डॉ. गो. बं. देगलूरकर यांचे नवे पुस्तक प्राचीन भारत, इतिहास आणि संस्कृती
अपरांतचे नवीन पुस्तक
“प्राचीन भारत इतिहास व संस्कृती“
ज्येष्ठ इतिहास संशोधक व डेक्कन कॉलेजचे कुलपती डॉ. गो. बं. देगलूरकर यांनी लिहीलेल्या “प्राचीन भारत इतिहास व संस्कृती“ या पुस्तकातुन वाचकांना पहिल्यांदाच मराठीतुन आपल्या गौरवशाली इतिहास व संस्कृतीची अद्ययावत माहिती मिळते. या पुस्तकांत डॉ. देगलूरकर यांनी पाषाणयुगापासून १३व्या शतकापर्यंतच्या काळावर विस्ताराने माहिती दिली आहे. प्राचीन इतिहास, इंडॉलॉजी या विषयाच्या अभ्यासकांना हे पुस्तक विशेष उपयुक्त ठरणार आहे. हे पुस्तक ४५६पानी असुन भरगच्च माहितीसोबतच अनेक छायाचित्रेही असल्याने पुस्तकाची उपयुक्तता वाढली आहे.
या पुस्तकात मांडण्यात आलेले ठळक विषय :
भारताची भौगोलिक माहिती
इतिहासाच्या अभ्यासाची साधने
सिंधु – सरस्वती संस्कृती व त्याकाळातील मानवी जीवन, व्यापार, स्थापत्य, कला, लिपी व धर्म.
वैदिक संस्कृती, ब्राह्मण व उपनिषत्कालीन संस्कृती
जैन व बौध्द धर्मांचा इतिहास व तत्वे
महाभारत व रामायणकालीन जीवन
१६ महाजनपदे व मगधसाम्राज्याचा उदय
भारतावरील विविध परकीय आक्रमणे
प्राचीन भारतातील अनेक पराक्रमी राजे व विविध राजवटी, जसे-
मौर्य, शुंग, काण्व, सातवाहन, गुप्त, वाकाटक, वर्धन, चालुक्य, राष्ट्रकुट, उत्तर चालुक्य, कलचुरी, पल्लव, चोल, पांड्य, पाल, सेन, प्रतीहार वगैरे
बृहत्तर भारत, प्राचीन भारताचे जगाशी संबंध व भारतीय संस्कृतीचा विस्तार, यांत श्रीलंका, कंबोडिया, मलेशिया, चीन, तिबेट, ब्रम्हदेश, थायलंड, जावा, सुमात्रा, चंपा या देशांची माहिती येते.
शेवटच्या भागात सिंधु – सरस्वती संस्कृती पासून १३ व्या शतकापर्यंतच्या विविध राजवटींच्या काळातील मंदिरस्थापत्य, शिल्पकला, शैलींची माहिती येते. यातच मंदिर स्थापत्यतील नागर, द्राविड, भुमिज व वेसर या शैलींचीही माहिती आहे. तसेच शिल्पकलेतील गांधार, मथुरा या शैली शिवाय मौर्य, शुंग, गुप्त-वाकाटक, चालुक्य, पल्लव, राष्ट्रकुट, चोल या राजवटींच्या काळातील शिल्पकलेची वैशिष्ट्यांची माहिती विस्ताराने येते.
पुस्तकाची किंमत रु. ५००/- असुन लवकरच वाचकांना उपलब्ध होत आहे. अधिक माहिती साठी ९४०३६ ०५७८३ या नंबरवर किंवा aprantbooks@gmail.com या इमेल वर संपर्क साधावा.

💬 प्रतिसाद
(12)
स
सतिश गावडे
Sat, 10/10/2015 - 11:03
नवीन
पुस्तकाचा विषय रोचक आहे.
मात्र या विषयातील अभ्यास शुन्य असल्याने मा. प्रचेतस सर यांचे मत वाचून पुस्तक घ्यावे की नाही हे ठरवेन.
- Log in or register to post comments
द
दत्ता जोशी
Sat, 10/10/2015 - 12:07
नवीन
माहिती बद्दल धन्यवाद. काही रिव्ह्यू आहेत का? बहुदा घेइनच. पण ५०० पानात इतके सगळे विषय हाताळणे म्हणजे शिवधनुष्य पेलणे आहे.
- Log in or register to post comments
द
द-बाहुबली
Sat, 10/10/2015 - 12:24
नवीन
प्रचेतस सर या पुस्तकाचे परीक्षण केंव्हा येणार ?
- Log in or register to post comments
ए
एस
Sat, 10/10/2015 - 13:28
नवीन
साधकबाधक परीक्षणे आल्यावर वाचून मग पुस्तक घेईल. पुस्तक चांगले असावे अशी आशा आहे.
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Sat, 10/10/2015 - 16:00
नवीन
मी हे पुस्तक घेतले आहे. देगलूरकर सर म्हणजे प्रश्नच नाही. पुस्तक अप्रतिम आणि सोप्या भाषेत आहे.
आपल्याकडचा शालेय इतिहास बाबरापासून सुरु होऊन स्वातंत्र्य मिळाल्यावर संपतो. पण त्याआधी सहस्र वर्षे इथे गौरवशाली इतिहास नांदत होता ह्याची माहिती अल्पप्रमाणात चंद्रगुप्त मौर्य आणि अशोक ह्यांचा अपवाद वगळता कुठेच मिळत नाही.
पुस्तक अजून वाचलेले नाही, नुकतेच चाळलेले आहे. पण एकंदरीत पुस्तकाची ढब पाहता मराठी वाचकांची प्राचीन इतिहासाच्या माहितीबद्दलची जिज्ञासा आणि अपेक्षा हे पुस्तक नक्कीच पूर्ण करेल यात कसलीही शंका नाही.
अर्थात ह्या पुस्तकाची एक उणीव म्हणजे विविध राजवटींबाबतची माहिती काहीशा अल्प प्रमाणात तरीही एकदंरीत तत्कालीन राजवटींविषयी कल्पना येण्यासाठी पुरेशी आहे. अर्थात ह्याला रूढार्थाने उणीव म्हणता येणार नाही. कारण ह्या एकेक राजवटींवर प्रत्येकी ५००/१००० पानी पुस्तके सहज व्हावीत.
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
Sat, 10/10/2015 - 16:31
नवीन
धन्यवाद प्रचेतस सर.
आपण हे पुस्तक कुठून विकत घेतलेत?
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Sat, 10/10/2015 - 17:03
नवीन
अपरांतच्या श्री. पराग पुरंदरे यांजकडून.
- Log in or register to post comments
क
कोकणप्रेमी
Sun, 10/11/2015 - 10:31
नवीन
पुण्यामधे “प्राचीन भारत इतिहास व संस्क्रुती“ हे पुस्तक आप्पाबळवंत चौकात रसिक साहित्यमधे, बाजीराव रोडवर अक्षरधारा मधे, डेक्कन वर उत्कर्ष मधे उपलब्ध आहे. सदाशिव पेठेत भारत इतिहास संशोधक मंडळातही उपलब्ध आहे. भारत इतिहास संशोधक मंडळात या पुस्तकासोबत मंडळाची इतरही अनेक पुस्तके बघता येतील जी बाहेर कुठल्याही दुकांनात उपलब्ध नसतात. उदा. शिवाजी निबंधावली, शिवचरिपत्र निबंधावली, संभाजीकालीन पत्रसारसंग्रह.
मुंबइमधे मॅजेस्टिक व आयडियल मधे पण उपलब्ध आहे.
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Sun, 10/11/2015 - 11:17
नवीन
धन्यवाद.
- Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते
Sun, 10/11/2015 - 11:35
नवीन
बराच मोठा आवाका आहे पुस्तकाचा. रोचक ठरावे.
- Log in or register to post comments
ज
जिप्सी
Mon, 10/12/2015 - 08:11
नवीन
पुस्तक सन्ग्रही असायला काही हरकत नाही,पण हे पुस्तक पुनर्मुद्रित आहे त्यामुळे मध्यन्तरीच्या काळातील अनेक नविन सन्दर्भ आणि नव्याने उजेडात आलेल्या अथवा नव्याने मांड्ल्या गेलेल्या / पुराव्याने सिद्ध झालेल्या इतिहासाची माहीती यात नसेल.
उदा. सातवाह्न आणि कुर व आनन्द यांच्यातील संबंध याविषयी आता अनेक नवे पुरावे उपलब्ध झाले आहेत पण या पुस्तकात आपल्याला ते आढळणार नाहीत
शिवाय सिंधुसभ्यतेविषयीचे नविन उत्खननातून प्राप्त पुरावे यावरुन आता त्यांच्या विकासातील नविन ट्प्पे समोर आले आहेत.
त्यांची माहीती यात नसेल.
तरीही पुस्तक घेण्यास ह्र्र्कत नाही.
अधिक आणि अद्यावत माहीतीसाठी
A History of Ancient and Early Medieval India - उपिन्दर सिंग
- Log in or register to post comments
क
कोकणप्रेमी
Wed, 10/14/2015 - 10:50
नवीन
पुस्तक वाचुन अभिप्राय दिला असता तर आनंद वाटला असता. पुस्तक न वाचताच अभिप्राय देणे म्हणजे लेखक किंवा प्रकाशक यांच्याबद्दलचा काहीतरी पुर्वग्रह दर्शवतो. असो.
तरीही वाचकांच्या माहिती साठी सांगतो की पुस्तक नवीन आहे. सध्यातरी मराठीमध्ये एवढे अद्ययावत माहिती देणारे दुसरे पुस्तक नाही. वाचकांनी पुस्तक स्वत: बघुन आपले मत बनवावे.
- Log in or register to post comments