कलेवराचा उत्सव?
लोकसत्ता मधे प्रकाशित झालेल्या 'कलेवराचा उत्सव' या लेखाच्या लेखकास हे पत्र. यातील मजकूर कुणा एका व्यक्तीस उद्देशून नसून तो केवळ एक विचार समजावा.
नमस्कार,
लोकसत्ता चा मी एक नियमित वाचक असून त्यात प्रकाशित झालेला आपला 'कलेवराचा उत्सव' हा लेख वाचला. (http://www.loksatta.com/vishesh-news/rajiv-khandekar-article-1147141/) त्याबद्दल प्रतिक्रिया देण्यासाठी म्हणून हा ई-संदेश. आपली कळकळ या लेखातून वाचकांपर्यंत नक्कीच पोचली. आपल्या अनेक मतांशी मी सहमत आहे. तरीही त्याहून अधिक मतांशी मी सहमत नाही.
सर्वप्रथम, मी एक संगीतप्रेमी आहे. शास्त्रीय संगीतापासून ते पाश्चात्य संगीतापर्यंत सगळे संगीतप्रकार मी ऐकतो, त्यांचा आनंद घेतो. जितकी रशीद खान ची भैरवी काळजात भिड्ते तितकंच एनिग्मा चं 'सॅडनेस' वेडं करतं. आपण आपल्या लेखात संगीत कळण्याचा उल्लेख केलात, त्याबद्दल इतकंच म्हणतो की संगीत कळण्यापेक्षा ते मनाला भावणं अधिक आनंददायी असतं. आपण पायथागोरस, प्लेटो या शास्तज्ञांबद्दल जे म्हणालात त्याबद्दल फारसं ज्ञान नाही, पण ते वाचून संगीताचं गणित, की गणिताचं संगीत हा प्रश्न मात्र खुणावून गेला.
त्रासच म्हणायचा तर तो लोकसंख्या, भ्रष्टाचार, प्रदूषण, राजकारण अशा गोष्टींचा जास्त होतो पण मुद्दा ढोल ताशांचा आवाज इथवर असेल तर ही गोष्ट मान्य आहे की त्यांचा आवाज अतिउच्च असल्याने त्याचा त्रास नक्कीच होऊ शकतो, होतो. विशेषतः रुग्णालयं, किंवा लहान मुलं, आपण म्हणालात त्याप्रमाणे पाळीव व इतर सगळेच प्राणी, यांना अतिउच्च आवाजाचा त्रास होऊ शकतो. त्याबद्दल काही म्हणणं नाही, ते खरं आहे. पण म्हणून 'ते संगीत नाही' असं म्हणणं ही अतिशय टोकाची भूमिका आहे. शिवाय त्यात सहभागी होणा-या मुली, त्यांचे पेहराव, त्यांचे मोकळे सोडलेले केस, किंवा बेभान होऊन त्यांचं ढोल वाजवणं, याची तुलना 'डोरा' च्या उपभोगोत्सुकतेशी करणं, हे कोत्या मनाचं लक्षण आहे. एकीकडे इझरा पौंडच्या मते ‘जे संगीत नृत्यापासून दूर जाते ते संगीत नष्ट होण्याकडे वाटचाल करते' असं आपण नमूद करता, आणि ढोल ताशांच्या तालावर मुली थिरकल्या तर त्यांचं थिरकणं आपल्याला उन्मादस्वरूप वाटतं. याचा कृपया विचार करावा.
'बधिरता ही नाचणाऱ्या व वाजवणाऱ्या व्यक्तीची अवस्था नसून आवश्यकता असते', असं आपण म्हणालात. मग भजनात तल्लीन होणारा, शास्त्रीय संगीत ऐकताना डोळे मिटून डोलणारा ही मंडळीही बधीरच म्हणायला हवीत, नाही का? जसं संगीत, तशी त्याची अनुभूती असते. आणि संगीत जरी वैश्विक असलं तरी संगीताची अनुभूती ही पूर्णपणे व्यक्तिसापेक्ष बाब आहे असं माझं मत आहे. संगीत ऐकण्याची प्रत्येकाची कारणं वेगळी असतात. कुणी ते कळतं म्हणून ऐकतो, कुणी आवडतं म्हणून ऐकतो, कुणासाठी ते ताण-तणावावरचं औषध असतं तर कुणासाठी ते गोष्टी, माणसं आठवण्याचं किंवा विसरण्याचं माध्यम असतं. संगीतातली फलश्रुती प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळी असते आणि म्हणूनच संगीताचे प्रकारही वेगवेगळे असतात. तेंव्हा अमूक एक वाईट आणि अमूक एक चांगलं असं त्याचं सरसकटीकरण होऊ शकत नाही. मात्र एक सामायिक गोष्ट ही की संगीताचा प्रकार कुठलाही असला तरी संगीतात प्रत्येक जण स्वतःला शोधत असतो.
उन्मादाबद्दल म्हणाल तर मान्य आहे की पब संस्कृती, अंधा-या जागेत कानठळ्या बसवणा-या आवाजात नाचणं, पुढे त्या पब संस्कृतीतून दिसणारा तथाकथित उच्चभ्रू समाजाचा ओंगळवाणा चेहरा हा उन्माद आहे. किंबहुना उन्मादाची व्याख्या खूप व्यापक आहे. केलेले नियम न जुमानणं, जिथे तिथे पैशाच्या जोरावर स्वतःला श्रेष्ठ सिद्ध करणं, लग्नसमारंभ, उत्सव अशा प्रसंगी पैशाची बेछूट उधळण, त्याचं प्रदर्शन करणं, समोरच्याला कमी लेखणं, केवळ परवडतंय म्हणून गोष्टींची नासाडी, उधळपट्टी करणं, समाजभावना न जपणं, आपलं तेच खरं करणं, दुस-याला कमी लेखणं, असहिष्णु वर्तन करणं, ही सगळी उन्मादाचीच उदाहरणं आहेत. आणि हा बळावत चाललेला उन्माद ढोलपथकांच्या आवाजापेक्षाही जास्त घातक आहे.
सरतेशेवटी, पुन्हा संगीत, बधिरता, अवस्था, आणि डोरा कडे येतो. संगीत, मग ते कुठलंही असो, ऐकताना तुम्ही ट्रान्स मधे जाणं, तल्लीन होणं, किंवा आपल्या भाषेत बधीर होणं, हे ते संगीत तुमच्यापर्यंत पोचल्याचं लक्षण आहे, असं मी मानतो. एखादं गाणं ऐकता ऐकता अचानक अंगावर सर्रकन काटा येतो, तेंव्हा काय होतं हे सांगता येणार नाही. मी स्वतः एका ढोलपथकाचा सदस्य आहे, आणि त्या तालाची, नादाची, संगीताची मजा ही केवळ शब्दातीत आहे हे आग्रहाने सांगेन. ती आपण स्वतः त्याचा भाग होऊन अनुभवल्याशिवाय कळण्यातली नाही.
संगीत ही नशा आहे, नक्कीच आहे. त्यामुळे नशेत जसा माणूस झिंगणं ही तात्पुरती अवस्था असते तसाच संगीतात माणूस गुंगणं ही सुद्धा तात्पुरती अवस्था असते. आणि ती स्वाभाविक आहे. कुणाला कुमारजींच्या भामत भैरव रचनेतील ‘ढोल आ बजा ले रे’ ऐकून ती अवस्था मिळत असेल, तर कुणाला स्वतः ढोल वाजवून. प्रत्येकाचं माध्यम वेगळं, पण परिणाम एकच. पण केवळ एखादं संगीत आपल्या लेखी श्रवणीय नाही म्हणून त्याच्याशी संबंधित लोकांबाबत ‘स्वत:ला नसलेल्या लिंगाची इच्छापूर्ती करणारे' असं विचित्र विधान करणं, हे योग्य नाही.
आपल्याला आवाजाबद्दल असलेल्या आक्षेपाशी सहमत असलो तरीही एकंदरित आपली मतं पूर्वग्रहदूषित, आणि टोकाची वाटली. विशेषकरून आपण ढोलपथकात असणा-या फक्त मुलींचा वारंवार उल्लेख केलात, तो संकुचित वाटला. आजच्या काळात मुली या मुलांपेक्षा कुठेही मागे नाहीत, ढोलपथकात मुलींपेक्षा दुप्पट संख्येने मुलं असतात, मग आपला आक्षेप प्रत्येकावर समान असायला हवा होता. असो. वर म्हटल्याप्रमाणे निष्प्राण, उन्मादक समाज बघायचा असेल तर तो ढोल पथकांमधे नाही, प्रत्येक ठिकाणी आपल्या आजूबाजूला आहे. त्याविषयी सकारात्मक समाजकार्य होणं गरजेचं आहे, अर्थात तो मुद्दा वेगळा आहे. पण ज्या संगीतात कलेवरातही प्राण ओतण्याची ताकद आहे, त्या संगीतात रमणा-यांचा उत्सव 'कलेवरांचा उत्सव' कसा असू शकतो? यावर आपण जरूर चिंतन करा अशी मी आपल्याला विनंती करतो.
ब्लॉग दुवा हा
💬 प्रतिसाद
(175)
व
वेल्लाभट
Wed, 10/07/2015 - 11:59
नवीन
If playing Dhol on the streets during festival is उन्माद then I don't know what उन्माद is.
- Log in or register to post comments
द
दत्ता जोशी
Wed, 10/07/2015 - 12:04
नवीन
मग ही उर्जा वापरण्यासाठी ढोल पथकं हा एकमेव उपाय आहे का
अनेक आहेत कि. पण हा हे सुधा एक सेलेब्रेशन आहे ना! अतिरेक नको, दुसर्यांना त्रास होईल हे ना पाहणे गरजेचे हे मान्य. पण मला आवडत नाही म्हणून कोणीच करायचं नाही हे पटत नाही.
"माझा stamina नि शारीरिक क्षमता वापरायचीय असं म्हणून एखादा तुम्हाला मारायला लागला "...
काय च्या काय.. तुमचा तर्क वाचून असंच वाटायला लागलाय मला. असुदे असुदे. मी काय मुद्दा मांडला होता तो तुमच्या पर्यंत नाही पोचणार.
- Log in or register to post comments
द
दत्ता जोशी
Wed, 10/07/2015 - 12:14
नवीन
दुसर्याने आपल्याकडे बोट दाखवल्यावर आपण तिसर्याकडे बोट दाखवणे बंद व्हायला हवे असे वाटते.
काहीही. म्हणून अशा ठिकाणी जास्ती आवाज नको असा लिहिलं आहे.
बाकी अनावश्यक महापुरुषांच्या जयंत्याना लागणाऱ्या स्पिकरच्या भिंती, अश्लील गाणी, नृत्ये, रहदारीला होणारा अडथळा टाळला गेलाच पाहिजे याबद्दल दुमत नाही.
- Log in or register to post comments
म
मोदक
Wed, 10/07/2015 - 12:42
नवीन
अनावश्यक महापुरुष कोणते?
- Log in or register to post comments
व
वेल्लाभट
Wed, 10/07/2015 - 12:48
नवीन
ते नै का पोस्टरात प्रकट होतात ते...
- Log in or register to post comments
अ
अंतरा आनंद
Wed, 10/07/2015 - 12:31
नवीन
हेच ना. त्या आवाजात कोणाचेच मुद्दे कोणापर्यंत पोहोचत नाहीत.
मला आवडत नाही म्हणून नाही तर मलाच नाही अनेकांना प्रचंड त्रास होतो म्हणून.
- Log in or register to post comments
स
सुनील
Wed, 10/07/2015 - 12:34
नवीन
हे अनावश्यक महापुरुष कोणते???
- Log in or register to post comments
द
दत्ता जोशी
Wed, 10/07/2015 - 12:50
नवीन
"बाकी अनावश्यक महापुरुषांच्या जयंत्याना लागणाऱ्या स्पिकरच्या भिंती, अश्लील गाणी, नृत्ये, रहदारीला होणारा अडथळा टाळला गेलाच पाहिजे याबद्दल दुमत नाही."
बाकी महापुरुषांच्या जयंत्याना लागणाऱ्या अनावश्यक स्पिकरच्या भिंती, अश्लील गाणी, नृत्ये, रहदारीला होणारा अडथळा टाळला गेलाच पाहिजे याबद्दल दुमत नाही.
"अनावश्यक महापुरुष" नाही.
- Log in or register to post comments
त
तर्राट जोकर
Wed, 10/07/2015 - 12:51
नवीन
ज्यांच्या जयंतीला डीजे लावून नाच होतो असे महापुरूष एकच आहेत भारतात...
- Log in or register to post comments
प
प्यारे१
Wed, 10/07/2015 - 12:59
नवीन
नै वो. प्रत्येक जातीचे आणि प्रत्येक धर्माचे असे एक एक आहेत.
वाटून घेतलेत आपसात.
- Log in or register to post comments
अ
अंतरा आनंद
Wed, 10/07/2015 - 13:00
नवीन
अहो, ते स्पीकरला अनावश्यक म्हणतायत तर तुम्ही का महापुरुषांच्या अनावश्यकतेवर घसरताय.(त्यानिमित्याने मोठ्या आवाजाला ते गोंगाट म्हणालेत हे ही नसे थोडके).
आणि त्यांनी का बरं डीजे लाउन डान्स करु नये? त्यांच्या उर्जेला वाट नको मिळायला?
- Log in or register to post comments
द
दत्ता जोशी
Wed, 10/07/2015 - 13:39
नवीन
ओ TJ भाऊ!
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Wed, 10/07/2015 - 13:29
नवीन
लेख आणि प्रतिक्रिया वाचून प्रचंड करमणूक झाली. गणपतीतल्या डॉल्बीकडे लक्ष वेधले की मशिदीचे भोंगे आणि अनावश्यक महापुरुषांकडे मुद्दा डायव्हर्ट करायचा ही स्ट्रॅटेजी जुनी झाली आता. हसूही येत नाही. तापावर इलाज म्हणून गोळी घ्या असे डॉक्टर म्हणतोय तर त्यालाच "खोकला अन सर्दीची गोळी कोण तुझा बाप देणार का" असे विचारण्याने नक्की काय बरे होईल ते एक महाज्ञानी रुग्णच जाणोत.
- Log in or register to post comments
द
दत्ता जोशी
Wed, 10/07/2015 - 13:45
नवीन
किती गडबड ओ मिरजकर ? ...वाचा कि जरा .. डॉल्बी काय, महापुरुष काय, सर्दी, खोकला काय, डॉक्टर काय , महापुरुष काय? विषय काय आहे माहिती आहे का? का परत एकदा एकदम बाबरी मशीद?
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Wed, 10/07/2015 - 14:16
नवीन
वाचलंय म्हणूनच लिहितोय ओ. घरातल्या घाणीचा विषय निघाल्यावर अन्य घरांबद्दल बोलून समोरच्याची कशी जिरवली अशा आविर्भावात असणार्यांना काय त्याचे? द्या, अजून अभिनिवेशपूर्ण प्रतिसाद द्या आणि निव्वळ समोरचे गप्प झाले म्हणून आपला मुद्दा कसा बरोबर असल्याचे सिद्ध झाले अशा उन्मादात रहा. शुभेच्छा.
- Log in or register to post comments
द
दत्ता जोशी
Wed, 10/07/2015 - 13:37
नवीन
अहो ताई,
आणि त्यांनी का बरं डीजे लाउन डान्स करु नये? त्यांच्या उर्जेला वाट नको मिळायला?
शांतपणे माझी ती पोस्ट संपूर्ण एकदा वाचा आणि काय लिहिलंय ते समजतंय का बघा. याउप्पर तुमची मर्जी. चालू दे तुमचं.
- Log in or register to post comments
द
दत्ता जोशी
Wed, 10/07/2015 - 14:29
नवीन
"घरातल्या घाणीचा विषय निघाल्यावर अन्य घरांबद्दल बोलून समोरच्याची कशी जिरवली "
विषय काय लिहिताय काय! वर सगळं वाचलं म्हणताय!
मिरजेत जिलबी चौकाच्या आसपास राहत होता काय? ताटात पडलं कि मग पुढ न बघता पहिले हाणायच मग शेवटी विचारायचं बारशाच होता का तेराव्याच ते.
काही माहिती नसताना काही संबंध नसतांना कशाला मध्ये पडता उगाच? का हौस आहे?
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Wed, 10/07/2015 - 14:31
नवीन
उगी उगी हां. अचं नै कलाचं! फार जळजळ होत असेल तर इनो घ्या.
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Wed, 10/07/2015 - 14:32
नवीन
हे लिहून आपल्या रोचक विचारांचे जाहीर प्रदर्शन घडवल्याबद्दल अनेक धन्यवाद. असेच बोलायचे शिक्षण दिले असावे बहुधा लहानपणापासून.
- Log in or register to post comments
र
राही
Wed, 10/07/2015 - 14:49
नवीन
सभासदांना प्रतिसाद देण्याचा हक्क नाहीय की काय मिपावर?
कशाला मध्ये पडताय म्हणजे काय?
- Log in or register to post comments
द
दत्ता जोशी
Wed, 10/07/2015 - 14:59
नवीन
याला मी उत्तर देणार नाही.
- Log in or register to post comments
द
दत्ता जोशी
Wed, 10/07/2015 - 14:40
नवीन
"घरातल्या घाणीचा विषय निघाल्यावर अन्य घरांबद्दल बोलून समोरच्याची कशी जिरवली " आणि "लेख आणि प्रतिक्रिया वाचून प्रचंड करमणूक झाली. गणपतीतल्या डॉल्बीकडे लक्ष वेधले की मशिदीचे भोंगे आणि अनावश्यक महापुरुषांकडे मुद्दा डायव्हर्ट करायचा ही स्ट्रॅटेजी जुनी झाली आता. हसूही येत नाही. तापावर इलाज म्हणून गोळी घ्या असे डॉक्टर म्हणतोय तर त्यालाच "खोकला अन सर्दीची गोळी कोण तुझा बाप देणार का" असे विचारण्याने नक्की काय बरे होईल ते एक महाज्ञानी रुग्णच जाणोत.
काही संबंध नसतांना तुम्हीच आलात विषयाशी असंबंध रोचक पोस्ट टाकायला, ओ राह्जे! आधी विचार करायचा होता, विषय काय लिहितोय काय ते.
असेच बोलायचे शिक्षण दिले असावे बहुधा लहानपणापासून. हे मी म्हणायला पाहिजे.
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Wed, 10/07/2015 - 14:43
नवीन
तिसर्या अवताराबरोबर मल्लविद्येचे प्रयोग करायची इच्छा नाही, तस्मात पास.
- Log in or register to post comments
त
तर्राट जोकर
Wed, 10/07/2015 - 15:00
नवीन
__/\___
- Log in or register to post comments
द
दत्ता जोशी
Wed, 10/07/2015 - 15:04
नवीन
विषयाशी संबंधित तुमची मते मांडायला तुम्ही मोकळे आहात. कदाचित तुमची काही मते जेन्युइन असतील आणि पटतील हि.
पण अहंपणाने अविचारी वैयक्तिक हल्ले करू नयेत. काहीच करण नाही. तिसरा अवतार वगैरे काही नाही. माझे नाव हि खरं आहे आणि मी हि. या पूर्वी किवा आताही माझा कोणताही पहिला दुसरा तिसरा..... अवतार किंवा आय डी मिपा वर नव्हता किंवा नाही. मिरजेचे आहात तेव्हा सोफ़्ट कॉर्नर नक्की आहे आणि राहील. माझ्यापेक्षा किमान १५-१६ वर्षांनी किंवा थोडे जास्तीच लहान दिसता. उत्तरा-उत्तर दाखल झालेल्या हाणामारीत बरेच काही बोललो. त्या बद्दल मनापासून क्षमस्व. तुमचे माझ्यावरचे वैयक्तिक प्रतिसाद आणि हल्ले मी मनावर न घेत विसरून जाणार आहे. ( शक्य असल्यास) तुम्ही पण विसरून जावे व कृपया मनात राग ठेवू नये. पण इथून पुढे असेच प्रतिसाद द्यायचे असतील तर तुमची इच्छा. माझी हरकत नाही.
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Wed, 10/07/2015 - 15:56
नवीन
माझ्या प्रथम प्रतिसादातली अनेक विधाने तुम्ही स्वतःला लावून घेतलीत. असो. तुमचा प्रांजळपणा आवडला हे नमूद करणे अवश्य आहे. हे खूप क्वचित दिसते.
बाकी रागबीग काही नाही. तस्मात क्षमस्व वगैरेची गरज नाही. :)
- Log in or register to post comments
द
दत्ता जोशी
Wed, 10/07/2015 - 17:49
नवीन
धन्यवाद, बॅटमॅन. हक्काने अरे तुरे म्हटलेलं चालेल का?
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Wed, 10/07/2015 - 18:13
नवीन
चालणार नाही. पळेल मात्र.
- Log in or register to post comments
अ
असंका
Fri, 10/09/2015 - 11:57
नवीन
एवढ्या वेगाने निचरा झालेला आज पहिल्यांदाच बघ्तोय....
- Log in or register to post comments
प
प्यारे१
Wed, 10/07/2015 - 15:05
नवीन
+१
अनावश्यक महापुरुष दत्ता जोशी यांचा निषेध. ;)
- Log in or register to post comments
द
दत्ता जोशी
Wed, 10/07/2015 - 15:17
नवीन
+१. प्यारे भाऊ. सर आन्खोपर. :-)
- Log in or register to post comments
क
काळा पहाड
Wed, 10/07/2015 - 17:27
नवीन
ते गणपती, नवरात्र, शिवजयंती, आंबेडकर जयंती, मोहरम वगैरे उत्सव घरात साजरे करा. एखादी रूम साऊंडप्रूफ करा आणि मग १९० डेसिबल नं डॉल्बी लावून मरा. रस्ता हा जाण्या येण्यासाठी असतो. तुम्ही संगीतातले किती दर्दी आहात हे लोकांना दाखवण्यासाठी नाही. एकाही माणसाला जर आवाजाचा त्रास होत असेल तर तो उत्सव बंद करणंच उत्तम. तुमची उर्जा वगैरे उतू जात असेल तर रस्ते तयार करणं, स्वच्छ भारत, ट्रॅफिक ला शिस्त लावणं वगैरे मधे भाग घ्या किंवा एक बॉक्सिंग ची पंचींग बॅग विकत घ्या. डोक्याला दरवर्षी ताप च्यायला.
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Wed, 10/07/2015 - 17:57
नवीन
+१११११११
- Log in or register to post comments
म
माझीही शॅम्पेन
Wed, 10/07/2015 - 18:03
नवीन
+ ११११११
अगदी अचुक !!!!
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Wed, 10/07/2015 - 18:15
नवीन
त्यात ते न्यू ईयर वगैरे राहिलं. नै म्हणजे "तुम्हांला फक्त धार्मिक सण दिसतात" असे कुणी म्हणायला नको.
- Log in or register to post comments
प
प्यारे१
Wed, 10/07/2015 - 18:17
नवीन
नावांची टक्केवारी बघता जास्त करुन हिंदूंच्या सणावरच तुमचा रोष दिसतोय.
-भगवा झेंडा
- Log in or register to post comments
न
नीलमोहर
Wed, 10/07/2015 - 18:48
नवीन
+१११११११११११११११११११११११११११
हिंदू सोडून इतर कुठल्या धर्मात उत्सव एवढ्या मोठ्या प्रमाणात सार्वजनिकरित्या रस्त्यांवर साजरे केले जातात ?
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Wed, 10/07/2015 - 21:07
नवीन
ब्ल्याक माऊंटनभौ. लैच परफेक्ट उत्तर.
आवडले.
काही अल्पाक्षरी उत्तरे पाहिल्यावर उन्माद काय ते कळलेच होते.
तुमचे हे उत्तर त्यासाठी परफेक्ट.
मला तुमचा प्रतिसाद वाचून सारखी स्व. अशोक कामटेंची आठवण आली. ह्याच पध्दतीने त्यांनी सोलापूरची दंगल आटोक्यात आणली होती.
- Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर
गुरुवार, 10/08/2015 - 07:11
नवीन
अहाहाहा!!!
काय प्रतिसाद लिहीलाय हो!!
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
गुरुवार, 10/08/2015 - 17:45
नवीन
@काळा पहाड
अचूक नेम +100
- Log in or register to post comments
ज
जातवेद
Tue, 10/13/2015 - 10:45
नवीन
+११११११
- Log in or register to post comments
न
नाखु
Sun, 09/16/2018 - 17:22
नवीन
पहाडी आवाजात कडकड झालाय?
सहा सात मंगल कार्यालय कोंडाळ्यात दहा वर्षे रहिवासी
डॉल्बी, ढोलताशांच्या आवाजाने अशरक्ष: भरलेला नाखु.
इथल्या सारखा काहींनी जागा बदल करण्याचा सल्ला दिला होता.
पण सतत विरोध पत्करून पत्रव्यवहार व समविचारी मंडळींना भेटून यथाशक्ति यथामति आवाय उठवत राहिलो आणि कशामुळे माहित नाही (अनधिकृत बांधकामे असल्याने) पाच मंगलकार्यालयांचा बाजार उठला,आणि दोन स्थलांतरित झाले.
त्या उपद्रवापायी ज्यांनी माझ्यासारखं बैठे घर सोडून फ्लॅट मध्ये गेले त्यांना जबरदस्त हळहळ वाटते.
- Log in or register to post comments
च
चांदणे संदीप
Wed, 10/07/2015 - 19:42
नवीन
या लेखाच्या आशयाशी साधर्म्य असणारी कविवर्य मंगेश पाडगांवकरांची एक सुरेख कविता आहे, बघा पटतीये का!
कावळा लागला थुईथुई नाच करू
तेव्हा तुम्हाला असह्य चीड आली कावळ्याची...
...आता पुर्ण आठवत नाहिये. जमेल तशी आठवून किंवा शोधून मग देतो...
धन्यवाद!
- Log in or register to post comments
द
दिवाकर कुलकर्णी
Wed, 10/07/2015 - 21:01
नवीन
ते गणपती, नवरात्र, शिवजयंती, आंबेडकर जयंती, मोहरम वगैरे उत्सव घरात साजरे करा. एखादी रूम साऊंडप्रूफ करा आणि मग १९० डेसिबल नं डॉल्बी लावून मरा. रस्ता हा जाण्या येण्यासाठी असतो. तुम्ही संगीतातले किती दर्दी आहात हे लोकांना दाखवण्यासाठी नाही. एकाही माणसाला जर आवाजाचा त्रास होत असेल तर तो उत्सव बंद करणंच उत्तम. तुमची उर्जा वगैरे उतू जात असेल तर रस्ते तयार करणं, स्वच्छ भारत, ट्रॅफिक ला शिस्त लावणं वगैरे मधे भाग घ्या किंवा एक बॉक्सिंग ची पंचींग बॅग विकत घ्या. डोक्याला दरवर्षी ताप च्यायला.
एकदम सही
- Log in or register to post comments
स
सह्यमित्र
गुरुवार, 10/08/2015 - 10:14
नवीन
ह्याच न्यायाने सवाई गंधर्व सारख्या महोत्सवाला हि अधून मधून काही जण विरोध करत असतात. कुठलाही सामाजिक उत्सव साजरा करताना त्याचा काही प्रमाणात उपद्रव हा होतच असतो. अर्थात तो सहनशक्तीच्या पलीकडे जाऊ न देणे हे उत्सव करणार्यांचे कर्तव्य आहे पण त्याच बरोबर थोडा देखील उपद्रव झाल्यास त्याचा मोठा गवगवा करून हे सगळेच बंद करून टाका असे म्हणणे हे देखील तितकेसे बरोबर नहि. एकूणच दोन्ही बाजू कडून सामंजस्याची आवश्यकता आहे. विशेषतः उत्सवाचा जल्लोष करणार्यांनी जास्त
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
गुरुवार, 10/08/2015 - 10:27
नवीन
तरीच म्हटले अजून सवाईचा उल्लेख कसा कोणी केला नाही...
- Log in or register to post comments
स
सह्यमित्र
गुरुवार, 10/08/2015 - 11:40
नवीन
विषयाशी निगडीत आहे म्हणून केला. बाकी चालू द्यात.
- Log in or register to post comments
द
दिवाकर कुलकर्णी
Wed, 10/07/2015 - 21:09
नवीन
एकदम सही काला पहाड़ याची प्रतिक्रिया
ते गणपती, नवरात्र, शिवजयंती,
काळा पहाड - Wed, 07/10/2015 - 20:57
- Log in or register to post comments
र
रेवती
Wed, 10/07/2015 - 22:54
नवीन
माझा पहिला प्रतिसाद गणरायाच्या कृपेनं गायबला. मूळ लेख, तुमचे पत्र वाचले. ढोल पथके वगैरेला कोणाचाही आक्षेप नाहीये तर आजकाल जे थैमान घातले गेलेय त्याला आक्षेप आहे. रस्ते हे फक्त गणेशमंडळांसाठी उत्सवाकरिता, जयंत्या, मयंत्यांकरिता नाहीत. ते ट्याक्सपेयर्सचे रस्ते आहेत (हो, खडबडीत असले तरी!). लोकांना सणाआधीही जगण्याचा अधिकार जास्त आहे. हां, आता ऐकून कोणी घेत नाही ते राहू द्या! यावर्षी ढोल, डॉल्बी, अजून काय दंगे असतील ते, यांनी वैताग आणलाय. माझ्या आईवडिलांची पिढी बर्यापेकी चालीरिती पाळाणारी (जरा देवभक्त क्याट्यागरी) आहे तरी त्यांच्या घराच्या चौकातील गणपतीत चाललेल्या गोंधळामुळे पहिल्या दिवशी गणपतीला नैवेद्य दाखवल्यावर दोघेही घरी न जेवता उपहारगृहात गेले. संध्याकाळी गाण्यांच्या आवाजाने आजारी पडले. ऐकू येईनासे झालेय. दुसर्यादिवशी पुण्याबाहेरील एका हॉटेलात रहायला गेले. इकडे आरत्या, भजने वगैरे चालूच होते. त्यांचे पाहून आणखी पंधराजण ओळखितले आपापली घरे, बसवलेल्या गणपतीसकट बंद करून हॉटेलात रहायला गेले. हॉटेलवाल्यांना रिक्वेस्ट करून सूप, खिचडी असा साधा आहार. कोणाला ताप, डोकेदुखी, दमा असे सुरु! जीव घाबरा होणे हेही झाले. मंडळांकडे तक्रारी केल्यास कोणीही ऐकून घेत नाही. कार्यकर्ते तर या दिवसात मस्तीतच असतात. यावर्षी म्हणे विदर्भातील दुष्काळाला सहानुभुती दाखवायची म्हणून (आसपासच्या रहिवाश्यांच्या कॉस्टवर) कोणतेही सेलेब्रिटी न बोलावता स्थानिक खेळ पथके, झिम्मा फुगडी पथके, लेझीम असे कार्य्क्रम १० दिवस होते. या कश्याच्याही विरुद्ध नाही पण या लोकांना जो उन्माद असतो ना, तो आवरण्यापलिकडे चाललाय. त्याचा अनुभव ३१ डिसेंबर २०१४ ला आम्ही घेतलाय. माझा मुलगा पुण्याच्या इस्पितळात उपचारासाठी गेला होता. रात्री बाहेर पडून आम्ही रिक्षा शोधत होतो तर एकही नाही. त्याचे औषध नाही. कारण विचारले तर दारू पिऊन लोक दुकानाचे नुकसान करतात. हा उन्मादच आहे! पुणे स्टेशनपर्यंत जाऊन औषधे आणावी लागली. आज काही लोकांची हॉटेलात जाऊन राहण्याची आर्थिक परिस्थिती आहे त्यांचे ठीक आहे. ज्यांना परवडत नाही त्यांनी हा त्रास सोसायचा? का म्हणून?
जग बदलतय, दिवस बदलतायत म्हणून आपल्यात बदल घडवणारी आपली पिढी आज परंपरांमध्ये काहीही बदल घडवायला तयार नाही. ढोल ताशे, संगीताचे कार्यक्रम असतील चांगले पण आज ते कितपत योग्य आहेत? किती वाजेपर्यंत? या तक्रारी सरकारात जाऊन अमूक वेळेपर्यंत हे बंद झाले पाहिजे वगैरे हुकुमांना किती दाद दिली गेली? कोणाचेही न ऐकणे/न जुमानणे हा उन्मादच आहे.
मुख्य रस्त्याच्या जवळ घर असणार्यांच्या नशिबात फक्त गणेशोत्सव, दहीहंडी, ताबूतरुपी दंगेच नसतात. रात्रीबेरात्री शिनेमे सुटल्यावर हॉर्न वाजवत जाणे, ओरडणे, दरमहिन्याच्या चतुर्थ्या, त्यासाठी चंद्रोदयापर्यंत भजने (अगदी लताबाईंनी गायलेली, पंडीत भीमसेनांनी गायलेली), नंतर आरत्या व उशीरापर्यंत प्रसाद वाटण! झोपायचे कधी? शांतता कधी? तक्रार केली तर "अरे आम्ही काय सिनेमातली गाणी लावतो काय? आरत्या भजने लावलीत, आम्हाला कोणी हात नाही लावू शकत" ही उत्तरे उन्मादाचे नाहीतर कश्याचे लक्षण आहे. लताबाईंची भजने चांगली असली तरी रात्री झोपताना शांतताच हवी असते.
पब संस्कृतीशी माझ्यासारख्या सामान्य मनुष्याला काही घेणे देणे नाही. नको असेल तर त्या वाटेला नाही जात व त्यांच्याकडून आवाजाचा त्रास होत नाही.
- Log in or register to post comments
भ
भाकरी
गुरुवार, 10/08/2015 - 01:21
नवीन
वरचा माझ्याबरोबरचा त्यांचा संवाद वाचा. सगळ्या मंडळातनं असे वेल्लाभट आहेत. त्याना जे करायचंय त्यामुळे लोकाना त्रास होत असेल तर त्याना काहिही फरक पडत नाहीये. तुम्ही आई-वडीलाना पुण्याबाहेर हॉटेलात ठेउ शकताय याबद्दल देवाचे आभार माना. तुम्ही-आम्ही या त्रासाबद्दल काहीही करू शकत नाही.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4
- ›
- »