इसीस मध्ये भारतीयांचा सहभाग
गेल्या आठवड्यात एक बातमी वाचनात आली होती . इसीस मधील भारतीयांच्या सहभागाबाबत .अर्थात आधीही अश्या बातम्या आल्या आहेत .काही महिन्यांपूर्वी कल्याण मधून ४ जन इसीस मध्ये सामील होण्यासाठी गेले असण्याची बातमी आपल्या सगळ्यांना माहित आहेच . त्याआधी पिंपरी-चिंचवड मधून काही तरुण गेल्याची बातमीही आपल्या वाचनात आली असेल . परंतु आता हा वाढता सहभाग भारतासाठी धोकादायक ठरत चालला असल्याची चाहूल काही गोष्टींतून स्पष्ट जाणवते . अफशा जबीन नावाची ३७ वर्षीय हैद्राबादी तरुणी UAE मध्ये नोकरीनिमित्त गेली होती . 'निकी जोसेफ' हे टोपण नाव घेवून ब्रिटीश नागरिक असल्याचं भासवून हि इसीस चं काम करत होती . online जगतात तरुणांना भुरळ घालून त्यांना इसीसकडे आकर्षित करण्याचं हिचं मुख्य काम होतं .तिला अबुधाबीत कुटुंबासह अटक करून भारताकडे सोपवण्यात आलंय .भारतातील ३० पेक्षा अधिक तरुण इसीस मध्ये सामील होण्यासाठी आपल्या संपर्कात होते असं तिने चौकशीत दिलेल्या कबुलीत म्हणलं आहे .तिने 'इस्लाम विरुद्ध ख्रिश्चनीटी फ्रेंडली डीस्कशन ' नावाचा फेसबुक ग्रुप तयार केला होता आणि त्याला फोलो करणाऱ्यांची एकूण संख्या ५० हजार होती . हे account बंद करण्यात आलंय . ज्या दिवशी तिने हि कबुली दिली त्याच दिवशी अजून चार तरुणांना दुबीतून परत पाठवण्यात आलं होतं . तिच्या रूपाने इसीसमधील एका भारतीय महिलेचा सहभाग उघड झाला . अश्या अजूनही भारतीय मुली असण्याची शक्यता नाकारता येत नाही .
संपूर्ण जग 'इस्लामिक स्टेट 'बनवून आपल्या कायद्यानुसार जगणारा समाज निर्माण करण्यासाठी ,मुस्लिम तरुणींचा उपयोग मोठ्या प्रमाणावर होत आहे . त्यांच्यात सामील होण्यासाठी आलेल्या महिला आणि मुलींची उत्तम बडदास्त ठेवली जाते . सर्व सोयी सुविधा फुकटात पुरवल्या जातात .त्यांना कोणतीही कमी करण्यास सांगितलं जात नाही. तरुणांना भुरळ घालून इसीस मध्ये आणण्यासाठी आणि दहशतवादी वृत्ती असलेली नवीन पिढी जन्माला घालण्यासाठी त्या वापरल्या जात आहेत .
असंच काम करणाऱ्या दुसऱ्या इसमाचं नाव आहे सलमान मोइउद्दिन . ३२ वर्षांचा इंजिनिअर असलेला हा तरुण काही वर्षे नोकरी करत होता . US return होता . हैद्राबादी असलेला हा तरुण आईवडिलांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी पुन्हा US मध्ये नोकरी करण्यासाठी निघाला होता . खरं तर तो दुबईला जाणार होता . घरच्यांशी खोटं बोलून . तिथे जावून तो इसीस चं काम करणार होता . त्याचे अनेक महिन्यांपासून इसीस मध्ये सामील होण्याचे प्रयत्न चालू होते . त्यामुळे तो दुबईला जाणार होता . पण त्याला विमानतळावारच अटक करण्यात आली . चौकशी मध्ये त्याच्याकडून इतर अनेक लोकांची माहिती आणि पत्ते उघड झाले आहेत .
'अल्लाहसाठी काम करायला या . जन्नतमध्ये जायला हवं असेल तर इसीस मध्ये या ' अश्या भावनिक आवाहन करणाऱ्या भूलथापांना बळी पडून तरुण तरुणी संघटनेत सामील होत आहेत . भारतीय मुस्लिमांचा त्यात सहभाग योग्य आहे का ?भारतीय सुरक्षा यंत्रणांना सोशल मिडीयावर वॉच ठेवणं , अंतर्गत सुरक्षा सांभाळणं हि महत्वाची कामे करावी लागणार आहेत . त्यांची जबाबदारी वाढली आहे . पण सामान्य भारतीय नागरिक म्हणून आपण काही करू शकतो का ? जाणकार आणखी प्रकाश टाकू शकतील .
💬 प्रतिसाद
(120)
व
विनोद१८
Mon, 10/12/2015 - 19:30
नवीन
जरूर सुनाओ नाना, वाकईमे सुनाओ, इसमे तो कोइ शक नही यहा तो सब लोग सुनेंगे तुम्हारी कहानी. अगर उसमे असलीयत हो तो.
न
नाव आडनाव
Fri, 10/09/2015 - 14:02
नवीन
ठरलं ! नाही जाणार आता मी इसिस जॉइन करायला.
ब
बाप्पू
Fri, 10/09/2015 - 17:16
नवीन
जन्नत मिस केली राव तुम्ही हा निर्णय घेऊन... :P
न
नाव आडनाव
Sat, 10/10/2015 - 05:02
नवीन
:)
ट
टवाळ कार्टा
Fri, 10/09/2015 - 17:36
नवीन
जा बे....तेव्हडीच ऑनसायीट =))
न
नाव आडनाव
Sat, 10/10/2015 - 05:03
नवीन
:)
अ
अनिरुद्ध.वैद्य
Mon, 10/12/2015 - 18:58
नवीन
हा शवार्मा अन कबाब्स मस्त मिळतील ;)
ध
धर्मराजमुटके
Fri, 10/09/2015 - 15:50
नवीन
काय राव ! काय स्वाभिमान नावाची गोष्ट उरली नाही ! आता भारतात एवढ्या संघटना असतांना पार तिकडं एवढ्या लांब बोंबलत जायचं म्हणजे काय ?
आत्तापर्यंतचे तुमचे मिपावरील प्रतिसाद पाहता या विषयावर तुमच्यापेक्षा कोण जाणकार असेल असे वाटत नाही बॉ !
ब
बाप्पू
Fri, 10/09/2015 - 17:12
नवीन
फिजि -
जगातल्या सगळ्या गोष्टींना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रित्या अमेरिका च जबाबदार असते. काहीही झाले तरी अमेरिकेला शिव्या घालून मोकळे व्हायचे...
अमेरिकेला दोष देण्यापेक्षा तुम्ही जरा इस्लाम धर्म, कुराण व इस्लाम मधील आक्रमक अमानवीय तत्वे, चालीरीती. अंधश्रद्धा, अति-धर्मांधता, असहिष्णुता, स्त्रियांवर अन्याय करणाऱ्या परंपरा इ, यावर विचार करून त्यांना बदलण्याचा प्रयत्न करा. आपली लोकसंख्या वाढवणे, टोपी घालणे आणि दिवसातून ४ वेळेला भोंगे वाजवण्यापेक्षा, सुशिक्षित मुस्लिम लोक्कांना एकत्र करून मुस्लिम धर्मावर संशोधन करा
थोडेसे अवांतर : डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या कार्याचा मला आदर च आहे. पण त्यांचा पूर्ण रोख हा हिंदू धर्मावर च होता. आपल्या मुलाचे नाव " हमीद" असे ठेवण्य वतिरिक्त त्यांनी मुस्लिम धर्मात काहीच इंटरेस्ट दाखवला नाही. असो. तो त्यांचा वयक्तिक प्रश्न होता. त्यांनी आपल्यासाठी जे काही केले ते एक महान कार्य आहे.
परंतु आश्चर्य वाटते कि त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन एखादा मुस्लिम दाभोलकर का नाही निर्माण झाला ? जर झाला असता... तर बाकीच्या जगाचे माहित नाही परंतु भारतात आपण इसीस आणि दहशतवाद यावर चर्चा करण्यात वेळ फुकट घालवला नसता.
अ
अस्वस्थामा
Fri, 10/09/2015 - 17:32
नवीन
नै बाकी चालू द्या फकस्त त्यांनी मुलाच नाव "हमीद" का ठेवले तेवढे शोधून वाचलेत तरी तुमच्या या प्रतिसादातील प्रश्नांची उत्तरे मिळतील (पुरवणी म्हणून हमीद दलवाईंबद्दल पण वाचा). "त्यांनी आपल्यासाठी जे काही केले ते एक महान कार्य आहे." असं तुम्हाला खरोखरीच वाटतंय असा अंदाज आहे म्हणून हा प्रतिसाद प्रपंच.. :)
ब
बाप्पू
Fri, 10/09/2015 - 17:54
नवीन
हमीद दलवाई यांच्याबद्दल माहिती आहे. आणि एक मराठी माणूस म्हणून त्यांचा आदर च करतो. माझा मुद्दा असा होता कि दाभोलकरांनी आपल्या मुलाचे नाव हमीद ठेवण्याव्यतिरिक्त मुस्लिम समाजातील चुकीच्या गोष्टी दूर करण्यासाठी काय ठोस प्रयत्न केले? जर काही केले असेल तर कृपया वेगळा धागा काढून त्याची माहिती द्या. म्हनजे माझे अज्ञान दूर होईल आणि ते वाचून थोडेतरी मुस्लिम लोक जागृत होऊन भारताचाच फायदा होईल.
असो आता विषयांतर नको.
सरसकट सगळे मुस्लिम किंवा मुस्लिम धर्मच वाईट आहे असे मी या धाग्यावर कुठेही म्हणलेले नाहीये.
मुस्लिम समजात चुकीच्या लोकांना फोलो करण्याची प्रवृत्ती वाढतीय. त्यामुळे मी फक्त एवढेच सांगू इच्छितो कि धर्मसुधारणा करणाऱ्या लोक्कांनी पुढे येण्याची गरज आहे. आणि मुस्लिम लोकांना योग्य दिशा दाखवण्याची गरज आहे. तर च आपण इसीस सारख्या संघटनांना भारतात शिरकाव करण्यापासून रोखू शकतो.
D
dadadarekar
Fri, 10/09/2015 - 19:30
नवीन
मुस्ल्मानाना योग्य दिशा दाखवणार म्हणजे नेमकं काय करणार ?
प
प्रदीप
Sat, 10/10/2015 - 14:13
नवीन
हमीद दलवाईंना त्यांच्या हयातीतच त्यांच्या धर्मातील कडव्या लोकांशी प्रखर झुंज घ्यावी लागली होती. माझ्या आठवणीनुसार तेव्हा अंनिस कार्यरत नव्हती त्याकाळी मे. पुं. रेगे व अ. भि. शहा ह्यांचा एक मंच समाजसुधारणेविषयी बराच कार्यरत होता, पण दलवाईंना त्यांनीही मदत केल्याचे मला आठवत नाही.
हमीदच्या अकाली निधनानंतर त्यांच्या पत्नि मेहरून्निसा दलवाई ह्यांनी त्यांचे कार्य सुरू ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न त्यांच्या परीने केला. मात्र त्यांना कर्मठाच्या झुंडीपुढे शरण जावे लागले व मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे कार्य गूंडाळावे लागले. ह्याविषयी त्यांनीच त्यांच्या आत्मचरीत्रात सविस्तर लिहीले आहे. तेव्हा त्यांना डॉ. दाभोळकर अथवा अन्य कुणाचीही साथ मिळाली असल्याचे त्यांनी नमूद केले असल्याचे मला आठवत नाही. त्याविषयी ठोस काही माहिती असल्यास कृपया येथे सांगावी.
ब
बॅटमॅन
Sat, 10/10/2015 - 14:15
नवीन
इंडीड.
ख
खटपट्या
Sat, 10/10/2015 - 17:10
नवीन
हुसेन दलवाई हे हमीद दलवाईंचे कोण ?
प
प्रदीप
Sat, 10/10/2015 - 17:25
नवीन
होते, असे वाटते.
व
विनोद१८
Sat, 10/10/2015 - 21:56
नवीन
ते दोघेही सख्खे भाउ.
ख
खटपट्या
Mon, 10/12/2015 - 12:22
नवीन
हुसेन दलवाईंमधे भावाचा एकही गुण नाही. :(
प
प्रदीप
Mon, 10/12/2015 - 14:15
नवीन
तो नाही.
अंनिस समर्थक अनेकदा दाभोळकरांनी हमीदचे नाव आपल्या मुलास दिले आहे, ह्याकडे निर्देश करतात. त्यांनी अथवा अंनिसने हमीदच्या मुस्लिम सत्यशोधक मंडळीच्या कामात हमीद हयात असतांना अथवा/ आणि त्यांच्या पश्चात काय मदत केली त्याविषयी कुणी काही ठोस सांगण्याची, अथवा तशी ती केली नसल्यास त्याची काही सयुक्तिक कारणे असतील ती विशद करण्याची वाट पहातोय.
D
dadadarekar
Fri, 10/09/2015 - 19:37
नवीन
परंतु आश्चर्य वाटते कि त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन एखादा मुस्लिम दाभोलकर का नाही निर्माण झाला ? जर झाला असता... तर बाकीच्या जगाचे माहित नाही परंतु भारतात आपण इसीस आणि दहशतवाद यावर चर्चा करण्यात वेळ फुकट घालवला नसता
तस्लिमा नसरीन , मलाला व इतर अनेक आहेत.
एक दाभोळकर झाल्याने हिंदू धर्म १०० % शुद्ध व स्वच्च झाला काय? मुसलमानांच्यात दाभोळकर झाल्यास तो धर्म कसा स्वच्छ होइइल ?
दाभोळकरानी इतर धर्मांबद्दल का केले नाही हा प्रश्नच हास्यास्पद आहे.
हे म्हणजे मी आठ तास एच आय व्हीचे पेशंट बघतो म्हटल्यावर तुम्ही हाड मोडलेले पेशंट का बघत नाही असे विचारल्यासारखे आहे.
द
दत्ता जोशी
Sat, 10/10/2015 - 07:23
नवीन
तस्लिमा नसरीन , मलाला व इतर अनेक आहेत.
होय ना . तस्लिमा नसरीन आणि मलालाने भारतात समाज सुधारणेसाठी आयुष्य वेचले. तरीही असं कसं काय म्हणू शकतात हे करंटे !!!!!!!!!!!!!!?????
दाभोळकरानी इतर धर्मांबद्दल का केले नाही हा प्रश्नच हास्यास्पद आहे.
त्याला हास्यास्पद नाही, उत्तर नसल्याने हसून साजरे करणे (वास्तवापासून दूर पळणे) म्हणतात.
हे म्हणजे मी आठ तास एच आय व्हीचे पेशंट बघतो म्हटल्यावर तुम्ही हाड मोडलेले पेशंट का बघत नाही असे विचारल्यासारखे आहे.
^^^^^^^^^^^ काय समजलं नाही बुवा हे उदाहरण.
एच आय व्ही चा पेशंट तो एच आय व्ही चा पेशंट मग मी यालाच बघणार आणि त्याला बघणार नाही असा दुजा भाव डॉक्टर ने करावा का असा धोपट प्रश्न आहे. पण तो हास्यास्पद आहे हे पटतंय इथे.
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
Mon, 10/12/2015 - 03:39
नवीन
मलाला हा चेहेरा आहे. ओव्हरहाईप्ड आणि ओव्हरप्रोजेक्ट केलेला. अमेरिकेला आम्ही मुस्लिमांसाठी काही करतोय हे दाखवायसाठी वापरलेली एक बाहुली. लाखोंनी लोकं दहशतवादी हल्ल्यांमधे अपंग झाली. एकट्या मलाला ला अमेरिकेमधे नेउन स्पेशल प्लास्टिक सर्जरी अन थेट नोबेल प्राईझ? जगामधे ह्याचं कारणासाठी काम करणारी आणि मलाला पेक्षा खुप जास्तं प्रोडक्टिव्ह काम केलेली शेकडो लोकं आहेत. त्यांची सिनिऑरिटी डावलुन थेट नोबेल? =)) बात कुछ हजम नहि हुई बॉस. आणि त्यातुनही कैलाश सत्यार्थी (भारतीय) आणि मलाला (पाकिस्तानी) ह्या दोघांना एकाचं वेळी पारितोषिक मिळावं हा योगायोग नक्कीचं नाही. हि सुत्रं बरीचं वरुन हाललेली आहेत. काय माहित कदाचित मलाला सी.आय.ए. ची एखादी एजंटही बनलेली असु शकेल.
D
dadadarekar
Mon, 10/12/2015 - 03:52
नवीन
मलाला एजंट असू शकेल असे तुम्हाला वाटते म्हणून ती नोबेल मिळवायला अपात्र ठरते ! वा !
ऋ
ऋतुराज चित्रे
Sat, 10/10/2015 - 13:29
नवीन
डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या कार्याचा मला आदर च आहे. पण त्यांचा पूर्ण रोख हा हिंदू धर्मावर च होता. आपल्या मुलाचे नाव " हमीद" असे ठेवण्य वतिरिक्त त्यांनी मुस्लिम धर्मात काहीच इंटरेस्ट दाखवला नाही.
बाप्पूसाहेब, खालील विडिओत आपल्याला पडलेल्या प्रत्येक प्रश्नाचे डॉ.नरेन्द्र दाभोलकर यानी उत्तर दिले आहे. त्यासाठी आपल्याला पुर्ण ९ मि.०३ से. विडिओ ऐकावा लागेल.
प
प्रदीप
Sat, 10/10/2015 - 17:18
नवीन
ह्या क्लिपचा दुवा आपण अगोदरही दिला होतात, तेव्हा त्यांचे भाषण पाहिले. त्यांतून काही प्रश्न मनात आलेले आहेत, पण येथे ते सर्व अवांतर आहे, तेव्हा इथे लिहीत नाही.
ब
बॅटमॅन
Fri, 10/09/2015 - 17:42
नवीन
भारतातील अनेक मुस्लिम धर्मगुरूंनी मिळून आयसिस ही इस्लामविरोधी असल्याचा फतवा काढल्याची न्यूज़ होती बॉ मध्ये.
ब
बाप्पू
Fri, 10/09/2015 - 18:02
नवीन
असा फतवा काढणारे धर्मगुरू हेच खरे भारतीय मुस्लिम आहेत. आणि त्यांना मी एक भारतीय म्हणून "आपले" मानतो.,
परंतु त्याचवेळी आपल्या भारतात याकुब च्या फाशीला विरोध करणारे, त्याला सोडून द्या म्हणणारे, अफजल गुरु निर्दोष आहे (होता) असे म्हणणारे पण धर्मगुरू आणि राजकीय नेते आहेत.. त्यांचे काय करावे बॉ ?
ब
बॅटमॅन
Fri, 10/09/2015 - 18:13
नवीन
काय करणार....त्यांच्यावर कडक टीका झालीच पाहिजे.
D
dadadarekar
Fri, 10/09/2015 - 19:41
नवीन
अंबानीच्या दोन्ही पोराना इस्टेट वाटून दिली.
एक मुद्दा संपला.
पण दुसर्याच्या हिश्श्यावर टेक ओव्हर करायचे स्वप्न बघायचा अधिकार दोन्ही पोराना सारखाच असायला हवा ना ?
ह
होबासराव
Sat, 10/10/2015 - 04:52
नवीन
ऑलरेडी हिस्सा दिला गेलाय हो १९४७ ला...काशि घाला तिकडे...अरे तुम्हि त्यावेळेस नसाल गेलात बरोबर आहे सुंता झालि नव्हति ना तेव्हा :)
ह
होबासराव
Sat, 10/10/2015 - 05:18
नवीन
http://www.ndtv.com/india-news/how-a-25-year-old-indian-was-recruited-by-the-islamic-state-1230344?pfrom=home-lateststories
व
विजुभाऊ
Sat, 10/10/2015 - 05:18
नवीन
इसिस काय किंवा आर एस एस काय दोघेही सारखेच.
इसिस वाले थेट करुन दाखवतात. आरएसेस वाले नुसतेच बौध्दिके नामक वाफ दवडत अ॑सतात. इतकाच काय तो फरक.
D
dadadarekar
Sat, 10/10/2015 - 06:40
नवीन
सहमत
य
याॅर्कर
Sat, 10/10/2015 - 06:29
नवीन
बाकी, चालू दे
द
दत्ता जोशी
Sat, 10/10/2015 - 06:56
नवीन
फुलथ्रॉटल जिनियस - Fri, 09/10/2015 - 21:20
, नथुराम गोडसे सुंता करुन आणि दाढी वाढवून गांधीहत्या करायला कशासाठी गेला होता? मुस्लिमांना बद्नाम करण्यासाठीच ना? तसेच आहे हे आयसिसचे
^^^^^^^^^^^^ सगळं काल्पनिकच कसं असतं हो तुमच्या पुस्तकांमध्ये ?
=========================================================================
अंबानीच्या दोन्ही पोराना इस्टेट वाटून दिली.
एक मुद्दा संपला.
पण दुसर्याच्या हिश्श्यावर टेक ओव्हर करायचे स्वप्न बघायचा अधिकार दोन्ही पोराना सारखाच असायला हवा ना ?
__/\__जिनियस !!. हाडाचे जिनियस.........!!!!
=============================================================================
इसिस काय किंवा आर एस एस काय दोघेही सारखेच.
इसिस वाले थेट करुन दाखवतात. आरएसेस वाले नुसतेच बौध्दिके नामक वाफ दवडत अ॑सतात. इतकाच काय तो फरक.
==========================================================================
अत्यंत विनोदी व्हायला लागला आहे धागा हळूहळू. .. ते हॉलीवूड चित्रपटात "रोमेडी" म्हणून प्रकार असतो न तसंच. " रोम्यांटिक कॉमेडी " किंवा " कॉमेडी रोमान्स" म्हणूया हवं तर . प्रेम आंधळ असतं असं ऐकलं होतं खरं. पण आंधळ्यांच प्रेम भन्नाटच.
ज
जेपी
Sat, 10/10/2015 - 08:03
नवीन
हाफशेंच्युरी निमीत्त तुडतुडी आणी दादा दरेकर यांचा सत्कार सिरीयाच वनवे तिकीट देऊन करण्यात येत आहे.
-शुभेच्छुक- जेपी आणी तमाम कार्यकर्ते.
ब
बिपिन कार्यकर्ते
Sun, 10/11/2015 - 13:06
नवीन
’तमाम कार्यकर्ते’
मला वगळा हं यातून. प्लीज. शुभेच्छुक होण्याइतकाही वेळ नाही माझ्याकडे यांच्याकरता! ;)
अ
अजया
Sat, 10/10/2015 - 09:17
नवीन
ही कल्पना सुचलेल्या जेपीला संपादक केलेच पाहिजे!
न
नीलमोहर
Sat, 10/10/2015 - 09:38
नवीन
१००% अणूमोदण (च्चं काय शब्द आहे बरं तो)
न
नाखु
Sat, 10/10/2015 - 11:23
नवीन
किमान अखिल मिसळपाव सार्वजनीक सत्कार संपादक तरी !!!
स्वगत : "जे पी" वळख असू द्या गरीबाची .
त
तर्राट जोकर
Sat, 10/10/2015 - 12:08
नवीन
उपाय तुम्हीच सांगितलेत मिपावर आजवर कित्येक प्रतिसादांतून, त्यामुळे मुसलमानांचं काय नाही झालं पण तुमचे प्रतिसाद गेले......
स
सुबोध खरे
Sat, 10/10/2015 - 15:06
नवीन
www.theatlantic.com/magazine/archive/2015/03/what-isis-really-wants/384980/
त
तुडतुडी
Sun, 10/11/2015 - 10:33
नवीन
पाकिस्तान हि मुस्लिमांची नाही , हिंदूंची भूमी आहे . मुस्लिमांनी तोडलेला लचका आहे तो . तेव्हा गोडसे सारख्या देशभक्ताला तो लचका तुटू नये वाटलं तर ते बरोबरच आहे . मुळात इस्राइल हि ज्यू आणि ख्रिश्चनांची भूमी आहे .त्यांच्यासाठी अत्यंत पवित्र . अरब मुस्लिमांनी ती बळकावली . अर्थातच अत्याचार , सक्तीचं धर्मांतर , हत्याकांड, बलात्कार ब्ला ब्ला ब्ला . आता ज्यू ती भूमी परत मिळवत असतील तर त्यात काहीच चूक नाही . मुस्लिमांनी अनेक देशांवर आणि धर्मांवर जे अनन्वित अत्याचार केलेत तेच आता त्यांच्यावर उलटत आहेत . इस्राइलने केवळ प्यालेस्ताईनच नाही तर जॉर्दन सुधा घ्यायला हवा . इस्राइल , अमेरिकेला शिव्या घालणं बंद करा.
हमीद दलवाईनच कार्य महान आहेच . त्यांचा दाभोलकरांच्या मुलाशी काही संबंध नाही . In Fact ज्या मुस्लिमांनी भारतासाठी काही केलं आहे त्यांना भारतीय हिंदूंनी मुस्लिमांपेक्षा जास्त सन्मान दिला आहे .
इतर धर्मियांनी दाभोल्कारांबद्दल बोलणे हास्यास्पद आहे .विषय इसीस चा चाललेला असताना काही दीडशहाण्या लोकांनी दाभोलकर वगेरे irrelative मुद्दे काढून मुद्दा भरकटव्लाय
फुलथ्रॉटल जिनियस यांचे एक से एक हास्यास्पद प्रतिसाद आपण त्या अफ्जुल्य्याच्या धाग्यावर वाचलेलेच आहेत तेव्हा त्यांच्या बालिश बडबडीकडे दुर्लक्ष करणंच चांगलं .
आधी म्हणता करणं सांगा . मग म्हणता उपाय मीच सांगितलेत . तुमचं तुम्हाला तरी कळतंय का काय बोलताय ते . आणि मुसलमानांचं काय होणार हि नाही . चंबू गबाळं उचलून ह्या जगाला टाटा बाय बाय फक्त करावं लागणार
सुबोध खरे साहेब खूप धन्यवाद
D
dadadarekar
Sun, 10/11/2015 - 10:43
नवीन
मुसौलमानाना असे शिव्याशाप देणारे अनेक होऊन गेले. बुडाला रंग्याचाचा पापी / म्लेंछ्संहार जाहला ..... असं बडबडलं म्हणून कुणाला काहीही फरक पडला नाही.
भूमी ही व्यक्तींची असते. त्या व्यक्तीनी धर्म बदलला तरी त्यांचा हक्क अबाधितच रहातो.
ब
बोका-ए-आझम
Sun, 10/11/2015 - 15:48
नवीन
तुमचा मूळचा आचरटपणा जात नाही, तसंच काहीसं ना?
ज
जेपी
Sun, 10/11/2015 - 17:29
नवीन
दादुनां ..मिपाचा विनोदविर पुरस्कार देण्यात यावा..
>>बुडाला रंग्याचाचा पापी>>> ठ्ठो =)))
D
dadadarekar
Mon, 10/12/2015 - 04:49
नवीन
पुरस्कार तर घोषणावीर हिंदुत्ववाद्याना द्यायला हावा.
आजची बातमी वाचली का ? ३७० रद्द करता येणार नाही असे कोर्टाने सांगितले.
५६ इंची छाती ताणुन कोकलणारे कुठे गेले ?
ज
जेपी
Mon, 10/12/2015 - 14:39
नवीन
जोवर राज्याची विधानसभा भंग होण्यापुर्वी ती हे कलम रद्द करण्याची शिफारस करत नाही,तोवर हे कलम रद्द करणे कलम 35अ अन्वये करणे शक्य नाही.
हे जेके उच्चन्यायालयाचे मत आहे.
ज
जेपी
Mon, 10/12/2015 - 14:45
नवीन
न्यायालय पुढे म्हणते की कलम 370 (3) अन्वये राष्ट्रपती जाहीर अधिसुचना काढुन कलम 370 रद्द करु शकते.
यासाठी विधानसभेची शिफारस हवी.
स
सुबोध खरे
Mon, 10/12/2015 - 15:03
नवीन
ओ हितेसराव
शहाबानो प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने निस्संदिग्ध शब्दात सांगितले होते कि भारतीय घटनेप्रमाणे मुसलमान स्त्रीला पण पोटगी मिळाली पाहिजे. तेन्व्हा तुमच्या आवडत्या राजीव गांधी साहेबांनी निर्णायक बहुमताचा दुरुपयोग करून दाढी कुरवळण्याचे धंदे करून घटना दुरुस्ती केली ना? मग उगाच उच्च न्यायालयाच्या एका निर्णयाचा आधार घेऊन कसला बुभुक्कार करता आहात?
३७० कलम रद्द करता येणार नाही असे जर "घटनेत" लिहिले असते तर इतकी वर्षे काश्मीरचे लोक त्याबद्दल घाबरून कलम रद्द केलेले आम्हाला चालणार नाही असे कंठशोष करून ओरडले नसते. घटनेतील काही मुळ कलमेच( मुलभूत अधिकार) फक्त रद्द करता येणार नाहीत बाकी सर्व घटनादुरुस्ती करून रद्द करता येतील ३७० हे (रद्द करता येण्याजोगे आहे) त्यात येते. ३७० हा "मुलभूत" नसून "विशेष" अधिकार आहे.
जरा कायदा वाचा व्यवस्थितपणे.
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- ›
- »