Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मराठी प्रतिशब्दांची यादी कुणाकडे आहे का?

स
सुचिकांत
Sun, 08/30/2015 - 15:50
🗣 45 प्रतिसाद
माझ्या एका मित्राला बँक या शब्दाचा मराठी प्रतिशब्द हवा आहे. त्यावर चर्चा करत असताना माझ्या लक्षात आले कि मागे मी मिसळ पाव वर १ प्रतिशब्दांची यादी पहिली होती. गुगल वर तसे शोधून देखील पाहिले पण दुर्दैवाने सापडली नाही. कृपया कुणाजवळ ती यादी असल्यास देता का? लिंक दिली तरी चालेल.

प्रतिक्रिया द्या
8738 वाचन

💬 प्रतिसाद (45)
म
माहितगार Sun, 08/30/2015 - 16:06 नवीन
मिपावरील यादीचे इतर मिपाकर सांगतीलच. मराठी विकिपीडियावर ऑनलाईन मराठी शब्द कोशांची यादी उपलब्ध आहे. शुभेच्छा
  • Log in or register to post comments
म
मांत्रिक Sun, 08/30/2015 - 16:07 नवीन
अधिकोष म्हणतात बहुतेक. बाकी सदस्य सांगतीलच.
  • Log in or register to post comments
ज
जेपी Sun, 08/30/2015 - 16:28 नवीन
बॅंकच म्हणतात बहुतेक.बाकी सदस्य सांगतीलच. (ब्यन्कवाला) जेपी
  • Log in or register to post comments
ज
जेपी Sun, 08/30/2015 - 16:30 नवीन
पतपेढी असा एक शब्द सापडला.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Sun, 08/30/2015 - 16:36 नवीन
पतपेढी म्हणजे इंग्रजीत क्रेडीट (कोऑपरेटीव्ह) सोसायटी. मराठीत अधिकोष म्हणजे बँक हे बरोबर आहे पण वर्ध्यातील एका को-ऑपरेटीव्ह बँकेशिवाय इतरत्र अधिकोष हा शब्द फारसा पाहण्यात येत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
म
मांत्रिक Sun, 08/30/2015 - 16:41 नवीन
बरोबर. माहितगार साहेब. पत : क्रेडिट पेढी : संस्था
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
अ
अभ्या.. Sun, 08/30/2015 - 16:50 नवीन
अधिकोष अथवा कोषागार हे ट्रेझरीला वापरले जातात बहुधा. (किंवा करन्सी चेस्ट ला)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
म
मांत्रिक Sun, 08/30/2015 - 16:53 नवीन
नाय रे भावा. ट्रेझरीला कोषागार म्हणतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
स
सुचिकांत Sun, 08/30/2015 - 16:45 नवीन
धन्यवाद सर्वांचे.
  • Log in or register to post comments
स
सिरुसेरि Sun, 08/30/2015 - 17:52 नवीन
बँक या संस्थेला ईंग्लिशमध्ये 'फायनान्शिअल इन्स्टिटयुट' असेही म्हणतात . ज्याचा मराठित 'आर्थिक संस्था' असाही प्रतीशब्द होतो .
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी Sun, 08/30/2015 - 17:53 नवीन
असे प्रश्न विचारण्यासाठी स्वतंत्र धागे काढण्याऐवजी सदाहरित धाग्यांवर प्रतिसादाद्वारे प्रश्न विचारावे असे मिपाचे मार्गदर्शक तत्व आहे. कृपया त्याचे पालन करावे. मला ठाऊक असलेल्या इंग्रजी शब्दांवरून मराठी प्रतिशब्द शोधण्याचे ऑनलाइन सुविधा -
  • पारिभाषिक शब्दांचा शोध
  • मोल्सवर्थ शब्दकोश
  • दाते कर्वे शब्दकोश
  • मराठी भाषा विभाग
याशिवाय गुगल ट्रान्सलेटर पण आहेच.
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Sun, 08/30/2015 - 18:01 नवीन
ह्यो रंगान्ना मिपाची ब्यांक हाय बगा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी
ड
डॉ सुहास म्हात्रे Sun, 08/30/2015 - 18:24 नवीन
+१०० याला माजे दणकून आणूमोदन !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
स
सुचिकांत Sun, 08/30/2015 - 18:30 नवीन
होय. तुमचे मुद्दे बरोबर. म्हणून मी इथे गेलो होतो अगोदर. http://www.misalpav.com/helpquestions.html मागे मी मिपावरच अतिशय चांगली यादी पाहिली होती, सापडली नाही म्हणून प्रश्न विचारला. यापुढे लक्षात ठेवीन नाहीतर सरळ तुम्हाला संपर्क साधीन. धन्यवाद सुचिकांत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी
प
प्रसाद भागवत Sun, 08/30/2015 - 18:07 नवीन
जरा मलाही मदत हवी आहे.'volatality' या शब्दाला 'चढ-उतार' पेक्षा चांगला प्रतिशब्द्च कोणी सुचवेल तर आभारी असेन.
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी Sun, 08/30/2015 - 18:12 नवीन
अस्थैर्य हा शब्द चालेल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद भागवत
प
प्रसाद भागवत Mon, 08/31/2015 - 07:01 नवीन
धन्यवाद, परंतु अस्थेर्य म्हणजे instability असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी
म
मांत्रिक Sun, 08/30/2015 - 18:13 नवीन
व्होलॅटाईल या शब्दाचे रुप आहे का? मग मला तर तुडतुड हाच शब्द योग्य वाटतो. हे असुरनिकंदिनी तुडतुडी ताई मज पामराला क्षमा कर!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद भागवत
आ
आदूबाळ Sun, 08/30/2015 - 18:41 नवीन
थरथराट. ह घ्या, डॅम ईट!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद भागवत
ग
गॅरी ट्रुमन Sun, 08/30/2015 - 18:46 नवीन
मग "व्होलॅटिलिटी स्माईल" ला "थरथराट हास्य" म्हणणार का? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
ज
जयंत कुलकर्णी Mon, 08/31/2015 - 05:21 नवीन
त्या शेअरच्या किंमतीत "खळबळ'' आहे...हे कसे वाटते ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद भागवत
प
प्रसाद भागवत Mon, 08/31/2015 - 07:03 नवीन
धन्यवाद, काही अंशी ठीक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी
D
dadadarekar Sun, 08/30/2015 - 19:45 नवीन
गामा पैलवान या आयडीला विचारा
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sun, 08/30/2015 - 20:49 नवीन
तरल.volatile liquid;oils;तरल प्रवाही;तरल तैल द्रव्ये vulnerable:नाजुक,अस्थिर,लेचापेचा. बँक:पेढी.cheque:हुंडी.encash:वटवणे.raise a fund,corpus:कोश करणे.transfer debit /credit येणे /देय रकम वर्ग करणे.transfer balance amt to xx a/c: निव्वळ शिल्लक खात्यास वळती करणे.
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Sun, 08/30/2015 - 21:22 नवीन
तरलतेतून volatility चा अर्थ बोध होत नाही. भागवतांनी विचारलेला शब्द त्यांच्या ट्रॅक वरुन शेयर बाजारासंदर्भात विचारला असण्याची शक्यता मला जास्त वाटते आहे. शेयर बाजार volatile असतो म्हणजे तरल असतो हे तांत्रिक दृष्टया बरोबर असलं तरी अतिच मिळमिळीत वाटतंय. ज़रा त्या भावनेशी संबंधित शब्द यायला हवाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
प
प्रसाद भागवत Mon, 08/31/2015 - 07:06 नवीन
प्यारे साहेब, बरोबर. 'बाजारातील volatility.......' असे काहीसे वाक्य आहे. सध्या मी 'दोलायमानता' अशा शब्दापर्यंत पोहोचलो आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
प
प्यारे१ Sun, 08/30/2015 - 21:22 नवीन
तरलतेतून volatility चा अर्थ बोध होत नाही. भागवतांनी विचारलेला शब्द त्यांच्या ट्रॅक वरुन शेयर बाजारासंदर्भात विचारला असण्याची शक्यता मला जास्त वाटते आहे. शेयर बाजार volatile असतो म्हणजे तरल असतो हे तांत्रिक दृष्टया बरोबर असलं तरी अतिच मिळमिळीत वाटतंय. ज़रा त्या भावनेशी संबंधित शब्द यायला हवाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
क
कंजूस Mon, 08/31/2015 - 04:26 नवीन
मग स्फोटक,तट्ट,{ वर का खाली सांगता येत नसेलतर}उटपटांग.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद भागवत Mon, 08/31/2015 - 07:17 नवीन
उटपटांग...is interesting. Thnx.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
स
सुबोध खरे Mon, 08/31/2015 - 06:05 नवीन
volatilityला शेअर बाजाराच्या भाषेत अस्थिर हा शब्द जास्त बरोबर वाटतो.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 08/31/2015 - 07:01 नवीन
+१ हेच लिहिणार होतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
ड
डायवर Mon, 08/31/2015 - 07:07 नवीन
संप्लवनशीलता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
प
प्रसाद भागवत Mon, 08/31/2015 - 07:18 नवीन
धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डायवर
प
प्रसाद भागवत Mon, 08/31/2015 - 07:14 नवीन
डॉ. साहेब, अस्थिर आणि volatile यात माझ्यामते फरक आहे. छोटी छोटी कंपने म्हणजे अस्थिर उलट हिंसक वा आक्रमक पद्ध्तीने अस्थिर म्हणजे volatile. सी-सॉ सारखे मोठे हेलकावे म्हणजे volatile
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
र
राही Mon, 08/31/2015 - 06:21 नवीन
तरल म्हणजे बहुधा फ्लुइड. वोलटाईल साठी रोजच्या वापरातला शब्द सुचत नाही. पण पारिभाषिक म्हणून संप्लवनशील वापरता येईल. खरे तर संप्लवन म्हणजे घनस्थितीतून एकदम वायुस्थितीत जाणे, मधली द्रवस्थिती ओलांडून. पण चालू शकेल. प्लु म्हणजे उडी मारणे. यावरून प्लाव्य, प्लवनीय, प्लवीभवन, प्लुत, प्लुति असे शब्द बनू शकतील, उत् लावूनही शब्द बनू शकतील पण ते फार कृत्रिम वाटतात. गुजरातीत रोजच्या वापरातला शब्द असावा कारण अर्थव्यवहारातल्या अनेक संकल्पना या समाजात आधीपासून अस्तित्वात आहेत, त्यामुळे शब्दही असतील. शोध घेतला पाहिजे.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद भागवत Mon, 08/31/2015 - 07:10 नवीन
उत्तम प्रतिसाद, संप्लवनशील हा शब्द व्यक्तीशः आवडला पण समजायला सोपा नसल्याने वापरणे कठीण. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
क
कंजूस Mon, 08/31/2015 - 06:56 नवीन
मुंबइ समाचार पेपर वाचून सांगतो. तिकडे म्युनिसिपालटी साठी सुधराई म्हणतात. कॅलक्युलेशनला गणत्री. बंगाली लोक रस्त्यावरच्या भाजीवाल्या फेरीविल्यांचा माल जप्त करायला येणाय्रा म्युनी• च्या गाडीला हल्लागाडी म्हणतात. मोठे सिमकार्ड कापावे लागते तो कापलेला तुकडा कधीकधी जपून ठेवावा लागतो त्यात ठेवून जुन्या फोनमध्ये पुन्हा बरोबर बसते.त्या तुकड्याला चड्डी हा शब्द आहे.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 08/31/2015 - 07:08 नवीन
मोठे सिमकार्ड कापावे लागते तो कापलेला तुकडा कधीकधी जपून ठेवावा लागतो त्यात ठेवून जुन्या फोनमध्ये पुन्हा बरोबर बसते.त्या तुकड्याला चड्डी हा शब्द आहे. त्या चड्डीचे कापताना बर्‍याचदा तुकडे पडून निकामी होते. त्याऐवजी SIM CARD Adapter Nano to Micro - Nano to Regular - Micro to Regular With eject pin वापरा. काही दिवसांपूर्वी मी रु १०० ला विकत घेतला होता... आता रु ५५ ला मिळतो. स्वस्त आणि मस्त !
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Mon, 08/31/2015 - 10:39 नवीन
खरडफळ्यावर कोणीतरी बँकेला "पतसंस्था" असा शब्द सुचवला होता.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Mon, 08/31/2015 - 11:35 नवीन
१)आता आहे त्या स्थितीपेक्षा वाईट होण्याची भिती असेल तर डळमळीत २)आता आहे त्यापेक्षा अचानक उसळी {वरती }मारेल अथवा कोसळेल काहीच सांगता येत नसेल तर उटपटांग ३)आता आहे त्यापेक्षा आठएक दिवसात वगैरे {खालीच} घसरत जाईल यासाठी अस्थिर ???
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Mon, 08/31/2015 - 11:40 नवीन
ब्लड बँक - रक्त पेढी बुक बॅंक - पुस्तक पेढी बँक = पेढी किंवा अर्थ पेढी किंवा धन पेढी
  • Log in or register to post comments
स
संजय पाटिल Tue, 09/01/2015 - 08:58 नवीन
मनी बँक = अर्थ पेढी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
च
चैतू Mon, 08/31/2015 - 21:57 नवीन
सावरकरांनी आपल्या खालील पुस्तकांमधून इंग्रजी भाषेचे प्रतिशब्द दिलेले आहेत. १. मराठी भाषेचे शुद्धीकरण आणि शब्दकोश http://www.savarkarsmarak.com/bookinpdfformat.php?id=58 २. भाषा शुद्धी- लेख http://www.savarkarsmarak.com/bookinpdfformat.php?id=59
  • Log in or register to post comments
अ
अमेरिकन त्रिशंकू Mon, 08/31/2015 - 22:16 नवीन
अस्थिर = अन्स्टेबल दोलायमान = ऑसिलेटिंग
  • Log in or register to post comments
प
प्रसाद भागवत Tue, 09/01/2015 - 04:02 नवीन
नक्कीच, म्हणुन तर त्यातल्या त्यात 'दोलायमान' हा मला अभिप्रेत अर्थाच्या 'जवळ पोहोचतो' असे म्हणालो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमेरिकन त्रिशंकू
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा