शिवजयंती हायजँक ????
महाराष्ट्र-भूषण पुरस्कारावरून आजूबाजूला एवढा गदारोळ उठलेला होता, त्यामुळे मी ठरवलं होत की एक मिपाकर म्हणून आपण त्या वादात पडायचं नाही, तर शिवरायांना सामान्य जनतेपर्यन्त कोणी पोहोचवण्याची सुरुवात केली व का ?, हा इतिहास तपासून जरा थोडफार माझ्यापरीने पडताळूया, मला अशी माहिती मिळाली की, शिवरायांची महती ओळखणारे पहिले व्यक्तिमत्त्व म्हणजे महात्मा जोतिबा फुले होते. यासाठी १८६९ साली शिवाजी महाराजांची समाधी फुलेंनी समाधी प्रथम शोधली. (जी समाधी पडकी काट्याकुट्यात गडप होती.) यानंतर 27 रुपये वर्गणी गोळ करून समाधीस्थळाची देखभाल केली. म्हणजे शिवाजी राजे गेल्यानंतर २०० वर्षांच्या काळात कोणालाही आठवण नसावी. अफाट कर्तृत्वाच्या समाजरक्षकाची, स्वराज्य उभे करणाऱ्याची याद नसावी, याचे आश्चर्य वाटते. त्यावेळीसुद्धा मूळनिवासी शेतकर्यांच्या जीवनाचे तीन तेरा वाजले होते, म्हणूनच ज्या राजाच्या काळात सुरक्षा, सहकार्य मिळाले होते (कर गोळा करताना शेतकऱयांच्या भाजीच्या देठालाही हात लावू दिला नाही), शेतकऱयांच्या जमिनीची मोजदाद करून नावे करून दिली, शेतकऱ्याच्या भल्यासाठी प्रयत्न केले. शेती, शेतकरी, त्यांचा बैलबारदाना, वृक्षतोड याविषयी जागरूकतेने प्रयत्न केले, शोषणव्यवस्थेचा बंदोबस्त करण्यासाठी त्यांनी वतनदारी, मिरासदारी संपवली (सैन्यदलाला पगार देणारा असा राजा). त्याची महती जनतेपर्यंत यावी म्हणूनच महात्मा फुल्यांनी प्रयत्न केले. महाराजाच्या गुणांमुळे ज्योतीराव फुले यांनी शिवाजी महाराजांचा उल्लेख 'शेतकऱ्यांचा राजा' 'कुळवाडीभूषण' असा केला व महाराजांवर, जगातील पहिले मराठी चरिञ -एक हजार ओव्यांचा कुळवाडीभूषण हा पोवाडा रचला. त्यांच्यातल्या महाराजांवरील प्रेम, श्रद्धा, भक्ती पोटी महाराष्ट्राच्या राजाबद्दलची अस्मिता म्हणूनच १९ फेब्रुवारी १८६९ साली पहिली शिवजयंती पुणे येथे सुरू केली ती १८९० च्या आसपास निधन होईपर्यंत चालू होती. शिवरायांच्या प्रेरणेने महात्मा फुल्यांनी समाजकार्य सुरू केले होते. ते अस्पृश्यतेच्या रूढीवर प्रहार करू लागले होते. त्यांनी मुलांमुलींसाठी शाळा सुरू केल्या. प्रबोधनाच्या माध्यमातून समाजजागृती सुरू केली. पण सांगा बरे, आज तुम्हाला प्रश्न विचारला कोणी "शिवजयंती कोणी सुरु केली ?", तर चटकन त्याचे उत्तर काय बरे येते तुमच्या डोळ्यापुढे ?
आजकाल शिवरायांच्या बद्दल आपण परस्परांत संवाद साधताना, 'शिवराय व शेतकरी/शेती' या आस्पेक्टचे मूलगामी महत्व दुर्दैवाने तुलनेने फार कमी लक्षात घेतले जाते, व जो कोणी या अंगाने मांडणी करतो, त्याचाही गंभीरपणे विचार करत नाही कोणी, असे वाटते. एकूणच सर्वच राजकीय शक्तींनी शिवाजी महाराजांना ऐक सेलेबल विषय करून, आपापसात वाटून घेतल्या सारखे दिसते, त्यामुळे महाराजांचे एकूणच सादरीकरण समाजामधे, 'तुळजाभवानीच्या कृपेने' वैगरे सारख्या दैववादी दिशेने जात आहे, असे वाटते.
माझ्या वैयक्तिक मते आजपासून ६०-७० वर्षांनी, "शिवजयंती कोणी सुरु केली ?" या प्रश्नाचे उत्तर 'बाबासाहेब पुरंदरे' असे मिळाले तर त्यावेळी काहीही वावगे वाटणार नाही कदाचित…
💬 प्रतिसाद
(175)
म
माहितगार
Fri, 08/21/2015 - 15:21
नवीन
Anant V. Darwatkar यांच्या पुस्तकात "James Douglas, an English man investigated the Tomb of Shivaji Maharaja at Raigad, which was virtually forgotten after the death of Shahu Maharaja 1 st," असे वर्णन येते आहे. हा James Douglas बहुधा प्रवासी लेखक होता. त्याने त्याचे प्रवास वर्णन १८८३ मध्ये प्रकाशीत केले असावे ते अर्काईव्ह डॉट ऑर्ग वर या दुव्यावर असावे. त्याने शिवाजी महाराजांच्या समाधीकडे होत असलेल्या दुर्लक्षाकडे अधीक लक्ष वेधले असावे. पण समाधीची कल्पना महात्मा फुल्यांना आधी पासूनच माहित असल्याची शक्यता इतर संदर्भांवरून दिसते आहे.
- Log in or register to post comments
प
पैसा
Fri, 08/21/2015 - 17:16
नवीन
त्यातही म. फुले लिखित शिवाजी महाराजांच्या पोवाड्याबद्दल लिहिले आहे. मात्र शिवजयंती उत्सव १५-१६ एप्रिल १८९६ ला टिळकांच्या प्रेरणेने सुरू झाला असे नि:संदिग्ध शब्दात लिहिले आहे. तसेच समाधी आणि जगदीश्वर देवळाच्या दुरुस्तीसाठी टिळकांनी काय काय केले ते लिहिले आहे. म. फुल्यांनी दुरुस्ती करवली असे कुठे दिसले नाही. त्यापूर्वी इंग्रज सरकारतर्फेच समाधीच्या देखभालीसाठी काही क्षुल्लक रक्कम दिली जात होती असे दिसते. कोल्हापूरच्या महाराजांनी सहानुभूती दाखवली मात्र पैशांची मदत दिली नाही. सयाजीराव गायकवाड यांनी १००० रुपयांची मदत दिली असा उल्लेख सापडला.
- Log in or register to post comments
म
माहितगार
Sat, 08/22/2015 - 04:33
नवीन
टिळक विषयक स्वांत्र्योत्तर काळातील विश्लेषणांमध्ये एक घटक तेवढा लक्षात घेतला जात नसावा तो म्हणजे ब्रिटीश कालीन ब्रिटीष धार्जीणी अँग्लो इंडीयन इंग्रजी वृत्तपत्रे. आज तत्कालीन अँग्लो इंडीयन इंग्रजी वृत्तपत्रे भारतात अस्तीत्वात नसल्यामुळे त्यांच्याकडे आजच्या विश्लेषणकर्त्यांचे दुर्लक्ष होत असावे परंतु टिळकांच्या काळात ती वृत्तपत्रे ब्रिटीश दृष्टीकोणांचे प्रतिनिधीत्व करत असत. केसरी मराठातील अग्रलेखांच्या माध्यमातून टिळकांचा एक संवाद जसा एतदेशीयांशी होत होता तसा त्यांचा दुसरा संवाद म्हणा रोख म्हणा अँग्लो इंडीयन इंग्रजी वृत्तपत्रातील न पटणारे दृष्टीकोणांशी सामना करण्यावर होता.
शिवाजी महाराजांच्याकडे महात्मा फुल्यांचे लक्ष गेले ते शेतकर्यांचा नायक म्हणून. शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा शोध घेतला जाऊ लागला होता. १८८३ मध्ये कुणी जेम्स डग्लस नामक प्रवास वर्णनकाराने मुंबईतील इंग्रजी वृत्तपत्राकडे पत्र पाठवून शिवाजी महाराजांच्या समाधीच्या दुर्लक्षाकडे लक्ष वेधले. जेम्स डग्लस हा ऐतिहासीक परिसरांना भेटी देणारा ब्रिटीश प्रवासी असल्यामुळे इतर राज्यकर्त्यांच्या समाधी (टोंब) च्या मानाने शिवाजी महाराजांच्या समाधीचे अस्तीत्व जाणवले नसणे सहाजिक आहे. बहुधा या इंग्रजी वृत्तपत्रीय चर्चेची दखल घेऊन कुणा मराठी माणसाने केसरी वृत्तपत्राचे लक्ष शिवाजी महाराजांच्या समाधीकडे वेधले त्यानंतर मात्र केसरीकारांनी समाधी जीर्णेद्धाराचा विषय चांगलाच मनावर घेतला. कारण लोकमान्यांना शिवाजी महाराज त्यांच्या समोरच्या तरूणाईसाठी आदर्श राष्ट्रपुरुष म्हणून उभे करावयाचे होते. त्या काळात ब्रिटीशांची राजधानी कलकत्त्यास होती. टिळकांच्या भाषणांचे लेखांचे अनुवाद ज्या वेगाने त्या काळातील इतर भारतीय भाषातून केले जात ते पाहून स्मितीत व्हावयास होते तसे ते बंगालीतही केले जाऊन प्रसारीत केले जात. टिळक महाराष्ट्रातल्या कुणाचे नेते होते का नव्हते हा वाद क्षुल्लक एवढ्यासाठी आहे की टिळक राष्ट्रीयस्तरावर नेते म्हणून स्विकारले गेले होते, शिवजयंती टिळकांना राष्ट्रीयस्तरा पर्यंत न्यावयाची होती कारण टिळकांचा उद्देश सरळ सरळ राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण करणे असा राजकीय होता. टिळकांनी जसे शिवजयंती उत्सवाचे प्रस्थ राजकीय उद्देशाने राष्ट्रीयस्तरा पर्यंत वाढवताहेत हे लक्षात आल्यानंतर, टिळकांच्या राजकारणापासून मुस्लीमांना वेगळे पाडण्यसाठी शिवाजी महाराजांच्या उत्सवामागे टिळकांचे हिंदुत्वाचे राजकारण असल्याची जावईशोध टिका ब्रिटीश धार्जीणी इंग्रजी वृत्तपत्रे करावयास लागली तेव्हा टिळकांनी शिवाजी हे मुस्लीम असते तरीही मी त्यांचा राष्ट्रीय नेता म्हणून उत्सव केला असता हे त्यांच्या भाषणातून सांगीतलेच सोबतच IS SHIVAJI NOT A NATIONAL HERO ?? हा मराठात अग्रलेख लिहून ब्रिटीश धार्जीणी इंग्रजी वृत्तपत्रांनी पेरलेल्या दुहीच्या बिजाला उत्तर दिले. त्या अग्रलेखाचा समारोप करताना लोकमान्य म्हणतात "It was only in conformity worth the political circumstances of the country at the time Shivaji was born in Maharashtra. But a future leader may born anywhere in India who knows even may be a Mohamedan . That is the right view of the question and we do not think that the Anglo Indian writers can succeed in diverting our attention from it."
अवांतर: एपीजे अब्दुल कलाम गेल्या नंतर सर्व भारतीयांनी एक दिलाने त्यांना आदरांजली वाहिली ते पाहून त्या दिवशी लोकमान्यांच्या वर नमुद केलेल्या अग्रलेखाची आठवण झाली.
- Log in or register to post comments
द
दत्ता जोशी
Fri, 08/21/2015 - 14:09
नवीन
हा इतिहास तपासून जरा थोडफार माझ्यापरीने पडताळूया, मला अशी माहिती मिळाली की, शिवरायांची महती ओळखणारे पहिले व्यक्तिमत्त्व म्हणजे महात्मा जोतिबा फुले होते. यासाठी १८६९ साली शिवाजी महाराजांची समाधी फुलेंनी समाधी प्रथम शोधली>>>>>>>>>> विथ ड्यू रिस्पेक्ट टू महात्मा ज्योतिबा फुले............ म्हणजे महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या आधी शिवाजी महाराजांच्या चरित्र / समाधी स्थळ इ. माहिती कोणालाच नव्हती का? मग म. फुल्याना हि माहिती कोठून मिळाली? फुले इतिहास संशोधक होते का? त्यांनी कोणकोणती कागदपत्रे अनु पुएअवे तपासले? ते त्यांना कोणी दिले? का असा म्हणता येईल कि शिवाजी महाराजांचे चरित्र इत्यादी स्वतःला हवा तसा लिहिण्याचा प्रकार तेव्हा पासून सुरु आहे?
- Log in or register to post comments
प
पगला गजोधर
Fri, 08/21/2015 - 14:29
नवीन
१८८० साली जोतिराव पुण्यातून चालत रायगडावर गेले. तिथे झाडा-झुडपात हरवलेली आणि पालापाचोळ्यात दिसत नसलेली शिवरायांची समाधी जोतिरावांनी मोठ्या कष्टाने शोधून काढली. त्याठिकाणी साफसफाई केली व शिवरायांच्या समाधीवर फुले वाहिली. ही माहिती जोतिरावांनी पुण्यात येऊन सारसबाग जवळ असलेल्या हिराबागेत आयोजित केलेल्या शिवसमाधी विषयक सभेत स्वतः सांगितल्याची नोंद मिळालेली आहे. या सभेत साफळकर स्वामी, गंगारामभाऊ म्हस्के आदी मान्यवर पुणेकरांची भाषणे झालेली होती. त्याच सभेत शिवजयंची उत्सव सुरू करण्याचा विचार जोतिरावांनी मांडला. आणि त्याला सर्वानुमते पाठिंबा देण्यात आला. त्या बैठकीत शिवजयंतीसाठी लोकवर्गणी जमवण्याचा निर्णय झाला. एकूण २७ रूपये त्या सभेत जमले. त्यातील तीन रुपये स्वतः जोतिरावांनी दिले. १८८०साली पुण्यात आणि रायगडावर शिवजयंती उत्सवाची जोतिरावांनी सुरूवात केली. त्यांचे सहकारी कामगार नेते रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांनी मुंबईच्या लालबाग आणि परळ या गिरणी कामगारांच्या वस्त्यांमध्ये शिवजयंती उत्सव सुरू केला. हा उत्सव सत्यशोधक मंडळी अतिशय भव्य प्रमाणात करत असत. १८९३ साली गणेशोत्सवाला सार्वजनिक रूप देऊन टिळकांनी त्याचे चळवळीमध्ये रूपांतर केले. त्यांना शिवजयंतीचेही महत्त्व वाटत होते. म्हणूनच पंधरा वर्षे सुरू असलेल्या राष्ट्रीय कार्यक्रमात टिळक जातीने उपस्थित राहिले. आणि आपला सहभाग देऊन त्यांनी हा उत्सव आणखी मोठा केला.
१८८२ साली टिळक-आगरकरांना शिवाजी महाराजांच्या वंशजाबद्दल केलेल्या लेखनासंदर्भात एका खटल्याला सामोरं जावं लागलं. त्यावेळी त्यांना डोंगरीच्या तुरुंगात राहावं लागलं. महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाचे खजिनदार रामशेठ बापुशेठ उरवणे यांना रूपये दहा हजार रोख घेऊन जामिनासाठी मुंबईला पाठविलं. आपल्या जामिनासाठी जोतिरावांनी ही धडपड केल्याचे खुद्द टिळक आगरकरांनी ‘केसरी’मध्ये नमूद केली आहे. टिळक-आगरकर तुरुंगातून सुटल्यावर सत्यशोधकांनी त्यांची वाजतगाजत मिरवणूक काढली, सत्कार करून मानपत्र दिले. हे मानपत्र ‘केसरी’मध्ये छापून आलं. उरवणे यांच्या मृत्युनंतर खुद्द टिळकांनी या आठवणींना उजाळा दिला. तेव्हा पोलिस खात्याचे अहवाल, सत्यशोधक चळवळीचे दस्तावेज, पुरावा लेखागारातील कागदपत्रे आणि सत्यशोधक माधवराव बागल यांनी १९३३ साली सत्यशोधक समाज हिरक महोत्सव ग्रंथात केलेले लेखन, हे सर्व दस्तावेज असे सांगतात की, जोतिरावांनी १८८० साली देशात सर्वप्रथम शिवसमाधी शोधणं, तिचे सुशोभिकरण करणं आणि शिवजयंती उत्सव सुरू करणं, अशी महत्त्वपूर्ण ऐतिहासिक कामे केलेली आहेत.
जामिन आणि मानपत्र याबाबतची नोंद तर खुद्द टिळकांनी केली आहे. तेव्हा आज आपण असे म्हटले पाहीजे की, शिवजयंती सुरू करणारे जोतिराव आहेत आणि ती मोठी करण्यात लोखंडे आणि लोकमान्य टिळक यांचा महत्त्वाचा वाटा आहे.
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Fri, 08/21/2015 - 14:42
नवीन
काय गजोधर साहेब,
ट्यार्पीची हौस फिटली का नाय?
अजून बरेच विषय आहेत.
स्त्री-पुरुष, मांसाहारी-शाकाहारी, अमेरिका-भारत, इंग्रजी-मराठी, आध्यात्मिक-वैज्ञानिक, पुणे-इतर, .................................... बहरपहुर हायेत. प्रत्येक धाग्यावर शंभर नक्की कमीत कमी. त्यातले तुमचेच पन्नास. और बोलो..?
- Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध.वैद्य
Fri, 08/21/2015 - 14:48
नवीन
!
- Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध.वैद्य
Fri, 08/21/2015 - 14:48
नवीन
!
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Fri, 08/21/2015 - 15:12
नवीन
कथेवर मिपाकर प्रतिसाद देईनात , म्हणून शॉर्टकट ;)
- Log in or register to post comments
व
विकास
Fri, 08/21/2015 - 15:25
नवीन
Maharashra CM Fadnavis seeks Bharat Ratna for Mahatma Jyotirao, Savitribai Phule
- Log in or register to post comments
D
dadadarekar
Fri, 08/21/2015 - 20:03
नवीन
ज्या व्यक्ती १९४७ नंतर हयात होत्या / आहेत त्यानाच भारतरत्न मिळते.
असे लिमिट आवश्यक आहे.
अन्यथा , कालिदास , शिवाजी महाराज , जिजाऊ , प्रभू रामचंद्र , व्यासमुनी , अकबर , ख्वाजाजी ....... प्रचंड मोठी यादी होइल
- Log in or register to post comments
म
मनो
Sat, 08/22/2015 - 03:41
नवीन
अरे रे किती तो गोंधळ. १६८० नंतर २०० वर्षे काहीच झाले नाही म्हणजे नक्की काय? १७०७ पर्यंत रायगडावर मोगल किल्लेदार होता. त्यानंतर जंजिरेकर सिद्दीने गड ताब्यात घेतला. शाहू महाराजांच्या हाती आला तो बाजीराव पेशव्याच्या काळात. शाहू महाराजांना गड स्वतः पाहण्याची खूप इच्छा होती पण काही कारणाने ते राहून गेले. मग गड पोतनीसांच्या ताब्यात होता. तो १७७२ साली पेशव्याने लढून ताब्यात घेतला. या सर्व काळात जेंव्हा गड मराठ्यांच्या ताब्यात होता त्या काळात पेशवे दफ्तरात गडाच्या व्यवस्थेबाबत अनेक कागद आहेत. 'रायगडच्या सिंहासनाची आणि समाधीची पेशवेकालीन व्यवस्था' असे एक पुस्तकही त्यावर आधारित आहे. त्यात साफसाफ लिहिले आहे की सिंहासन नेहेमी मूल्यवान कापडाने अछ्छादलेले असे. राज्याभिषेकाच्या दिवशी आणि गडाच्या देवताच्या साठी दर वर्षी एक उत्सव होई. त्या दिवशी गडाचे सारे मानकरी एकत्र सिंहासनाला मुजरे घालत. ज्या वेळी काही कारणाने उत्सव झाला नाही त्या वेळी 'उपद्रव' होई. मग त्यासाठी एक रेडकू नाहीतर बकरे देवापुढे बळी दिले जात असे. त्यासाठी झालेला खर्च मुळ अस्सल कागदात नमूद आहे. १८१८ साली इंग्रजी तोफांच्या मार्याने राजांचा राहता वाडा जळाला, गडावर एकहि इमारत उभी उरली नाही. सर्व मानकरी हत्यारासकट गड उतरले (दुसर्या बाजीरावाची बायको वाराणसीबाई हिच्या बरोबर एकही मराठा शिपाई गडावर नसला पाहिजे याला किल्लेदार शेख अबुद जामीन). त्यामुळे हा उत्सव बंद पडला. तो नंतर फुल्यांनी चालू केलाही असेल, पण या एकाच गोष्टीचा उल्लेख करून बाकी इतिहास खोटा असे म्हणणे म्हणजे आपल्याला सोयीस्कर तेवढ्याच गोष्टी उचलण्याचे उदाहरण आहे. असो, ज्यांना इतिहास माहित करून घायचा असेल ते वाचतील, वाद घालायचा तर काय कशावरही घालता येईल.
- Log in or register to post comments
म
माहितगार
Sat, 08/22/2015 - 05:54
नवीन
'रायगडच्या सिंहासनाची आणि समाधीची पेशवेकालीन व्यवस्था' प्रकाशन आणि लेखक कोण आणि प्रताधिकार(कॉपीराइटस्थिती माहिती असेल तर द्यावी) . कॉपीराइट संपला असेलतर ग्रंथ स्कॅन करून आंतरजालावर उपलब्ध केला जावा असे वाटते.
- Log in or register to post comments
ज
जयंत कुलकर्णी
Sat, 08/22/2015 - 04:30
नवीन
पग,
आपल्या लेखातील शेवटचे वाक्य संपादकांना सांगून काढावयास सांगणे. खरं म्हणजे त्याचे आवश्यकताच नव्हती. आणि शेवटी तुम्ही जो प्रश्न विचारलाय त्याचे उत्तर तुम्हीच दिले आहे...त्यामुळे या लेखाचे प्रयोजन शेवटच्या वाक्यात दडले आहे असा संशय येतो.... असो..कृपया असे करु नये...
- Log in or register to post comments
प
प्रदीप साळुंखे
Sat, 08/22/2015 - 04:56
नवीन
खरा इतिहास जाणण्यासाठी ते टाईम मशीन असायला पाहिजे होते.पण मला वाटते काळाच्या मागे म्हणजे भूतकाळात जाणे scientifically अशक्य आहे.तेव्हा हे अध्यात्मिकदृष्ट्या शक्य आहे.म्हणजे योगी होऊन सिद्धी प्राप्त करणे आणि भूत-भविष्य जाणणे वगैरे.पण आता सिद्धी प्राप्त करणे कठीण आहे बुवा.
- Log in or register to post comments
व
विकास
Sat, 08/22/2015 - 05:11
नवीन
काळाच्या मागे म्हणजे भूतकाळात जाणे scientifically अशक्य आहे
म्हणूनच सामान्य माणसाचे कर्तव्य असते की काळा बरोबर पुढे जाणे आणि स्वत:चा/कुटूंबियांचा उत्कर्ष करणे. आणि समाजातिल नेत्याचे काम असते की पुढील काळाचा विचार करून समाज एकसंघ होईल असे आचार विचार करणे...फूट कशी पाडता येईल त्याचा नाही.
विंदांच्या भाषेतः
इतिहासाचे अवघड ओझे, घेऊन डोक्यावर ना नाचा
करा पदस्थल त्यावर आणिक चढून त्यावर भविष्य वाचा!
- Log in or register to post comments
म
माहितगार
Sat, 08/22/2015 - 05:29
नवीन
विंदांच्या भाषेतः
इतिहासाचे अवघड ओझे, घेऊन डोक्यावर ना नाचा
करा पदस्थल त्यावर आणिक चढून त्यावर भविष्य वाचा!
मस्त !!
- Log in or register to post comments
द
दत्ता जोशी
Sat, 08/22/2015 - 06:36
नवीन
एकाच गोष्टीचा उल्लेख करून बाकी इतिहास खोटा असे म्हणणे म्हणजे आपल्याला सोयीस्कर तेवढ्याच गोष्टी उचलण्याचे उदाहरण आहे
टिळ्कन्नच्य शिवजयंती आणि गणेशोत्सव सार्वजनिक रित्या करण्या मागे एक आणि एकच हेतू होता, तो म्हणजे लोकांनी एकत्र यावे, सभा चर्चा व्हाव्यात आणि स्वातंत्र संग्रामाला हातभार लागावा. त्याकाळी लोक एकत्र आले कि इंग्रज सरकारचे कान टवकारले जायचे. सार्वजनिक सभांवर बंधने होती. शिवजयंती उत्सवासाठी टिळक स्वतः महाराष्ट्रात ठिकठिकाणी जावून सभा घेत. लोकांना उद्बोधन करीत आणि युवकांना प्रेरित करीत हे जगजाहीर आहे. हे उत्सव करून टिळकांना कोणतेही श्रेय लाटायचे नव्हते कि मतदारांना प्रभावित करून कोणती निवडणूक लढवायची नव्हती. पण आता जो वाद होतो आहे तो फक्य्त टिळक ब्राह्मण होते म्हणून कोणतेही श्रेय त्यांना मिळू न देणे, युगपुरुषांची नावे घेवून ठराविक समाजाला भावनिक फुंकर घालणे आणि मतांचे द्रुविकरण करणे हेच आहे यात कोणालच तिळभरही शंका नाही. पण हळूहळू समाज सुशिक्षित होतो आहे. आणि असल्या माकड चेष्टांना भीक घालत नाही हे महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या वेळी दिसून आले.
- Log in or register to post comments
प
पैसा
Sat, 08/22/2015 - 06:58
नवीन
सरकार भक्कमपणे पाठीशी होते म्हणून ते झाले. नाहीतर अवघडच होते. लोक सहसा इथे तिथे जे १०० वेळा ठासून सांगितले जाते त्यावर विश्वास ठेवतात. टिळकांना बोलून संपले नाही म्हणून मग आता आगरकरांचे स्त्री शिक्षण आणि सामाजिक सुधारणांविषय कार्य नाकारले जात आहे. तसले उद्गार असलेली एक मुलाखत एका हुच्चभ्रू संस्थळावर खपवलेली बघून भयानक संताप झाला होता. पण विवेकाचा आवाज हळूहळू क्षीण पडणार आणि प्रचारक सांगतील तोच सोयीस्कर इतिहास "इतिहास" म्हणून खपवला जाणार असे दिसते. ते सहज साध्य झाले नाही तर ऐतिहासिक पुरावे नाहीसे करण्यापर्यंत यांची मजल जाऊ शकते. पाठवा १०० गुंड आणि करा पुन्हा तोडफोड, जाळपोळ. हाकानाका.
- Log in or register to post comments
द
दत्ता जोशी
Sat, 08/22/2015 - 07:31
नवीन
पैसा जी, सरकार खंबीर होतेच पण बहुजनांना भावनिक हूल देवून त्यांच्या ध्रुवीकरणाचा जो प्रयत्न झाला तो यशस्वी नाही झाला असे तुम्हाला वाटत नाही का? बहुजन बहुजन अशी हाकाटी पिटवून सगळ्या महाराष्ट्राला या विरोधात ओढण्याचे राजकारण संपूर्ण फसले. स्वथाही मते संपूर्ण महाराष्ट्राच्या तोंडी घालण्याचे प्रयत्न फोल झाले. दंग करणारे तेच ते मुठभर होते. सर्वसामान्यजनतेने या हाकाटीला भीक नाही घातली त्यांचे करण मला असे वाटते कि या राजकारणाचा आता त्यांनाही कंटाळा येवू लागला आहे.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sat, 08/22/2015 - 09:43
नवीन
http://indianexpress.com/article/opinion/columns/another-shivaji-controversy/
निधर्मांधांचे लाडके इतिहासकार यांनी या लेखात खालील वाक्य लिहिले आहे.
Lokmanya Bal Gangadhar Tilak was the first to recall Shivaji’s role in history by organising a Shivaji festival.
शिवजयंतीचा सार्वजनिक उत्सव नक्की कोणी सुरू केला याविषयीचा वाद आता मिटायला हरकत नाही.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sat, 08/22/2015 - 09:44
नवीन
निधर्मांधांचे लाडके इतिहासकार राम पुनियानी यांनी या लेखात खालील वाक्य लिहिले आहे.
- Log in or register to post comments
फ
फुलथ्रॉटल जिनियस
Sat, 08/22/2015 - 10:50
नवीन
पुनियानी आता संघात आहेत ,त्यामुळे ते आता संघिष्ट तत्वज्ञान पसरवत आहेत.
- Log in or register to post comments
व
विकास
Sat, 08/22/2015 - 14:21
नवीन
हे नक्की कशामुळे म्हणत आहात का? काही दुवा/संदर्भ मिळेल का? का नुसतेच पिल्लू सोडून देयचे? कॉन्फिडन्टली म्हणले की खपून जाईल असे गृहीत धरुन?
- Log in or register to post comments
फ
फारएन्ड
Sat, 08/22/2015 - 18:03
नवीन
संघ पण छुपा ब्राह्मणविरोधी आहे की काय?
http://www.lokmat.com/storypage.php?catid=17&newsid=7539212
- Log in or register to post comments
फ
फुलथ्रॉटल जिनियस
Sat, 08/22/2015 - 18:36
नवीन
फारेंड ,दोन राम पुनियानी आहेत, मी व गुरुजी ज्यांच्याबद्दल बोलत आहोत ते वेगळे आणि या लोकमतच्या लिंकमधले वेगळे.
- Log in or register to post comments
व
विकास
Sat, 08/22/2015 - 19:36
नवीन
वेगळ्या पुनियानींची माहिती /दुवा द्या. माझ्या माहितीप्रमाणे या संदर्भात एकच राम पुनियानी आहेत...
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Mon, 08/24/2015 - 09:49
नवीन
>>> पुनियानी आता संघात आहेत ,त्यामुळे ते आता संघिष्ट तत्वज्ञान पसरवत आहेत.
फिदीफिदी!
नानांनी नवीन जावईशोध लावला. नाना जपून हं. राम पुनियानी तुमच्यावर बदनामीचा दावा दाखल करून बिनभाड्याच्या घरात पाठवतील आणि तुम्ही खडी फोडायला आत गेलात की माईंचे हाल कुत्रा खाणार नाही.
अवांतर - राम पुनियानी हे निधर्मांध आहेत. ते संघाचे कट्टर विरोधक आहेत. ते कधीच संघात नव्हते आणि नाहीत.
- Log in or register to post comments
फ
फुलथ्रॉटल जिनियस
Mon, 08/24/2015 - 10:45
नवीन
पुनियानी संघाचेच आहेत हो! पुरोगामी चळवळी हायजॅक करण्यासाठी संघ अशी लोकं नेमतात,बायदवे तुम्ही कोणत्या पुनियानींबद्दल बोलत आहात?
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Mon, 08/24/2015 - 11:06
नवीन
नाना,
वेड पांघरून माईंच्या माहेरी, कुरसुंगीला, निघालात काय?
राम पुनियानी ही एकच व्यक्ती आहे. हे त्यांचे प्रोफाईल - https://en.wikipedia.org/wiki/Ram_Puniyani
हे कट्टर संघविरोधी, हिंदुत्ववादी संघटनाविरोधी, मुस्लिम लांगूलचालक, निधर्मांध इ.इ. आहेत. त्यांचा संघ विरोध जगजाहीर आहे.
हे पहा त्यांचे वर्णन -
He is involved with human rights activities, communal harmony and initiatives to oppose the rising tide of fundamentalism in India. He is associated with the organisations All-India Secular Forum, Center for Study of Society and Secularism
He is associated with various secular initiatives and has been part of various investigation reports on violation of human rights of minorities. Has been part of an Indian People's Tribunal that investigated the violation of rights of minorities in Orissa and Madhya Pradesh, His approach and views have also been criticised as anti Hindu.
हा त्यांचा लेख वाचा.
https://www.facebook.com/ram.puniyani/posts/10151672703408779
बाबरी मशीद प्रकरणावरून त्यांनी संघाला कायम झोडपले आहे. ते मोदींचे कट्टर विरोधक आहेत. मुस्लिमांविषयी त्यांना कळवळा आहे. या लेखातील खालील परिच्छेद अत्यंत बोलका आहे.
In the next elections RSS is going to use multiple strategies. One, to polarize the society through violence and through keeping alive the issue of Ram temple. Second it is going bank heavily on twin propaganda around Modi, the Gujarat model of development and Modi’s own leadership qualities, i.e. his autocratic style of functioning. For this purpose if Modi is talking about development and toilets it is again a very clever mover. Modi built himself up by polarizing the Gujarat society through post Godhra carnage. During all these years he played the subtle Hindutva agenda of marginalizing the minorities, as is evident in the prevalent conditions in Gujarat. Having consolidated this polarization as a state policy, he changed gears. As the Gujarat society got polarized due to this carnage, his tune was changed to the one of development. This development claims have been punctured by the statistics from various sources. The latest one being that every third child in Gujarat is malnourished. This is the revelation of the findings of the Comptroller and Auditor General. So many other statistics have burst the myth of Gujarat development.
आणि अशा कट्टर संघविरोधकाला आणि मोदीविरोधकाला तुम्ही संघाचा माणूस म्हणता? ठीक आहात ना?
- Log in or register to post comments
फ
फुलथ्रॉटल जिनियस
Mon, 08/24/2015 - 12:42
नवीन
बरोबर, हेच ते पुनियानी, आता ते संघाचे प्रशंसक झाले आहेत.त्यामुळे त्यांनी टिळकांना शिवजयंतीच क्रेडिट दिले आहे.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Mon, 08/24/2015 - 16:31
नवीन
>>> बरोबर, हेच ते पुनियानी, आता ते संघाचे प्रशंसक झाले आहेत.त्यामुळे त्यांनी टिळकांना शिवजयंतीच क्रेडिट दिले आहे.
काहीही फेकू नका नाना. ते कधीपासून संघाचे प्रशंसक झाले? त्यांनी संघाची प्रशंसा केली आहे याचे काही पुरावे आहेत का? निधर्मांधांना एक वाईट व्यसन आहे. आपल्या विचारांविरूद्ध जे बोलतात, कृती करतात ते संघिष्ट असल्याचा शिक्का लगेच निधर्मी मारतात.
मी दिलेल्या लेखातील खालील उतारा राम पुनियानींची विचारधारा ओळखण्यास पुरेसा आहे हा लेख फक्त ४ दिवसांपूर्वी लिहिलेला आहे. २० ऑगस्ट २०१५ पर्यंत तरी राम पुनियानी संघविरोधक होते. त्यानंतर गेल्या २-३ दिवसात ते संघाचे प्रशंसक झाले असल्यास तसे सिद्ध करावे.
In yet another controversy, just before the 2009 assembly elections, a poster of Shivaji killing Afzal Khan with a knife became the provocation for communal violence in the Dhule-Sangli area, during which one person was killed and a tense atmosphere was created. The poster appeared to suggest that Shivaji was the representative of all Hindus while Afzal Khan was standing in for all Muslims. This is fertile ground for hatred to develop, and the consequent violence polarised the communities, which led to the victory of the communal forces.
(२००९ च्या विधानसभा निवडणुकीत मिरज, सांगली व इचलकरंजी भागातल्या तीनही मतदारसंघातून भाजप-सेना युतीचे उमेदवार विजयी झाले होते. त्यांचा विजय हा जातीयवादी शक्तींचा विजय होता आणि या भागात हिंदूंचे प्रतिनिधी असलेल्या शिवाजी महाराजांनी छातीत तलवार खुपसून मुस्लिमांचा प्रतिनिधी असलेल्या अफझलखानाला मारल्याचे पोस्टर लावल्यामुळे जातीय तणाव निर्माण होऊन जातीयवादी शक्ती म्हणजेच सेना-भाजपचे उमेदवार जिंकले असा दावा या पुनियांनी केला आहे. कोणताही संघ प्रशसंक असा दावा करणे आणि असे दोषारोप करणे अशक्य आहे.)
सारांश - तेव्हा नानासाहेब, राम पुनियानी हे संघाचे प्रशंसक कधीपासून झाले आणि त्यांनी संघाची प्रशंसा करायला कधीपासून सुरूवात केली आणि कशी प्रशंसा केली याचे सबळ पुरावे द्या. तसे पुरावे नसतील तर थापेबाजी बंद करा. नाहीतर तुमची थापेबाजी माईंच्या कानावर घालेन.
- Log in or register to post comments
व
विकास
Mon, 08/24/2015 - 16:38
नवीन
- Log in or register to post comments
प
पैसा
Mon, 08/24/2015 - 16:43
नवीन
=))
- Log in or register to post comments
म
माहितगार
Mon, 08/24/2015 - 17:24
नवीन
=))
प्रतिसाद कोणत्या प्रतिसादास आहे माहित नाही पण तुमचं कीट भारी आवडून सोडलंकी हो =))
- Log in or register to post comments
ह
होबासराव
Mon, 08/24/2015 - 16:42
नवीन
१) हिंदूंचे प्रतिनिधी असलेल्या शिवाजी महाराजांनी छातीत तलवार खुपसून मुस्लिमांचा प्रतिनिधी असलेल्या अफझलखानाला मारल्याचे
काय बोलावे, लिहावे कहि सुचत नाहि परस्परच महाराजांचि आणि खानाची वाटणी करुन टाकली.
२)शिक्का लगेच निधर्मी मारतात.
हे जे सो कॉल्ड निधर्मि आहेत..जगाच्या पाठिवर शोधुनसुध्दा ह्यांच्या सारखा धर्मांध कोणि सापडणार नाहि.
- Log in or register to post comments
फ
फुलथ्रॉटल जिनियस
Mon, 08/24/2015 - 17:48
नवीन
Bio
Puniyani was born in British India (1945), and raised in a
Hindi speaking Punjabi Khatri business family in the central
Indian town of Nagpur.
गुरुजी , आता बोला,हे पुनियानी नागपुरात जन्मले आहेत ,यांच्यावर लहाणपणापासुनच संघाचे संस्कार झाले आहेत, ते पुरोगामी अस्ल्याचे नाटक करतात.
- Log in or register to post comments
प
प्यारे१
Mon, 08/24/2015 - 18:03
नवीन
Truely Genius!
हाय का आवाज????
विकासराव, कीट प्लीज.
- Log in or register to post comments
व
विकास
Mon, 08/24/2015 - 19:32
नवीन
आज पुनियानींसाठी ढसाढसा रडण्याचा दिवस आहे. इतके वर्षे संघावर टिका केली, द्वेष केला आणि त्याचं फळ काय तर परत आपणच संघाचे?

- Log in or register to post comments
प
प्यारे१
Mon, 08/24/2015 - 21:02
नवीन
फुलथ्रोटल जीनियस यांचा नागपुरच्या चैत्यभूमीवर ६ किंवा २५ डिसेंबर ला सत्कार घेण्याचा प्रस्ताव मी याठिकाणी ठेवत आहे.
त्या दिवशी राम पुनियानी यांचा फ़ोटो संघाच्या मुख्य कार्यालयातून निघून चैत्य भूमीवर मौलाना दादाद रेकर साहिब यांच्या पाक हातून जीनियसजींना देताना प्रेयर म्हटल्या जातील. ;)
- Log in or register to post comments
अ
अर्धवटराव
Mon, 08/24/2015 - 18:04
नवीन
नागपूरच्या लोकांवर संघाचे संस्कार... हम्म्म. प्रत्यक्ष नागपूरी लोकांसमोर असं काहि बोलु नका. परिणाम भयंकर होऊ शकतात :)
- Log in or register to post comments
म
मृत्युन्जय
Tue, 08/25/2015 - 12:39
नवीन
इतका रद्दी प्रतिवाद करुन उगाच आपले घोडे पुढे दामटवण्याचा प्रयत्न केल्याबद्दल तुमचा जाहीर सत्कार करायला हवा.
पुनियानी नागपुर मध्ये जन्मले म्हणून संघाचे???????????????? तसे असेल तर भाजपेतर पक्षांना नागपुरकरांचे एकही मत नको पडायला? खरे ना? की पडतात ती सगळी मते तात्पुरते नागपुरात स्थलांतरित झालेल्या लोकांची?
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Tue, 08/25/2015 - 15:23
नवीन
>>> गुरुजी , आता बोला,हे पुनियानी नागपुरात जन्मले आहेत ,यांच्यावर लहाणपणापासुनच संघाचे संस्कार झाले आहेत, ते पुरोगामी अस्ल्याचे नाटक करतात.
वा नाना! आवडलं. आता समजलं माई नानांवर का लट्टू झाल्या होत्या.
नानात नाना, नेफळे नाना,
इतर नाना, करिती ठणाणा!
अस्सल नागपूरकर असलेल्या कवी कै. सुरेश भटांनी संघ-हिंतुत्ववाद्यांचा उल्लेख 'भगवी डुकरे' असा केला होता. आयुष्यभर संघ-हिंदुत्व विरोधी असलेले भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस ए. बी. बर्धन हे सुद्धा नागपूरकर आहेत. या दोघांवर संघाचे संस्कार झाल्याचे आजतगायत लपवून ठेवल्याबद्दल दोघांचाही जाहीर निषेध आणि या दोघांचे संघ कनेक्शन उघडकीला आणण्याबद्दल नानांचा श्री. गोळवलकर गुरूजींचा 'विचारधन' हा प्रसिद्ध ग्रंथ भेट देऊन आणि संघाची काळी टोपी भेट देऊन नागपूरच्या रेशीमबागेत जाहीर सत्कार!
- Log in or register to post comments
म
माहितगार
Sat, 08/22/2015 - 16:49
नवीन
खालील
हे कुटून
हे चघळून
अजून रस येईल काय ते माहित नाही :)
चोथा चघळून दमला असाल तर , विकिमिडीया कॉमन्सच्या वती(सौजन्या)ने हा (ह.) घ्या...
गरमा गरम चहा !!
- Log in or register to post comments
म
माहितगार
Sat, 08/22/2015 - 16:54
नवीन
@ प.ग. तुमच्या धाग्यावर बिन बुलाये चहाच्या ब्रेकची ऑफर देऊन अवांतरासाठी क्षमस्व. पण प्रतिसाद वाचून थकला असाल तर आमच्या चहाचा ब्रेक घेऊन पुढच्या शतका कडे वाटचाल होऊ द्या. धाग्यास शुभेच्छा.
(ह.घ्या.)
- Log in or register to post comments
प
पगला गजोधर
Sat, 08/22/2015 - 20:13
नवीन
No probs :)
- Log in or register to post comments
प
पैसा
Sat, 08/22/2015 - 17:09
नवीन
१०० झाल्याबद्दल पगला गजोधर यांचा सत्कार लकडी पुलावर राजा शिवछत्रपतीची पायरेटेड सीडी देऊन करण्यात येत आहे.
शुभेच्छुकः जेपीची विद्रोही ब्रिगेड
- Log in or register to post comments
प
पगला गजोधर
Sat, 08/22/2015 - 20:16
नवीन
For your courtesy
- Log in or register to post comments
अ
अभिदेश
Sun, 08/23/2015 - 22:59
नवीन
प.ग. तुम्ही तुमचा मराठी स्वभाव दखवुन दिला आहे. नुसता वाद घाला , ज्याचा लोकांना कहीही उपयोग नाही. का उगिच वेळ वाया घालवताय... बाबासाहेबांचा विषय संपल्यामुळे तुम्हाला हे दुसरे काहीतरी चघळायल हवे असेल तर गोष्ट वेगळी. मला वाटते की मि.पा. करांनी अश्या विषयांवर प्रतिक्रिया देऊच नये. कित्येक बाबी ह्या अनुन्लेखाने मारायच्या असतात , हि त्यातलिच एक पोस्ट आहे. प.ग. तुम्ही आणि तुमच्या सरख्यांना माझा एकच सल्ला...GET WELL SOON MAAMU...
- Log in or register to post comments
_
_मनश्री_
Mon, 08/24/2015 - 11:17
नवीन
शिवाजी महाराजही गेले
आणि टिळक ,फुले ह्यांना सुद्धा जाउन कितीतरी वर्ष लोटली पण इथे तुम्ही आम्ही बसतो भांडत
ह्यांच्यातल कोणीच कधी अस म्हणाल नव्हत कि आमच्यानंतर भांडत बसा
इतिहास ह्या विषयातून काही प्रेरणादायी शिकण्यापेक्षा इतिहासाचा वापर एकमेकांशी भांडण्यासाठी केला जातो
इतिहासात झालेल्या घटनांवरून बोध घेताना कोणीच दिसत नाही
खर तर ह्या देशाचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे तो असा कि जनता नेत्यांना जाब विचारण्यापेक्षा आपापसात भांडत बसलेत ,
आणि सगळेच नेते जनतेच्या मनात परस्पर द्वेषाची बीजे रोवून स्वतःची पोळी भाजून घेतात
कधी जात पात तर कधी आणखी कुठल्या कारणावरून
ते सगळे बघतात मजा आणि जनता भांडतीये
divide and rule हीच नीती वापरून राज्यकर्ते राज्य करताहेत
मूळ समस्यांवरून लोकांच लक्ष विचलित करतात
भाषिक आणि प्रादेशिक अस्मिता ह्याच्यातच अडकून पडलेत सगळे , हयात नसलेल्या माणसांसाठी भांडायला सगळे पुढे...
खर तर आज आपल्याकडे गरिबी, बेरोजगारी ,प्रदूषण ,वाढती गुन्हेगारी ह्या आणि इतर हजारो समस्या असताना त्या सोडवायच्या राहिल्या बाजूला.......
आणि शिवजयंती ,गणेशोत्सव कशासाठी सुरु केले होते ?
आपापसातील भांडण मिटवून एकत्र येण्यासाठी आणि इथ त्या शिवजयंती वरूनच भांडण
तसही आजकाल शिवजयंती आणि गणेशोत्सव साजरा करतात म्हणजे काय ? वर्गण्या गोळा करून चार रिकामटेकडी टाळकी लाउड स्पिकरच्या भिंती उभारून दारू पिउन धिंगाणा घालणार
अश्या जयंत्या साजऱ्या करण्यापेक्षा त्या पैशातून काहीतरी समाजोपयोगी करा
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4
- ›
- »