Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मातृभक्ति आणि मराठे

R
raudransh_27
Tue, 08/18/2015 - 20:30
🗣 142 प्रतिसाद
या भूमि तील मातृभक्ति, मातृप्रेम वादातीत आहे मातृ देवो भव: पितृ देवो भव: अतिथि देवो भव: असे म्हणताना प्रथम आईला दैवतसमान म्हटले आहे महाराष्ट्राचा सुर्वणकाल, शतके ज्यांनी इथे राज्य केले असे "सातवाहन" त्यांचा सर्वात पराक्रमी राजा "गौतमीपुञ सातकर्णी " स्वतःच्या नावापुढे आईचे नाव लावतो श्रञियकुलावतंस छञपती शिवराय यांच्या बालपणापासुन आयुष्याच्या प्रत्येक कालात त्यांच्या आईचा -जिजाऊ माँसाहेब- प्रभाव त्यांच्यावर आढळतो. शिवरायानां स्वतंञ राष्ट्र निर्माण करण्याची प्रेरणा, मार्गदर्शन, पाठिंबा आणि स्वातंञ्यदिनानतंरच ज्यानी श्वास सोडले त्या माँसाहेब छ.शिवरायांबरोबर तमाम मराठ्यानां वंदनीय भारतीय ब्रिटिशविरोधी स्वातंञ लढा वाचल्यावर एवढे लश्रात येते की मातृभूमिसाठी लढण्यात आघाडीवर होते महाराष्ट्र आणि बंगाल.. क्रांतीकुलावतंस मराठे हसतहसत मातृभूमिसाठी मृत्युला सामोरे गेले परवापरवा पन्हाळा-पावनखिंड पदभ्रमण करताना माझे मिञ एका हातात भगवा अन् एका हातात तिरंगा घेऊन होते माझ्या जवळच्या मिञाने Group Discussion च्या वेळी मांडलेला एक मुद्दा मला आजही आठवतो, तो म्हणत होता की मी Love marriage ला फक्त एकाच मुद्दा्यावर समर्थन करतो की Love marriage मध्ये मी ठामपणे आधीच सांगु शकेन की ती माझ्या आईची काळजी घेईल माझे अनेक मिञ फक्त आईच्या समाधानासाठी देवळात जातात (मी धरुन) (Partially atheist ) जगप्रसिध्द MAXIM GORKY, साने गुरुजी सारखी मोठी माणसे जगभरात मातृप्रेमाचा जयजयकार करत आजही दिसतात.. राष्ट्रवादाचा (Nationalism) चा उदय पण मातृभुमिप्रेमातुनच.. जगातल्या प्रत्येक प्रांतात मातृभक्ति आढळते.. पण मराठ्यांची मातृभक्ति वादातीतच , इथे जन्मला की प्रत्येक मानव दोन्ही आईंसाठी मातृभक्ति By default मातृभक्ति हा मराठ्यांसाठी फक्त शब्द नाही, ही एक विचारधारा आहे.. हा एक Religion आहे.. ही एक Lifestyle जीवनशैली आहे.. ही अशी स्वंयभु संकल्पना आहे in that we believes. जय जिजाऊ, जय शिवराय _/\_ (लहानपासुन ज्या विचारधारेवर विश्वास ठेवतो त्याला प्रचंड विसंगत वाक्यांमुळे, आरोपांच्या विरोधी, आम्हाला शुद्र दाखवणार्या स्वंयघोषित महान विचारधारेमुळे हा लेखनपंप्रच. हे कादंबरीकार महाशय म्हणतात की "प्रसंगी मराठे आईला विकायला कमी करत नसत" सभासद बखर, बेंद्रे, JN Sarkar, Grand duff , मुघल दरबार पञे, कुरुंदकर, राजवाडे, देशमुख आणि सांळुखे सर ईत्यादी इतिहासअभ्यासकाचीं थोडीफार पाने वाचलीत, सगळ्या ९६ कुळाचां पण नाही माहिती, जेवढे थोडेफार माहितेय त्याततरी "मराठे आई विकायला कमी करत नसत " असे एकही उदाहरण आढळले नाही... आजोबाअंधअनुयायीनीं काही माहिती असल्यास सांगावे, नाहीतर तुमच्या एकांगी लेखनाच्या विश्लेशणाला सरळ ब्राह्मणद्वेषी किंवा ब्रिगेडी सांगुन नेहमीप्रमाणे उत्तर न देता स्वतःची लाल म्हणुन पळ काढावा.. )

प्रतिक्रिया द्या
34685 वाचन

💬 प्रतिसाद (142)
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Wed, 08/19/2015 - 09:06 नवीन
सूद्दलेकणाच्या चूका दाकऊ णका. ते मोरचा घेऊण येतिल!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
स
सस्नेह Wed, 08/19/2015 - 09:15 नवीन
तुम्ही काय लिवलंय ते तुम्हाला तरी कळलं आहे अशी तुमची खात्री आहे का ? असल्यास आपली धन्य __/\__
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Wed, 08/19/2015 - 09:42 नवीन
ज्यांना छत्रपती हा शब्द धड शुद्ध लिहिता येत नाही त्यांची बडबड ती काय सीरियसलि घ्यायची? हे लोक एरवी साडेतीन टक्केवाल्यांची भाषा म्हणून संस्कृतला शिव्याच घालतात. कशाला सांगता मग छात्या पुढे करकरून संभाजीराजांनी बुधभूषणम् हे संस्कृत काव्य लिहिल्याचे ???? यातल्या एकालाही धड संस्कॄत हा शब्दही लिहिता येईल किंवा नाही याबद्दल शंकाच आहे. जशी शुद्धलेखनाची बोंब आहे तशीच विचारशुद्धता, तर्कशुद्धतेचीही बोंबच आहे. एकुणात शुद्धता या संकल्पनेशीच ज्यांचे वैर आहे त्यांना काय सीरियसलि घ्यायचे. महापुरुषांचा वारसा सांगणार्‍या या टिनपाटांना त्यांची जागा जनतेने दाखवूनच दिली पाहिजे.
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Wed, 08/19/2015 - 10:09 नवीन
ए जिगर . हान.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
फ
फुलथ्रॉटल जिनियस Wed, 08/19/2015 - 14:25 नवीन
संस्कृतचा उदोउदो करणार्यांना तरी कुठे संस्कृत येते? चार पाच आरत्या,दोन तीन श्लोक पाठ असणारे संस्कृत संस्कृत करतात तेव्हा खूप. गंमत वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Wed, 08/19/2015 - 14:39 नवीन
एतदपि सत्यं किन्तु "अकरणान्मन्दकरणं श्रेयः" इति उक्ति: श्रुता किल भवता? अज्ञानगर्वस्तु ब्रिगेडानुयायिनां स्थायीभावोऽस्तीति मे मति:| भवतोऽज्ञानं दॄष्ट्वा रञ्जितोऽस्मि मुहुर्मुहु:| भवान्सदैवास्मान् रञ्जयतु | अपि च- ये जना: लेखने 'त्र-ञ-'यो: अपि पार्थक्यं न जानन्ति तान्प्रति को यत्नः???? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फुलथ्रॉटल जिनियस
स
संदीप डांगे Wed, 08/19/2015 - 14:46 नवीन
आमचं संस्क्रुत कच्चंय मनुन आमी संस्क्रुतचा उदो उदो नाय करत, पण वरच्या पर्तेसादाचा आमच्या मते येकच अर्थ हायः . . . "ह्या ब्याट्याला कोणीतरी धरून हाणा रे"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
प
पैसा Wed, 08/19/2015 - 15:05 नवीन
साधु: साधु:| भो: वल्गुदशास्त्री महोदय, सत्यं अवदत् त्वया|
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
अ
अनिरुद्ध.वैद्य Wed, 08/19/2015 - 16:08 नवीन
बॅटमॅन ह्यांचा सिक्सार ... चेंडू पार स्टेडीअमच्या बाहेर!!! बाकी संस्कृत न शिकता आल्याची अजूनही खंत असल्याचे प्रामाणिकपणे कबूल! आंतरजालावर कुठेशिक आहे का शिकण्याची सोय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
क
कोमल Wed, 08/19/2015 - 16:46 नवीन
और ये लगाया बॅटमॅनने छक्का, फुलथ्रॉटल जिनियस हो गये हक्का बक्का.. फुलथ्रॉटल जिनियस यांचा चुकीच्या माणसाला टोला हाणायचा प्रयत्न मस्त फसला आहे.. बॅटमॅन भौ _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
अ
अद्द्या गुरुवार, 08/20/2015 - 17:41 नवीन
दादा कशाला एवढा त्रास करून घेतोय . . (ते सगळं टंकायचा ) ह्या यडझव्या डी ग्रेडींची बौद्धिक लायकी नाही , हे सगळं समजायची . किंवा एकुणात काहीही समजून घ्यायची . पण असो . हा सिक्सर पार अगदी गावाच्या बाहेर मारलेला आहे . दंडवत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
प
प्रदीप साळुंखे Wed, 08/19/2015 - 11:11 नवीन
मिपावर सगळे 'भट'च आहेत कि काय? बहुतेक प्रतिक्रिया वाचून तसेच वाटते. (भट=विद्वान,असे म्हणायचे आहे, कृपया चिडू नका)
  • Log in or register to post comments
प
पैसा Wed, 08/19/2015 - 11:22 नवीन
अय्या, हो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप साळुंखे
प
प्यारे१ Wed, 08/19/2015 - 11:36 नवीन
आता आता येऊ लागलेत. आपलं स्वागत आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप साळुंखे
स
संजय पाटिल Wed, 08/19/2015 - 13:39 नवीन
(भट=विद्वान,असे म्हणायचे आहे, कृपया चिडू नका) लोल....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप साळुंखे
अ
अनिरुद्ध.वैद्य Wed, 08/19/2015 - 16:32 नवीन
भट=विद्वान,असे म्हणायचे आहे >> मला चुकून महेश भट का आठवले कुणास ठाऊक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप साळुंखे
प
प्रदीप साळुंखे Wed, 08/19/2015 - 17:58 नवीन
साहजिकच आहे.तुम्हाला महेश भट च आठवणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध.वैद्य
प
प्यारे१ Wed, 08/19/2015 - 20:43 नवीन
साळुंखे, मी बहुजन समाजातला आहे. माझ्या एका चुलत बहिणीनं मराठा मुलाशी आणि एका मावसबहिणीनं ब्राह्मण मुलाशी लग्न केलंय. सगळे व्यवस्थित जा ये खा पि करतात. तुमचा नक्की काय आक्षेप आहे? आपण भट म्हणजे विद्वान या अर्थानं नाही म्हणालात हे तुम्हालाही माहिती आहे. वेळ प्रसंगी मी आमच्या जातीला, मराठ्यांना आणि बामणाना पण श्या देतो. खातो पण. भरपूर मुस्लिम, अनेक आणखी जातीतले धर्मातलेही मित्र मैत्रिणी आहेत. तुमचा नक्की काय आक्षेप आहे????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप साळुंखे
न
नाखु गुरुवार, 08/20/2015 - 11:16 नवीन
ओ.ह. माफ करा आ.ह. यांचे नक्की कोण आहेत त्याची चव्कशी करा जरा !!! बाकी रुमाल टाकून आहे. चार जागा पकडून ठेवणे शेंगा-कणसं घेऊन येतो. चिर्कूट चिमण मेंबर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
अ
अनिरुद्ध.वैद्य गुरुवार, 08/20/2015 - 11:24 नवीन
मग अजून कोणी आठवायला हवे होते?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप साळुंखे
स
स्रुजा Wed, 08/19/2015 - 19:15 नवीन
मी या धाग्याला फाट्यावर मारणार होते. तुमच्या या एका प्रतिक्रियेत तो विचार बदलायचं सामर्थ्य आहे. अभिनंदन !! भट म्हणजे विद्वान हे मान्य आहे का? बर्र !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप साळुंखे
L
llपुण्याचे पेशवेll Wed, 08/19/2015 - 11:28 नवीन
ऐका जरा. तीय ब्रिटिशविरोधी स्वातंञ लढा वाचल्यावर एवढे लश्रात येते की मातृभूमिसाठी लढण्यात आघाडीवर होते महाराष्ट्र आणि बंगाल.. क्रांतीकुलावतंस मराठे हसतहसत मातृभूमिसाठी मृत्युला सामोरे गेले याच्यामधले किती ९६के होते हो? आणि राहीलच तर जे हसत हसत मृत्यूला सामोरे गेले त्यात किती तुमचे साडेतीन टक्के वाले होते होते मोजा बरे जरा. अहो कमीत कमी उदाहरणे तरी आपल्या स्वतःच्या मुद्द्याला मारणार नाहीत अशी निवडायची हो.
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Wed, 08/19/2015 - 11:30 नवीन
लेखक महाशय काडी टाकून गेले आहेत. आपण बसलोय लेखण्या ताणत :)
  • Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध.वैद्य Wed, 08/19/2015 - 14:28 नवीन
दुर्लक्ष करणे! आता लेखक सांगत फिरत असतील कसा ५० लोकांना नडलो ते :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
प
प्रदीप साळुंखे Wed, 08/19/2015 - 11:39 नवीन
मी नाही ओ वर पहा
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Wed, 08/19/2015 - 11:49 नवीन
आयला अजून कोनीच कसे आले नाय वो? त्या भट बाबा पुरंदरेला॑ दिलेला पुरस्कार परत घेतला पाहिजे. (आता देऊन झालाय म्हणजे बोलायला मोकळे) दादू कोंडदेवाचे नाव इतिहासातून पुसून टाकले पाहिजे.. त्या जेम्स लेन ला मसाला पुरवतो म्हणजे काय? त्या जातीयवादी कादंबरीवर बंदी घातली पाहिजे.. शिवरायांची/मासाहेबांची बदनामी केली म्हणजे काय? मग त्या वाक्यांचा मागचा पुढचा संदर्भ काहीही असो. शिवरायांच्या आईबद्दल घाणेरडी(?) वाक्य काढणार्‍याची जीभ मुळापासून उपटली पाहिजे (आमच्या आईवडिलांना आम्ही कुत्र्याची देखील किम्मत देत नसलो तरीही) असो. मला एकच प्रश्न, भर दरबारात कोण तो भूषण "शिवबा न होते तो सुन्नत सबकी होती" असे काहीबाही बरळतो, आणि महराजांचे अष्टप्रधान मंडळ गप्प बसते म्हणजे काय? त्यांंना महाराजांचा धर्मनिरपेक्ष स्वभाव माहीत नव्हता काय? तिथल्या तिथे त्या भूषणला चेचला नाही म्हणून ही भाटांची पिलावळ सोकावलीय.
  • Log in or register to post comments
आ
आदूबाळ Wed, 08/19/2015 - 12:21 नवीन
The 8 Stages of Genocide http://www.genocidewatch.org/aboutgenocide/8stagesofgenocide.html कोणत्या पायरीवर आहोत आत्ता आपण? पाच (Polarization) संपवून सहा (Preparation)?
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Wed, 08/19/2015 - 12:33 नवीन
जे ज्यूंचा झाला तेच होणार आहे. फक्त कधी ? हा प्रश्न आहे. ट्रिगर इव्हेंट काय असेल ? मध्ये शरद पवारावर हल्ला झाला तो व्यक्ती जर ब्राह्मण असता तर पुन्हा १९४८ रीपीट झाले असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
ब
बॅटमॅन Wed, 08/19/2015 - 12:43 नवीन
मला नाय वाटत तसं काही होईल म्हणून. १९४८ ला देखील काय झाले म्हणे? किती ब्राह्मणांचे शिरकाण करण्यात आले? घरे जाळली हे खरे, पण किती लोकांना मारले? तेव्हा जे झाले खूप वाईट झाले, पण त्याला जिनोसाईड म्हणणे म्हणजे जिनोसाईड या कल्पनेवरच विनोद केल्यापैकी आहे. ब्राह्मणविरोधी १९४८ चे जे दंगे झाले ते देशभर झाले का? महाराष्ट्रातही पश्चिम महाराष्ट्र सोडून कुठे झाले? पश्चिम महाराष्ट्रातही जास्त प्रमाण कुठे होते? जिथे दंगे झाले तिथे वित्तहानी किती आणि जीवितहानी किती झाली? लोकांचे ब्राह्मणांशी दंग्यांनंतरचे वर्तन कसे होते? याचा जरा अदमास घ्या अशी विनंती आहे. त्याचा अदमास घेऊन जर पाहिले तर ज्यूंच्या शिरकाणाशी तुलना करणे म्हणजे काय म्हणावे हे कळत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
ब
बॅटमॅन Wed, 08/19/2015 - 12:45 नवीन
आणि हो, हे टाकायचे राहिलेचः (नॉनसेकुलर ब्राह्मण) बॅटमॅन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
क
कपिलमुनी Wed, 08/19/2015 - 13:08 नवीन
१९४८ ला सामाजिक वातावरण आजएवढे प्रदूषित नव्हते. मिडिया , सोशल मिडियामुळे बातम्या , अफवांचा वेग प्रचंड वाढला आहे. शहानिशा न करता त्यावर लोकं विश्वास ठेवतात आणि रीअ‍ॅक्ट होतात ( विटंबनेच्या अफवेवरून अशाच दंगली झाल्या आहेत) १९४८ ला सर्वसाधारंण लोका हिंसक नव्हती त्यामुळे बर्‍याच ठिकाणी घरे जाळाली तरी आतल्या लोकांना बाहेर काढले होते पण काही ठिकाणी सामूहिक शिरकाण झाले होते. सुदैवाने त्यांना सरकारी सपोर्ट नव्ह्ता ( जो शिख हत्याकांडामध्ये होता) सध्या जमाव जमला की हिंसक आणि क्रूर होतो. अगदी पाकीटमारापासून ते रस्त्यावरच्या गाडीचा धक्का लागल्यानंतरचा खून अशी उदाहरणे आहेत. हा वाढता हिंसकपणा पाहिला तर जिनोसाईडची भिती वाटणे साहजिक आहे . आज किंवा नजीकच्या काळात नाही किंवा ज्यूंएवढे मोठे नाही . पण समाजकंटकांना एखादा मोठा ट्रिगर ( हत्या ई.) मिळाला तर जिनोसाईडची छोटी आवृत्ती घडू शकते .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Wed, 08/19/2015 - 13:14 नवीन
ह्या बाकी खरा. तेव्हापेक्षा आजचे वातावरण खूप जास्ती प्रदूषित झालेले आहे. कदाचित होईलही (न होवो). बायदवे, १९४८ साली शिरकाण कुठे झाले हे सांगू शकाल कय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
क
कपिलमुनी Wed, 08/19/2015 - 13:30 नवीन
व्यनि केला आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
अ
अभ्या.. Wed, 08/19/2015 - 13:52 नवीन
मुनीवर माझे व्यवसायानिमित्त एक छोटेसे निरिक्षण आहे. कदाचित तो बदलत्या समाजमनाचा आरसा असावा. ग्रुप्स, प्रतिष्ठाने, मंडळे, संस्था, सेवाभावी संस्था, संघटना आधीपासुन असायच्या. आता त्यांची बेसुमार पैदास झालीय ते सोडा पण पुर्वीच्या मंडळांचे संस्थांचे लोगो सुर्योदय, पणती, दिवा, मदतीचे हात, सुर्य, मंगलचिन्हे असे असायचे. आताच्या कुठल्याही ग्रुपला वाघ, सिंव्ह, तलवारी, बंदुका, जाळ, क्वचित कवट्या असेच लोगो लागतात. महाभारतकालीन वाघसिंह शौर्याचे प्रतिक म्हणून वापरत असत पण आजच्या जमान्यात फालतू फालतू लोकांची अन संघटनांची ती युध्द्जन्य चिन्हे पाहून कीव येते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
ब
बॅटमॅन Wed, 08/19/2015 - 14:09 नवीन
खल्लास निरीक्षण!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 08/19/2015 - 14:20 नवीन
+१ वर ही सिम्बॉल्स असली तरी त्यामागे..हल्लीचे तयार झालेले निरनिराळे ग्रुप्स असतात. पुण्यातली दहिहंडीची पोस्टर्स पाहिली तरी समजतं लगेच. बेकारी,निरुत्साह या समस्येत असलेली वय १५ ते २२ गटातली पोरं या ग्रुप्स मधे बेसुमार भरती होत आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
अ
अजया Wed, 08/19/2015 - 16:30 नवीन
अभ्या परफेक्ट निरीक्षण! लोगो एकूणच मानसिकता व्यक्त करणारे आहेत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
क
कोमल Wed, 08/19/2015 - 16:51 नवीन
बेकारी,निरुत्साह
+१ आणि यांचे फ्लेक्सांवरचे हावभाव युद्ध जिंकून आल्या सारखे असतात ते वेगळेच!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
स
समीरसूर गुरुवार, 08/20/2015 - 11:36 नवीन
जबरदस्त निरीक्षण! अगदी खरे आहे. एकंदरीत झुंडशाही वाढलेली आहे हे खरे. आणि डोक्यात जातात ती अशी वाक्ये: नाद करायचा नाय... बघतोस काय? मुजरा कर! सिंहाच्या जबड्यात घालुनि हात, मोजीन दात, ही जात मराठ्याची! (सिंहाचे दात जबड्यात हात वगैरे घालून का मोजायचे ह्या प्रश्नाचं मला अजून उत्तर मिळालेलं नाही. थोडं वाचन केलं तरी सहज कळेल. हे पद्धतशीरपणे जातीय तेढ वाढवण्याचे, वर्चस्व गाजवण्याचे प्रयत्न! ब्रिगेडधर्म!) राजे/दादा तुम्हीच! (पण काय?) दहशत घालून मोठेपण मान्य करायला लावण्याचं हे तंत्र खूप धोकादायक आहे. हे ब्रेंडिंग सुरु झालं आणि आपल्या समाजाचा पोत बिघडला. आता तो दुरुस्त होणं कठीण आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
क
कहर गुरुवार, 08/20/2015 - 11:47 नवीन
भले
सिंहाच्या जबड्यात घालुनि हात, मोजीन दात, ही जात मराठ्याची
हाच तर प्रयत्न होता. स्वताला संभाजी समजून सिंह शिवशाहिरांच्या पुरस्काराला हात घालायला निघाले …. पण दात राहिले बाजूला हात बाहेर आल्यावर मोजणारी बोटे सुद्धा हातावर उरली नाहीत की. संभाजीचा आव आणणारा शास्ताखान निघाला म्हणायचे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समीरसूर
ब
बॅटमॅन गुरुवार, 08/20/2015 - 16:09 नवीन
सिंहाच्या जबड्यात घालुनि हात, मोजीन दात, ही जात मराठ्याची! (सिंहाचे दात जबड्यात हात वगैरे घालून का मोजायचे ह्या प्रश्नाचं मला अजून उत्तर मिळालेलं नाही.
आणि मजा म्हणजे ही कन्सेप्ट सर्वांत अगोदर शाकुंतल नामक नाटकात सांगितलेली आहे. त्याहूनही मजा म्हणजे हे नाटक साडेतीन टक्केवाल्यांच्या भाषेत लिहिलेलं आहे. तेव्हा ज्यांच्या विरुद्ध दंड थोपटायचे त्यांच्याच कल्पना चोरायच्या म्हणजे किती बुद्धिदारिद्र्य असेल पहा तुम्हीच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समीरसूर
क
कॅप्टन जॅक स्पॅरो गुरुवार, 08/20/2015 - 16:21 नवीन
अरे गंमतीची गोष्ट म्हणजे सिंहाच्या जबड्यात घालुनी हात मोजती दातवाली मंडळी जेव्हा चुकुन घरी येतात तेव्हा कुत्रा मोकळा आहे का बांधलेला आहे ह्याची खात्री केल्याशिवाय गेटला पण हात लावत नाहित. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन गुरुवार, 08/20/2015 - 16:24 नवीन
ठ्ठो =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
प
प्यारे१ गुरुवार, 08/20/2015 - 16:59 नवीन
ते कुत्र्याचे सोनेरी पट्टे वडलोपार्जित जमिनी (काळी आई) विकून गळ्यात मिरवत असतात....! सरसकटीकरण नाही करत पण बर्‍याच केसेस पाहिल्यात. सॉरी मालोजीराव, गॉगल्या आणि इतर लोक...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
म
माहितगार Wed, 08/19/2015 - 15:44 नवीन
सुदैवाने त्यांना सरकारी सपोर्ट नव्ह्ता ( जो शिख हत्याकांडामध्ये होता)
या धाग्यावरची बाकी चर्चा खरेच माहित नाही ब्याटमनरावांचे प्रतिसाद फॉलेकरत या प्रतिसादा पर्यंत पोहोचलो. या धागा चर्चेत शीख समाजाचा संबंध कोणता आणि कसा लावला जातो आहे ? शिख हत्याकांडामध्ये होता म्हणजे कोणते ? अफगाणीस्तानातले का नॉर्थवेस्ट फ्रंटीयरचे ? आणि त्यात सरकारी सपोर्ट या साठी कोणते संदर्भ आहेत ? शिख हत्याकांडास सरकारी सपोर्ट यातून प्रतिसाद कर्त्यास काय ध्वनीत करावयाचे आहे ? Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
स
संदीप डांगे Wed, 08/19/2015 - 15:57 नवीन
३१ ऑक्टोबर १९८४ बद्दल बोलत आहेत दादा ते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
प
पगला गजोधर Wed, 08/19/2015 - 13:32 नवीन
ऐला मी तिकडे कथेच्या जिलब्या पाडू राहिलोय, तिथे कोन फिरकत पण नाही आणि प्रतिक्रिया पण देत नाही. थांबा आता मी पण एक कॉन्ट्रोव्हरशीअल का. कु. धागा काढतोच…
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ह
होबासराव Tue, 08/25/2015 - 14:48 नवीन
मस्त...पटेश. तसा हि आज सेक्युलरीझम चा जो अर्थ आहे त्यामानाने आम्हि नॉन-सेक्युलरच बरे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
न
नाव आडनाव Wed, 08/19/2015 - 13:09 नवीन
या प्रतिसादासाठी धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
अ
अभिजितमोहोळकर Fri, 08/21/2015 - 08:07 नवीन
ज्यूं चे भयानक हाल झाले आणि अणि महा पाशवी निर्दयी शिरकाण झालं. तेव्हढं काही १९४८ ला झालं नव्हंत. गावगुंडांनी तेंव्हा हात धुवून घेतले हे मात्रं खरं. अर्थातच परिणाम फारच मोठे झाले हे मान्य पण ज्यूं च्या अत्याचारांशी तुलना योग्य नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा