Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मोहरम : माहिती हवी आहे

द
दत्ता जोशी
Fri, 10/16/2015 - 06:32
🗣 128 प्रतिसाद
आजपासून मोहरम सुरु झाला. मोहरम हा एक अत्यंत महत्वाचा इस्लामिक सण / उत्सव असावा असे वाटते. अनेक वर्षे मध्यपूर्वेत काम करताना तिथे कधी लोकांना हा उत्सव करतांना पहिले नाही. तिथे दोन ईद, प्रेषित मुहम्मद जन्मदिन, इस्लामिक नव वर्ष इतक्याच इस्लामिक सणांना सरकारी सुटी असायची. इथे दिसतात त्याप्रमाणे मोहरमच्या मिरवणुका वगैरे कधी दिसल्या नाहीत. म्हणून या उत्सवाविषयी थोडे कुतूहल जागृत झाले. या उत्सवाचे औचित्य काय? तो भारतातच का केला जातो? यामागे काही धार्मिक भावना आहे, इतिहास कि फक्त सामाजिक उत्सव उर्मी? याविषयी कृपया माहिती द्यावी.
वर्गीकरण
धर्म

प्रतिक्रिया द्या
35539 वाचन

💬 प्रतिसाद (128)
स
सत्याचे प्रयोग Sat, 10/17/2015 - 15:53 नवीन
कट्टर मुसलमानांना दाढी ठेवणे आवश्यक असतेच. माझ्या पोलीस मित्राला दाढी ठेवण्याच्या परवानगी साठी मुंबई कार्यालया पर्यंत पत्रव्यवहार करावा लागला तेव्हा त्यास परवानगी मिळाली होती. कट्टर मुसलमानांना जीवनात 1दा हज यात्रा कंपल्सरी कट्टर मुसलमानांना दारु वर्ज्य. कट्टर मुसलमानांना खोटं बोलणं वर्ज्य. कट्टर मुसलमानांना सुंता कंपल्सरी. बास हे सर्व त्या मुस्लिम मित्राने सांगितले आहे. अजून काही असल्यास त्याला विचारून टंकतो.
ख
खटपट्या Sat, 10/17/2015 - 15:57 नवीन
कट्टर मुसलमानांना खोटं बोलणं वर्ज्य
हे अशक्य आहे. बाकी दाढी ठेवण्याबद्दल बरीच मतमतांतरे आहेत. मग जे दाढी ठेवत नाहीत ते कट्टर नाहीत का?
↩ प्रतिसाद: सत्याचे प्रयोग
क
कैलासवासी सोन्याबापु Sat, 10/17/2015 - 18:48 नवीन
च्यायला ह्या भावाने तर इस्लाम स्वतः ज़ाकिर नाईक ते ओवैसी अन अबु आझमी ते आझम खान ह्या व्यक्ति तद्दन हराम असल्याचे मानायला हवे (खोटे बोलणे क्लॉज़ अनुसरुन)
↩ प्रतिसाद: खटपट्या
स
सत्याचे प्रयोग Sat, 10/17/2015 - 19:34 नवीन
आजुन 3 गोष्टी राहिल्या 1.) कट्टर मुसलमानांना फोटो काढणे वर्ज्य .(मी त्यांचे लग्न पाहिले. VDO शूटींग सोडा फोटोग्राफर सुध्दा नव्हता. 2) कट्टर मुसलमानांना व्याज घेणे वर्ज्य मग ते शेअर, बचत खाते सर्व प्रकारचे (हसायला येते ना ???) जमा होणारे व्याज कट्टर मुसलमान गरीबांना दान करतो. 3 ) 5 वेळी नमाज कंपल्सरी. वरील सर्व प्रकार कुणाला हिणवायचे म्हणून नाही सांगत पण काळाबरोबर बदला की बाबानो.
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
प
प्यारे१ Sat, 10/17/2015 - 20:21 नवीन
आयला या भावाने (सोन्याबापूंचा शब्द) 90% अल्जीरिया वाले मुस्लिम ठरायचे नाहीत. अनेक 'शेख' सुद्धा मुस्लिम नाहीत काय या अर्थानं?
↩ प्रतिसाद: सत्याचे प्रयोग
क
कैलासवासी सोन्याबापु Sun, 10/18/2015 - 03:46 नवीन
बिरादर, जो सूत न खाय वो शेख नही होती हम चला वसूली पर हबीबी
↩ प्रतिसाद: प्यारे१
प
प्यारे१ Mon, 10/19/2015 - 10:03 नवीन
यस बिरादर.
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
L
lakhu risbud Wed, 10/28/2015 - 11:15 नवीन
धर्माचा उगम,स्थापना ज्या प्रदेशात,भूभागात झाली धर्माचा उगम,स्थापना ज्या प्रदेशात,भूभागात झाली तेथील परिस्थितीचा,वातावरणाचा त्या त्या धर्माच्या आचार-विचार-नियम या सर्व गोष्टींवर प्रभाव पडलेला दिसतो. हिंदू धर्म हिंदू धर्माचा उगम सिंधू नदीच्या अत्यंत सुपीक अशा त्रिभुज प्रदेशात झाला,पाण्याची मुबलक उपलब्धता,समशीतोष्ण हवामान या मुळेच धर्माचरणाचे नीती-नियम या गोष्टींचा विचार करून बनवले गेले. उदा. रोजच्या रोज स्नानसंध्या झालीच पाहिजे,त्याशिवाय देवदर्शन करता येणार नाही. शेती आधारित जीवनपद्धती असे,त्यात पशुशक्तीचे महत्व अनन्य साधारण,त्यामुळेच गोमांस भक्षण करणे निषिद्ध झाले. अशा प्रकारचे नियम बनले अशी अनेक उदाहरणे आहेत. इस्लाम धर्म या धर्माचा उगम सध्याच्या सौदी अरेबिया आणि आसपासच्या परिसरात झाला. वाळवंटातील अत्यंत विषम हवामान,मनुष्य प्राण्यास जगण्यासाठी निसर्गाशी पदोपदी लढा द्यावा लागणार, या गोष्टींचा विचार करूनच त्या धर्माचे नीती-नियम तयार केले गेले. उदा. वाळवंटात रात्री सरपटणाऱ्या प्राण्यांचे भय असते. प्रचंड थंडीत उब मिळविण्यासाठी ते जमिनीवर एखादा माणूस झोपला असेल तर त्याच्या जवळ जाणार, झोपेत त्या माणसाचा धक्का लागला तर प्राण वाचविण्यासाठी दंश आणि त्यातूनच मृत्यू ठरलेला. म्हणूनच इस्लाम मध्ये जमिनीवर झोपणे निषिद्ध आहे. . हिम्मतराव बाविस्कारांनी कोकणात काम करताना त्यांचा या बाबतचा अनुभव सांगितला आहे. त्यांना विंचू दंशांच्या रुग्णांमध्ये मुस्लिम धर्मियांचे प्रमाण अत्यंत कमी आढळले . त्यामागच्या कारणांचा शोध घेतल्यावर त्यांना हे कारण आढळले कि गरिबातला गरीब मुसलमान पण जमिनीपासून उंच असणाऱ्या चौपाई वर झोपतो. म्हणून विंचू दंशाच्या घटना कमी असतात . गोमांस,बकर्याचे मांस भक्षण करणे. वाळवंटात अन्नाचे दुर्भिक्ष्य असते. जे मिळेल ते अन्न ग्रहण करणे आवश्यक असे. म्हणूनच धर्माने मांस भक्षण करणे धर्माचरणाशी जोडले. डुक्कराचे मांस निषिद्ध कारण डुक्कर हा प्राणी प्रामुख्याने खरकटे मानवी आरोग्यास अपायकारक अन्न खाणारा. अनुयायांमध्ये रोगराई पसरून संख्या कमी होऊ नये म्हणून डुक्कराचे मांस निषिद्ध. जुम्मे के जुम्मे नहाना कारण वाळवंटात पाण्याचे दुर्भिक्ष्य,माणसांना पिण्यासाठी पाणी मिळणे दुष्प्राप्य तिथे अंघोळ कुठे करणार ? म्हणून फक्त(साप्ताहिक सामुदायिक प्रार्थनेच्या)मशिदीतील नमाजा आधी स्वच्छ अंघोळ वगैरे करून नमाज पढने हे धर्माचरण ठरवले गेले. दाढी- महंमद आणि त्यांच्या अनुयायांना धर्म टिकविण्यासाठी आणि नंतर प्रसारार्थ अनेक लढाया खडतर प्रवास करावा लागला. वाळवंटात दिवसा अनेक वेळा सुमारे ५५-६० कि मी वेगाने वारे वाहतात,त्या वाऱ्या मध्ये वाळवंटातील वाळू मिसळली तर घोड्यावर व पायी प्रवास करणाऱ्या माणसाच्या चेहरा ओरबाडून काढू शकते. हे कमी करण्यासाठीच दाढी वाढविणे आणि डोक्यावर काहीतरी आच्छादन असणे हे धर्माचरणाशी जोडले गेले. खिल्ली उडविण्याचा हेतू नाही, पण मागे एका लेखात वाचले होते कि हिंदू धर्मात रोजच्या रोज आंघोळ करणे आवश्यक असल्यामुळे आणि शाकाहारी आहारामुळे हिंदू तुलनेने सहिष्णू,कट्टर धर्माभिमानी किवा (धर्मासाठी काहीही करणारा) नसतो. हे आक्रमक भारतात आल्यावर इतर ठिकाणी न मिळणारे स्वच्छ आणि मुबलक पाणी,(त्यामुळे मिळालेली अंघोळ) सुंदर हवामान यामुळे त्यांचा कट्टर पणा कमी झाला. आणि ते याच परिसरात स्थायिक झाले. हा दाखला अनेक जणांना पटणार नाही पण अनभव घेण्यासाठी दोन दिवस अंघोळ न करून बघा, आपल्या नकळतच आपण चीडचिडे बनतो.
↩ प्रतिसाद: सत्याचे प्रयोग
म
मोगा गुरुवार, 10/29/2015 - 15:17 नवीन
हिंदू शाकाहारी असतात म्हणे ! अगदी कट्टर ब्राह्मण वगळता बहुसंख्य हिंदू मिश्राहारीच आहेत. शाकाहारी ब्राह्मणांची संख्या एकूण हिंदुंच्या ३ % तरी आहे का ? अगदी रामायण महाभारतातही मांसाहाराचे उल्लेख आहेत. हिंदू गाय खात नाहीत व मुसलमान डुक्कर. पण इतर सर्व प्राणी दोघेही सारख्याच आवडीने खातात ! मग एक कट्टर व दुसरे अ-कट्टर कसे झाले म्हणे ?
↩ प्रतिसाद: lakhu risbud
स
सुबोध खरे Mon, 10/19/2015 - 11:37 नवीन
100+
द
दत्ता जोशी Tue, 10/20/2015 - 08:11 नवीन
उगीच सारवा सारवी करू नका. काही फायदा नाही. बिकांनी तुम्हाला अगदी योग्य उत्तर दिलंच कि मग. मी काही बोललो का? पण त्यावर तुमची खालची प्रतिक्रिया बघा. यालाच मळमळ म्हणतात. तर्राट जोकर - Mon, 19/10/2015 - 00:35 तुमालाच कळलं बगा, नायतर बाकीचे बसलेत कुटत... जाउंदे. रोख फक्त इथे होता. : त्यांच्या धर्मातच तशी शिकवण आहे. आपल्या धर्मात तशी शिकवण नाही. एक चुकीची समजूत की हिंदू एवढे काय हिंस्त्र-वैगेरे नाहीत. जातीपातीतून घडणारे हत्यासत्र, धिंडी, इत्यादी बघितले तर हिंदूंही कट्टर-हिंस्त्रपणात मागे नाहीत हे समजून येतं. जर हिंदू धर्म एवढाच ग्रेट, शांतीप्रिय, सहिष्णु वैगेरे होता तर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्म का सोडला? शैव-वैष्णवांचे रक्तरंजित इतिहास कसे विसरले जातात? कि फक्त दुसर्‍या धर्माचे लोक मारले की तेव्हाच धर्म हा कट्टर-असहिष्णु-हिंस्त्र समजला जातो? मुद्दा होता की धर्मात असलेल्या शिकवणुकीने खरंच फरक पडतो का? माणुस कट्टर व हिंस्त्र व्हायला नक्की काय लागत असावं? धार्मिक शिकवणुकीने माणसे मारेकरी झाली असती तर काही हिंदू संघटना तोडीस तोड ब्रेनवॉशिंग करत आहेत, त्यांचेही रिझल्ट्स दिसले असते. जर तसे नसेल तर डीनएमधे लोचा असला पाहिजे. याला द्वेषाने आंधळे होणे असे म्हणतात. तुम्ही तर विचारवंत आहात तुमच्या कडून हे अपेक्षित नाही. कारण, मानवतावादाच्या कळकळीने संपृक्त झालेल्या विचारवंतांचा खरा चेहरा..... असा असतो तेव्हा काळजी घ्या. मुंबै स्पिरीट म्हणून जे मिरवल्या जाते तेही याच सहिष्णुपणाच्या पठडीतले. यावर तुम्ही काय उत्तर द्याल तेही माहित आहे. हिच ती बेगडी सेक्युलारांची संवेदनशीलता. पण तुम्ही सुधा असा विचार करावा? तुमची मुबैकारांकडून नक्की काय अपेक्षा होती साहेब ? लोकांच्या धैर्याला आणि सहनशीलतेला बुळेपणा आणि भेकडपणा असे संबोधून चिथावणी देणाऱ्या आणि वर मानवता आणि समतेवर चर्चा करून नक्राश्रू ढाळनार्या विचारवंतांनी आंबेडकरांचे नाव घेवून खराब करू नये असे तुम्हाला मनापासून वाटत नाही का? आज हे असले उसने आणि दुटप्पी विचार घेवून मानवतेवर गप्पा मारणाऱ्या बेगडी विचारवंत आणि सेक्युलर लोकांची फळी आपल्या समाजाच्या एकोपा आणि विकासासाठी कट्टरवाद्यांपेक्षाहि जास्ती घातक आहेत. कितीही कळवला दाखवला तरी त्यांचा खरा उद्देश वेगळाच असतो. शाहू फुले आंबेडकर अशी नावे घेवून त्यांना काय सध्या करायचे असते हे न समजण्या इतके लोक मूर्ख राहिले नाहीयेत आता. कधी कधी त्यांचा हा बुरखा फाडून त्यांचा खरा चेहरा लोकांसमोर आणावा असे तुमच्या सारख्या सुशिक्षित आणि संवेदनशील अशा विचारी मनाला वाटत नाही का?
त
तर्राट जोकर Tue, 10/20/2015 - 09:20 नवीन
मुंबैतल्या लोकांच्या बुळेपणा आणि भेकडपणाला धैर्य व सहनशीलता म्हणून त्यांच्यावर रोज गुदरणार्‍या भयानक प्रसंगांना दिव्यतेची झालर लावण्याचे महान कार्य मुरलेले हरामखोर राजकारणी करत असतात. लाखो मुंबैकरांना साध्या नागरी सुविधा मिळत नाहीत, जीवाची भीती मनात ठेवून प्रवास करावा लागतो. काही घटना झाल्या की दुसर्‍या दिवशी मोर्चा-आंदोलने करून आपल्या मागण्या-हक्क यासाठी लढा द्यायचे सोडून मुंबैकर हजेरीपटावर हजेरी लावायला पळतो का तर दिवसाचा पगार बुडू नये. "मला काय त्याचे?" ही भावना मुंबैकरांचे सेकंड नेचर आहे. अशा गुणांना धैर्य व सहनशीलता म्हणून गौरवणे राजकारण्यांना शोभते, तुमच्यासारख्या देशप्रेमी लोकांना नाही. जी परिस्थिती मन मारून मुटकून जगावी लागते त्या परिस्थितीत किंचीतसाही बदल घडवण्याची इच्छा नसणे हा बुळेपणा व भेकडपणा आहे. त्यात गौरवास्पद काहीही नाही. फुले-शाहु-आंबेडकर हा पुरोगामी-बहुजन आघाडीचा आवडता शब्दप्रयोग आहे. त्यांच्या विचारधारणेशी माझा काही संबंध नाही. मी आंबेडकरांचे नाव फक्त धर्मपरिवर्तनाच्या मुद्द्यासाठी घेतले. नसेल आवडले तर त्याऐवजी असे म्हणतो की "हिंदूं धर्माचा एक मोठा भाग असलेली दलित जनसंख्या अचानक धर्म सोडून जाते ह्याला काय कारण घडले असावे ह्यावर काय विचार केला आहे का?" आंबेडकरांनी मिशनर्‍यांसारखी आमिषे तर दाखवली नव्हती, किंवा मुस्लिमांसारखे अत्याचारही नव्हते केले मग काय कारण आहे की एवढी जनता हिंदूंपासून वेगळी झाली आणि त्यावर हिंदूंनी काहीही प्रतिक्रिया दिली नाही? बाकी तुम्ही कोणावर काय शिक्के मारता ह्याच्याशी मला काय कर्तव्य नाही. अमुक एक विचार दिसला की हा अमक्या गटाचा अशी स्वमतांध वर्गवारी करणे सध्या फॅशन आहे. तुम्हाला आवडेल ते चष्मे घाला, आमची काहीच ना नाही.
↩ प्रतिसाद: दत्ता जोशी
द
दत्ता जोशी Tue, 10/20/2015 - 12:41 नवीन
विषय : मुहर्रम माहीती हवी. या विषयावर कोणीही कट्टरपणा वार बोलणं सुरु करण्याआधीचे TJ यांचे प्रतिसाद. १. मुहर्रम चा मातम बघितला तर तर्राट जोकर - Fri, 16/10/2015 - 13:34 मुहर्रम चा मातम बघितला तर कट्टरतेची शिकवण कशी मिळते हे सोदाहरण पटतं. २. ते तर आहेच. तर्राट जोकर - Fri, 16/10/2015 - 14:42 ते तर आहेच. धर्मासाठी रक्त कसं वाहायचं याची शिकवण नकळत्या वयापासून दिली जाते ते दिसलं म्हणून आपली टिप्पणी...! ३.. तुमालाच कळलं बगा, नायतर तर्राट जोकर - Mon, 19/10/2015 - 00:35 तुमालाच कळलं बगा, नायतर बाकीचे बसलेत कुटत... जाउंदे. रोख फक्त इथे होता. : त्यांच्या धर्मातच तशी शिकवण आहे. आपल्या धर्मात तशी शिकवण नाही. एक चुकीची समजूत की हिंदू एवढे काय हिंस्त्र-वैगेरे नाहीत. जातीपातीतून घडणारे हत्यासत्र, धिंडी, इत्यादी बघितले तर हिंदूंही कट्टर-हिंस्त्रपणात मागे नाहीत हे समजून येतं. जर हिंदू धर्म एवढाच ग्रेट, शांतीप्रिय, सहिष्णु वैगेरे होता तर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्म का सोडला? शैव-वैष्णवांचे रक्तरंजित इतिहास कसे विसरले जातात? कि फक्त दुसर्‍या धर्माचे लोक मारले की तेव्हाच धर्म हा कट्टर-असहिष्णु-हिंस्त्र समजला जातो? मुद्दा होता की धर्मात असलेल्या शिकवणुकीने खरंच फरक पडतो का? माणुस कट्टर व हिंस्त्र व्हायला नक्की काय लागत असावं? धार्मिक शिकवणुकीने माणसे मारेकरी झाली असती तर काही हिंदू संघटना तोडीस तोड ब्रेनवॉशिंग करत आहेत, त्यांचेही रिझल्ट्स दिसले असते. जर तसे नसेल तर डीनएमधे लोचा असला पाहिजे. ४. मिस्टर जोशी, तर्राट जोकर - Mon, 19/10/2015 - 16:40 मिस्टर जोशी, सिलेक्टीव रीडींग सोडाल तर बरं होइल. माझे बिका यांना असलेले दोन्ही प्रतिसाद वाचा. त्यात कुठे हिंदूधर्मावर निरर्थक टिप्पणी केली हे सांगू शकाल? . सुमारे ६००-७०० वर्षे मुस्लिमांची आक्रमणे होत रहिली, राज्य होत राहिली. काय करून घेतले हिंदूंनी. त्यांना जाग यायला ६०० वर्षे जावी लागले जेव्हा शिवाजीमहाराज प्रकट झाले. तत्पूर्वी काय चाललं होतं हे तुम्हास जास्त ठावूक कारण मुस्लिम अत्याचार कहान्या तुम्हास मुखोद्गत आहेत असं दिसतंय. तेव्हा हिंदूंनी काहीच कसं केलं नाही हा विचार कधीच आपल्या संस्कारी मनात येत नाही. पण मुस्लिमांनी कसे आमच्यावर अत्याचार केले ह्या टिप्पीकल सासु-सुना छाप रडगाणी कायम गात असता. तेव्हा हिंदू आपले कट्टर जातपातवाद, पंथ-वाद, धर्मप्रचार-वाद-विवादचर्चा यात मश्गूल होते, त्यांना परकिय आक्रमणांना तोंड द्यायला जमले नाही. हे कबूल का करत नाही? आक्रमकांनी सौजन्य दाखवावे अशी तर्कदुष्ट विचारसरणी नेहमीच मुस्लिम आक्रमकांबद्दल बोलतांना इथे दिसून येते. पण सौजन्य न दाखवणार्‍या आक्रमकांना इथून हाकलून लावायला हिंदूंना कुणी अडवले होते हे काय कोणी बोलत नाही. कुणीही येतो अन् हिंदूंवर राज्य करून जातो यात हिंदूंचा सहिष्णुपणा आहे की भेकड, अल्पसंतुष्टी वृत्ती आहे हे सांगावे. मुंबै स्पिरीट म्हणून जे मिरवल्या जाते तेही याच सहिष्णुपणाच्या पठडीतले. यावर तुम्ही काय उत्तर द्याल तेही माहित आहे. त्यामुळे उत्तर द्या, मग पुढे अजून बोलायचे आहेच. कशाला सारवा सारवी करता? वाचकांना जे कळायचे ते कळले. बाय द वे, मुंबईत जावून मुंबईकरांच्या बाबतील असलं काही असंवेदनशील बोलू नका. तुमच्यावर धागा लिहायची पाळी येईल. बाकी चालुदे. मला वेळ फुकट घालवणे खरच परवडत नाही.
त
तर्राट जोकर Tue, 10/20/2015 - 13:49 नवीन
जाऊद्या हो. काय एवढं मनाला लावून घेताय. तुमच्या आवाक्याबाहेरचं आहे ते. राग शांत झाला की धा-बारा महिन्यांनी परत हा धागा आणि प्रतिसाद वाचा मग बोलूया.... आणि हो... साहेब, मी मुंबैतच आहे गेल्या बारा वर्षापासून. जिथे तिथे हेच बोलतो. अजुनतरी जीवंत आहे कारण मुंबैकरांना खरंच वेळ नाही हो. अहो, सुधारणा करायला वेळ नाही, माझ्याकडे लक्ष द्यायला कुणाला वेळ असेल. असला तरी मी खोटे बोलत नाही हे अस्सल मुंबैकरास पक्के ठावूक आहे. कधी मुंबैत येऊन विचारा. वेळ नसेल फुकट घालवायला तर 'पेज ३' चित्रपट बघून घ्या.....
↩ प्रतिसाद: दत्ता जोशी
द
दत्ता जोशी Tue, 10/20/2015 - 16:14 नवीन
कसला राग? हिंदू विद्वेषी जळजळ तुमच्याकडे आहे. हाच तुमचा खरा चेहरा आणि प्रतीक्रीयान्माग्च इण्टेन्शन आहे हे फक्त दाखवून दिलंय. बाकी काही नाही. जिथे तिथे नाही लपून लपून आणि ठराविक लोकांपुढे हेच बोलतो असा लिहा. ते जास्ती वास्तविक आहे.
त
तर्राट जोकर Tue, 10/20/2015 - 20:01 नवीन
हिंदू विद्वेषी जळजळ. अभी तुमने देखाही क्या है भाई..? एवढ्यातच इतके मोठे शब्द वापरायला लागलेत. आधी हिंदू म्हणजे काय याची तुम्हास किती समज आहे ते बघुद्या. मग आमची 'जळजळ' हिंदू विद्वेषी की कशी ते बघू....
↩ प्रतिसाद: दत्ता जोशी
द
दत्ता जोशी Wed, 10/21/2015 - 07:54 नवीन
<हिंदू विद्वेषी जळजळ. अभी तुमने देखाही क्या है भाई पडद्यामागे बसून कळ फलक बडवणे म्हणजे विद्वत्ता किंवा गेला बाजार समाज सुधारणा असे समजणारे पैशाला पासरी आहेत आंजा वर. कोणत्याहि विषयाचा अभ्यास नाही, इतिहास ठो माहिती नाही, संस्कृती ठो माहिती नाही. वृत्तपत्रे वाचत नाही ( म्हणे) ती व्ही पाहत नाही ( म्हणे) वर उगीच घिसे पिटे आन्जावरील विचारवंतांच्या उसनवारीचे विषय घेऊन संदर्भहीन गुळण्या टाकायच्या आणि वर माझ्या टांगा वर असल्या प्रवृत्तीच्या विद्वत्तेला सलामच. वेगवेळ्या संस्थळांवर वेगवेगळे आय दि घेवून टंकत सुटायचे हा तुमच्या व्यवसायाचा भाग असू शकेल माझ्या नाही. तेव्हा पुढच्यावेळी तयारी करून या. मग उंटाच्या शेपटीचा मुका घेत येतो कि नाही ते कळेल. आणि हो. विषय काय बोलतोय काय आणि लिहितोय काय संदर्भ काय हे आधी बघा. मग उत्तरे द्यायची कि नाही ते ठरवू.
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Wed, 10/21/2015 - 14:45 नवीन
आयएसो ९००१:२००८ सर्टीफिकेटचे काय भाव आहेत आजकाल...?
↩ प्रतिसाद: दत्ता जोशी
अ
अनुप ढेरे Tue, 10/20/2015 - 16:41 नवीन
या मजेशीर व्हिडोमध्ये आत्ताच्या मिडल इस्ट क्रायसीसबद्द्ल छान माहिती आहे. Is this some kind of psychological terrorism where they try to confuse us to death!
ब
बिपिन कार्यकर्ते Wed, 10/21/2015 - 12:15 नवीन
मस्तच आहे व्हिडिओ! =))
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
प
पुष्करिणी Wed, 10/21/2015 - 14:44 नवीन
ज्यांना रूची आहे त्यांनी Constitutional Struggles in the Muslim World हा कोर्सेरा वरचा कोर्स जरूर जॉइन करा, सध्या पब्लिक डिमांड मुळे दुसर्‍यांदा चालू आहे.
म
मोगा गुरुवार, 10/29/2015 - 15:06 नवीन
पख्तुन प्रदेशात रहाणार्‍या लोकांचा पख्त असा उल्लेख आहे. हेच आजचे पठाण लोक. तेंव्हा ते मुसलमान नव्हते ( आणि कदाचित ते वैदिक हिंदुही नसावेत . अनेक अवैदिक जमातींचा उल्लेख वेदात सापडतो. त्यापैकीच एक पख्त ही एक जमात आहे. ) दाल पख्तुनी ही डिश प्रसिद्ध आहे.
↩ प्रतिसाद: तुडतुडी
त
तुडतुडी गुरुवार, 10/29/2015 - 18:11 नवीन
अगदी कट्टर ब्राह्मण वगळता बहुसंख्य हिंदू मिश्राहारीच आहेत.
अभ्यास वाढवा .
हिंदू गाय खात नाहीत व मुसलमान डुक्कर.
इथेही अभ्यास वाढवा . हिंदूंना गाय पवित्र आहे . मुस्लिमांना डुक्कर निषिद्ध आहे . आंबेडकरांनी अनेकांना घेवून धर्मांतर केलं हा मुद्दा काही हिंदू विद्वेषी लावून धरत आहे . त्याला मुख्य कारण म्हणजे धर्मांतर करणार्यांना हिंदू देहदंडाची शिक्षा देत नाहीत . इस्लाम मध्ये इस्लाम विरोधात चुकून जरी काही बोललं, वागलं, धर्मांतर वगेरे केलं तर सरळ मुंडकी उडवली जातात . मुस्लिम धर्मांतर करत नाही म्हणजे तो फार आवडता धर्म आहे हा गैरसमज काढून टाकावा .इराण मध्ये आज इस्लाम बद्दल इस्लामीच वैतागलेले आहेत . पुढच्या काही कळत तिथे इस्लाम विरोधात क्रांती झाली तर आश्चर्य वाटायला नको . सगळ्या मुस्लिम कट्टर गोष्टी बंद करा . मग बघू किती लोक इस्लाम ला कवटाळून राहतात ते
म
मोगा गुरुवार, 10/29/2015 - 18:57 नवीन
नुस्ता अभ्यासवाढवा अशी चोंबडी कमेंट टाकून पळून नका जाऊ. हिंदुंच्यात शाकाहारी किती टक्के व मांसाहारी किती टक्के . काही डेटा देउ शकाल का ? मांसाहार केला तरच प्राणी बलवान होतो असा नियम नाही. बैल , हत्ती असे प्राणी शाकाहारी असुनही बलवान आहेत.
↩ प्रतिसाद: तुडतुडी
त
तर्राट जोकर गुरुवार, 10/29/2015 - 19:22 नवीन
काय मोगादिशू (मोदी. गाय. दिसली. शूट.).... कुणाला डेटाबिटा मागताय राव..? त्यांनी बोलले ना तेच परमसत्य..बाकी जग मिथ्या.... लक्षात असू द्या. तुमचे हजार आयडी उडतील. पण ह्यांच्या एकाही आयडीला धक्कासुद्धा लागलेला दिसत नाही.
↩ प्रतिसाद: मोगा
L
lakhu risbud Fri, 10/30/2015 - 07:04 नवीन
अच्छा ! हे दुखणं आहे होय ? आम्ही आपलं उगाचच काहीतरी वेगळं समजत होतो.
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
ब
बॅटमॅन Fri, 10/30/2015 - 07:11 नवीन
अडाण** लोकांनी हिंदू धर्माचे नाव समर्थनाच्या नावाखाली फुकट बदनाम कसे केले याचे प्रत्यंतर या धाग्यावर अगदी नीटच आले.
ह
होबासराव Fri, 10/30/2015 - 07:15 नवीन
मिपा चे 'संगीत सोम' किंवा 'साक्षि महाराज' :)
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा