Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

कलेवराचा उत्सव?

व
वेल्लाभट
Tue, 10/06/2015 - 07:26
🗣 175 प्रतिसाद
लोकसत्ता मधे प्रकाशित झालेल्या 'कलेवराचा उत्सव' या लेखाच्या लेखकास हे पत्र. यातील मजकूर कुणा एका व्यक्तीस उद्देशून नसून तो केवळ एक विचार समजावा. नमस्कार, लोकसत्ता चा मी एक नियमित वाचक असून त्यात प्रकाशित झालेला आपला 'कलेवराचा उत्सव' हा लेख वाचला. (http://www.loksatta.com/vishesh-news/rajiv-khandekar-article-1147141/) त्याबद्दल प्रतिक्रिया देण्यासाठी म्हणून हा ई-संदेश. आपली कळकळ या लेखातून वाचकांपर्यंत नक्कीच पोचली. आपल्या अनेक मतांशी मी सहमत आहे. तरीही त्याहून अधिक मतांशी मी सहमत नाही. सर्वप्रथम, मी एक संगीतप्रेमी आहे. शास्त्रीय संगीतापासून ते पाश्चात्य संगीतापर्यंत सगळे संगीतप्रकार मी ऐकतो, त्यांचा आनंद घेतो. जितकी रशीद खान ची भैरवी काळजात भिड्ते तितकंच एनिग्मा चं 'सॅडनेस' वेडं करतं. आपण आपल्या लेखात संगीत कळण्याचा उल्लेख केलात, त्याबद्दल इतकंच म्हणतो की संगीत कळण्यापेक्षा ते मनाला भावणं अधिक आनंददायी असतं. आपण पायथागोरस, प्लेटो या शास्तज्ञांबद्दल जे म्हणालात त्याबद्दल फारसं ज्ञान नाही, पण ते वाचून संगीताचं गणित, की गणिताचं संगीत हा प्रश्न मात्र खुणावून गेला. त्रासच म्हणायचा तर तो लोकसंख्या, भ्रष्टाचार, प्रदूषण, राजकारण अशा गोष्टींचा जास्त होतो पण मुद्दा ढोल ताशांचा आवाज इथवर असेल तर ही गोष्ट मान्य आहे की त्यांचा आवाज अतिउच्च असल्याने त्याचा त्रास नक्कीच होऊ शकतो, होतो. विशेषतः रुग्णालयं, किंवा लहान मुलं, आपण म्हणालात त्याप्रमाणे पाळीव व इतर सगळेच प्राणी, यांना अतिउच्च आवाजाचा त्रास होऊ शकतो. त्याबद्दल काही म्हणणं नाही, ते खरं आहे. पण म्हणून 'ते संगीत नाही' असं म्हणणं ही अतिशय टोकाची भूमिका आहे. शिवाय त्यात सहभागी होणा-या मुली, त्यांचे पेहराव, त्यांचे मोकळे सोडलेले केस, किंवा बेभान होऊन त्यांचं ढोल वाजवणं, याची तुलना 'डोरा' च्या उपभोगोत्सुकतेशी करणं, हे कोत्या मनाचं लक्षण आहे. एकीकडे इझरा पौंडच्या मते ‘जे संगीत नृत्यापासून दूर जाते ते संगीत नष्ट होण्याकडे वाटचाल करते' असं आपण नमूद करता, आणि ढोल ताशांच्या तालावर मुली थिरकल्या तर त्यांचं थिरकणं आपल्याला उन्मादस्वरूप वाटतं. याचा कृपया विचार करावा. 'बधिरता ही नाचणाऱ्या व वाजवणाऱ्या व्यक्तीची अवस्था नसून आवश्यकता असते', असं आपण म्हणालात. मग भजनात तल्लीन होणारा, शास्त्रीय संगीत ऐकताना डोळे मिटून डोलणारा ही मंडळीही बधीरच म्हणायला हवीत, नाही का? जसं संगीत, तशी त्याची अनुभूती असते. आणि संगीत जरी वैश्विक असलं तरी संगीताची अनुभूती ही पूर्णपणे व्यक्तिसापेक्ष बाब आहे असं माझं मत आहे. संगीत ऐकण्याची प्रत्येकाची कारणं वेगळी असतात. कुणी ते कळतं म्हणून ऐकतो, कुणी आवडतं म्हणून ऐकतो, कुणासाठी ते ताण-तणावावरचं औषध असतं तर कुणासाठी ते गोष्टी, माणसं आठवण्याचं किंवा विसरण्याचं माध्यम असतं. संगीतातली फलश्रुती प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळी असते आणि म्हणूनच संगीताचे प्रकारही वेगवेगळे असतात. तेंव्हा अमूक एक वाईट आणि अमूक एक चांगलं असं त्याचं सरसकटीकरण होऊ शकत नाही. मात्र एक सामायिक गोष्ट ही की संगीताचा प्रकार कुठलाही असला तरी संगीतात प्रत्येक जण स्वतःला शोधत असतो. उन्मादाबद्दल म्हणाल तर मान्य आहे की पब संस्कृती, अंधा-या जागेत कानठळ्या बसवणा-या आवाजात नाचणं, पुढे त्या पब संस्कृतीतून दिसणारा तथाकथित उच्चभ्रू समाजाचा ओंगळवाणा चेहरा हा उन्माद आहे. किंबहुना उन्मादाची व्याख्या खूप व्यापक आहे. केलेले नियम न जुमानणं, जिथे तिथे पैशाच्या जोरावर स्वतःला श्रेष्ठ सिद्ध करणं, लग्नसमारंभ, उत्सव अशा प्रसंगी पैशाची बेछूट उधळण, त्याचं प्रदर्शन करणं, समोरच्याला कमी लेखणं, केवळ परवडतंय म्हणून गोष्टींची नासाडी, उधळपट्टी करणं, समाजभावना न जपणं, आपलं तेच खरं करणं, दुस-याला कमी लेखणं, असहिष्णु वर्तन करणं, ही सगळी उन्मादाचीच उदाहरणं आहेत. आणि हा बळावत चाललेला उन्माद ढोलपथकांच्या आवाजापेक्षाही जास्त घातक आहे. सरतेशेवटी, पुन्हा संगीत, बधिरता, अवस्था, आणि डोरा कडे येतो. संगीत, मग ते कुठलंही असो, ऐकताना तुम्ही ट्रान्स मधे जाणं, तल्लीन होणं, किंवा आपल्या भाषेत बधीर होणं, हे ते संगीत तुमच्यापर्यंत पोचल्याचं लक्षण आहे, असं मी मानतो. एखादं गाणं ऐकता ऐकता अचानक अंगावर सर्रकन काटा येतो, तेंव्हा काय होतं हे सांगता येणार नाही. मी स्वतः एका ढोलपथकाचा सदस्य आहे, आणि त्या तालाची, नादाची, संगीताची मजा ही केवळ शब्दातीत आहे हे आग्रहाने सांगेन. ती आपण स्वतः त्याचा भाग होऊन अनुभवल्याशिवाय कळण्यातली नाही. संगीत ही नशा आहे, नक्कीच आहे. त्यामुळे नशेत जसा माणूस झिंगणं ही तात्पुरती अवस्था असते तसाच संगीतात माणूस गुंगणं ही सुद्धा तात्पुरती अवस्था असते. आणि ती स्वाभाविक आहे. कुणाला कुमारजींच्या भामत भैरव रचनेतील ‘ढोल आ बजा ले रे’ ऐकून ती अवस्था मिळत असेल, तर कुणाला स्वतः ढोल वाजवून. प्रत्येकाचं माध्यम वेगळं, पण परिणाम एकच. पण केवळ एखादं संगीत आपल्या लेखी श्रवणीय नाही म्हणून त्याच्याशी संबंधित लोकांबाबत ‘स्वत:ला नसलेल्या लिंगाची इच्छापूर्ती करणारे' असं विचित्र विधान करणं, हे योग्य नाही. आपल्याला आवाजाबद्दल असलेल्या आक्षेपाशी सहमत असलो तरीही एकंदरित आपली मतं पूर्वग्रहदूषित, आणि टोकाची वाटली. विशेषकरून आपण ढोलपथकात असणा-या फक्त मुलींचा वारंवार उल्लेख केलात, तो संकुचित वाटला. आजच्या काळात मुली या मुलांपेक्षा कुठेही मागे नाहीत, ढोलपथकात मुलींपेक्षा दुप्पट संख्येने मुलं असतात, मग आपला आक्षेप प्रत्येकावर समान असायला हवा होता. असो. वर म्हटल्याप्रमाणे निष्प्राण, उन्मादक समाज बघायचा असेल तर तो ढोल पथकांमधे नाही, प्रत्येक ठिकाणी आपल्या आजूबाजूला आहे. त्याविषयी सकारात्मक समाजकार्य होणं गरजेचं आहे, अर्थात तो मुद्दा वेगळा आहे. पण ज्या संगीतात कलेवरातही प्राण ओतण्याची ताकद आहे, त्या संगीतात रमणा-यांचा उत्सव 'कलेवरांचा उत्सव' कसा असू शकतो? यावर आपण जरूर चिंतन करा अशी मी आपल्याला विनंती करतो. ब्लॉग दुवा हा
वर्गीकरण
बातम्या
परंपरा
विचार

प्रतिक्रिया द्या
54330 वाचन

💬 प्रतिसाद (175)
व
वेल्लाभट गुरुवार, 10/08/2015 - 11:02 नवीन
ब...र !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाकरी
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 10/08/2015 - 08:32 नवीन
प्रचंड सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
ब
बॅटमॅन गुरुवार, 10/08/2015 - 08:57 नवीन
वर आणि असे काही बोलले की लगेच "तुम्हांला त्यांचं काही दिसणार नाही" वगैरे सुरूच. असे बोलणार्‍यांच्या घरातील एखाद्या व्यक्तीला त्रास झाला म्हणजे कळेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
त
तर्राट जोकर गुरुवार, 10/08/2015 - 05:08 नवीन
इथे टक्कू नावाच्या आयडीने दोन प्रतिसाद ७:४५ व ७:४६ ला दिलेले मोबाईलवर लॉग-इन नसतांना दिसत आहेत. क्म्प्युटर वर लॉगनि झाल्याव्र दिसत नाहीत. टक्कू हा वेल्लाभट यांचा डु-आयडी का?
  • Log in or register to post comments
त
तर्राट जोकर गुरुवार, 10/08/2015 - 06:39 नवीन
म्हणूनच मला मुख्य रस्त्यावरची घरं आवडत नाहीत. 'आमचं घर अगदी मेनरोडवर आहे' याचं लोकांना फार कौतुक असतं. जेव्हा त्रास होतो तेव्हा तेच न्युसन्स होतं. रस्ता आहेत तर आवाज होणारच, हॉर्न वाजणारच, मिरवणुका निघणारच. ज्यांना पटत नाही ते लोक आधीच योग्य निर्णय का घेत नाहीत? रस्त्यावरची घरं तर उलट महाग असतात. पण तेच >> कन्विनियन्स पाहिजे, न्युसन्स नको. मुख्य रस्त्यापासून आत असलेली घरं शांत, निवांत असतात. एकदा पैसे वाचवण्यासाठी म्हणून मुख्य रस्त्यावरचं अगदी महत्त्वाच्या चौकातलं एका खोलीचं घर भाड्याने घेतलं होतं. सकाळी चार पासून दुधाच्या गाड्या, ट्रक्स, सातपासून नोकरदारांच्या बाइक्स कार, ९ ते ११ आणि ६ ते ८ भयंकर वाहतूक कोंडी, आवाज, धूर. १० पर्यंत सामसूम झाल्यासारखं वाटत असतांना पार्ट्याहून परतणार्‍या कार्स, बाइक्स. रात्री हटकून १ ते ३ पर्यंत घराखालीच भरलेली कुत्र्यांची ग्रामसभा. त्यानंतर चारपासून दुसरा दिवस परत सुरू. त्या वर्षभर जो त्रास झाला, त्यानंतर दोन पैसे जास्त लागले तरी चालतील पण प्रशस्त आणि शांतता असलेल्या वस्तीतच घर घ्यायचं असं तत्त्व कायम पाळले. मुंबईत इतक्या ठिकाणी राहिलोय पण वरील प्रतिसादांमधले त्रास कधी झाले नाहीत. पण म्हणून ते अस्तित्वातच नाहीत असेही म्हणणार नाही. माझी आई माझ्या पिन्ड्रॉप-सायलेन्स प्रिय वृत्तीवर कायम चिडायची, तिचे एकच पालुपद --- मग जंगलात जाऊन र्‍हा ---
  • Log in or register to post comments
र
रेवती गुरुवार, 10/08/2015 - 15:55 नवीन
घर मुख्य रस्त्यावर आहे याचं कौतुक नाही हो. घर घेतलं तेंव्हा रस्ता साधाच होता. नंतर नंतर त्यावरील वाहतुक व इतर प्रकार वाढत गेले. आजूबाजूच्या दुकानांमुळे कन्विनियन्स आहे हे नाकारत नाहीये व सकाळी व संध्याकाळी असलेली नोकरदार वर्गाची रहदारी याबद्दल तक्रार (निदान या धाग्यात) करत नाहीये. याशिवाय असलेले त्रास हे भरीचे असतात. सार्वजनिक गणपती हा पूर्वी अगदी लहानसा असे. नंतर नगरशेवकाच्या कृपेने हे सगळे झालेय. त्यानेच हळूहळू ताब्यात घेतलेली दुकाने, गणपती, दहीहंडीसारखे उत्सव, भाजीचे गाळे वगैरे. बरं, आम्ही तेथे रहायला गेलो त्यावेळी हा नगरशेवक कॉलेजात जाणारा मुलगा होता. त्याच्या बहिणीचे लग्न एका नामवंत राजकारण्याशी काय झाले, सगळेच बदलले! त्याचे फ्लॅटचे बांधकाम चालू होते तेंव्हा भाडेकरू म्हणून आमच्याच बिल्डिंगमध्ये रहात होते दोन वर्षं. नंतर एकाला एक असे तीन फ्ल्याट जोडलेले त्याचे आलीशान घर तयार झाले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर गुरुवार, 10/08/2015 - 16:07 नवीन
तुमच्या प्रतिसादावर माझा रोख नव्हता. पण नेहमी जे लोकांकडून ऐकले तेच इकडे मांडले. एकदा ठाण्यात घर बघत होतो. अगदी तिठ्यावरल्या (तीन रोड एकत्र) मोठ्या २० वर्ष जुन्या बिल्डींगमधे ब्रोकर घेऊन गेला. त्या फ्लॅटच्या हॉल, किचन बेडरूममधून सगळा रस्ता व्यवस्थित दिसत होता. म्हणजे तो फ्लॅट एक्झॅक्टली तिठ्यावरच होता. ब्रोकर कौतुकाने सांगतो," अमुक नंबरची बस येते ते तुम्हाला इथूनच दिसेल.. हे ... ते..." भाडं कमी असून नाकारला तो फ्लॅट. एकतर मला बसची गरज नव्हती. दुसरं, रस्त्यावर घर मांडल्याचा फील परत एकदा नको होता. ब्रोकरला माझ्या नकाराचं कारण काही केल्या कळत नव्हतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
व
वेल्लाभट गुरुवार, 10/08/2015 - 11:01 नवीन
कुणाचं काय तर कुणाचं काय.
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट गुरुवार, 10/08/2015 - 11:07 नवीन
एकूणच मूळ लेख, त्यातील तर्कटपणा, प्रतिक्रिया, त्याचा विपर्यास, विषयांतर, हे सगळं फार मनोरंजन करून गेलं. आणि हा १०० वा प्रतिसाद. च्यामारी फुल टू उन्माद !
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ गुरुवार, 10/08/2015 - 11:10 नवीन
संस्कृती आपल्याच लोकांना त्रास देऊन जपली जाते तर. असो! एखादं सुनसान वाळवंट गाठून काय ते बडवत बसावेत.... ढोल ताशे. जनतेला त्रास देऊ नये. एकंदरच या उन्मादाबद्दल एक मिपाकर म्हणून शरम वाटली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट
भ
भीमराव गुरुवार, 10/08/2015 - 12:28 नवीन
पत्र्याचे कडे व प्लास्टीक पानाचे १०० ढोल विरुद्ध लाकडी कडे अन चामडी पानाचा १ ढोल असा सामना ठेवला ना तरी लाकडी कड्याचा ढोलचं हवा करुन जाइल. ढोलपथक वाले भरपुर एनर्जी ने वाजवतात, तालाचा सराव करतात परंतु त्यामधे काहीतरी कमी आहे. पत्रा ढोलाचा नाद फक्त वाजवनारांमधे भिनत जातो पन ऐकनारांसाठी तो काही काळाने नुसता गोंगाट बनतो. ढोल, ताशा, हलगी, संबळ यांचे नाद जोडीला मस्त लेझीम सोबतच चालु असनारं " राडा राडा, लय भारी वाजतय" असली मिरवणुक म्हनजे वाजवनारे अन पाहनारे/ ऐकनारे या सगळ्यांमधे घुमनारे संगीत. किंवा एका रेशेमधे ढोलाला झेंडा लाऊन ऊभे असनारे ढोलवाले अन त्यांचं संथपने सुरु होनारं "ढिंपांग ढिढिंपांग" नकळत वेग घेत जातं. ऐकनार्याने कितीही दुर्लक्ष करन्याचा प्रयत्न करुदे तो मनाने ढोलाच्या लयी बरोबर जोडला जातोच. हे ही नको तर मग एकुलत्या एका ढोलावर एका बाजुला ढोलाची थाप न दुसरीकडे ताशा यांचा तालावर खेळले जानारे डाव किंवा गज्या हे बघा. ह्यात पन वाजवने आहे, नाद आहे,ऊन्माद आहे. बेदरकारी आहे तरीही हे भारी आहे. का? काय म्हायत।
  • Log in or register to post comments
त
तर्राट जोकर गुरुवार, 10/08/2015 - 12:57 नवीन
हेच मत आमचे....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भीमराव
प
पैसा गुरुवार, 10/08/2015 - 12:46 नवीन
त्यामुळे जास्त काही बोलू शकत नाही. एक ढोल हा खराच ऐकणार्‍याला वेडा करणारा असतो. तेच डफ, ताशा, हलगी यांचे. पण असे ५०/१०० ढोलांचे पथक का असते? एका ढोलाचे का नसते? एक ढोल आणि त्यासोबत ५० लेझीम हे फार सुंदर वाटेल ऐकणार्‍या बघणार्‍याला.
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट गुरुवार, 10/08/2015 - 13:24 नवीन
हे इनडोअर चांगलं वाटेल तै. भर रस्त्यात गोंगाटात एकाला पण ऐकू जायचं नाही. आणि शेवटी काहीही झालं तरी उत्सव आहे, तो ग्रँड नको? हां, ढोलांच्या संख्येवर निर्बंध आणले जाऊ शकतात. एका वेळी जास्तीत जास्त २५-३० जे काय असेल ते. पण काही सदात्रासिक लोकं बंदच करायचा युक्तिवाद करतात. तिथे पुढे काही बोलण्यात अर्थ उरत नाही. ढोल पथक, एका लयीत, एका तालात वाजणारे अनेक ढोल याला ग्रेस आहे. मग ती कुणाला संगीत वाटो किंवा न वाटो. आणि या गोष्टीला, उत्सवाला परंपरा आहे. याची आणि पब ची तुलनाच मुळात चुकीची आहे कारण दोहोंमागचा विचार हा परस्पर भिन्न आहे. उन्माद काय, मानसिक आजार काय, निष्प्राण समाज काय... लोक (मूळ लेखकासकट) वाट्टेल ते म्हणू लागले म्हणून माझी मतं मी वरील पत्रात मांडली. काहींना पटली त्याबद्दल आनंद आहे. नाही पटली त्यांच्याबद्दल दु:ख मुळीच नाही. रॅशनल युक्तिवाद केला तर रॅशनल सोल्यूशन्स निघू शकतात. नाहीतर मग 'काथ्याकूट'.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा गुरुवार, 10/08/2015 - 16:11 नवीन
माहीत नाही. माझ्य आठवणीत रत्नागिरीतले सार्वजनिक गणेशोत्सव म्हणजे उत्तम नाटके, शास्त्रीय गाण्याचे कार्यक्रम, कीर्तन, भजन, भाषणे, एखाद दिवस ऑर्केस्ट्रा, ते सगळे आम्हाला ग्रँड वाटायचे. गणपती आणताना आणि पोचवताना माफक ढोल ताशे, खूप लेझीम खेळणारे आणि फटाके हे सगळे उभे राहून बघायला आवडत होते. आता ५० ढोल वाजत असताना किती वेळ बघू शकेन माहीत नाही. पुण्यात एकदा पाहिले होते. १०/१५ मिनिटे, ते छान वाटले. पण याहून जास्त वेळ नाही आवडणार. राधाकृष्णाच्या देवळात नवरात्राचा सार्वजनिक उत्सव असायचा, तेव्हा रोज शास्त्रीय गायकांच्या मैफिली असायच्या. मंजिरी आलेगावकर, रघुराम भट, मधुवंती दांडेकर वगैरे लोकांना तिथे ऐकले आहे. एका गणेशोत्सवात सुरेश वाडकरांचा कार्यक्रमही ऐकला आहे. आता हे शास्त्रीय गाण्यांचे कार्यक्रम बंद होऊन गरबा असतो असे ऐकले. गणेशोत्सवात कित्येक वर्षात जाऊ शकले नाही त्यामुळे काय परिस्थिती आहे माहीत नाही. मला वाटते, मार्केट ढकलते तशा ग्रँड काय याच्या कल्पना बदलत जातात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट
च
चतुरंग गुरुवार, 10/08/2015 - 14:22 नवीन
खांडेकरांनी मांडलेला अतिउच्च आवाजाचा मुद्दा तर अमान्य करण्यासारखा नाहीच. त्यांनी फारच ताणून ढोल वाजवणार्‍या स्त्रिया, डोरा, पब वगैरे नको ते मुद्दे त्यात घुसडलेत याबद्दलही दुमत नाहीच. तरीही, तरीही, माझे म्हणणे असे आहे की ढोलपथके वगैरे आपल्या परंपरांचा आपण नवीन परिस्थितीनुसार विचार करायला नको का? शहरातून आधीच वाढत असलेले सर्व प्रकारचे प्रदूषण हे हाताबाहेर गेलेच आहे. काही वर्षांपूर्वी बहुतांश गणपतीतच अशी पथके असत त्यातल्या ढोलांची संख्या मर्यादित असे. आमच्या अहमदनगरच्या घरासमोरुन मुख्य रस्त्यावरुन गणपतीची मिरवणूक दरवर्षी जाते. मीही लहान असताना त्यात भाग घेतला आहे. ढोल वाजवलाय, लेझीम खेळलोय. आवाज बर्‍यापैकी सुसह्य होते. आणि वाजवणार्‍यांची संख्या अगदी मर्यादित होती. संपूर्ण मिरवणूकीत एखाददुसरे पथक असे आणि एकूण साताठजण असत. वाजवणेही नादपूर्ण आणि कमीवेळ असे. डॉल्बीच्या ढणढणाटाने हल्ली खिडक्या, दरवाजे बंद करुनही संपूर्ण बिल्डींग हादरत असते असे माझे आई-वडील सांगतात. दहा दिवस आणि अनंत चतुर्दशीचा दिवस म्हणजे गेल्या जन्मीचे पाप फेडत आहोत की काय इतका त्रास होतो! गेल्या काही वर्षात दहीहंडीपासून ते दिवाळीपर्यंत सततच काही ना काही सुरु असते.शिवाय यातही व्यावसायीकरणाने व्यवस्थित प्रवेश केलाय त्यामुळे भरपूर पैसे मोजून अशी पथके तयार केली जातात आणि त्यांच्यात स्पर्धा आल्याने तुझा आवाज मोठा की माझा इथे सगळा घोळ सुरु होतो. या सगळ्यात सामान्य माणसांचा विचार की मुळात ज्यांच्या आनंदासाठी हे सगळे केले जाणे अपेक्षित आहे तो कुठच्याकुठे भिरकावला जातो. सूज्ञपणाने विचार आपण करणार आहोत की नाही? उपाय काय. तर ढोलांची संख्या मर्यादित करणे. त्यांच्या आवाजपातळीवर निर्बंध घालणे. एका ठिकाणी दहा मिनिटांपेक्षा जास्त ढोल न वाजवणे. ढोल वाजवण्याच्या दोन ठिकाणांमध्ये किमान एक किमि. चे अंतर असणे, फक्त गणपतीतच ढोल असतील इतर वेळी नाही, डॉल्बीवापरुन ढोलाचा आवाज वाढवता येणार नाही असे निर्बंध घालता येऊन सामान्य माणसाचा विचार करता येऊ शकत नाही का? अशाने दोन्ही साध्य होऊ शकेल. अडेलतट्टूपणाने काहीच साध्य होणार नाही आणि एकेदिवशी सामान्य लोकांच्या आंदोलनामुळे संपूर्णच बंद करावे लागेल. उन्मादी अवस्थेत जाऊन भरकटण्यापेक्षा वेळीच विवेकाने विचार होणे आवश्यक वाटते.
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ गुरुवार, 10/08/2015 - 14:47 नवीन
>>> सामान्य लोकांच्या आंदोलनामुळे संपूर्णच बंद करावे लागेल. फारच आशावादी ब्वा तुम्ही! (उपरोधानं लिहीतोय)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
च
चैतन्य ईन्या गुरुवार, 10/08/2015 - 15:32 नवीन
काहीतरीच बुवा. इथे इतके लोक सांगतायत पण त्रास होवून ढोल संख्या कमी केली पाहिजेल हेच मान्य होत नाहीये. मग होतंय काय कि माझ्यावर बंधने घालतंय म्हणून मी असून विरोध करणार असा सूर आहे. हा वैयक्तिक हल्ला समजू नये. कारण हि वृत्ती सगळीकडेच आहे. आपल्यामुळे लोकांना त्रास होतोय आणि तो पप्रमाणाबाहेर आहे हे कळत नाहीये किंवा कळतंय पण वळत नाहीये. दुर्दैवाने दिसते काय कि आमच्या हिंदूंच्या सणांनाच तुमचा ओरडा असा सूर होतोय. मला पण ढोल आवडतो. आवर्जून रात्री ढोल वाजवलाय. पण त्यात किती फार तर १०-१२ ढोल असायचे. आता ५०-५० ढोल लक्ष्मी रोड येतात. सगळ्यांना सारखा नियम आणि त्याची कडक अंमलबजावणी झाली पाहिजेल. दुर्दैवाने फेस्टिवल आहे तो ग्रांड झाला पाहिजेल हा सूर विचित्र आहे. कदाचित वयाचा परिणाम. एकदा थोडे केस पांढरे झाले कि कदाचित लक्षात येईल. जोपर्यंत त्याचा त्रास स्वतःच्या घरात होत नाही, आपले जळत नाही तोपर्यंत त्याची तीव्रता कळत नाही. डॉल्बीमुले एक घर उध्वस्त झालंय ह्याचे वाईट वाटते पण त्याचा घरट्यांचे हाल नंतर बघायला मिळत नाही. तेच आपल्या बाबतीत जेंव्हा होईल. आपल्या आई/वडिलांना आजीला हॉस्पिटल मध्ये नेता येत नाही असे जेंव्हा घडेल तेंव्हाच त्याची तीव्रता कळेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
व
वेल्लाभट गुरुवार, 10/08/2015 - 19:30 नवीन
ढोल संख्या कमी केली पाहिजेल हेच मान्य होत नाहीये.
प्रतिसाद नीट वाचा असं सांगेन
तेच आपल्या बाबतीत जेंव्हा होईल. आपल्या आई/वडिलांना आजीला हॉस्पिटल मध्ये नेता येत नाही असे जेंव्हा घडेल तेंव्हाच त्याची तीव्रता कळेल.
असो. मी माझी पातळी सोडू इच्छित नाही. तुम्ही सोडलीत, तुमची लेव्हल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चैतन्य ईन्या
ए
एक सामान्य मानव Fri, 10/09/2015 - 10:48 नवीन
हा विषय आला कि परम्परा हा शब्द येतोच. ढोल हे वाद्य पारम्पारिक असेल पण १०० जणानी ढोल एकत्र वाजवायचा ही परम्परा आहे का? माझ्या माहीतीप्रमाणे हा गेल्या फारतर ३० एक वर्षातला प्रकार आहे. जाणकारानी प्रकाश टाकावा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
_
_मनश्री_ गुरुवार, 10/08/2015 - 16:41 नवीन
त्यांचा झाला जल्लोष; त्याला गमवावा लागला जीव एखाद्याचा जीव गेला तरी चालेल , पण उत्सव मात्र ग्रॅण्ड झाले पाहिजेत कारण तरुणांची ऊर्जा खर्च करण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे , बाकीची जनता जाऊ दे खड्ड्यात
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट गुरुवार, 10/08/2015 - 19:32 नवीन
ग्रँड या शब्दावरून पुन्हा जो विपर्यास झालाय तो हास्यास्पद आहे. Absolutely childish. Ok this has now become a series of baseless arguments. So; I am done. तुमचं चालूदे.
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप गुरुवार, 10/08/2015 - 20:37 नवीन
ओ वेल्लाभट... अहो अहो... जरा थां...बा... हाश्श... हुश्श्ह... ओहुहू.. दो..न... मिं...ट... हा... हा... जर्रा... दम... लाग्ला...य...पा... णी... पाणी देता... का कुणी! ग्ल्कक्क.... ग्लक्क.... गल्क्ककहा....हा...धन्यवाद! पाणी पिल्यावर जरा बरं वाटल. तर, मी काय सांगणार होतो की...जसं मी माझ्या आधीच्या या लेखावरच्या प्रतिक्रियेत म्हटलो होतो ना... ती पाडगावकरांची कविता... ती.. ती... आठवली का?? अहो तीच हो, मी म्हटलं होत ना... या लेखाच्या आशयाची जरा नात जुळतय तिच... ती...तीच आत्ता सापडली मला. म्हणजे बघा अशीतशी नाही... चांगल्या दोन दिवस दोन रात्रीच्या अभूतपूर्व, व्यापक अशा शोधमोहिमेनंतर (म्हणजे हेच आपल... जुन्या दोन तीन डाय-या, काही ड्रॉवर्स, कपाटाचा हात न जाणारा अगदी खालचा कप्पा अशा, रद्दी, काही मित्रांना केलेले फोन वगैर बाबी!) आज रात्री साडेअकराला एका कागदाच्या चिटो-यावर मीच मागे कधीतरी लिहिलेली सापडली! तर कवितेत कविवर्य मंगेश पाडगांवकर म्हणतात... कावळा लागला थुईथुई नाच करू आपण मोर आहोत असंच मनात समजून कावळ्यानं केलेलं हे मोराचं अनुकरण पाहून तुम्हांला असह्य चीड आली कावळ्याची! माझा नाच पहा असं कावळा मुळीच नव्हता म्हणाला त्याचा नाच पाहिलाच पाहिजे तुम्ही अशी कुठल्याही कायद्यान केली नव्हती तुमच्यावर सक्ती तुम्ही आपली दृष्टी केव्हाही अन्यत्र वळवू शकता ज्या आनंदातून उमलत नाचणं थुईथुई त्या आनंदाहून नाचणं वेगळं नसतच कधी! डोळ्यांना जे दिसतं ते त्या आनंदाच बाह्यरूप! त्या आनंदाला स्पर्श करणं जर तुम्हाला शक्य नसेल तर हातात घ्या त्या दिवसाचं ताज वर्तमानपत्र आणि पंख्याखाली बसून निवांत वाचा खुनाच्या, बलात्काराच्या बातम्या! - कविवर्य मंगेश पाडगावकर ____/\____ बघा, कुणाला काही घेता आल तर या कवितेतून! धन्यवाद! Sandy
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट
त
तर्राट जोकर गुरुवार, 10/08/2015 - 20:24 नवीन
धागालेखकाच्या मूळ उद्देशाचा फालुदा होने मिसळपाववर विशेष नाही असे दिसते. एवढ्यातले काही धागे बघितले तर कळोन आले.
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Fri, 10/09/2015 - 07:16 नवीन
संस्कृतीदर्शनासाठी ढोलपथके होती आधीच्या काळी....आत्तासुध्धा संस्कृतीदर्शनासाठी ढोलपथके आहेत...मान्य पण अगदी ३० वर्षांपर्यंत वर्षभर काहीही कारणांमुळे वाजणारे डॉल्बी, प्यँप्यँ करत सारखे वाजणारे हॉर्न आणि आजच्या इतकी वाहने नव्हती त्यामुळे आधीच्या काळी ढोल १० असूदे किंवा ५० असूदे...चालून गेले आजच्या काळात जिथे "कार्यकर्त्यां"चे डोके रिकामे असते ते अगदी हॉस्पिटलच्या बाजूने जातानासुध्धा त्याच मोठ्ठ्या आवाजात ढोल वाजवत जातात ....वेल्लाभट ज्या ढोलपथकात आहे ते लोक ठाण्याच्या मुख्य रस्त्यातून बहुतेक मिरवणूक काढतात...पण तेसुध्धा प्रत्येक हॉस्पिटलच्या बाजूने जाताना आवाज थांबवत असतील? नक्कीच नाही....आणि कारण सुध्धा तयार असेल....इथे इतकी हॉस्पिटल्स आहेत...कुठे कुठे थांबणार...अशाने मग आम्ही ढोल मिरवणूक कुठे काढायची...आम्हीच का थांबवू "ते" आवाज करतात त्याचे काय?....आणि हे असेच सुरु रहाणार....आपल्या रहायच्या जागेचा उकिरडा आपणच करणार आहोत
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे Fri, 10/09/2015 - 07:35 नवीन
हा विषय काल एका डॉक्टर मित्रासोबत छेडला असता त्याने त्याचा ताजा अनुभव सांगितला. त्याचे क्लिनिक मुख्य रस्त्यावरील गजबजलेल्या चौकाच्या आतल्या गल्लीत आहे. क्लिनिक जरा आत असल्याने चौकातला गोंगाट तिथपर्यंत पोहचत नाही. त्याच्या क्लिनिकसमोरच शहरातील एक प्रख्यात बालरुग्णालय. अनंत चतुर्दशीच्या दिवशी एक ढोलपथकवाली मिरवणूक त्याच्या क्लिनिकसमोरुन (आणि अर्थातच बालरुग्णालयासमोरुन) जात होती. मिरवणूक बालरुग्णालयासमोर आली. कुणीतरी आदेश दिला, चौकात वाहतुकीचा खोळंबा होईल; पोलिस नाचू देणार नाहीत म्हणून इथेच नाचायचे. मिरवणूक अर्धा तास बालरुग्णालयासमोरच ढोल बडवत नाचत होती. जोडीला कानठल्या फोडणारा डीजे. माझा डॉक्टर मित्र हताशपणे समोरच्या रुग्णालयातील बालरुग्णांवर या कानठळ्या बसवणार्‍या आवाजाचा काय परिणाम होत असेल याचा विषण्ण मनाने विचार करत बसला होता. विरोध केला तर काय परिणाम होतील याची जाणिव असल्याने असे हताशपणे बसण्यापलिकडे तो काही करुही शकत नव्हता. दिवस खुप वाईट आले आहेत. ज्या सुशिक्षितांनी या सार्‍याला विरोध करायचा तेच संस्कृतीच्या नावाखाली चालू असलेल्या उन्मादाचे आंधळे समर्थन करत आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Fri, 10/09/2015 - 07:51 नवीन
या नाचणार्यांच्या घरचे पालक संस्थळांवर हे सगळे किती वाईट असे टायपत बसलेले असू शकतील :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
ब
बॅटमॅन Fri, 10/09/2015 - 10:57 नवीन
आणि असे बोलले की हिंदूद्वेष्टे वगैरे लेबले लावायची. काहीजण म्हणतात त्याप्रमाणेच, असे होऊ नये पण यांच्या घरातल्या लोकांन त्रास झाला की कळेल मग. तोवर कळणार नाही आणि कळालं तरी कळून घेणार नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
अ
अस्वस्थामा Fri, 10/09/2015 - 12:14 नवीन
मित्र हो, हे एक लक्षात आलंय का की धागाकर्ता तसेच इतर समर्थन करणारे हे "त्रास होतो" वगैरे मुद्दे मान्य करत आहेत आणि त्याच बरोबर हे "असेच चालणार" यावर देखील ते ठाम आहेत. तेव्हा कितीही बोललात तरी या ठाम मतांत बदल होणार नाही (जोवर स्वतःवर अथवा जवळच्या कोणावर काही बेतत नाही तोवर कदाचित) मग आता पालथ्या घड्यावर किती पाणी ओतायचं ते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
प
प्यारे१ Fri, 10/09/2015 - 12:28 नवीन
थोडक्यात ढोल वाजतो, वाजतो वाजतो ढोल वाजतो, ढोल सगळ्यांचा वाजतो, वाजतच राहतो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अस्वस्थामा
ब
बॅटमॅन Fri, 10/09/2015 - 12:35 नवीन
आं? त्रास होतो असे म्हणणार्‍यांनी "हे असेच चालायचे" असे कुठे म्हटलेय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अस्वस्थामा
अ
अस्वस्थामा Fri, 10/09/2015 - 13:26 नवीन
माझा निर्देश या प्रतिसादाशी होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
अ
अत्रन्गि पाउस Fri, 10/09/2015 - 08:05 नवीन
कोणत्याही संगीत बदल करणाऱ्याला ' हे पूर्वी असे नव्हते' ऐकावे लागलेच ....पण म्हणून हे ऐकावे लागलेला प्रत्येक जण संगीत बदल करणारा क्रांतिकारी संगीतकार नव्हता ...हृदयनाथ आणि अपाचे इंडियन हे एकाच तागडीत तोलणे हा हक्क आहेच शहाणपणा नव्हे ....जानकारी तर नव्हेच नव्हे .. आपल्यामुळे इतरांना त्रास होऊ नये हि शिकवण मुळातच घरात दिली जात नाही हल्ली ...त्यापेक्षा "स्वतःला योग्य वाटते ते कर जग गेले उडत' हा विचार आधुनिक ठरतोय ...कायदेभंग हा इतिहासमान्य मार्ग आहे आपल्याकडे ... आपल्या बहुतांश सणांमध्ये "कोणताही कायदा , नियम, संकेत , सामाजिक भान, स्वच्छता, शिस्त, संयम हे इतरांनी पाळायच्या गोष्टी आहेत ...स्वत: नाही ..." असा काहीसा समज आहे ...दहीहंडीतील मूर्ख धाडस, सार्वजनिक गणपतीतील अनिष्ट प्रथा /गोष्टी, नवरात्रीतील धांगडधिंगा, दिवाळीतील फटाके आणि एकूणच आगीशी खेळ हे सगळेच अनाकलनीय आहे ... परंतु झुंडी पुढे शहाणपण नाही हेच शेवटी खरे जाता जाता : नृत्याकडे नेत नाही ते संगीत अस्त पावते असे म्हणणारी ती विदुषी ...आणि एक दिवस कोणत्याही साथीशिवाय ख्याल सादर करण्याची इच्छा बाळगणाऱ्या किशोरी ताई .... असो !!!
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Fri, 10/09/2015 - 10:25 नवीन
"कलेवरांचा उत्सव" या लेखातील आशयाशी सहमत आहे. सार्वजनिक उत्सव हा प्रकार अत्यंत उपद्रवी झालेला आहे. गणेशोत्सव, दहीहंडी, नवरात्र, शिवजयंती, आंबेडकर जयंती व पुण्यतिथी, अण्णाभाऊ साठे जयंती, बुद्ध पौर्णिमा, मोहरम, इतर काही नेत्यांची जयंती व पुण्यतिथी इ. चे स्वरूप अत्यंत उपद्रवी व त्रासदायक झाले आहे. त्याबरोबरीने रस्ता अडवून निघालेल्या लग्नाच्या मिरवणुका, तोरणाच्या मिरवणुका, मोहरमची डावी-उजवी हे रस्त्यावर साजरे केले जाणारे सर्व प्रकार अत्यंत त्रासदायक आहेत. निवडणुकीच्या वेळी रस्त्यावर घेतल्या जाणार्‍या सभासुद्धा त्रासदायक आहेत. हे सर्व प्रकार तातडीने बंद करायला हवेत. खरं सांगायचं तर रस्त्यावर साजरे केले जाणारे सर्व उपक्रम बंद व्हायला हवेत.
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Fri, 10/09/2015 - 12:56 नवीन
धाग्यावर अवांतर आहे पण हळूहळू सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मंडळांची संख्या व त्यानिमित्ताने निघणार्‍या मिरवणूका कमी कमी होत जाणार आहे असे माझे मन मला सांगते. त्याजागी तीच मंडळे नवरात्रोत्सवाचे धुमधडाक्यात आयोजन करतील आणी गणेशोत्सव मंडळांपेक्षा नवरात्र मंडळांची संख्या वाढत जाईल असे भाकीत वर्तवितो. गणपतीत जास्तीत जास्त २ दिवस नाचायला, वाजवायला भेटते पण नवरात्रात नऊ दिवस + कोजागिरी असे १० दिवस मजा करायला मिळते. शिवाय त्यात पर्सनल टच जास्त असतो. टीप : ३०० होतील ना आता ?
  • Log in or register to post comments
त
तर्राट जोकर Sat, 10/10/2015 - 13:07 नवीन
नवरात्रात नऊ दिवस + कोजागिरी असे १० दिवस मजा करायला मिळते. शिवाय त्यात पर्सनल टच जास्त असतो.
जेल प्रॉपलंट भरले आहे दोन शब्दात...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
म
मोदक Tue, 10/13/2015 - 08:48 नवीन
वेल्लाभट, प्रतिसादांचा धुरळा खाली बसला आहे म्हणून मुद्दाम आत्ता प्रतिसाद देतो आहे. शांतपणे विचार करा. माझा एक जेन्युईन प्रश्न, तुम्हाला ढोल वाजवायला आवडते.. ते तुमचे पॅशन आहे. तर, "तुम्ही समस्त ढोल वाजवणार्‍यांची बाजू घेवून का प्रतिवाद करत आहात?" तरूणाई, पॅशन, रग वगैरे तुमचे मुद्दे बरोबर आहेत तसेच प्रतिपक्षाचेही मुद्दे तितकेच जेन्युईन आणि बरोबर आहेत, आणि हा वाद प्रतिवाद तुम्हाला प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक क्षेत्रात आढळेल मग किती जणांना उत्तरे देत बसणार?? १९९८ च्या दरम्यान सुरेंद्र चव्हाण यांनी एव्हरेस्ट सर केल्यानंतर वाचकांच्या पत्रव्यवहारात आणि साप्ताहिक सकाळ / लोकप्रभामध्ये "एव्हरेस्ट सर करून काय मिळवले?" या अर्थाने लेख प्रसिद्ध झाले होते. त्याला पुन्हा लोकांनी उत्तरे दिली.. पुन्हा मूळ लेखकाने उत्तर दिले असे महिनाभर सुरू होते. सोन्याबापूंनी बुलेटचा धागा काढल्यावर त्यावरही असे "याची काय गरज आहे का आता?" टाईप्स प्रतिसाद आले होते. इथे मिपावरच सुचेता कडेठाणकर यांनी गोबीचे वाळवंट चालत पार केले त्यावरून धुरळा उडाला होता आणि गिरीप्रेमीच्या लोकांनी "एव्हरेस्ट सर करून काय मिळवले?" असेही लेख आहेतच. मी त्यावेळी हिरीरीने प्रतिवाद केला होता (खिल्ली पण उडवली होती), पण नंतर असाही विचार डोक्यात आला की, त्या लोकांचा एक वेगळा, आपल्यापेक्षा सर्वस्वी विरूद्ध असा दृष्टीकोन आहे आणि "त्यांच्या दृष्टीने" ते बरोबर आहेत. तुमची आवड सांभाळणे ही तुमची गरज आहे. त्या आवडीच्या क्षेत्रामध्ये अपप्रवृत्ती असणार आहेत त्यामुळे लोकांचे आक्षेप असणारच आहेत. मग प्रत्येक आक्षेपाला उत्तर देत तुम्ही तुमचा किती वेळ वाया घालवणार आणि त्याचा खरंच तुम्हाला काही उपयोग होणार आहे का? तुमचे पथक नियम पाळणारे आहे असे तुम्ही म्हणता आहात.. ठीक आहे. तुम्ही बरोबर आहात तर जगाची काळजी सोडा झकास पैकी व्यायाम, संगीत, गाड्या अशा विषयांवर लेख लिहा.
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Tue, 10/13/2015 - 10:12 नवीन
व्हॉट्सॅपचे मल्टिपल अंगठे तुमच्यासाठी. मी कितीवेळ आणि मुळात कशाला उत्तरं देऊ? असं म्हणूनच मी http://www.misalpav.com/comment/752417 या प्रतिसादानंतर थांबलो. आपापल्या अकलेचे ढोल वाजवूदेत म्हटलं लोकांना. सो; तुमच्या प्रतिसादाबद्दल अनेक आभार. सर्वात सेन्सिबल प्रतिसाद होता हा या लेखावरचा. आणि हो, इतर नमूद केलेल्या विषयांवर लिहीनच. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
र
रेवती Tue, 10/13/2015 - 14:30 नवीन
तुम्हाला प्रतिसाद देणं थांबवायचं असेल तर थांबा. तो हक्कच आहे, पण धागा तुम्ही सुरु केलायत म्हटल्यावर लोकंनी वाचावे व प्रतिसाद द्यावा ही अपेक्षा आहे. नाहीतर त्या वृत्तपत्रातील महिलेलाच पत्र सदर पेपरात द्यायचे होते. ढोलांचा होणारा त्रास मान्य करूनही तुमची आवड पुढे रेटताय तेही ठीकच, मग दुसर्‍याला अकलेचे ढोल असे म्हणायचे होते तर धागा काढूच नये. सभ्य शब्दातला प्रतिसाद ही किमान अपेक्षा आहे पण माझ्या किंवा इतर अनेकांच्या प्रतिसादात तुम्हाला असभ्य शब्द वापरलेले कुठे दिसले कि तुम्ही अकलेचे ढोल म्हणावे? तुमच्या म्हणण्याला सपोर्ट करणारा प्रतिसाद हा सेन्सिबल व आमचे प्रतिसाद जरी सभ्य भाषेतील असले तरी ते विरुद्ध असल्याने सेन्सलेस होतात का? एरवी तुमचे धागे वाचून आवडल्यास तशा प्रतिक्रिया दिल्या जातात तेंव्हा आम्ही सेन्सिबल ठरतो असे आहे का? तुम्ही प्रतिसाद देणे जर थांबवले होते तर मोदकाचा प्रतिसाद आल्यावर लगेच मल्टिपल थम्स अपसाठी आलात त्याला काय म्हणावे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट
प
प्यारे१ Tue, 10/13/2015 - 14:35 नवीन
कसं बरं तुला जमतं, कित्ती कित्ती छान वगैरे 'स्तुतीसुमनांची अपेक्षा' ही लिंगनिरपेक्ष मानावी काय???? मुळात मोदकाचा प्रतिसाद हा मल्टीपल थम्प्स आहे का किंवा का आहे याबद्दल सखोल विचार करायला हवा. मोदककडे शालजोड्या भरपूर आहेत असं ऐकून आहे. ;) कळावे, आ. न. प्यारे पैलवान
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
ट
टवाळ कार्टा Tue, 10/13/2015 - 14:49 नवीन
त्याच्याकडे बुचं पण हैत असे ऐकून आहे =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
प
पिलीयन रायडर Tue, 10/13/2015 - 10:46 नवीन
अशानी तर मग कुणीच कुठेच बोलायची सोय रहाय्ची नाही मिपावर.. आपली मतं दुसर्‍याला पटवायची नसतील तर काय करायचं काय नक्की इथे?!!!! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
प
प्यारे१ Tue, 10/13/2015 - 10:56 नवीन
अशं नै बोलाचं बाबा. आमाला लाग येतो मग.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
अ
अभ्या.. Tue, 10/13/2015 - 10:58 नवीन
आपापल्या अकलेचे ढोल वाजवूदेत म्हटलं लोकांनाआपापल्या अकलेचे ढोल वाजवूदेत म्हटलं लोकांना
मस्त. आवडले. हा प्रतिसाद लेखात अ‍ॅडवायचा होता राव. तेवढेच कमी प्रदूषण अकलेंच्या ढोलांचे पण. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
ट
टवाळ कार्टा Tue, 10/13/2015 - 10:59 नवीन
खिक्क
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
म
मोदक Tue, 10/13/2015 - 11:07 नवीन
आपली मतं दुसर्‍याला पटवायची नसतील तर काय करायचं काय नक्की इथे?!!!! ;) तुमचा काय अनुभव आहे? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
प
पिलीयन रायडर Tue, 10/13/2015 - 11:14 नवीन
मले काय ठावे बाबा.. मी तरी आजवर लोकांना माझी मतं पटवणे हेच एकच उदात्त कार्य करत आहे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
ट
टवाळ कार्टा Tue, 10/13/2015 - 11:19 नवीन
शहाणे करूनी सोडावे सकळजन =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
प
पिलीयन रायडर Tue, 10/13/2015 - 11:24 नवीन
त्याचसाठी हे अवतारकार्य... त्याचसाठी हा अट्टाहास...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
म
मोदक Tue, 10/13/2015 - 11:37 नवीन
मले काय ठावे बाबा.. तुझ्या खरडवहीत एकदा एक निरागस जीव ज्ञानकण शिंपडून गेला.. होता ते वाच! ;) ऑन अ सिरीयस नोट, १) "तुम्ही समस्त ढोल वाजवणार्‍यांची बाजू घेवून का प्रतिवाद करत आहात?" २) "तुमचे पथक नियम पाळणारे आहे असे तुम्ही म्हणता आहात.. ठीक आहे. तुम्ही बरोबर आहात तर जगाची काळजी सोडा" २.१) पब्लीक दोन्हीकडून (फक्त) बोलणारच आहे मग कशाला काळजी करा - हे ही एक! हे माझे मुद्दे आहेत. इतकेच. बाकी काही नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा