Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

केजरीवाल सरकारचा पहिला घोटाळा आणि गोबेल्स vs भक्त

न
नांदेडीअन
Mon, 09/21/2015 - 08:04
🗣 77 प्रतिसाद
‘केजरीवाल सरकार का पहला घोटाला ।’ ‘केजरीवाल के प्याज ने दिल्लीवालों को रुलाया ।’ ‘केजरीवाल सरकार ने प्याज से मुनाफा कमाया ।’ या अशा बातम्या काल पाहिल्याच असतील तुम्ही. आजकाल मीडियाची विश्वासार्हता अशीही मायनसमध्येच गेलेली आहे, त्यामुळे तुम्ही बातमीकडे दुर्लक्ष केले असेल तर चांगलेच आहे. पण जर तुम्हाला ही बातमी खरी वाटली असेल, तर खालील काही फॅक्ट्स बघा. - SFAC ने नाशिकमधून १८ रूपये किलो या दराने कांदा विकत घेतला. - त्यानंतर SFAC ने हा कांदा दिल्ली सरकारला ३२.८० रूपये किलो या दराने विकला. - ट्रान्सपोर्टेशन आणि इतर खर्च जोडून दिल्ली सरकारला कांद्यासाठी एकंदरीत ४० रूपये प्रति किलो मोजावे लागले. - पण दिल्लीच्या जनतेला ४० रूपयेसुद्धा द्यावे लागू नयेत म्हणून दिल्ली सरकारने १० रूपयांची सबसिडी दिली. - आणि शेवटी दिल्लीच्या जनतेला हा कांदा ३० रूपये किलो दराने विकल्या गेला. गणिताचा आणि माझा ३६ चा आकडा आहे, तेव्हा तुम्हीच कॅल्क्युलेट करून बघा, कोणाला फायदा झाला आणि कोणाला नुकसान. बाय द वे, SFAC (लघु कृषक कृषी व्यापार संघ) ही संस्था केंद्र सरकारचीच संस्था आहे. आणि काल दिवसभर वेगवेगळ्या न्यूज चॅनल्सवर येऊन दिल्ली सरकारला शिव्या घालणारे, नाफेडच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सवर असलेले श्री. अशोक ठाकूरसुद्धा भाजपाचेच आहेत. (ते स्वतः हे अभिमानाने सांगत असतात.) असो. या निमित्ताने का होईना, सगळ्या भारताला कळाले की दिल्ली सरकार फक्त ३० रूपयांना कांदा विकत आहे. तोंडावर आपटणे हा छंदच झालाय सध्या जुमला पार्टीचा. काही दिवसांपूर्वी डेंग्यूच्या विषयावरसुद्धा आम आदमी पार्टीच्या सरकारलाच जबाबदार ठरवण्याचा प्रयत्न केला होता मीडियाने. वास्तविक पाहता डेंग्यू-मलेरियासारखे आजार पसरू नयेत म्हणून औषधांची फवारणी करणे हे पालिकेचे काम असते, जी कित्येक वर्षांपासून भाजपाच्या ताब्यात आहे. डेंग्यूशी लढण्यासाठी दिल्ली सरकारने ५५ नवीन क्लिनिक सुरू केले आहेत जे रविवारी आणि सुट्टीच्या दिवशीसुद्धा चालु राहतील, सगळ्या दवाखान्यांना ताकीद दिली आहे की डेंग्यूच्या वेगवेगळ्या टेस्ट्ससाठी ६०० रूपयांच्या वर कोणत्याही दवाखान्याने चार्ज करू नये, दवाखान्यांमध्ये बेड्सची संख्या वाढवली आहे, ऍंटीकरप्शन हेल्पलाईनवर डेंग्यूसंबंधित काही समस्या असतील तर त्यासुद्धा सोडवण्यात येत आहेत. आम आदमी पार्टी हे सगळे करत असतांना केंद्र सरकार दिल्लीच्या उपराज्यपालांच्या मार्फत ऑर्डर काढून ‘आप’च्या कामात अडथळे आणत आहे. तुमच्यापर्यंत काय पोहोचवायचे हे ऑलरेडी ठरलेले आहे. भक्त बिचारे त्यासाठी दिवसरात्र मेहनत करत असतात. तुमच्यापर्यंत आलेल्या माहितीवर डोळे बंद करून विश्वास ठेवायचा की सुशिक्षित असल्याचा फायदा घेऊन स्वतः माहितीची शहानिशा करून घ्यायची हे तुमचे तुम्ही ठरवा. हिटलरच्या गोबेल्समध्ये आणि आजच्या भक्तांमध्ये जास्त फरक नाहीये. उलट त्याकाळी गोबेल्सकडे मर्यादित साधने होती आणि आज भक्तांकडे विकासाचे गाजर आहे, फोटोशॉप आहे, जी हुजूरसारखी न्यूज चॅनल्स आहेत, IT Cell कडून मिळणारा चांगला पगार आहे. अजून काय पाहिजे ? खरंच, गोबेल्स वरून बघत असेल तर त्याला हेवा वाटत असेल भक्तांचा. अवांतर : मी दिलेली माहिती चुकीची असेल, तर कृपया खरी माहिती कळवा. एक्स्ट्रा अवांतर : गोबेल्सबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी ... http://www.history.com/topics/world-war-ii/joseph-goebbels
वर्गीकरण
राजकारण

प्रतिक्रिया द्या
15742 वाचन

💬 प्रतिसाद (77)
ह
होबासराव Mon, 09/21/2015 - 09:51 नवीन
हे मान्य. पण बहुतांश श्रोते सुद्धा असेच आहेत म्हणजे भाजपा फॉलोअर्स ला केजरिवाल सरकार विरुध्द बातमि आवडेल आणि केजरिवाल फॉलोअर्स ला मोदिंविरुद्ध दिलि गेलेलि बातमि आवडेल. भक्त बिचारे त्यासाठी दिवसरात्र मेहनत करत असतात आता हे वरिल वाक्य युनिव्हर्सल आहे,, तिथे भक्त ह्या शब्दाच्या जागी कुठलाहि शब्द फिट बसतो, मग तो भक्त असो, गुलाम असो कि कार्यकर्ते.
  • Log in or register to post comments
न
नया है वह Mon, 09/21/2015 - 11:05 नवीन
आजकाल मीडियाची विश्वासार्हता अशीही मायनसमध्येच गेलेली आहे
हिच गोष्ट भाजपा विरुद्ध दिलि गेलेलि बातमिच्या लिकां देताना लेखक महोदय जाणिवपुर्वक विसरतात. आणि म्हणुनच मला आआप आणि त्याचे समर्थक यांच्यावर कधीच विश्वास ठेवु वाटत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: होबासराव
श
श्रीगुरुजी Mon, 09/21/2015 - 11:14 नवीन
हिटलरच्या गोबेल्समध्ये आणि आजच्या भक्तांमध्ये जास्त फरक नाहीये.
ज्या तर्‍हेने आआपचे अंधभक्त खोटे आणि फक्त खोटेच बोलून आआपचा अहोरात्र प्रचार करीत आहेत, त्यावरून या वाक्याच्या खरेपणाची पुन्हा एकदा प्रचिती आली.
  • Log in or register to post comments
न
निनाद मुक्काम … गुरुवार, 09/24/2015 - 18:57 नवीन
श्रीगुरुजी तुम्हास आप tard म्हणायचे आहे का ते आणि त्यांचे नेते सुद्धा अनेकदा भाजपच्या विरुद्ध बातमी आली कि बातमीचा पूर्ण शहानिशा न करता टीव टीव करतात . त्यांना त्यांच्या भाषेत उत्तर मिळाले कि कळेल पूर्ण विचारांती काहीही खरडू नये फरारी आमदाराने पक्षाला लाज आणली असे म्हणणारा केजू जेव्हा अश्या लोकांना निवडणुकीचे तिकीट देऊ नये अशी मागणी करणाऱ्या योगेंद्र ला पक्षाबाहेर हाकलतात , तेव्हा त्यांचे tard समर्थक विठ्ठला कोणता झेंडा घेऊ अश्या मनस्थितीत नसतात , कारण केजू म्हजे आप ,हे त्यांच्या डोक्यात फिट असते जसे लालू म्हणजे राजद आप जी वाटचाल प्रादेशिक पक्षाच्या दिशेने होऊन व्यक्ती केंद्रित झाली आहे , चळवळी मधील मित्रांना पक्षात वळवल केल्यावर बाहेर काढणाऱ्या केजू ची पक्षात हुकुमशाही पाहता तो आता सराईत प्रस्थापित राजकारणी झाल्याचे पाहून चुकीच्या माणसाला विरोध न केल्याचे आत्मिक समाधान लाभले आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
क
कपिलमुनी Mon, 09/21/2015 - 11:18 नवीन
मराठी आंजावर केवळ राजकारणाला वाहीलेल्या स्वतंत्र संस्थळांची गरज आहे.
  • Log in or register to post comments
न
नाखु Mon, 09/21/2015 - 11:21 नवीन
केवळ राजकारणात वाहून गेलेल्या स्वतंत्र संस्थळांची अशी दुरुस्ती करता आली तर बघा. अति-अवांतर सदन भेटी दरम्यान कळविणे आज रावेतला बाप्पा विसर्जन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
न
नाखु Mon, 09/21/2015 - 11:26 नवीन

कथा अकलेच्या कांद्याची

  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Mon, 09/21/2015 - 12:40 नवीन
अचूक वेळी लेख टाकला आहेस रे नांदिडियना. त्या हार्दिकने गुजरातमध्ये विकासाच्या गाजराचा हलवा करून दाखवला.अमित शहा हा माणूस अत्यंत कपटी आहे असे ह्यांचे मत.आपल्याशिवाय कोणीही मोठा होता कामा नये ही रा़क्षसी महत्वाकांक्षा भाजपाचा घात करणार असे दिसते.
  • Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम Wed, 09/23/2015 - 07:05 नवीन
.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
ब
बोका-ए-आझम Wed, 09/23/2015 - 07:06 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
ह
होबासराव Mon, 09/21/2015 - 12:49 नवीन
च्यायला ह्यांचे 'हे' डीक्टेशन कधि थांबवणार हैत्..आणि पदराआडून भायेर कइ निंगनार हैत.
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Mon, 09/21/2015 - 13:15 नवीन
अम्मळ अश्लील प्रतिसाद. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: होबासराव
क
कैलासवासी सोन्याबापु Wed, 09/23/2015 - 11:11 नवीन
होबासराव हे आपली उमरीच्या चौकातली पोट्टेशाही कायले भाईर काढता!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
ह
होबासराव Wed, 09/23/2015 - 11:27 नवीन
बाप्पु अ‍ॅक्चुअली मला फक्त एव्ह्ढेच म्हणायचे होते कि माईंचे 'हे' पडद्या बाहेर कधि येणार. पण माझ्या वाक्याचा वेगळाच अर्थ निघतोय.. :((.. संपादकाना विनंति आहे कि प्लीज माझा वरिल प्रतिसाद उडवावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
श
श्रीगुरुजी Tue, 09/22/2015 - 09:33 नवीन
अवांतर : मी दिलेली माहिती चुकीची असेल, तर कृपया खरी माहिती कळवा.
http://www.rediff.com/news/interview/the-man-who-exposed-kejriwal-govt-on-onions/20150921.htm http://indiatoday.intoday.in/story/revealed-aap-govt-bought-onions-at-rs-18-kg-and-sold-to-delhiites-at-rs-30-kg/1/478019.html
- त्यानंतर SFAC ने हा कांदा दिल्ली सरकारला ३२.८० रूपये किलो या दराने विकला.
नाफेड दिल्लीत २३-२४ रू. प्रति किलो या दराने कांदे विकत असताना आणि आमच्याकडून कांदे घ्या असे केजरीवालांना सांगत असताना, नाफेडकडून कांदे न घेता मुद्दाम SFAC कडूनच ३२.८० रू. प्रति किलो कांदे घेण्यामागे केजरीवालांचा नक्की काय हेतू होता हे लक्षात आले असेलच.
खरंच, गोबेल्स वरून बघत असेल तर त्याला हेवा वाटत असेल भक्तांचा.
नक्कीच. आपल्यापेक्षा चतुर असलेले आआपभक्त बघून तो शरमिंदाही झाला असेल. तुमच्यासारख्या अंधभक्तांकडून उत्तराची अपेक्षाच नाही. आजवर वेगवेगळ्या धाग्यांवर तुम्ही आआपचा व केजरीवालांचा जो गोबेल्ससारखा खोटा प्रचार केला तो पूर्णपणे पुराव्यासहीत खोडून काढल्यावर तुम्ही त्याबद्दल आजतगायत अवाक्षरही काढलेले नाही किंवा आपण खोटी माहिती देत होतो हे मान्यसुद्धा केलेले नाही. गोबेल्सचे देखील हेच तंत्र होते.
  • Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु Tue, 09/22/2015 - 09:44 नवीन
दोन पट्टी च्या अंधभक्त लोकांचा कलगीतुरा पाहण्या लायक रंगु दे रे गणेशा! (गणपती ला आर्त विनंती आहे माई ची कॉपी नाही) पॉपकॉर्न पक्का कोल्डड्रिंक अपना अपना (दोस्ती पक्की पैसा अपना अपनाच्या चालीवर) ('अ'राजकीय अराजक विरोधी) बाप्या
  • Log in or register to post comments
न
नाखु Tue, 09/22/2015 - 10:26 नवीन
पाच शीटा आमच्या पकडणे. नाखु अडाणी आडगाव बु ||
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
क
कैलासवासी सोन्याबापु Tue, 09/22/2015 - 15:28 नवीन
साफा पसरला आहे ! शिटा रिज़र्व केल्यात! लौकर येसान हो नाखु साहेब! काय गड्या फ़क्त १८ रिप्लाई!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
व
विशाल कुलकर्णी गुरुवार, 09/24/2015 - 12:33 नवीन
आलोच पॉपकॉर्न घेवून .....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
श
श्रीगुरुजी Tue, 09/22/2015 - 11:17 नवीन
काही दिवसांपूर्वी डेंग्यूच्या विषयावरसुद्धा आम आदमी पार्टीच्या सरकारलाच जबाबदार ठरवण्याचा प्रयत्न केला होता मीडियाने. वास्तविक पाहता डेंग्यू-मलेरियासारखे आजार पसरू नयेत म्हणून औषधांची फवारणी करणे हे पालिकेचे काम असते, जी कित्येक वर्षांपासून भाजपाच्या ताब्यात आहे.
+१ बरोबर आहे. डेंग्युसाठी आआप व केजरीवाल जबाबदार नाहीत. तसं पाहिलं तर ते कशालाही जबाबदार नाहीत. - केजरीवाल मुख्यमंत्री असले तरी स्वतःकडे कोणत्याही खात्याचे मंत्रीपद न घेता त्यांनी प्रशासनाची कोणतीच जबाबदारी घेतलेली नाही. - एप्रिल १५ मध्ये दिल्लीत शेतकरी मेळावा बोलवून त्यासाठी आआपने राजस्थानमधील गजेंद्र सिंह नावाच्या एका सधन शेतकर्‍याला उचकवून मेळाव्याला आणले व नंतर त्याला झाडावर चढून आत्महत्येचा देखावा करण्यास सांगण्यात आले. तो झाडावर चढताना आआपचे कार्यकर्ते टाळ्या पिटून त्याला प्रोत्साहन देत होते व झाडावर चढल्यावर त्याच्या हातात आआपचे चिन्ह असलेला झाडू देण्यात आला व गळ्याभोवती उपरणे गुंडाळून फास लावण्याचे नाटक करण्याचे सांगण्यात आले. त्याला खाली उतरविण्यासाठी गेलेल्या पोलिसांना आआपच्या कार्यकर्त्यांनी अडवून ठेवले. त्या बिचार्‍याला खरोखरच फास बसून त्यात त्याचा मृत्यु झाला, तेव्हा केजरीवाल आणि आआपचे इतर महान नेते तिथून ५० फुटावर असलेल्या व्यासपीठावर पुढील ७५ मिनिटे भाषण ठोकत होते. त्याच्या नावाने कोणीतरी भलत्यानेच एक आत्महत्येची चिट्ठी देखील लिहून ठेवली होती. दुसर्‍या दिवशी केजरीवालांनी भाषणात सांगितले की "ह्म पुलिससे बार बार कहते रहे, उसे बचाईये उसे बचाईये. लेकिन पुलिसने उसे नही बचाया." झाडावर चढून फास घेणे याला तोच जबाबदार होता. केजरीवाल व आआपचे नेते त्यासाठी जबाबदार नव्हते. एवढेच नव्हे तर झाडावर चढल्यावर फास घेण्यापासून त्याला थांबविण्याची जबाबदारी पोलिसांची होती. केजरीवाल आणि आआपचे नेते त्यासाठी कसे जबाबदार असणार. आणि केजरीवाल आणि त्यांचा कंपू भाषण मधेच सोडून त्याला वाचवायला कसा जाणार? भाषण महत्त्वाचे का त्याचा जीव महत्त्वाचा? - इतर पक्षाच्या अनेक नेत्यांवर, शकुंतला गॅम्लीन सारख्या प्रशासकीय अधिकार्‍यावर केजरीवालांनी भ्रष्टाचाराचे खोटे आरोप केले तेव्हा ते आरोप सिद्ध करण्याची जबाबदारी केजरीवालांची नव्हतीच. ज्यांच्यावर आरोप झाले त्यांनीच सिद्ध करायला हवे होते की ते भ्रष्टाचारी नाहीत. - केजरीवाल मुख्यमंत्री झाल्यापासून सरकारी निवासस्थानात रहायला गेल्यावर दरमहा लाखो रूपयांची वीज वापरतात. स्वतःच्या खाजगी उपयोगासाठी वापरलेल्या वीजेचे बिल भरण्यास केजरीवाल जबाबदार नाहीत. जनताच ते भरण्यासाठी जबाबदार आहे. - दिल्लीत कोणतीही समस्या आली तरी त्यासाठी उपराज्यपाल, केंद्रीय गृहखाते किंवा नरेंद्र मोदी जबाबदार असतात. केजरीवाल त्यासाठी कदापिही जबाबदार नसतात. - दिल्लीत मोफत वायफाय पुरविण्यात अपयश आले किंवा १५ लाख सीसी टीव्ही बसविता आले नाहीत तर त्यासाठी केजरीवाल मुळीच जबाबदार नाहीत. ती जबाबदारी केंद्र सरकारची आहे. - दिल्लीत सफाई कामगारांचे पगार न झाल्याने संप झाला होता. संप झाला कारण महापालिकेने पगार दिला नाही. महापालिकेने पगार दिला नाही कारण दिल्ली सरकारने महापालिकेला ठरलेला निधी दिला नाही. दिल्ली सरकारने महापालिकेला निधी दिला नाही कारण केजरीवालांनी स्वतःचा उदोउदो करणार्‍या जाहिरातींसाठी ५२६ कोटी रू. बाजूला काढून ठेवले आहेत. परंतु सफाई कामगारांच्या संपाला भाजपच्या ताब्यात असलेली दिल्ली महापालिका जबाबदार आहे. केजरीवाल त्यासाठी जबाबदार नाहीत. - प्रचारात शीला दिक्षितांवर भ्रष्टाचाराचे आरोप करताना आपल्याकडे त्यांचा भ्रष्टाचार सिद्ध करणारे ३८० पानांचे पुरावे आहेत असे केजरीवाल जाहीर सांगत होते. मुख्यमंत्री झाल्यावर शीला दिक्षितांवर खटला दाखल करा असे विचारल्यावर "विरोधकांनी पुरावे द्यावेत, म्हणजे खटला दाखल करण्यात येईल" असे सांगून पुरावे देण्याची जबाबदारी माझी नाही हे केजरीवालांनी अगदी स्वच्छपणे सांगून टाकले. एकंदरीत केजरीवाल कशासाठीही जबाबदार नाहीत. विरोधक विनाकारण त्यांना प्रत्येक गोष्टीसाठी जबाबदार धरत आहेत.
  • Log in or register to post comments
व
वगिश Tue, 09/22/2015 - 12:06 नवीन
पुरावे तर बैलगाडी भरुन होते, त्याचे काय झाले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Tue, 09/22/2015 - 11:35 नवीन
पुण्यात सकाळ किंवा मटासारख्या वृत्तपत्रात पूर्ण पान जाहिरात देण्यासाठी ३५ लाख रूपये लागतात. पुण्यापेक्षा मोठ्या शहरात (दिल्ली, मुंबई इ.) आणि इंग्लिश वृत्तपत्रात पूर्ण पान जाहिरातीसाठी अजून जास्त खर्च येत असणार. आआप सरकारचा 'कांदा घोटाळा' बाहेर आल्यावर घाबरगुंडी उडालेल्या दिल्ली सरकारने डॅमेज कंट्रोलसाठी लगेच दिल्लीच्या अनेक वृत्तपत्रातून पूर्ण पान जाहिराती देऊन आपल्यावरील आरोप खोडण्याचा प्रयत्न केला. इतक्या जाहिरातींसाठी सरकारने जनतेचे किती रूपये उधळले असतील याची कल्पनाच करता येईल. http://www.abplive.in/incoming/2015/09/21/article720389.ece/Onion-scam-CM-Kejriwal-targets-news-channel-in-full-page-newspaper-ads अर्थात हा खर्च आम आदमीसाठी असल्याने आक्षेप घेण्याचे कारणच नाही आणि या जाहिरातींच्या खर्चासाठी केजरीवाल किंवा आआप जबाबदार नसून त्यांचा घोटाळा बाहेर काढणारेच जबाबदार आहेत.
  • Log in or register to post comments
फ
फुलथ्रॉटल जिनियस Tue, 09/22/2015 - 11:49 नवीन
पुण्यात सकाळ किंवा मटासारख्या वृत्तपत्रात पूर्ण पान जाहिरात देण्यासाठी ३५ लाख रूपये लागतात. पुण्यापेक्षा मोठ्या शहरात (दिल्ली, मुंबई इ.) आणि इंग्लिश वृत्तपत्रात पूर्ण पान जाहिरातीसाठी अजून जास्त खर्च येत असणार.>>>>>>>>> बाप रे! भाजपने मागच्या लोकसभा निवडणूकीत १०००० कोटी रुपये ओतलेले हे आता खरे वाटायला लागले आहे. बिहारात भाषण ठोकताना परदेशभ्रमंतीपटू मोदींनी बिहारच्या जनतेला ," कीतना पैसा चाहीये?,वीस हजार करोड, चालीस हजार करोड , चलो सवा लाख करोड दे दीया! असली नबावी थाटातली मिजास दाखवली होती, जसे हा सगळा पैसा नागपुरी गोसावी स्वतःच्या तिजोरीतून वाटत आहेत. भाजपने पुर्ण बहुमताचा अहंकार इतका डोक्यात घालून घेतला आहे की स्वतःची कबर स्वतःच खोदायला निघाले आहे.
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Wed, 09/23/2015 - 13:15 नवीन
भाजपने पुर्ण बहुमताचा अहंकार इतका डोक्यात घालून घेतला आहे की स्वतःची कबर स्वतःच खोदायला निघाले आहे.
+१. मोदींपेक्षा त्यांचे स्तुतीपाठक सरकारची वाट लावणार असे दिसते.इंदिरा गांधींच्या बाबतीतही हाच प्रकार व्हायचा.जरा कुणाबद्दल चार बरे बोल बोलावेत तर इंदिरा समर्थक्,पत्रकार तुटून पडायचे.अमूक राजकारणी स्त्री द्वेष्टा,तमूक राजकारणी सी.आय.ए.चा एजंट अशी संभावना व्हायची.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फुलथ्रॉटल जिनियस
ब
बोका-ए-आझम Wed, 09/23/2015 - 19:39 नवीन
म्हणजे भाजपवाल्यांना डोके आहे हे तुम्हाला मान्य आहे तर. आपवाल्यांच्या मात्र पूर्ण बहुमत सरळ गुडघ्यात गेलेलं आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
श
श्रीगुरुजी Wed, 09/23/2015 - 19:45 नवीन
कमाल आहे. माई नानाचं कौतुक करतोय आणि ते सुद्धा 'ह्यां'चं नाव पुढे न करता! हा ''अहो रूपम, अहो ध्वनि" असाच प्रकार आहे. नाना उर्फ माई म्हणतो, भाजप स्वतःची कबर स्वतःच खोदायला निघाले आहेत. माई उर्फ नाना म्हणतो, मोदींपेक्षा त्यांचे स्तुतीपाठक सरकारची वाट लावणार असे दिसते. राहुल उर्फ पप्पू म्हणतो, मोदींच्या विनाशाची कथा ते स्वत:च लिहीतायत. एकंदरीत भाजप विरोधकांनाच भाजपची जास्त काळजी दिसतेय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
व
विवेकपटाईत Tue, 09/22/2015 - 14:57 नवीन
पाहिली गोष्ट दिल्लीत दररोज कांद्याची खपत १०,००० टन आहे. दिल्ली सरकारने मागविला २५०० त्या पैकी ४०% खराब (RTI च्या अनुसार) निघाला. किती लोकांपर्यंत पोहचला.???? . काही राशन विक्रेते टेम्पो सरळ काळ्या बाजारात विकून टाकतात. बाकी ६० रुपये किलोने बाजारात कांदा उपलब्ध आहे. बाकी यात नवीन काही नाही. १९८४ पासून ते आज पर्यंत हेच सुरु आहे. दरवर्षी कांदा घोटाळा हा होतोच. जिथे सबसिडी तिथे घोटाळा हे कुणीच टाळू शकत नाही. (१९८२ ते १९९६)कृषी भवन मध्ये कार्यरत होतो, दरवर्ष हेच पाहायचो) डिसेंबरमध्ये उरलेला कांदा नाफेड आणि इतर सरकारी/ दिल्ली सरकारी संस्था मातीच्या भावाने विकतील. बाकी DTC बसेसच्या जागी नुकत्याच ५०० मिनी बसेस (ब्लू लाईनचा नवीन अवतारात) रस्त्यावर धाऊ लागल्या आहेत. खरा घोटाळा इथे आहे. माझ्या ब्लॉग वर बघा = ब्लू लाईन कथा – फिरुनी नवी जन्मेन मी
  • Log in or register to post comments
व
विवेकपटाईत Tue, 09/22/2015 - 15:09 नवीन
पण या वेळीतिन्ही नगर निगमचा फंड दिल्लीत सरकारने थांबवून ठेवला होता. (शीला दीक्षित यांच्या कारकिर्दीत असे कधीच झाले नव्हते). दरवर्षी एप्रिल मध्ये दिल्ली सरकार आणि नगर निगम यांच्यात डेंगू नियंत्रण करण्या बाबत मिटींग्स होतात. या वर्षी कुठलीही मीटिंग झाली नाही आणि कुठलीही उपाय योजना कशी करायची आणि त्या साठी फंड वैगरेहचा प्रश्नच येत नाही. गेल्या वर्षी उपराज्यपाल यांच्या हाती सत्ता होती. डेंगू पसरला नाही. पण या वर्षी १२ लोक मरे पर्यंत सरकार चूप होती. लोकांना मूर्ख बनविणे हीच केजरीवाल यांची राजनीती आहे. (चोरांची वीज माफ करणे, श्रीमंतांचे पाण्याचे बिल माफ करणे, पाणी आणि विजेच्या चोरीला प्रोत्साहन देणे). दिल्लीत येणाऱ्या प्रत्येक ट्रक वर १००० अतिरिक्त कर लावणे. पहिली सरकार आहे जिने दिल्लीत रस्ते, पुला, footover bridge या साठी एकहि पैसा ठेवलेला नाही. बाकी आपच्या अधिकांश MLAचा biodata पहा अधिक काही सांगण्याची आवश्यकता नाही. दिल्लीत या घटकेला माफिया राज्य आहे, ५ वर्षांत दिल्ली बिहार बनेल. बाकी एवढे निश्चित ५ वर्षांनी काँग्रेस पूर्ण बहुमतांनी जिंकेल, घोटाळेबाज असले तरी काही कामे तर करीत होते.
  • Log in or register to post comments
म
मृत्युन्जय Wed, 09/23/2015 - 06:50 नवीन
का अजुन धागे काढुन स्वतःची नाचक्की करुन घेत आहात? आणि कुठे गेले ते मिपावरचे "कह के लेंगे", "प्रचारकी थाटाचे धागे" वगैरे गळे काढणारे लोक. हा धागा नक्क्की काय वेगळा आहे? आपच्या गुलामांनी (आत्ता त्यांना भक्त म्हणायची पद्धत आहे का? नाही धाग्यात सगळीकडे भक्तांची आणि गोबेल्सची तुलना केली आहे म्हणुन विचारले) सगळ्याच चुकांचे समर्थन करायची प्रतिज्ञा केली असेल तर आम्ही काय बोलणार? मजा बघु फक्त. पण किमान अंधभक्तांनी भाजप समर्थकांना या कारणावरुन शिव्या घालणे सोडावे फक्त. भाजपा समर्थक प्रसंगी भाजपावर टीका देखील करतात. आपचे गुलाम फक्त आंधळे समर्थन करतात असे दिसते. सदरच्या प्रकरणात दिल्लीच्या सामान्य जनतेवर प्रति किलो मागे १८ रुपयांचा अतिरिक्त बोजा पडतो आहे हे लोकांना कळत नाही की काय? एकतर कांदा नाफेडपेक्षा ८ रु किलो अधिक दराने विकत घेतला आणी आता गरीब बिचार्‍या जनतेला १० रुपयांच्या सबसिडीचे आमिष दाखवत आहेत. तुम्हीच सांगा हे १० रुपये काय युगपुरुष स्वतःच्या खिषातुन देणार आहेत का? लोकांच्याच खिषातुन जाणार न शेवटी अप्रत्यक्षरीत्य? युगपुरुषांच्या सरकारकडे दातावर मारायला पैसा नाही तर मग एरवी सब्सिडी कुठुन देणार? स्वतःवर आणी युगपुरुषांवर कृपा करा आणी असले हास्यास्पद धागे काढु नका. आधीच तुमचे आणि त्यांचे खुप हसे झाले आहे. त्यांच्या इभ्रतीचे (उरल्यासुरल्या) अजुन वाभाडे नका काढु. बाकी डेंग्यु बद्दल थोड्या प्रमाणात मान्य. याबद्दल भाजपप्रणित मुनिसिपाल्टी ला देखील जबाबदार धरावे. पण मग मी काय म्हणतो की "सार्वजनिक स्वच्छता आणि आरोग्य", सुरक्षा या जर लोकल कॉर्पोरेशनची जबाबदारी असेल आणि इतर गोष्टींसाठी जर केंद्र सरकार जबाबदार असेल तर मग दिल्ली स्टेट असेंब्ली नक्की कशासाठी जबाबदार आहे हे तर लोकांना कळु देत आणि मग दिल्लीसाठी अजुन एका वेगळ्या सरकारी यंत्रणेची गरजच काय? स्टेट असेंब्ली कायमस्वरुपी डिसॉल्व का करु नये?
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Wed, 09/23/2015 - 07:17 नवीन
आणि कुठे गेले ते मिपावरचे "कह के लेंगे", "प्रचारकी थाटाचे धागे" वगैरे गळे काढणारे लोक. हा धागा नक्क्की काय वेगळा आहे?
असे कसे बोलता मृत्युंजय राव? केवळ भाजप समर्थकांनी सॉरी मोदींच्या भक्तांनी लिहिलेले लेख हे प्रचारकी थाटाचे असतात, असे लोक पेड सपोर्टर असतात, असे काहीतरी लिहिल्याचे त्यांना पैसे मिळतात हे तुम्हाला माहित नाही का? केजरूके गुलाम कसे एकदम बॅलन्स्ड असतात, भ्रष्टाचार कमी व्हावा याची चाड केवळ त्यांनाच असते हे तुम्हाला माहित कसे नाही? आज रामदास स्वामी असते तर नक्कीच म्हणाले असते--- "केजरूच्या गुलामांचे कैसे बोलणे केजरूच्या गुलामांचे कैसे चालणे".... हे तिरकसपणे लिहिले आहे हे वेगळे सांगायलाच नको.
मग दिल्ली स्टेट असेंब्ली नक्की कशासाठी जबाबदार आहे हे तर लोकांना कळु देत आणि मग दिल्लीसाठी अजुन एका वेगळ्या सरकारी यंत्रणेची गरजच काय?
दिल्लीच्या विधानसभेची गरज बाकी कशासाठी नाही तरी एका गोष्टीसाठी तरी नक्कीच आहे. दिल्लीतल्या जुगाडू कल्चरमधल्या लोकांनी सगळे काही फुकट पाहिजे म्हणून अडाण्यांना निवडून दिले आहे.त्यांना त्या कर्माची फळे पाच वर्षे अगदी पूर्णपणे भोगू देत.आणि दिल्लीत अडाण्यांना निवडून दिल्यामुळे नक्की काय परिणाम झाले हे देशातील इतर राज्यांमधील लोकांनाही समजू दे.त्या कारणासाठी २०२० नव्हे तर २०२५ पर्यंत दिल्ली विधानसभाही असू दे आणि केजरीवालच मुख्यमंत्री असू देत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
ब
बोका-ए-आझम Wed, 09/23/2015 - 07:41 नवीन
एवढा राग आहे तुमचा दिल्लीवर? आणि अजून एक लक्षात आलं की नाही? गाझामधल्या इझराईलच्या बाँबफेकीबद्दल निषेध करणारे आप्पलपोटे सीरिया, आयसिस, चार्ली हेब्डो, आयलान कुर्दी यांच्याबाबत शांत आहेत. बरोबर, यांच्या शांततेला वाहिलेल्या धर्मातल्या बोलवित्या धन्यांकडून आदेश आला नसणार!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
म
माईसाहेब कुरसूंदीकर Wed, 09/23/2015 - 08:30 नवीन
कारणासाठी २०२० नव्हे तर २०२५ पर्यंत दिल्ली विधानसभाही असू दे आणि केजरीवालच मुख्यमंत्री असू देत.
ह्या असल्या कारणांसाठीच 'धुतल्या तांदळासारखा स्वच्छ' शिवराजसिंग चौहान मुख्यमंत्री ठेवलाय.अजून किती व्यापम घोटाळे हे ग्रुहस्थ करतात पाहूया.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
ब
बोका-ए-आझम Wed, 09/23/2015 - 11:14 नवीन
१९९९ मध्ये सुरु झाला. तेव्हा मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री दिग्विजय सिंग होते. जरा तुमच्या ह्यांचा अभ्यास वाढवा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
म
माईसाहेब कुरसूंदीकर Wed, 09/23/2015 - 13:09 नवीन
धन्यवाद रे बोक्या. दिग्विजय्,शिवराज सिंग हे एकाच माळेचे मणी आहेत हे शेवटी सिद्ध झाले. भाजपा राज्यांमध्ये कांद्याचा भाव काय आहे?दिल्लीपेक्षा महाग असेल तर भाजपाचे मंत्रीही 'कांदा घोटाळा' करत आहेत का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
ब
बोका-ए-आझम Wed, 09/23/2015 - 19:45 नवीन
म्हणजे तुम्ही, नानासाहेब, ग्रेटथिंकर, फुजि, हितेश, दादा दरेकर, काउ - हे जसे आहेत तसे का माई? जरा ह्यांना विचारून घ्या बरं. तशीही तुम्हाला स्वतःची अक्कल कुठे आहे? 'ह्यांचा' प्लेबॅक सतत तर लागतो. आणि आपल्याच पक्षाच्या महिला कार्यकर्तीचा उल्लेख प्रसिद्धीमाध्यमांसमोर टंच माल म्हणून करणारे दिग्विजय आणि शिवराज एका माळेचे मणी? आणि हे सिद्धपण झालं? कुठल्या कोर्टात? कसं? पण असले प्रश्न ' ह्यांना ' पडत नसावेत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
श
श्रीगुरुजी Wed, 09/23/2015 - 19:47 नवीन
+१ या एकाच माळेच्या मण्यात टॉफि (टॉपगिअर्ड फिलोसोफर), ग्रेटथिन्कर, सचीन, मंदार कुमठेकर इ. मूल्यवान मौक्तिके राहिलीच की!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
फ
फुलथ्रॉटल जिनियस गुरुवार, 09/24/2015 - 16:36 नवीन
ते गिरिष बापटचे विधान,कर्नाटक विधान परिषदेतलं पॉर्न क्लिप प्रकरण, संजय जोशीची सेक्स स्कॅण्डल हे सगळे विसरलात काय हो बोका भाउ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
श
श्रीगुरुजी गुरुवार, 09/24/2015 - 18:30 नवीन
नारायण दत्त तिवारीचे राजभवनातले प्रताप आठवतात का नाना? आणि अभिषेक मनू संघवीचे प्रकरण विसरलात का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फुलथ्रॉटल जिनियस
ब
बोका-ए-आझम गुरुवार, 09/24/2015 - 20:05 नवीन
अशा स्वरूपाची विधानं केली आहेत ना. नाही कोण म्हणतंय?पण आपल्याच पक्षाच्या कार्यकर्तीबद्दल असं विधान आणि तेही एक महासचिव पदावरचा आणि माजी मुख्यमंत्री असलेला माणूस करतो तेव्हा ते नक्कीच गंभीर आहे आणि भाजपच्या नेत्यांनी असं केलंय म्हणून काँग्रेसच्या नेत्यांची वागणूक क्षम्य कधीपासून ठरायला लागली? सर्वांना एकच न्याय लावा नाहीतर biased आहात असं सरळसरळ मान्य करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फुलथ्रॉटल जिनियस
श
श्रीगुरुजी Wed, 09/23/2015 - 19:51 नवीन
का अजुन धागे काढुन स्वतःची नाचक्की करुन घेत आहात? आणि कुठे गेले ते मिपावरचे "कह के लेंगे", "प्रचारकी थाटाचे धागे" वगैरे गळे काढणारे लोक. हा धागा नक्क्की काय वेगळा आहे?
त्यांच्याकडून उत्तराची अपेक्षा करू नका. प्रचारकी धागा काढून ते केव्हाच पसार झाले आहेत. प्रत्येकवेळी खोटे प्रचारकी प्रतिसाद लिहायचे आणि खोटेपणा उघडकीला आणल्यानंतर कोणतेही स्पष्टीकरण ने देता पसार व्हायचे ही त्यांची नेहमीची पद्धत आहे. आता पुढील काही दिवस ते मौनात असतील. सोमनाथ भारतीवरील आरोपांमागे भाजपचाच कट आहे हे कसे सिद्ध करायचे याविषयी अभ्यास सुरू असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
ब
बोका-ए-आझम Wed, 09/23/2015 - 07:07 नवीन
  • Log in or register to post comments
ह
होबासराव Wed, 09/23/2015 - 10:59 नवीन
दिल्लीतल्या जुगाडू कल्चरमधल्या लोकांनी सगळे काही फुकट पाहिजे म्हणून अडाण्यांना निवडून दिले आहे.त्यांना त्या कर्माची फळे पाच वर्षे अगदी पूर्णपणे भोगू देत.आणि दिल्लीत अडाण्यांना निवडून दिल्यामुळे नक्की काय परिणाम झाले हे देशातील इतर राज्यांमधील लोकांनाही समजू दे. क्लिंटन भौ (आपण क्लिंटनच म्हणणार) तुमच्या ह्या मताशी खुप वेळा सहमत. @मृत्युन्जय मग दिल्लीसाठी अजुन एका वेगळ्या सरकारी यंत्रणेची गरजच काय? थेट भेट गनिमांना, एकदम मुद्द्यालाच हात घातला कि :))
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 09/23/2015 - 19:54 नवीन
आआपचे मंत्री सोमनाथ भारती न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यापासून फरार आहेत. 'स्वच्छ राजकारण', 'हम यहा सिस्टिम बदलने आये है' अशा गप्पा मारणारे अशा फरार मंत्र्याला मंत्रीमंडळातून काढत नाहीत कारण हा नक्कीच उपराज्यपाल किंवा केंद्रसरकारचाच कट असणार.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 09/24/2015 - 18:31 नवीन
अटक टाळण्यासाठी आआपचे मंत्री सोमनाथ भारती अजूनही फरारी आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
अ
अर्धवटराव गुरुवार, 09/24/2015 - 18:57 नवीन
कौटुंबीक हिंसा प्रकरणी अटक टाळण्यासाठी अशी फरारा-फरारी कॉमन आहे. केजरीसाहेबांचं नशीबच वाकडं म्हणायचं. राज्यात काहि चांगलं करायला गेले तर पक्षात घरचे अहेर सतत मिळत राहातात साहेबांना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Mon, 09/28/2015 - 16:52 नवीन
सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा जामीन नाकारला व पोलिसांच्या स्वाधीन व्हायचे आदेश दिले. तरीसुद्धा सोमनाथ भारती अजून फरार आहे. त्याला मंत्रीपदावरून तरी काढले का नाही याची माहिती नाही. आम आदमी पक्षाचे नाव बदलून आता "फआप" असे करावे. "फआप" म्हणजे "फरारी आरोपींचा पक्ष"!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
र
रमेश आठवले Sat, 09/26/2015 - 18:44 नवीन
अरविंद केजरीवाल हे सुशिक्षित आहेत. राष्ट्रीय प्रोद्योगिक संस्थेचे पदवीधर आहेत. केंद्र सरकारचे अधिकारी म्हणून त्यांनी बरीच वर्षे काम केले आहे. दिल्लीचे मुख्य मंत्री दुसऱ्या खेपेस झाले आहेत. त्याना राजधानीचे शहर दिल्ली येथील मुख्य मंत्र्याच्या मर्यादित अधिकारा विषयी चांगली माहिती असणार. तरीसुद्धा पदावर आल्या पासून स्वत:चे काम न करता त्यांच्या अधिकाराच्या बाहेर जावून रोज नवीन गोष्टी करतात, सनसनाटी निर्माण करतात व खापर मोदी , केंद्र सरकार , नायब राज्यपाल व भा ज पा वर फोडतात . हा पद्धतशीर खेळ चालवला आहे . वेड घेऊन पेडगावला जाणाऱ्यां आणि जाणून बुजून अपप्रचार करणारया केजरीवाल यांचे- पेडगावचे गोबेल्स- असे नामकरण करावयास ह्वे.
  • Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम Mon, 09/28/2015 - 17:17 नवीन
असेच म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमेश आठवले
श
श्रीगुरुजी Mon, 09/28/2015 - 17:43 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
न
नांदेडीअन Tue, 09/29/2015 - 08:32 नवीन
धाग्याचे नाव सार्थ ठरवल्याबद्दल सर्वप्रथम आपल्या सगळ्यांचे आभार. आता या बातमीमागच्या ‘परिस्थिती’बद्दल बोलू. १. ही बातमी लिहिणारे शेखर घोष हे दक्षिणी दिल्ली महानगरपालिकेने नेमून दिलेले अधिकृत पत्रकार आहेत, त्यामुळे ते कोणाची आणि कशी रिपोर्टिंग करतील हे वेगळे सांगायची गरज नाही. वाटल्यास त्यांच्या फेसबुक प्रोफाइलवर जाऊन त्यांचे गेल्या फक्त महिन्याभराचे पोस्ट्स बघा. २. दिल्लीची ही मोटार ड्राइविंग स्कुल असोसिएशन सरकारच्या मागे का पडली आहे हे जाणून घेण्यासाठी ही बातमी वाचा. New guidelines for Delhi's driving schools http://timesofindia.indiatimes.com/city/delhi/New-guidelines-for-Delhis-driving-schools/articleshow/48645534.cms वर दिलेल्या या दोन कारणांकडे दुर्लक्ष करू (तुम्हाला विषयांतर करायला सोपे जावे म्हणून.) आणि मूळ बातमीबद्दल बोलू. - IDTR म्हणजे Institute of Driving Training & Research Center. - असे सेंटर वेगवेगळ्या राज्यांमध्ये असतात. - बाराव्या पंचवार्षिक योजनेमध्ये IDTR बद्दल राज्य सरकारसाठी काय लिहिले आहे बघा : Identify and allot requisite land of about 10-15 acres for setting up the institute free of cost. - असे सेंटर बांधून झाल्यानंतर सरकारी अनुदानावर जर काही खर्च लागत असेल, तर तो IDTR ने राज्य सरकारला द्यावा. - मागच्याच महिन्यात झारखंड सरकारने टाटा मोटर्सच्या IDTR साठी १२ एकर जागा फुकट दिली आणि केंद्र सरकारने हे सेंटर उभारण्यासाठी १७ करोड रूपये दिले. - आणि सगळ्यात हास्यास्पद बाब म्हणजे, जे लोक "शाळा-कॉलेज बांधायला लागणार्‍या जमिनीसाठी आप सरकारला केंद्राकडेच भीक मागावी लागेल!" म्हणत होते, तेच आज अशा बातम्या पसरवत आहेत. बाय द वे, सोमनाथ भारती यांना कोणत्या मंत्रीपदावरून काढायला हवे असे तुम्हाला वाटते ? कधी कधी वाटतं की सगळे मिपाकर (फेक प्रोफाइल ग्राह्य धरल्या नाहीत.) सुज्ञ आहेत, आणि तुम्ही पोस्ट केलेल्या प्रत्येक माहितीची ते स्वतः शहानिशा करत असतील. पण कधी कधी काळजीसुद्धा वाटते की माहितीची खातरजमा करून घेण्यात वेळ घालवण्यापेक्षा तुमच्यावर विश्वास ठेवणे त्यांना अधिक सोयीचे वाटत असावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा