सुंदर पिचई आणि ऐंशीच्या दशकातली गरीबी...
सुंदर पिचईबद्दल लेख वाचला लोकमतमधे...
आजकाल कुणीही यशस्वी झाला की तो कसा गरिबीत जगला याचं फारच चर्वितचर्वण करतात बॉ पत्तर्कार लोक. काय तर म्हणे "तीनच" खोल्यांचं घर होतं, 'स्कूटर'वरून चौघे फिरायचे, 'साधा' टेलिफोनही नव्हता (१९८५), तो आणि त्याच्या भावाला बाहेरच्या खोलीत झोपायला लागायचं.. अरे काय राव गरिबाची चेष्टा करताय. हे ऐंशीच्या दशकातल्या एका साध्या गरिब मध्यमवर्गीय कुटूंबाचं वर्णन आहे का? आयआयटीत पदवी आणि स्टॅनफर्डमधे पदव्युत्तर शिक्षण घेणारा गरिब मध्यमवर्गीय? जनरल इलेक्ट्रीक मध्ये वरिष्ठ अभियंता पदावर असणारे वडील गरिब मध्यमवर्गीय?
ऐंशीच्या दशकात टीवी, कार्स, फोन्स, बंगलोज हे फक्त अतिश्रीमंत, धनाढ्य व गर्भश्रीमंत लोकांकडेच होते. त्यांच्याशिवाय जे ही भारतीय होते ते सर्व गरीब? माझ्यामते तर अभियंता, डॉक्टर असणारे, मोठ्या कंपनीत, बँकेत नोकरी असणारे, स्कूटर, घर वैगेरे असणारे सुखवस्तू, सेटल्ड समजले जात होते. गरीब नाही. सुशिक्षित व सुखवस्तू घरांमधे या मुलांना योग्य त्या संधी मिळणे यात काय मोठं आहे? की उगाच कि...त्त्ती गरीब होते म्हणून त्यांचे फुकाचे कौतुक.
अशी वर्णने वाचली की आम्ही जी गरीबी बघितली 'त्ये काय व्हतं मग?' असं विचारायला होतं बुवा.
माध्यमांमधून खर्या गरिबीची अवहेलनाच होत नाहीये का?
की कुणीही यशस्वी झाला की तो गरिबच होता हे अट्टाहासाने सांगितलं तरच त्याच्या यशाला उजळपणा येतो?
कि लोकांना असलंच काही (रॅग्स टू रिचेस) वाचावंसं वाटतं म्हणून पत्रकार रंगवतात कहान्या?
मुन्शीपाल्टीच्या दिव्याखाली अभ्यास केला वैगेरे सांगितले की फार रोम्यांटीक वाटतं.. नाही का?
तुम्हाला काय वाटतं मंडळी...? ऐंशीच्या दशकात जे विशीत होते त्यांच्याकडून ऐकायला आवडेल.
💬 प्रतिसाद
(73)
ब
बाबा योगिराज
Wed, 08/26/2015 - 16:22
नवीन
खाबुजीचा फेक्मत आला की धागा प्रगतीच करत जातो. लवकरच हा धागा सम्बर लम्बरी होवो हिच का ही ही इच्छा.
जय खाबुजी.
- Log in or register to post comments
प
पैसा
Wed, 08/26/2015 - 18:43
नवीन
१९८५ साली गरीब? मी १९८७ साली बँकेत नोकरीला लागले तेव्हा माझा पगार महिना १०५० रुपये होता. घराचे कर्ज फक्त स्टाफला मिळत असे. त्याची लिमिट जास्तीत जास्त दीड लाख रुपये होती. त्यात साधारण २ लाख रुपये किंमतीचा फ्लॅट कसाबसा घेता यायचा. इतर पब्लिकला घराचे कर्ज जाम महाग असायचे.
मुंबईत घर घेणे तेव्हाही दुरापास्त होते. डोंबिवली ठाणे वगैरे भागात रहाणारे लोक बहुधा वन रूम किचनचे लहानसे फ्लॅट घेत असत. चेन्नै हे मुंबईप्रमाणे मेट्रो असल्याने तिथे परिस्थिती वेगळी असेल असे वाटत नाही. तीन खोल्यांचे घर म्हणजे लैच मोठी उडी झाली. कोणाकडे बजाजची स्कूटर असलीच तर बहुधा सेकंड हँड असायची. सायकली फ्याशन म्हणून नव्हे तर गरज म्हणून वापरात होत्या. साधा टेलिफोन कोणाकडे असायचा? अगदी १९९० सालीसुद्धा टेलिफोन सहज मिळत नव्हते. बहुतेक १९९५ मधे आमच्याकडे टेलिफोन आला. आणि १९९८ ला डायल अप इंटरनेट. मात्र १९८५ साली आम्ही गरीब नक्कीच नव्हतो. भले श्रीमंत म्हणता येणार नाही, पण खाऊन पिऊन सुखी मध्यमवर्गीय.
सुंदर पिचाईचे वर्णन गरीब घराचे नक्कीच नाही. त्या काळातले कोणत्याही प्रातिनिधिक मध्यमवर्गीय घराचे आहे. तीन खोल्यांचे घर म्हणजे बहुतेक उच्च मध्यमवर्गीय असावेत.
- Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी
Wed, 08/26/2015 - 19:10
नवीन
पैतै अशाच तंत्रकुशल बनल्या नाहीत.
१९९८ साली फार कमी लोकांकडे इंटरनेट जोडणी असायची. माझ्या माहितीप्रमाणे आमच्या शहरात एकच सायबर कॅफे होते. एका तासाला बहुधा ₹१२० की ₹१५० शुल्क होते.
माझ्या घरी २००१ मध्ये संगणक घेतला. २००२ मध्ये इंटरनेट जोडणी काही दिवस घेतली होती. महाग पडत असल्याने काही महिन्यांनी काढून टाकली.
- Log in or register to post comments
प
पैसा
Wed, 08/26/2015 - 19:17
नवीन
आधी डायल करा. मग वाट बघत बसा. गूगल सर्च पेज ओपन होईपर्यंत भाजीला फोडणी घालून यायचं. दुसरं पेज ओपन होईपर्यंत भाजी शिजायची. १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला दिवसभर इंटरनेट फुकट असायचं आणि रात्री बहुतेक ११ नंतर. पण स्पीड काय विचारायचं नाही. जीमेल नंतर आली. आधी एमेसेन. माझा पहिला ईमेल आयडी @msn.com वाला आहे.
- Log in or register to post comments
अ
असंका
Wed, 08/26/2015 - 19:25
नवीन
गुगल होतं काय तेव्हा पण? मला वाटलेलं तो याहूचा जमाना होता....
- Log in or register to post comments
प
पैसा
Wed, 08/26/2015 - 19:32
नवीन
गुगल सर्च तेव्हा बीटा अवस्थेत होतं. पण होतं.
- Log in or register to post comments
श
शब्दबम्बाळ
Wed, 08/26/2015 - 19:33
नवीन
टीईईईईई टू टुक टुक टुक.....टुक टुक टुक ट्याव ट्याव
काय भारी आवाज यायचा डायल अपचा!! :D
अस वाटायचं कि आपला कम्प्युटर बोलतोय आपल्याशी त्याच्या भाषेत...
आपण खूप काहीतरी भारी शोध लावणारे आता अशी फिलिंग यायची मला तर! :)
- Log in or register to post comments
प
पैसा
Wed, 08/26/2015 - 19:36
नवीन
=)) अगदी अगदी!
- Log in or register to post comments
अ
असंका
Wed, 08/26/2015 - 19:42
नवीन
काय बरोब्बर बोललात वा! अगदी असंच वाटायचं....!
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
गुरुवार, 08/27/2015 - 09:06
नवीन
हा हा हा, एकदम हळवे केलेत जुन्या आठवणींनी.
- Log in or register to post comments
र
रेवती
गुरुवार, 08/27/2015 - 18:57
नवीन
आम्ही ९९ साली एक रुपाया प्रतिमिनिट असे इंटरनेट वापरले. नंतर ते ५०, ३०, २५ रूपयांपर्यंत कमी होत गेले.
- Log in or register to post comments
अ
असंका
गुरुवार, 08/27/2015 - 19:06
नवीन
व्ही एस एन एल द्यायची डायल अप सेवा...त्यांचं ऑफीस लय कुठल्या कोपर्यात होतं पोलीस परेड ग्राउंडच्या तिकडे पुण्यात...
काय शोधाशोध केली होती.... साई इंटरनेट की कायतरी नाव होतं त्यांचं. इंटरनेटचा पॅक वेगळा आणि फोनचं बिल वाढून यायचं ते वेगळं ...
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
गुरुवार, 08/27/2015 - 07:00
नवीन
वन बी.एच.के घरालाही तीन खोल्यांचेच घर म्हणता येईल.मी लहानपणी ठाण्याला होतो तेव्हा आमचेही वन बी.एच.के च घर होते. तीन खोल्यांचे घर म्हणजे तीन बेडरूमचे घर अशी कन्सेप्ट काही ठिकाणी सध्या वापरात आहे.ती त्या काळी होती असे वाटत नाही. अर्थातच पिचाई हे श्रीमंत नसले तरी खाऊन पिऊन सुखी मध्यमवर्गीय असे नक्कीच म्हणता येईल.
- Log in or register to post comments
प
पैसा
गुरुवार, 08/27/2015 - 07:04
नवीन
वन बीएचके ते. तेव्हा तीन बेडरूम्स म्हणजे ३ खोल्यांचे घर असे म्हणत नव्हतेच.
- Log in or register to post comments
न
नमकिन
गुरुवार, 08/27/2015 - 08:39
नवीन
स्थल, काल, कार्य, संपन्न, असे मुद्दे असुनही गाडी भरकटुन (वैचारिक चुंबकीय शक्ती) गेली कर्तुत्व विषयाकडे.
कदाचित मूळ लेखन परदेशी भाषेत झाले असावे (परदेशी ठिकाणी) त्या अाधारे पुढील सर्व बेतलेले दिसत आहे, त्यात "ष्टोरी" छापन्याची घाई असणार, मग कुठला स्थलकाल अभ्यास! चालायचंच.
स्पर्धा, दर्जा दुर्लक्षित.
- Log in or register to post comments
श
शरभ
गुरुवार, 08/27/2015 - 09:46
नवीन
एक माणूस म्हणून बघताना, अशा एखाद्या गोष्टीचा उदो उदो केला जावा का ?
भारतीय आहेत म्हणुन.... अभिमान वाट्तोय.
मराठी असते तर ......अत्याभिमान वाट्ला असता
मराठी अमुक एक जातीचे असते तर्...उर फूटून आलं असतं
आडनाव बंधू असते तर... अती होतय, आवरा....
- Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर
गुरुवार, 08/27/2015 - 12:35
नवीन
पूर्वीच्या काळी जी मर्यादेत कवतिके व्हायची तेच बरे असे म्हणावे लागतेय असे ह्यांचे मत.
सुंदर भारतीय म्हणून भारतीय खूष
सुंदर चेन्नईचा म्हणून चेन्नईकर खूष.
सुंदर तामिळ ब्राम्हण म्हणून अय्यर्,अय्यंगार खूष.
सुंदर आय.आय.टी.चा म्हणून आय आय टी मेटॅलर्जीवाले खूष.
सुंदर आय.टी.त म्हणून आमचे हिंजवडी,मगरपट्टावाले खूष.
सुंदर एन.आर.आय. म्हणून आमचे अमेरिकन एन.आर.आय. खूष.
- Log in or register to post comments
र
राही
गुरुवार, 08/27/2015 - 14:02
नवीन
भारतातल्या मध्यमवर्गाच्या विस्तारीकरणाची सुरुवात बँकांच्या राष्ट्रीयीकरणापासून झाली असे मानता येईल. तोपर्यंत अर्थक्षेत्राशी कारकूनवर्गाचा फारसा संबंध नव्हता. राष्ट्रीयीकरणानंतर निमशहरी आणि शेतमालाच्या बाजारपेठांच्या गावातही सरकारी बँका सक्तीने का होईना, पोचल्या. शाखावृद्धीमुळे हजारोंना नोकर्या मिळाल्या. आर्थिक जगताचे एक अद्भुतरम्य दार सामान्य भारतीयांसाठी उघडले. परकीय चलन, मोठ्या कंपन्यांचा पतपुरवठा, त्यांचे व्यवहार, शेअर बाजार अशा कधी न ऐकलेल्या जगात मध्यमवर्ग डोकावू लागला. एक प्रकारे अलीकडच्या आय.टी. क्रांतीचेच ते एक मिनिरूप होते. त्यानंतर सुमारे दहा वर्षांनी एशिअन गेम्सच्या निमित्ताने टेलिविजनचे जाळे भारतात पसरले. हे गेम्स पाहाता यावे म्हणून दर दिवशी एक टीवी टॉवर या वेगाने सुमारे एकदीड वर्ष टॉवर (वसंत साठे यांच्या धडाडीमुळे) उभारले गेले. यामुळे इलेक्ट्रॉनिक्स मध्ये नोकरीधंद्याच्या संधी वाढल्या. टीवीवरून संपन्न जगताची झलक सर्वसामान्यांना दिसली. कन्ज़्यूमर गुडसची मागणी आणि उत्पादन वाढले. यानंतर संगणकयुगाचा पाया घातला गेला. गावोगावी टेलिफोन एक्स्चेन्जिस पोचली. संपर्कक्रांतीची ती सुरुवात होती. शहरात डिजिटल युग अवतरले आणि त्यामुळे निकामी झालेली एक्स्चेन्जिस निमशहरी भागात धाडली गेली. या नंतर भारतीय मध्यमवर्गाने मागे वळून पाहिले नाही.
साधारणपणे १९५० ते १९७५ पर्यंत गरीबी होती. लाल बहादुर शास्त्रींनी १९६५च्या युद्धादरम्यान भारतीयांनी वर्षभर एक दिवस उपास करावा म्हणजे ५५ कोटी जेवणे वाचतील असे आवाहन केले होते आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळाला होता. १९७१च्या पाक युद्धानंतर समारंभातल्या जेवणावळींवर निर्बंध आले होते. फक्त पन्नास माणसांना जेवण घालता येई. किती अन्न शिजले आहे ते तपासण्यासाठी पोलीस धाडी घालीत. मग एकावेळी फक्त पन्नास जणांचा स्वयंपाक शिजवण्याची शक्कल लोकांनी काढली. काहींनी तांदुळाऐवजी वर्यांचा भात वाढला.
नंतर कृषिक्रांतीमुळे काळ्या बाजारातून साखर किंवा राशनचे धान्य घेण्याची गरज मध्यमवर्गाला राहिली नाही. चैनीच्या वस्तूंची खरेदी वाढली. पूर्वी फर्निचर म्हणजे एक गोद्रेज किंवा गद्रेचे कपाट, एक सिंगर मशीन, एक लोखंडी खाट आणि बसायला खुर्च्या इतक्याच वस्तू असत. दिवाळीला मोती साबण ही चैनीची परमावधी होती. बजाज स्कूटरसाठी पाच पाच वर्षांची प्रतीक्षायादी असे आणि डिलिवरीच्या वेळी तुफान काळाबाजार चाले. कित्येक तर ऑन पैसे मिळवण्यासाठी बुकिंग करून ठेवीत. मारुतीने स्कूटरची मिजास उतरवली. मराठी मध्यमवर्ग शेअर बाजारात १९७५-८० नंतर उतरला. उद्योगांच्या विस्तारीकरणामुळे खूप प्रायमरी ऑफर्स (आय.पी.ओ) असत. त्या वेळी दहावीस शेअर्स लागलेले लोक आज कोट्यवधीचे मालक असतील, जर त्यांनी ते विकले नसतील तर. या बरोबरच चाळ आणि वाडा संस्कृती लयाला जाऊन वन बी एच के संस्कृती आली. त्या काळचा उच्चमध्यमवर्ग उदयास आला.
दारिद्य तेव्हाही होते, आताही आहे. पण दारिद्र्याच्या व्याख्येत फरक झाला आहे.
- Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर
गुरुवार, 08/27/2015 - 16:17
नवीन
काय रे हे राही?
- Log in or register to post comments
क
कंजूस
गुरुवार, 08/27/2015 - 16:00
नवीन
काही कळलं नाही.
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
गुरुवार, 08/27/2015 - 19:13
नवीन
माझ्या उत्त्पन्नात काही फरक पडलाय का? मग मी ते वाढायसाठी अजुन कष्ट करु का सुंदर पिचईंचे गोडवे गात फिरु? हे गृहस्थ पुर्वी गरिब होते का सोन्याच्या पलंगावर झोपत होते ह्याची वायफळ चर्चा कशाला पाहिजे? त्यांच्या कष्टाचं फळ त्यांना मिळालं म्हणा आणि त्यातुन शिका ना ४ गोष्टी.
- Log in or register to post comments
अ
असंका
गुरुवार, 08/27/2015 - 19:14
नवीन
एक नंबर कप्तानसाहेब!
- Log in or register to post comments
श
शरभ
Fri, 08/28/2015 - 08:54
नवीन
हा असला उदो उदो करुन काय मिळनारे?
अहो, असेच एक भारतीय एका मोठ्या फर्मचे सी इ ओ झाल्यावर, भारतात किती तरी जॉब कट झाले. Employee वरुन vendor झालो, हा स्वानुभव आहे. त्यावेळी नोकरी जाउन बेकार झालो नाही हेच नशीब. तस्मात, ह्या लोकांकडून शिकावं आणि पुढे जावं हेच उत्तम. He deaserved it, its his own achievement, that's it.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2