अराजक
अराजक
- डॉ. सुधीर रा. देवरे
केंद्र सरकारच्या अखत्यारित असलेल्या साहित्य अकादमीसह इतर संस्थांचे पुरस्कार परत करणार्या साहित्यिकांची- विचारवंतांची संख्या देशभरात वीस पर्यंत पोचली आहे. (महाराष्ट्रातल्या काही साहित्यिकांनीही महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार परत केले.) आणीबाणी नंतर आजची राजकीय स्थिती ही सर्वात जास्त अराजकतेकडे चालली आहे काय? कोणाला ढळढळीत अराजकता अजूनही दिसून येत नसेल तर फक्त एका वर्षात छुपी अराजकता नक्कीच सुरू झाली आहे. डॉ. यू. आर. अनंतमूर्ती... बोलल्याप्रमाणे केवळ देशच नव्हे, तर आख्खं जग सोडून निघून गेले! खरंच हे जग आज इतके वाईट आहे का? पण साहित्यिकांच्या या कृतीने सरकारवर अजून तरी साधा ओरखडाही उमटलेला दिसत नाही. राजकारणी लोकांमध्ये आता साहित्यिक- विचारवंतांचा आदर राहिला नाही. आजच्या राजकारणात सुसंस्कृतपणा दिसून येत नाही.
एम. एस. कलबुर्गी, गोविंद पानसरे व डॉ. नरेंद्र दाभोळकर या तीन विचारवंतांचा खून. या हत्त्यांमागील लोक कोण हे शोधणे फार दूरचे काम असे आपण समजून चाललो तरी ज्या मारेकर्यांनी त्यांना रस्त्यात गाठून हत्त्या केली ते भाडोत्री मारेकरी सुध्दा हाती लागू नयेत हे आकलनापलिकडे आहे. एखादा संशयीत मारेकरी पोलिसांच्या हाती लागला तर तो कसा निष्पाप आहे हे न्यायाधिशांच्या आधी मंत्रीमहोदय सांगतात.
कोणी काय खावे हे दुसरा कोणी कसा ठरवू शकतो? कोणी कोणते कपडे घालावेत त्यावरून मतभेद. कोणाचे घर कोणत्या वस्तीत असावे हे तो तो कळप ठरवणार? मोहम्मद अखलाख दादरी हत्याकांडाने आक्खा देश हादरला. थरकाप उडवणारी आणि झोप उडवणारीही हिंसक घटना आहे ही. आपण मध्ययुगीन आदिम काळात जगतो आहोत की काय असा भास व्हायला लागला. आपापल्या जातीधर्माच्या कळपात राहून आपण आपले आदिम हिंसक टोळ्यांमध्ये रूपांतर करू पहात आहोत? गुजरातमध्ये मुस्लीम युवकांना गरबा नृत्य परिसरात येण्यावर बंदी घालण्यात आली. देशभरात विविध संघटनांकडून असे अनेक छोटेमोठे स्थानिक फतवे निघताहेत. हा कोणत्या प्रकारचा जमातवाद आहे.
यापुढे कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळणे हे देशाच्या दृष्टीने हानीकारक ठरणार आहे का? आपण या देशाच्या विकासासाठीच नक्की सरकार निवडून दिलंय का? हा कोणत्या प्रकारचा विकास आहे? विकासाच्या आरोळ्या मारताना देशातल्या शंभरावर असलेल्या विविध नावांच्या संघटना सुप्तावस्तेत होत्या. सत्ता मिळताच त्या आपल्या खरे रूप दाखवायला लागल्या. रस्त्यांवर नंगानाच होऊ लागला. मत विभाजन होण्यासाठी एखादा नाटकी विरोधकही तसा खमक्या हवा म्हणजे आपला अजेंडा ठोसपणे राबवता येतो. आपल्या समूहावर विषारी टीका केली की आपल्यापासून थोडे दूर गेलेले लोक अजून आपल्या जवळ येतात या सिध्दांताने अगदी ठरवून एका राक्षसालाही जन्म देण्यात आला. तो जितके विषारी बोलेल तितका आपल्याला फायदा. इथे एक कळत नाही की एखाद्या नेत्यावर कोणी टीका केली तर त्या नेत्याच्या धर्माच्या लोकांचा अपमान कसा होऊ शकतो?
इतके सारे होत असूनही सिंहासनावर आरूढ झालेली व्यक्ती काही बोलायला तयार नाही. तेव्हाचे मौनीबाबा परवडले. आता सोयीनुसार बोलले जाते आणि सोयीनुसार दुर्लक्ष केले जाते. प्रचारसभांमध्ये आणि इतर देशांच्या दौर्यांवर जे बोलू नये ते बोलले जाते. रेडीओवर मनातले सगळे सोयीस्कर सांगितले जाते. पण देशांतर्गत हिंसेवर तोंडावर बोट... गडीगुप्प. उत आलेले लोक याचा फायदा उठवत आपला कार्यभाग उरकवताहेत.
महात्मा गांधींना संपवता येत नाही तर आता महात्मा गांधींचे नाव घ्यायचे आणि होता आले तर दुसरे महात्मा व्हायला काय हरकत आहे. मंदिरे बांधता बांधता पोटातल्या पोट आपलेही एखादे मंदिर का बांधू नये आता? दोन आक्टोबरला रस्त्यांची स्वच्छता करता करता मनातल्या जळमटांची स्वच्छता मात्र अजिबात करायची नाही! भारत पंधरा महिण्यांपूर्वी अस्तित्वात होता की नव्हता, माहीत नाही. कदाचित तो आताच घडवला गेला असेल ! चमकता येईल तिथे चमकायचे मग ते फेसबुक का असेना पण जग फिरताना आपल्याच देशाची निंदा करणे गरजेचे आहे का?
काल एका चॅनलवर ऐकले: बिहार मध्ये मुस्लीम मते नितीश आघाडीकडे किती जातील आणि भाजपकडे किती. राजपूत आणि तेल्यांची मते कुठे जातील तेही सांगू... माझी जात ज्या कोणाला मते देईल त्यालाच मी माझे मत देईल का? एक जात एक धर्म सर्व मिळून एखाद्या पक्षाला मतदान करू शकतात का? अशा जातीयवादी सर्वे करणार्या चॅनल्सना कोर्टात खेचले पाहिजे. कोणतं न्यूज चॅनल नेमकं कोणाला विकलं गेलंय हे सहज कळतं आता! लोकशाहीचा तिसरा स्तंभ विकला गेला आहे का!
सावधान! देशाच्या सवोच्च स्थानी असलेल्या नेत्यांची भाषा प्रचार सभांमध्ये पार रसातळाला गेली! आपला देश फक्त प्रचार सभांपुरताच आणि निवडून येण्यापुरताच उरला की काय? तसे नसते तर आज प्रचार करताना जातीय धर्मिय समिकरणे जिथक्या उथळपणे वापरली जातात तशी ती वापरली गेली नसती.
भारतात अशी अराजकता येणार असेल तर देशाच्या नुकसानासाठी दुसर्या शत्रू देशाला काहीच करायची गरज नाही. आपण आपल्याच कृत्यांनी देशाची एकता पोखरून काढू. अथवा शत्रू राष्ट्राला हे निमंत्रण आहे! असे म्हणावे लागेल. आपण खरंच अराजकतेकडे जात आहोत का, याचा सजगपणे विचार करण्याची वेळ आली आहे.
(या मजकुराचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह सविस्तर संदर्भ द्यावा ही विनंती.)
- डॉ. सुधीर रा. देवरे
Email: sudhirdeore29@rediffmail.com
इंटरनेट ब्लॉगचा पत्ता:
Dr sudhir Deore
sudhirdeore29.blogspot.com
💬 प्रतिसाद
(98)
द
द-बाहुबली
Tue, 10/27/2015 - 13:33
नवीन
अराजक नाही पण किंचीतसा विस्कळीतपणा येतोय का अशी बारीक शंका अधुन मधुन डोकावत असते. मी स्वतः विचार स्वातंत्र्याचा आदर करणारा प्राणी आहे. आणि व्यक्त होण्यात बंधने निर्माण होने मला मान्य नाही हे मी एका मराठी संस्थळावरील गाढवांना सुध्दा स्पश्ट शब्दात सुनावले होते अन बॅन झालो होतो. दुर्दैवाने असे आता सर्वांनाच सुनावण्याची वेळ येत असेल तर... आपण परिस्थीतीचे सुक्ष्मनिरीक्षन करुन आवश्यक ते बदल केले पाहिजेत, घटनेने तो अधिकार आपल्याला नक्किच दिला आहे.
- Log in or register to post comments
म
मारवा
Tue, 10/27/2015 - 14:06
नवीन
एक लक्षात घ्या विरोध ज्यांनी केलेला आहे त्यांची साधी व्हरायटी बघा
किती कीती वेगवेगळ्या विचारधारांचे भाषांचे साहित्यीक आहेत
आता गुलजारं सारखा एरवी अलिप्त असणारा माणुसही निषेध नोंदवतोय
थोरात संजय भास्कर जोशी कीती वेगळ्या विचारसरणीचे दोन्ही
नयनतारा सहगल हे सर्व इतक्या भिन्न भिन्न भाषा विचार चिंतन शैलीतले आहेत
तरीही
या सर्वांना कुठेतरी इतकं जास्त असह्य होत आहे की ते अतिशय अडचणीचा तापदायक ठरु शकतो असा स्टॅन्ड भुमिका घेत आहेत.
तेव्हा कुठे होता ? हा इतका थिल्लर प्रश्न या इतक्या मोठा प्रश्न उपस्थित केल्याला दिलेला प्रतिसाद कुठेच टीकत नाही.
- Log in or register to post comments
र
रामदास
Tue, 10/27/2015 - 16:17
नवीन
राधासुता तुझा धर्म ? अशा अर्थाने का ?
- Log in or register to post comments
व
विवेकपटाईत
Tue, 10/27/2015 - 15:10
नवीन
याला खाल्या मिठाला जगणे म्हणतात. कर्नाटक सरकारचा विरोध करा, उत्तर प्रदेश सरकारचा विरोध करा. केंद्र सरकारचा विरोध काही कळत नाही बा....
- Log in or register to post comments
आ
आनंदी गोपाळ
Fri, 10/30/2015 - 17:11
नवीन
पीएमो मधे नोकरीला आहात ना तुम्ही? ;)
- Log in or register to post comments
र
रामदास
Tue, 10/27/2015 - 16:22
नवीन
लेख विचार करायला लावणारा आहे पण विस्कळीत आहे असा भास झाला.
तसाही लेखाचा आशय वेगवेगळ्या माध्यमांतून चर्चेला आल्यामुळे प्रभावी वाटला नाही.
मिपासारख्या व्यासपिठाचा वापर विचार मंथनासाठी तुम्ही करत आहात हे स्वागतार्ह आहे.
पुलेशु.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Tue, 10/27/2015 - 16:36
नवीन
सर्व जण अराजक आहे म्हणून म्हणत आहेत पण याला उपाय काय आणी तो कसा करायचा यावर कोणाचाही ठोस उपाय येताना दिसत नाही.
ज्यांना मोदी सरकारला विरोध करायचा आहे त्यांच्याकडून सुद्धा पर्याय काय या वर मौन बाळगलेले दिसते. हे म्हणजे लग्न संस्था परिपूर्ण नाही पण त्याला पर्याय काय यावर उत्तर नाही. कांग्रेसचे सरकार राहुल गांधींच्या नेतृत्वा खाली हा पर्याय हास्यास्पद दिसतो. दुसरा कोणताही पक्ष त्या कुवतीचा दिसत नाही. मिलीजुली सरकारचा कार्यक्रम (COMMON MINIMUM PROGRAM) चा लसावी काढाल तर तो शून्य होता कारण त्यांच्यात COMMON ठोस असे काहीच नव्हते. होता तो फक्त भाजप विरोध.
त्यांची विचारसरणी पाकिस्तान सारखी आहे.पाकिस्तानच्या चारही राज्यांचा समन्वय नाही. एकच COMMON MINIMUM PROGRAM तो म्हणजे भारत विरोध. पण याने विकास तर होत नाही.
कलबुर्गी, दाभोलकर यांची हत्या झाली तेंव्हा तेथे कान्ग्रेसचेच राज्य होते आणी दादरी येथे हत्याकांड झाले तेथे हि भाजपचे सरकार नाहीच मग सपाच्या सरकारला तेथे सज्जड काम करायला कोण थांबवीत आहे? केजरीवाल आणी इतर लोकांना ज्यांचे सरकार तेथे नाही ज्यांचा त्याच्याशी कोणताही इतर सम्बन्ध नाही त्यांनी दादरीला जाण्याची (राजकारण सोडून) काय गरज होती?
त्यामुळे बर्याच वेळेस हे लेखक कांग्रेसच्या सरकारच्या मेहेरबानीने पारितोषिके मिळालेले आहेत आणी आता "त्यांचे" सरकार गेले म्हणून हि कोल्हेकुई चालू आहे हा उजव्या गटाच्या म्हणण्यास काही तरी आधार आहे असे वाटू लागले आहे.
- Log in or register to post comments
द
द-बाहुबली
Wed, 10/28/2015 - 14:18
नवीन
विचारवंतांच्या हत्या उलगडण्ञात येत असलेले अपयश हा साहित्यिकांच्या चिंतेचा महत्वाचा विषय आहे असे कोणालाच वाटत नाही काय ?
- Log in or register to post comments
अ
असंका
Wed, 10/28/2015 - 14:22
नवीन
आता कृपया हे कुणी वैयक्तिक घेउ नये, पण हा वरचा प्रश्न म्हणजे ज्याचं जळतं त्यालाच कळतं अशा अर्थी आहे का?
- Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध.वैद्य
Sat, 10/31/2015 - 12:13
नवीन
फक्त त्येंनी कर्नाटक, उत्तर प्रदेश सरकारच्या निषेधाबाबत अवाक्षर न काढता डायरेक्ट केंद्रावर हल्ला चढविला न ...
मग कसकाय हेतू प्रामाणिक म्हणायचं?
- Log in or register to post comments
ट
ट्रेड मार्क
Tue, 10/27/2015 - 17:37
नवीन
जाती आणी धर्मा वरून राजकारण सुरू करण्यात कॉंग्रेसचा मोठा हात आहे. इतकी वर्ष एका धर्माचं लांगुलचालन झालं, विविध आरक्षणं, झुकतं माप त्यांच्या पदरात पडलं. आता तथाकथित हिंदू विचारसरणीचं सरकार आहे असं वाटून काही आत्यंतिक कट्टर विचारसरणीचे लोक उन्माद आल्यासारखे वागत असतील. एखाद्या ग्रुप अथवा विचारसरणीच्या काही लोकांमुळे लगेच अराजक माजले आहे असं म्हणणे जरा अतिशयोक्तीचे होईल.
दादरी हत्या ही निंदनीय आहेच परंतु त्याबरोबरच प्रशांत पुजारीच्या हत्येबद्दल कोणीच काही बोलत नाही. दादरीची हत्या ही एका जमावानी केलेली होती त्यात पूर्वनियोजित काही नसावे असं वाटतं. प्रशांतची हत्या तर पूर्वनियोजित होती असा म्हणायला बराच वाव आहे. मुळात दादरी घटनेपेक्षा कितीतरी थरकाप उडवणाऱ्या, झोप उडवणाऱ्या, देश हादरवणाऱ्या घटना आधी पण घडल्या आहेत आणि नंतर पण घडल्या आहेत. माहिती नसल्यास सांगतो, प्रशांतची हत्या दादरी नंतर काही दिवसात झाली आणी दोन्ही घटनेमागचं कारण गोहत्या बंदी हे आहे. (मी दोन्ही किंवा कुठल्याच अतिरेकी घटनेचं समर्थन करत नाहीये).
केंद्र सरकारला एखाद्या व्यक्तीच्या हत्येमधे (हत्या करण्यामागे अथवा करवण्यामागे) एवढा इंटरेस्ट असावा असं वाटत नाही. त्यातूनही जर करायचीच असती तर सुमडीत केली असती, त्यासाठी कितीतरी मार्ग, प्रशिक्षित लोकं सहज उपलब्ध आहेत. तेथील घटनेची जबाबदारी खरं तर राज्य सरकारची आहे. त्यात केंद्र सरकारने काय करावे असं अपेक्षित आहे?
कोणी कुठले कपडे घालावेत या बाबत हिंदू धर्मापेक्षा मुस्लिम धर्मात जास्त कडक कायदे आहेत. आणी आपला त्यास विरोध आहे हे स्वागतार्ह आहे. राहिला गोमांस भक्षणाचा मुद्दा तर त्यावर दुसर्या एका धाग्यात बरीच चर्चा झाली आहे.
अजून एक मुद्दा म्हणजे, निवडणुकीच्या काळात कॉंग्रेसचे नेते म्हणतच होते की भाजपाचं सरकार आलं तर जातीय दंगे होतील. कश्यावरून तसे दंगे व्हावेत असे प्रयत्न केले जात नसतील?
सहिष्णुता ही भारतात राहणाऱ्या सर्व लोकांनी पाळणे जरुरीचे आहे, मग तो कुठल्याही धर्माचा असो. खरं तर मानवता हाच (फक्त) धर्म स्वीकारण्याची सर्व जगातच वेळ आली आहे.
- Log in or register to post comments
त
तर्राट जोकर
गुरुवार, 10/29/2015 - 12:55
नवीन
ट्रेड मार्क,
हा प्रश्न तुम्ही आधी एका धाग्यावर विचारला होता. की प्रशांत पुजारी बद्दल कोण का बोलत नाही?
इथे ते उत्तर सापडतं का बघा:
Prashant Poojary was a Bajrang Dal activist in Moodbidri. The Bajrang Dal has self-admittedly used violence as a weapon against minorities (don't believe me, meet Babu Bajrangi in Gujarat or listen to him in a Tehelka expose). Poojary has been allegedly involved in cases of intimidation and violence in the region. He was fighting the “beef Mafia” as part of the anti-cow slaughter agitation.
Poojary was part of a political war between the Bajrang Dal and minority group outfits, some of them with criminal links. Can his killing be compared to Mohammed Akhlaq, an innocent householder whose only crime was that he was the victim of a rumour that he had stored beef and belonged to a particular religion. Naturally, the outrage over a hate crime will be and must be greater in his case.
दोन केसमधला मूलभूत फरक लक्षात येत असेल तर दोन व्यक्तिंचे धर्म बघण्यात काय पॉईंट आहे?
- Log in or register to post comments
ट
ट्रेड मार्क
गुरुवार, 10/29/2015 - 16:09
नवीन
यात मूलभूत फरकापेक्षा मूलभूत साम्य आहे की दोघांची हत्या झाली. तुमच्या प्रतिसादात असं वाटतंय की तुम्ही प्रशांतच्या हत्येचं समर्थन करताय आणी अख्लाक च्या हत्ये बद्दल मात्र तुम्हाला वाईट वाटतंय.
फरकाबद्दल बोलायचं तर अख्लाकची हत्या जमावानी मारहाण करून केली आणी प्रशांतची हत्या धारदार शास्त्रांनी झाली. योग्य काय होतं तर दोन्ही घटनेत पोलिसांच्या हाती आरोपीला सुपूर्द करणं, जे झालं नाही.
नुसतं शिरोमणी राजदीप सरदेसाई म्हणतात म्हणून प्रशांत "Poojary was part of a political war between the Bajrang Dal and minority group outfits, some of them with criminal links.". या गोष्टीचा काही पुरावा आहे का? त्यानी किती हत्या, मारामाऱ्या, दंगे यात भाग घेतला होता? त्याच्यावर किती गुन्हे पोलिस चौकीत नोंदलेले आहेत? तसे अख्लाक वर पण तिथल्या स्थानिक लोकांनी चोरीचे आरोप केले आहेत.
मुळात मी धर्माबद्दल काहीच म्हणत नाहीये. दोघेही भारतीय होते तर दोघांना सारखी वागणूक मिळायला हवी हा मुद्दा आहे.
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Sat, 10/31/2015 - 11:00
नवीन
तजो,दोन व्यक्तींची हत्या झाली आहे. एक एअरफोर्सचा कर्मचारी होता आणि दुसरा एका हिंदुत्ववादी संघटनेचा कार्यकर्ता होता पण कायद्याच्या दृष्टीने दोघेही सारखे. निदान या देशात तरी. अर्थात मिडियाच्या आणि आदर्श लिबरल सिक्युलर्सच्या दृष्टीने एका मुस्लिम माणसाचा मृत्यू हा जास्त महत्वाचा आहे आणि हिंदू माणसाचा नाही हे तुमच्या प्रतिसादावरुन समजतंच. शिवाय बाबू बजरंगीला त्याच्या कृत्यांबद्दल जन्मठेपेची शिक्षा झाली आहे, पण ते कुणा तहलकाने expose केलं म्हणून नाही, तर कोर्टात त्याचा गुन्हा सिद्ध झाला म्हणून. तसा प्रशांत पुजारीच्या गुन्ह्यांबद्दल आहे का? आणि अशा भेदभावामुळेच हिंदू - मुस्लिम तेढ वाढायला मदत होते आहे हे आदर्श लिबरल्सना कधी समजणार आहे? हत्या ही हत्या असते. जसा गुन्हेगारांना धर्म नसतो तसा त्यांच्या बळींनाही धर्म नसतो. पण कोणी त्यावरून मिळालेल्या पुरस्कारांचा त्याग करेल असं वाटत नाही.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sun, 11/01/2015 - 10:43
नवीन
चूक. बळींना धर्म असतो आणि त्यांच्या मारकर्यांनाही धर्म असतो आणि बळी व मारेकर्यांच्या धर्मावरून पुरोगामी आणि निधर्मी विचारवंतांची प्रतिक्रिया ठरते. याच्यात साधारणपणे खालील वर्गवारी असते.
(१) बळी हिंदू, मारेकरी अहिंदू
पुरोगामी आणि निधर्मी विचारवंतांची प्रतिक्रिया - संपूर्ण दुर्लक्ष करून मौन पाळणे आणि या घटनेचा चुकुनही उल्लेख न करता मारेकर्यांविरूद्ध चकार शब्द न काढणे. समजा कोणी चिकाटीने प्रतिक्रिया विचारली तर बळी पडलेला बजरंग दल, संघ इ. गुंड संघटनेचा गुंड सदस्य होता व ही हत्या धार्मिक द्वेषातून झालेली नसून हा राजकीय खून आहे असे सांगून प्रश्न झटकून टाकणे.
उदाहरणे - ओरिसामधील स्वामी लक्ष्मणानंद व त्यांच्या ४ शिष्यांची धर्मांतर प्रकरणावरून ख्रिश्चनांनी केलेली हत्या, बीफला विरोध केल्यामुळे कर्नाटकातील मुस्लिमांनी केलेली प्रशांत पुजारीची हत्या, बीफबंदीमुळे संतापलेल्या मौलवीने नमाजाच्या वेळी प्रक्षोभक भाषण करून डिवचल्यामुळे एका मुस्लिम युवकाने बंदोबस्तावर असलेल्या पोलिसाला भोसकल्याचे प्रकरण इ.
(२) बळी हिंदू, मारेकरी हिंदू
पुरोगामी आणि निधर्मी विचारवंतांची प्रतिक्रिया - संपूर्ण दुर्लक्ष करून मौन पाळणे
(३) बळी अहिंदू, मारेकरी अहिंदू
पुरोगामी आणि निधर्मी विचारवंतांची प्रतिक्रिया - संपूर्ण दुर्लक्ष करून मौन पाळणे
(४) बळी अहिंदू, मारेकरी हिंदू
पुरोगामी आणि निधर्मी विचारवंतांची प्रतिक्रिया - प्रचंड आरडाओरडा करून निषेध करणे, थेट मोदींना जबाबदार धरणे, देशात भीतिचे व दडपशाहीचे वातावरण आहे असे वेगवेगळ्या परिसंवादांमध्ये सांगत रहाणे, वृत्तपत्रातून लेख लिहून हिंदुत्ववादी संघटनांचा फॅसिस्ट, दहशतवादी, अतिरेकी असा उल्लेख करणे, मिळालेले पुरस्कार परत करण्याचे नाटक करून प्रसिद्धीच्या झोतात येण्याचा प्रयत्न करणे इ.
(५) बळी अहिंदू किंवा यांच्यासारखाच निधर्मी, पुरोगामी, विचारवंत इ.इ. आणि मारेकरी अज्ञात
पुरोगामी आणि निधर्मी विचारवंतांची प्रतिक्रिया - रचंड आरडाओरडा करून निषेध करणे, थेट मोदींना जबाबदार धरणे, देशात भीतिचे व दडपशाहीचे वातावरण आहे असे वेगवेगळ्या परिसंवादांमध्ये सांगत रहाणे, वृत्तपत्रातून लेख लिहून या हत्येमागे हिंदुत्ववादी संघटनांचा फॅसिस्ट, दहशतवादी, अतिरेकी चेहरा आहे असा कोणत्याही पुराव्याविना सतत आरोप करीत राहणे, मिळालेले पुरस्कार परत करण्याचे नाटक करून प्रसिद्धीच्या झोतात येण्याचा प्रयत्न करणे इ.
- Log in or register to post comments
र
रमेश आठवले
Sun, 11/01/2015 - 18:33
नवीन
छान विश्लेषण
- Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध.वैद्य
Sat, 10/31/2015 - 12:16
नवीन
म्हणजे बजरंग दल दंगा करत म्हणून त्यांना कापायचं असंच न?
- Log in or register to post comments
अ
अर्धवटराव
Wed, 10/28/2015 - 03:00
नवीन
निर्भया वगैरे प्रकरणांमुळे जी संवेदना द्रवली नाहि, सलमानभौला कायद्याच्या कचाटीत आणणार्या पाटलाच्या पोराचे हाल-हाल मरण बघुन ज्या प्रतिभेला पाझर फुटला नाहि, नाना-मक्या फाटलेल्या आभाळाला ठिगळ लावायचे प्रयत्न करत असताना अशी परिस्थिती मुळात उद्भवलीच कशामुळे वगैरे प्रश्नांनी जी सद्भावना जागी झाली नाहि, ति अचानक देशातलं वातावरण फार म्हणजे फारच -ते हि अचानक, आणि काहि केंद्र शासनाने मुद्दाम तसं केल्यामुळे - अगदी झंकारुन उठली आहे. साहित्यीकांचा फार फार अभिमान वाटतो आहे मला :)
बाकि हा लेख साहित्यीक चळवळीची पुढील पायरी म्हणावा असा फक्कड जमुन आला आहे.
अवांतरः मानवी जीवनाचं अवमुल्यन घडवणार्या घटकांना सरळ पोलिसी दंडुके वापरुन दोन मिनीटात ठीक करता येतं... आणि राज्य सरकारे तसं अगदी सहज करु शकतात. किंबहुना ते त्यांचं प्रथम कर्तव्य आहे. पण अशा किरकोळ मुद्द्यांना फाट्यावर मारलेलं बरं. :)
- Log in or register to post comments
प
प्यारे१
Wed, 10/28/2015 - 15:23
नवीन
+१
देर से आये दुरुस्त आये म्हणून आम्ही देखील साहित्यिकांचे अभिनंदन करतो.
तरीही अर्धवटरावांच्या प्रतिसादाचा निषेध.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Mon, 11/02/2015 - 10:34
नवीन
हे खरे नाही. हे तथाकथित विचारवंत देरीने आलेले नाहीत आणि दुरूस्त देखील आलेले नाहीत. पुरस्कार ऑक्टोबर २०१५ मध्ये करण्यामागची त्यांची मुख्य कारणे खालीलप्रमाणे -
(१) २० ऑगस्ट २०१३ रोजी नरेंद्र दाभोलकरांचा खून (केंद्रात सत्ताधारी - युपीए, राज्यात सत्ताधारी - काँग्रेस + राष्ट्रवादी)
घटना घडून २ वर्षांहून अधिक काळ लोटल्यानंतर यांना जाग आली. खुनानंतर तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग व तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना दोष दिला नाही.
(२) २० फेब्रुवारी २०१५ रोजी गोविंद पानसरेंचा खून (केंद्रात सत्ताधारी - भाजप, राज्यात सत्ताधारी - भाजप)
घटना घडून ७ महिन्यांहून अधिक काळ लोटल्यानंतर यांना जाग आली. खुनानंतर तत्कालीन पंतप्रधान मोदी व तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांना दोष दिला नाही.
(३) ३० ऑगस्ट २०१५ रोजी कलबुर्गींचा खून (केंद्रात सत्ताधारी - भाजप, राज्यात सत्ताधारी - काँग्रेस)
घटना घडून १ महिन्यांहून अधिक काळ लोटल्यानंतर यांना जाग आली. खुनानंतर तत्कालीन पंतप्रधान मोदी व तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांना दोष दिला नाही.
(४) .............
(५) ३० सप्टेंबर २०१५ रोजी दादरी येथे अखलाखचा खून (केंद्रात सत्ताधारी - भाजप, राज्यात सत्ताधारी - सपा)
आता मात्र यांना जाग आली. खुनानंतर तत्कालीन पंतप्रधान मोदींवरच या खुनासाठी व सर्व आधीच्या खुनांसाठी दोष द्यायला सुरूवात झाली. कर्नाटकचे तत्कालीन मुख्यमंत्री सिद्धरामय्या व उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचा नामोल्लेखही नाही.
(६) .............
काही जणांना वाटले की पूर्वी हे जागे झाले नव्हते, पण निदान उशीरा का होईना हे जागे झालेत हे चांगलेच झाले. परंतु हे उशीरा जागे झाले आणि योग्य कारणासाठी जागे झाले हे खोटे आहे. कारण वर न लिहिलेली घटना क्रमांक (४) आणि (६).
(४) २५ सप्टेंबर २०१५ रोजी यवतमाळमध्ये अब्दुल मलिक नावाच्या एका मुस्लिम तरूणाने नमाज संपल्यावर बंदोबस्तावर असलेल्या एका पोलिसाला भोसकले. गोवंश हत्याबंदीमुळे संतापलेल्या एका मौलवीने प्रक्षोभक भाषण करून चिथावणी दिल्यामुळे अब्दुल मलिकने एका पोलिसाला भोसकले व इतर २ पोलिसांवर हल्ला केला. While stabbing him, an angry Malik allegedly shouted, “Tumhari government beef ban karti hai, toh yeh lo (Your government bans beef, so you suffer).” Malik allegedly also attacked two more constables who tried to intervene.
http://indianexpress.com/article/india/india-news-india/maharashtra-constable-stabbed-to-avenge-beef-ban-hunt-on-for-maulana/
ही घटना दादरीच्या ५ दिवस आधी म्हणजे २५ सप्टेंबरला घडली. हा उघडउघड जातीयवादी द्वेषातून केलेला हल्ला होता. या घटनेवर आजतगायत पुरस्कार परत करणार्यांपैकी एकानेही तोंड उघडलेले नाही.
(६) ८ ऑक्टोबर २०१५ रोजी मंगळूरमध्ये प्रशांत पुजारीला अनेक मुस्लिमांनी एकत्र येऊन त्याचा खून केला. कारण तो गोवंशहत्येला विरोध करीत होता. हा उघडउघड जातीयवादी द्वेषातून केलेला हल्ला होता. या घटनेवर आजतगायत पुरस्कार परत करणार्यांपैकी एकानेही तोंड उघडलेले नाही. जर हे विचारवंत "देर आए, दुरूस्त आए" होते, तर दादरीनंतर घडलेल्या निदान या हल्ल्याचा तरी त्यांनी निषेध करायला हवा होता. पण तसे झालेले नाही, कारण वरील दोन्ही घटनात हल्लेखोर मुस्लिम होते व बळी हिंदू होते.
http://www.daijiworld.com/news/news_disp.asp?n_id=363789
हे सिलेक्टिव्ह निषेध करतात हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. यांचा ढोंगीपणा पुन्हा एकदा सिद्ध झालेला आहे. दादरी घटनेच्या आधी आणि नंतर घडलेल्या घटनेबद्दल मौन पाळताना यांनी फक्त दादरीचाच निषेध केला कारण दादरीचे हल्लेखोर हिंदू होते व बळी मुस्लिम होता आणि इतर २ घटनांमधील हल्लेखोर मुस्लिम होते व बळी पडलेले हिंदू होते.
हे तथाकथित विचारवंत देरीने आलेले नाहीत आणि दुरूस्त देखील आलेले नाहीत. नक्की कोणत्या घटनेचा निषेध करायचा आणि कधी तोंड बंद ठेवायचे हे यांना चांगलेच समजते. दुसर्या एका प्रतिसादात लिहिल्याप्रमाणे यांचे वर्तन हे हल्लेखोरांचा धर्म व बळी पडलेल्यांचा धर्म यावर ठरते.
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Mon, 11/02/2015 - 10:55
नवीन
देरीने दुरुस्ती केल्याबद्दल प्यारेंचा णिशेढ !!
- Log in or register to post comments
भ
भंकस बाबा
गुरुवार, 10/29/2015 - 19:50
नवीन
- Log in or register to post comments
आ
आकाश कंदील
Wed, 10/28/2015 - 12:42
नवीन
एक दुर्लक्ष करण्यायोग्य धागा
- Log in or register to post comments
न
नया है वह
गुरुवार, 10/29/2015 - 09:35
नवीन
आणी हो ते पुरस्कार परत करणारे सुध्दा दुर्लक्ष करण्यायोग्यच
- Log in or register to post comments
र
रामदास
Wed, 10/28/2015 - 15:16
नवीन
धागा वाचनीय आहे. चर्चा होणे आवश्यक आहे. आपण सर्वच या संस्थळावर संवेदनाशील नागरीक आहोत. जर दुर्लक्ष करण्यायोग्य धागा असेल तर तुमच्या मताचेही स्वागत असावे पण तुम्हीही हा धागा दुर्लक्ष करण्यासारखा का आहे या बद्दल चार शब्द लिहावे.
- Log in or register to post comments
आ
आकाश कंदील
गुरुवार, 10/29/2015 - 09:06
नवीन
रामदास साहेब प्रतिसादाबद्दल आभार. मी "एक दुर्लक्ष करण्यायोग्य धागा" असे लिहिले कारण मला "अर्धवटराव " आणि "ट्रेड मार्क" यांचे मुद्दे पटले आणि तेच परत आपले म्हणून लिहावेसे नाही वाटले. मला वाटते विरोधी पक्ष सरकारला विरोध करणार आणि आपल्या देशात तर बरेचवेळा विरोध करायचा म्हणून केला जातो. म्हणूनच पत्रकार आणि माध्यमांनी तरी संतुलित विचार करावा असे मला वाटते. माझ्या माहिती प्रमाणे "साहित्य अकादमीने " आत्ता पर्यंत १२२७ पुरस्कार दिले आहेत.(तज्ञ योग्य आकडा सांगतीलच) त्यातील धागा लेखक "डॉ. सुधीर रा. देवरे" यांच्या सांगण्याप्रमाणे आत्तापर्यत २० पुरस्कार परत केले गेले. म्हणजे अंदाजे १.६३% म्हणजे दुसरा अर्थ असा कि ९८.३७ % साहित्यिकांनी पुरस्कार परत केले नाहीत आणि खचितच हा आकडा दुर्लक्ष करण्या एवढा नाहि. तरी TV वाहिन्यावर, पेपरात सर्वत्र एकच विषय त्यावरच चर्चा.
गोमांस बंदी हा कायदा फार पूर्वीपासून लागू आहे. तो मुद्दा मला वाटते माध्यमे मुद्दाम उकरतात, कोणीतरी साक्षी महाराज, उमा भारती, वि. के. सिंग यासारक्या विचार करून न बोलाण्यार्या व्यक्तींचा साक्षात्कार घेतात आणि ते बोललेले आणि नबोललेले असे म्हनून "breaking news" म्हणून खपवतात. आणि वर अपेक्षा कि जरी सरकारने, पक्ष म्हणून भाजपने यावर नापंसन्ति दर्शवली तरी मोदिनी त्याचे खंडन करावे, आता जरी ते केले तरी इतक्या उशिरा का केले म्हणून आक्षेप. मला वाटते एखादा पक्ष किवा व्यक्तीचे कोणीच समाधान करू शकणार नाही जर त्यांना तसे जाणूनबुजून करून घ्यायचे नसेल तर. मला तर या सर्व पुरस्कार वापसी मागे मोठी राजकीय शक्ती काम करत असावी असे वाटते. मला एक विचारेवेसे वाटते अत्तापार्यत कित्ती लेखक आणि पत्रकार प्रशांत पुजारीच्या हत्येबद्दल बोलले, कश्मीरी निर्वासित लोकांबद्दल बोलले, आसामातील सामुहिक हत्याबद्दल बोलले, बंगाल मधील "Nalhati" गावात ३ वर्ष दुर्गापूजा होऊन दिली जात नाही ती का ?. का त्याला त्यांच्या भाषेत TRP मुल्य नाही म्हणून. दादरी हत्याकांड किवा या सारख्या नृशंस घटना घडणे कधीही दुख दायक, पण यासारख्या घटनांना रोज प्रसारित करून आपण समाजातील तेढ वाढवत असतो.
शेतकऱ्याच्या आत्महत्या, G.S.T. विधेयक, कमी होणारे पेट्रोलचे भाव, वाढणारे डाळीचे भाव, लघु उद्योजकाकरिता असणारी मुद्रा बँक योजना, pension योजना, परराष्ट्र धोरण, वाढणारे जमिनीचे भाव यासारख्या विषयावर अळीमिळी गुपचिळी आणि भावनिक मुद्दे पहिल्या पानावर. सहज आठवले दोन दिवसापूर्वी लोकसत्ता पेपरमध्ये कोजागिरीचा चंद्र ढगाळ हवामांमुळे नीट दिसणार नाही हि पहिल्या पानावरिल मोठी सचित्र बातमी आणि कित्येक तरुणांना अपेक्षित आणि दिलासा देणारी बातमी म्हणजे आता ब, क ड वर्गाना (Gazette officer सोडून) साक्षात्काराची गरज नाही हि बातमी आतील ४ थ्या पानावर ती पण १० ओळीत. आता काय बोलणं दादा सांगा
- Log in or register to post comments
र
रामदास
गुरुवार, 10/29/2015 - 15:39
नवीन
उदाहरणार्थ : शेवटच्या परीच्छेदातील अत्यावश्यक बाबींबद्द्ल.
आता प्रश्न मनात येतो तो असा की मिडीया हे प्रश्न मुख्यपृष्ठावर का आणत नाहीत ?
मला असे वाटते की इतरांप्रमाणे (इतर उद्योगाप्रमाणे) खपणारा माल ते शोकेस मध्ये आणून ठेवतात. विचार करायला लावणार्या बातम्या वाचकांना निरस वाटत असाव्या असे त्यांचे निरीक्षण असावे. हाच प्रकार राजकारणी व्यक्तिंचा असावा. एरवी "ऑल्सो रॅन " या यादीत बसणारे "काय बरळत आहेत " असा माझ्या मनात विचार येतो तेव्हा "वा! काय बोलले हो ?" असे म्हणणारे पण असतीलच. तूर्तास त्यांची संख्या जास्त असली तर मिडीया त्यांना अनुकुल असे मथळे देत राहणार आहे.
आता मूलतत्ववादी( हा शब्द बरोबर आहे का ?) सरकार येऊन अराजक माजेल का ? असा प्रश्न लेखकाने मांडण्याचा प्रयत्न केला आहे. ही त्या लेखकाच्या मनातील भिती बोलत आहे असे मी मानतो. पण असे भितीदायक प्रश्न वारंवार मनात यावे ही स्थिती प्रत्येकाच्या मनात उभी राहत असेल. लेखकाने ती मांडून दाखवली आहे.
अशा परीस्थितीत आपण सर्वजण जी चर्चा करत असतो त्या चर्चेची दखल कुठेतरी घेतली जातच असेल असे मला वाटते.(किंबहुना मला तशी खात्री आहे .)
या निमित्ताने तुम्ही चर्चेत भाग घेतला हे पण महत्वाचे आहे. धन्यवाद.
- Log in or register to post comments
अ
अमृत
गुरुवार, 10/29/2015 - 09:29
नवीन
आशा आहे तुम्हाला मंगल पांडेनी पहिली गोळी का चालवली याचं कारण माहिती असेलच. जर खाण्याविशयी बोलाल तर का म्हणून एका विशिष्ट समूहातील लोकांचे लाड करावेत. जर त्यांच्या काही सवयी बहुतांशांच्या भावन दुखावणार्या असतील तर त्यांनीसुद्धा थोडी अॅडजस्टमेंट का करू नये?
प्रश्न हाच आहे की घंटा बांधणार कोण? गेल्या कित्तेक दशकांपासून लाडोबा बनवून ठेवलय तेव्हा बदल मान्य करताना त्रास होणारच.
- Log in or register to post comments
त
तर्राट जोकर
गुरुवार, 10/29/2015 - 12:52
नवीन
ओके ओके, आपण भारतात भगवा तालिबान आणण्याच्या समर्थनात आहात तर...
- Log in or register to post comments
द
द-बाहुबली
गुरुवार, 10/29/2015 - 13:33
नवीन
घाबरु नका हो, भगवा तालिबान म्हणजे सावरकरांना अभिप्रेत नसलेले हिंदुराष्ट्र म्हणताय का ?
ते होणार नाही कारण एवरीवन नोज हिंदु राश्ट्रा इज अ फेल्ड कॉन्सेप्ट... जेव्हां फक्त ब्राम्हणांना शिक्षणाधीकार होते भारताची अवस्था शिक्षण क्षेत्रात काय होती ? जेंव्हा फक्त क्षत्रीयांकडे संरक्षणाच्या जबाबदार्या होत्या, संरक्षण क्षेत्रात भारताची अवस्था काय झाली ? जेंव्हा फक्त वैश्य व्यापार करत होते भारताची अवस्था व्यापारात काय होती किती भारतीयांनी वसाहती निर्माण केल्या ? इन इंडीया एवरीवन नोज.. भगवा तालिबान इज ह्युज फेल्युअर. जे शतकोनशतके मुघल राजवटीखाली राहुन उमजले नाही ते दिडशे वर्षात इंग्रज राजवटीमुळे कळाले ते म्हणजे सावरकरांना अभिप्रेत नसलेले हिंदुराष्ट्र हे भारताचे न भुतो न भवीष्यती अपयश आहे अन पुन्हा तोच ऐतीहासीक चुकांचा कित्ता गिरवायची हौस/क्षमता भारतीय जनतेत आता नक्किच उरली नाही.
- Log in or register to post comments
त
तर्राट जोकर
गुरुवार, 10/29/2015 - 13:02
नवीन
भाजप सरकारला पाठीशी घालणारे प्रतिसाद पाहिले की तळपायाची मस्तकात जाते. शिवाय मुद्दे मांडायची एक टिपिकल पद्धत आहे. समोरच्याला चकवून खर्या मुद्द्याला सोयिस्कर बगल द्यायची. कंटाळा आलाय तिच्यायाला....
ठिक आहे बाबा... करा हिंदूराष्ट्र. दाखवा तुमचा हिंदूअभिमान. तुमचे सर्व प्रॉब्लेम्स देश हिंदूराष्ट्र नसल्यामुळेच आहे. तुरीच्या डाळीचे भाव वाढले ते एक मायचा लाल पुढे नाही आला विरोध करायला. इथे सारी भाजपाची तळी धरतायत. व्वारे देशप्रेम. कि फक्त पक्ष-प्रेम, कि जाती-प्रेम?
- Log in or register to post comments
भ
भंकस बाबा
गुरुवार, 10/29/2015 - 20:05
नवीन
मी पण मला इयत्ता पहिलीत चमचा गोटी स्पर्धेत मिळालेले तृतीय क्रमांकाचे पारितोषिक शाळेला परत करत आहे. आता मलापण टीवी वर झळकन्याचा मोका द्या
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Sat, 10/31/2015 - 11:11
नवीन
अच्छा! म्हणजे तुम्हाला या देशात हुकूमशाही हवी आहे तर! बरं, तो मागे एक धागा झोपवण्याची वगैरे वल्गना केली होती, त्याचं काय झालं? जे सरकार या देशात व्यवस्थित बहुमत मिळवून निवडून आलेलं आहे, त्याला पाठिंबा देणारे प्रतिसाद पाहिल्यावर जर तुमची तळपायाची आग मस्तकाला वगैरे जात असेल तर मग लोकशाही तुम्हाला मान्य नाही असाच अर्थ निघतो त्यातून. उद्या काँग्रेसचं किंवा इतर पक्षाचं सरकार आलं तर आमच्या तळपायाची आग वगैरे काहीही मस्तकाला जाणार नाही. बहुमताने आलेलं सरकार स्वीकारणं आणि त्या मताचा सन्मान करणं ही लोकशाही आहे आणि ज्यांच्या तळपायाची वगैरे फालतू आगी मस्तकात जातात, त्यांनी स्वतःमध्ये लोकशाही रुजवावी!
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
गुरुवार, 10/29/2015 - 14:52
नवीन
हिंदू राष्ट्र कुणाला हवे आहे? आम्हाला भारत देश हवा आहे.
आम्हाला निधर्मी राष्ट्र हवे आहे. अल्पसंख्यांकांचे तुष्टीकरण करणारे नव्हे.
गोमांस खावे कि नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. गोवध बंदीला व्यक्तीशः माझा विरोध आहे. जातीव्यवस्था किंवा चातुर्वर्ण्य पद्धतीला कोण पाठींबा देत आहे ? या गोष्टी केंव्हाच( निदान १००० वर्षापूर्वी) कालबाह्य झाल्या आहेत.
माझा विरोध या तथाकथित सेक्युलर विचारवंतान्बद्दल आहे जे याकुब मेमन च्या फाशीच्या वेळेस सर्वोच्च न्यायालयावर टीका करायला पुढे आले. अल्पसंख्यांकांचे तुष्टीकरण म्हणजे सेक्युलर हा गैरसमज दूर करणे आवश्यक आहे. अल्पसंख्यांकाना त्यांच्या संस्थामध्ये ५० टक्के राखीव जागा हे कसे चालवून घेता येईल.
भगवा तालिबान कुणालाच नको आहे. गायीचे शेण पवित्र म्हणून खाण्याची किती लोकांची तयारी असेल? आपली परंपरा कितीही थोर असली तरी मोक्ष घोर आहे हे शाहीर रामजोशी नि म्हटले आहे. आपण ओडीसा मध्ये न गन्ज्णारे लोखंड २००० वर्षापूर्वी बनवत होतो म्हणून ते तंत्रज्ञान आज वापरणार का? किंवा पारंपारिक ज्ञान/ तंत्र वापरून रस्ते घरे बांधणार का किंवा आधुनिक रुग्णालये/ वैद्यकीय महाविद्यालये बंद करुन जुन्या पद्धतीची गुरु शिष्य परंपरेचे पुनरुज्जीवन करणार का? अर्थातच नाही.
धर्म हा घरातच असावा या विधानाला येथील बहुसंख्य लोक पाठींबा देतील मग मशीदीवर असो कि गणेशोत्सवात असो बोंबल्या (लाउड स्पीकर) नकोच असेच बहुसंख्य म्हणतील). कानठळ्या बसवणारे ढोल ताशे हि नकोत किंवा महा मिरवणुकाही नकोत. प्रत्येक गावात एकच मंदिर( त्यात हव्या तितक्या मूर्त्या ठेवा) एकच मशीद असावी. एकच चर्च असावे अल्पसंख्यांकांना सवतासुभा बंद असावा. विज्ञानाची कस धरून पुढच्या शतकात जाणारा भारत हवा आहे. मान्य आहे हे फारच आदर्शवादी तत्वज्ञान आहे.
राहिली गोष्ट डाळीचे भाव-- मागच्या सरकारच्या वेळेस कांद्याचे भाव गगनाला भिडले होते तेंव्हा हे विचारवंत कुठे होते? भाव वाढ झाली याचे कारण व्यापारी साठेबाजी करतात म्हणून सरकार नेहमीप्रमाणे सावकाश काम करते. पण केवळ एक अजेंडा घेऊन विखारी प्रचार करणाऱ्या या तथाकथित बुद्धीवान्तानचा संताप येतो. डाळींचा भाव हे पुरस्कार परत करण्याचे कारण असू शकते का ?
महागाई हे कारण घेऊन सरकारला झोडपण्याचा हेतू विचारवंतानी का करावा त्यासाठी विरोधी पक्ष आहेतच कि. मग स्वच्छपणे तुम्ही त्या पक्षात सामील व्हा आणि बोला. संताप यांच्या दुटप्पीपणाचा आहे.
भाववाढ झाली तर त्याबद्दल काय भाजप प्रेमी खुशीत आहेत का?
अराजक अराजक म्हणून जो साप म्हणून भुई बडवण्याचा अश्लाघ्य प्रकार चालू आहे तो बंद झाला पाहिजे.
- Log in or register to post comments
त
तर्राट जोकर
गुरुवार, 10/29/2015 - 15:09
नवीन
माझ्या वरच्या प्रतिसादातला पहिला मुद्दा उदाहरणासहित सिद्ध करणारा प्रतिसाद लगेच....! :-)
काँग्रेस सरकारकाळात कांद्याच्या भावाच्या वेळेस, महागाईबद्दल भक्तगण आरडाओरडा करत होते ते आता कुठे गेले...? तेव्हा सोशलमिडीयावरून भरभरून महागाईचे संदेश वाहत होते, आता फक्त गाईचे संदेश वाहतात.... आता अच्छे दिन आलेत ना. भाजपप्रेमींना तोंड कुठे राह्यलंय. त्यांचं तोंड ह्या फालतूच्या चर्चा करण्यात बीझी आहे.
डोळे मिटून दूध पिणार्या भाजपाला जग आंधळं नाही हे कधी समजेल...?
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
गुरुवार, 10/29/2015 - 15:18
नवीन
दोन मुद्द्यांची सरमिसळ
- Log in or register to post comments
द
दत्ता जोशी
गुरुवार, 10/29/2015 - 18:49
नवीन
सोप्प आहे. मुद्दे संपले कि विषय भरकट्वत न्यायचा. हीच तर खासियत आहे ना असल्या विचारवंतांची. हेतू पुरस्सर ठराविक घटना हायलाईट करायच्या आणि तशाच दुसर्या घटनेकडे डोळेझाक करायची मग हिंदू राष्ट्र , महागाई, गोहत्या बंदी, बाजारू विचारवंतांचे सिलेक्तीव्ह मुद्दे उगीच फिरून फिरून टाकत राहायचे. आणि गोंधळ निर्माण करायचा प्रयत्न करायचा. मग काही मिळाल नाही कि काश्मिरी पंडिताची हत्या झाली तेव्हा तुम्ही कुठे होता, मग तुमचे पूर्वज कसे भित्रे आणि अल्पसंतुष्ट होते असला काहीही लिहित सुटायचं आणि काय.
हि सगळी घुसमट वेगळ्याच कारणासाठी आहे. व्यवस्था बदलतांना आधीच्या व्यवस्थेत विरघळून गेलेल्यांना होणारा त्रास अशी याची व्याख्या करावी लागेल. मग मिळेल तो मुद्दा म्येग्निफाय करावाच लागणार. प्रत्येक गोष्टीला धर्माचा, जातीयवादाचा रंग द्यावा लागणार. महागाई रोखण्यात भाजपा ला अपयश आला हे मोठ्या प्रमाणात खरा असला तरी भ्रष्टाचार आणि शासकीय यंत्रणांमधली अंदाधुंदीवर फास आवळण्याचा भाजपचा प्रयत्न प्रामाणिक वाटतोय तेव्हा बर्याच लोकांची घुसमट हि होणारच.
- Log in or register to post comments
त
तर्राट जोकर
गुरुवार, 10/29/2015 - 15:29
नवीन
अगदी अगदी.....! त्यात नवीन काय..?
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
गुरुवार, 10/29/2015 - 15:43
नवीन
म्हणजे मूळ धाग्यात महागाई ई. विषयांचा उल्लेखही नसताना आपण तो ओढून ताणून आणता आहात "तुरीच्या डाळीचे भाव वाढले ते एक मायचा लाल पुढे नाही आला विरोध करायला" तर आपला भाजप द्वेषच दिसून येतो आहे.
राहिली गोष्ट आपला आय डी ७ महिने ३ आठवडे नवा असताना आपल्याला अगोदरच्या सरकारच्या वेळेस मि पा वर झालेली आरडा ओरड कशी आठवली?
"काँग्रेस सरकार काळात कांद्याच्या भावाच्या वेळेस, महागाईबद्दल भक्तगण आरडाओरडा करत होते ते आता कुठे गेले...?"
असो. आपले पाय किती पाण्यात आहेत ते पहा.
- Log in or register to post comments
त
तर्राट जोकर
गुरुवार, 10/29/2015 - 16:09
नवीन
बाब्बौ, डॉक्टर.....? आर यु ऑल राइट..?
तुमच्या प्रतिसादावरून असं समजतंय की मिपा हेच आंतरजालावरचे एकमेव सोशल मिडिया संस्थळ आहे. मिपावरच्या आयडी फक्त मिपावर झालेल्या चर्चांचे संदर्भ घेऊन बोलत असतात. सदस्य झाल्यावरच मिपा वाचू शकतात. मिपा आयडीचे वय हा त्याच्या प्रत्यक्ष वयाचा दाखला आहे.
मिपाच्या बाहेरही एक भल्लं मोठ्ठं जग आहे हे तुमच्या सारख्या ज्येष्ठ सद्स्यांना मी सांगावं हे काय बरोबर दिसणार नाही.
पुरस्कार परत करणार्यांवर सगळ्या सोशलमिडीयासंस्थळांवरून भक्तगण चिखलफेक करण्यात मश्गुल आहेत. गायीचे धार्मिक महत्त्व पटवण्यात मश्गुल आहेत. पुरस्कार परत करणारे जर इतकेच अनुल्लेखनिय अदखलपात्र आहेत तर त्यांच्या विरूद्ध इतके घमासान कँपेन का चालू आहे हे मला म्हणायचे आहे. खर्या देशभक्तांच्या प्रायोरिटी लिस्ट मधे सामान्य जनतेला भेडसावणार्या समस्या टॉपला हव्यात. अडगळीत पडलेले कोणी साहित्यिक किंवा त्यांचे बालीश वर्तन नाही.
डाळीचा मुद्दा महागाईचे, लोकांच्या अपेक्षांचे प्रातिनिधिक उदाहरण आहे. ते छद्मी देशभक्तांना महत्त्वाच्या मुद्द्यांची आठवण करून देण्यासाठी वापरले आहे ज्याला ते सपशेल अनुल्लेखाने मारत आहेत.
- Log in or register to post comments
भ
भंकस बाबा
गुरुवार, 10/29/2015 - 20:11
नवीन
त्या कुलबर्गी ना का मारले हो? हे नाव होटेलातल्या डिश सारखे वाटते नाही?
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
गुरुवार, 10/29/2015 - 16:17
नवीन
पुरस्कार परत करणारे जर इतकेच अनुल्लेखनिय अदखलपात्र आहेत तर त्यांच्या विरूद्ध इतके घमासान कँपेन का चालू आहे
कारण मिडिया त्यांना विकला गेला आहे. रोज कोणत्यातरी अडगळीत पडलेल्या साहित्यिकाने पुरस्कार परत केल्याची बातमी पहिल्या पानावर कशी येते हो?
गायीचे धार्मिक महत्त्व हा मुद्दा इथे कसा आला? येथील बरेच सदस्य गायीला उपयुक्त पशु मानतात. (मी त्यातच आहे)
राहिली गोष्ट अराजकाचा आणी डाळीचा भाव याचा ( बादरायण) संबंध आपण का लावलात हे समजले नाही? भाजपचा द्वेष आपण करा त्याबद्दल म्हणणे नाही. आपल्या मताचा आदर आहे. फक्त बाजीरावाची शेंडी अहमदशहा अब्दालीला लावू नका.
- Log in or register to post comments
र
रामपुरी
गुरुवार, 10/29/2015 - 16:43
नवीन
पण त्यांना बाजीरावाची शेंडी अहमदशहा अब्दालीलाच लावायची आहे. लावू द्या. त्याही मताचा आदर आहेच की. :)
- Log in or register to post comments
क
कापूसकोन्ड्या
गुरुवार, 10/29/2015 - 17:29
नवीन
त्यांना जो पुरस्कार मिळाला तो विधिवत निवडून आलेल्या सरकारेन दिला आहे.तो सर्व लोकांतर्फे दिलेला आहे. त्या सर्वांच हा अपमान आहे.
याना मिळ्णारी दुभती गाय त्यानी मारली आहे. कित्येक वर्षे ही गाय चारा सरकार चा आणि दुध याना देत होती. दुखरी नस तिथे आहे. हजारो एन्जीओ कित्येक वर्षे इन्कम टॅक्स नाहीच पण साधा रितर्न पण भरत नाहीत. त्यांच्या नाड्या आवळल्या आहेत. हे सर्व लोक लुच्चे आणि भ्रष्ट आहेत.
- Log in or register to post comments
त
तर्राट जोकर
गुरुवार, 10/29/2015 - 19:04
नवीन
भाजपाच्या प्रामाणिक प्रयत्नावरून आठवली,. सिंहाला डावलून माकडाला जंगलाचा राजा करतात ती कहाणी....
- Log in or register to post comments
ट
ट्रेड मार्क
गुरुवार, 10/29/2015 - 21:13
नवीन
सिद्ध करा की मे २०१४ पासून कुठले भ्रष्टाचार झाले. त्यात किती पैश्यांचा अपहार झाला आणी त्यात कोण कोण गुंतले आहेत. नुसत्या डरकाळ्या मारून कोणी सिंह होत नाही आणि शेपूट लावून माकड पण होत नाही.
नुसतेच म्हणता, एका ठिकाणी "या धाग्याचा एका फटक्यात निकाल लावता येईल", दुसर्या ठिकाणी "आत्ता वेळ नाही नंतर सविस्तर प्रतिसाद देतो". अजून कुठे, "आत्ता एवढंच सांगतो, नंतर सवडीने प्रतिसाद देइन" पण हे सविस्तर प्रतिसाद कधीच आले नाहीत आत्तापर्यंत.
एका प्रतिसादात एवढेच मुद्दे लिहितो कारण जास्त लिहिले तर तुम्ही सोयीनुसार काही मुद्द्यांवरच प्रतिसाद देता. विशेष करून पहिल्या मुद्द्यावर उत्तर अपेक्षित आहे. (असं म्हणून तुमची घुसमट करत नाहीये. "विशेषकरून" या शब्दाला महत्व आहे. तुम्ही या दोन्ही किंवा अजून कुठल्या ही मुद्द्यावर उत्तर देवू शकता. पण मला पहिल्या मुद्द्याच्या उत्तरात जास्त रस आहे.)
- Log in or register to post comments
व
विनोद१८
Sun, 11/01/2015 - 10:37
नवीन
तेव्ह्डीच आपली आम्हाला आपल्या ज्ञानात भर टाकता येइल.
बाकी तुमचे चालू द्या नेहमीप्रमाणे, लगे रहो.
- Log in or register to post comments
त
तर्राट जोकर
गुरुवार, 10/29/2015 - 19:06
नवीन
सर्टीफिकेट आणि शिक्का घेऊन फिरणारे फेरिवाले इकडेही आले आहेत.
- Log in or register to post comments
द
दत्ता जोशी
गुरुवार, 10/29/2015 - 19:29
नवीन
काय करणार फिरावाच लागतं विचारवंतांची घुस्मट होते न! ..
- Log in or register to post comments
त
तर्राट जोकर
गुरुवार, 10/29/2015 - 19:54
नवीन
एवढी काळजी करता म्हणुन घुसमट होते हो... काळजी करणं सोडा घुसमट थांबेल, पण हो... तुमचा पोटापाण्याचा धंदा बंद पडेल, तेवढं बगा मंजी झालं.
- Log in or register to post comments
- 1
- 2
- ›
- »