[साडीवाले]
विजूभाउंच्या 'आय्टीवाले'च्या धर्तीवर-
परवा एक लेख वाचण्यात आला. त्यात साडीविक्रेते लोकांच्या रोजच्या जीवनमानाबद्दल लिहीले होते.
त्यां लेखाचा मतितार्थ असा की साड्या विकणारे लोक खूप स्वच्छंद जगतात. त्याना हव्या तेवढ्या साड्या उपलब्ध असतात मात्र नशिबात वडिलांचा कोट-टाय घालण्याचे सूख मात्र नसते.
एकूणातच समाजातील साडीवाले हा एक छोटा वर्ग लोकांच्या चर्चेचा नेहमीच विषय असतो.
यातील काही कॉमन अभिप्राय/प्रश्न असे आहेत. तुम्हालाही असे अनुभव आले असतील्.तुम्हाला काय वाटतंय या अभिप्रायांबद्दल?
लोकांच्या मते
१)साडीवाले भरपूर साड्या विकतात.
२) दुकानात बसून फक्त बायकांना बघायचे हेच तर नुस्ते काम असते. बाकी काय करतात?
३) गोड गोड बोलायचे यात कसले आले काम ?
४)साड्या विकणार्या लोकांकडे भरपूर साड्या असतात त्यामुळे त्यांच्या बायका पैसे कसेही उडवतात. त्यामुळे महागाइ वाढते. पटोला,कांजीवरम,मैसूर सिल्क पासून पैठणी,डिझायनर साड्यांचे दर वाढण्यामागे कारण हे साडी विक्रेते आहेत.
५) तुमची काय मज्जा आहे एकदा सकाळी एक डिझायनर साडी,लग्नाचा शालू विकला की नुसते पैसे छापायचे असतात. वर्षाकाठी पन्नास एक लाख काय सहज मिळतात तुम्हाला.
६) सगळे साडीवाले साड्या खरेदी करायला सूरतला जातात.
७)तुम्हा साडीवाल्यांमुळे सलवार-कमीझ विकणार्या दुकानदारांना धंदा मिळत नाही..
८)साडी विकणार्या पुरुषांना कोट-टाय्,जीन्स अजिबात घालता येत नाही.
९) भारत साड्यांतील महसत्ता आहे तर आपले भारतीय साडीवाले 'ली','रॅन्गलर' इतक्या मोठे का नाहीत? इतकी वर्षे आपण फक्त साड्या का विकतो आहोत? अजूनपर्यन्त डॉकर्स्,ओल्ड नेव्हीसारखे एकही भारतीय प्रॉडक्ट आपण का बनवू शकलो नाही
१०)सगळ्या परदेशस्थ भारतीय स्त्रियांनी फक्त साड्या नेसायच्या ठरवल्या तर लिवाईस्,डेनिझनचा
सगळा माज एका फटक्यात उतरेल.
साडीवाले भरपूर साड्या विकतात. २) दुकानात बसून फक्त बायकांना बघायचे हेच तर नुस्ते काम असते. बाकी काय करतात?बस इतकंच??? देवा, परमेश्वरा, या लोकांना माहित नाही ते काय बोलताहेत. त्याना माफ़ कर.गोड गोड बोलायचे यात कसले आले काम ? ४)साड्या विकणार्या लोकांकडे भरपूर साड्या असतात त्यामुळे त्यांच्या बायका पैसे कसेही उडवतात. त्यामुळे महागाइ वाढते. पटोला,कांजीवरम,मैसूर सिल्क पासून पैठणी,डिझायनर साड्यांचे दर वाढण्यामागे कारण हे साडी विक्रेते आहेत. ५) तुमची काय मज्जा आहे एकदा सकाळी एक डिझायनर साडी,लग्नाचा शालू विकला की नुसते पैसे छापायचे असतात.आमच्या दुकानाचे झाहीर निमंत्रण. प्रत्यक्ष अनुभव घेऊन खात्री करावीभारत साड्यांतील महसत्ता आहे तर आपले भारतीय साडीवाले 'ली','रॅन्गलर' इतक्या मोठे का नाहीत? इतकी वर्षे आपण फक्त साड्या का विकतो आहोत? अजूनपर्यन्त डॉकर्स्,ओल्ड नेव्हीसारखे एकही भारतीय प्रॉडक्ट आपण का बनवू शकलो नाहीसंपादक मंडळास् येथे एक डोके खाजवनारि (कन्फ्यूज्ड) स्मायली टाकावी, असा आदेश देण्यात येत आहे.सगळ्या परदेशस्थ भारतीय स्त्रियांनी फक्त साड्या नेसायच्या ठरवल्या तर लिवाईस्,डेनिझनचा सगळा माज एका फटक्यात उतरेल.हा हा हा. ठ्ठो. अखिल भारतीय साडी विक्रेता संघाचे अध्यक्ष हभप बाबा योगिराज. ढूसक्लेमेर:- हे वाचून कुणाला राग आला तर मिपच्या टेम्पोत बसवून, फाट्यावर नेउन पोकळ बाम्बूचे फटके देण्यात येतील.