Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदर्‍यांचे अभिनंदन!

व
विकास
Wed, 08/19/2015 - 16:52
🗣 133 प्रतिसाद

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदर्‍यांचे अभिनंदन!

Purandare Maharashtra Bhushan आत्ताच राजभवनात, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदर्‍यांना अधिकृतपणे "महाराष्ट्र भूषण" ह्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने संमानीत केले. ज्यावेळेस महाराष्ट्रावर "डिसकव्हरी ऑफ इंडीया"कार नेहरू आणि तत्सम काँग्रेसी वैचारीक गुलामगिरीत जोखडले होते तेंव्हा गावोगाव अथक हिंडून शिवाजी बद्दल अधुनिक महाराष्ट्राला जाण करून दिली, प्रेम लावले आणि जनतेसमोर एक आदर्श उभा केला. त्यांच्या भाषणमालीका ऐकताना, केवळ शिवाजीबद्दलच नव्हे तर तमाम महाराष्ट्राबद्दल प्रेम तयार झाले. शिवाजी महाराजांचे सगळे पुतळे एकत्र करून जेव्हढे जमले नाही ते काम म्हणून नाही तर खरेच शिवाजीबद्दलचे प्रेम म्हणून त्यांनी आजन्म केले. शिवाजी महाराजांबद्दल वाटेल ते लिहीणारे अनेक होऊन गेले आहेत. नेहरूंच्या १९३४ च्या "Glimpses of world history" पुस्तकातला उल्लेख असाच नकारात्मक होता. (उदा.: When only a boy of nineteen he started on his predatory career) अजून एक उदाहरणादाखल: (आऊटलूकच्या) विनोद मेहतांनी इंडिपेंडन्स नावाचे वर्तमानपत्र मुंबईत चालू केले त्यात उगाच जाता येता - यशवंतराव आणि शिवाजीमहाराजांसंदर्भात वाटेल ते लिहीले... प. बंगालमधले देखील असे काही इतिहासकार होते ज्यांनी शिवाजीबद्दल काही अंंशी का होईना नकारात्मक कधीकाळी लिहीले होते. अगदी जेम्स लेन प्रकरण जेंव्हा प्रकाशात आले तेंव्हा म्हणजे २००४ च्या सुमारास आउटलूक इंडीया मधे प्रकाशीत झालेल्या शिवाजी आणि सद्य राजकारणा संदर्भातील लेखाचे शिर्षक देखील बरेच काही सांगून जाते... अशा या "बुद्धीवादी" काळात तसेच त्या आधी देखील महाराष्ट्रात अनेक चांगले (शिवाजी संदर्भात) इतिहासकार झाले पण जनसामान्यांपर्यंत जसे शास्त्रज्ञ पोचू शकत नाहीत तसेच इतिहासाचे मुलभूत संशोधन करणारे पोचू शकत नाहीत. तो त्यांचा दोष नसतो. त्यांचा स्वभाव असतो आणि म्हणूनच ते इतिहास संशोधन करू शकतात. रा.स्व. संघ जे सहा उत्सव संघटना म्हणून साजरे करते त्यातील एक उत्सव हा "शिवराज्याभिषेक दिना"चा आहे. कारण काय तर, तत्कालीन पद्धती झुगारत शिवाजीने भोसला एम्पायर म्हणून राज्य तयार न करता, हिंदवी स्वराज्य म्हणून राज्य तयार केले आणि तमाम जनतेस एकत्र आणले. या मुळे किमान संघाच्या संपर्कात आलेली अमराठी जनतेस देखील शिवाजीबद्दल आत्मियता तयार झाली. अर्थात हे अजून एक कारण आहे ज्यामुळे स्युडोसेक्यूलर्स, रिअललेफ्टीस्ट्स आणि तथाकथीत बुद्धीवाद्यांना शिवाजीला वेगळे करायचे आहे अथवा शिवाजीचे महत्वच कमी करायचे आहे. मात्र, इतिहासकार नसलेल्यांमधे दोन अशी व्यक्तीमत्वे होती ज्यातील एका व्यक्तीने शिवाजी जनमानसात पोचवला. तर त्यातील दुसरी व्यक्ती दुर्दैवाने त्या विषयावर ज्याला "समग्र" म्हणता येईल असे लेखन करण्याआधीच निवर्तली - ते म्हणजे नरहर कुरंदकर. त्यांचे पुस्तक वाचले नसले तर अवश्य वाचा. आणि दुसरे म्हणजे बाबासाहेब पुरंदरे. या दोघांनी शिवाजीला एक राज्यकर्ता म्हणून पाहीले. त्यातील चमत्कार बाजूला ठेवले. त्यांचे कर्तुत्व, त्यांच्या योद्धा आणि शासक म्हणून प्रतिक्रीया पहाताना त्या काळाचा संदर्भ घेऊन बघितल्या. अर्थात कुरंदकरांचे लेखन हे प्राद्यापकी असल्याने ते आवडू शकेल असा वर्ग मर्यादीतच राहीला असता. ती मर्यादा बाबासाहेबांना नव्हती. कारण त्यांनी त्यांच्याच शब्दात (स्वतःस इतिहासकार/इतिहाससंशोधक असे न संबोधिता) शाहीरी केली. शाहीराला कालानुरूप शब्दरचना आणि अलंकार त्यांनी वापरले, इतकेच. जर पुरंदर्‍यांसारख्या शाहीराऐवजी असे नकारात्मक अथवा वर्गिकरण करणारे शाहीर त्यावेळेस तयार झाले असते तर महाराष्ट्राचे काय झाले असते कोण जाणे. आज मिळालेला महाराष्ट्र भूषण पुरस्कार हे त्यांच्या या कार्यासंदर्भात दाखवलेली कृतज्ञता आहे.
वर्गीकरण
इतिहास

प्रतिक्रिया द्या
41319 वाचन

💬 प्रतिसाद (133)
व
विकास गुरुवार, 08/20/2015 - 18:50 नवीन
मिपाभूषण बॅटमन साहेबांचा विजय असो !! कृपया या संदर्भातले आपले विचार "मिपा भूषण पुरस्कार वाद" या धाघ्यात मांडावेत. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
न
नाखु Tue, 08/25/2015 - 06:34 नवीन
या उप प्रतीसादाला आणि बॅट्याला +१११११ सटीप निरक्षीर माहीती बद्दल. मूळ अवांतर : मिपाभूषण बॅटमन आहे का ते माहीत नाही कारण तो वाद-विवाद करतो "वादाचा" उगमविषय नाहीय. "मिपाभिषण पुरस्कारासाठी समीती नेमीत आहे इच्चुकांनी संपर्क करणे.
बिग्रेडीमार्फाट्यावर्बमोतिर्स्कारक्प्रती-दया-कीववजाघृणा,समयोचीत्फट़्केअंमल्बजावणी संघ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
ख
खटपट्या गुरुवार, 08/20/2015 - 18:48 नवीन
श्री बॅटमन यांचे वरील सर्व प्रतिसाद जतन करुन ठेवण्यासारखे आहेत. प्यारे यांनी सुचवलेल्या प्रमाणे बॅटमन यांनी वेगळा धागा काढावाच. शिवचरीत्रात रस असणार्‍यांना ती एक पर्वणीच असेल.
  • Log in or register to post comments
श
शब्दबम्बाळ गुरुवार, 08/20/2015 - 18:53 नवीन
पण जेम्स लेन सारख्या नकारात्मक गोष्टी या लेखात लिहिल्या नसत्या तरी चालले असते असे वाटले... इतिहास हा कितीही प्रयत्न केला तरीही थोडाफार व्यक्तीसापेक्ष राहतोच असे माझे मत आहे. मिळालेले दस्तावेज कोणत्या प्रकारे तपासले जातात आणि त्यातून कोणते अर्थ निघतात हे बर्याचदा इतिहासकाराच्या दृष्टिकोनावरही अवलंबून असते. त्यामुळे इतिहास काळानुरूप व मिळत जाणार्या पुराव्यांनुसार बदलूही शकतो पण आपण या सगळ्या गोष्टींना खुल्या दृष्टीकोनातून कधी पाहणार आहोत काय माहित! ग्रांट डफने लिहिलेल्या इतिहासातल्या चुका दाखवून देताना आपल्या लोकांनी इतिहासाचा खूप अभ्यास केला आणि या सगळ्या घडामोडींमुळे आपल्याला आज माहित असलेला इतिहास तयार होत गेला त्यामुळे खर तर त्याचेही आभार मानले पाहिजेत. थोडक्यात काय, वाईटातूनही चांगले निर्माण होऊ शकते! या निमित्ताने, आयुष्यभर झटलेल्या सर्व इतिहासकारांना शतशः नमन!
  • Log in or register to post comments
न
नंदन गुरुवार, 08/20/2015 - 20:40 नवीन
विकास आणि बॅटमॅन यांच्यातली चर्चा अतिशय आवडली. प्रत्युत्तर म्हणून टोकाची भूमिका न घेता, विषयाचे आणि संदर्भांचे व्यापक परिप्रेक्ष्य ('बिग पिक्चर') लक्षात घेऊन केलेल्या चर्चेचे उत्तम उदाहरण.
  • Log in or register to post comments
आ
आस्तिक शिरोमणि गुरुवार, 08/20/2015 - 22:17 नवीन
त्रिवार प्रणाम या महान माणसाला..
  • Log in or register to post comments
श
श्रीनिवास टिळक Fri, 08/21/2015 - 03:12 नवीन
एका मित्राकडून मला नुकताच खालील संदेश आला: झी २४ तासचे संपादक डॉ. उदय निरगुडकर यांनी सांगितलेला हा किस्सा. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची मुलाखत घेण्यासाठी त्या दोघांची भेट झाली. तुमच्या आडनावाचा महिमा तुम्हाला माहित आहे का? असं निरगुडकरांना बाबासाहेबांनी विचारलं आणि सांगायला सुरुवात केली. "शिवनेरीवर जिजाऊ आईसाहेबांना प्रसवकळा सुरु झाल्या. आसपासच्या गावांत वैद्यांना बोलावणं गेलं. वैद्य गंगाधरशास्त्री आले आणि त्यांनी बाहेरच्या दालनातून दिलेल्या वैद्यकीय सूचनांनुसार उपस्थित दायांनी आत प्रसव क्रिया पार पाडली. शिवबांचा जन्म झाला आणि "मुलगा झाला" हे गंगाधरशास्त्री यांना दायांनी बाहेर येऊन सांगितलं. मग शिवबांच्या जन्माची पहिली जाहीर घोषणा शास्त्रीबुवांनी सदरेवर जाऊन केली. झी २४ च्या दालनात उपस्थित असलेल्या सर्वांकडे बघून बाबासाहेब पुढे म्हणाले “त्या गंगाधरशास्त्री वैद्यांचं आडनाव होतं निरगुडकर आणि आज आत्ता इथे माझ्यासमोर जे डॉ. उदय निरगुडकर बसलेले आहेत ते वैद्य गंगाधर शास्त्री निरगुडकरांचे १४ वे थेट वंशज आहेत!"
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Fri, 08/21/2015 - 03:20 नवीन
कसलं भारी वाटलं असेल त्यांना हे ऐकुन. :) असे इतिहास शास्त्रोक्त पद्धतीने कसा खणतात ह्याबद्दल नेहेमी उत्सुकता वाटत असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीनिवास टिळक
प
पिलीयन रायडर Fri, 08/21/2015 - 05:01 नवीन
सगळ्यांनी अभिनंदन अभिनंदन लिहीलं असेल किंवा कुणीतरी तरी नक्कीच काहीतरी निगेटिव्ह लिहुन अकलेचे तारे तोडले असतील असं वाटुन हा धागा पाहिलाच नाही. पण इथे तर अन्पेक्षितरित्या फारच सुंदर चर्चा झाली आहे, विशेष्तः बॅट्याचे प्रतिसाद! वेगळा धागा करता आला तर बरं होइल..
  • Log in or register to post comments
क
कोमल Fri, 08/21/2015 - 07:05 नवीन
अगदी यासाठीच मी पण धागा पाहिला नव्ह्ता. वाचनिय प्रतिसाद. प्रत्यक्ष बाबासाहेबांना भेटले आहे. मीना प्रभू यांचा प्रवासनामा हा कार्यक्रम होता आणि बाबासाहेब प्रमुख पाहुणे होते. रात्री ९.१५ - ९.३० ला कार्यक्रम चालू झाला तरी बाबासाहेब सकाळ असल्या प्रमाणे प्रसन्न होते आणि भरभरुन बोलले. अगदी अनौपचारीक कार्यक्रम होता, गप्पा-आठवणी. बाबासाहेबांच्या तोंडून लंडन आणि न्युयॉर्कची वर्णने ऐकली. त्यांमधुनही शिवचरित्राने भारावलेले बाबासाहेब प्रकट होत होते. लंडन ला अल्बर्ट म्युझियम मध्ये बाबासाहेब गेले असता त्यांनी भवानी तलवार पाहण्याबद्दल विचारणा केली. कडक पहार्‍यातून त्यांना तलवारीच्या दालनात नेले. सोबत म्युझियम मधील एक माहितगार होती. तिने बाबासाहेबांना सांगितलं, 'या तलवारीला २४ तास कडक पहारा असतो, आजुबाजुला सुरक्षारक्षक असतात. अद्यावत सुरक्षा व्यवस्था पण आहे. कोणीही हि तलवार इथुन हलवू शकत नाही' (आपल्या राजांची तलवार त्यांच्या राणीच्या रॉयल कलेक्शन मध्ये अगदी सुखरूप आहे) एवढं ऐकुन बाबासाहेबांनी त्या मुलीला विचारलं, 'मी इथे थोडावेळ बसू शकतो का?' तिचा होकार आला. बाबासाहेबांनी तलवारी समोर खाली बसुन बराचं वेळ चिंतन केलं. तोवर ती मुलगी पण तिथेच उभी होती. उठतांना बाबासाहेबांनी तलवारीला वाकून दंडवत घातला आणि मग मात्र ती मुलगी न राहावून बोलली, 'तुम्ही हे सगळं इतक्या मनःपुर्वक का करत आहात?' बाबासाहेबांचं उत्तर असं काहिसं होतं, "या तलवारीशी आणि त्या राजाशी आमच भक्तिचं नात आहे" ज्या ताकदीने बाबासाहेबांनी आम्हाला तो प्रसंग सांगितला तेवढ्या नीट इथे नाही सांगता आला. पण खुप खुप गप्पा मारलेल्या त्या दिवशी. शरीर थकलेल जाणवतं बाबासाहेबांचं पण एकदा बोलायला सुरवात केली की आपल्याला वेगवेगळ्या गडांवरून, बुरुजांवरून, माचींवरून मस्त फिरवून आणतात. २०-२२ वर्षांपूर्वी अभ्याच्या गावी एका भाषणाला बाबासाहेब गेले होते तेव्हा अभ्याने त्यांना एक चित्र काढून दिलेले. (याचे डीटेल्स तोच देईल) पण मी तो संदर्भ सांगितला तर ते पण त्यांच्या लक्षात होते. अश्या ग्रेट माणसाला माझा दंडवत __/\__
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
प
प्यारे१ Fri, 08/21/2015 - 16:26 नवीन
>>>२०-२२ वर्षांपूर्वी अभ्याच्या गावी एका भाषणाला बाबासाहेब गेले होते तेव्हा अभ्याने त्यांना एक चित्र काढून दिलेले. अब्बा रुखसाना को भी पता चल गया????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोमल
ब
बॅटमॅन Fri, 08/21/2015 - 20:57 नवीन
खी खी खी =)) असो, अंग्रेजचे अवांतर सुरू झाले तर अवघड व्हायचं. (पच्चीस सालसे चारमिनारपे बैठणार्‍याचा फॅन) बॅटमॅन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
ग
गुलाम Mon, 08/24/2015 - 22:53 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
फ
फुलथ्रॉटल जिनियस Fri, 08/21/2015 - 06:59 नवीन
जे डॉ. उदय निरगुडकर बसलेले आहेत ते वैद्य गंगाधर शास्त्री निरगुडकरांचे १४ वे थेट वंशज आहेत!">>>>>>>>>.>>> यावर लै हसलो,असेच विनोद टाका जावा,बहुतांश लोकांनाच आपला खापरपणजोबा काय करत होता हे ठाऊक नसते,इथे मात्र पुरंदरेंना कोन कोनाचा वंशज आणि कीतवा हे ठाउक आहे म्हणे.....
  • Log in or register to post comments
क
कहर Fri, 08/21/2015 - 07:53 नवीन
संशोधन यालाच म्हणतात. खापर पंजोबंपर्यंत पोचायची आपली कुवत नाही मग इतिहास काय कपाळ कळणार आपल्याला. त्यांना इतिहासाचा ध्यास आहे… आपल्याला फक्त त्याचा वरवरचा वास आहे …
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फुलथ्रॉटल जिनियस
श
श्रीगुरुजी Fri, 08/21/2015 - 11:20 नवीन
>>> यावर लै हसलो,असेच विनोद टाका जावा,बहुतांश लोकांनाच आपला खापरपणजोबा काय करत होता हे ठाऊक नसते,इथे मात्र पुरंदरेंना कोन कोनाचा वंशज आणि कीतवा हे ठाउक आहे म्हणे..... का माहित नसावं? इथल्या सर्वांना तुमच्या गेल्या ७-८ पिढ्या माहिती आहेत की. तुमचा कुलवृत्तांत खालीलप्रमाणे - मूळपुरूष - ग्रेटथिन्कर दुसरी पिढी - टॉपगिअर्ड फिलोसोफर तिसरी पिढी - सचीन चौथी पिढी - नानासाहेब नेफळे आणि माईसाहेब कुरसुंदिकर पाचवी पिढी - ग्रेटथिंकर सहावी पिढी - मंदार कुमठेकर सांप्रतची सातवी पिढी - फुलथ्रॉटल जिनियस यातला चौथ्या पिढीतला माईसाहेब कुरसुंदीकर अजून जिवंत आहे (नानासाहेब नेफळे आणि माईसाहेब कुरसुंदीकर हे एकाच वेळी असित्वात होते. साधारणपणे २ इन १ किंवा मिक्स्ड सिंगल्स अशा तर्‍हेची ती रचना होती). बाकी सर्वजण केव्हाच आणि अकाली अल्लाला प्यारे झाले. सारांश - एखाद्या व्यक्तीच्या मागील अनेक पिढ्यांचा इतिहास माहिती असू शकतो. त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीही नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फुलथ्रॉटल जिनियस
प
प्यारे१ Fri, 08/21/2015 - 11:29 नवीन
खुलासा: अल्लाला प्यारे होणे काही संबंध नाही. गुरुजींना प्रश्न : दादादरेकर, जामोप्या यांचं वरील घराण्याशी काही नातं नाही का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
प
प्यारे१ Fri, 08/21/2015 - 11:31 नवीन
अल्लाला 'प्यारे' होणे आणि आमचा काही संबंध नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
श
श्रीगुरुजी Fri, 08/21/2015 - 11:35 नवीन
थोर इतिहासतज्ज्ञ श्रीमंत कोकाटे आणि महान इतिहासतज्ज्ञ पुरूषोत्तम खेडेकर यांच्यात जे नातं आहे किंवा कसाब आणि अफझल गुरू यांच्यात जे नातं होतं किंवा हिटलर आणि स्टॅलीन यांच्याच जे नातं होतं, तेच नातं या दोन घराण्यात आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
क
कहर Fri, 08/21/2015 - 12:25 नवीन
तुम्ही ".हितेश " ला विसरला का ? (बहुतेक माईंच्या पुढची पिढी किंवा समकालीन) पप्पू प्रेमापायी त्याने मोडी उदयानंतर काही दिवसातच जीव दिल्याचे ऐकिवात आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
क
कहर Fri, 08/21/2015 - 12:26 नवीन
* मोदी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कहर
व
विनोद१८ Fri, 08/21/2015 - 12:28 नवीन
....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कहर
फ
फुलथ्रॉटल जिनियस Fri, 08/21/2015 - 07:06 नवीन
जे डॉ. उदय निरगुडकर बसलेले आहेत ते वैद्य गंगाधर शास्त्री निरगुडकरांचे १४ वे थेट वंशज आहेत!">>>>>>>>>.>>> यावर लै हसलो,असेच विनोद टाका जावा,बहुतांश लोकांनाच आपला खापरपणजोबा काय करत होता हे ठाऊक नसते,इथे मात्र पुरंदरेंना कोन कोनाचा वंशज आणि कीतवा हे ठाउक आहे म्हणे.....
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव Fri, 08/21/2015 - 07:52 नवीन
थे मात्र पुरंदरेंना कोन कोनाचा वंशज आणि कीतवा हे ठाउक आहे म्हणे.....
त्याबद्दल कुतुहल वगैरे वाटणं अशी फालतु लक्षणं आमच्या ब्रीगेडी संस्कृतीत बसत नाहि. पण तुम्हाला हसु का आलं ? एव्हाना बाबासाहेबांना वाद-विवादाचं आव्हान देऊन ते कसे चर्चेला घाबरले वगैरे बातम्या यायला हव्या होत्या अव्हाड आणि मंडळाकडुन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फुलथ्रॉटल जिनियस
स
सुबोध खरे Fri, 08/21/2015 - 09:34 नवीन
जीनियस साहेब इतिहासाचार्य ग ह खरे यांनी संशोधन करून खरे कुलवृत्तांत लिहिला आहे त्यात आमच्या कुळाचे १२५० पासूनचे पूर्ण संदर्भ आहेत.पूर्ण वंश विस्तार काय आणी कसा आहे याचे २००० पानी सविस्तर वर्णन त्यात आहे.आणी हा छापील स्वरुपात उपलब्ध आहे. मला माझ्या आठ पिढ्यांची नावे माहित आहेत. तेंव्हा बाबासाहेब पुरंदरे यांच्या सारख्या दिग्गज माणसाने स्वतःच्या अभ्यासातून किंवा जर अशाच निरगुडकर वृत्तांतातून माहिती काढली असेल तर ते सहज शक्य आहे. किमान पक्षी तुम्ही ठरवता तशी "हास्यास्पद" नक्कीच नाही. जाता जाता -- आपल्या इतिहासाची माहिती कशाला असावी?याचा एक पैलू पाकिस्तानने इस्लामच्या उदयाच्या अगोदरच आपला इतिहास नाकारला असल्याने त्यांच्याकडे समृद्ध अशी परंपरा नाही. त्यामुळे त्यांच्या कडे क्षेपणास्त्राना सुद्धा घोरी, अब्दाली अशी अफगाण योद्ध्यांची आहेत. त्यांच्याकडे योद्धे नाहीतच? ( भारत द्वेष हा एकच धागा त्या देशाला अखंड ठेवत आहे).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फुलथ्रॉटल जिनियस
ख
खटपट्या Fri, 08/21/2015 - 12:42 नवीन
माझ्या गावातील माझ्या आडनावाचे जे लोक आहेत त्यांची संपूर्ण माहीती चार्टच्या स्वरुपात उपलब्ध आहे. बर्‍याच लोकांची वंशावळ नाशीक येथे उपलब्ध आहे असे ऐकीवात आहे. अवांतर - मधे ऐकले होते की ईंदीरा गांधी यांची वंशावळ काशी येथे आहे. अक्चुअली असेल तर ती तीथून नष्ट करण्याचा प्रयत्न होईल. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
त
तुडतुडी Fri, 08/21/2015 - 09:47 नवीन
तुम्हाला कोणी विचारलं होतं का तुम्हला कोणती पुस्तकं आवडतात आणि कोणती बोर होतात ? स्वतःच सांगायचं आणि मग प्रतिसाद आल्यावर पुन्हा चिडायचं . हे काही बरोबर नै
  • Log in or register to post comments
स
सिरुसेरि Sat, 08/22/2015 - 15:27 नवीन
देशाला सर्वांगीण सामाजिक विकास साधण्याची अत्यावश्यक गरज आहे . हा सर्वांगीण सामाजिक विकास साधला तरच प्रत्येक मनूष्य हा राजकीय , वैयक्तिक महत्वाकांक्षेपेक्षा सामाजिक हित ओळखून त्याप्रमाणे आचरण करेल .
  • Log in or register to post comments
ह
हेमंत लाटकर Tue, 08/25/2015 - 10:24 नवीन
हे सर्व मेसेजेस वाचून छान माहिती मिळून ज्ञानात भर पडली. सध्या मिपावर आल्यापासून facebook, whatsapp पाहणे बंदच झाले आणि मिपाचा फॅन झालो.
  • Log in or register to post comments
श
शेखरमोघे गुरुवार, 08/27/2015 - 21:20 नवीन
शिवचरित्राबद्दल लोकान्चे औत्सुक्य आणि आकर्षण वाढवणे आणि त्याना शिवकालात घेऊन जाता जाता जास्त जास्त गुन्गवणे,गुन्तवणे आणि एकाच वेळी विनम्र (स्वदेशाच्या कल्पनेपुढे) आणि उन्नत (येन केन प्रकारेण शत्रूवर विजय मिळवल्याने) करणे अशा अनेक प्रकारे बाबासाहेबान्च्या लिखाणाचे वर्णन करता येईल. त्याना मिळालेली लोकमान्यता आणि राजमान्यता यथायोग्यच! साधारण असाच परिणाम माझ्यावर नाथ माधव (द्वारकानाथ माधव पितळे) यानी लिहिलेल्या स्वराज्याचा श्रीगणेशा, स्वराज्याचा कारभार, स्वराज्याची स्थापना, स्वराज्यावर सन्कट या व इतर यासारख्या पुस्तकान्च्या वाचनानन्तर झाला होता. ही पुस्तके मी १९५० च्या दशकात वाचली.
  • Log in or register to post comments
न
नाखु Fri, 08/28/2015 - 05:29 नवीन
पांडुरंग बलकवडे प्रतिपादन पुराव्यानिशी आता तर इतर धाग्यावर काढलेल्या गरळवाल्यांना काही उमज पडेल अशी आशा करू या! जय शिवराय जय महाराष्ट्र जय मिपाकर
  • Log in or register to post comments
प
पैसा Fri, 08/28/2015 - 06:36 नवीन
ते त्यांना सुद्धा माहित आहे. पण "घटं भिंद्यात् पटं छिन्द्यात् कुर्यात रासभरोहणम्" वाल्यांना त्याचं काय पडलंय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
प
प्रसादजोशी Fri, 08/28/2015 - 10:37 नवीन
बाबासाहेबांचे खूप खूप अभिनंदन !!!!
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा