शिवजयंती हायजँक ????
महाराष्ट्र-भूषण पुरस्कारावरून आजूबाजूला एवढा गदारोळ उठलेला होता, त्यामुळे मी ठरवलं होत की एक मिपाकर म्हणून आपण त्या वादात पडायचं नाही, तर शिवरायांना सामान्य जनतेपर्यन्त कोणी पोहोचवण्याची सुरुवात केली व का ?, हा इतिहास तपासून जरा थोडफार माझ्यापरीने पडताळूया, मला अशी माहिती मिळाली की, शिवरायांची महती ओळखणारे पहिले व्यक्तिमत्त्व म्हणजे महात्मा जोतिबा फुले होते. यासाठी १८६९ साली शिवाजी महाराजांची समाधी फुलेंनी समाधी प्रथम शोधली. (जी समाधी पडकी काट्याकुट्यात गडप होती.) यानंतर 27 रुपये वर्गणी गोळ करून समाधीस्थळाची देखभाल केली. म्हणजे शिवाजी राजे गेल्यानंतर २०० वर्षांच्या काळात कोणालाही आठवण नसावी. अफाट कर्तृत्वाच्या समाजरक्षकाची, स्वराज्य उभे करणाऱ्याची याद नसावी, याचे आश्चर्य वाटते. त्यावेळीसुद्धा मूळनिवासी शेतकर्यांच्या जीवनाचे तीन तेरा वाजले होते, म्हणूनच ज्या राजाच्या काळात सुरक्षा, सहकार्य मिळाले होते (कर गोळा करताना शेतकऱयांच्या भाजीच्या देठालाही हात लावू दिला नाही), शेतकऱयांच्या जमिनीची मोजदाद करून नावे करून दिली, शेतकऱ्याच्या भल्यासाठी प्रयत्न केले. शेती, शेतकरी, त्यांचा बैलबारदाना, वृक्षतोड याविषयी जागरूकतेने प्रयत्न केले, शोषणव्यवस्थेचा बंदोबस्त करण्यासाठी त्यांनी वतनदारी, मिरासदारी संपवली (सैन्यदलाला पगार देणारा असा राजा). त्याची महती जनतेपर्यंत यावी म्हणूनच महात्मा फुल्यांनी प्रयत्न केले. महाराजाच्या गुणांमुळे ज्योतीराव फुले यांनी शिवाजी महाराजांचा उल्लेख 'शेतकऱ्यांचा राजा' 'कुळवाडीभूषण' असा केला व महाराजांवर, जगातील पहिले मराठी चरिञ -एक हजार ओव्यांचा कुळवाडीभूषण हा पोवाडा रचला. त्यांच्यातल्या महाराजांवरील प्रेम, श्रद्धा, भक्ती पोटी महाराष्ट्राच्या राजाबद्दलची अस्मिता म्हणूनच १९ फेब्रुवारी १८६९ साली पहिली शिवजयंती पुणे येथे सुरू केली ती १८९० च्या आसपास निधन होईपर्यंत चालू होती. शिवरायांच्या प्रेरणेने महात्मा फुल्यांनी समाजकार्य सुरू केले होते. ते अस्पृश्यतेच्या रूढीवर प्रहार करू लागले होते. त्यांनी मुलांमुलींसाठी शाळा सुरू केल्या. प्रबोधनाच्या माध्यमातून समाजजागृती सुरू केली. पण सांगा बरे, आज तुम्हाला प्रश्न विचारला कोणी "शिवजयंती कोणी सुरु केली ?", तर चटकन त्याचे उत्तर काय बरे येते तुमच्या डोळ्यापुढे ?
आजकाल शिवरायांच्या बद्दल आपण परस्परांत संवाद साधताना, 'शिवराय व शेतकरी/शेती' या आस्पेक्टचे मूलगामी महत्व दुर्दैवाने तुलनेने फार कमी लक्षात घेतले जाते, व जो कोणी या अंगाने मांडणी करतो, त्याचाही गंभीरपणे विचार करत नाही कोणी, असे वाटते. एकूणच सर्वच राजकीय शक्तींनी शिवाजी महाराजांना ऐक सेलेबल विषय करून, आपापसात वाटून घेतल्या सारखे दिसते, त्यामुळे महाराजांचे एकूणच सादरीकरण समाजामधे, 'तुळजाभवानीच्या कृपेने' वैगरे सारख्या दैववादी दिशेने जात आहे, असे वाटते.
माझ्या वैयक्तिक मते आजपासून ६०-७० वर्षांनी, "शिवजयंती कोणी सुरु केली ?" या प्रश्नाचे उत्तर 'बाबासाहेब पुरंदरे' असे मिळाले तर त्यावेळी काहीही वावगे वाटणार नाही कदाचित…
💬 प्रतिसाद
(175)
प
प्यारे१
Sat, 08/22/2015 - 17:59
नवीन
तुम्ही बरोबर आहात.
पैसा काकू हो म्हणा ओ. नवीन लेखकांना प्रोत्साहन द्या की जरा.
- Log in or register to post comments
प
पैसा
Sat, 08/22/2015 - 18:05
नवीन
लाटकर साहेब बरोबर. पण कृपया आणखी ब्लॉग्जच्या लिंक्स देऊ नका!
- Log in or register to post comments
G
gogglya
Wed, 08/26/2015 - 10:57
नवीन
लिंक आवर !
- Log in or register to post comments
न
नाव आडनाव
Sat, 08/22/2015 - 17:03
नवीन
त्या तुम्हाला काका म्हणत आहेत, तुम्ही त्यांना दादा म्हणताय, त्या आहेत ताई, आणि दादा तर अजून भलतेच (लई फ्यॅमस माणूस). लई कंफुजन झालंय बघा :) (लई दिस झालं दादा काय दिसंनात? :) उडाले का काय भुर्रर्र )
- Log in or register to post comments
अ
अस्वस्थामा
Mon, 08/24/2015 - 01:00
नवीन
ओ काका.. चूक दाखवली म्हणून इतकं व्यक्तिगत व्हायची कै गरज ?
मी काय पण आयडी घेईन (बादवे ते अस्वस्थ आत्मा = अस्वस्थात्मा असे अपेक्षित होते. सुरुवातीच्या दिवसात एका संस्थळावर चुकून असे लिहिले गेले म्हणून तसेच वापरतोय. पण असो), हिटलर घेईन नै तर सावरकर घेईन नै तर भीमराव नै तर अजून काही.! तुमाला काय करायचंय?
घ्या तुमचा १३व्या महिन्याचा पगार राव आणि डोकं खाऊ नका..
एक चुकलेलं गणित दुरुस्त करुन दिलं तर हा आयडी "बदले की आग" मध्ये इथे पेटतोय उगी. कैच्या कै.
पहिली गोष्ट म्हणजे जरी अश्वत्थाम्याच्या नावावरुन प्रेरित असलं तरी ते नाव मी घेतलेलं नाही (आणि तसंही ते अस्वथामा नाहीय!)
मी ब्राह्मण (की ब्राम्हण ते तुम्ही इतर ब्रह्मवृंदास विचारुन ठरवा) असेन नसेन पण त्याचा इथे काहीही संबंध नाही. तुम्ही त्याच्यावरुन मला जज करण्याचादेखील शष्प संबंध नाही. या धाग्यावर देखील या प्रतिसादाचा काही संबंध नाही.!
इथे जात काढायचा काय संबंध.. ??
असल्या पोकळ अभिमानी लोकांनी तर सगळं वातावरण दुषित करुन ठेवलंय सगळं.. :\
निषेध करायला अनेक दुराचारी, भ्रष्टाचारी सर्व जाती-जमाती,धर्मातले पुरेसे लोक आजूबाजूला आहेत. त्यांचा करा. त्यांच्या तोंडावर करा. व्यासांनी निर्मिलेल्या अथवा हजारो वर्षांपूर्वीच्या इतिहासातल्या (तुम्हाला काय हवे ते घ्या) एका पात्राबद्दल निषेध करुन काय होणारेय.
एक तुमची चूक सांगणारा प्रतिसाद काय दिला तर तुम्ही पार इतर धाग्यांवर येऊ येऊ माझ्या आयडीबद्दल आणि त्याच्यावरुन माझ्याबद्दल लिहू पाहताय !! खरंच धन्य आहे तुमची.
[हा माझा तुम्हाला पहिला आणि शेवटचा व्यक्तिगत पिंकेवरचा साध्या शब्दातला प्रतिसाद राहील, यापुढे धाग्यासंदर्भातच मुद्दे मांडावेत, प्रतिवाद करावेत, जमत नसेल तर वाचन करावे. मनाजोगते प्रतिसाद नै आले तर उगी माझ्याच नव्हे कोणाच्याच बाबतीत व्यक्तिगत होऊ नये. आपले बाहेरच्या जगातले अहं इथे आणू नयेत. व्यक्तिगत उतरलात तर आधी इग्नोर मारण्यात येईल आणि नंतर (जौ दे, इग्नोरच मारेन!) याची नोंद घ्यावी.]
- Log in or register to post comments
ह
हेमंत लाटकर
Mon, 08/24/2015 - 04:57
नवीन
मी हे तुम्ही माझ्या धाग्यात चुक दाखवली म्हणून लिहले नाही तर तुम्ही टिकोजीराव म्हणाले म्हणून विनोदात लिहले. आयडी घेणे हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे. पण आयडी घेताना चांगले असले तर बरे वाटते. टिळक, सावरकर, भीमराव हे चांगले वाटते जर हिटलर, दुर्याधन, हे घेतले तर वाईट वाटते. तुम्ही जो आयडी घेतला आहे ताे अस्वस्थामा (अस्वस्थ+आत्मा) हे इतके डीप मघ्ये बघेल सहज बघेल. अस्वस्थामा, अस्वथामा, अस्वत्थामा ही तीनही नावे द्रोणाचार्य पुत्र अस्वत्थामाचीच माहिती गुगल वर दाखवतात.
दोणाचार्याचा (ब्राम्हण गुरूचा) पुत्र असूनही हे कृत्य केले . या वाक्याचा अर्थ मी जात काढण्यासाठी केला नाही तर एका ब्राम्हण गुरूचा मुलगा असूनही असे हीन काम केले म्हणून लिहले बाकी नाही. बी पाॅझिटिव्ह.
- Log in or register to post comments
श
शलभ
Mon, 08/24/2015 - 10:04
नवीन
हा हा हा..;)
- Log in or register to post comments
अ
अस्वस्थामा
Mon, 08/24/2015 - 11:00
नवीन
हेच ते बदले की आग..!! आणि ते तिथेच लिहायचेत या दुसर्या धाग्यावर अवांतर कशाला ? तसाही तो विनोद असेल तर तुमच्या विनोदबुद्धीस _/\_.
हे तुमच्या लक्षात आल्याबद्दल धन्यवाद.
मला वाटतं हा ज्याच्या त्याच्या बघण्याचा दृष्टीकोन आहे. मी अमुक आयडी घेतला म्हणून अमुक होतो असे नव्हे. उद्या तुम्ही "जोकर" आयडी घेतलात म्हणून तुमच्या विनोदास लोक हसतील असेही नव्हे. तेव्हा "डोळे उघडा, बघा नीट".
प्रथमतः माझे आयडी नाम गुगलून पाहिल्याबद्दल धन्यवाद. मी पण ते कधी केले नव्हते. ;)
खुसपट काढायला का होईना पण तुम्ही ते केल्याबद्दल आभारच मानले पाहिजेत. पण त्याचबरोबर जे गुगल सांगतो ते "बाबा वाक्यं प्रमाणं" नसतंय हो.. लई कचरा असतोय. जरा लॉजिक लावावं लागतंय काय चूक काय बरोबर ते शोधायला. तस्मात तुम्हाला आढळलेले उल्लेख बरोबर आहेत असे म्हणवत नाही.
बाकी तुम्हाला इतरांनी सांगितलेच आहे आणि सूज्ञास अधिक सांगणे न लगे. :)
"ब्राम्हण गुरूचा मुलगा असूनही" इथे तुमचा छुपा जातीयवाद दिसत नाही काय ? दुसर्या कुठल्या जातीचा असता तर चालले असते काय तुम्हाला ? की "ब्राह्मण श्रेष्ठ " म्हणून त्याने जे केले ते तुम्हाला खटकतेय ? मग आईचे मुंडके उडवणार्या परशुरामाबद्दल तुमची मते जहालच असतील. नै का ? (इथे अवांतर नको! जस्ट उदा. आहे)
कुणीही चुकीचे काम केले तर (किंवा तुम्हाला असे वाटत असेल तर) त्याचा निषेध करायला हवा, फक्त ब्राह्मण आहे म्हणून नव्हे.
तुमचा जातीयवाद स्पष्ट दिसतोय आणि त्याचा निषेध केला गेला पाहिजे असे वाटते..
तो आमचा रक्तगटच आहे तेव्हा चिंता नसावी.
परंतु एक सांगावेसे वाटते.
कोणतेही किंतु न बाळगत वावरा ना तुम्ही. जालावर बाहेरचे तुमचे मान-अपमान, जाती, धर्म बाहेरच ठेवून या. ही चांगली संधी आहे, एक वेगळा "अवतार" म्हणून सगळ्याच गोष्टींकडे पहायची. वेगळे दृष्टीकोन आजमवायची. इथे एखाद्या तज्ञापासून ते शेंबड्या पोरांपर्यंत सगळेच आहेत. आणि कोणीही कोणाला कशाही बद्दल बेधडक विचारु शकतो, वाद घालू शकतो. एरवी लोक तोंडावर जे स्पष्ट बोलणार नाहीत ते इथे बोलतायत तर त्याबद्दल या सुविधेचे आभारच मानले पाहिजेत की त्याचा राग मनात घेऊन या संस्थळाचे संस्थळावर, या धाग्याचे त्या धाग्यावर उट्टे काढायचे? हे कशाला ?
असो, तुम्हीच "मोठे व्हा" काका.
(तुम्हाला काका म्हणतोय म्हणून आम्हाला शेंबडे पोर समजू नये, "काका")
- Log in or register to post comments
ह
हेमंत लाटकर
Mon, 08/24/2015 - 12:56
नवीन
अस्वस्थामा साष्टांग नमस्कार. यापुढे तुमच्या सुचना जरूर पाळेल. (हे सर्व वाद निवळण्यासाठी भिऊन नव्हे)
परशुरामाने आईचे मुंढके उडवले ते वडिलांची आज्ञा मोडू नये म्हणून त्याबरोबर परशुरामाला वडिलांचे (जमदग्नींचे) योगसामर्थ माहित होते ते आई रेणूकेला परत जिवंत करतील.
- Log in or register to post comments
G
gogglya
Wed, 08/26/2015 - 11:00
नवीन
माहीती असताना चुकीचे कृत्य केले तरीही ते बरोबर ? अजब तर्कशास्त्र आहे आपले! __/\__
- Log in or register to post comments
क
काळा पहाड
Mon, 08/24/2015 - 20:57
नवीन
मी पण तुम्हाला अश्वत्थामाच समजत होतो. मला वाटलं "अस्वस्थ अश्वत्थामा" अशी काही तरी फोड असेल.
- Log in or register to post comments
इ
इरसाल
Mon, 08/24/2015 - 10:31
नवीन
आता त्यांना "शष्प" चा अर्थ पण सांगुन टाका नाय्तर त्यासाठी नव्या ब्लॉगची लिंक चिकटवतील !
- Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध.वैद्य
Fri, 08/21/2015 - 13:27
नवीन
पैल्या धा परतीसादात अशी मारामारी करून अख्या कुस्तीचा मजा घालवल्याबद्दल णीषेध.
आस फुस्स करतात होय? तुमी येक्दामस हारवी द्येंत याक्ट लावून सर्वा लोकांना आत टाकून दिले ;)
अवांतर: गो नि दांडेकरांचे पुस्तक वाचून महात्मा फुल्यांनी खरच शोधली का असे वाटून गेले होते.
- Log in or register to post comments
श
श्रीरंग
Sat, 08/22/2015 - 14:23
नवीन
गोनिदा म्हणजे "दांडेकर" ना? मग त्यांनी.. सॉरी.. त्यानी लिहिलेलं सर्वच सपशेल खोटं, आणी महाराजांविषयी बदनामीकारकच असणार. लोकमान्य टिळक हेदेखील एखादं काल्पनीक पात्र असेल कदाचित. किंवा अस्लेच खरे, तर बाळ गंगाधर टिळक लोकमान्य नक्कीच नसणार. त्यांच्या जातीच्या इतिहास संशोधकांनी ही खोटी पदवी चिकटवली असणार त्यांना.. सॉरी.. त्याला.
- Log in or register to post comments
म
मालोजीराव
Sun, 08/23/2015 - 19:47
नवीन
शिवचरित्रमाला मध्ये बाबासाहेबांनी डिटेल रेफरन्स दिलाय फुल्यांचा....मधल्या काळात नरकेंनी फुल्यांच्या समाधीला भेट दिल्याच्या नोंदी शोधल्या आहेत
समाधीची दुरवस्था जेम्स डग्लस मुळेच खर्या अर्थाने सर्वांसमोर आली,त्यानेच शासकीय यंत्रणा हलवली असे माझे वैयक्तिक मत आहे
- Log in or register to post comments
प
पैसा
Fri, 08/21/2015 - 11:05
नवीन
- Log in or register to post comments
प
प्यारे१
Fri, 08/21/2015 - 11:10
नवीन
ज्योतिराव फुल्यांना महात्मा पदवी कुणी दिली होती? त्यांनी ब्रिटीशांना विरोध वगैरे केला होता का?
त्यांची समाज सुधारणा आणि शिक्षण (विशेषत: स्त्री) क्षेत्राताली कामगिरी असाधारण असली तरी इतर मुद्दे पटण्या सारखे आहेत का? शिक्षण क्षेत्र किंवा समाज सुधारणा सुद्धा इंग्रजांच्या पठडीत राबवण्याचा प्रयत्न होता का?
- Log in or register to post comments
प
पगला गजोधर
Fri, 08/21/2015 - 11:43
नवीन
महात्मा फुलेंना महात्मा पदवी कोणी दिली असे विषय काढून धागा कृपया भरकटवु नका.
(तुमच्या माहितीसाठी, मुंबईतील कामगार चळवळीचे प्रणेते लोखंडे यांनी ती दिली, आचार्य अत्रेंनी केलेला चित्रपट पहा महात्मा फुल्यांवरचा. )
अवांतर : कृपया वरील प्रतिसादाला प्रत्युतर म्हणून 'लोकमान्य', 'स्वातंत्र्यवीर' या पदव्यांचे उगमस्थानाबाबतीत नस्त्या चौकश्या सुरु करू नका.
- Log in or register to post comments
म
माहितगार
Fri, 08/21/2015 - 11:33
नवीन
राजवाडेंच्या उपरोक्त लेखनातील "शंभूमहादेवास शिवाजी, शिवाजीचे पुर्वज, शिवाजीचे वंशज यांची राउळे आहेत." या उल्लेखातील शंभूमहादेव हे ठिकाणाचे नाव आहे का ? तसे असल्यास हे ठिकाण कोठे आहे ?
- Log in or register to post comments
प
पैसा
Fri, 08/21/2015 - 11:39
नवीन
शिखर शिंगणापूर असावे. मी तिथे गेलेली नाही त्यामुळे नक्की सांगू शकत नाही. पण शिखर शिंगणापूरचाच उल्लेख शंभूमहादेव असा करतात.
- Log in or register to post comments
म
माहितगार
Fri, 08/21/2015 - 11:50
नवीन
ओह ओके तुम्ही म्हणता ती शक्यता बरोबर वाटतीए. मिपाकरात दुजोरा देऊ शकतील असे अजून कुणी जाणकार आहेत का ?
- Log in or register to post comments
श
शलभ
Sun, 08/23/2015 - 21:22
नवीन
मला वाटतं तेच असावं. आमच्या घरातले जातात दर वर्षी.
आणि उदयनराजेंची खासगी मालमत्ता आहे.
- Log in or register to post comments
म
माहितगार
Mon, 08/24/2015 - 07:40
नवीन
मराठी विकिपीडियावरील सध्याची नोंद खालील प्रमाणे आहे.
शंभू महादेव हे भोसले घराण्याचे कुलदैवत असल्याने मालोजीराजे भोसले आपल्या परिवारासह देवदर्शनासाठी येथे येत. पाण्याच्या दुर्भिक्षेमुळे भाविकांचे होणारे हाल पाहून मालोजी राजांनी येथे इ.स. १६०० साली एक मोठे तळे येथे बांधले, त्यास पुष्करतीर्थ असे म्हणत; त्यालाच आता शिवतीर्थ म्हणतात. पूर्वीचे देऊळ पडल्यामुळे १७३५ मध्ये शाहू महाराजांनी सध्याचे देऊळ बांधले. १९७८ मध्ये त्याचाही जीर्णोद्धार झाला. दक्षिणेतील रामस्वामी नावाच्या एका स्थापत्यतज्ज्ञाकडून शिखराची व मंदिराची डागडुजी करून त्यांना आकर्षक रंग देण्यात आला आहे.
हि नोंद बहुधा शिखर शिंगणापूरच्या मुख्य शंभू महादेव मंदिरा बाबत असावी. राजवाड्यांनी राऊळे आहेत असा अनेकवचनी उल्लेख केला आहे. शिखर शिंगणापूरास भोसले घराण्याची शंभू महादेवा शिवाय इतरह मंदिरे आहेत का ?
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Fri, 08/21/2015 - 11:10
नवीन
यांपैकी कोणीही शिवजयंती चालू केली असेल त्याने काय फरक पडतो ? महराष्ट्राच्या जडणघडणी मध्ये दोघांचा वाटा आहे.
ज्याच्या त्याच्या ज्ञानावर अवलंबून आहे. इथे अमोल कोल्हेचा फोटो लावून शिवजयंती करणारी मंडळे आहेत.
आणि शिवजयंती कोणी सुरू केली हा प्रश्नच फसवा आहे. कारण शिवजयंती चा "उत्सव" हा टिळकांनी सुरू केला.
त्यापूर्वी कदाचित फुलेंनी तो उत्सव सुरु केला असेल मग त्याच्या योग्य नोंदी शोधून तो इतिहास सुधारला पाहिजे.
ज्याप्रमाणे गणेशोत्सव पूर्वी घरोघर असायचा पण सार्वजनिक उत्सव टिळकांनी सुरू केला.
इतिहास ही नवनवीन संशोधनाने बदलणारी गोष्ट आहे. त्यामध्ये श्रेयवाद किंवा अभिमान याला स्थान नसते.
- Log in or register to post comments
प
पैसा
Fri, 08/21/2015 - 11:14
नवीन
सहमत आहे.
- Log in or register to post comments
प
पगला गजोधर
Fri, 08/21/2015 - 11:37
नवीन
शिवाजी महाराज शेतकऱ्यांचे हितकारी धोरण ठेवणारा राजा, आणि शिवजयंती निम्मित सरकारने करोडो अब्जो रुपये खर्चून
अरबी समुद्रात पुतळा उभारण्यापेक्षा, छोटी छोटी अनेक धरणे तळी निर्माण करावी. शिवजयंती निम्मित धरणातला गाळ काढणे किंवा रेन वॉटर हार्वेस्टिंग असे उपक्रम राबवावे… असं मला म्हणायचं
- Log in or register to post comments
म
मास्टरमाईन्ड
Fri, 08/21/2015 - 11:42
नवीन
खरंच हे गरजेचं आहे.
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Fri, 08/21/2015 - 11:50
नवीन
लैच अपेक्षा तुमच्या.
अन स्मारकच करायचं तर शेप्रेट पुतळ्याची तरी गरज काय? आहे ते गडकिल्ले नीट जपले तरी लै झालं. त्यांच्याच कामात भ्रष्टाचार होतोय कोट्यवधींचा, दोन छोटी तळी साफ केल्यावर हजार घनमीटर वाळू उपसल्याचे आकडे दाखवतात...काय बोलावं तितकं थोडंच आहे.
- Log in or register to post comments
प
पगला गजोधर
Fri, 08/21/2015 - 12:01
नवीन
जनतेने, महाराज्यांचे नाव घेऊन-आपली तुंबडी भरणाऱ्या राजकारण्यांना, आठवण करून द्यावी,
की राजांचे स्वराज्य 'जय कुळवाडी जय मावळे' (जय जवान जय किसान च्या चालीवर) धोरणावर होते.
इकडे आपल्या बापजाद्याची जयंती पुण्यतिथी ग्रेगोरिअन कॅलेंडर प्रमाणे साजरी करणार, मात्र महारांजांची
जयंती पुण्यतिथी मात्र तिथीप्रमाणेच साजरी करा म्हणून जनतेला वेठीस ठेवणार।
- Log in or register to post comments
फ
फुलथ्रॉटल जिनियस
Fri, 08/21/2015 - 12:09
नवीन
छान प्रतीसाद,महाराष्ट्रातल्या एका कथीत ईतिहासकाराने ,ज्याने म्हणे
आयुष्य वेचले आहे शिवप्रचारासाठी ,त्यानेच हा तिथिचा घोळ घातला आहे.
साळगावकरांना तिथी सुचवली आणी राज्य सरकारला तारीख कळवली,अश्या लोकांचा उदोउदो करण्यात लोक आपला वेळ खर्ची .
- Log in or register to post comments
क
कहर
Fri, 08/21/2015 - 13:16
नवीन
अहो फूल्ल थ्रो टल्ल … बाबासाहेबांनी फक्त शिवजन्मादिवशी कोणती ग्रेगोरियन तारीख असेल याचे संशोधन केले.
त्यांनी कधी असे म्हणले कि "त्त्या ग्रेगोरियन तारखेलाच शिवजयंती साजरी करा" असेल तर त्याचे पुरावे दाखवा.
राजकारण्यांनी त्याचा वापर वाद घालायला केला.
नावात जीनियस लिहिता तसे कधीतरी थोडे डोके पण चालवून दाखवा ना
- Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll
Fri, 08/21/2015 - 12:11
नवीन
अग्गदी खरे बोललात पगला गजोधर साहेब.
पण बापजाद्याची पुण्यतिथी माझ्या माहिती नुसार सर्वत्र तिथीनेच 'साजरी' करतात. ती सुधा वर्षातून २ दा. एकदा तिथिला आणि एकदा पक्षाला.
आपलं तर म्हणणं आहे की सगळीकडे ग्रेगोरीयन लावून मस्तं पैकी हॅलोवीनला दिवाळी साजरी करावी आणि ख्रिसमसला राम + कृष्ण यांची जयंती. खेळ खल्लास.
- Log in or register to post comments
प
पगला गजोधर
Fri, 08/21/2015 - 12:16
नवीन
जरा २३ जानेवारी व १७ नोव्हेंबर या तारखांविषयी जर्रा रिसर्च करा बरे.
- Log in or register to post comments
प
प्यारे१
Fri, 08/21/2015 - 12:22
नवीन
राजकारणी जिथं तिथं राजकारण करतात. त्यांचं मरु दे. आणि मुळात
1.ग्रेगोरियन पद्धत प्रचलित झाल्यानं नेत्याच्या जन्म मृत्यु च्या तारखा लक्षात असतील तर काय चूक आहे?
2.महाराजांच्या काळी तिथी प्रचलित होती त्यामुळे तीच पुढे सुरु राहावी अशी मागणी करण्यात काय चूक आहे?
- Log in or register to post comments
फ
फुलथ्रॉटल जिनियस
Fri, 08/21/2015 - 11:12
नवीन
नंतर टिळक आले आणि त्यांनी सगळीकडे प्रसार करून
सुळे नामक इंजिनियरकडून समाधी पुन्हा बांधून घेतली.>>>>>>>>किती फेकाफेकी करावी यालाकाही लिमिट? महात्मा फुले यांनी समाधीची डागडुजी केली व शिवजयंती उत्सव पहिल्यांदा सुरु केला,
टिळक हे राजकारणी आणि फुले विरोधक अस्ल्याने फुल्यांच्या निधनानंतर त्यांनी धुर्तपणे शिवजयंतीचे क्रेडीट लाटायला सुरुवात केली,तत्कालीन मिडीया जात्यांध लोकांच्याच ताब्यात अस्ल्याने त्यांनीही टिळकांना खोटे क्रेडीट द्यायला सुरुवात केली.
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Fri, 08/21/2015 - 11:19
नवीन
शिवसमाधी टिळकांनी पुन्हा एकदा बांधवून घेतली आणि दणक्यात शिवाजीउत्सव वाढवला हे खोटे असेल तर पुरावे द्या.
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Fri, 08/21/2015 - 11:21
नवीन
तुम्ही पण पुरावे फेका की ! लाजू नका
कोणी अडवला आहे.
शेवटी आम्हाला टिळक काय आणि फुले काय सारखेच!
फरक तुम्हालाच पडतो.
- Log in or register to post comments
प
पगला गजोधर
Fri, 08/21/2015 - 11:32
नवीन
मूळ मुद्दा असा आहे 'शेतकऱ्यांच हित पाहणारा राजा' आणि त्याचा उत्सव (असे उत्सवाचे स्वरूप), तर आजचे नवीन 'कट्टर हिंदू राजा' असे उत्सवाचे स्वरूप आले आहे काय ? यासाठी उहापोह करा …
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Fri, 08/21/2015 - 11:27
नवीन
>>> महात्मा फुले यांनी समाधीची डागडुजी केली व शिवजयंती उत्सव पहिल्यांदा सुरु केला,
जोतिबा फुल्यांनी सुरू केलेल्या शिवजयंतीच्या मिरवणुकीत नानासाहेब नेफळे दांडपट्टा, भाला-बरची आणि लेझीम खेळत होते असा तत्कालीन ब्रिटिश गॅझेटिअरमध्ये उल्लेख आहे.
- Log in or register to post comments
म
माहितगार
Fri, 08/21/2015 - 11:53
नवीन
श्रीगुरुजी उपरोधानी लिहिताय का खर म्हणताय ? (विकिपीडियात अशी एंट्री घ्यावी का नको असा प्रश्न पडतो !)
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Fri, 08/21/2015 - 12:00
नवीन
माहितगार म्हणजे माहितीने दुसर्याला गार करणारा, स्वतःच गार होणारा नव्हे =))
- Log in or register to post comments
प
पगला गजोधर
Fri, 08/21/2015 - 12:27
नवीन
तुम्ही 'माहिती' द्यायची अंन आम्ही 'गार' व्हायचं ………।
हे असं ठरलंय की नै ?
- Log in or register to post comments
म
माहितगार
Fri, 08/21/2015 - 12:52
नवीन
==)) कै विचारू नका आमच्या सारखेच लोक आहेत म्हणून १८५७च्या नानासाहेब पेशव्यांचे नाव मराठी विकिपीडियात पहिल्या नानासाहेब पेशव्यांकडे स्थानांतरीत होऊ शकते. श्रीगुरुजी कोणत्या नानासाहेबांबद्दल लिहिताहेत हे माहितच नसलेल्यांकडून या नानासाहेबांची भर पडली मराठी विकिपीडियावर कुणाकडून पडल्यास विचारावयास नको :) संभाजी महाराजांच्या काकांच्या नावाचे लेखाचा दुवा तुम्हाला त्यांच्या पुतण्याच्या लेखावर नेऊन पोहोचवू शकतो. पब्लिकला आयती माहिती पाहिजे असते नेमकेपणाशी कै देणेघेणे नसते :(
- Log in or register to post comments
व
विनोद१८
Fri, 08/21/2015 - 21:24
नवीन
....माईने नानाला सुहास्य वदनाने पंचारतीने ओवाळून औ़क्षण केले होते त्यामुळे नान्याच्या अंगावर मूठ्भर मांस वाढले व त्यांस दांडपट्टा, भाला-बरची आणि लेझीम खेळण्याचे स्फुरण चढले. याचादेखील उल्लेख असावा असा आपला माझा अंदाज.
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Sat, 08/22/2015 - 05:43
नवीन
- Log in or register to post comments
इ
इरसाल
Fri, 08/21/2015 - 11:39
नवीन
हेडिंग मधे असणार्या हाय जँक वरुन मला मोंजी का बरे वाटत आहात.
- Log in or register to post comments
म
मास्टरमाईन्ड
Fri, 08/21/2015 - 11:40
नवीन
धागा परत ब्राम्हण आणी ब्राम्हणेतर या विषयाकडेच वळ्तोय की काय?
म. फुल्यांना महात्मा किंवा लो. टिळकांना लोकमान्य पदवी कुणी दिली हे शोधण्यात काय हशील आहे? (आता मिपावर असणार्यांपैकी कुणीही त्यावेळेस कळत्या वयात असण्याची शक्यता दुरापास्तच आहे.)
आपल्याला वैयक्तिकरित्या एखाद्या "महात्मा" किंवा "लोकमान्य" किंवा आणखीन कुणीतरी मान्य नसतील पण त्यांच्याबद्दल मिपा सारख्या सार्वजनिकरित्या खुल्या असलेल्या व्यासपीठावर काहीतरी शंकास्पद टंकून आग पेटती ठेवणं एवढ्याच हेतूनं हे होत असेल तर _/\_
एक गोष्ट तर १००% खरी आहे की
सगळेच ब्राम्हण "जात्यंध" नसतात / नाहीत
तसेच सगळेच ब्राम्हणेतर "ब्रिगेडी" नसतात / नाहीत
मग कशाला कुटायचा काथ्या या विषयावर?
कायतरी इंट्रेष्टींग ष्टोर्या ल्ह्या. आमी वाचताव.
- Log in or register to post comments
प
पैसा
Fri, 08/21/2015 - 11:42
नवीन
अति अवांतरः हायजँक चा उच्चार कसा करायचा? मोजी कथा वाचल्या पण अजून सवय होत नाही.
- Log in or register to post comments
प
पगला गजोधर
Fri, 08/21/2015 - 11:48
नवीन
अनुनासिकस्वरात करावा.
;) हळू घ्या.
- Log in or register to post comments
म
माहितगार
Fri, 08/21/2015 - 13:56
नवीन
शिवजयंती उत्सवाचे इतिहास विषयक काही संदर्भ गूगल बुक्सवरील नारायण कुलकर्णी यांनी लिहिलेल्या चॅप्टर ६८ मध्ये दिसत आहेत.(इंग्रजी मजकुर) काही पाने पेड रिडर्स साठी राखीव दिसतात त्यामुळे सारीच पाने वाचता नाही आली. जिज्ञासूंनी या ग्रंथातून काही माहितीवर प्रकाश पडतो का ते पहावे.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4
- ›
- »