिळाले. अगदी हेमलकशापासून दोन कि.मी. इतके आत ते पोचले होते. बाबा आमटे पोचण्यापूर्वी तिथे चर्च उभे झाले होते आणि चॅरिटी सुरू होती. मुंबईत आणि सर्वत्रच ज़ेविअर, विल्सन, फ्रॅन्सिस, अॅग्नेस, ट्रीज़ा, अँड्र्यू यांच्या नावे अनेक शाळांतून भारतीयांच्या आणि प्रामुख्याने हिंदूंच्या पाचसहा पिढ्या शिकून बाहेर पडल्या आहेत. ही मुले देशप्रेमास किंवा संस्कृतीस पारखी झाली असे म्हणवत नाही. उलट आजही या शाळांतून प्रवेशासाठी झुंबड असते. मागणी आहे म्हणून पुरवठा आहे हे सत्य आहे. आणि या शाळा वाईट शिक्षण देतात तरीही त्यांना मागणी आहे असे बहुधा नसावे. इंग्रजी शिक्षणाचा निदान एक तरी चांगला परिणाम म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली बाजू, आपली संस्कृती काही जणांना मांडता आली. त्यांच्या भाषेत प्रतिवाद करता आला. आता इंग्रजीतून न शिकलेले काही जण साहित्यिक पातळीवरचे उत्तम इंग्रजी लिहू शकत असतील कदाचित पण असे फारच थोडे असावेत.
हो आणि इंग्रजीतून शिक्षण घेणारे लोक इंग्रजीचे गुलाम बनतात किंवा त्यांना देशप्रेम कशाशी खातात हे माहीत नसते या अर्थाच्या वाक्याशी तर तीव्र असहमति.
(या पुढचे प्रतिसाद वैयक्तिक पातळीवर किंवा आगखाऊ भाषेत असले तर उलट प्रतिसाद देणार नाही असे स्पष्ट करीत आहे.)
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
Mon, 08/17/2015 - 14:47
नवीन
इंग्रजीतून शिकलेल्यांना देशप्रेम कशाशी खातात हे माहित नसते यापेक्षा मोठे असत्य वक्तव्य बघायला मिळणे कठिण आहे. माझ्या माहितीप्रमाणे गोपाळ गणेश आगरकर हे पण इंग्रजीतून शिकले होते आणि त्यांना केसरीचे संपादक बनविले गेले तेव्हा आपण मराठी वर्तमानपत्राच्या संपादकपदाला न्याय देऊ शकू की नाही याविषयी त्यांच्या मनात धाकधूक होती.पण त्यांना विष्णूशास्त्री चिपळूणकरांनी म्हटले की देशप्रेमाची तळमळ सच्ची असेल तर शब्द आपोआप सुचतील. बर्याच वर्षांपूर्वी हे वाचल्याचे आठवते. आता गोपाळराव आगरकर इंग्रजीतून शिकले म्हणून त्यांच्याही देशभक्तीवर शंका घेणार का हे लोक?
(मराठी शाळेत शिकलेला पण मिपावरील अनेकांच्या मते इंग्रजी गुलाम असलेला) गॅरी ट्रुमन
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Mon, 08/17/2015 - 12:57
नवीन
जुन्या मैदानावर नवे भिडू नवा खेळ, वा!
पॉपकॉर्न.... अर्रर्र.. चणे-फुटाणे, खारे शेंगदाणे प्लीज... (कृपया?)
- Log in or register to post comments
अ
अजया
Mon, 08/17/2015 - 13:13
नवीन
प्लीज!! महापाप केलेत=))
मी पाॅपकाॅर्न घेऊन फाँदीवर जाऊन बसते ब्वा!
- Log in or register to post comments
म
मधुरा देशपांडे
Mon, 08/17/2015 - 13:18
नवीन
फाँदीवर?? मोजींची आठवण आली वाटते.
बाकी लेखाबद्दल पास.
- Log in or register to post comments
अ
अजया
Mon, 08/17/2015 - 14:06
नवीन
अगं मराठी माध्यमात शिकून पण माझं मराठी बॅड आहे ;)
- Log in or register to post comments
म
मधुरा देशपांडे
Mon, 08/17/2015 - 15:24
नवीन
ओह आख झो...सॉरी..अच्छा अच्छा असे म्हणायचे आहे मला. (माझं मराठी फक्त इंग्रजाळलेलं नाही, जर्मनाळलेलं पण आहे ;) )
- Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु
Mon, 08/17/2015 - 13:19
नवीन
त्यांचे पाय चाटनार्यांबद्दल काय....
अरे वा!! छान मराठी लिहिली आहे की!!
असो!!
- Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर
Mon, 08/17/2015 - 14:54
नवीन
मी आपलं शिस्तीत डांगेंना प्रतिसाद दिला, खालचा गोंधळ वाचलाच नाही.
हा तर पॉपकॉर्नवाला धागा हय!!
- Log in or register to post comments
अ
अजया
Mon, 08/17/2015 - 15:19
नवीन
दिमागकी बत्ती जल गई अब पिराजीकी! ये वर आता पाॅपकाॅेर्न घेऊन.माझ्यातले देणार नाही;)
- Log in or register to post comments
इ
इशा१२३
Mon, 08/17/2015 - 19:10
नवीन
उतर खाली आधी अजया... माझे पोपकोर्न घेउन बसलीस.मला हवेत ते...
- Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु
Mon, 08/17/2015 - 15:50
नवीन
आमाला बी पॉपकॉर्न घेऊन बसावे लागणार! एका लिमिट पर्यंत संयत बोलायचा यत्न केला आता अजुन खाली नाही जाऊ शकत लेवल! तस्मात् आम्ही ही पॉपकॉर्न
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Mon, 08/17/2015 - 16:47
नवीन
लेखाचे शीर्षक चुकले आहे. शीर्षकात "भालचंद्र नेमाडे बडबडले" या शब्दांऐवजी "भालचंद्र नेमाडे बरळले" किंवा "भालचंद्र नेमाडे पचकले" असे शब्द हवे होते.
अवांतर - निव्वळ चित्र बघून भालचंद्र नेमाडे व श्याम मनोहर हे वेगवेगळे ओळखता येतील का कोणाला?
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Mon, 08/17/2015 - 17:41
नवीन
अहो बराच काळ तर मला नायगावकर आणि नेमाडे एकच वाटायचे...
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Tue, 08/18/2015 - 15:50
नवीन
यातले अशोक नायगावकर कोणते, नेमाडे कोणते आणि श्याम मनोहर कोणते?

- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Mon, 08/17/2015 - 17:21
नवीन
नेमाडे आणि काही इतर तथाकथित पुरोगामी आणि निधर्मांधांची मुक्ताफळे -
नेमाडे बाबासाहेब पुरंदरे यांनी केलेले शिवाजीमहाराजांचे चित्रण इतिहासाला धरून नाही. त्यामुळे त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात येऊ नये. बाबासाहेबांच्या निष्ठेविषयी अजिबात शंका घेतायेणार नाही. त्यांच्याविषयी मला नितांत आदर आहे. मात्र,शिवाजी महाराजांबद्दलची आमच्या मनात असलेली प्रतिमा वेगळी आहे. बाबासाहेबांचे लेखन माझ्या आकलनामध्ये बसत नाही, असेही नेमाडे यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र घरोघरी पोहोचविणारे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना राज्य सरकारने जाहीर केलेल्या ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराच्या वादाने आता राजकीय क्षेत्रापलीकडे उडी घेतली आहे. पुरंदरे यांना जाहीर झालेला हा पुरस्कार रद्द करावा, अशी मागणी करणारे एक निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आले असून त्यावर माजी साहित्य संमेलनाध्यक्ष नागनाथ कोत्तापल्ले, ज्ञानपीठ विजेते लेखक भालचंद्र नेमाडे, स्त्रीवादी चळवळीच्या नेत्या विद्या बाळ, ‘अंनिस’च्या मुक्ता दाभोलकर, मेधा पानसरे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. पुरंदरे यांना हा पुरस्कार दिल्यास त्यांच्या विकृत लेखनास राजमान्यता मिळाल्यासारखे होईल, अशी भीती राज्यातील फुले-आंबेडकर-शाहूंचे विचार मानणाऱ्या वर्गास वाटत आहे, असे या निवेदनात म्हटले आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे हे ‘तथाकथित इतिहास संशोधक’ असून छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, तसेच बहुजन स्त्रियांबद्दल अत्यंत अवमानकारक लिखाण त्यांनी केले आहे, कोणतेही समकालीन पुरावे नसताना त्यांनी केलेले लेखन कट्टरवादाला खतपाणी घालणारे असून शिवरायांसारख्या युगपुरुषाची प्रतिमा ठरावीक समाजासाठी मर्यादित करून मलीन करणारे आहे, असा आरोपही या नामवंतांनी निवेदनात केला आहे.
मी बाबासाहेब पुरंदर्यांचे शिवचरीत्र अनेकवेळा वाचलेले आहे. त्यात छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, तसेच बहुजन स्त्रियांबद्दल अवमानकारक असा एकही शब्द नाही. असल्यास दाखवून द्यावा.
- Log in or register to post comments
फ
फारएन्ड
Mon, 08/17/2015 - 19:18
नवीन
ते निवेदन त्या सह्या करणार्यांनी वाचले आहे का अशीच शंका येते. त्यात बर्याचश्या पेपर्स मधे मूळ निवेदन्/पत्रक कोणते व नेमाडी ,कोतापल्ले इत्यादींचे मत कोणते हेच कळत नाही, इतके मिक्स केले आहे.
- Log in or register to post comments
प
परश्या
Tue, 08/18/2015 - 13:41
नवीन
मुलं इंग्रजी माध्यमात शिकली तर यांना भविष्यात वाचकवर्ग कसा मिळणार ?
- परश्या (भाई)
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Tue, 08/18/2015 - 15:47
नवीन
नेमाडे बुढ्ढा पंच्याहत्तरिया गया है. (थेरडा बरळतोय असं म्हणायचंय पण आपली ही मराठी भाषा लयच रांगडी आहे.)
- Log in or register to post comments
ऋ
ऋतुराज चित्रे
Wed, 08/19/2015 - 07:54
नवीन
अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलेला हा आगळावेगळा निर्णय.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Wed, 08/19/2015 - 08:43
नवीन
उच्च न्यायालयाचा निर्णय निस्संशय वैयक्तिक स्वातंत्र्यावर गदा आणणारा आहे तेंव्हा तो कायद्याच्या निकषावर टिकणार नाही.सर्वोच्च न्यायालयात त्यावर स्टे नक्कीच मिळेल. मला माझ्या मुलाला कोणत्या शाळेत घालायचे आहे ते न्यायालय ठरवू शकत नाही( आज्ञार्थ असू शकत नाही) फार तर सुचवू शकेल( विध्यर्थ) आणि त्यासाठी माझ्या पगारातून पैसे कापू शकत नाही. फार तर मला फी चा परतावा मिळणार नाही असे म्हणू शकेल. न्यायालयीन अतिक्रमणाचे हे उत्तम उदाहरण आहे. (judicial overreach).
न्यायालयात न्याय मिळत नाही निकाल मिळतो याचेही हे उत्तम उदाहरण.
- Log in or register to post comments
त
तुडतुडी
Wed, 08/19/2015 - 14:10
नवीन
गोपाळ गणेश आगरकर हे पण इंग्रजीतून शिकले होते>>
त्यावेळी जबरदस्तीने, नाईलाजाने इंग्रजी शाळेतूनच शिकावं लागत होतं . इंग्रज सरकार मातृभूमितून शिक्षण देणाऱ्या शाळांना परवानगी देत नवतं . कारण त्यांना स्वस्तात ,मातीमोल किमतीत त्यांच्यासाठी राबणारे मजूर निर्माण करायचे होते .
मुद्दा इंग्रजी शाळेचा नसून कॉन्वेंट शाळेचा आहे हे परत परत सांगून सुधा मुद्दा लक्षात आला नसेल तर धन्य आहात .अध्यात्मात फार पुढे गेलेल्या एका व्यक्तीचं आत्मचरित्र मध्ये वाचनात आलं होतं .त्यांचं स्वतःच शिक्षण कॉन्वेंट मध्ये झालं होतं . त्यांनी कॉन्वेंट मध्ये वेगवेगळ्या धर्मांबद्दल काय गलिछ शिकवलं जातं हे वाचून चीड आली होती
- Log in or register to post comments
स
स्रुजा
Wed, 08/19/2015 - 20:18
नवीन
गलिच्छ? काय शिकवतात असं आम्हाला तरी सांगा.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2