Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मातृभक्ति आणि मराठे

R
raudransh_27
Tue, 08/18/2015 - 20:30
🗣 142 प्रतिसाद
या भूमि तील मातृभक्ति, मातृप्रेम वादातीत आहे मातृ देवो भव: पितृ देवो भव: अतिथि देवो भव: असे म्हणताना प्रथम आईला दैवतसमान म्हटले आहे महाराष्ट्राचा सुर्वणकाल, शतके ज्यांनी इथे राज्य केले असे "सातवाहन" त्यांचा सर्वात पराक्रमी राजा "गौतमीपुञ सातकर्णी " स्वतःच्या नावापुढे आईचे नाव लावतो श्रञियकुलावतंस छञपती शिवराय यांच्या बालपणापासुन आयुष्याच्या प्रत्येक कालात त्यांच्या आईचा -जिजाऊ माँसाहेब- प्रभाव त्यांच्यावर आढळतो. शिवरायानां स्वतंञ राष्ट्र निर्माण करण्याची प्रेरणा, मार्गदर्शन, पाठिंबा आणि स्वातंञ्यदिनानतंरच ज्यानी श्वास सोडले त्या माँसाहेब छ.शिवरायांबरोबर तमाम मराठ्यानां वंदनीय भारतीय ब्रिटिशविरोधी स्वातंञ लढा वाचल्यावर एवढे लश्रात येते की मातृभूमिसाठी लढण्यात आघाडीवर होते महाराष्ट्र आणि बंगाल.. क्रांतीकुलावतंस मराठे हसतहसत मातृभूमिसाठी मृत्युला सामोरे गेले परवापरवा पन्हाळा-पावनखिंड पदभ्रमण करताना माझे मिञ एका हातात भगवा अन् एका हातात तिरंगा घेऊन होते माझ्या जवळच्या मिञाने Group Discussion च्या वेळी मांडलेला एक मुद्दा मला आजही आठवतो, तो म्हणत होता की मी Love marriage ला फक्त एकाच मुद्दा्यावर समर्थन करतो की Love marriage मध्ये मी ठामपणे आधीच सांगु शकेन की ती माझ्या आईची काळजी घेईल माझे अनेक मिञ फक्त आईच्या समाधानासाठी देवळात जातात (मी धरुन) (Partially atheist ) जगप्रसिध्द MAXIM GORKY, साने गुरुजी सारखी मोठी माणसे जगभरात मातृप्रेमाचा जयजयकार करत आजही दिसतात.. राष्ट्रवादाचा (Nationalism) चा उदय पण मातृभुमिप्रेमातुनच.. जगातल्या प्रत्येक प्रांतात मातृभक्ति आढळते.. पण मराठ्यांची मातृभक्ति वादातीतच , इथे जन्मला की प्रत्येक मानव दोन्ही आईंसाठी मातृभक्ति By default मातृभक्ति हा मराठ्यांसाठी फक्त शब्द नाही, ही एक विचारधारा आहे.. हा एक Religion आहे.. ही एक Lifestyle जीवनशैली आहे.. ही अशी स्वंयभु संकल्पना आहे in that we believes. जय जिजाऊ, जय शिवराय _/\_ (लहानपासुन ज्या विचारधारेवर विश्वास ठेवतो त्याला प्रचंड विसंगत वाक्यांमुळे, आरोपांच्या विरोधी, आम्हाला शुद्र दाखवणार्या स्वंयघोषित महान विचारधारेमुळे हा लेखनपंप्रच. हे कादंबरीकार महाशय म्हणतात की "प्रसंगी मराठे आईला विकायला कमी करत नसत" सभासद बखर, बेंद्रे, JN Sarkar, Grand duff , मुघल दरबार पञे, कुरुंदकर, राजवाडे, देशमुख आणि सांळुखे सर ईत्यादी इतिहासअभ्यासकाचीं थोडीफार पाने वाचलीत, सगळ्या ९६ कुळाचां पण नाही माहिती, जेवढे थोडेफार माहितेय त्याततरी "मराठे आई विकायला कमी करत नसत " असे एकही उदाहरण आढळले नाही... आजोबाअंधअनुयायीनीं काही माहिती असल्यास सांगावे, नाहीतर तुमच्या एकांगी लेखनाच्या विश्लेशणाला सरळ ब्राह्मणद्वेषी किंवा ब्रिगेडी सांगुन नेहमीप्रमाणे उत्तर न देता स्वतःची लाल म्हणुन पळ काढावा.. )

प्रतिक्रिया द्या
34685 वाचन

💬 प्रतिसाद (142)
अ
अनिरुद्ध.वैद्य Wed, 08/19/2015 - 14:45 नवीन
त्यांनी तर संघ पण टाकलाय हो राजे हो .. Genocide is always organized, usually by the state, often using militias to provide deniability of state responsibility (the Janjaweed in Darfur.) Sometimes organization is informal (Hindu mobs led by local RSS militants) or decentralized (terrorist groups.) तरीपण, मला वाटते आपण लेव्हल ६ कधीच गाठलीय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
ह
होबासराव Tue, 08/25/2015 - 14:49 नवीन
ळॉळ =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध.वैद्य
त
तुडतुडी Wed, 08/19/2015 - 12:37 नवीन
प्रसंगी मराठे आईला विकायला कमी करत नसत>> मराठे म्हणजे मराठी माणसं असा उल्लेख असावा . शिवपूर्व काळाची भयाण परिस्थिती लक्षात घेतली तर छोट्या छोट्या वतनांसाठी, थोड्या पैशांसाठी अत्यंत लाचार होणारे लोक असं करतहि असतील कदाचित .
  • Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध.वैद्य Wed, 08/19/2015 - 14:48 नवीन
इतर ठिकाणचा मराठे क्षत्रिय किंवा मराठा ब्राम्हण असा पोटभेद सोयीस्कर विसरतात मंडळी ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुडतुडी
ज
जयंत कुलकर्णी Wed, 08/19/2015 - 12:42 नवीन
हेच टाकायला येणार होतो...धन्यवाद ! खेडेकरांनी भारतातील प्रत्येक ब्राह्मणास ठार करु अशी धमकी दिलेली याप्रसंगी आठवत आहे... त्यांच्या पुस्तकातील इतर अनेक धमक्या नेटवर सापडतील बहुदा....
  • Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध.वैद्य Wed, 08/19/2015 - 14:38 नवीन
प्रत्येक ब्राह्मणास नव्हे काही ... ब्राह्मण पुरुषांना ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी
ब
बॅटमॅन Wed, 08/19/2015 - 14:44 नवीन
ओह येस..नेहमीची मेथडॉलॉजी हो. पुरुषांना ठार मारा आणि बायका आपसात वाटून घ्या. नवा पार्ट इतकाच की इतके सगळे करूनच्या करून बहुजनांचे कैवारी असल्याचे मिरवून घ्यायचे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध.वैद्य
अ
अनिरुद्ध.वैद्य Wed, 08/19/2015 - 14:46 नवीन
तसलेच काहीसे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
व
विवेकपटाईत Wed, 08/19/2015 - 14:40 नवीन
पुरंदरे यांचे लेखन वाचल्याशिवाय लिहिलेला हा लेख आहे. बाकी महाराष्ट्रात खरोखरच कुणी मराठी आहे का? बाकी सत्य एकच आहे, पुरंदरे मुळे लोकांना शिवाजी माहित झाला. (माननीय नेहरू यांचे शिवाजी आणि मराठ्यांबाबत काय विचार होते, एकदा तपासून पहा) पुरंदरे नसते तर सेकुलर सरकारने शिवाजीचा धडा हि शाळेत शिकविला नसता. संभाजी ब्रिगेडने पुरंदरे यांचे आभार मानले पाहिजे. (जर ते शिवाजी राजेना आपला राजा मानीत असतील तर). बाकी लोकसभेचा पराभव साहेबाना अजून पचला नाही आहे, गादी विना त्यांची अवस्था बिकट झाली आहे.
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Wed, 08/19/2015 - 14:46 नवीन
पुरंदरे मुळे लोकांना शिवाजी माहित झाला.
साहेब उगा काहीही बोलू नका. बाबासाहेबांचे कार्य महान आहे पण शिवाजीमहाराजांची स्मृती त्यांच्याही अगोदर खूप जणांनी गाजवलेली आहे. बाबासाहेबांपायी बाकीच्यांचा अपमान करू नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत
श
शब्दबम्बाळ Wed, 08/19/2015 - 16:23 नवीन
पटाईत साहेबांच्या प्रतिसादातला शिवाजीमहाराजांचा एकेरी उल्लेख खटकला हे नमूद करतो! शेवटी ज्याची त्याची मर्जी, त्याने महाराजांचे कर्तुत्व काही कमी होणार नाही पण "पुरंदरे यांचे लेखन वाचल्याशिवाय लिहिलेला हा लेख आहे" या वाक्यात आपण पुरंदरेंना आदराने संबोधित करू शकता ते राजांच्या बाबतीतही फारसे अवघड नसावे असे वाटते! बाकी आप तो भावानावो में बह गये!! असाच एका धाग्यावर कोणीतरी "पुरंदरे यांचा अपमान म्हणजे शिवाजी महाराजांचा अपमान" असे लिहिलेले वाचले! अरे काय चाललंय, म्हणजे एखाद्याला मोठ्ठ दाखवायचं म्हणून काहीही बोलायचं? अशी सुद्धा मा. पुरंदरे यांना अशा प्रकारे ओळख देण्याची काही गरज नाहीये! महाराष्ट्र त्यांना शिवचरित्रकार म्हणून आधीपासूनच असाही ओळखतोच. दोन्ही बाजूंना हे टोक किंवा ते टोक एवढाच पाहायला मिळतंय! अवघड आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
क
कहर गुरुवार, 08/20/2015 - 10:51 नवीन
अहो ज्ञानेश्वरीमुळे गीतेचे ज्ञान अगदी तळागाळातल्या सामान्य जनतेपर्यंत पोचले अशा अर्थाचे वाक्य आहे ते . गीता आधीपासून होतीच की. छत्रपतींच्या बद्दल अनेक बखरी आणि लेखन उपलब्ध होते मान्य पण सामान्य जनमानसात किती पोचले होते ? पेशव्यांच्या कारकिर्दीबद्दल पण अनेक साहित्य उपलब्ध आहे पण सामान्य लोकांना माहिती किती आहे? अशा अर्थाने
पुरंदरे मुळे लोकांना छत्रपतीं माहित झाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन गुरुवार, 08/20/2015 - 16:07 नवीन
नाही, तेही चूक आहे. बाबासाहेबांच्या अगोदर ललित लेखन किंवा काव्यनाटक वगैरे रूपांनी शिवचरित्र भरपूर तळागाळात पोहोचले होते. शिवचरित्रविषयक कादंबर्‍या किंवा नाटक वगैरेंना तुफान पॉप्युलॅरिटी अगोदरपासूनच होती. सामान्य जनमानसात शिवचरित्र पुष्कळ पोहोचले होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कहर
प
प्रचेतस गुरुवार, 08/20/2015 - 16:21 नवीन
वाच्यार्थानं चरित्र म्हणता यावे असे पाहिले मराठी शिवचरित्र केळुसकर यांनी लिहिलेले होते ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन गुरुवार, 08/20/2015 - 16:24 नवीन
येस आय थिंक. तरी जरा पाहतो कै अजून कोणी असेल तर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
अ
अस्वस्थामा गुरुवार, 08/20/2015 - 17:16 नवीन
नक्की कुठे जाऊन पाहून येतोस रे तू.. ?? ;) (नै येताना बोचकंच आणतोस म्हणून विचारतोय.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
अ
अद्द्या गुरुवार, 08/20/2015 - 17:48 नवीन
याच्या तळघरात "दि लायब्ररीयन " सारखी एखादी गुप्त आणि मोठी एखादी लायब्ररी असेल . .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अस्वस्थामा
क
कहर Fri, 08/21/2015 - 05:39 नवीन
लोळ... खरेच तसे काही असल्यास बघायला आवडेल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अद्द्या
ख
खटपट्या गुरुवार, 08/20/2015 - 10:21 नवीन
हायला या ब्रिगेडी लो़कांमुळे विवेकवादी सच्चे मराठे फुकटचे बदनाम होतायत..
  • Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु गुरुवार, 08/20/2015 - 10:40 नवीन
कश्यात काय अन फाटक्यात पाय!! ह्यांची मर्दुमकी ब्राह्मण पुरुष मारा ते एड्स चे विषाणु असतात वगैरे इतपत असते त्याच्यापुढे नाही! उगाच धागा उघडला भाऊ!!
  • Log in or register to post comments
आ
आदूबाळ गुरुवार, 08/20/2015 - 11:09 नवीन
http://www.genocidewatch.org/aboutgenocide/8stagesofgenocide.html
3. DEHUMANIZATION: One group denies the humanity of the other group. Members of it are equated with animals, vermin, insects or diseases. Dehumanization overcomes the normal human revulsion against murder. At this stage, hate propaganda in print and on hate radios is used to vilify the victim group.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
त
तुडतुडी गुरुवार, 08/20/2015 - 10:42 नवीन
"शिवबा न होते तो सुन्नत सबकी होती" असे काहीबाही बरळतो, आणि महराजांचे अष्टप्रधान मंडळ गप्प बसते म्हणजे काय?>>> मग ? हे विधान चूक आहे काय ? महाराज धर्मनिरपेक्ष होते हे निर्विवाद सत्य आहे . त्यांच्या सैन्यात अनेक इतर धर्मीय लोक होते . आग्र्याला असताना महाराजांचा एकनिष्ठ सेवक मदारी मेहतर त्यांच्यासोबत होता . पण हिंदुस्थानवर राज्य करणारे त्यावेळचे राज्यकर्ते धर्मनिरपेक्ष नवते ना . शिवपुर्वकालीन हिंदूंची स्थिती आणि हिंदवी स्वराज्य स्थापन झाल्यानंतर ची स्थिती ह्यात जमीन अस्मानाचा फरक आहे . तेव्हा शिवाजी महाराज नसते तर कलशाने उच्चारलेलं वाक्य सत्य सुधा होऊ शकलं असतं .
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ गुरुवार, 08/20/2015 - 10:54 नवीन
ओ आक्का, उपरोधात्मक प्रतिसाद आहे तो. कुल्फि खा आणि थंड व्हा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुडतुडी
ख
खटपट्या गुरुवार, 08/20/2015 - 11:45 नवीन
शतका बद्दल धागाकर्त्याला शिवचरित्राचे सर्व खंड देउन सत्कार करण्यात येत आहे. मिपा पडीक सत्कार समीती. अध्यक्ष - जेपी उपाध्यक्ष - नाखू (नाखू यांचा सद्याचा पत्ता माहीत नाही) बाकी सगळे मिपा पडीक कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो गुरुवार, 08/20/2015 - 16:34 नवीन
थोडासा उचित बदल सुचवतो. शतका बद्दल धागाकर्त्याला बाबासाहेब पुरंदरे लिखित शिवचरित्राच्या प्रत्येक आवृत्तीची एक एक प्रत देउन सत्कार करणेत येत आहे. तसचं जाती/वंशश्रेष्ठत्वाची जी काविळ झालेली आहे त्यामधुन सदर महाशय लौकर बरे व्हावेत ह्यासाठी सद्ध्याचे लोकप्रिय आद्यदैवत जयदेवा जयदेवा खंडेरायाला प्रार्थना करण्यात येत आहे. -सर हेपीतेखा जेपी- (अध्यक्ष,अखिलमिपापडिकसत्कारसमिती) -श्री.श्री.बॅटुकराजे गॉथमहळ्ळीकर- (-संस्थापक व अध्यक्ष, रोचकऐतिहासिकसंदर्भसमिती, मिपावाडी) -कॅजॅस्पॅ- (अध्यक्ष,धरलाकीहाणपळलाकीसोडकुत्रा ब्रिगेड) आणि असंख्य कार्यकर्ते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
ख
खटपट्या गुरुवार, 08/20/2015 - 16:43 नवीन
चालतंय :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
क
कपिलमुनी गुरुवार, 08/20/2015 - 16:46 नवीन
संन्यासाचा तेवढा लक्षात ठेवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
अ
अस्वस्थामा गुरुवार, 08/20/2015 - 17:22 नवीन
खिक्क.. टका ने बगा कसा आगदी मनावर घेतलाय.. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
प
परश्या Fri, 08/21/2015 - 06:54 नवीन
मातृगौत्र निदर्शक नांव धारण करणारा गौतमीपुत्र सातकर्णी हा काही पहिला राजा नाही. असे मातृगौत्र निदर्शक नांव धारण करण्याची प्रथा/पद्धत त्यापुर्वीही म्हणजे अगदी वैदिक काळापासुन प्रचलित होती. बहुपत्नीत्वाची पद्धत अस्तित्वात असलेल्या समाजात विशिष्ट राणीपासून झालेली मुले इतर राण्यांच्या मुलांपासून वेगळी अशी ओळखता यावीत यासाठीची ती परंपरा होती. ही पद्धत केवळ राजघराण्यापुरतीच मर्यादित नसून सामान्य जनतेतही अशी नावे अस्तित्वात होती. इथे मातेबद्दल आदर वगैरे सुचविण्यासाठी गौतमीपुत्र सातकर्णी ने हे नाव धारण केलेले दिसत नाही. ….बादवे….. सातकर्णी (घराणे) हे क्षत्रिय घराणे नसून ब्राह्मण घराणे होते. संदर्भ – महाराष्ट्र राज्य गॅझेटिअर , इतिहास : प्राचीन काळ (खंड १) पान क्र. १६५ व ४८५
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव Fri, 08/21/2015 - 07:54 नवीन
आयडी बदलला कि काय ???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परश्या
प
प्रचेतस Fri, 08/21/2015 - 08:13 नवीन
नाही हो. बाकी सातवाहन ब्राह्मण होते का क्षत्रिय हा विवाद्य विषय आहे. हा संपूर्ण डोलारा गौतमीपुत्राच्या नासिक शिलालेखातील 'एक ब्राह्मणनस' (एक ब्राह्मण) ह्या शब्दावर आधारित आहे. ह्या व्यतिरीक्त सातवाहन हे ब्राह्मण अथवा क्षत्रिय असल्याचा कुठलाही पुरातत्वीय उल्लेख नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
प
परश्या Fri, 08/21/2015 - 09:28 नवीन
असहमत... नाशिक शिलालेखात ’एक ब्राह्मणनस’(एक ब्राह्मण)(दुरूस्ती : मुळ शब्द ’एक बम्हण’ (एक ब्राह्मण) असा आहे.) ह्या शब्दाच्या आधी देखील एक शब्द आहे. ’खतिय दप मान मदण’ म्हणजे क्षत्रियांचा अहंकार चिरडणारा. आणि हा शिलालेख गौतमीपुत्राचा नसून त्याचा मुलगा ’वासिष्ठीपुत्र पुलुमावी’ ( अर्थात अनेक राण्यांपैकी एक वासिष्ठी या राणीचा पुत्र ) याच्या राजवटीतील आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रचेतस Fri, 08/21/2015 - 12:22 नवीन
मूळ प्राकृत शब्द एकबम्हणस असा आहे. एककुसस एकधनुधरस एकसूरस एकबम्हणस रामकेसवाजुनभीमसेनतुलपरकमस बाकी हा शिलालेख पुळुमावीने कोरुन घेतलेला असली तरी लेखाचा उद्देश हा पुळुवामीच्या आजीने (आणि गौतमीपुत्राच्या आईने) हे लेणे धर्मकार्यार्थ कोरवून घेतले हे नमूद करण्याचा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परश्या
स
स्वामी संकेतानंद Fri, 08/21/2015 - 08:48 नवीन
फ़ालतू धागा. पूर्ण वाचायच्या भानगडीत पडलो नाही. छत्रपती व्यवस्थित लिहीणे तरी शिकून घ्यावे किमान.
  • Log in or register to post comments
त
तुडतुडी Fri, 08/21/2015 - 09:55 नवीन
प्यारे१ बरं . नीलमोहर मलाही तो प्रश्न पडतो . भूछत्रासारख्या गल्लीबोळात उगवलेल्या संघटनांनी उच्छाद मांडलाय नुसता . आक्षेप घेणार्यांनी स्वतः कधीही आक्षेप घेतल्या जाणार्या गोष्टीचा इतिहास वाचलेला नसतो . वाहणार्या गंगेत हात धुवून घ्यायचा म्हणून गावगुंड काहीतरी धुडगूस घालत बसतात . आणि लई झालं आता . एकाच विषयावर किती धागे आलेत ओ . दुसरं कैतरी लिवा आता . इनोदी , भयकथा वगेरे
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Fri, 08/21/2015 - 11:17 नवीन
हे कादंबरीकार महाशय म्हणतात की "प्रसंगी मराठे आईला विकायला कमी करत नसत"
यावरून बाबासाहेब पुरंदरेंना शिव्या घालणार्यांनी या अभंगावर कधी टिप्पणी केलेली आठवत नाही . झविली महारे । त्याची व्याली असे पोरे ॥ करी संतांच मत्सर । कोपे उभारोनी कर ॥ बीज तैसे फळ । वरी आले अमंगळ ॥ तुका म्हणे ठावे । ऐसे झाले अनुभवे ॥
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Fri, 08/21/2015 - 16:48 नवीन
हा सारासार ब्रह्मणी कावा आहे. हा अभंग प्रक्षिप्त आहे. तुम्हाला कळत नाही का? बहुजन तुकोबा असे काही लिहिणे शक्यच नाही. तुकोबांना मारल्यावर त्यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी कोणीतरी हा अभंग त्यांच्या गाथेत घुसडला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
अ
अंतरा आनंद Wed, 08/26/2015 - 08:49 नवीन
मुख्य मुद्द्यावर जे रणकंदन चाललंय ते चालू द्या. पण
Love marriage ला फक्त एकाच मुद्दा्यावर समर्थन करतो की Love marriage मध्ये मी ठामपणे आधीच सांगु शकेन की ती माझ्या आईची काळजी घेईल
याबद्द्ल ... हा दिव्य मुलगा "तिच्या आईची काळजी घेईन" असं ठामपणे सांगणार का?
  • Log in or register to post comments
प
पैसा Wed, 08/26/2015 - 08:51 नवीन
:D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अंतरा आनंद
प
प्यारे१ Wed, 08/26/2015 - 09:15 नवीन
तिच्या आईवर अवलंबून असावं. -राजकुमार हेमामालिनी कमलाहासन पद्मिनी कोल्हापुरे चा कुठला रे तो चित्रपट??????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अंतरा आनंद
स
संजय पाटिल Wed, 08/26/2015 - 12:58 नवीन
पहेली का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
प
प्यारे१ Wed, 08/26/2015 - 13:07 नवीन
बहुतेक. आईवर मुलगा आणि मुलीवर बाप प्रेम करतात आणि लग्न करतात. गुत्ताडा सगळा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय पाटिल
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा