Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

भारतात वृद्धाश्रम वाढत आहेत.

ह
हेमंत लाटकर
Wed, 09/02/2015 - 08:39
🗣 159 प्रतिसाद
आपल्या भारत देशातील वृद्धांची अवस्था बघुन मन भरून येते. मागच्या काही वर्षापासून आपल्या देशात वेगाने वृद्धाश्रमांची संख्या वाढते आहे. भारता सारख्या देशात जिथे आई-वडिलांना देवासारखे समजले जाते, तिथे अशा प्रकारची वागणुक बघुन मन अस्वस्थ होते. खरच आपण इतके पुढारलेले आहोत का आज आई-वडिल आपल्याला जड होत आहेत. ज्या घरात त्यांनी आपल्या रक्ताचे पाणी केलेले असते त्याच घराच्या एका कोपर्यात त्यांना पडलेले पाहून मन दु:खी होते. आई-वडिल अशी आशा करतात की त्यांची मुले म्हातरपणी त्यांचा आधार होतील. वृद्धांना स्वाभीमानाने फक्त दोन वेळचे जेवण व मुलांचे प्रेम पाहिजे असते. प्रत्येक मुलांनी हा विचार करावा ज्यांनी मुलांच्या सुखाकरता आपले पुर्ण आयुष्य घालवले. त्यांच्यासाठी थोडा वेळ द्यावा. त्यांच्यावर वृद्धाश्रमात जाण्याची वेळ येऊ देवू नये.
वर्गीकरण
काथ्थ्याकुट

प्रतिक्रिया द्या
54687 वाचन

💬 प्रतिसाद (159)
त
तिमा Wed, 09/02/2015 - 12:36 नवीन
सर्वप्रथम माणसाने भावनाशील असू नये. म्हातारपणी आपली अडगळ होऊ नये म्हणून स्वतःहून वेगळे व्हावे व रहावे. पुढे, तब्येती ढासळल्या तर जरुर वृद्धाश्रमात जाऊन रहावे. तरुण पिढीचे जीवन इतके धकाधकीचे झाले आहे की त्यांचा प्रॉब्लेम होऊन राहू नये. - एक वृद्ध, तिमा
  • Log in or register to post comments
ह
हेमंत लाटकर Wed, 09/02/2015 - 15:08 नवीन
सर्वप्रथम माणसाने भावनाशील असू नये. तुमचे म्हणणे बरोबर आहे. आई-वडिलांनी मुलांवर जास्त अवलंबून राहु नये. आपल्या म्हातारपणीची सोय करावी, सगळे मुलांना देऊन टाकू नये. मुलाचे लग्न झाल्यावर त्याला वेगळे राहु द्यावे. कारण आजकाल मुलीनां स्वतंत्र राहवे वाटते. पण मुलीच्या आई-वडिलांनी मुलीच्या संसारात लक्ष घालू नये. याबाबतीत अमेरीकन लोकांचे चांगले आहे. ते मुलांना लहानपणापासून स्वावलंबी बनवतात. मुलेही सज्ञान झाल्यावर आई-वडिलांवर अवलंबून न राहता पेट्रोल पंप, हाॅटेल येथे नौकरी करून आपला खर्च भागवतात व वेगळे राहतात. याउलट भारतातील मुले नौकरी लागेपर्यंत आई-वडिलांवर अवंलबून असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा
र
रेवती Wed, 09/02/2015 - 13:54 नवीन
धागा वाचून बरे वाटले. मलाही भविष्यात एका वृद्धाश्रमाची गरज लागणार आहे. तिथे राहण्यात काय हो एवढे वाटून घ्यायचे? संसार करून कंटाळा येत नाही का? निवांत तिकडे जाऊन रहावे, वेळेवर व्यायाम, जेवण, वैद्यकीय तपासण्या, समवयस्कांशी गप्पा, दूरदर्शन संचासमोर बसून सासूसुना मालिका बघणे (तरण्या वयात ती संधी नाही ना मिळाली!), जमल्यास जरा कथा कीर्तन ऐकणे. उद्याला ब्रेकफास्टायला काय, जेवायला कोणती भाजी, रात्रीच्या जेवणात पिठले करू की कढी? लाँड्री करायचीये, कपड्यांच्या घड्या, घराची स्वच्छता हे विचार कधीतरी थांबतील या कल्पनेने बरे वाटतेय. आधीच्या माहितीनुसार वृद्धाश्रमात बरीच वेटींग लिस्ट असते असे ऐकले होते. आता आश्रमांची संख्या वाढतिये म्हणजे मलाही संधी मिळेल असे वाटतेय. तशा माझ्या चुलत आजेसासूबाई वृद्धाश्रमात राहतायत. अगदी स्वत: ठरवून राहतायत व आम्ही नातेवाईक येताजाता सारखे भेटत असतो. शेवटी त्या कंटाळतात व आम्हाला "घरी जा" म्हणतात. त्यांना त्यांचे वेळापत्रक सोडायचे नसते. हसतमुख आहेत. नुकतीच भेटले तर नव्वदितल्या आजी इतक्या तरतरीत दिसल्या की मीच काळवंडलेली दिसत होते त्यांच्यासमोर! तुम्ही झकास बातमी दिलीत, धन्यवाद! भारतात त्या परांजपे की कोणत्यातरी बांधकाम व्यावसायिकांनी अथश्री नावाची योजनाही आणलिये म्हणे! त्यात वयस्कांसाठी सगळ्या सोयी असतात असे ऐकले आहे. चांगली कल्पना आहे.
  • Log in or register to post comments
प
पैसा Wed, 09/02/2015 - 14:28 नवीन
मी विचारच करत होते की आता मी म्हातारी झाल्यावर कुठे जाऊ म्हणून. कारण आमच्या घरात तरी ९० च्या पुढे वय असलेले शिनियर लोक स्वतःच्या मुलांच्या अयुष्यातलेच नव्हे तर नातवंडांच्या आयुष्यातले निर्णयही आपणच घ्यायला बघत आहेत. आणि ते हताशपणे बघण्याखेरीज माझ्या हातात काही नाही. अर्थात ती नातवंडे त्यांना कट मारून आपल्याला हवे ते करतात ही गोष्ट वेगळी. चाळीस-पन्नास वयाच्या माझ्या मैत्रिणींशी बोलते तेव्हा कमी अधिक प्रमाणात हीच परिस्थिती सगळ्यांच्या घरी असल्याचे कानावर येते. त्यांची मुले १५ ते २५ वर्षांची झाली तरी आपल्याला मिळालेले पैसे घरातल्या मोठ्या माणसांच्या हातात ठेवावे लागतात आणि खर्चाचा हिशेबही द्यावा लागतो हे अजूनही खूपजणांकडून ऐकते. त्यामुळे आम्ही म्हातारे झाल्यावर असा काही त्रास नसलेल्या ठिकाणी रहायला मिळाले तर मला प्रचंड आनंद होईल!
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Wed, 09/02/2015 - 14:33 नवीन
मी विचारच करत होते की आता मी म्हातारी झाल्यावर कुठे जाऊ म्हणून.
विचार सुरु तर झाला म्हणा की. ब्येस्ट. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा Wed, 09/02/2015 - 14:40 नवीन
तुझी १२ पोरं बघितल्याशिवाय नाही जाणार! :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
प
प्यारे१ Wed, 09/02/2015 - 14:45 नवीन
अभ्या तुम आगे बढ़ो (पूर्णविराम) -हम तुम्हारे साथ है चं काय करायचं याच्या विचारात प्यारे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
अ
अभ्या.. Wed, 09/02/2015 - 14:51 नवीन
हम बच्चोंकी चड्ड्या संभालते है असे म्हणायचे बर्का प्यारे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
च
चिगो गुरुवार, 09/03/2015 - 10:02 नवीन
प्यारे पुरता सुसाट सुटलाय ह्या धाग्यावर.. मेलो मी हसून हसून.. अभ्या तुम आगे बढो.. होऊ दे खर्च..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
क
कॅप्टन जॅक स्पॅरो गुरुवार, 09/03/2015 - 15:38 नवीन
अगागगगगगगगगगगगगगगगगग!!!! आयला प्यारे काका आज अगदी जोमात आहेत. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
द
दिव्यश्री Wed, 09/02/2015 - 15:34 नवीन
बाब्बौ... अहो लोक्सण्ख्या स्फोट असा शब्द ऐकला तरी आहे का कधी????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
ज
जेपी Wed, 09/02/2015 - 14:40 नवीन
मिपावरील म्हातार्या लोकांसाठी आश्रम काढायचा का ? महीना वीसहजार बदल्यात खाणे(अमर्यादीत), पिणे(मर्यादीत) आणी मिपा -मिपा खेळण्यासाठी फुकट ब्रॉडबॅंड नेट.!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
क
कपिलमुनी Wed, 09/02/2015 - 16:13 नवीन
पिणे(मर्यादीत)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
अ
अभ्या.. Wed, 09/02/2015 - 16:15 नवीन
मक्काय. घरच्याना शुध्दीवरचे सांभाळणे येईनात. हितं कुणी असल्या लोडांना सांभाळायचे? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
द
दिव्यश्री Wed, 09/02/2015 - 16:19 नवीन
घरच्याना शुध्दीवरचे सांभाळणे येईनात>>> स्वाणुभव म्हणाचा हा?? इतक औघडे का अभ्या तुज ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
अ
अभ्या.. Wed, 09/02/2015 - 16:23 नवीन
आसं परसणल णाई बोलायचं बर्का. जे काय ते जणरल जणरल. आमचं परसणल लै लागतं लोकांणा मग.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिव्यश्री
द
दिव्यश्री Wed, 09/02/2015 - 16:24 नवीन
बाबा गल्ती से मिष्टेक मैत है णा?? :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
द
दिव्यश्री Wed, 09/02/2015 - 16:23 नवीन
इस्मायली राहिलि की?? :( (स्वसंपाद्णाच कै झाल कै मैत)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिव्यश्री
र
रेवती Wed, 09/02/2015 - 14:42 नवीन
आपण अनाहितांचा वृद्धाश्रम काढूया का? ;) त्यात शिनियर असल्यामुळे तुमचे सगळ्यांचे निर्णय मीच घेणार? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा Wed, 09/02/2015 - 14:44 नवीन
पण तू सासू म्हणून येणार का! मग आपल्या सुना मजेत राहतील त्याचं काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
अ
अभ्या.. Wed, 09/02/2015 - 14:49 नवीन
मग आपल्या सुना मजेत राहतील त्याचं काय?
केवळ ह्याच मुद्द्यामुळे कितीतरी वृध्दाश्रमांचा बिझ्नेस कमी होतो हो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
ए
एस Wed, 09/02/2015 - 14:50 नवीन
अक्षरशः खरे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
प
प्रसाद गोडबोले Wed, 09/02/2015 - 14:50 नवीन
मग आपल्या सुना मजेत राहतील त्याचं काय?
=))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
न
नाखु Wed, 09/02/2015 - 14:57 नवीन
पार्श्वसंगीत म्हणून आणी खास आजी-भावी सासवांसाठी (आणि सायंकाळचे ६.२० झाले म्हणून ) सांजधारा गीत ऐकूया. "सुन्या सुन्या महफिलीत माझ्या" चित्रप्ट उंबरठा !!! सांजधाराप्रेक्षकश्रोतासंघ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
र
रेवती Wed, 09/02/2015 - 14:52 नवीन
सुना मजेत म्हणजे आपले मुलगेही आनंदी राहतील ना! शिवाय त्यांचे प्रश्न त्यांच्यापाशी! आपल्या संसारात आयुष्यभर भाज्या निवडल्यावर पुन्हा शेवटच्या श्वासापर्यंत कोथिंबीरीची जुडी पूर्ण निवडून मरण्याची माझी इच्छा नाही. ;) मी सासू म्हणून वृद्धाश्रमात आले तर तुला चालेल का? अनाहितांनी आपापली मते द्यावीत. आपला रोल काय असणारे ते आधीच स्प्ष्ट असलेले बरे! आश्रमात अडीनडीला उपयोगी म्हणून निदान एक अ‍ॅम्ब्यूलन्स तरी असतेच. आपल्याला एकवेळ ती नसली तरी चालेल पण शॉपिंगला जाण्यासाठी गाडी लागेल. त्याचा विचारही करावा लागेल. नुसते अनाहिता कट्ट्याचे फोटू बघून आता गप्प बसवत नाही. मलाही तुळशीबाग शॉपिंग कट्टा निदान म्हातारी झाल्यावर तरी करायचाय. हीच शेवटची इच्छा! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पिलीयन रायडर Wed, 09/02/2015 - 15:03 नवीन
पै तै आणि रेवाक्का ला अणुमोदन! (दिव्यश्री इफेक्ट) रेवाकका सासु होणार असेल तर मी पण तीशीतच वृद्धाश्रमात यायला तयार आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
अ
अभ्या.. Wed, 09/02/2015 - 15:10 नवीन
एवढे सगळे पाह्यजे म्हणती रेवाक्का? राहा बै आपापल्या घरातच. घरचे थोडे चिडचिड करतील पण आपलेच ना ते. उगी बाहेरच्या लोकांना त्रास कशाला? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
र
रेवती Wed, 09/02/2015 - 15:16 नवीन
वृद्धाश्रमात राहण्यात मजा वाटायला हवी ना! प्रत्येकाच्या कोणत्या ना कोणत्या गोष्ती करायच्या राहून गेलेल्या असतात त्यातील काही तरी करून बघता यायला हव्यात म्हणून सगळी खटपट चाललिये. तर तुम्ही मला भगवी कफनी आणि कमंडलूच देताय की! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
प
पिलीयन रायडर Wed, 09/02/2015 - 15:06 नवीन
मग आपल्या सुना मजेत राहतील त्याचं काय?
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
ए
एस Wed, 09/02/2015 - 14:47 नवीन
मी काय म्हणतो, आपण मिपाकरांचाच एक वृद्धाश्रम काढायचा का? तिथे डुआयडींना प्रवेश नसेल. प्रत्येक वृद्ध मिपाकर हातात एक टॅब घेऊन मिपामिपा खेळत बसेल. तिथे सरळसरळ एकमेकांशी बोलायला बंदी असेल. जे काही बोलायचेय ते व्यनि/खवमधून. झालेच तर जो कॉमन हॉल असेल त्याला खरडफळा असे नाव देऊ. अगदीच कुणाला बोलायची हुक्की आली तर बसने बाहेर कुठेतरी नेऊन कट्टाबिट्टा करू. काय म्हणता? फक्त मिपा जरी मिपाकरांना फुकट असले (मालकांच्या कृपेने) तरी मिपाश्रम मात्र टीटीएमएम. काय?
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Wed, 09/02/2015 - 14:49 नवीन
ही देखील भारी आयडीया आहे .... फक्त त्यांच्या मिसळीत जास्त तिखट मीठ मसाला तर्री नको ... बीपी वाढलं तर कोण पहाणार भाऊ !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
ज
जेपी Wed, 09/02/2015 - 14:50 नवीन
आयडीया ढापायची नाय सांगुन ठेवतय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
र
रेवती Wed, 09/02/2015 - 14:56 नवीन
थांबा, आधी एक सांगा की स्कोअर सेटल कसे करायचे? समोर बसलेला मनुष्य माझ्याशी तिरके प्रतिसाद देऊन भांडतोय असे दिसताच, हातातील काठी नाही तरी तोंडातील कवळी फेकून मारली तर जबाबदारी कोण घेणार? अजया एकवेळ कवळी बसवण्याची जबाबदारी घेईल, फेकून मारणार्‍यांची नाही! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
प
प्यारे१ Wed, 09/02/2015 - 15:00 नवीन
इत्ते साल मिपा पे रैकर इत्ता भी नै सीखी आप???? क्या दादी आप भी????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
ज
जेपी Wed, 09/02/2015 - 14:59 नवीन
हापशेंच्युरी निमीत्त श्री.लाटकर यांचा सत्कार मिपाआश्रमात 50 % डिस्कांऊट देऊन करण्यात येत आहे. शुभेच्छुक- जेपी आणी तमाम तरणेताठे कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
स
सूड Wed, 09/02/2015 - 15:19 नवीन
भारतातल्या एका मोठ्या समस्येला वाचा फोडल्याबद्दल तुमचे किती आभार मानावे तितके कमीच!!
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Wed, 09/02/2015 - 15:22 नवीन
ह्या समस्येच्या वाचेलाच कंटाळून वृध्दाश्रमांची आयड्या निघालीय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
स
सूड Wed, 09/02/2015 - 15:28 नवीन
वायच गप रंव!! ते लाटकरकाका कायतरी बोलतायेत!! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
अ
अजया Wed, 09/02/2015 - 15:23 नवीन
अनाहिता वृध्दाश्रमाची आयड्या लै भारी आहे.कट्ट्यासाठी बस असली की बास.वाती वळायला कापूस ,सुनांच्या चहाडया.मज्जानु लाइफ! मी फुकट दात पाडून हातात देणे हा रोल घ्यायला तयार आहे.
  • Log in or register to post comments
र
रेवती Wed, 09/02/2015 - 15:33 नवीन
ओक्के, मग मी सासूचा रोल करीन. आपल्या भटारखान्यातील मेन्यू प्ल्यानिंगला ताज्या दमाच्या कार्यकर्त्या म्हणून सानिकाताईंना घेण्यात यावे. तो त्यांचा अर्धवेळ जॉब असेल. ;) स्पँडीताई या सणवार येताच सर्व आज्ज्यांचे मेक अप करून देतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
स
सानिकास्वप्निल Wed, 09/02/2015 - 17:44 नवीन
मी तय्यार आहे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
द
दिव्यश्री Wed, 09/02/2015 - 15:36 नवीन
मला पण घ्या तुमच्यात ... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Wed, 09/02/2015 - 17:47 नवीन
एवढ्या स्त्रिया एकत्र रहाणार. ह्म्म. म्हणजे सलोखा, शांती, गुण्यागोविंदा वगैरे शब्दांचा वापर थांबणार तर. ;) (सोमणांच्या मिलिंदाबरोबर ट्रायाथलॉन एवढं पळुन जातो आहे. कृपया इकडचे वातावर शांत झाले की व्यनि करणे) :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
अ
अजया Wed, 09/02/2015 - 15:37 नवीन
दिव्या रोल ठरव मग.
  • Log in or register to post comments
द
दिव्यश्री Wed, 09/02/2015 - 15:40 नवीन
रोल म्हणे... काय तुम्ही द्याल त्यो ... आफ्ट्र अ‍ॅल...यु आर शिणेर ...यु णो ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
र
रेवती Wed, 09/02/2015 - 15:51 नवीन
ओक्के. मग आपण तुला शुद्धलेखणाचे वर्ग घेण्यास नेमूयात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिव्यश्री
द
दिव्यश्री Wed, 09/02/2015 - 16:04 नवीन
पळेल... बाकीच्य्याणा विचरा ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Wed, 09/02/2015 - 17:48 नवीन
सूद्दलेकण म्हणायचय का तुम्हाला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
र
रेवती Wed, 09/02/2015 - 17:49 नवीन
त्येच त्ये!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
स
सुबोध खरे Wed, 09/02/2015 - 15:40 नवीन
मी जांभूळपाड्याला( पाली जवळ) एक वृद्धाश्रम पाहिला. जेथे सर्व टूणटुणीत सुखवस्तू वरिष्ठ नागरिक राहताना दिसले प्रत्येक जोडप्यासाठी दोन खोल्या (एक बेडरूम आणि एक बाहेरची खोली) होत्या (४०० चौ फूट).बाहेरच्या खोलीत एक सोफा दोन खुर्च्या एक टी व्ही. आतल्या खोलीत दोन पलंग एक ड्रेसिंग टेबल त्याला जोडून बाथरूम ज्यात सौरबंबाच्या पाण्याची जोड इ. ते म्हणजे एक स्वयम्पाकघर नसलेले घर होते. सकाळी सहा वाजता चहा येतो. तो घेऊन प्रातर्विधी आटोपून सर्व जण नदीकाठी फिरायला जातात. आठ ते साडे नउ पर्यंत न्याहारी दुपारी साडेबारा ते दोन जेवण आणि सायंकाळी साडे सात ते नौ जेवण हे सर्व मोठ्या डायनिंग हॉल मध्ये. मधल्या काळात वरिष्ठ लोक आपापसात गप्पा मारताना पत्ते कॅरम वगैरे खेळताना दिसले. कोणीही तेथे गलितगात्र नव्हता किंवा अगतिक नव्हता. सर्व जण खाऊन पिउन सुखी अशा कुटुंबातील होते. तेथील खर्च माणशी १० हजार होता आणि जोड्प्याला १७ हजार होता.(२०११ -१२ मध्ये). पण त्यात जेवण खाण पासून सर्व गोष्टींची काळजी घेतलेली होती. सकाळी उठून दुध वाला पेपर वाला पासून मोलकरीण कपडे धुणे इ गोष्टींची कोणतीही कटकट त्यात नव्हती. प्रदूषण विरहित हवा पाणी, ताज्या भाज्या कोणताही ताण तणाव नाही.घराची डागडुजी करा. प्लंबर इलेक्त्रिशियन ची दाढी धरा काहीच नाही. एकदा पैसे भरले कि मोकळे. (तेथे जाण्यासाठी मोठी प्रतीक्षा यादी आहे असे ऐकतो.) कुटुंबाच्या कटकटी नाही कि गृह कलह नाही.एकमेकांच्या फार जवळ राहण्यामुळे पायात पाय अडकण्याची शक्यता असते तीही नाही. परत मुंबईहून फार लांबही नाही. ते पाहून मला ती कल्पना फारच आवडली. माझ्या सारख्या माणसाला तर जवळ एखादा धर्मार्थ दवाखानाही चालवता येईल. परंतु बायकोला हि कल्पना फारशी आवडलेली नाही. ( पन्नाशी नंतर कदाचित आवडेल अशी आशा). असा वृद्धाश्रम मला फारच भावला. अगदीच गलितगात्र होईपर्यंत अशा ठिकाणी राहायचे असे मी मनाशी ठरवलेले आहे पुढचे पुढे पाहू. मुलांनी हाकलल्यावर वृद्धाश्रमात जाण्यापेक्षा अगोदरच जाऊन सेकंड इनिंग चालू करण्याची कल्पना मला भावते. जाता जाता --विदारक सत्य अनाथाश्रमात गरिबांची मुलं असतात आणि वृद्धाश्रमात श्रीमंतांचे आईबाप असतात.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा