सोलापूर, तुळजापूर, पंढरपूर व विजापूर - सहलिबाबत मार्गदर्शन
सोलापूर, तुळजापूर, पंढरपूर व विजापूर असे दिवाळीनंतर पाच ते सहा दिवस फिरायचे ठरवीत आहे. मी ठाण्याला राहतो. सोलापूरला मुख्य मुक्काम ठेऊन आजूबाजूची ठिकाणे पाहणे सोयीस्कर ठरेल असे एकंदरीत वाटते. तर वाहतुकीच्या सोयी, राहण्याची व जेवणाची व्यवस्था तसेच वरील उल्लेखाव्यतीरिक्त आणखी कोणती पाहण्याची ठिकाणे आहेत का? याबाबत जाणकारांनी मार्गदर्शन करावे.
💬 प्रतिसाद
(106)
क
कोमल
Tue, 10/13/2015 - 11:03
नवीन
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Tue, 10/13/2015 - 11:09
नवीन
आमचा जाहिरातवाला आदिजोशी समजलो म्या. दातं काढायची गरज नै.
तू आलीस तर तेथे जेवू देऊ नका म्हणून सांगण्यात येईल.
- Log in or register to post comments
अ
अदि
Tue, 10/13/2015 - 12:05
नवीन
तुम्ही पार्टी देणार कि कय??
- Log in or register to post comments
व
विक्रान्त कुलकर्णी
Tue, 10/13/2015 - 08:28
नवीन
व्हेज हॉटेल आहे की नॉन-व्हेज आहे ?
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Tue, 10/13/2015 - 08:34
नवीन
प्योर व्हेज. नॉन खायचे असेल तर तुळजापूरला खावा.
- Log in or register to post comments
व
विक्रान्त कुलकर्णी
Tue, 10/13/2015 - 09:05
नवीन
तुळजापूरची मटण-भाकरी खायची आहे. तुळजापूरल कोठे चान्गली मिळेल ?
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Tue, 10/13/2015 - 09:11
नवीन
अशा लै डीट्टेल चौकश्या केल्या तर आमच्या सोलापुरात 'पैले ये तर बे." असे उत्तर द्यायची पध्दत आहे. ;)
आणि अर्थातच अश्या चौकश्या करुन ट्रीपा ठरवायची आमच्या हितं लोकांना सवय नाही. झाली तर झाली गैरसोय. सगळेच आपल्या मनासारखे अन प्लॅनड करायला आपण काय वीणा नायतर केसरी हावोत काय.
- Log in or register to post comments
व
विक्रान्त कुलकर्णी
Tue, 10/13/2015 - 09:15
नवीन
एकदम सहमत...
- Log in or register to post comments
न
नि३सोलपुरकर
Tue, 10/13/2015 - 12:03
नवीन
म्हणुन तर शांत होतो ना रे अभ्या ..बाकी चादरी बद्दल अभ्या शी सहमत आहे .
- Log in or register to post comments
भ
भीमराव
Tue, 10/13/2015 - 07:18
नवीन
माचनुर ला जाता आले तर पहा, सोलापुर मंगळवेढा रोड वरचं छान ठिकाण आहे
- Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा
Tue, 10/13/2015 - 09:19
नवीन
माचणुर कश्यासाठी प्रसिद्ध आहे ?
काय काय पाहण्यासारखे आहे तिथे ?
- Log in or register to post comments
भ
भीमराव
Tue, 10/13/2015 - 11:58
नवीन
देऊळ आहे तिथं नदीच्य काठावर, घाट पन मस्त आहे नदीवरचा. शांत ठिकाण आहे. गजबजाटात राहनारांना तर नक्कीच आवडेल.
- Log in or register to post comments
श
शामसुन्दर
Tue, 10/13/2015 - 09:22
नवीन
विजापुरला गेल कि पुढे अलमट्टि धरण पण आहे आणि जाण्यासाऱखे ठीकाण आहे
- Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा
Tue, 10/13/2015 - 10:10
नवीन
http://www.misalpav.com/node/31913
वर कंजुजुस यानी लिहिलेला पंढरपुर भटकंतीचा अप्रतिम वृतांत.
जरूर वाचा उपयोगी पडेल.
- Log in or register to post comments
क
कंजूस
Tue, 10/13/2015 - 10:43
नवीन
मी मुद्दामहून पंढरपूर आणि विजापूर - बदामी धाग्याबद्दल उल्लेख केला नाही.माझ्या मते धार्मिक सहलींत तुळजापूर पंढरपूर वगैरे भाविक असणे गरजेचे आहे कारण अस्वच्छता फार आहे. शिवाय कधीकधी दर्शनरांगा फार असतील तर तुमचे वेळापत्रक कोलमडू शकते.श्रद्धेचा बाजारही असतो.( त्याबद्दल कधीतरी नंतर . )शांतपणे दोन तीन ठिकाणेच पहा. दोन वर्षांपुर्वी सोलापुर एसी रिटाइरिंग रूम रू ५५०/ आणि साधी रू ३५०/ होती. मला विजापूर ट्रिप दर्म्यान भेटलेल्या एका डॅाक्टरने सांगितले रूम चांगल्या होत्या.अगदी सकाळी तुळजापुरला गेल्यास गर्दी अजिबात नसते.दुपारच्या वेळेस पंढरपूर करा. इथूनच( सोलापूर) सकाळी सहाला सुटणारी हुबळी इक्सप्रेस साडेआठला विजापूरला जाते.वरती रूमवरच असल्याने धावपळ होणार नाही.विजापूर पाहून ( गोलगुंबज, इब्राहिम रोजा)) संध्याकाळी परत येता येईल.
- Log in or register to post comments
क
कंजूस
Tue, 10/13/2015 - 10:51
नवीन
अलमट्टी धरण: विजापूर ते बदामी रेल्वेप्रवासात अलमट्टी धरण फुकट पहायला मिळते कारण रेल्वे ( सोलापूर- हुबळी) वीस मिनीटे कडेकडेधेच जाते.बस मात्र थोडी दुरून जाते.
सोलापुरी जडजड चादरी धुवायला फार त्रास पडतो त्यापेक्षा को-ओप्टेक्स च्या बेडशीटस वापरणे बरे पडते. सध्या तीस टक्के दसरा सेल आहे मुलुंड,मुंबईला.
- Log in or register to post comments
व
विक्रान्त कुलकर्णी
Tue, 10/13/2015 - 11:33
नवीन
कंजूस साहेब आपल्या माहिती बद्दल आभारी आहे. तसेहीकोत्ठेही मी खरेदीच्या पूर्ण विरुद्ध आहे. माझा अनुभव असा आहे की त्याच रेट्मध्ये मुम्बै मध्ये तीच वस्तु खत्रिशिर पणे मिळते.
- Log in or register to post comments
क
कविता१९७८
Tue, 10/13/2015 - 12:47
नवीन
पुलघम निश्चितच स्वस्त आहे ईथल्यापेक्षा
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Tue, 10/13/2015 - 12:56
नवीन
पुलगम हो. सिंघम सारखे नाही.
पुलघम असे लिहिले तर मालक पुढचे काम देणार नै.
- Log in or register to post comments
C
chetanlakhs
Tue, 10/13/2015 - 16:24
नवीन
सोलापूर मधील काही न चुकावावेत असे खाद्य पदार्थ:
१} भाग्यश्रीचा बटाटे वडा
२} पार्क किंवा सात रस्ता येथील डिस्को भजी
३} सुधा ची इडली / गणेश चा उत्तपा आणि डोसा
४} पार्क येथील भैयाची भेळ
५} सराफ कट्ट्याजवळ मनोज भेळ
६} कन्दले किंवा पुणेकर कामठे उसाचा रस
बाकी हॉटेल्स पुष्कळ आहेत आणि तिथे सगळ मिळते
- Log in or register to post comments
क
कविता१९७८
गुरुवार, 10/15/2015 - 18:59
नवीन
हे भेळ प्रकरण गाणगापुरला जाताना ट्रेनमधे खायला मिळाले , काही पदार्थ जे मुम्बईची स्पेशालिटी आहेत उदा. भेळ , पावभाजी , बटाटावडा , ईडली ई ती बाहेर काही केल्या चव येत नाही हे माझे वैयक्तीक मत. प्रत्येक ठीकाणी चव बदलते.
- Log in or register to post comments
न
नरेन
Wed, 10/14/2015 - 08:03
नवीन
वर ज्या काहि लोकानि सोलापुर रेल्वे स्टेशन च्या अस्वछ्तेबाबत लिहिलय ते सगळ खोट आहे आपण या सोलापुर ला मग कळेल किति स्वछ आहे ते. स्वछ्तेबाबत सोलापुर स्टेशन कायम जागरुक आहे अणि कायम सोलापुर ला त्याचि ट्रोफि मिळते आपण सोलापुर ला या अणि पाहा.
- Log in or register to post comments
द
दुर्गविहारी
Wed, 10/14/2015 - 08:10
नवीन
अक्कलकोट्ला गेलात तर एस. टी. स्टॅड जवळचा राजवाडा आणि छोटेखानी म्युझिअम पाह्ण्यास विसरु नका. स्टॅडपासून १० मिनीटावर आहे. मासनूरला गेलात तर जवळच असणारा औरन्ग्जेबाने बान्धलेला किल्ला जरुर पहा. नळ्दुर्ग किल्ला हि असेच न चुकवता येणारी जागा.
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Wed, 10/14/2015 - 08:22
नवीन
सोलापुरात सात रस्त्याजवळ डॉमिनोज आहे. भागवत पाशी अॅडलॅब आहे. मॅक्डी अन केएफसी तिथेच होतेय. बिगबाझार अन तळवलकर जवळ जवळ आहेत. चोकोलेड लै ठिकाणी आहे. ली रँग्लर लिनन क्लब वूडलँड पीएनजी अन लीवाईस एका लैनीत व्हीयापी रोडवर आहेत. वोल्व्होच्या लोफ्लोअर सिटीबस आहेत.
बाकी उरलेले सोलापूर जरासे गलिच्छ आहे. ;)
- Log in or register to post comments
प
प्यारे१
Wed, 10/14/2015 - 11:42
नवीन
डिस्को भजी ला डिस्को भजी का म्हणतात????
-खादाडखाऊपणसध्याउपाशी
- Log in or register to post comments
र
राघवेंद्र
Wed, 10/14/2015 - 15:26
नवीन
मिरची भजी अर्धवट तळून बाहेर काढायची. त्याचे उभे काप करायचे. (मिरची सुध्दा विभागली जाईल.) आणि ती परत तळायची. यात थोडा चाट मसाला सोबत खायची. बहुतेक दोनदा तळतात म्हणुन डिस्को असे म्हणतात.
- Log in or register to post comments
म
मांत्रिक
Wed, 10/14/2015 - 18:16
नवीन
असली भयानक तिखट भजी खाऊन माणूस डिस्को करंल नाहीतर काय? कुठंकुठं जळजळ होईल? ऑ?
- Log in or register to post comments
C
chetanlakhs
Wed, 10/14/2015 - 19:43
नवीन
जे मिरची भजी खावू शकतात त्यांना डिस्को भज्यानी काहीही होणार नाही..सोलापुरकारांसाठी मिरची भजी ही तिखट प्रकारात मोडत नाहीत..तिथली माणसे जास्त तिखट आहेत
- Log in or register to post comments
क
कंजूस
Wed, 10/14/2015 - 15:41
नवीन
कविता१९७८ फार उपयोगी माहिती दिली आहे.जो कोणी पुढे जाईल त्यास ट्रीप ठरवायला फारच उपयोगी पडेल.प्रवासाचा वेळ आणि सोयी कळल्याने तिथे मुक्काम करायचा अथवा पाहून परत यायचं यासाठी बारीकसारीक तपशील महत्त्वाचा असतो.
नरेन,कुठे गेल्यावर मी उगाच चौकशा करतो त्यामुळे सोलापूर रिटाइरिंग रूमबद्दल त्या डॅाक्टरकडून समजले.ते विजापुरात हेरिटेज हॅाटेलमध्ये (मयुरा अदिलशाही अनेक्स )राहिले होते रु अडिच हजारात हेरिटेज चांगले होते असे त्यांचे म्हणणे होते
- Log in or register to post comments
म
मनिमौ
Wed, 10/14/2015 - 18:11
नवीन
यांच्याशी पूर्ण सहमत. सोलापूर रेल्वे स्थानक अतिशय स्वच्छ आहे. रेल्वे फलाटावर पिचकाऱ्या अजिबात दिसत नाही.खाण्यासाठी अजुन एक ठिकाण म्हणजे कन्ना चौकातील पाणी पुरी..पवार बंधू यांचे साड्यांचे दुकान मोठे आहे. तसेच सोलापूर महापालिका कार्यालय इंद्र भुवन पाहणे पण चुकवू नका. बाकी अजून काही मदत हवी असल्यास सांगा.
- Log in or register to post comments
व
विक्रान्त कुलकर्णी
गुरुवार, 10/15/2015 - 07:30
नवीन
सोलापूर शहरात सिद्धेश्वर मन्दीर, तलाव व किल्ला या व्यतिरिक्त पहाण्यासारखी ठिकाणे कोणती आहेत ?
- Log in or register to post comments
C
chetanlakhs
Wed, 10/14/2015 - 19:49
नवीन
कडक भाकरी हा प्रकार तर सांगायचा राहूनच गेला..अफलातून चीज आहे..
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Wed, 10/14/2015 - 20:00
नवीन
नॉन व्हेज वाल्यासाठी शीग मटन. चकोले मटन भाजनालयातले (भोजनालयातले नव्हे).
शाकाहारीसाठी कडक भाकरी, शेंगा भाजी, घट्ट दही, मटकी फ्राय, पेंडपाला, हुग्गी, शेंगा पोळी, खवा पोळी हे सर्व हॉटेलात मिळतात.
ब्राह्मणी जेवणासाठी (तसा बोर्ड आहे) अनादी च्या दोन शाखा.
पूर्व भागात आंध्रा लोणचे, रायचूर (आंध्रा) भजी, चारु बोवा, हिरवे मटण, दालचा हे पण मिळते.
नाश्त्याला अगदी ५ रु डिशपासून ८० रु. पर्यंत ईडलीच्या व्हरायटी डिशेस मिळतात.
पुरी भाजी ही वेगवेगळ्या ४-५ प्रकारात मिळते.
पंजाबी खाऊ घालायला भरपूर ठिकाणे आहेत. तिथे जात नाही.
- Log in or register to post comments
व
विक्रान्त कुलकर्णी
गुरुवार, 10/15/2015 - 07:33
नवीन
शाकाहारी जेवण नक्कीच ट्राय केले जाईल.अनादी साधारण पणे कुठे आहे ?
- Log in or register to post comments
५
५० फक्त
गुरुवार, 10/15/2015 - 02:36
नवीन
अंमळ उशीर झाला इथं यायला....
असो...
आज रात्री डिट्टॅल मध्ये लिहितो...
- Log in or register to post comments
न
नि३सोलपुरकर
गुरुवार, 10/15/2015 - 06:13
नवीन
वेळ असेल तर पद्मशाली चौकात मिळणारी पाणी पुरी ट्राय करू शकता .
- Log in or register to post comments
म
मनिमौ
गुरुवार, 10/15/2015 - 16:47
नवीन
म्हणजे कुठला ?
एक अज्ञानी सोलापूरकर.
मनिमौ
- Log in or register to post comments
न
नि३सोलपुरकर
Sat, 10/17/2015 - 08:09
नवीन
पद्मशाली चौक हे पुर्वभागातलं, म्हणजे दत्तनगर मधील बालाजी मंदिरा जवळच .
- Log in or register to post comments
क
किसन शिंदे
गुरुवार, 10/15/2015 - 17:21
नवीन
बाब्बौ! चौकशीचा धागा शंभरीकडे वाटचाल करतोय.. विक्रांतकाका शेंगा चटणी आणा हो येताना ;)
@धन्या, कवा जायचं बे सोलापूरला?
- Log in or register to post comments
C
chetanlakhs
गुरुवार, 10/15/2015 - 18:30
नवीन
शतकी धागे ही काय फक्त पुण्या-मुंबईची मक्तेदारी आहे काय?
खादाडी बाबतीत पुण्यापेक्षा जास्त विविधता आहे सोलापुरात..
- Log in or register to post comments
र
राघवेंद्र
गुरुवार, 10/15/2015 - 19:08
नवीन
+१
- Log in or register to post comments
प
प्रभू-प्रसाद
गुरुवार, 10/15/2015 - 19:27
नवीन
मंगळवार पेठेतील डोसा विविध प्रकारात मिळतो.सेट डोसा,कट डोसा,दावणगिरी डोसा इत्यादी.खान्याच्या बाबतीत सोलापूर एक नंबर आणि इतर ठिकानंपेक्षा स्वस्त आहे.
- Log in or register to post comments
भ
भुमन्यु
गुरुवार, 10/15/2015 - 20:20
नवीन
बिजापुरला १ दिवसापेक्षा जास्त वेळ देउ नका. बिजापुर जवळ १८ किमि वर कुमुटगी म्हणुन जागा आहे तिला नक्कि भेट द्या. तिथे राजाचे विश्राम ग्रुह आहे, शेजारीच तलाव आहे. त्याकाळची शॉवर पद्धत बघता येईल.ए.एस.आय. चा कर्मचारी उत्तम माहिती देईल (तिथे गाईड नाही). बाकि कुठेही गाईड करु नका, फसवतात आणि काहिही विशेश माहिती देत नाहीत. उप्पुळी बुरुज वर एक म्हातारे आजोबा १०० घेउन बर्यापैकी चांगली माहिती देतात.बिजापुरला राहणार असाल तर हॉटेल पर्लचा विचार करु शकता तिथुन गोल घुमट पायी जाण्याइतपत जवळ आहे. ११०० रु/नाईट (आम्हाला सवलतित ७०० रु मध्ये मिळाली.
अजुन काही मदत असल्यास नक्की विचारा.
बदामि, ऐहोळे पट्टडकल जाणार असाल तर तिथली माहिती देऊ शकेन. ह्या भागात जाण्यापुर्वि कंजुस काकांचा हा धागा नीट वाचुन काढा... http://www.misalpav.com/node/28762
- Log in or register to post comments
व
विक्रान्त कुलकर्णी
Fri, 10/16/2015 - 07:07
नवीन
तुम्ही सन्गितल्याप्रमाणे हॉटेल पर्लचा नक्की विचार करेन.मला एक दिवस नळदुर्गला पण जायचे आहे. त्यासाठी कसे जावे लागेल ?
- Log in or register to post comments
भ
भुमन्यु
Fri, 10/16/2015 - 10:47
नवीन
माफ करा, परंतु नळदुर्गला विषयी काही माहिती नाही.
- Log in or register to post comments
भ
भुमन्यु
Fri, 10/16/2015 - 10:53
नवीन
१. जेवणात जर तिखट कमी खात असाल तर तशी पुर्व कल्पना द्या. ओव्हरऑल उत्तर कर्नाटकात तिखट जास्त खातात.
२. पर्ल हॉटेल जवळ कामत हॉटेल आहे, तिथेही जेवण चांगले मिळते.
- Log in or register to post comments
५
५० फक्त
Fri, 10/16/2015 - 02:52
नवीन
अबे अभ्या....
लईच दंगा झाला बे इथं..असो,
विक्रांत, या सोलापुरला जरुर या, स्वागत आहे. पुर्वीपासुनच सोलापुर हे एक तुम्ही लिहिलेल्या धार्मिक ठिकाणांचं केंद्र म्हणुन सोयीचं आहे. सोलापुरात येताय तर खाणंपिणं मजेत करा..
जमल्यास, दातेंच्या गणपतीचं दर्शन घेउन या, देवळाच्या बाहेरुन देखील दर्शनाची सोय आहे, आणि त्यांचं ऑफिस तिथं मागंच आहे, विनंती केल्यास ते देऊळ उघडुन दर्शन घेउ देतात.
पुर्वभागातलं, म्हणजे अक्कलकोटलनाक्याच्या अलीकडं बालाजीचं मंदिर आहे, तिथं जाउन या.
बा़ळीवेशीतलं मल्लिकार्जुन मंदिर आणि माणिकचॉकाजवळ्चं जैनमंदिर ही जस्ट ५-१० मिनिट जाउन यायची ठिकाणं आहेत. सिद्धेश्वर तलावाच्या बाजुचा घाटावरचा गणपती देखील असाच आहे. अजुन ह.दे.प्रशाला बघा, आजकालचे शिक्षणसम्राट तेवढ्या जागेत १२-१४ संस्था उभ्या करतील
खाण्यापिण्याचं म्हणाल तर खरंच सोलापुरसारखी ओरिजनल जागा नाही...
सातरस्त्याजव़ळ राजमहाल मध्ये इडली खायला जा, तिथं तेलमसाला वेगळा मिळ्तो चटणीवर घालुन खायला, तिथुन रंगभवनकडं येताना इंडिया टि हाउस आहे, फक्त चहा घेउन जरा लांब जावं लागतं. पुढं विजापुर वेशीत २-३ पायनापल कोल्डिंकची दुकानं आहेत ती ट्राय करा.
सावरकर मैदानावर पैलवान कडचं आइस्क्रिम खा, तिथुन पुढं बागेच्या गेटसमोर सिद्धेश्वरमध्ये चहा प्या इथं केटी घ्या, नुसता चहा नको.
वर सांगितलेली भैयाची भेळ हा आमच्या शाळेच ऑफिशियल पाणीपुरी वाला होता, अगदी शाळेच्या कॅम्पसमध्ये होता तो. डिस्कोभजी हा प्रकार ओरिजनल साखर पेठ आणि भवानी पेठेत मिळेल्,पार्कवर ठिक आहे.
चादरी बद्दल सगळ्यांनी सांगुन झालंय, पुर्वभाग राम मंदिराच्या जवळ चाटलांच शोरुम् आहे तिथं जाउन या.
व्हेज जेवणासाठी स्टेशनच्या थोडंसं पुढं सुगरण आहे, सोलापुरी शेंगाच्या पोळ्या आणि खवाच्या पोळ्या खाउन या तिथं. नाश्ट्याला, मधला मारुतीच्या जवळ अप्पा हलवाई कंडं एक पुरी भाजी आणि एक प्लेट कुंदा खाउन या.
स्वताचया गाडीनं जाणार असाल तर, सोलापुरच्या अलीकडं लांबोटीला चिवडा, कुंदा आणि बाकरवड्या घेउन या. फक्त दुधातला चहा ही तिथली स्पेशलिटि आहे.
अजुन उद्या...
- Log in or register to post comments
व
विक्रान्त कुलकर्णी
Fri, 10/16/2015 - 07:10
नवीन
एवढे सगळे पदार्थ खायचे म्हणजे सोलपूरातील मुक्काम वाढवावा लागेल असे दिसते. नळदुर्गला कसे जायचे व प्रवास किति वेळाचा लागेल याबद्दल काही माहिती मिळेल का ?
- Log in or register to post comments
अ
अभिजितमोहोळकर
Fri, 10/16/2015 - 04:20
नवीन
सोलापूर म्हंजे मजाच मजा. भरपूर खाणं आणि चित्रपट बघणं. जर का सुभाष चौकातल्या कुठल्या हॉटेलात राहिलात तर बर्याच गोष्टी पायी फिरून बघता येतील. किल्ला समोरच आहे. बाजारपेठा, पार्क मैदान, सिद्धेश्वर देऊळ, ह्दे प्रशाला, संगमेश्वर कॉलेज, वारद बंगला अर्थात ईंद्रभुवन अर्थात सोलापूर (म्?)न.पा.कार्यालय, आणि भरपूर टॉकिजेस.
सोलापूर म्हंजे खायला पर्वणी. सुप्रजा, स्वाद,नट्स चाट चा ठेला पण मस्त. त्याच्यानंतर दत्ताच्या देवळाजवळ आलं की आनंदाश्रम होतं. तिथला डोसा उर्फ दोसाई अफलातून होता.किल्ल्यासमोर रस्त्यावर्च्या गाड्यांवर चटणी सँडवीच प्रचंड भारी!!! आता मिळतं का कल्पना नाही. पूर्वी हाटेलातली जेवणं पण मस्त होती, अजूनही बर्यापैकी घरगुती चव टिकून आहे. अर्थात मागच्या ३ वर्षातले बदल माहीत नाहीत. पार्क मैदानाजवळ दूध पंढरीचे पेढे आणि फ्लेवर्ड दूध जरूर प्या.बाजारपेठेत दाणे खात खात भटका. लक्ष्मी मंडईत जा. माणिक चौक, सहकार पेठपर्यंत पायी फिरा.
पूर्वी मी लकी (बंद झालं),गदग ग्रँड (मजा गेली आता), मुक्ताई मिठाई इ. ठीकाणी मनमुराद खाल्ले आहे. तेंव्हा सकाळी सकाळी गरम गरम ईडली, द्वाशी आणि वडा सांबार देणारी एक गाडी लागायची. तूफान मजा यायची सकाळी सकाळी ते खाताना.
मस्त शहर आहे आणि मस्त लोकं आहेत.
- Log in or register to post comments
व
विक्रान्त कुलकर्णी
Fri, 10/16/2015 - 07:12
नवीन
सगळ्यांच्या प्रतिसादावरुन शहर व लोकं मस्त आहेत याची खात्रीच पटली.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- ›
- »