Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मोसाद

म
महासंग्राम
Tue, 09/15/2015 - 12:01
🗣 91 प्रतिसाद
आपण बर्याचदा MI६ अथवा जेम्स बॉंड बद्दल बऱ्याचदा वाचतो, ऐकतो पण मोसाद विषयी माहिती काहीच माहिती नाही ऑपरेशन रेड फाल्कन अथवा मोसाद विषयी मराठीत काही माहिती आहे का ? अशी माहिती असल्यास वाचनास अधिक मजा येईल त्या अनुषंगाने हा धागा निर्माण केला आहे.
वर्गीकरण
माहिती

प्रतिक्रिया द्या
21320 वाचन

💬 प्रतिसाद (91)
ह
होबासराव Tue, 09/15/2015 - 12:03 नवीन
मंदार आंतरजालावर भरपुर माहिति आहे ह्याविषयि
  • Log in or register to post comments
म
महासंग्राम Tue, 09/15/2015 - 12:15 नवीन
हो भरपूर माहिती आहे पण ती एकत्रीत स्वरूपात आणि मराठीत वाचायला भेटली तर सोने पे सुहागा होइल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: होबासराव
च
चांदणे संदीप Tue, 09/15/2015 - 12:42 नवीन
इथे आपल्या बापूसाहेबांना विनंती करून झालेली आहे. पाहूया ते कधी मनावर घेतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महासंग्राम
ब
बाबा योगिराज Tue, 09/15/2015 - 12:11 नवीन
थोडी फार एकीव महिती आहे. अजुन महिती वाचायला आवडेल.
  • Log in or register to post comments
म
मोदक Tue, 09/15/2015 - 12:49 नवीन
मोसाद नाही.. पण म्युनीक मॅसेकर वरती एक लेखमाला आहे. Munich Massacre... Munich Massacre... (भाग २) Munich Massacre... (भाग ३) Munich Massacre... (भाग ४) - Operation Wrath of God Munich Massacre... (भाग ५) - Operation Wrath of God Munich Massacre... Operation Wrath of God - समाप्त.
  • Log in or register to post comments
म
महासंग्राम Tue, 09/15/2015 - 13:20 नवीन
वाह गणपती आधीच बाप्पाचा प्रसाद भेटला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
प
प्यारे१ Tue, 09/15/2015 - 13:30 नवीन
भालेराव मालक. कुठले तुम्ही? आणखी काय काय 'भेटतं' तुम्हाला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महासंग्राम
म
महासंग्राम Wed, 09/16/2015 - 05:48 नवीन
तसे आम्ही विदर्भातले हमु पुण्यनगरी … ताक़. माणसं सोडून सर्व काही भेटत आम्हांला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
न
नाव आडनाव Wed, 09/16/2015 - 09:53 नवीन
नगरला पण असंच आहे - सारं भेटतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महासंग्राम
ह
होबासराव Wed, 09/16/2015 - 09:57 नवीन
नगर ले पन आलुबोंडा अन रस्सा मस्त भेटते ना राजेहो डिट्टो अकोल्या सारखा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाव आडनाव
क
कैलासवासी सोन्याबापु Wed, 09/16/2015 - 10:56 नवीन
रस्सा अन आलू बोंडे खाव त अकोल्याले मधु च्या अटी नाही तर श्रीगणेश वर यवतमाळ ले जाताना बोरी अरब ले बी झकास रस्सा आलू वडा भेटते!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: होबासराव
ह
होबासराव Wed, 09/16/2015 - 11:07 नवीन
मधु च हाटेल (सिव्हिल लाइन चौक) आपलच हाय ना (लय घरोबा हाय), तथिच तर पडिक असतो रोज सकाडी सकाडी. आलुबोंडा-रस्सा. गिल्लि मिसल आन नतंर कलाकंद.. घे दाब्बुन मंग काय भेट्टे :))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
क
कैलासवासी सोन्याबापु Wed, 09/16/2015 - 11:10 नवीन
अकोल्यातच हाय नाही मंग मुक्कामी तुम्ही होबासराव! लकी ब्वाय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: होबासराव
ह
होबासराव Wed, 09/16/2015 - 11:13 नवीन
नाहि ना राजा गणपति महालक्ष्मि साठि आलो..पुढल्या हप्त्यात वापिस पुन्याले..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
प
प्यारे१ Wed, 09/16/2015 - 11:24 नवीन
मोसाद च्या गुप्तहेरांना पण चिकन 'भेटवा'. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: होबासराव
म
महासंग्राम Mon, 09/21/2015 - 12:40 नवीन
मधु च नाव काहादल अगदी तोंडले पाणी सुटल अह्हां
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: होबासराव
ह
होबासराव Mon, 09/21/2015 - 12:45 नवीन
मधु च हॉटेल आणि राठि पेढेवाला...आपुन त लय मजा केलि...सार्‍या वर्षाचा करसडा काढला :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महासंग्राम
म
महासंग्राम Mon, 09/21/2015 - 12:50 नवीन
खरच नशीब काढल वो तुमी आता इथ पुण्यात अकोल्यासारखा आलुबोंडा-रस्सा भेटन म्हणजे मंगळावर पाणी सापडन्यासारख आहे.... ख्याख्याख्या म्या येतोच दिवाळीत बादवे अकोल्यात एक कट्टा हून जाऊ द्यायचा का दिवाळीत सगळेच असतीन दिवालीले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: होबासराव
च
चिनार Wed, 09/16/2015 - 11:22 नवीन
सोन्याबापू..आपल्या उमरावतीत नमुन्याच्या गल्लीत बी भेटते ना राजेहो झ्याक आलुबोण्डे न रस्सा.. येजा कधी..खिलवतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
ह
होबासराव Wed, 09/16/2015 - 11:26 नवीन
गड्डा हॉटेल हाय का अजुन ? तथी बि त तर्रि वाला रस्सा रायत जाय ना हो. मिपाकर म्हणतिल मोसादच्या धाग्याचा पार आलुबोंडा केला आपण :))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिनार
च
चिनार Wed, 09/16/2015 - 11:32 नवीन
गड्डा हाय का नाही माहित नाही राजेहो..लय दिवसात चक्कर नाही..पोटापाण्यासाठी पुन्यात हाओ ना.. पन असल बहुतेक..तिथली मिसळ फ़ेमस हाय ना..आन आपल्याकडे मिसळीसोबत पाव नाही मिळत..नुसती हाना लागते..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: होबासराव
ब
बोका-ए-आझम Wed, 09/16/2015 - 11:44 नवीन
मस्तच. होबासराव पण अकोल्याकडचेच काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
ह
होबासराव Wed, 09/16/2015 - 11:56 नवीन
हो राजा आम्हि बि अठुल्लेच. पण आता १३ वर्ष झाले फिरतोय पोटापाण्यासाठि पहिले हैद्राबाद आणि गेलि १० वर्षे पुण्यनगरि. तरिपण शेवटि जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी (सावरकरांचि माफि मागुन कारण मि हे फक्त आपल्या गावा साठि वापरतोय)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
म
मास्टरमाईन्ड Tue, 09/15/2015 - 18:39 नवीन
एकदम मस्त! मस्त लेखन. जबरदस्त.. मी यापूर्वी एरिक बानाचा "म्युनिक" पाहिला आहे. पण तुमची लेखमाला वाचताना पण "पाहिल्याचा" फील येत होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
ह
होबासराव Tue, 09/15/2015 - 13:06 नवीन
Wrath Of God.... commitment..Dedication...Determination चुन चुन के मारा था.
  • Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम Wed, 09/16/2015 - 13:35 नवीन
तर त्यात एव्हनर (एरिक बाना) शेवटी त्याच्या हँडलरला (जाॅफ्रे रश) हे सांगतो की इझराईलने जेव्हा आईकमनला अर्जेंटिनामधून उचललं आणि त्याच्यावर खटला भरून, आरोप सिद्ध करुन मग त्याला फाशी दिलं तेव्हा जगाने त्याचं कौतुक केलं पण Wrath if God मुळे आपल्यात आणि आपण ज्यांचा पाठलाग करतोय त्या अतिरेक्यांमध्ये फरक उरलेला नाही. मोसादमध्येही हा विचार प्रबळ होत होता (संदर्भ: Gideon's Spies by Gordon Thomas). शिवाय १९७४ मध्ये इजिप्तने इझराईलला योम किप्पूर युद्धात जबरदस्त हादरा दिला होता. नंतर जरी इझराईल त्यातून सावरलं आणि त्यांनी इजिप्शियन फौजांना मागे रेटलं तरी त्यांना हे कळून चुकलं की शांततेशिवाय गत्यंतर नाही. त्यामुळे इझराईलचे पंतप्रधान मेनॅचम बेगिन आणि इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अन्वर अल सादात यांच्यात अमेरिकेचे अध्यक्ष जिमी कार्टर यांच्या मध्यस्थीने करार झाला. पण इतर अरब राष्ट्रांनी इजिप्तचा कित्ता गिरवला नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: होबासराव
म
मालोजीराव Tue, 09/15/2015 - 13:11 नवीन
म्युनिक चित्रपट पहा
  • Log in or register to post comments
म
महासंग्राम Wed, 09/16/2015 - 06:45 नवीन
मालोजीराव आपले आद्य गुप्तहेर बहिर्जी नाईक यांच्याविषयी माहिती वाचायला आवडेल तुमच्याकडून.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मालोजीराव
ह
होबासराव Tue, 09/15/2015 - 13:14 नवीन
अवांतरः- कहुता प्रकरणात आपल्या पंतप्रधानांनि काय दिवे लावले होते हे आपल्याला माहित असेलच्...रॉ चि ३ वर्षांचि मेहनत पुर्ण वाया गेलि.. 'ते' एजंट एलिमिनेट केल्या गेले.
  • Log in or register to post comments
म
मी-सौरभ Tue, 09/15/2015 - 13:18 नवीन
मोदी का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: होबासराव
म
मालोजीराव Tue, 09/15/2015 - 13:42 नवीन
मोरारजी देसाई बहुतेक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी-सौरभ
ह
होबासराव Tue, 09/15/2015 - 14:16 नवीन
ते रॉ एजंट तिथे वेष पालटुन केशकर्तनालयात ३ वर्ष काम करुन पाकिस्तानि सायंटिस्ट चे हेअर सँपल गोळा करत होते तेव्हा हे क्लिअर झाल कि पाकिस्तान हॅज नाउ द अ‍ॅबिलिटि टु एनरिच द युरेनिअम. आणि आपल्या पंतप्रधानांनि अगदि सरळ साधेपणाने (बावळटपणा म्हणायचय) जनरल झिया ना सांगितले कि "जनरल आम्हाला माहित आहे तुम्हि कहुता मध्ये काय करताय ते " बास एका दिवसात आय एस आय ने कहुतात रॉ एजंट हुडकुन काढले आणि एलिमिनेट केले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मालोजीराव
अ
अन्या दातार Tue, 09/15/2015 - 13:44 नवीन
कहुता प्रकरण? काय आहे हे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: होबासराव
म
माईसाहेब कुरसूंदीकर Tue, 09/15/2015 - 14:07 नवीन
पाकिस्तानची अणुभट्टी कहुता येथे होती.१९७८-८०च्य आसपासचे हे प्रकरण असावे.आपली माणसे तेथे घुसवायची असा रॉ चा प्लान होता.घटना घडून बराच कालावधी उलटला की पोपट्पंची करून घटनेची जबाबदारी तत्कालीन राजकारण्यांवर टाकायची जुनी खोड आपल्या नोकरशाहीला आहे. परराष्ट्र मंत्री अटल बिहारी वाजपेयी होते. देसाई व वाजपेयी हे दोन्ही नेते पाकिस्तानचे आवडते होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्या दातार
ह
होबासराव Tue, 09/15/2015 - 14:19 नवीन
माई ते तिथे ३ वर्ष आपल्या प्राणांचि पर्वा न करता काम करत होते. पोपट्पंची करून घटनेची जबाबदारी तत्कालीन राजकारण्यांवर टाकायची जुनी खोड आपल्या नोकरशाहीला आहे. तुम्हि तुमचि ओकारि चालु ठेवा.. फॉर यु आय रेस्ट माय केस.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
न
निनाद मुक्काम … गुरुवार, 09/17/2015 - 02:33 नवीन
माझ्या मते तो हस्तक मोक्याच्या आडावर कार्यरत होता त्याच्या माहितीचा पुरावा किंवा सत्यता शोधण्यासाठी रॉ च्या हस्तकांनी मग केसांचे पुरावे भारत सरकारच्या स्वाधीन केले पण देसाई मुळे तो हस्तक पकडला गेल्या मात्र तो हस्तक भारतीय होता की नव्हता ह्याबाबत अजून शाश्वत माहिती आंजा व सापडली नाही त्याचे पुढे काय झाले असेल ह्याची कल्पना करवत नाही गुजराल ने तर अनेक वर्ष चालत असलेले कोवेर्ट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: होबासराव
म
मालोजीराव Tue, 09/15/2015 - 14:10 नवीन
याचा पण संबंध इस्राइलशीच आहे, १९७७ साली रॉ चे एक महत्वाकांक्षी मिशन होते पाकिस्तानातील न्युक्लियर प्लांट्स उध्वस्त करायचे, पण पंतप्रधान मोरारजी झिया उल हक जवळ पचकले कि कहुता मधले तुम्ही करताय ते उद्योग आम्हाला कळलेत … रॉ नी आम्हाला तुमच्या न्युक्लियर वेपन प्लांट ची माहिती दिलीये म्हणून. हा सगळा गौप्यस्फोट झाल्याने झिया उल हक नी लगेच यंत्रणा कामाला लावून पाक मधले रॉ एजंट्स शोधले आणि त्यांना मारले…मिशन फेल्ड ! सिमिलरली सेम ऑपरेशन इस्राइल ने राबवले आणि इराक मधले न्युक्लियर केंद्र १९८१ साली उध्वस्त केले…
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्या दातार
ब
बबन ताम्बे Tue, 09/15/2015 - 15:57 नवीन
हे म्हणजे वर्गातल्या मुलांसारखं झालं ! बाई बाई , तो बघा कॉपी करतोय पण मी तुम्हाला सांगणार नाही. एव्ह्ढे आंतरराष्ट्रीय परीणाम करणारे ऑपरेशन, निश्चितच प्रचंड गुप्तता पाळावी असे ठरले असणार. आणि भारताचे पंतप्रधान झिया सारख्या बोक्यासमोर पचकतात? खरे आहे का हे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मालोजीराव
प
प्यारे१ Tue, 09/15/2015 - 16:00 नवीन
हँगओवर असेल. शिवाम्बु प्यायचे ना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बबन ताम्बे
ह
होबासराव Tue, 09/15/2015 - 16:02 नवीन
दुर्दैवाने खरे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बबन ताम्बे
ब
बबन ताम्बे Tue, 09/15/2015 - 16:15 नवीन
प्यारेजी म्हणतात तसा शिवांबु हँगओव्हर असेल. श्री. सुधीर काळे यांची इ-सकाळमधे पाकिस्तानच्या अणुकार्यक्रमावर लेखमाला (भाषांतर) वाचलेली आठवते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: होबासराव
ह
होबासराव Tue, 09/15/2015 - 16:26 नवीन
त्यांतं कांयं एंव्हंढें मुत्सद्दी तर आमचा अरविंदा सुद्धा हे.. केजरिवालांचा :)) ह.घ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बबन ताम्बे
प
प्यारे१ Tue, 09/15/2015 - 16:29 नवीन
>>> मुत्सद्दी याची संधी बॅटमॅन ला सोडवायला सांगू. आमचे प्रतिभास्थान कमी उंच आहे. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: होबासराव
ब
बबन ताम्बे Wed, 09/16/2015 - 09:41 नवीन
कधीतरी वाचल्याचं आठवतंय. पाकडया विचारवंतांनी (?) लिहून ठेवलंय, भारतीय राजकारणी तहात हरतात. पुरावा म्हणून माझ्याकडे दुवा नाही. अर्थात हे पाकडयांचे मत. इंदिरा गांधी, लालबहादूर शास्त्री निश्चितच अपवाद असतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
ब
बॅटमॅन Mon, 09/21/2015 - 12:55 नवीन
अम्म्म नक्की कुणाची सद्दी म्हणालात? =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
द
द-बाहुबली Tue, 09/15/2015 - 13:53 नवीन
मोसादवर एक पुस्तकच मराठीत उपलब्ध्द आहे. स्वारी नाव आठवत नाही... लायब्ररीत वाचले होते. मोसादच्या बहुतांश कारवाया डीटेल्समधे लिहल्या होत्या. मग ते दुसर्‍या देशाचे फायटर विमान पळवुन आणने असो की शत्रुला अणूबॉम्ब बनवता येउ नये म्हणून त्यांना युरेनीअम पुरवणारे जहाज बुडवणे असो. त्यांच्या अचाट क्लुप्तीचे अफाट कारनामे त्यात आहेत. पुस्तक शेवट पर्यंत खाली ठेववत नाही.
  • Log in or register to post comments
म
मृत्युन्जय Wed, 09/16/2015 - 08:12 नवीन
पंकज कालुवालांचे पुस्तक आहे ते. इस्त्रायलची मोसाद असे नाव आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: द-बाहुबली
अ
अभ्या.. Tue, 09/15/2015 - 13:56 नवीन
छान कॅम्पेन. शिकायचे राहिले हे अ‍ॅडव्हर्टाईझिंगमध्ये.
  • Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु Tue, 09/15/2015 - 14:01 नवीन
मोसाद बद्दल जास्त माहिती उपलब्ध नसणे हीच त्याच्या यशाची पावती नसावी काय??
  • Log in or register to post comments
ह
होबासराव Tue, 09/15/2015 - 14:03 नवीन
बापु सहमत.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा