मोसाद
आपण बर्याचदा MI६ अथवा जेम्स बॉंड बद्दल बऱ्याचदा वाचतो, ऐकतो पण मोसाद विषयी माहिती काहीच माहिती नाही ऑपरेशन रेड फाल्कन अथवा मोसाद विषयी मराठीत काही माहिती आहे का ? अशी माहिती असल्यास वाचनास अधिक मजा येईल त्या अनुषंगाने हा धागा निर्माण केला आहे.
💬 प्रतिसाद
(91)
म
माईसाहेब कुरसूंदीकर
Tue, 09/15/2015 - 14:10
नवीन
तुमच्या त्या आय.बी व रॉ बद्द्लही काही माहिती नाही रे बापू. सी.आय.ए.ची वेब साईट आहे पण ह्यांची नाही.रॉ व आय.बी.चे लोक अजूनही पोस्ट्कार्ड वापरतात,ई-मेल वापरत नाहीत असे वाचले होते.
- Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु
Tue, 09/15/2015 - 14:13
नवीन
सगळे तुमच्या जमान्यात भर्ती झालेले असतील माई! पण तुम्ही म्हणालात ते ही खरे आहे मी केंद्रासरकर किंबहुना अर्धसैनिक बलात असूनही मला त्या भूतांबड़दक काहीच माहिती नाही हो! सगळे आपले वाचिव माहिती
- Log in or register to post comments
ह
होबासराव
Tue, 09/15/2015 - 14:23
नवीन
कुठल्याहि गुप्तहेर संघटने च्या बद्द्ल, त्यांनि राबवलेल्या ऑपरेशनबद्दल जास्त माहिति उपलब्ध नसणे ह्यातच त्या संघटनेच यश असत. आय एस आय सुध्द्दा एक वेरि प्रोफेशनल आणि कंपिटंट संघटना आहे.
- Log in or register to post comments
न
निनाद मुक्काम …
गुरुवार, 09/17/2015 - 02:37
नवीन
माई गुगल काकांना त्रास द्या जरा रॉ वर बक्कळ पुस्तके सापडतील
- Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज
Tue, 09/15/2015 - 14:36
नवीन
यशस्वी गुप्तहेर संघटना तीच आहे ज्याची जगाला काहीच माहीती नाही.
मोसाद ची थोडीफार माहीती ऊपलब्ध असणे हे त्या संघटणेचे अपयश नव्हे काय?
- Log in or register to post comments
द
द-बाहुबली
Tue, 09/15/2015 - 14:47
नवीन
आपली वाक्यरचना संदिग्ध आहेच पण घटना घडवुन आणण्यात आलेले अपयश संघटनेचे अपयश नक्किच म्हणता येइल. उगा संघटनेबद्दल कुणाला माहीती नाही हे अशक्य. गुप्तहेर संघटनेतर्फे राबवले जाणारे एखादे मिशन अतिगोपनीय असु शकते पण आख्खी संघटनाच अतिगोपनीय करायची म्हणजे राम गोपाल वर्माच्या सत्या २ ला सुध्दा अशक्यप्राय आहे ते :)
- Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु
Tue, 09/15/2015 - 14:54
नवीन
२१व्या शतकाच्या सुरुवातीला माहिती चा स्फोट झाला आज तिचा इतका प्रचंड लोंढा आपल्या मोबाइल मधुन सुद्धा वाहताना दिसतो, अश्याकाळात संपुर्ण माहिती लपणे निव्वळ अशक्य आहे कारण काही न काही कारणाने कुठल्या न कुठल्या संबंधित संघटनेला नेट वर यावेच लागते, ती येते सुद्धा बरेचवेळी आपल्याला माहिती नसते आपण आपल्या आयुष्यात मग्न असतो अश्या अस्तित्वामुळे आलेली थोड़ी ऑनलाइन/ऑफलाइन माहिती ही त्या संघटनेच्या अपयशाचे द्योतक नाही म्हणली जाऊ शकत
शिवाय आजकाल जे साइकोलॉजिकल वारफेयर अर्थात मानसशास्त्रीय युद्ध असते त्यात पब्लिक डीलिंग चा एंगल सुद्धा असतो. शिवाय बरेच वेळी संघटना स्वतः स्वतःबद्दलच कंड्या पिकवते जेणे करून विरोधी किंवा शत्रु किंवा महितीची गरज असणारे ती विकणार व्यावसायिक लोकं हे मिसलीड होतील असे वाटते
- Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे
Tue, 09/15/2015 - 15:02
नवीन
"आपल्याला हवी ती माहिती जगजाहीर करणे आणि इतर माहिती गुप्त ठेवणे" हे ज्या गुप्तहेर संघटनेला नीट जमते ती संघटना यशस्वी समजली जाते.
"हवी ती खरी (शत्रूच्या मनात धडकी भरवायला) आणि खोटी (शत्रूच्या डोळ्यात धूळ झोकण्यासाठी) माहिती पसरवून शत्रूला सतत संभ्रमात ठेवणे" हे गुप्तहेर संघटनांच्या यशाचे मुख्य गमक असते.
- Log in or register to post comments
ह
होबासराव
Tue, 09/15/2015 - 14:49
नवीन
बाहुबलि साहेब माझ्या वरिल वाक्यात कुठे संदिग्ध्ता आहे हो ?
- Log in or register to post comments
द
द-बाहुबली
Tue, 09/15/2015 - 15:29
नवीन
"एखाद्या संघटनेच्या अस्तित्वाची जगाला माहीती नाही", हे आपणास म्हणायचे आहे की "त्यांच्या कारवाया(मिशन्स) व कार्यपध्दतीची जगाला माहीती नाही", हे आपणास म्हणायचे आहे हे माझ्यापुरते स्पष्ट होत न्हवते म्हणून मी त्यात संदिग्ध्ता धरली.
- Log in or register to post comments
ख
खेडूत
Tue, 09/15/2015 - 14:55
नवीन
मोसादने इराकची अणुभट्टी उध्वस्त केली त्याबद्दल इथे मराठीतून सुंदर माहिती आहे.
खरं तर ही सगळी मालिकाच ऐकण्यासारखी आहे!
- Log in or register to post comments
ह
होबासराव
Tue, 09/15/2015 - 15:09
नवीन
कॉग्रेस च्या लाजिरवाण्या परभवामागे आणि भाजप च्या विजयामध्ये सुध्दा मोसाद आहे :- श्री श्री मोहन प्रकाश (खाँग्रेस लिडर)
असे मध्यंतरि कुठेस वाचलय :))
- Log in or register to post comments
द
द-बाहुबली
Tue, 09/15/2015 - 15:37
नवीन
अफवांचा विचार केला तर म्हणतात की कारण रशीयाची इस्त्राएलच्या विरोधी राश्ट्रांना असलेली उघड मदत व प्रत्यक्ष इस्त्रैलासुध्दा अण्वस्त्रसिध्द पाकिस्तानवर वचक ठेवेल असे(थोडक्यात हिंदुत्ववादी) सरकार भारतात यावे असे मनापासुन वाटत आले आहे. म्हणून इस्त्राइलची मदत परीणामी मोसाद रिसोर्सेसचे युटीलायजेशन सत्ताबदलात झाले नाही असे मानणे अवघड आहेच पण त्याहीपेक्षा दणकट पुरावा म्हणजे सत्तेत आल्यावर मोदीनीं पिटुकले राष्ट्रही भेट द्यायचे सोडले नाही पण दिर्घकाळचा मित्र, हितचिंतक, साथिदार रशिया दौर्यावर मात्र ते अजुनही गेले नाहीत (रशीयात गेले नाहीत असे न्हवे).
- Log in or register to post comments
र
राही
Tue, 09/15/2015 - 15:23
नवीन
१)रॉ काय किंवा अन्य कुठलीही गुप्तहेर संघटना काय हे लोक कधीही प्रकाशझोतात काम करीत नाहीत. त्यांनी पडद्याआड राहाणे हेच देशहिताचे असते. जर त्यांची कुठलीही कामगिरी वर्तमानपत्रातून चघळली जाऊ लागली तर खुशाल समजावे की ही त्यांनीच पेरलेली एक बेट आहे.
'रॉ'ने आतापर्यंत अविश्वसनीय असे काम केले आहे. फारच थोडे लोक ते जाणतात. रामेश्वरनाथ काव हे रॉचे पहिले अध्यक्ष (रॉ वेगळी झाल्यानंतरचे.) त्यांनी अगदी जेम्स बाँड इतकीच थरारक कामगिरी पार पाडली आहे.' रॉ--ऑल द काव'ज़ मेन ' हे पुस्तक मिळाले तर जरूर वाचावे. साधारण असे म्हणता येईल की बांग्लादेश युद्ध हे रॉ मुळे (आणि अर्थात तेव्हाच्या पंतप्रधानांचे कणखर नेतृत्व आणि तिन्ही दलांची नेत्रदीपक कामगिरी यामुळे) आपण निर्णायकरीत्या जिंकू शकलो होतो.
२)भारतात तीनही सशस्त्र दलांचे प्रमुखही माध्यमांमध्ये फारसे चमकत नाहीत. सरकारने निर्णय घ्यावा आणि सर्विसेसनी तो पाळावा अशी पद्धत आहे. शिवाय तीनही दलांचे अंतिम प्रमुख हे राष्ट्रपती असतात. कोणतेही दल अधिक वरचढ होऊ नये म्हणून केलेली ती तरतूद असते.
'मौनी' असणे हे बरेचवेळा फायद्याचे असते.
- Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर
Tue, 09/15/2015 - 18:17
नवीन
पण तुमच्या त्या सी.आय.ए.चे लोक अगदी उघडपणे काम करताना दिसतात.
https://www.cia.gov/careers/opportunities येथे तर अगदी पारदर्शी व्यवहर दिसतो.तांत्रिक कामासाठी उच्च प्रतीचे लोक येथे कामावर असतात असे वाचले आहे. त्यामानाने रॉ व आय.एस.आय. लाजाळू दिसतात.असो.
७०,८०च्या दशकात खरा भूकंप असो वा राजकीय उलथापालथ, बोट सी.आय.ए.कडे दाखवले जायचे.
- Log in or register to post comments
आ
आदूबाळ
Tue, 09/15/2015 - 18:22
नवीन
The Kaoboys & R&AW: Down Memory Lane हे का ते पुस्तक?
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Tue, 09/15/2015 - 19:40
नवीन
आदूबाळा, थोड्या वर्षापूर्वी माझ्या वाचनात एक मराठी पुस्तक आले होते. 'सत्तांध' . अरुण साधू अन स्व. अशोक जैन दोघांनी मिळून लिहिलेले. आणिबाणीनंतर इंदिराजी पायउतार झाल्यावर जनता सरकारने लिहवून घेतले असावे असा थोडासा आविर्भाव होता. आणिबाणी पूर्व अन नंतर अशा कालखंडाचा वेध त्यात घेतला होता. आणिबाणीत गाजलेल्या बर्याच जणांच्या (जगमोहन, व्हिसी शुक्ला, यशपाल शर्मा, यशवंतरावजी आणि इअतर बरेच मान्यवर) प्रत्यक्ष मुलाखती घेऊन हे पुस्तक सिध्द केलेले होते. यात रामनाथ (?) काओ यांच्या नेतृत्वाखाली गुप्तचर संघटनेला कसे राबवले गेले न त्यात कशा सुधारणा व विभाजन होत गेले त्याचा चांगला रेफरन्स होता. नंतर हे पुस्तक दुर्मिळ झालेय बहुतेक.
त्याकाळच्या बर्याच नेत्यांचे तेव्हाचे वर्तन आणि नंतरची वाटचाल पाहताना गरगरल्यासारखे होते हे निश्चित.
- Log in or register to post comments
अ
अमृतेश सराफ
Tue, 09/15/2015 - 15:44
नवीन
बुकगंगा वर इस्रायलची मोसाद हे पुस्तक उपलब्ध आहे ; परंतु सध्यातरी ते "आऊट अॉफ स्टॉक " असे दर्शवित आहे.
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Wed, 09/16/2015 - 04:44
नवीन
हे जागतिक कीर्तीचे पत्रकार आहेत. त्यांनी लिहिलेलं Gideon's Spies हे पुस्तक मोसादवरचं सर्वात अधिकारवाणीने लिहिलेलं पुस्तक समजलं जातं. त्यात त्यांनी मोसादचा स्थापनेपासून ते आतापर्यंत असा धांडोळा घेतलेला आहे. त्यात अॅडाॅल्फ आईकमनचं अपहरण, म्युनिक हत्याकांडाचा बदला, नाझी वैज्ञानिकांना धमकावणं आणि वेळप्रसंगी त्यांची हत्या, सद्दाम हुसेन, इझराईलने इराकी अणुभट्ट्या १९८३ मध्ये उध्वस्त करणं, इराण, लेबनाॅन आणि पॅलेस्टाईन अशा अनेक प्रश्नांचा, मोसादच्या त्यातल्या भूमिकेचा आणि काही घोडचुकांचा उहापोह केलेला आहे. जरुर वाचा. मराठीत दुर्दैवाने असं लिखाण सापडत नाही. या पुस्तकाचा मराठी अनुवाद झालाय का ते माहित नाही. जर असेल तर फार छान.
- Log in or register to post comments
म
महासंग्राम
Wed, 09/16/2015 - 05:57
नवीन
तुमच्या शब्दात भाषांतर वाचायला आवडेल. द स्केअरक्रो च केलत त्याप्रमाणे .
- Log in or register to post comments
स
सौंदाळा
Wed, 09/16/2015 - 07:01
नवीन
याचा मराठी अनुवाद उपलब्ध आहे आणि वाचनीय पण
'हाउस ऑन गारीबाल्डी स्ट्रीट' असे मुळ पुस्तकाचे आणि (मराठी अनुवादाचेपण) नाव आहे. अनुवादक, प्रकाशक आठवत नाही.
- Log in or register to post comments
न
नाखु
Wed, 09/16/2015 - 07:23
नवीन
पन्नाशी निमित्त धागा लेखकाचे व मोदकरावांचे अनुक्रमे "धागा चार आण्याचा प्र(ती)साद सव्व रुपयाचा"(चारोळी संग्रह) आणि "मोदकांचे २१ प्रकार (एक पाककल्ला पुस्तीका)" या बरोबरच गणपती आरतीचे संग्राह्य पुस्तीका आणि नारळ (पाणी असलेला) देऊन करण्यात येत आहे.
सत्कारार्थी
अभा मिपा संचालीत जेपी-मित्रमंडळ आणी तमाम बिनपावतीपुस्तक वर्गणी कार्यकर्ते.
- Log in or register to post comments
म
महासंग्राम
Wed, 09/16/2015 - 07:27
नवीन
तुमच्या सत्काराने भरून पावलो फक्त आरतीच्या पुस्त्काएवजी ऎखादि युद्धकथा दिल्यास उत्तम ( युद्ध करण्याची खुमखुमी जास्त अजून काय )
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Wed, 09/16/2015 - 09:02
नवीन
एका धाग्यावर दहशतवादाला पाठिंबा देणारे दुस-या धाग्यावर जेव्हा दुस-यावर दहशतवादाचा आरोप आणि तोही पुरावा नसताना करतात तेव्हा फार हसायला येतं बुवा. अजून येऊ द्या.
- Log in or register to post comments
प
प्यारे१
Wed, 09/16/2015 - 09:08
नवीन
ते विरोधी बाजूचे गुरुजी आहेत
- Log in or register to post comments
ह
होबासराव
Wed, 09/16/2015 - 09:31
नवीन
ह्या असल्या कुजकट आणि संकुचित आत्म्यांसाठि, नाखु साहेबांनि फार छान लिहिलय.
सुग्रासान्नाची मिळता थाळी, लाथाळू करंटे सत्वर !
मिरवावी ओकारी त्रिकाळी, नको दाद नको ढेकर !
- Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे
Wed, 09/16/2015 - 13:48
नवीन
या प्रतिसादा(काडी)मुळे वाढलेल्या ट्यार्पीसाठी धागालेखक आपला अत्यंत म्हंजे यक्दम अत्यंत आभारी होईल =))
- Log in or register to post comments
प
प्यारे१
Wed, 09/16/2015 - 15:12
नवीन
'नागपूर ला जन्मलेले संघिष्ट' नंतर फुलथ्रॉटल जिनियस यांचे आणखी एक मुक्ताफळ.
जस्ट अवेसोमे. :)
बाकी असं काही खरंच लोक करत असतील तरी वाईट वाटून घेण्याचं काही कारण आहे असं वाटत नाही.
आपल्यातले (असं म्हणावं का हा प्रश्न आहे खरं तर) काही अहिंसावादी आणि थंड रक्ताचे लोक आयसिस कडे वळताना पाहून वाईट वाटतं इतकंच.
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Wed, 09/16/2015 - 15:39
नवीन
.....आणखी एक मुक्ताफळ."
फुलथ्रॉटल जिनियस, उधळत असलेल्या ज्ञान कणांना, "मुक्ताफळे" असे म्हणू नये.
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Wed, 09/16/2015 - 16:28
नवीन
फुलथ्रॉटल जिनियस, ह्यांनी तर मौन व्रतच धारण केलेले दिसत आहे....
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Wed, 09/16/2015 - 16:56
नवीन
आलेले आहेत....
आता तरी मौन व्रत सोडतात का बघू.
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Wed, 09/16/2015 - 18:14
नवीन
मध्यपूर्वेतले सगळेच लोक अतिरेकी आहेत असं कुठे म्हटलंय कोणी? आणि मोसादविषयी किंवा अमेरिकेविषयी इथे कोणाला उमाळा असेल असं वाटत नाही. उमाळा सहानुभूतीपायी येतो आणि सहानुभूती ही ना कधी इझराईलने मागितली आहे ना अमेरिकेने. त्याबद्दल असलंच तर कौतुक आहे.
- Log in or register to post comments
व
विवेकपटाईत
Wed, 09/16/2015 - 18:28
नवीन
विलेक्शन मध्ये डाव्या पक्षाचे तिकीट तुम्हाला मिळण्याची शक्यता....
- Log in or register to post comments
च
चिनार
Wed, 09/16/2015 - 14:04
नवीन
फक्त "असावे" असा म्हणून अंदाज व्यक्त करायचा असेल जागोबाजी माहुलकर सहकारी पतपेढी,मु. पो. शिरजगाव कसबा,ता. चांदूर बाजार, जि. अमरावती यांचा आयसिस संस्थेला आर्थिक पाठिंबा आहे असा माझा अंदाज आहे.
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Wed, 09/16/2015 - 15:34
नवीन
श्री रोफलेश प्रसन्न प्रतिसाद आहे. एक चतुर चिनार बडे होशियार!
- Log in or register to post comments
ह
होबासराव
Wed, 09/16/2015 - 08:57
नवीन
वारलो :))
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Wed, 09/16/2015 - 15:46
नवीन
फुलथ्रॉटल जिनियस, हे फार ज्ञानी व्यक्तीमत्व आहे.
पण ते आपले ज्ञान दुसर्याला देत नाहीत.
उदा.
http://misalpav.com/comment/reply/31763/712577
- Log in or register to post comments
अ
अमृत
Mon, 09/21/2015 - 13:30
नवीन
http://www.misalpav.com/node/21475 खूप मागे लिहिला होता. वाचून बघा.
- Log in or register to post comments
म
महासंग्राम
Tue, 09/22/2015 - 08:45
नवीन
अमृत लेख आताच वाचला खूप मस्त झालाय
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Mon, 09/21/2015 - 17:24
नवीन
मधला जो एकमेव इझराईली अधिकारी ठार झाला, त्याचं नाव जोनॅथन नेतान्याहू. इझराईलचे विद्यमान पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांचा सख्खा मोठा भाऊ.
- Log in or register to post comments
म
महासंग्राम
Tue, 09/22/2015 - 08:47
नवीन
जोनॅथन नेतान्याहु कोणाच्या चुकीने मारला गेला या बद्दल अजूनही इस्त्रायल मध्ये वाद सुरु आहेत
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2