महाराष्ट्र भूषण पुरस्कार वाद
प्रसिध्द शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला अन लगेच वादाला तोंड फुटले. वृत्तवाहिन्या अन वृत्तपत्रांमधून बरीच मत मतांतरे बघावयास अन वाचावयास मिळत आहेत. बराच काळ वाट पाहून इथे शेवटी या विषयावर काथ्याकुट टाकतो आहे.
बाबासाहेबांनी त्यांचे अख्खे आयुष्य शिवरायांच्या जीवनपटावर लोकउद्बोधक कार्यक्रम व शाहिरी करण्यात व्यतीत केले. "जाणता राजा " या लोकप्रिय कार्यक्रमामुळे शिवराय लहान मोठ्यांना अधिक सुलभतेने समजण्यास मदत झाली. पण पुरस्कार विरोधकांचा मुख्य आक्षेप हा आहे कि बाबासाहेबांनी चुकीचा इतिहास कथन केला. शिवरायांच्या जन्म तिथिबद्दल वाद, त्यांच्या जीवनात रामदास स्वामी यांना गुरु म्हणून चिकटवण्याचा प्रमाद, जीजाउंच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्यात जेम्स लेनला केलेली कथित मदत व इतर अनेक आक्षेप त्यांच्यावर या अनुषंगाने आहेतच.
या आक्षेपांमुळे त्यांच्या आयुष्यभराच्या कार्याला बट्टा तर लागला नाही ना?
पुरस्कार ज्या कार्यासाठी मिळतोय ते कार्य वादविवादरहित असावे या मताचा मी असल्याने बाबासाहेबांनीच हा पुरस्कार नाकारावा असे मला वाटते.
मिपाकरांना याबद्दल काय वाटते, हे जाणण्यास उत्सुक.
💬 प्रतिसाद
(135)
अ
अजया
Wed, 08/19/2015 - 04:07
नवीन
पिराच्या संपूर्ण प्रतिसादाला +१०००
- Log in or register to post comments
आ
आनन्दा
Wed, 08/19/2015 - 05:49
नवीन
+१०००
चला चला. उत्तर आणि पुरावे द्या. नुसती पिंक टाकून पळून जाऊ नका. कोणत्याही जाणत्या शिवप्रेमीसाठी बाबासाहेबांचा अपमान म्हणजे शिवरायांचाच अपमान आहे. तेव्हा परत या.
- Log in or register to post comments
क
किसन शिंदे
Wed, 08/19/2015 - 06:33
नवीन
पिलियन रायडरच्या संपूर्ण प्रतिसादाशी सहमत! कोणत्याही गोष्टीबद्दल हातात योग्य आणि संपूर्ण माहीती असेल तरच ती लोकांना दाखवावी. मिळालेल्या साधनांचा गैरवापर करून तुमचेच विखारी आणि विकृत विचार प्रसवणे बंद करा.
(मायला! महाराजांनाही नाही सोडलं या नालायक लोकांनी राजकारण करण्यासाठी)
- Log in or register to post comments
ह
हेमंत लाटकर
Sat, 08/22/2015 - 20:17
नवीन
तुमच्याशी सहमत
- Log in or register to post comments
अ
अजया
Wed, 08/19/2015 - 04:15
नवीन
व्हाॅट्स अॅपवरचं ज्ञान फाॅरवर्ड करायला डोकं लागत नाही.निदान कोणाबद्दल काय फाॅरवर्ड करतोय हे कळले तरी खूप.हे फाॅरवर्ड करणार्यानी किती साहित्य वाचलंय पुरंदर्यांचं?
आपली लायकी आहे का अशा प्रकारची भाषा वापरून एखाद्या व्यक्तीचं चारित्र्यहनन करण्याची? असे प्रश्न पडत नाहीत का?
पु.ल.देशपांड्यांनी पुरंदर्यांबद्दल गणगोत या पुस्तकात लिहिलेला हा लेख जरूर वाचा!
"मी त्या वेळी दिल्लीला सरकारी चाकरीत होतो. सुटीत मुंबईला आलो होतो. उत्तरेस कूच करण्यापूर्वी सोबतीला चार मराठी पुस्तके घ्यावीत म्हणून एका पुस्तकाच्या दुकानात शिरलो. केवळ योगायोगाने काउंटरवर पडलेल्या शिवचरित्राचा पहिला खंड हाती पडला. साऱ्या महाराष्ट्रातल्या शुभदेवतांना केलेल्या सुरुवातीच्या आवाहनानेच मनावरची धूळ झटकली. “सुदिन सुवेळ मी शिवराजाच्या जन्माचं व्याख्यान मांडलंय-आई, तू ऐकायला ये” ही तुळजाईला घातलेली हाक जिवाला चेतवून गेली. त्या शिवचरित्रातला ‘उदो उदो अंबे’चा जागर म्हणजे महाराष्ट्राचा पाना- दोन पानांत उभारलेला सांस्कृतिक इतिहास आहे. बळवंत मोरेश्वर पुरंदरे नामक कोण्या इतिहासकाराने लिहिलेल्या शिवचरित्राचा पहिला खंड वाचत मी काउंटरपाशीच खिळून राहिलो. ते दहाखंडी चरित्र विकत घेऊन मी निघालो. दिल्लीला पोचेपर्यंत अखंड चोवीस तासांच्या सफरीत ते दहाही खंड संपवले. आपण काही तरी अद््भुत अनुभवातून न्हाऊन बाहेर पडल्यासारखे वाटले. महाराष्ट्रात जन्माला आल्याच्या धन्यतेने मी फुलून निघालो होतो.
जगण्यासाठी महत्त्वाची गोष्ट मिळवावी लागते; ती म्हणजे जगण्याचे प्रयोजन. पुरंदऱ्यांना हे प्रयोजन वयाच्या सोळाव्या-सतराव्या वर्षीच गवसले. एका ड्रॉइंग मास्तराच्या बळवंत नावाच्या मुलाला शिवनेरीच्या शिवरायाने झपाटले. त्या झपाटल्या अवस्थेतच त्यांच्या जीवनाचा प्रवास चालू आहे, यापुढेही चालणार आहे. इतिहासाचा हा मोठा डोळस उपासक आहे, भक्त आहे; पण त्या भक्तिमार्गावर ज्ञानदीपाचा प्रकाश आहे. निराधार विधान करायचे नाहीत, अशी प्रतिज्ञा आहे. लिहिताना अखंड सावधपण आहे. उगीचच ‘शिवाजी’ म्हटल्यावर हाताचे आणि जिभेचे पट्टे फिरवणे नाही. त्यांच्या अंतःकरणातला कवी मोहोरबंद, गोंडेदार भाषा लिहितो; पण हातातला इतिहासाचा लगाम सुटत नाही, वर्तमानाच्या रिकिबीतून पाय निसटत नाही की नजर डळमळत नाही.
पुरंदरे इतिहासात सहजतेने डुबकी घेतात. माशाला पोहायची ऐट मिरवावी लागत नाही, तशी पुरंदऱ्यांना शिवभक्तीचा दर्शनी टिळा लावण्याची आवश्यकता भासत नाही. आणि म्हणून जाणत्या इतिहासकारांनी घालून दिलेले दंडक सांभाळून शिवचरित्र आणि त्या अनुषंगाने इतर इतिहासविषयक लिखाण सामान्यांपर्यंत अत्यंत सचित्र भाषेत पोहोचवण्याचे कार्य त्यांनी केले आहे. इतिहास संशोधन हे शास्त्र आहे याची त्यांना पक्की जाणीव आहे आणि म्हणूनच हा तरुण मोकळ्या मनाने सांगतो, की “माझ्या रचनेतल्या चुका दाखवा. पुढल्या आवृत्तीत दुरुस्त करीन. इतिहास ही माझी एकट्याची मिरास नाही. ते साऱ्यांचं धन आहे. त्यात कुठं हीण आलं असेल तर ते पाखडून फेकून द्यायला हवं! इथं वैयक्तिक अहंकार गुंतवण्याचं कारण नाही.” त्यांच्या शिवचरित्राच्या खास आवृत्तीच्या प्रकाशनाच्या दिवशी ते म्हणाले होते, “शिवाजीला मी माणूस मानतो, अवतार नव्हे. आजवर ठपका द्यावा, असा ह्या माणसाविरुद्ध सबळ पुरावा आढळला नाही. आढळला तर न लपवता तो शिवचरित्रात घालीन.” आणि म्हणूनच पुरंदरे ऐतिहासिक घटनांविषयी बोलताना कोणत्याही नाटकी अभिनिवेशाने बोलत नाहीत.
पुरंदऱ्यांची तपशिलांवरची पकड भलतीच कडक आहे. स्मरणशक्ती विलक्षण. त्यांच्याशी बोलताना-म्हणजे ते बोलत असून आपण ऐकत असताना-इतिहास हा वर्तमानापासून तुटला आहे असे वाटतच नाही. अतिशय रंगतदार भाषेत बोलतानादेखील इतिहासकार म्हणून ते एक प्रसन्न अलिप्तपणा सांभाळू सकतात. आज इतकी वर्षे मी त्यांच्या तोंडून शिवचरित्रातले प्रसंग ऐकतो, पण कधी मुसलमान व्यक्तीचा मुसलमान म्हणून त्यांनी तुच्छतापूर्वक उल्लेख केलेला मला स्मरत नाही. परधर्मीयांची कुचेष्टा नाही. अवहेलना नाही. इतिहास ही वस्तू अनेक जण अनेक कारणांनी राबवतात. खुद्द शिवाजी महाराजांचे चित्र दुसऱ्या महायुद्धात रिक्रूटभरतीसाठी राबवले होते. “सोळा रुपये पगार, कपडालत्ता फुकट...शिवाजी न्यायासाठी लढला” हे पोस्टर अजून आठवते. काहींना इतिहासातले नाट्य रुचते. काहींचा रोख आजवर झालेले इतिहास संशोधन चुकीचे होते आणि आपलेच कसे खरे हे अट्टहासाने दाखवण्यावर असतो. इतिहासाचे काही भक्त तर सदा उन्मनी अवस्थेतच असल्यासारखे वागतात. उगीचच ‘रायगड रायगड’ करीत उड्या मारण्याने शिवरायांवरची आपली निष्ठा जाज्वल्य असल्याची लोकांची कल्पना होते, अशी यांची समजूत असावी; पण शिवाजी महाराजांच्यावर प्रेम असायला प्रत्येक किल्ल्याचा चढउतार केलाच पाहिजे, असे मानायचे कारण नाही.
दरवर्षी रायगडावर जाऊन डोळे गाळायचे ही शिवभक्ती नसून शिवभक्तीची जाहिरात आहे. आणि म्हणूनच गड-कोटांविषयी पुरंदरे बोलायला लागले की शिवाजी महाराजांच्या जीवनाचे मूळ सूत्र जो विवेक न गमावता ते रंगून बोलतात, म्हणून मला त्यांचे कौतुक अधिक वाटते. स्वतःच्या डोळ्यात आधीच लोटीभर पाणी आणून ऐतिहासिक कथा सांगण्याचा देखावा त्यांनी कधी केला नाही-ते करणारही नाहीत. कारण त्यांनी इतिहासाकडे “हरहर ! गेले ते दिवस!’’ असले उसासे टाकीत पाहिले नाही.
पुष्कळदा वाटते की, त्यांनी शिवचरित्र कसे लिहिले याचा इतिहास एकदा लिहावा. किती निराशा, कसले कसले अपमान, केवढी ओढग्रस्त! त्यातून पुरंदऱ्यांचे खानदान मोठे! वडील भावे स्कुलात ड्राॅइंग मास्तर. पर्वतीच्या पायथ्याशी पुरंदऱ्यांचा वाडाही आहे. भिक्षुकी, मास्तरकी हे व्यवसाय अफाट दैवी संपत्तीचे धनी करणारे. त्या धनातून मंडईतली मेथीची जुडीदेखील येत नसते. महागाईच्या खाईत भारत इतिहास संशोधक मंडळाकडून मिळणारे माहे पाऊणशे रुपये घेऊन पुरंदऱ्यांनी संसार सजवला. रुपयांचा अखंड शेकडा एकजिनसी न पाहिलेले ग. ह. खरे हे पुरंदऱ्यांचे गुरू. ऋषी हा शब्द फारच ढिलेपणाने वापरला जातो; पण ऋषी म्हणावे अशी खऱ्यांसारखी माणसे क्वचित आढळतात. खऱ्यांचे सहायक म्हणून पुरंदऱ्यांनी खूप वर्षे भारत इतिहास संशोधक मंडळात काम केले.
वर्तमानातून इतिहासात पुरंदरे अगदी सहजतेने डुबकी घेतात. हा माणूस किती शांतपणे माणसांच्या अंगावर रोमांच उभे करतो. कुठेही राणा भीमदेवी थाट नाही, अश्रुपात नाही, मुठी आवळणे नाही. त्या पूर्वदिव्यावर पडलेल्या कालवस्त्राला अलगद दूर करून पुरंदरे इतिहासाचे दर्शन घडवतात. त्यांना वक्तृत्वाची देणगी आहे. शब्दकळा तर अतिशय साजरी आहे. सूक्ष्म विनोदबुद्धी आहे. पण ही सारी लक्षणे मिरवीत येत नाहीत. भाषेच्या अंगातून अलगद ओसंडत असतात. कुठलीही ऐतिहासिक घटना पचवून ते लिहितात किंवा बोलतात. “मला अमुक एक ऐतिहासिक कथा ठाऊक नाही, किंवा निश्चित पुरावा नाही म्हणून मी मत देत नाही” हे सांगायची त्यांनी भीती वाटत नाही.
इतिहास हा आम्ही हातच्या कागदपत्रांइक्याच वयाने आणि त्याहूनही मनाने जीर्ण लोकांच्यावर सोपवलेला विषय समजतो. अशा वेळी शिवचरित्राच्या रूपाने त्या इतिहासाचे पाठ लोकमानसात नेऊन सोडणाऱ्या पुरंदऱ्यांचे खूप कौतुक व्हायला हवे होते. त्यांनी इतिहासकाराची पंडिती पगडी चढवली नाही. कुणाही पंडिताने धन्योद््गार काढावेत इतका अभ्यास केला आणि मांडला मात्र गद्यशाहिरासारखा. त्या चरित्राला ते आधारपूर्वक लिहिलेली बखर म्हणतात. इतिहास हा “माजघरापर्यंत गेला पाहिजे, पाळण्यापर्यंत गेला पाहिजे. इतकंच नव्हे, तर आमच्या बहिणी, भावजया आणि लेकी-सुना गरोदर असतील त्यांच्या गर्भापर्यंत गेला पाहिजे,” असे म्हणणारा हा इतिहासकार मला तरी आमच्या आजवरच्या भारतीय इतिहासकारांपेक्षा एक निराळी – लोकशाहीला अत्यंत पोषक भूमिका घेऊन उभा राहिलेला दिसतो.
वयाच्या सोळाव्या-सतराव्या वर्षापासून आजतागायत आपल्या सुखाचे, स्वास्थ्याचे नव्हे, तर आयुष्याचे दान देऊन गोळा केलेले हे शिवचरित्राचे हे धन. एका मास्तरचा हा मुलगा शिवरायाचे चरित्र आठवीत आडरानातल्या वडपिंपळाखाली पालापाचोळ्याचे अंथरूण आणि दगडाची उशी करून झोपला. हल्ली रस्त्यारस्त्यातून जिल्हा परिषदेच्या जीपगाड्या धावताना आढळतात.
शिवाजी महाराजांच्या पावलांच्या खुणा शोधत जाणाऱ्या पुरंदऱ्यांना कोण जीपगाडी देणार! पार्लमेंटात हात वर करण्यापुरते जागे असणाऱ्या सभासदांना आसेतुहिमाचल आगगाडीच्या पहिल्या वर्गाचा फुकट पास असतो. पुरंदरे कुठल्याशी गावी कागदपत्रं मिळायची शक्यता आहे, हे कळल्यावर थर्ड क्लासच्या खिडकीपाशी तिकिटासाठी रांग धरून उभे असतात! निरनिराळ्या जागा धरून किंवा अडवून ठेवण्याच्या ह्या युगात उदात्त वेडाने झपाटलेली माणसे एकूणच कमी. बाराशे मावळे दीड लाख मोगली फौजेचा धुव्वा उडवीत होते. कारण ते बाराशे मावळे “हे हिंदवी स्वराज्य व्हावे, हे तो श्रींची इच्छा!” ह्या शिवाजीराजाने त्यांच्या कानी फुंकलेल्या मंत्राने झपाटलेले होते. कोणत्याही कार्याच्या सिद्धीला असा एखादा मंत्र लागतो; पण सिद्धीपेक्षा प्रसिद्धी मोठी, अशी भावना रुजायला लागते तेव्हा माणसांची बाहुली होतात. पुरंदरे शिवाजीचे चरित्र गाईन हा संकल्प सोडून जगताहेत. इतिहासाच्या त्या धुंदीत वावरणाऱ्या पुरंदऱ्यांना वर्तमान आणि भुताची चित्रे एकदम दिसतात. हे दिसणे भाग्याचे! ही भाग्याची वेडे !
- Log in or register to post comments
उ
उगा काहितरीच
Wed, 08/19/2015 - 10:11
नवीन
अजयाताई, प्रतिसाद अत्यंत आवडला. बाबासाहेब पुरंदरे यांच्याबद्दल आदर होताच, तो द्विगुणीत झाला. आत्तापर्यंत त्यांचे साहित्य वाचण्यात आले नाही हे माझे दुर्दैव ! चला अशा धाग्यामुळे इतकी चांगली माहिती आमच्यापर्यंत पोचली हेही नसे थोडके.
- Log in or register to post comments
ह
हेमंत लाटकर
Sun, 08/23/2015 - 11:54
नवीन
अजयाताई, छान माहिती टाकली. वाचून छान वाटले.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Wed, 08/19/2015 - 10:46
नवीन
>>> पुरंदरेंनी ‛‛राजा शिवछत्रपती’’ आणि ‛‛लालमहाल’’ या कादंबरीतुन राष्ट्रमाता जिजाऊ व छत्रपती शिवरायांबद्दल
अत्यंत अवमानकारक व संतापजनक लिखाण केले.
मी बाबासाहेब पुरंदर्यांचे "राजा शिवछत्रपती" हे पुस्तक अनेकवेळा वाचलेले आहे. त्या पुस्तकाची प्रत माझ्या संग्रही आहे. त्या पुस्तकात राष्ट्रमाता जिजाऊ व छत्रपती शिवरायांबद्दल अत्यंत अवमानकारक व संतापजनक लिखाण नक्की कोणत्या पानावर व कोणत्या परिच्छेदात केले आहे ते सांगा.
>>> ● ‛‛राजा शिवछत्रपती’’ कादंबरीतुन स्वराज्य निर्मीतीच्या कार्यात स्वतःचे रक्त सांडणाऱ्या बारा मावळ आणि महाराष्ट्रातील सरदारांच्या आईबद्दल खुप भयानक व विकृत लिखाण केले.
हे विकृत लिखाण या पुस्तकाच्या नक्की कोणत्या पानावर व कोणत्या परिच्छेदात केले आहे ते सांगा.
>>> ● ‛‛राजा शिवछत्रपती’’ कादंबरीत कुणबीणी म्हणजे कुणब्याची (शेतकऱ्याची) पत्नींविषयी खुप किळसवाणे व बदनामीजनक लिखाण केले.
हे विकृत लिखाण या पुस्तकाच्या नक्की कोणत्या पानावर व कोणत्या परिच्छेदात केले आहे ते सांगा.
_______________________________________________________________________________
तुम्ही हे सांगू शकणार नाही व वरील प्रतिसादाला उत्तर देणार नाही हे उघडच आहे. कारण हे पुस्तक तुम्ही स्वतः वाचलेलेच नाही आणि वरील पुस्तकात असे कोणतेही लिखाण नाही. संभाजी ब्रिगेड नावाच्या एका अत्यंत उन्मत्त व फॅसिस्ट संघटनेने ब्राह्मणांविरुद्धच्या जळफळाटातून हे धडधडीत खोटे आरोप केले आहेत व त्या आरोपांवर तुमच्यासारख्या व्यक्ती स्वतः पुस्तक न वाचता डोळे झाकून विश्वास ठेवून विष पसरवित राहता.
पुन्हा एकदा विचारतो. "राजा शिवछत्रपती" या पुस्तकात तुम्ही वर्णन केलेले लिखाण नक्की कोणकोणत्या पानांवर आहे ते सांगा. ते शक्य नसेल तर आपण केलेले विषारी आणि खोटे आरोप मागे घ्या.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Wed, 08/19/2015 - 19:42
नवीन
वरील लोकांच्या पुरस्काराला तुम्ही विरोध केला नाही आणि फक्त बाबासाहेबांच्याच पुरस्काराला विरोध केला याचे एकमेव आणि फक्त एकच कारण म्हणजे वरील कोणाच्याही पुरस्काराला विरोध करून तुम्हाला ब्राह्मण वि. मराठा हा वाद निर्माण करता आला नसता व त्याद्वारे आपल्यासाठी मतांची बेगमी करता आली नसती. परंतु बाबासाहेबांच्या पुरस्काराला विरोध केल्याने ब्राह्मण वि. मराठा अशी फूट पाडून आपल्यासाठी मतांची बेगमी करता येते. म्हणूनच वरील लोकांच्या पुरस्काराला तुम्ही विरोध केला नाही आणि फक्त बाबासाहेबांच्याच पुरस्काराला विरोध केला.
- Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी
Tue, 08/18/2015 - 20:43
नवीन
संजय सोनवणी यांची या विषयाशी संबंधीत लेख (प्रकाशन तारीख ६ मे २०१५)
राजा शिवछत्रपती आणि आक्षेप!
तसेच काही तासांपूर्वी प्रकाशित केलेला आणखी एक लेख
माझ्या दृष्टीने तरी बाद!
तसेच ऑक्सफर्ड युनिवर्सिटी प्रेसला पाठवलेले १० नोव्हेंबर २००३ चे हे पत्र (जालावरून साभार). भांडारकर संस्थेवरचा हल्ला ५ जानेवारी २००४ रोजी झाला होता.

- Log in or register to post comments
श
शब्दबम्बाळ
Wed, 08/19/2015 - 16:39
नवीन
चांगली माहिती दिल्याबद्दल आभार!!
- Log in or register to post comments
र
रमेश आठवले
Wed, 08/19/2015 - 00:06
नवीन
खूप समर्पक माहिती पुरवल्या बद्दल.
- Log in or register to post comments
व
विशाखा पाटील
Wed, 08/19/2015 - 06:22
नवीन
अजया आणि श्रीरंग जोशी, माहितीसाठी धन्यवाद!
कालच्या ABP माझा वरच्या चर्चेतले प्रा. हरी नरके यांचे विचारही विरोध करणाऱ्यांनी जरूर ऐकावे.
पुराव्याशिवाय रेटून बोलणे, मागच्या-पुढच्या वाक्यांचा संदर्भ न लावता अर्थ काढणे, जेम्स लेनच्या पुस्तकावरून विनाकारण राळ उठवणे ही विरोधकांची साधने. समाजात दरी उभी करणारे, त्याचा राजकीय फायदा करून घेणारे कसले देशभक्त! एवढीच शक्ती स्थानिक समस्या सोडवण्यासाठी, विकासासाठी घालवली तर खरी देशभक्ती...
- Log in or register to post comments
च
चौकटराजा
Wed, 08/19/2015 - 06:47
नवीन
खरे तर आज जे आपण जगतो त्या जगण्याची सुरूवात १८५७ पासून होते कारण आपल्या स्वार्थापोटी का होईना त्यावेळी भारतातील राजे रजवाडे ब्रिटीशांविरूद्ध एकत्र येउ पहात होते. ( ते त्याना जमले नाही हा भाग वेगळा ! ) . त्यापूर्वीच्या इतिहासात मला अजिबात रस नाही याचे कारण आपले वर्तमानाचा संबंध हा राजे, संस्थानिक , वतनदार , जहागिरदार, सरंजाम शहा , सरदार अशांबरोबर नसून तो राष्ट्र, प्रधानमंत्री ,संसद, विधीमंडळे, कामगार, उधोगपति, व्यावसायिक, कामगार ,शेतकरी, नोकरशहा, ऐअर मार्शल जनरल ई ई सारख्या संस्थांशी आहे. यातील किती मूलतत्वे १८५७ च्या अगोदरच्या काळापासूनच्या वास्तवाकडून घेतली आहेत ? त्यातली किती परकीय आहेत? किती स्वकीय याचा चिकित्सक अभ्यास झाला
पाहिजे. तो सोडून महाराष्ट्रातील अतिरेकी इतिहास प्रेमी पुन्हा सोळाव्या शतकातील व्यवस्था जणू आजच्या काळात कशी चपखल लागू आहे याची चर्चा करीत असतात. अर्थात इतिहासाचा अभ्यास हा मनुष्य जीवनाचा एक पैलू आहे पण तो इतक्या महत्वाचा नाही ही त्याच्या एका अभ्यासकास राज्य भूषण पुरस्कार द्यावा. पण सर्वसमावेशक कार्य हा निकष न ठेवता तो विशिष्ट कार्य असा निकष असेल ( तसाच तो आहे हे यादीवरून कळून येते ) तर पुरंदरेना तो मिळण्यास काहीच
हरकत नाही. त्यांच्या विरोधकानी पद्धतशीर अभ्यास करून पुरावे आणून त्यांचे लेखन चुकीचे ठरवले तर तो पुरस्कार स्वता: च पुरंदरे तो परत करतील. पण विरोधकांचाही अभ्यास ऐकीव असेल तर सरकारने त्याची काय म्हणून परवा करायची ?
- Log in or register to post comments
न
नूतन सावंत
Wed, 08/19/2015 - 06:49
नवीन
पिरा, अजयाशी +१००० वेळा सहमत.हेच लिहायला आले होते.
आणि रंगाभाऊ, तुमच्या अज्ञानी लोकांचे अज्ञान दूर करणाऱ्या माहितीबद्दलआभार.
हल्ली मिपावर स्वतंत्र विचार करणारे, मुळातून काही वाचन करून त्यावर लिहिणारे लेखक कमी झालेत असे वाटू लागले आहे.(विवेकानंद धागा)हे सगळे महाराष्ट्राच्या राजकारणातल्या, महाराष्ट्राला “गाडता राजा” चे प्रताप आहेत हे उघड दिसून येत आहे.कुणीही उठावे कोणाबद्दलही बोलावे असे झाले आहे.जितेंद्र आव्हाड याचे इतिहासातील योगदान काय? तर शून्य. जर काही शंका असतील तर त्याचे निराकरण योग्य व्यक्तीकडून करून घेणे हे ह्या माणसाला समाजात नाही,ज्यांना पदव्या विकत घ्यावा लागतात अशांच्या भुन्कण्याकडे लक्ष न देता बाबासाहेबांनी हा पुरस्कार आमच्यासारख्या सामान्य माणसांसाठी स्वीकारला पाहिजे.ज्यांना त्यांनी आमचा राजा कसा होता आम्हाला हे रक्ताचे पाणी करून शिकवलेय.
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Wed, 08/19/2015 - 06:51
नवीन
आज फेफ्रातल्या बातम्या वाचून परत एकदा सिद्ध झालंय....
"साहेबांचा आदेश आहे. जाळपोळ करा, चक्काजाम करा, काहीही करा. कोणी विचारलं तर सांगा पुरस्कार देऊ नये म्हणून करतोय."
का? कशासाठी? काय उपयोग? हे प्रश्न कार्यकर्ते विचारत नसतात. ते फक्त आदेशाचे मानकरी. त्यातल्या त्यात थोडे इंटरनेटवर पडीक असले फॉरवर्ड पिंकत बसतात. अशा लोकांना ना शिवाजी माहित ना पुरंदरे. महाराजांच्या आयुष्यातला एकही प्रसंग तपशीलात सांगता येणार नाही. एकही किल्ला आयुष्यात चढून बघितलेला नसतो. गेले असतील तर फक्त दारूच्या बाटल्या फोडायला आणि दिलात बाण खुप्सून नावं लिहायला. परत यांना फक्त पुरंदरेंनी लिहिलेल्या इतिहासातून शिवाजी समजून घेतलेला आणि आज तेवढाच शिवाजी हायजॅक करतायत. त्याच पुरंदरेंवर उलट चिखलफेकीचे आरोप करतायत. स्वतःचे काही कर्तॄत्व नाही पण साहेबांचा आदेश आला की स्वतःच्या आईलाही विकायला कमी करणार नाहीत. कुणाला तसं लिहायची तरी काय गरज आहे. यांच्या वागणुकीतूनच हे सिद्ध केले आहे आज. यांचे इतिहासावर आणि महाराष्ट्रावर किती प्रेम आहे हे दाखवून दिलेच आहे सरकारी संपत्तीची जाळपोळ करून.
आपल्याच लोकांना वेठीस धरून दहशत माजवणे हा कुण्या एका धर्माचा मक्ता नाही, ही प्रवृत्ती सार्वत्रिक आहे असे खेदाने नमूद करावे लागते.
असल्या लोकांमधे राहावं लागतं याचं खरंच वैषम्य आहे.
- Log in or register to post comments
न
नूतन सावंत
Wed, 08/19/2015 - 06:52
नवीन
“गाडता राजा”असे वाचावे.
- Log in or register to post comments
न
नूतन सावंत
Wed, 08/19/2015 - 06:57
नवीन
जो माणूस महाराष्ट्राचा माजी मु.मं.आहे त्याचे उद्गार आहेत की,”मी महाराष्ट्रभूषण पुरस्काराला किंमतदेत नाही”.कारण हे महाराष्ट्रदूषण आहेत हे त्यांना स्वता:ला माहीत आहे.
- Log in or register to post comments
स
सस्नेह
Wed, 08/19/2015 - 08:51
नवीन
एक जाणता होता आणि एक त्याला जाणून त्याच्या ठायी लीन झालेला होता.
..दोघांचीही महानता कणभरही जाणण्याची जाण नसणारे निष्कारण भांडत आहेत...अरेरे..!!!
- Log in or register to post comments
प
प्यारे१
Wed, 08/19/2015 - 08:52
नवीन
'महाराजांचे लग्न ठरल्यावर आऊसाहेब आणि दादोजींची लगीनघाई सुरु झाली' अशा अर्थाची जिजाऊंची बदनामी करणारी वाकयं बाबासाहेबांनी लिहिली आहेत असं ब्रिगेडी लोक म्हणतात. (जितुभाऊंनी (मुंब्रावाले डॉक्टर) आपल्या भूमिकेचं स्पष्टीकरण देताना हे लिहिलंय)
यात बदनामी दिसणारा माणूस सडक्या डोक्याचा असून त्याला चपलेनंच हाणला पाहिजे.
बऱ्याच जणांना नेमकं काय चुकीचं लिहिलंय तेही समजणार नाही.
काही ठराविक आयडी ना समजण्याची शक्यता आहे. कारण ते/त्या अशाच सडक्या पद्धतीनं विचार करतात.
- Log in or register to post comments
ख
खटपट्या
Wed, 08/19/2015 - 09:26
नवीन
दणकून अनुमोदन
- Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले
Wed, 08/19/2015 - 10:01
नवीन
खरंच अजुनही कळत नाहीये की ह्यात काय चुकीचे लिहिले आहे ते ? जितेंद्रजी आव्हाड ह्यांन्ना ह्या विधानात काय अर्थ लागला कोणी समजावुन सांगेल का इथे ?
- Log in or register to post comments
प
प्यारे१
Wed, 08/19/2015 - 10:03
नवीन
असा प्रतिसाद कुणीतरी टाकणार हे अपेक्षित होतं.
व्यनि करतो.
- Log in or register to post comments
फ
फुलथ्रॉटल जिनियस
Wed, 08/19/2015 - 09:00
नवीन
फेसबुक फॉरवर्ड,हे खरे आहे काय,? मिपाकरांना काय वाटते??
पुरंदरे आणी ब्राह्मणांना विरोध कशासाठी ,माझे विश्लेषण
१९९१ साली मंडल आयोग लागू झाल्यानंतर, ओबिसिंना सत्तेत मोठा वाटा मिळाला
ओबिसिंना मोठा वाटा मिळाल्याने शिक्षण,रोजगार,राजकारण यातला मराठ्यांचा दबदबा खूप कमी झाला
अमर्याद सत्ता उपभोगायची सवय लागलेल्या मराठा समाजाला ओबिसिंची प्रगती आणि घौडदौड बघून पोटात दुखायला लागले
ओबिसि आरक्षण काढणे बाप जन्मात शक्य नसल्याने थेट आरक्षणात घुसण्याची तयारी मराठा समाजाने सुरु केली
यासाठी मराठा हा मागासवर्गिय दाखवला पाहीजे,दलित, ओबिसिंनी भूतकाळात मराठ्यांनवर अत्याचार केले असा प्रचार केला तर् तो शतकातला मोठा विनोद ठरला असता
मग मराठ्यांपेक्षा उच्चवर्णीय ब्राह्मण समाजाला यात ओढले गेले ,व ब्राह्मणांनी भूतकाळात मराठ्यांवर अत्याचार केल्याच्या खोट्या बाता मारणे सुरु झाले,यासाठी पगारी इतिहासतज्ञ नेमले गेले,ब्रिगेड सारख्या संघटना स्थापण केल्या गेल्या.
मराठा हा दलित ओबिसिंप्रमाणेच मागासवर्गीय आहे हा खोटा दावा वारंवार लोकांच्या माथि मारुन पार्श्वभुमी तयार केलि गेली,यासाठी ब्राह्मणांना बदनाम केले गेले,प्रसंगी स्त्रीयांची बदनामी केली गेली
२००५ पर्यंत पार्श्वभुमी निर्माण केल्यानंतर मराठा आरक्शनाची मागणी हळुच पुढे करण्यात आली
मराठा हे मागासवर्गीय आहेत या खोट्या प्रचाराला दलित,ओबिसींच्या संघटना भुलल्यामुळे मराठा आरक्षणाला त्यांचा विरोध कमी झाला
राष्ट्रवादी हा मराठ्यांचा पक्ष असल्याने २०१४ साली मराठा आरक्षण जाहीर झाले
आरक्षणाची लबाडी हायकोर्टाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर हायकोर्टाने यावर बंदी घातली
त्यामुळे पुन्हा ब्राह्मणविरोध सुरु झाला आहे,पण या संघटनांचं अंतीम लक्ष हे ओबिसी आरक्षणात घुसघोरी करुन त्यांच्या ताटातला चतकोर तुकडा हिसकावून घेणे हे आहे.
परंतू या सर्वांमध्ये ब्राह्मण समाजाचा नाहक बळी जात आहे हे खेदजनक आहे.
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Wed, 08/19/2015 - 09:09
नवीन
उत्तम प्रतिसाद! याची सुरुवात केतकरांच्या घरावर हल्ला करण्यापासून झाली होती बहुतेक. तेव्हापासूनच मराठ्यांनी शिवाजी महाराजांना आपल्यात ओढायला सुरुवात केली.
- Log in or register to post comments
अ
अर्धवटराव
Wed, 08/19/2015 - 17:06
नवीन
ज्याला आपण ओबीसी समाज म्हणतो तो ना कधि राजकारणात बळकट होता ना अर्थकारणात. आपली बलुतेदारी सांभाळावी, सगळी कष्टाची कामे करावी, राजसत्तेला कर द्यावा, व जे पानात पडेल त्यात सुख मानुन नशीबाच्या हावाल्याने जगावं असं त्यांचं आयुष्य होतं. स्वातंत्र्यानंतर त्यांचं थोडंफार राजकीय भान जागृत झालं आणि लगेच पारंपारीक सत्ताधीशांना मिर्च्या झोंबल्या. त्याचाच परिणाम आहे हा सगळा.
- Log in or register to post comments
ह
होबासराव
Sun, 08/23/2015 - 18:20
नवीन
प्रतिसाद वाचल्यानंतर पुन्हा पुन्हा आयडी चेक केला, स्वतःला एक चीमटा सुद्धा घेतला.
- Log in or register to post comments
म
मालोजीराव
Wed, 08/19/2015 - 09:12
नवीन
फेसबुक वरची पोस्ट कॉपी-पेस्टवतोय, माझेहि मत हेच आहे...
- Log in or register to post comments
ख
खटपट्या
Wed, 08/19/2015 - 09:24
नवीन
जबरी मालोजीराव.
- Log in or register to post comments
क
किसन शिंदे
Wed, 08/19/2015 - 09:42
नवीन
तुमच्याच प्रतिक्रियेची वाट पाहत होतो मालोजीराव!
- Log in or register to post comments
प
प्यारे१
Wed, 08/19/2015 - 09:48
नवीन
बाकी प्रतिसादाशी १००% सहमत.
फक्त ...
नाना फडणविसांना चिक्कीत अडकलेल्या पंकजाला वाचवायचं आहे
याबाबत दुमत आहे किंबहुना हे प्रकरण जाणीवपूर्वक उकरलं गेलंय असं वाटतं.
कोणी उकरलं म्हणून विचारताय???? ह्या ह्या ह्या!
- Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध.वैद्य
Wed, 08/19/2015 - 09:59
नवीन
आमी तर पंकजाताईंना नाना फडणविसांनी अडकवल आस ऐकलं होत!
- Log in or register to post comments
प
प्यारे१
Wed, 08/19/2015 - 10:01
नवीन
असं अजिबात नस्तं बोलायचं.
विरोधकांचा डाव असतो हा सगळा.
- Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध.वैद्य
गुरुवार, 08/20/2015 - 11:30
नवीन
.
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Wed, 08/19/2015 - 09:52
नवीन
वयाच्या ९४ व्या वर्षी पुरंदर्यांना असले काही बघायला मिळावे याचा फार फार खेद वाटतो. राजकारण करायचे ते करतातच पण नाहक अशा लोकांना वेठीला धरले गेलेले पाहिले की त्यासारखे वाईट दुसरे काही नाही. आता या लोकांनी बाबासाहेबांच्या पाठोपाठ मेहेंदळे सरांच्या मागे लागू नये म्हणजे झाले. :(
- Log in or register to post comments
प
पैसा
Wed, 08/19/2015 - 09:57
नवीन
पुढचा नंबर त्यांचा. श्रीशिवजयंती उत्सव लोकमान्य टिळकांनी सुरू केला याला राजवाड्यांच्या लेखात पुरावे असताना ते नाकारणारे आणि स्त्रीशिक्षणात आगरकरांचं कार्य काही नाही म्हणणार्यांना काय अशक्य आहे?
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Wed, 08/19/2015 - 10:07
नवीन
तेही खरेच म्हणा, पण मेहेंदळे सर खमके आहेत. ब्रिगेडी पस्तावतील जास्ती काही केलं तर.
- Log in or register to post comments
म
मालोजीराव
Wed, 08/19/2015 - 10:42
नवीन
मेहेंदळे सर ऋषीतुल्य आहेत,सरांचं साहित्य वाचलेलं आहे आणि त्याचं काम इतकी वर्ष पाहिलेलं सुद्धा आहे, सरांवर अशी वेळ आली तर सरांसाठी आम्ही पुन्हा तलवार उचलू …
- Log in or register to post comments
ज
जयंत कुलकर्णी
Wed, 08/19/2015 - 11:50
नवीन
मालोजीराव,
ब. मो. पुरंदर्यांसाठी आपली तलवार म्यानातून बाहेर का पडत नाही याचे कारण वाचण्यास आवडेल. मी दोघांचीही सर्व पुस्तके अभ्यासली आहेत म्हणून उत्सुकता...
- Log in or register to post comments
म
मालोजीराव
Wed, 08/19/2015 - 12:02
नवीन
दुर्दैवाने जाणता राजा नाटक पाहता आले नाही अजून, बाबासाहेबांची पुस्तके अजून वाचली नाहीत आणि अभ्यासलीहि नाहीत , थेट भेट कधीच झाली नाही, आम्ही म्हणजे ट्रस्ट ने त्यांचा 'शिवकल्याण राजा' हा कार्यक्रम गणेश कला क्रीडा ला ठेवला होता तेव्हा हि पुण्यात नव्हतो…पुरेसा अभ्यास आणि माहिती नसल्याने या वादात पडलो नाही.
बाबासाहेबांच्या अचाट आणि अफाट निष्ठेबद्दल आणि कार्याबद्दल त्यांना पुरस्कार नक्कीच देण्यात यावा, असे वैयक्तिक मत आहे
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Wed, 08/19/2015 - 11:51
नवीन
सरांना जर कुणी त्रास दिला तर यथाशक्ती नक्की प्रतिकार करूच.
- Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले
Wed, 08/19/2015 - 10:03
नवीन
ख्यॅ ख्यॅ ख्यॅ ...
लिस्ट्वर तुमचे आणि वल्ली सरांचे ही नाव असु शकते बरं का !!
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Wed, 08/19/2015 - 10:07
नवीन
खी खी खी, वल्ली सरांना काय टेन्शन नाय. अजून सातवाहन राजांच्या अत्याचारांपर्यंत हे लोक पोचलेले नसल्याने वल्ली सर सेफ आहेत एकदम. जोपर्यंत ब्रिगेडवाले देऊळ पाडापाडीचा कार्यक्रम आरंभत नाहीत तोपर्यंत तरी वल्ली सरांना काही टेन्शनच नाय.
- Log in or register to post comments
प
प्यारे१
Wed, 08/19/2015 - 10:11
नवीन
सातवाहन.>>>
हे नाव कानावर पडू देऊ नका. नाहीतर....
अमुक तमुक ... 'आठवाहन' (फॉरचुनर) वाले असं नाव लावतील.
नाद करायचा नाय !
४१४१
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Wed, 08/19/2015 - 11:09
नवीन
कोण हो हे वल्ली सर?
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Wed, 08/19/2015 - 11:32
नवीन
तुमास्नी माहिईत न्हाई ?
लै झेंगाट माणूस !
सुंदर्यांवर डोळा ठिवून आसतोय :)
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Wed, 08/19/2015 - 11:52
नवीन
दर्पणसुंदर्या काय ओ? कुठलीही दर्पणसुंदरी दिसली रे दिसली की, "सुंद्राबाई, फटूत या" (वाड्यावर या च्या चालीत वाचावे =)) ) म्हणताना ऐकलेय तोच झेंगाट माणूस काय हो हा?
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Wed, 08/19/2015 - 11:54
नवीन
खी खी खी. :)
- Log in or register to post comments
अ
अर्धवटराव
Wed, 08/19/2015 - 17:17
नवीन
ते ही आता लवकरच करणार ब्रीगेडवाले. भटांनी मिर्झाराजे जयसींगला देवीच्या अनुष्ठानात मदत केली. त्याचा परिणाम म्हणुन शिवाजीराजे जयसींगापुढे पराजीत झाले. भटांची मानगुट तर पकडलीच आहे ब्रीगेडींनी. पण आता मिर्झाराजांच्या देवीचं काहि खरं नाहि. तिने का म्हणुन ऐकावं भटांचं ? त्या देवीचा शोध सुरु आहे. तिच्या मंदीराची खैर नाहि.
पण तो ही मुद्दा नंतर येईल. सर्वप्रथम नंबर लागणार तुळजाभवानीचा. तिथे तर भट नसतात पूजेला. तरिही तिने शिवाजीला मिर्झाराजेंविरुद्ध यश देऊ नये?? जयसींगाची देवी जर पॉवरफुल्ल होती तर तुळजेने आपला मराठी.. नाइ नाइ.. मराठा बाणा दाखवायला नको होता तिला?? तुळजेची खैर नाहि आता. मराठा छावा घाव घालायला सज्ज होतोय.
जय ब्रीगेड.
- Log in or register to post comments
क
काळा पहाड
Sat, 08/22/2015 - 18:20
नवीन
राज ठाकरे आणि बाबासाहेबांचा स्नेह फार जुना आहे. ही पूर्वी राज ठाकरेंनी बाबासाहेबांची रायगडावर घेतलेली मुलाखतः https://www.youtube.com/watch?v=UX6PqD1AdBk
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- ›
- »