Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

भारतात वृद्धाश्रम वाढत आहेत.

ह
हेमंत लाटकर
Wed, 09/02/2015 - 08:39
🗣 159 प्रतिसाद
आपल्या भारत देशातील वृद्धांची अवस्था बघुन मन भरून येते. मागच्या काही वर्षापासून आपल्या देशात वेगाने वृद्धाश्रमांची संख्या वाढते आहे. भारता सारख्या देशात जिथे आई-वडिलांना देवासारखे समजले जाते, तिथे अशा प्रकारची वागणुक बघुन मन अस्वस्थ होते. खरच आपण इतके पुढारलेले आहोत का आज आई-वडिल आपल्याला जड होत आहेत. ज्या घरात त्यांनी आपल्या रक्ताचे पाणी केलेले असते त्याच घराच्या एका कोपर्यात त्यांना पडलेले पाहून मन दु:खी होते. आई-वडिल अशी आशा करतात की त्यांची मुले म्हातरपणी त्यांचा आधार होतील. वृद्धांना स्वाभीमानाने फक्त दोन वेळचे जेवण व मुलांचे प्रेम पाहिजे असते. प्रत्येक मुलांनी हा विचार करावा ज्यांनी मुलांच्या सुखाकरता आपले पुर्ण आयुष्य घालवले. त्यांच्यासाठी थोडा वेळ द्यावा. त्यांच्यावर वृद्धाश्रमात जाण्याची वेळ येऊ देवू नये.
वर्गीकरण
काथ्थ्याकुट

प्रतिक्रिया द्या
54687 वाचन

💬 प्रतिसाद (159)
द
दिव्यश्री Wed, 09/02/2015 - 15:44 नवीन
हे आताचे असेल , पुर्वी आमच्या गावात एक मंदिर आहे. त्या मंदिराच्या मुख्यप्रवेश्द्वारा समोर एक मोठी घंटा आहे , त्या खाली चारचाक्यांमधुण व्रुद्ध आइबापांणा सोड्त असत. हे डोळ्याणी(कुणाच्या असा प्रश्ण विचारु ण्ये) पाहिले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
र
रेवती Wed, 09/02/2015 - 15:50 नवीन
डॉ. खरे यांच्याशी सहमत. मी पाहिलेल्या आश्रमात एकच मोठी खोली दोन जणांमध्ये दिली गेली होती. बाथरुम जोडलेले होते. माझ्या आजेसाबा मात्र दोन जणांचे पैसे भरून एकट्याच रहात होत्या. त्यासाठी त्यांनी दिलेली कारणे मला पटली. आयुष्यभर त्यांनी बर्‍याच तडजोडी केल्या (हे सगळे माझे लग्न होण्याआधी झाले होते ;) ). आता या वयात कोणा दुसर्‍या सदस्येशी जमवून घेणे व आपले वेळापत्रक पाळणे त्यांना अवघड वाटले. हातात पैसे असताना ही तडजोड नको वाटत होती. शिवाय त्या त्यांच्या (दिवंगत) पतींच्या स्वभावामुळे का होईना वेळापत्रक, प्लेनिंग यांच्या पक्क्या आहेत. त्यात गडबड झालेली अजिबात चालत नाही. त्यांनी तोही उल्लेख केला. त्यांचा मुलगा, मुलगी यांचे सगळे आयटीवाले संसार, त्याप्रमाणे असलेली धावाधाव आहे. ती त्यांना मानवत नाही. मग आपले आपण राहिलेले बरे. शिवाय सगळे नातेवाईक विचारपूस करून आहेत याचेही सूख मनात असते. त्यांना सांगितले की मीही तिथेच येऊन राहणार आहे.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Wed, 09/02/2015 - 16:01 नवीन
आज्जे चक्क तुळशी बागेतुन नीट चुझ करुन घेतलेली तुळशी माळ जपत... काळे वाटाणे वाफेवर सहज शिजत नसल्यास त्यावर काय करावे ? या शंकेवर सगळ्या भक्तांना { सुनांना } प्रवचन कम टिप्स देत आहे असे चित्रच डोळ्या समोर आले ! ;) . .. ... चल पळा आता... ;) जाता जाता :- मध्यंतरी मात्र एक बातमी वाचुन माझ्या डोळ्यात पाणी आले होते... जन्मदात्या आईला भर पावसात टाकून कृतघ्न मुलाचा पोबारा भर पावसात वयोवृद्ध आईला गाडीतून फेकून देऊन 'तो' पळून गेला... मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Halke Gaadi Haako... { Folk Fusion by Neeraj Arya's Kabir Cafe - Official Video }
  • Log in or register to post comments
र
रेवती Wed, 09/02/2015 - 16:02 नवीन
बाणा, मी अनाहिता आज्जी आहे. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
म
मदनबाण Wed, 09/02/2015 - 16:07 नवीन
हा.हा.हा... ते माहित आहे हो. पण ते माझं असचं... कॄपया राग मानु नये ! मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Halke Gaadi Haako... { Folk Fusion by Neeraj Arya's Kabir Cafe - Official Video }
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
ह
हेमंत लाटकर Wed, 09/02/2015 - 16:13 नवीन
हे वृद्धाश्रम श्रीमंत आई-वडिलांसाठी आहेत. पण जे गरीब वृद्ध लोक आहेत, त्यांची परिस्थिती मात्र फार वाईट आहे.
  • Log in or register to post comments
स
सूड Wed, 09/02/2015 - 16:22 नवीन
खरंच काका!! पण मी काय म्हणतो, इथे लेख लिहीण्यापेक्षा तुम्हीच एखादा उपक्रम अशा वृद्धांसाठी का सुरु करत नाही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंत लाटकर
क
कवितानागेश Wed, 09/02/2015 - 16:53 नवीन
इथे पत्ते टाका हो वृद्धाश्रमाचे. वाचनखू ण साठवून ठेवेन. ;-)
  • Log in or register to post comments
स
सूड Wed, 09/02/2015 - 16:56 नवीन
पत्ते टाकतो पण आधी काय खेळायचं ते ठरवा. बदाम सात, पाचतीन्दोन, मेंढीकोट की रमी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश
द
दिव्यश्री Wed, 09/02/2015 - 17:00 नवीन
किण्वा मेंढीकोट ...चालेल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
ए
एस Wed, 09/02/2015 - 17:02 नवीन
पोकर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
स
सूड Wed, 09/02/2015 - 17:03 नवीन
तात्या, कसं खेळत्यात ते सांगा की!! आमास्नी ठावं नाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
ए
एस Wed, 09/02/2015 - 18:54 नवीन
हाहाहाहा! यावरून आठवलं, मिपाची वाटचाल पत्त्यांच्या खेळांच्या रूपाने मांडायची झाल्यास सर्वात आधी होतं पोकर. मग झालं ब्रिज. मग झालं रमी. नंतर पाचतीनदोन, मेंढीकोट वगैरे. आणि सध्या आहे जोड्या-जोड्या. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
अ
अभ्या.. Wed, 09/02/2015 - 17:19 नवीन
पोक आलेल्यांसाठी पोकर काय ? ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
ह
हेमंत लाटकर Wed, 09/02/2015 - 17:06 नवीन
मुलांनी आई-वडिलांवर वृद्धाश्रमात जाण्याची वेळच का येऊ द्यावी. मुले शाळेत असताना सकाळी पाच वाजता उठून पोळी भाजीचा डब्बा आई करून देते. मुले आजारी पडले की रात्रभर आई जागरण करते. मुले काॅलेजात गेली की मुलांना त्रास होवू नये म्हणून लोन काढून वडिल गाडी घेऊन देतात, मग ते लोन फेडण्यासाठी आेव्हरटाईम करतात. मुलांसाठी एवढे करूनही मुलांसाठी वेळ न देणार्याची गती अशीच होते म्हणणे म्हणजे कृतग्घपणा आहे. मुले परदेशात असली तर वृद्धाश्रमात जाणे बरोबर आहे. पण एकाच गावात राहुन मोठे घर असुनही वृद्धाश्रमात जावे लागणे वाईट आहे.
  • Log in or register to post comments
स
सूड Wed, 09/02/2015 - 17:10 नवीन
मुलांनी आई-वडिलांवर वृद्धाश्रमात जाण्याची वेळच का येऊ द्यावी.
हे तर मान्य आहे. पण आता ज्यांच्यावर ही वेळ आली आहे त्यांच्याबद्दल तुम्हाला अतोनात कणव वाटत्ये तर काहीतरी करा की राव, नुसते लेख पाडून काय होणारे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंत लाटकर
द
दिव्यश्री Wed, 09/02/2015 - 17:15 नवीन
मुले काॅलेजात गेली की मुलांना त्रास होवू नये म्हणून लोन काढून वडिल गाडी घेऊन देतात, मग ते लोन फेडण्यासाठी आेव्हरटाईम करतात. मुलांसाठी एवढे करूनही मुलांसाठी वेळ न देणार्याची गती अशीच होते म्हणणे म्हणजे कृतग्घपणा आहे. >>>अहो मला एक सांगा की काॅलेजात जाणार्या मुलांणा वडिलांणी का गाडी घेउण द्यावी??? त्यांच्यात धमक असेल तर ते घेतिल कि पुढे... कशाला णसते लाड हवेत...जोपर्यन्त ते स्वता कष्ट करुण मिळवणार णाहीत तोपर्यंत त्यांना कष्टाची आणी पैशाची किंमत कशी समजणार? दुसर म्हन्जे मुले जन्माला घालताना आपली म्हातार्पनीची काठी होइल हा विचार्च का?? अपेक्षाच का ठेवायची अशी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंत लाटकर
क
कवितानागेश Wed, 09/02/2015 - 17:43 नवीन
इतक्या पहाटेपासून शाळेत जाऊन जर बेसिक मूल्यशिक्षण मुलांना मिळत नसेल, आणि उच्चशिक्षणासाठी गाड़ी आवश्यक होत असेल तर तो दोष शिक्षणपद्धतीचा आणि समाजातूनच रुजल्या जाणाऱ्या मूल्यांचा आहे, .. मुलांचा नाही!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंत लाटकर
प
प्यारे१ Wed, 09/02/2015 - 17:48 नवीन
हा प्रतिसाद सीरियसली सीरियस वाटता वाटता सीरियसली कॉमिक वाटायला लागलाय. पहाटे आई उठते, डब्बा बनवते (मधली कामं संदीपसांदने यांच्या निलाक्षीच्या धाग्यावर) पोरं शाळेला आरामात जातेत. बाकी पोरांचा दोष नाही हे सांगितल्यावर टेंशन गेलं ना भो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश
र
रेवती Wed, 09/02/2015 - 17:46 नवीन
लाटकर साहेब, विषय फार मोठा आहे. कृपया राग मानू नका. असे एका धाग्यात काय बोलणार? मिपावर याआधी वृद्धाश्रमांचा विषय चर्चिला गेलाय अनेकदा. प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते. आजकाल सारखे सारखे ऐकू येते की दुसर्‍यांचा विचार करा, दुसर्‍यांचा विचार करा. पण खरंतर स्वत:चाच विचार करायला कोणाकडे वेळ नाहीये. माझ्याकडे सध्या आहे म्हणून मी फक्त माझाच विचार करतिये ही गोष्ट वेगळी. वृद्ध व त्यात आर्थिक परिस्थिती वाईट असलेल्यांचे खरंच हाल आहेत. अमान्य नाहीच. मनुष्यबळ हा मोठा प्रश्न ठरतोय. शिवाय दरपिढी जे बदल समाजात घडायचे ते थांबणार नाहीत. तसे ते थांबत असते तर आज तुमच्या/माझ्या घरातील महिला नऊवारी साडी नेसून वावरत असत्या. तर, बदल हे असेच आहेत. आपापले संसार पूर्वीच्या पद्धतिनं करून झाल्यावर आजकालचे शिनियर्स अबलंबित्व असेल असे रहायलाच तयार नाहीत. हा वर्गही मोठा आहे. ते जिथे राहतात ती गल्ली सोडूनही त्यांना कोणी ओळखत नाहीत पण त्यांना तेच बरे वाटते. ही परिस्थिती माझी आहे तरी मी त्या परिस्थितीचाच विचार करणार. जगातील प्रत्येक अनाथ, दीन दुबळ्याचा विचार कोणीही करू शकत नाही. त्याने आज हातात असलेला दिवसही वैट जातो हा स्वानुभव आहे. ते म्हातारे आहेत म्हणून त्यांनी दु:खात जगायचं व जे तरणे आहेत त्यांनी काहीही कन्स्ट्रक्टीव न करता नुसतं अरेरे म्हणायचं आणि उसासे सोडायचे. ना म्हातारे सुखी, ना तरणे! तुम्हाला काळजी वाटतिये तर एक काम होऊ शकेल. वृद्धाश्रमात तेथील सिनियर सिटिझन्सच्या मनोरंजनासाठी काही उपक्रम राबवू शकता. त्याबद्दल काही म्हणायचे असेल तर चांगले आहे.
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Wed, 09/02/2015 - 17:48 नवीन
१०० झाले. सत्कार करा रे.
  • Log in or register to post comments
द
दिव्यश्री Wed, 09/02/2015 - 17:51 नवीन
जेपी दादा जर्रा मदत करा बर्र... हा फाष्टेश्ट शेण्च्युरी धागा हाये का ? हे साण्गा बरे.
  • Log in or register to post comments
न
नीलमोहर Wed, 09/02/2015 - 17:53 नवीन
" ....... अन कालचा गोंधळ बरा होता." काय म्हण आहे बरं ही ?
  • Log in or register to post comments
र
रेवती Wed, 09/02/2015 - 18:01 नवीन
यावेळी मी बरीच मदत केलीये शेंचुरीसाठी. आमचाही सत्कार झाला पायचे. फ्लेक्ष लागले पायजेत. त्यावर समर्थक म्हणूनही चित्र व नाव लावावे.
  • Log in or register to post comments
र
राघवेंद्र Wed, 09/02/2015 - 19:52 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
आ
आदूबाळ Wed, 09/02/2015 - 18:26 नवीन
धागा असाच दीर्घायु होवो. आता दोनशासाठी शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 09/02/2015 - 19:20 नवीन
भूतकालातल्या आणि सद्याच्या जीवनात असलेल्या फरकाचा अंदाज जमेस न धरल्यानेच केवळ वृद्धाश्रमांबद्दल अनेक गैरसमज होत आहेत. जुन्या काळासंबंधिची काही भ्रामक गृहीतके... १. पूर्वी कसे सगळे पुत्र/पुत्री अगदी श्रावणबाळासारखी आईवडिलांची सेवा करत असत ! २. आईवडिलांची सेवा करण्यापुढे मुलांनी आपल्या भवितव्याचा बळी दिला पाहिजे !! ३. ... आणि मुख्य म्हणजे एवढे सर्व (आणि इतर काही) त्याग आईवडिलांसाठी करून वर आपल्या मुलांनी आपल्या शेजार्‍यांच्या मुलांच्यापेक्षा चार पावले पुढे राहून आईबापांचे आयुष्य कृतकृत्य केले पाहिजे ही अपेक्षा असतेच !!! पूर्वीच्या आणि सद्याच्या वस्तूस्थितीतील फरक लक्षात घेतला तर असे दिसून येईल की... १. जुन्या काळी जेव्हा आईबाप... बहुदा बापच... आपल्या जीवनाचा व्यवसाय मुलाच्या हाती सोपवत असत आणि मुलगाही बापाच्या गावात आणि घरात राहून पुढचे आयुष्य घालवत असे तेव्हा आईवडिलांनी मुलांवर अवलंबून असणे हे 'एका अर्थाने' ठीक होते. २. आजच्या काळात बापाचा व्यवसाय-धंदा मुलगा चालवतोच असे नाही... बहुदा नाहीच. कारण पीढी-दरपीढी नवनवीन संधी निर्माण होत आहेत. या सर्व संधी मूळ गावी मिळतील असेच नाही... बहुदा नाहीच. मग असे असताना चांगल्या आईबापांनी आपल्या मुलामुलींना उत्तम शिक्षण देवून त्यामूले मिळणार्‍या जगभरच्या संधी काबीज करण्यासाठी पूर्ण मोकळीक द्यावी की त्यांच्यावरचा भार बनून त्यांचे पंख छाटावेत ? ३. जर नीट नियोजन केले तर सद्याच्या काळातल्या बहुसंख्य आईवडीलांची आर्थिक परिस्थिती इतकी वाईट नाही की त्यांनी आपल्या मुलांवर सरसकट अवलंबून रहायला लागावे. आणि विशेषतः, ज्या काही आईवडीलांना मुलांवर आर्थिकदृष्ट्या अवलंबून रहावे लागते त्यांनी जर मुलांवर बंधने न टाकता त्यांना त्यांच्या विकासाला मोकळीक दिली तर मुलांची आणि पर्यायाने आईवडिलांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासच मदत होईल नाही का ? अजून महत्वाचे मुद्दे असे की... १. भावनिक भरात अंध झाल्याने आपण आपल्या मुलांच्या विकासावर बंधने घालत आहोत हे बर्‍याच लोकांच्या ध्यानात येत नाही. २. याच भावनिक अंधत्वामुळे "वृद्धाश्रम म्हणजे काहीतरी लाजिरवाणे आहे" हा गैरसमज आणि "आईवडिलांनी वृद्धाश्रमांत राहणे हे मानहानीकारक आहे" अश्या खुळ्या कल्पना उगम पावतात. या कल्पनाच भारतात उत्तम सोईसुविधांचे वृद्धाश्रम निर्माण होण्याला असलेले मोठे अडथळे आहेत. त्यामुळे, एकीकडे आर्थिक सुस्थिती असलेल्या कित्येक घरांत वृद्धांची मानसिक व शारिरीक अनावस्था होत असते. तर दुसरीकडे आर्थिक दृष्ट्या सबळ असलेल्या वृद्धांनाही उत्तम व्यवस्था असलेले (किंवा इतर कोणतेही) वृद्धाश्रम उपलब्ध नाहीत. हा विरोधाभास केवळ मानसिक दंभामुळे निर्माण झालेला असून, तो दंभ झुगारून दिल्याशिवाय त्याचे निराकरण होणार नाही.
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे गुरुवार, 09/03/2015 - 05:40 नवीन
सहमत आहे. वृद्धाश्रम गुणवत्तापूर्ण कसे होतील हे पहाण्याची आता गरज आहे. तुला जन्म दिला. खस्ता खाऊन लहानाचा मोठा केला. ..... वगैरे वगैरे जे मुलांना ऐकवले जाते त्याला जन्म देण्यापुर्वी आमची परमिशन घेतली होती काय? असा प्रश्न विचारु लागले आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ह
हेमंत लाटकर गुरुवार, 09/03/2015 - 07:12 नवीन
वृद्धाश्रम गुणवत्तापूर्ण कसे होतील हे पहाण्याची आता गरज आहे. आपल्या मुलांचे पालनपोषण करताना कोणतेही आई-वडिल म्हातारपणी मुलांनी सांभाळावे म्हणून करत नाहीत तर प्रेमापोटी करतात. आजकाल आई-वडिलच एकत्र फॅमिलीत राहत नसल्यामुळे मुलांनी जवळच राहावे असा आग्रह आई-वडिल करत नाहीत. खर तर आपणही अमेरिकनांसारखे वागले पाहिजे, जसे तिथे लहानपणापासून मुलांना स्वावलंबी बनवले जाते. मुलेही सज्ञान झाल्यावर आई-वडिलांवर अवलंबून न राहता पेट्रोल पंप, रेस्टाॅरंट मध्ये कामे करून स्वत:चे शिक्षण करतात. तसे भारतीय मुलांना आई-वडिलांनी करायला लावायला पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 09/03/2015 - 07:47 नवीन
खर तर आपणही अमेरिकनांसारखे वागले पाहिजे, जसे तिथे लहानपणापासून मुलांना स्वावलंबी बनवले जाते. मुलेही सज्ञान झाल्यावर आई-वडिलांवर अवलंबून न राहता पेट्रोल पंप, रेस्टाॅरंट मध्ये कामे करून स्वत:चे शिक्षण करतात. तसे भारतीय मुलांना आई-वडिलांनी करायला लावायला पाहिजे. हे सरसकटीकरण झाले ! अमेरिकन जीवन पद्धतीत जसे काही फायदे आहेत तसे तोटेही आहेत. १. अमेरिकेतही ज्या आईवडिलांना परवडते ते मुलाची पोस्ट्ग्रॅजुएट (ज्याला ते कॉलेज/ग्रॅज्युएशन म्हणतात) शिक्षणाच्या खर्चाची एजुकेशन फंड, बचत, इ तून तरतूद करतात. अमेरिकेत शैक्षणिक कर्ज जास्त सुलभपणे मिळते आणि ते निवडणूकीतला महत्वाचा मुद्दाही असते. पेट्रोल पंप, रेस्टाॅरंट, इ त काम करून मिळणारे उत्पन्न शिक्षणाच्या खर्चाला पुरेसे नसते... त्याच्याकडे एक अतिरिक्त (सप्लिमेंटरी) आवक इतकेच पहाता येईल. २. ज्यांच्या पालकांना उच्च शिक्षणाचा खर्च परवडत नाही असे अनेकजण ग्रॅज्युएट (ज्याला ते हायस्कूल म्हाणतात) शिक्षणानंतर नोकरी करून पैसे साठवून अथवा स्वतःच्या नोकरीच्या बळावर शिक्षणकर्ज काढून पोस्टग्रॅजुएशन करतात. ३. शिक्षण चालू असतानाही स्वावलंनाची सवय असली तर ते नक्कीच चांगले आहे. पण, ज्या पाल्याच्या पालकांमध्ये शिक्षणाचा खर्च उचलण्याची ताकद आहे त्या पाल्यांना शिक्षणात अधिक वेळ खर्च करता आला तर ते पाल्याच्या भवितव्यासाठी जास्त फायदेशीर ठरेल. ३. एखादी परदेशी पद्धत अंगिकृत करताना तिच्यातले सर्वच आपल्या देशातल्या वस्तूस्थितीत आणि तेही सर्वच माणसांना लागू पडेलच असे नाही... त्यामुळे त्यातले फक्त आपल्यासाठी चांगले तेवढेच उचलावे, अंधानुकरण टाळावे. मुख्य म्हणजे चांगल्या गोष्टी केवळ पश्चिमेकडूनच येतात असे नाही... पूर्व, उत्तर, दक्षिणेकडूनही येऊ शकतात किंबहुना आपण डोके लढवले तर आपल्या इथेही त्या जन्मू शकतात... आपण डोळे उघडे ठेवून निष्पक्षपातीपणे त्यांचे विष्लेशण करून योग त्याचा आणि योग्य तेवढ्याचा स्विकार करणे जास्त फायद्याचे ठरेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंत लाटकर
स
स्रुजा गुरुवार, 09/03/2015 - 14:59 नवीन
पर्फेक्ट ! संपूर्ण प्रतिसादाला + १००००
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
अ
अर्धवटराव Wed, 09/02/2015 - 22:38 नवीन
कि भारतात वृद्धाश्रम काढत आहेत. मोठ्या अपेक्षेने, अभिनंदन वगैरे करायला धागा उघडला. तर च्यामारी..केटली तो गरम है और चाय बिलकुलच नय. आमचा ( नो वृद्ध ) आश्रम काढण्याचा बेत आहे (आदर्शः अनेक बापु, बुवा वगैरे). तिथले उद्योग बघता तिथे वृद्धावस्थेला थाराच नसतो. प्रश्नच इल्ले :)
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो गुरुवार, 09/03/2015 - 03:31 नवीन
ह्या ह्या ह्या. आम्हास एंट्री चकटफु ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
न
नाखु गुरुवार, 09/03/2015 - 04:59 नवीन
असा प्रश्न विचारल्याने एक जागरूक मिपा वाचक म्हणून शरम /लाज्/खंत जी उप्लब्ध आहे ती वाटली. अ.राव.आगे बढो हम तुम्हारे साथ है!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
अ
अर्धवटराव गुरुवार, 09/03/2015 - 05:59 नवीन
डोळे पाणावले :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
ह
हेमंत लाटकर गुरुवार, 09/03/2015 - 03:51 नवीन
माझ्या धाग्याला 100 च्यावर नेल्याबद्दल सर्व मिपाकरांचे शतश अभिनंदन.
  • Log in or register to post comments
प
पैसा गुरुवार, 09/03/2015 - 07:05 नवीन
बर्‍याच गंभीर धाग्यांनंतर जरा गंमत केली ती तुम्ही मजेत घेतली त्याबद्दल धन्यवाद! इथे बर्‍याच लोकांनी गंभीर प्रतिसाद दिले आहेत आणि ते खरंच चांगले आणि व्यवहार्य आहेत. आता निव्वळ भावनेवर आधारित राहून चालणार नाही. काही लोक म्हणतात तसे खरंच घरी ठेवलेल्या नोकराने काही अघटित प्रकार केला तर? किंवा घरात एकट्या असलेल्या वृद्धाला अचानक काही मेडिकल इमर्जन्सी आली आणि मदत उपलब्ध नाही झाली तर? असे बरेच प्रश्न आहेत. त्यातही कोणतीही दोन माणसे आणि त्यांची परिस्थिती एकसारखी नसते. त्यामुळे एकच एक उत्तर सगळीकडे लागू होणार नाही. त्या त्या परिस्थितीत सापडल्याशिवाय कोणीही माणूस असा का वागला हे सांगता येणार नाही. त्यामुळे सगळ्याला सरसकट लेबल लावू नये. आता जगच बदलत चालले आहे तर माणूस बदलणारच ना! जागतिकीकरणात अनेक गोष्टीचे संदर्भ बदलतात. त्या रेट्यात नवीन पिढी स्वार्थी झाल्यासारखी वाटली तरी त्याला इलाज नाही. पूर्वी ५/८ मुलं असायची. आईबापाची जबाबदारी सगळ्यांवर वाटून जायची. आता एकेकच मूल असेल तर एका नवरा बायकोच्या जोडीवर ४ वृद्धांची, (आजी आजोबा असतील तर त्याहूनही जास्त) जबाबदारी येईल. ते हे कसे निभावून नेऊ शकतील? स्वतंत्रपणे आयुष्य घालवलेल्या माणसाला सुनेच्या किंवा जावयाच्या मर्जीनुसार वागणे कितपत शक्य होईल? या सगळ्याला इलाज नाही. बदल हे होणारच. ते जास्तीत जास्त सकारात्मक कसे घेता येतील हे बघणे गरजेचे आहे. त्याबदली पूर्वी कसं होतं आता कसं आहे हा विचार करून काय फायदा आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंत लाटकर
च
चिगो गुरुवार, 09/03/2015 - 11:31 नवीन
माझ्या धाग्याला 100 च्यावर नेल्याबद्दल सर्व मिपाकरांचे शतश अभिनंदन.
मग आता ह्या धाग्याला घरीच ठेवून त्याची मायेनी काळजी घेणार तुम्ही कि वृद्धाश्रमात टाकणार? ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंत लाटकर
ह
हेमंत लाटकर गुरुवार, 09/03/2015 - 09:53 नवीन
आई-वडिलांंनी मुलांना जन्म दिल्यावर मुलांना लहानाचे मोठे करून त्यांना उच्चशिक्षण देणे हे जसे आई-वडिलांचे कर्तव्य आहे. तसे आई-वडिल खुप म्हातारे व आजारी (धडधाकट असताना ते आपली कामे आपणच करतात) पडल्यावर त्यांची सेवा करणे हे मुलांचे कर्तव्य नाही का? वृद्धाश्रमात पाठवून आपली जबाबदारी झटकणे कितपत योग्य आहे.
  • Log in or register to post comments
प
पैसा गुरुवार, 09/03/2015 - 09:57 नवीन
सेवा करणे म्हणजे नेमके काय? त्या मुलांनी आपापले कामधंदे सोडून आईबापाची शारीरिक सेवा करावी का? ते तुम्हाला स्वतःला शक्य आहे का? जरा विचार करून बघा. मग म्हातार्‍या आईबापांना नोकरांच्या हातात सोपवून नोकरांनी हेळसांड केली, खून वगैरे केले तर? ती रिस्क घेण्यापेक्षा वृद्धाश्रमात ते राहिले तर काय वाईट आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंत लाटकर
ख
खटपट्या गुरुवार, 09/03/2015 - 10:25 नवीन
+१ बरोबर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
स
सौंदाळा गुरुवार, 09/03/2015 - 10:32 नवीन
+२ सध्या ज्यांचे (ज्या पिढीचे) आईवडील वूध्द आहेत त्यांना हे तणावपुर्ण वाटु शकेल कारण त्यातल्या बर्‍याच जणांनी आई-वडीलांनी आजी-आजोबा, सासु-सासरे यांची केलेली सेवा बघितली असेल आणि त्यांच्यावर कळत . नकळत संस्कारदेखिल आई-वडीलांना सांभाळायचे झाले आहेत. पण जे लोक आता ४०-४५ किंवा कमी वयाचे आहेत त्यांना त्यांच्या वृध्दापकाळी वृध्दाश्रमात राहयला काही वाटणार नाही. येत्या काही वर्षात लोकांचे वृध्दाश्रमाकडे सकारात्मकरित्या बघण्याचे प्रमाण वाढेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
द
दिव्यश्री गुरुवार, 09/03/2015 - 10:41 नवीन
मी माझ्या आईबाबाना माझ्या आजीआजोबांची सगळी सेवा करता णा पाहिले आहे त्यामुळे ते संस्कार माझ्यावर झाले आहेत . मी माझ्या सासुसासार्याना वृद्धाश्रमात कधीही ठेवणार णाही . पण जर माझ्यावर वेळ आली तर मी अगदी आनंदाने जायील . :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौंदाळा
स
सौंदाळा गुरुवार, 09/03/2015 - 10:56 नवीन
इथे दिव्यश्री ताईंशी सहमत माझी म्हातारपणी जर वर डॉक म्हणाले आहेत तशा वृध्दाश्रमाची पैसे भरण्याची ऐपत असेल तर मी पण आनंदाने जाईन. कमीतकमी हवापालट म्हणुन एखाद-दोन महिने जायला तर काहीच वाटणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिव्यश्री
ह
हेमंत लाटकर गुरुवार, 09/03/2015 - 11:31 नवीन
मी माझ्या सासुसासार्याना वृद्धाश्रमात कधीही ठेवणार णाही. वा! सुन असावी तर अशी असावी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिव्यश्री
स
सूड गुरुवार, 09/03/2015 - 11:36 नवीन
वा! सुन असावी तर अशी असावी!
कित्ती भारी!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंत लाटकर
क
कपिलमुनी गुरुवार, 09/03/2015 - 11:19 नवीन
या सर्व चर्चांमधून एकच गोष्ट कळली म्हातारपणी पुरेशी बचत हवी. श्रीमंत म्हातर्‍यांना बरे दिवस आहेत.
  • Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध.वैद्य गुरुवार, 09/03/2015 - 12:29 नवीन
.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
प
पद्मावति गुरुवार, 09/03/2015 - 11:25 नवीन
वरच्या अनेक प्रतिसादात आल्याप्रमाणे हे खरं आहे की उत्तम वैद्यकीय सेवा, समवयस्क लोकांचा सहवास, जबाबदारीतून मुक्तता हे वृद्धाश्रमाचे प्लस पॉइण्ट्स आहेतच. बर्याच घरात बघितलं आहे की तीथे वृद्धांची आबाळ होते. कधी कधी मुलांना इच्छा असूनही आई वडिलांकडे पूर्णवेळ लक्ष देणे शक्य होत नाही. मग नोकरांच्या भरवशावर त्यांना ठेवण्यापेक्षा वृद्धाश्रमात ठेवणे कधी पण चांगले. पण त्यांच्या वृद्धाश्रमाचा खर्च मात्र मुलांनीच करावा. आई वडिलांच्या उतरवयात मुलांनी त्यांची आर्थिक जाबाबदारी घेणे कायद्याने अनिवार्य करावे. सौंदाळा यांचा प्रतिसाद सुद्धा पटतो. मला वाटतं सगळ्यांच्या बाबतीत हा मन आणि बुद्धी यामधला हा संघर्ष आहे. बुद्धी सांगते की वृद्धाश्रम ही काळाची गरज आहे. पण तरीही स्वत:च्या आईवडील, सासू सासरे यांच्याविषयी वृद्धाश्रमाचा विचार करवतही नाही. याचबरोबर हेही पक्कं माहिती आहे की बहुतेक करून सगळेच वेळ आल्यावर स्वत: मात्र वृद्धाश्रमात आनंदाने जातील.
  • Log in or register to post comments
त
तुडतुडी गुरुवार, 09/03/2015 - 11:55 नवीन
द-बाहुबली >>> +११११११११११ अहो पण आता वनंच नाहीत तर वानप्रस्थाश्रम कसा स्वीकारणार ? खिक बरं मग ? वृद्धांनी प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींत पोरांच्या संसारात नाक खुपण बंद करावं . आणि ह्याला आईवडिलांचे संस्कार पण कारणीभूत असतात . आता लहान मुलं असलेल्या आईबापांनी त्यांच्या म्हातारपणी होणार आहे ह्याचा विचार करावा
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा