Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

सोलापूर, तुळजापूर, पंढरपूर व विजापूर - सहलिबाबत मार्गदर्शन

व
विक्रान्त कुलकर्णी
Mon, 10/12/2015 - 11:04
💬 106
सोलापूर, तुळजापूर, पंढरपूर व विजापूर असे दिवाळीनंतर पाच ते सहा दिवस फिरायचे ठरवीत आहे. मी ठाण्याला राहतो. सोलापूरला मुख्य मुक्काम ठेऊन आजूबाजूची ठिकाणे पाहणे सोयीस्कर ठरेल असे एकंदरीत वाटते. तर वाहतुकीच्या सोयी, राहण्याची व जेवणाची व्यवस्था तसेच वरील उल्लेखाव्यतीरिक्त आणखी कोणती पाहण्याची ठिकाणे आहेत का? याबाबत जाणकारांनी मार्गदर्शन करावे.

प्रतिक्रिया द्या
30738 वाचन

💬 प्रतिसाद (106)
ज
जेपी Fri, 10/16/2015 - 06:41 नवीन
वाखुसा.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Fri, 10/16/2015 - 07:13 नवीन
सोलापुरकरांनो चांगली माहिती सांगितलीन की.असं आहे की जोरदार प्रमोशन झालं पाहिजे एकेका जिल्ह्याचं.एक सांगायचं राहिलंच की चादरी इतकंच महत्त्वाची शाळूची ( पांढराशुभ्र चमकदार मऊ जोंधळा , यावरूनच शेतं पिकली मोत्यावानी कल्पना आली ) भाकरी,तीन चार सुक्या चटण्या.कारळे शेंगदाणे तीळ. वर करडईचं तेल. मला मनपा इमारत फार आवडली होती.
  • Log in or register to post comments
व
विक्रान्त कुलकर्णी Fri, 10/16/2015 - 07:25 नवीन
प्रत्येक जिल्ह्याचे असेच जोरदार मार्केटिंग व्हायला हवे.
  • Log in or register to post comments
द
दुर्गविहारी Fri, 10/16/2015 - 14:44 नवीन
सोलापूर हैद्राबाद रोडवर नळदुर्ग किल्ला आहे. खालील लिन्कवर तुम्हाला नळदुर्गची माहिती मिळेल http://ourosmanabad.blogspot.in/2010/03/naldurg-fort.html
  • Log in or register to post comments
र
राघवेंद्र Fri, 10/16/2015 - 15:59 नवीन
नळदुर्ग -तुळजापूर असा रस्ताही आहे व बस ही पुष्कळ आहेत. पावसाळ्यात नळदुर्ग च्या किल्यात धबधबा असतो आता माहिती नाही. जाताना अणदूर येथेही खंडोबा मंदिर आहे. सोलापूर -हैदराबाद रोड -नळदुर्ग - तुळजापूर असे पण जाऊ शकता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दुर्गविहारी
प
प्रभू-प्रसाद Fri, 10/16/2015 - 15:59 नवीन
सोलापुरकर मन्ड्ळी बरीच आहेत मिपावर. छान कट्टा होइल सोलापुरात.अभ्याभाऊ घ्या पुढाकार.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा