मोहरम : माहिती हवी आहे
आजपासून मोहरम सुरु झाला. मोहरम हा एक अत्यंत महत्वाचा इस्लामिक सण / उत्सव असावा असे वाटते. अनेक वर्षे मध्यपूर्वेत काम करताना तिथे कधी लोकांना हा उत्सव करतांना पहिले नाही. तिथे दोन ईद, प्रेषित मुहम्मद जन्मदिन, इस्लामिक नव वर्ष इतक्याच इस्लामिक सणांना सरकारी सुटी असायची. इथे दिसतात त्याप्रमाणे मोहरमच्या मिरवणुका वगैरे कधी दिसल्या नाहीत. म्हणून या उत्सवाविषयी थोडे कुतूहल जागृत झाले.
या उत्सवाचे औचित्य काय? तो भारतातच का केला जातो? यामागे काही धार्मिक भावना आहे, इतिहास कि फक्त सामाजिक उत्सव उर्मी? याविषयी कृपया माहिती द्यावी.
💬 प्रतिसाद
(128)
D
dadadarekar
Sat, 10/17/2015 - 04:00
नवीन
उदा. गुरुदेव रविंद्रनाथ टागोर , छत्रपती शिवराय , समर्थ रामदास इ इ
दाढी न वाढवणारे मुसलमानही असतात.
पाच वेळच्या नमाजाबद्दल बाकीच्यानी का विचारायचे ? बाकीच्याही दहा वेळा पूजा करावी.
ख
खटपट्या
Sat, 10/17/2015 - 04:49
नवीन
दादा साहेब. माझा दाढीला विरोध नाही. आणि नमाजलाही नाही. कामाच्या ठीकाणी जर तुम्हाला दाढीचा त्रास होत असेल तर थोडी ट्रीम करुन घ्यायला काय हरकत आहे? अरब मुसलमानच आहेत ना? ते जर व्यवस्थीत कोरुन दाढी ठेवत असतील तर भारतातील आणि पाकीस्तनातील मुसलमान का बरे अजागळासारखी दाढी ठेवतात.
पाच वेळा नमाजला जा की, नाही कोण म्हणतोय पण काम सोडून नव्हे. फक्त नमाजाची वेळ झाली म्हणून भर मीटींग मधून उठून जाण्यात काय हशील? एखाद दीवशी पाच वेळा नमाज नाही केला तर काय आभाळ कोसळणार का?
एखादे प्रायोरीटी १ चे तिकीट्/काम असलल्यास ते सोडून जर नमाजला गेला आणि त्यामुळे क्लायंट संतापणार असेल तर काय करावे? आधि पोटोबा(पोटासाठी लागणारे काम) आणि मग विठोबा हे कधी लक्षात येणार. आणि मग हेच सर्व करायचे असेल तर स्वतःचा व्यवसाय चालू करा. जीथे सर्व धर्माचे लोक कामाला येतात अशा मोठ्या कॉर्पोरेट हाउस मधे असा हट्टीपणा कसा चालेल. आणि मग जर कोणी बोलले की आम्ही मुसलमानांना नोकर्या देत नाहीत तर मग गळे काढायचे.
उद्या मी भगवी कफनी घालून अंगाला भस्म लाउन कामावर गेलो तर सुरक्षारक्षक मला आत तरी घेतील का? प्रत्येकाने आपापला धर्म त्याच्या घरी ठेउन यावा एवढेच माझे म्हणणे.
स
सुबोध खरे
Sat, 10/17/2015 - 06:47
नवीन
खटपट्या शेट
त्या दादा दरेकरानी हिरवा चष्मा लावला आहे त्यामुळे त्यांना कोणतीही लाल, भगवी, पिवळी चीज सुद्धा काळीच दिसते.( रंगमिश्रणाचे परिणाम). त्यांच्या नादाला कुठे लागता. ते सर्व संपत्ती आम्हाला देऊन टाकून पुण्य मिळवायला हाजला जाणार म्हणून गर्जना करून झाल्या पण तेथे होणार्या लाथाळ्या आणि चेंगराचेंगरीत माणसे मेली ते पाहून त्यांनी शेपूट घातलेले दिसते.
अतिरेकाचे उत्तम उदाहरण म्हणजे पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल झिया उल हक हे ( स्वघोषित) राष्ट्रपती असताना त्यांनी राष्ट्राच्या आणि लष्कराच्या इस्लामीकरणाचा फतवा काढला होता, त्यामुळे लष्करी अधिकार्यांना दिवसात पाच वेळा नमाज पढण्यासाठी वार्षिक गोपनीय अहवाल( ACR - annual confidential report) मध्ये गुण होते.आणि कोण नमाज पढतो आहे यावर "लक्ष" ठेवले जायचे. यामुळे लष्कराच्या कामकाजाच्या वेळेत तीन वेळेस लष्करी अधिकार्यांना आपला गणवेश आणि बूट उतरवून झगा घालायला लागायचा आणि नमाज पढायला लागायचा. आमचे एक स्नेही आणि वरिष्ठ admiral बंगारा यांनी पाकिस्तानात लष्कराचे दूत म्हणून गेले असतानाची हि आठवण सांगितली.त्यात झाडून सगळे लष्करी अधिकारी वैतागलेले होते. अतिरेक किती होऊ शकतो त्याचे हे उदाहरण आहे.
मी जे एक म्हणतो कि धर्म हा घरातच बंदिस्त असायला हवा तो यासाठीच. सार्वजनिक जीवनात एकच धर्म तो म्हणजे भारत धर्म किंवा राष्ट्र धर्म
ख
खटपट्या
Sat, 10/17/2015 - 15:54
नवीन
+ बाडीस डॉ़क
न
नि३सोलपुरकर
Sat, 10/17/2015 - 13:56
नवीन
नसिरुद्दीन शाह "खुदा के लिये" या चित्रपटात म्हणतो
, 'दिन'मे दाढी है ,दाढी मे 'दिन'नही.
द
दत्ता जोशी
Sat, 10/17/2015 - 06:22
नवीन
सगळे भारतीय मुसलमान इतके कट्टर नाहीतच.तसेच सगळेच कन्व्हर्ट केले गेलेलं नाहीत तर तत्कालीन मुस्लिम सरदार इत्यादींच्या पिढ्या आणि वाढत गेलेली वंशावळ आहे. अर्थात यांच्या वंशात सरमिसळ झालेली आहेच. मला वाटते कि दाखीनेत त्यातल्या त्यात केरळात हि कन्व्ह्र्टेड मंडळी जास्ती असावीत. केरला हे अगदी अलीकडच्या काळापर्यंत एक शांतता प्रिय राज्य म्हणून ओळखले जायचे. तिथे मुस्लिम क्रिश्चन आणि हिंदू अगदी मिळून मिसळून राहायचे. पण आज काल तिथेही भयंकर कट्टरता फोफावली आहे. मा. ए पी जे अब्दुल कलाम हे कट्टर नाहीत. उलट त्यांनी इसम राहण्याबरोबरच हिंदू तत्वज्ञानाशी खूप जिव्हाळा दाखवला. अब्दुल कलमांची भगवद गीता तोंड पाठ होती हे बर्याच जणांना माहिती असेलच.
द
दत्ता जोशी
Sat, 10/17/2015 - 06:31
नवीन
मोठा प्रोब्लेम हा आहे कि शिकवण आणि त्यातून येणारा दृष्टीकोन. शाहरुख खान ने पठाण असल्याचे अभिमानाने सांगतो . अस बाबा. आमची अडचण नाही पण तुला जे काही मिळालेय ते या भूमी ने दिले आहे. तू याच मातीतला म्हणून तुला तिचा अभिमान आधी असुदे. इतकेच माझे म्हणणे. माझे कोणीतरी पूर्वज पठाण होते म्हणून माझ्या निष्ठा आणि अभिमान अफगाण अरबस्थानाशी जोडला गेला, तर प्रोब्लेम होतो. अफगाणिस्तानात असतास तर कुठेतरी ट्रक चालवत बसला असतास. ओवेसी डोक्यात जातो याच साठी तुझे पूर्वज काही काळासाठी एका तुकड्याचे शासन करते होते म्हणजे हिंदुस्तान तुझ्या तलव्याखाली नाही आला.
D
dadadarekar
Sat, 10/17/2015 - 06:44
नवीन
पठाण असल्याचा अभिमान बाळगला तर लगेच तो अफगाणिस्तानचाझाला काय ?
पठाण लोकांचा ऋग्वेदात पख्तुन असा उल्लेख आहे.
...
ताकात अफगाणी हिंग घालून पिणारा व अब्दालीचा फ्यान दादू पठाण .
द
दुर्गविहारी
Sat, 10/17/2015 - 12:17
नवीन
कुटल्या तरी मशीदीत जाउन नाव आड्नाव बद्लून घ्या. तेवडातरी हिन्दुत्वाचा टिळा कशाला.
दुधात केशर घालुन पिणारा व सम्भाजीराजान्चा फॅन
D
dadadarekar
Sun, 10/18/2015 - 14:02
नवीन
आज एक नवीन अफगाण फ्लेवर मिळाला.
अमूल अफगाण फ्रूट आइस्क्रीम !
मस्त !
द
दत्ता जोशी
Sun, 10/18/2015 - 19:05
नवीन
छ्या!! काय ते अमूल, हिंग, ताक....अफगाणिस्तानचा जगप्रसिद्ध प्रोडक्ट घेत कि नाही?
प
प्रभाकर पेठकर
Sun, 10/18/2015 - 16:12
नवीन
इथे मस्कत मध्येही दाढी वाढविणारे, कोरीव दाढी ठेवणारे आणि दाढी न ठेवणारे असे अरब दिसतात.
दाढी न करणारे, फुटभर वाढू देणारे हे कुराण पठणाला वाहिलेले मौलवी बनणारे धर्म प्रसारक असतात.
बाकी सामान्यांमध्ये कोरीव दाढी ठेवणारे आणि न ठेवणारे हे आधुनिक प्रथा पाळणारे (शिक्षण, नोकरी आणि सर्वसामान्यांचे जीवन जगणारे) असतात.
शिया पंथियांमध्ये दाढी न ठेवणार्यांचे प्रमाण अधिक दिसते.
द
दत्ता जोशी
Sun, 10/18/2015 - 19:58
नवीन
अवांतर : मस्कत मधले अरब कुवैत किंवा सौदी सारखे नाहीत. ओमान मध्ये इन जनरल भारतीय लोकांना अजून मान आहे.
माझा एक मित्र सौदीत काम करायचा. तो सांगायचा कि दर शुक्रवारी नमाजाच्या वेळी मौलवी /मुथाव्वा फिरत असायचे आणि जो कोणी नमाजाच्या वेळी बाहेर फिरत असेल त्याला पकडून शिक्षा करायचे. खरं आहे का हे?
ब
बिपिन कार्यकर्ते
Mon, 10/19/2015 - 08:20
नवीन
हे वाचा...
माझं खोबार : http://www.misalpav.com/node/4516
ब
बिपिन कार्यकर्ते
Sun, 10/18/2015 - 18:38
नवीन
दाढी हा तसा धर्माचा भाग नाही. मात्र ती धार्मिकतेचा भाग मात्र जरूर आहे.
मुसलमानांसाठी कुराण हे सर्वात महत्त्वाचे आहे. तसेच, हदिथ आणि सुन्नाह असे अजून दोन प्रकार आहेत. हदिथ किंवा सुन्नाह म्हणजे पैगंबरांनी वेळोवेळी केलेल वर्तन अथवा त्यांनी बोललेली वाक्ये इत्यादींवरून 'काय आदर्श असेल?' 'काय बरोबर अथवा चूक असेल?' हे ठरवण्याची आणि इस्लामी न्यायशास्त्रात मान्य असलेली एक पद्धत. हदिस आणि सुन्नाह हे जवळ जवळ एकच प्रकार आहेत. काही सूक्ष्म भेद आहेत.
या मागे भावना ही आहे की, पैगंबर जसे वागत किंवा बोलत, तसेच आपण केले तर आपल्या हातून काही पाप / चूक (गुनाह) होणार नाही. त्यामुळे, पैगंबर दाढी ठेवत, त्यांचे कपडे घोट्याच्या वर असत, तर आपणही तसे करावे, ही भावना धार्मिक मुसलमानांच्यात असते. शिया व सुन्नी, दोघेही दाढी ठेवतात. मात्र सुन्नींमध्ये ती जास्त दिसते.
दीडदोनशे वर्षांपूर्वी सौदी अरेबियाच्या वाळवंटात वहाबी पंथ / विचारधारा उदयाला आली. या पंथाच्या विचारांनुसार दाढी वाढविणे आवश्यक आहे. आणि ती कापत नाहीत. अनिर्बंध वाढ होऊ दिली जाते.
ब
बिपिन कार्यकर्ते
Sun, 10/18/2015 - 18:41
नवीन
दाढी आणि अमेरिकेचा व्हिसा यावरून मला माझ्या ’माझं खोबार’ या लेखमालेत लिहिलेल्या या किश्श्याची आठवण झाली. :)
http://www.misalpav.com/node/6646
द
दत्ता जोशी
Sat, 10/17/2015 - 06:47
नवीन
हिंदू लेचापेचाच असतो हे चित्र आधी तुम्ही पुसून टाकणे महत्वाचे आहे. हिंदू सहिष्णू आणि शांत असतो. म्हणून तर हिंदूंनी कधीच कुणावर आक्रमणे करून बळजबरीने राज्ये बळकावणे, धर्मांतरण इ. केले नाही. हिंदू लेचा पेचा नाही म्हणून तर घणाघाती आक्रमणे होवून सुधा हिंदुस्तान चा इस्लामिस्थान, अरबस्थान , पठाणीस्थान करता आला नाही. हे झाले नाही याचे कारण म्हणजे इस्लामची सहिष्णुता आणि इस्लाम चा हिंस्र पणा म्हणजे हिंदू अत्याचारांचा परिपाक हे ऐकून कंटाळा आलाय. आणि इथे विषय तो नाहीये.
ह
हुप्प्या
Sat, 10/17/2015 - 18:30
नवीन
पूर्वी अल्पसंख्य होते म्हणून आणि आता जाणीवपूर्वक कट्टरता जोपासली जात असल्यामुळे लोकांमधे ही पराकोटीचा धार्मिकपणा येतो असे मला वाटते.
१९७९ मक्केत झालेल्या उठावाचा परिणाम म्हणून सौदी अरेबिया सरकारने मोठ्या प्रमाणात पैसे आणि मनुष्यबळ पुरवून आपल्या कडव्या इस्लामचा प्रचार करण्याची मोहीम घेतली. अफ्रिका आणि आशिया ह्या भागात जिथे इस्लामचे स्वरुप सौम्य झाले होते अशा ठिकाणी असे प्रचारक पाठवले. कित्येक स्थानिक धर्मगुरुंना सौदी अरेबियाला बोलावून प्रशिक्षित केले गेले. तेव्हापासून चालवलेल्या मोहिमेची फळे मिळू लागली आहेत. ह्या बिगरअरब देशातील मुस्लिम कट्टरता पद्धतशीरपणे वाढवत नेलेली आहे. मलेशिया, इंडोनेशिया ह्या भागात रामायण वगैरे सादर करण्यात मुस्लिमही असायचे पण आता त्यांना ते हराम आहे वगैरे शिकवले जाते. त्यामुळे हे देशही कट्टर बनत आहेत. अलीकडे झालेल्या बाँबहल्ल्यावरुन हे दिसत आहे. भारतही ह्या प्रकारातून सुटलेला नाही. झकीर नाईक नामक इस्लामचा पाईक शुद्ध वहाबी पंथाचा इस्लाम शिकवताना दिसतो. इथल्या सुफी परंपरा, इथले दर्गे आणि पीर ह्यांना हराम म्हणतो.
ह्यामागे अफाट पैसा हेही कारण आहे. सौदी अरेबियाने आपला कट्टरतावाद निर्यात करण्यामागे ही पीडा आपल्या देशात नको असा काही विचार केला असावा.
क
कैलासवासी सोन्याबापु
Sat, 10/17/2015 - 18:45
नवीन
बहुदा त्यांस जमात किंवा मोर स्पेसिफिकली तब्लीग़ी जमात असे म्हणतात बहुतेक.
ब
बिपिन कार्यकर्ते
Sun, 10/18/2015 - 17:56
नवीन
तुम्हाला खरोख्रच हे प्रश्न पडतील इतके 'अगदीच हे' तुम्ही असाल असे तुमच्या आजवरच्या इथल्या वावरावरून वाट तर नाही ब्वॉ! :)
त
तर्राट जोकर
Sun, 10/18/2015 - 21:05
नवीन
तुमालाच कळलं बगा, नायतर बाकीचे बसलेत कुटत... जाउंदे.
रोख फक्त इथे होता. : त्यांच्या धर्मातच तशी शिकवण आहे. आपल्या धर्मात तशी शिकवण नाही.
एक चुकीची समजूत की हिंदू एवढे काय हिंस्त्र-वैगेरे नाहीत. जातीपातीतून घडणारे हत्यासत्र, धिंडी, इत्यादी बघितले तर हिंदूंही कट्टर-हिंस्त्रपणात मागे नाहीत हे समजून येतं. जर हिंदू धर्म एवढाच ग्रेट, शांतीप्रिय, सहिष्णु वैगेरे होता तर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्म का सोडला? शैव-वैष्णवांचे रक्तरंजित इतिहास कसे विसरले जातात? कि फक्त दुसर्या धर्माचे लोक मारले की तेव्हाच धर्म हा कट्टर-असहिष्णु-हिंस्त्र समजला जातो?
मुद्दा होता की धर्मात असलेल्या शिकवणुकीने खरंच फरक पडतो का? माणुस कट्टर व हिंस्त्र व्हायला नक्की काय लागत असावं? धार्मिक शिकवणुकीने माणसे मारेकरी झाली असती तर काही हिंदू संघटना तोडीस तोड ब्रेनवॉशिंग करत आहेत, त्यांचेही रिझल्ट्स दिसले असते. जर तसे नसेल तर डीनएमधे लोचा असला पाहिजे. कुठेतरी तर या प्रश्नाचे उत्तर असेल जे मी जेन्युइनली शोधत आहे. म्हणून खरोखर प्रश्न विचारला होता. कुत्सितपणे किंवा उपरोध म्हणून नाही. त्यासाठी दुसरे आयडी आहेत. तर्राट असलो तरी कळतं कुठे काय बोलायचे ते....!
ब
बिपिन कार्यकर्ते
Mon, 10/19/2015 - 08:23
नवीन
चिल्ल! मी गंमती गंमतीत बोललो हो ते. सविस्तर बोलायला आवडेल. वेळ मिळेल तसा प्रतिसाद देतो.
तोवर हे वाचा...
http://www.misalpav.com/node/6046
http://www.misalpav.com/node/6646
त
तर्राट जोकर
Mon, 10/19/2015 - 08:41
नवीन
पूर्वी वाचलेलं, आता परत वाचतो.. धन्यवाद!
द
दत्ता जोशी
Mon, 10/19/2015 - 09:31
नवीन
गाडी कोणत्या ठेस्नाला जाणार ते माहिती होतं आम्हाला. उगीच वैचारिक वगैरे ग्राऊण्ड तयार करायची काय गरज? लिहायचे ना बिनधास्त. हिंदू लेचा पेचा नाही, सहिष्णू आहे इतकाच स्पष्ट केले फक्त. बाकी तुमची वैचारिक टिमकी चालु द्या.
---(संपादित)----
D
dadadarekar
Mon, 10/19/2015 - 09:47
नवीन
खैबर्खिंडीतून बाकी लोक आत आले. त्याच खिंडीतून बाहेर जाऊन प्रदेश जिंकायला हिंदूना कोणी नको म्हटले होते का ?
हा सहिष्णूपणा नव्हे , आळशीपणा आहे.
द
दत्ता जोशी
Mon, 10/19/2015 - 09:52
नवीन
काय दादा, आता आळशीपणा सोडू म्हटलं तरी तुम्हाला आवडत नाही. असं कसं!
प
प्यारे१
Mon, 10/19/2015 - 10:02
नवीन
खिक्क्क!
मस्ती करा रे, सापडू नका फक्त. ;)
त
तर्राट जोकर
Mon, 10/19/2015 - 10:10
नवीन
श्रीयुत दत्ता जोशी,
ह्या शिक्केमार वृत्तीचा संसर्ग फार वाइट हो. तस्मात् कुणास काय बोलतो आहोत याचा पाचपोच ठेवा.
आपणास माझ्याबद्दल शष्प माहित नसतांना मला मियां वैगेरे संबोधणे आपल्या महान सहिष्णु संस्कारांची पातळी दर्शवते. यापुढे असल्याप्रकारे संबोधन केल्यास वैयक्तिक अपमान केल्याप्रकरणी संपादकांकडे तक्रार केली जाईल एवढे लक्षात घ्या.
तसेही प्रतिसाद तुम्हाला नसून बिपिन कार्यकर्ते यांना होता. चर्चा करायची असेल तर पातळी योग्य ठेवा.
राहता राहिला हिंदू लेचापेचा वा कसा आहे हे तुम्ही मला सांगण्याचा प्रश्न तर... हिंदू बलवान राज्यकर्त्यांप्रति सहिष्णु तसेच असहाय्यांप्रति कट्टर, असहिष्णु आहे. तुम्ही नुसतं हिंदू-मुस्लिम, हिंदू-मुस्लिम एवढंच बघत बसला आहात. आपल्याच हिंदूंमधे आपल्याच बांधवांवर किती अत्याचार झाले हे आपल्यास ठावूक असल्याचे दिसत नाही कारण त्याबद्दल आपणास काही रुची दिसत नाही. त्यामुळे कोण कसं आहे याबद्दल आपले कूपमंडूक विचार स्वयंमनोरंजनास उपयुक्त आहेत, त्याने सत्य सिद्ध होत नाही. याबद्दल अधिक माहिती हवी असेल तर जरूर कळवा.
द
दत्ता जोशी
Mon, 10/19/2015 - 12:20
नवीन
"यापुढे असल्याप्रकारे संबोधन केल्यास वैयक्तिक अपमान केल्याप्रकरणी संपादकांकडे तक्रार केली जाईल एवढे लक्षात घ्या."
शुभेच्छा. मी अडवू शकत नाही.
प्रत्येक धाग्यावर हिंदू , हिंदू संस्कृती वर घसरून ज्या निरर्थक टिपण्या करणे हि प्रवृत्ती विशाल आणि संस्कृती उच्च आहे का? विषय काय होता आणि तुमची प्रतिक्रिया काय. चर्चाच करायची होती तर आंबेडकर, शैव वैष्णव, हिंदू- जीन्स आणि काय काय बिनकामाचे लिहायचे कारण नव्हते. तुमची हिंदू संस्कृतीच्या सुधारणेची कळकळ बघितल्यावर दुसरे कोणतेही विशेषण मला योग्य वाटले नाही. प्रत्येक धाग्यावरील तुमची "टिपिकल" मनोवृत्ती बदला आधी. तरच चर्चा होऊ शकेल. चर्चा म्हणजे उगीच आपल्या दुषित आणि विद्वेषी वृत्तीचे प्रदर्शन नव्हे हे लक्षात घ्या. तळमळ आणि मळमळ यातला फरक समजतो वाचकांना.
त
तर्राट जोकर
Mon, 10/19/2015 - 13:10
नवीन
मिस्टर जोशी,
सिलेक्टीव रीडींग सोडाल तर बरं होइल. माझे बिका यांना असलेले दोन्ही प्रतिसाद वाचा. त्यात कुठे हिंदूधर्मावर निरर्थक टिप्पणी केली हे सांगू शकाल?
पहिल्या प्रतिसादात फक्त मुस्लिम धर्म व धर्मामुळे येणारा कट्टरवाद चर्चेस घेतला आहे. त्यात धर्मांतरामुळे कट्टरवाद उफाळतो का कि तो व्यक्तित आधीपासूनच असतो हा प्रश्न होता. त्यात हिंदूंवर घसरून वैगेरे कुठे दिसले ते कळले नाही. तुम्हाला लेचापेचा हा शब्द फारच लागलेला दिसतोय. त्याबद्दलपण एक खुलासा करतो. सुमारे ६००-७०० वर्षे मुस्लिमांची आक्रमणे होत रहिली, राज्य होत राहिली. काय करून घेतले हिंदूंनी. त्यांना जाग यायला ६०० वर्षे जावी लागले जेव्हा शिवाजीमहाराज प्रकट झाले. तत्पूर्वी काय चाललं होतं हे तुम्हास जास्त ठावूक कारण मुस्लिम अत्याचार कहान्या तुम्हास मुखोद्गत आहेत असं दिसतंय. तेव्हा हिंदूंनी काहीच कसं केलं नाही हा विचार कधीच आपल्या संस्कारी मनात येत नाही. पण मुस्लिमांनी कसे आमच्यावर अत्याचार केले ह्या टिप्पीकल सासु-सुना छाप रडगाणी कायम गात असता. तेव्हा हिंदू आपले कट्टर जातपातवाद, पंथ-वाद, धर्मप्रचार-वाद-विवादचर्चा यात मश्गूल होते, त्यांना परकिय आक्रमणांना तोंड द्यायला जमले नाही. हे कबूल का करत नाही? आक्रमकांनी सौजन्य दाखवावे अशी तर्कदुष्ट विचारसरणी नेहमीच मुस्लिम आक्रमकांबद्दल बोलतांना इथे दिसून येते. पण सौजन्य न दाखवणार्या आक्रमकांना इथून हाकलून लावायला हिंदूंना कुणी अडवले होते हे काय कोणी बोलत नाही. कुणीही येतो अन् हिंदूंवर राज्य करून जातो यात हिंदूंचा सहिष्णुपणा आहे की भेकड, अल्पसंतुष्टी वृत्ती आहे हे सांगावे. मुंबै स्पिरीट म्हणून जे मिरवल्या जाते तेही याच सहिष्णुपणाच्या पठडीतले. यावर तुम्ही काय उत्तर द्याल तेही माहित आहे. त्यामुळे उत्तर द्या, मग पुढे अजून बोलायचे आहेच.
दुसर्या प्रतिसादात धर्म हे कारण नसून माणसांच्या वृत्तीतच हिंस्त्रपणा आहे हे नमूद केले आहे. लोक सोयिस्करपणे धर्माला जोडून जो अत्याचार चालला आहे त्याकडेच लक्ष वेधतात. इतरत्रही बरेच प्रकार सुरू असतात. त्याबद्दल थोडा खुलासा होता. हुप्प्या व इतरांनी माहितीपूर्ण प्रतिसादही दिलेत. जे माझ्या प्रश्नांच्या रोखाने अगदी योग्य होते. तिथे आपण हिंदूंबद्दल निरर्थक टिप्पणी आहे असे कसे म्हणता? शैव-वैष्णव-आंबेडकर हे हिंदू धर्माच्या बाबतीत बिन्कामाचे आहे हे आपले वक्तव्य आहे ते तद्दन बेफिकिरीतून व अज्ञानातून तसेच हिंदूधर्माच्या पराकोटीच्या चुकिच्या अभिमानातून आले आहे. आपल्याच धर्माबद्दल आपणांस किती तोकडी समज आहे हेही उघड झाले, पुराण-वेद्,पोथ्या-आर्त्या, मंदीर-मठ म्हणजेच हिंदू धर्म अशी जी आपली समजूत झाली आहे त्यास माझ्या प्रतिसादांनी फार धक्का बसत असेल तर मी काय करु शकत नाही.
चर्चा तुम्ही ठरवलेल्या चौकटीतच झाली पाहिजे असे तुम्हाला पाहिजे असेल तर धाग्यावर डिस्क्लेमर टाका. आणि शुभेच्छांची आपणास जास्त गरज आहे, तस्मात् असू देत तुमच्याकडे.
द
दत्ता जोशी
Mon, 10/19/2015 - 16:40
नवीन
अभ्यास हीन असंदर्भ सिलेक्टिव्ह लिखाण बंद करा. अजूनही लिखाण त्याच त्रिज्येत सुरु आहे.
सुमारे ६००-७०० वर्षे मुस्लिमांची आक्रमणे होत रहिली, राज्य होत राहिली. काय करून घेतले हिंदूंनी. त्यांना जाग यायला ६०० वर्षे जावी लागले जेव्हा शिवाजीमहाराज प्रकट झाले. तत्पूर्वी काय चाललं होतं हे तुम्हास जास्त ठावूक कारण मुस्लिम अत्याचार कहान्या तुम्हास मुखोद्गत आहेत असं दिसतंय. तेव्हा हिंदूंनी काहीच कसं केलं नाही हा विचार कधीच आपल्या संस्कारी मनात येत नाही. पण मुस्लिमांनी कसे आमच्यावर अत्याचार केले ह्या टिप्पीकल सासु-सुना छाप रडगाणी कायम गात असता.
हाच तुमचा का अभ्यास ... मग काय बोलावे?
काश ...! .१६व्य शतकात महाराजांनी अलौकिक कार्य हाती घेई पर्यंत जवळपास ८५० वर्षे घणाघाती हल्ले करूनहि हिंदुस्तानचा मुघलीस्थान, अरबस्थान का नाही झाला..गेला बाजार अखंड हिंदुस्तांवर हे आक्रमणकर्ते राज्य का नाही प्रस्थापित करू शकले ...असा प्रश्न बुद्धिवंतांना का पडत नाही?
आता मी मास्तर बनून कोणाला नाही शिकवू शकत पण ८व्य शतकापासून - १६व्या शतकापर्यंत बाप्पा रावल, राजा जयपाल, पृथ्वीराज चौहान, महाराणा प्रताप, इ राजपूत तसेच नागा, शीख हे बुद्धिमंतांच्या खिजगणतीत नाहीत का? .
बाय द वे, ६०० वर्षांपासून आक्रमणे झाली, राज्ये झाली आणि छत्रपती जन्माला आले, हिंदू जागे झाले, मग त्यांनी स्वराज्य स्थापन केले ...हे मान्य आहे तर तुम्हाला. आधीच्या बर्याच धाग्यात वेगळाच सूर होता कि...अर्थात नवीन काहीच नाही.
चर्चा तुम्ही ठरवलेल्या चौकटीतच झाली पाहिजे असे तुम्हाला पाहिजे असेल तर धाग्यावर डिस्क्लेमर टाका.
आता तुमचा हा प्रतिसाद बघा संपादित तजो ....'मुहर्रम ची माहिती हवी' या धाग्यावर
"एक चुकीची समजूत की हिंदू एवढे काय हिंस्त्र-वैगेरे नाहीत. जातीपातीतून घडणारे हत्यासत्र, धिंडी, इत्यादी बघितले तर हिंदूंही कट्टर-हिंस्त्रपणात मागे नाहीत हे समजून येतं. जर हिंदू धर्म एवढाच ग्रेट, शांतीप्रिय, सहिष्णु वैगेरे होता तर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्म का सोडला? शैव-वैष्णवांचे रक्तरंजित इतिहास कसे विसरले जातात? कि फक्त दुसर्या धर्माचे लोक मारले की तेव्हाच धर्म हा कट्टर-असहिष्णु-हिंस्त्र समजला जातो? "
बेशुद्धच पडलो हे वाचून ...काय संबंध आहे मुहर्रमचा आणि वरच्या या हौ वॉज दयाट अपील चा? ?
याच्या आधीपण "मुसलमानांना कसे बाळकडू दिले जाते कट्टरतेचे आणि धर्मासाठी रक्त सांडायचे " वगैरे असल्या प्रतिक्रिया उगीचच टाकायची काय गरज होती? काय लिहायचे हे ठरवून सुरवात केल्याचे हेतू स्पष्ट आहेत आणि तुमच्या मान्य न करण्याने काही होत नाही.
शैव-वैष्णव-आंबेडकर हे हिंदू धर्माच्या बाबतीत बिन्कामाचे आहे हे आपले वक्तव्य आहे ते तद्दन बेफिकिरीतून व अज्ञानातून तसेच हिंदूधर्माच्या पराकोटीच्या चुकिच्या अभिमानातून आले आहे.
... काय संबंध भौ? विषय काय, लिहितोय काय काही तारतम्य? माफ करा, स्पष्ट बोलतो पण मराठीत अशा बोलण्याला वेगळाच शब्द आहे.
बाय द वे, तुम्ही स्वतः किती शैव- वैष्णव दंगली पहिल्यात हो? किती बॉम्ब स्फोट केले त्यांनी एकमेकांच्या देवळासमोर? किती संघटना निघाल्या एकमेकांना संपवण्यासाठी?
आंबेडकरांचे नाव घेतले कि विचारवंत आणि पुरोगामी हे अधोरेखितच आहे त्यामुळे पास.
आणि चेरी ऑन द केक...
त्यास माझ्या प्रतिसादांनी फार धक्का बसत असेल तर मी काय करु शकत नाही.
. हे म्हणजे... हाइट ऑफ अमुक... हाइट ऑफ तमुक पठडीतले जे विनोद होते ना, त्याचा शिरोमणी आहे.... हाइट ऑफ गैरसमज ..आत्मविश्वास वगैरे .. (खरच खदाखदा हसलोय).
असो..लगे रहो. .. लई बिल झालं. मला इतका वेळ फुकट घालवणं परवडण्यसारखं नाही. ..
-----(संपादित)------=
त
तर्राट जोकर
Mon, 10/19/2015 - 16:58
नवीन
मिस्टर जोशी,
यहांसे पढना शुरु करो तो कुछ समझमे आयेगा.. मुस्लिमांच्या माहिती धाग्यावर हिंदू कुठून आले हेही कळेल
"जी जात नाही ती जात' असं म्हणतातच. इथले अनेक लोकसमूह काही ना काही कारणांनी मुस्लिम झाले. पण त्यांच्या मूळ जाती चिकटून राहिल्याच. काही जाती पेशाशी निगडीत आहेत म्हणून राहिल्या. काही जाती प्रतिष्ठित आहेत म्हणून राहिल्या. भारतात अठरापगड जाती (खरे तर हजारो) आहेत हे आपल्याला माहित असते. पण काही जाती अस्तित्वात असतील असे सामान्य माणसाच्या गावीही नसते.
उत्तर भारतात हुसेनी ब्राह्मण नावाची एक जात आहे. (बरखा दत्त याच जातीची आहे.) पाकिस्तानात मुस्लिम राजपूत मोठ्या संख्येने आहेत. गोव्यात सारस्वत कॅथलिक बरेच आहेत. जात संपणार नाही, हे कटू असले तरी वास्तव आहे."
यावर मी बिका यांना माझी शंका विचारली कारण ते या बाबतीत अभ्यासू आहेत असे जाणवले. बाकी तुम्हाला अंबाबाईचा गोंधळ घालायला माझी काय ना नाही. धागा तुमचा असला तरी यु आर नॉट द ओनर ऑफ धिस साईट अॅण्ड इट्स कंटेंट. तुम्हाला अवांतराचा त्रास होत असेल तर इग्नोरास्त्र आहे तुमच्याकडे. किंवा संपादकांकडे रितसर तक्रार करा. स्वतःच आकांडतांडव करून हास्यास्पद होत आहात हे लक्षात आले नाही अजून?
एक राहिलंच, आंबेडकरांचं नाव घेतलं की जळफळाट का होतो हो तुमचा...? तिथे सगळी उत्तरं संपतात बहुतेक सहिष्णु मास्तरांची...
म
मृत्युन्जय
Tue, 10/20/2015 - 08:18
नवीन
तजो अगदी प्रामाणिकपणे बोलायचे तर दजोंच्या प्रतिवादात दम आहे. याच धाग्यावर तुम्ही दोन्ही बाजूंनी बोलत आहात. एका प्रतिसादात तुम्ही म्हणाला की "हिंदु हिंस्त्र आहेत / होते" दुसर्या प्रतिसादात तुम्ही त्यांना लेचेपेचे म्हणता, हे असे एकाच धाग्यावर दोन विरोधी प्रतिसाद देणे चुकीचे नाही काय? एक काय तो स्टॅंड ठरवा ना. किंवा मग सरळ लिव्हा की "बाबा रे हिंस्त्रे किंवा लेच्यापेच्या असले काही नसते. सगळेजण सारखेच". असे स्पष्त लिव्हा की मंग लोकांचे कन्फ्युजन नाही व्हायचे. अशी डबल ढोलकी कशी चालेल?
त
तर्राट जोकर
Tue, 10/20/2015 - 09:05
नवीन
माझा मुद्दा समजण्यात थोडी गडबड झाली आहे असे दिसते.
विधान एकः बहुसंख्य हिंदूंमधे असा समज आहे की मुस्लिमांच्या धर्मातच कट्टरपणा आहे. हिंदूंमधे तसा नाही. (म्हणजे हिंदू सौम्य आहेत. कट्टर/हिंस्त्र नाहीत)
विधान दोनः भारतातले बहुतेक मुस्लिम हे कन्वर्टेड हिंदूच आहेत.
विधान तीनः कट्टरपणा हा धर्मात नसून व्यक्तीत असतो.
विधान चारः धर्माचा आधार घेऊन हिंस्त्रपणा अजून भडकवता येतो. (हुप्प्या व इतरांच्या प्रतिसादांतून हा प्रकार जाणीवपूर्वक इस्लामी धुरिणांनी केला आहे अशी माहिती मिळाली.)
विधान पाचः हिंदूंची भूमिका बलवानांप्रति सहिष्णु व निर्बलांप्रति कट्टर अशी दिसून येते. (याबद्दल मुस्लिम शासक व दलितांचे उदाहरण दिले.)
आता वरील सर्व विधाने जोडून पहा. "हिंस्त्र वा लेचेपेचे असणे हे स्थल-काला-परिस्थितीनुसार बदलते, धर्मानुसार नाही" हे विधान मी माझे मत म्हणून मांडले. हे कुठल्याही धर्माला लागू होते. इथे सिलेक्टीवली हिंदूंनाच हिंस्त्र वा लेचेपेचे म्हणणे गृहित नाही. ज्याला मुभा मिळते तो अत्याचार करतोच. त्यास काहीही कारण पुरते.
बाकी माझा काही गोंधळ वा सिलेक्टीव दुटप्पीपणा दिसत असेल तर जरूर कळवा. आभारी राहिन.
स
सुहास
Fri, 10/16/2015 - 17:14
नवीन
हुसेनी ब्राह्मणांचे पूर्वज करबलाच्या लढाईत हुसेनच्या बाजूने लढले होते असे ऐकले आहे.. याबद्दल काही जास्त माहीती आहे का..?
तसेच इमाम हुसेनांनी हिंदुस्थानात शरण घ्यायची (take refuge) इच्छा व्यक्त केली होती म्हणे हे खरे आहे का..?
ब
बिपिन कार्यकर्ते
Fri, 10/16/2015 - 17:43
नवीन
होय. हुसेनी ब्राह्मण करबलात हुसेनच्या पक्षात लढले होते असे म्हणले जाते. म्हणूनच त्यांना हुसेनी ब्राह्मण असे नाव पडले.
हुसेनने हिंदुस्तानात शरण घ्यायची इच्छा दाखविली की कसे याबद्दल मला माहिती नाहीये. पण ते सर्वथा शक्य मात्र आहे.
श
श्रीगुरुजी
Fri, 10/16/2015 - 17:46
नवीन
ताबुतांची "डावी-उजवी" होणे म्हणजे नक्की काय?
पुण्यात श्रीनाथ चित्रपटगृहाबाहेर एक ताबूत बसविला जातो. अजून एक ताबूत नव्या पुलापाशी असतो. या दोन्ही ताबूतांची मिरवणूक निघून नानावाड्यासमोर दोघांची "डावी-उजवी" झाली असे वृत्तपत्रात येते. म्हणजे नक्की काय होते?
तसेच या प्रसंगी रेवड्या उधळल्या जातात. त्यामागचे कारण काय?
स
सुहास
Fri, 10/16/2015 - 17:58
नवीन
"डावी-उजवी" म्हणजे गळाभेट असावी..
D
dadadarekar
Sat, 10/17/2015 - 01:57
नवीन
ते गळाभेटच असणार.
पीर एकमेकांशी गळाभेट घेतात.
ब
बिपिन कार्यकर्ते
Sun, 10/18/2015 - 17:59
नवीन
डावी उजवी म्हणजे गळाभेट घेणे, मिठी मारणे. दोन मुसलमान गळाभेट घेताना आधी डावा खांदा एकमेकांना भिडवून मग उजवा खांदा भिडवतात. त्यावरून हा वाक्प्रचार आला असावा.
स
सौन्दर्य
Sat, 10/17/2015 - 00:03
नवीन
मुंबईत भायखळा येथे नोकरीला असताना मी मुंबई सेन्ट्रलवरून पायी भायखळ्याला जात असे. मोहर्रमच्या कित्येक दिवस आधी रस्त्यावर फुकट सरबत वाटणार्यांच्या गाड्या, जागोजागी उभारलेले पाण्याचे हिरवे माठ, त्याभोवती केलेली सजावट दिसू लागे. मोहर्रमच्या दिवशी मात्र आम्हाला अन-ऑफिशियली अर्धा दिवस लवकरच सोडण्यात येई. हेतू हा की मोहर्रमच्या मिरवणुकीत कोणी चुकून सापडायला नको. मात्र संध्याकाळी ऑफिसहून परत येताना, कित्येक वेळा ह्या मिरवणुका दिसायच्या. सर्व जमाव कसल्यातरी धुंदीत (मादक पदार्थाने येणारी धुंदी नव्हे) असायचा. कित्येक तरुण, लोखंडी साखळ्याना बांधलेल्या टोकदार सुऱ्याने, किवा अश्याच अणुकुचीदार हत्याराने स्वताच्या उघड्या अंगावर, चाबूक मारावेत तसे मारून, रक्त काढत. रस्त्यावर जागोजागी रक्त पडलेलं असायचं. तो सर्व प्रकार बघवला जायचा नाहीत तरी उत्सुकतेपोटी आम्ही मित्र बघायचो. स्त्री सहकारी मात्र त्या दिवशी, भायखळ्यावरून ट्रेन पकडायच्या त्या ह्या मुंबई सेन्ट्रल भागात यायच्या नाहीत.
ह्या धाग्याच्या निमित्ताने खूप माहिती मिळाली. सगळ्यांचे आभार.
न
नंदन
Sat, 10/17/2015 - 01:32
नवीन
बिकांचे प्रतिसाद नेहमीप्रमाणेच वाचनीय. इराणच्याच प्रभावक्षेत्रात येणारा अझरबैजान देश आणि इराकमधला बगदादच्या दक्षिणेचा भाग हेही शिया बहुसंख्य आहेत. लेबनॉनच्या खिचडीतही शियांची संख्या लक्षणीय आहे.
अ
अनुप ढेरे
Sat, 10/17/2015 - 06:32
नवीन
येमेनमध्ये पण खूप शिया आहेत. येमेनमधली आत्ताची यादवी शिया-सुन्नी वाद आहे. सौदी+इजिप्त सुन्नींना मदत करतायत आणि इराण शियांना.
ब
बिपिन कार्यकर्ते
Sun, 10/18/2015 - 18:02
नवीन
धन्यवाद नंदन.
खरे आहे. अझरबैजान, इराक वगैरे देश शियाबहुलच आहेत. अझरबैजान हा इराणचाच एक ऑफशूट आहे असे म्हणता येईल. इराकमध्येही ६५% लोक शिया आहेत. आज इराकमध्ये शियांचीच सत्ता आहे. इराकमधला संहर्ष अद्याप न संपण्याचे हे ही कारण आहेच.
क
कंजूस
Sat, 10/17/2015 - 02:16
नवीन
सौंदळा,बिपिन कार्यकर्ते,psajid यांनी बरोबर सांगितलंय .आणखीही आहे.नंतर लिहितो.
अ
अजया
Sat, 10/17/2015 - 05:38
नवीन
एकदा बाहरेनला असताना मुहर्रमच्या गर्दीत सापडलो होतो. एका फॅमिली फ्रेंडच्या घरी निघालो होतो.त्यांचे घर कट्टर शिया एरिआत.रस्त्यावर अनेक लोक अतिशय भेसूर आवाजात छाती बडवत चालले होते. मित्राच्या घरीदेखील तोच आवाज भरुन राहिला होता. अतिशय विचित्र अशी ती मिरवणूक चांगलीच हादरवून गेली होती.
द
दत्ता जोशी
Sat, 10/17/2015 - 06:35
नवीन
असं ऐकून आहे कि २०१२ मध्ये जो उठाव झाला त्यवेळी पाकिस्तानी सुन्नी पोलिसांना बंदोबस्तासाठी वापरले होते म्हणून जास्ती प्रोब्लेम झाले.
अ
अजया
Sat, 10/17/2015 - 10:25
नवीन
हो.या पोलिसांवर जनतेचा विशेष राग आहे.
ब
बिपिन कार्यकर्ते
Sun, 10/18/2015 - 18:23
नवीन
बाहरीनमध्येही शिया बहुसंख्य आहेत. ७०%-७५% लोक शिया असावेत. अधिकृत जनगणना होत नाही त्यामुळे नेमकी संख्या दिसून येत नाही. जनतेत शिया बहुसंख्य, पण राजघराणं मात्र सुन्नी. शिवाय हे घराणं मूळचे बाहरीन बेटावरचे नाहीत. बाहरीनच्याच मालकीच्या पण थोड्या लांबवर असलेल्या एका बेटावरचं हे घराणं. (या बेटांवर कतारपण हक्क सांगतो. पण तो वाद आता मिटला आहे.) त्यामुळे, जनतेला राजा आपला वाटत नाही. ही परिस्थिती अनेक दशकांपासून चालत आलेली आहे. जनतेपासून धोका असल्यामुळे, राजाने स्थानिक पोलिसांमध्ये पाकिस्तानातून बलुची लोक आणून भरती केले. त्यांना स्थानिक नागरीकत्वही दिले. हे लोक आज अनेक पिढ्या बाहरीनमध्येच आहेत त्यामुळे, ते तिथलेच बनून गेले आहेत. पण ऊर्दू बोलतात. पण कितीही झाले तरी ते परकीयच. आणि ते भलतेच राजनिष्ठ असल्यामुळे स्थानिक शियांवर अत्याचार करताना मागे पुढे पाहात नाहीत.
लोकसंख्येमधील शियांचे प्रमाण कमी करण्याकरता सरकार अजून एक युक्ती वापरत आहे. अनेक परकीयांना बाहरिनी नागरिकत्व दिले जात आहे. माझ्या माहितीत अशी काही उदाहरणे होती. एक मँगलोरी ख्रिश्चन माणूस ५०-६० वर्षांपूर्वी तिथे गेला. तो तिथेच राहिला. पुढे त्याने एका इराणी महिलेशी लग्न केले. काही काळाने त्याने एका फिलिपिनो ख्रिश्चन महिलेशी लग्न केले. त्याला एकंदर ७-८ मुलं झाली. त्यातल्या इराणी बायकोच्या मुलांचा धर्म मुस्लिम. फिलिपिनो बायकोच्या मुलांचा धर्म ख्रिश्चन (त्यापैकीच एक जण मला भेटला होता). या मुलामुलींनीही अशीच वेगवेगळ्या जातीधर्मवंशाच्या लोकांशी लग्नं केली. त्यातून बरीच मिश्र संतती निर्माण झाली. आणि हे सगळे बाहरिनी पासपोर्टहोल्डर होते पण शिया नव्हते. नंतर मला अजूनही अशी काही उदाहरणं दिसली. आखाती देशांमध्ये सहसा नागरीकत्व दिले जात नाही. सौदी अरेबिया व कुवेतमध्ये तर अगदीच अभावाने आणि ते ही केवळ सुन्नी मुस्लिमांनाच दिले जाते. ओमानमध्ये काही गैरमुस्लिमांना नागरीकत्व दिले गेले आहे. पण सरकारी धोरण म्हणून गैरमुस्लिमांना किंवा परकीयांना नागरीकत्व देणारा बाहरीन हा एकमेव आखाती देश. अर्थातच, त्यामागील कारण, शियांचे प्रमाण कमी करणे हेच आहे.
या सगळ्या मुस्कटदाबीतूनच, गेल्या ४-५ वर्षांमधला बाहरीनमधील शियांचा उठाव सुरू झाला आहे. तो अत्यंत क्रूर पद्धतीने दडपण्यातही आला आहे.
प
प्यारे१
Sat, 10/17/2015 - 09:28
नवीन
इस्लाम मध्ये दाढी कंपल्सरी नाही. कट्टर मुस्लिम असलेले अनेक जण दाढी ठेवत नाहीत पण पाच वेळा नमाज पठण करतात.
एक व्यक्ती सातत्यानं एका विचाराला आयुष्यभर वाहून नेत नाही. आपण आक्ख्या समाजांबद्दल विचार का करावा? सरसकटीकरण सरसकट करणं कधी थांबायचं?
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- ›
- »