Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

एक माणूस मिशी काढून..............

श — शिव कन्या, गुरुवार, 10/29/2015 - 15:38
एक माणूस मिशी काढून शाळेमध्ये पोहचला बघता बघता खिडक्यांमधून वर्गात जाऊन बसला. वर्ग भरला मुलामुलींनी सुरेख हसणे पानांमधूनी हळूच पाही शाई सांडूनि, बघते का ती मान वळवूनी! हातचा राखून गणित चुकले नजर चकवून भाषा हुकली कितीक राजे आले गेले इतिहासाच्या पानोपानी.... छंद जीवाला एकच लागे रिबिनीमागचे भोळे कोडे! इकडे तिकडे बघून झाले मास्तर सगळे येऊन गेले मधली सुट्टी चिंचा बोरे मैदानावर सुटली पोरे..... वर्गासहित उठून गेले साधेभोळे हळवे कोडे! भान आले, बाहेर आला.... एक मुलगा मिशी लावून शाळेबाहेर पडला हरवलेले हळवे कोडे पुनःपुन्हा शोधित राहिला .

प्रतिक्रिया द्या
25277 वाचन

💬 प्रतिसाद (71)
च
चाणक्य गुरुवार, 10/29/2015 - 15:42 नवीन
एक नंबर. खूप आवडली.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग गुरुवार, 10/29/2015 - 15:51 नवीन
कित्येक दिवसांनी एवढी सुरेख कविता वाचायला मिळाली! रंगा
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 10/29/2015 - 16:49 नवीन
+++१११ अत्यंत सहमत अतिप्रचण्ड आवडली
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
क
कोमल Fri, 10/30/2015 - 06:49 नवीन
+१११ असेच म्हणते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
म
मांत्रिक गुरुवार, 10/29/2015 - 16:00 नवीन
अप्रतिम काव्य! अगदी झक्कास स्टाईल!!! उत्तम उत्तम उत्तम लिहिता! U r 1 of the rarest gr8 minds!!!
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप गुरुवार, 10/29/2015 - 16:23 नवीन
मस्तच! शाळेत गुर्जी कवितांना चाल लावायचे तश्शीच म्हणून पाहिली! :))
एक मुलगा मिशी लावून शाळेबाहेर पडला हरवलेले हळवे कोडे पुनःपुन्हा शोधित राहिला
शेवटही उत्कृष्ट!
  • Log in or register to post comments
च
चतुरंग गुरुवार, 10/29/2015 - 16:46 नवीन
की त्यावरुन मला एक कविता सुचली - एक माणूस मिशी 'काढून' सिनेमामध्ये पोहचला बघता बघता डोळ्यांमधून मनात जाऊन बसला. थेटर भरले मुलामुलींनी निखळ हासणे मनापासुनी हळूच पाही डोळे पुसुनी, काय सांगतो चेहेर्‍यामधुनी! गल्ल्यावरची गणिते सुटली? चित्रपटांची भाषा कुठली? कितीक नटवर आले गेले इतिहासाच्या पानोपानी.... पिसे जीवाला एकच लागे मिशीमागचे भोळे डोळे! 'गोल्ड रश' अन 'किड' हलवुन गेले 'डिक्टेटर' 'सिटीलाईट' हसवुन गेले वेताची काठी फाटके बूट जुनाट टोपी ढगळा सूट आठवांसहित हरवुन गेले मिशीमागचे भोळे डोळे! एक मुलगा मिशी लावून थेटरबाहेर पडला हरवलेले भोळे डोळे पुन्हापुन्हा शोधित राहिला. (अ किड) रंगा
  • Log in or register to post comments
श
शिव कन्या गुरुवार, 10/29/2015 - 18:38 नवीन
भारी जमलंय. आवडेश .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
द
दमामि Fri, 10/30/2015 - 01:55 नवीन
सुरेख!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
र
रातराणी Fri, 10/30/2015 - 03:31 नवीन
सहीय हे पण!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
म
मिसळपाव Fri, 10/30/2015 - 14:24 नवीन
मूळच्या सुरेख कवितेला चतुरंगाचा अप्रतिम प्रतिसाद! व्वा! झकास. आता केशवसुमारने येउन यावर कडी चढवली की मी चिमटा काढून बघेन - टाईम मशीनमधनं चार-पाच वर्ष मागे नाही ना गेलोय बघायला ;-) एक माणूस मिशी काढून / लावून.... क्या बात है.... टिपः माझा आयडी 'मिसळपाव' असला, मिपाच्या बाल्यावस्थेत तत्कालीन चालकांच्या संमतीने घेतलेला, तरी मी एक सामान्य सभासद आहे. या आयडीचा आणि या संस्थळाच्या चालकांचा / संपादकांचा काहीही संबंध नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
द
दमामि Fri, 10/30/2015 - 15:25 नवीन
अगदी खरे, केशवसुमारांची आठवण खूपदा येते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळपाव
श
शिव कन्या Fri, 10/30/2015 - 19:34 नवीन
इतक्या जुन्या आय डी ने प्रतिक्रिया दिली. बरे वाटले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळपाव
स
सुमीत भातखंडे Wed, 11/04/2015 - 09:18 नवीन
ही कवितापण छान आहे. आता चॅप्लिनचे सिनेमे नक्की पाहणार. धन्यवाद या कवितेबद्दल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
ब
बिपिन कार्यकर्ते Sun, 11/08/2015 - 15:28 नवीन
रंगा.. कडकडून मिठी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
प
प्यारे१ गुरुवार, 10/29/2015 - 16:54 नवीन
मूळ कविता बेस्ट आणि चतुरंग रावांची कविता पण सरस.
  • Log in or register to post comments
स
स्वप्नज गुरुवार, 10/29/2015 - 16:56 नवीन
अप्रतीम...सुरेख...लाजवाब
  • Log in or register to post comments
अ
अजया गुरुवार, 10/29/2015 - 17:00 नवीन
वा! सुंदर कविता.चतुरंगपंतांची पण खासच.
  • Log in or register to post comments
प
पैसा गुरुवार, 10/29/2015 - 18:04 नवीन
सुंदर कविता!
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे गुरुवार, 10/29/2015 - 19:25 नवीन
सुरेखच लिहिलीये कविता.
  • Log in or register to post comments
न
निनाद Fri, 10/30/2015 - 00:31 नवीन
खुपच सुंदर आहे तुमची कविता. खुप दिवसानी काही तरी मस्त वाचायला मिळाले.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Fri, 10/30/2015 - 01:38 नवीन
अग बाई अरेच्चा-एक मुलगीच्या चालीवरच्या दोन्ही कविता/विडंबन आवडले. शाई कशाला सांडली?
  • Log in or register to post comments
द
दमामि Fri, 10/30/2015 - 01:46 नवीन
वा!!!!!
  • Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज Fri, 10/30/2015 - 02:09 नवीन
अत्यंत सुंदर!!! खुपच आवडली!!!! वा!!!!
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Fri, 10/30/2015 - 02:21 नवीन
अत्यंत सुरेख कविता ! :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Get Down :- Backstreet Boys
  • Log in or register to post comments
र
रातराणी Fri, 10/30/2015 - 03:30 नवीन
मस्त!! :)
  • Log in or register to post comments
ए
एस Fri, 10/30/2015 - 04:29 नवीन
:-)
  • Log in or register to post comments
प
पगला गजोधर Fri, 10/30/2015 - 04:33 नवीन
:)
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Fri, 10/30/2015 - 06:13 नवीन
कवितेचा आशय आवडला.
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Fri, 10/30/2015 - 06:22 नवीन
वाह, सुंदर कविता !
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Fri, 10/30/2015 - 06:22 नवीन
:):):) फारच सुंदर!
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Fri, 10/30/2015 - 07:04 नवीन
हाण तेजायला. मस्तच!
  • Log in or register to post comments
न
नाखु Sat, 10/31/2015 - 06:46 नवीन
पुन्हा पुन्हा याद आणि दाद यावी अशी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
च
चिगो Fri, 10/30/2015 - 08:52 नवीन
आवडली कविता..
  • Log in or register to post comments
अ
अन्या दातार Fri, 10/30/2015 - 09:04 नवीन
मूळ कविता आणि रंगाशेठनी केलेले विडंबन (विडंबन का म्हणावे हाही प्रश्न आहेच) मस्तच. लिहित रहा.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Fri, 10/30/2015 - 12:21 नवीन
उत्स्फूर्तपणे सुचलेले विचार त्याच कवितेच्या धाटणीत बांधलेत. "मला सुचलेली कविता" असं तिथेच म्हटलं आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्या दातार
म
मित्रहो Fri, 10/30/2015 - 09:13 नवीन
फारच आवडली
  • Log in or register to post comments
अ
अंतरा आनंद Fri, 10/30/2015 - 12:29 नवीन
सुंदर सुंदर सुंदर.
  • Log in or register to post comments
स
सागरकदम Fri, 10/30/2015 - 13:45 नवीन
क्या बात हाऊन
  • Log in or register to post comments
म
मोगा Fri, 10/30/2015 - 15:58 नवीन
छान
  • Log in or register to post comments
म
मोगा Fri, 10/30/2015 - 15:59 नवीन
छान
  • Log in or register to post comments
श
शिव कन्या Fri, 10/30/2015 - 19:36 नवीन
गमती गमतीत सहज लिहिलेली कविता तुम्हा सर्वांना आनंद देऊन गेली! छान वाटले. सर्वांचेच आभार.
  • Log in or register to post comments
श
शिव कन्या Fri, 10/30/2015 - 19:37 नवीन
गमती गमतीत सहज लिहिलेली कविता तुम्हा सर्वांना आनंद देऊन गेली! छान वाटले. सर्वांचेच आभार.
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Sat, 10/31/2015 - 06:40 नवीन
दोन्ही कविता अतिशय आवडल्या. इतक्या सहजपणे मिशी काढतायेत नाही याची या निमित्ताने पुन्हा एकदा जाणिव झाली आणि उदास करुन गेली. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी Sat, 10/31/2015 - 06:45 नवीन
छान
  • Log in or register to post comments
न
नीलमोहर Sat, 10/31/2015 - 06:54 नवीन
मूळ कविता आणि चतुरंग यांची रचना दोन्ही अप्रतिम.
  • Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम Sun, 11/01/2015 - 17:09 नवीन
अ फ ला तू न !
  • Log in or register to post comments
स
सुमीत भातखंडे Wed, 11/04/2015 - 09:19 नवीन
काव्य. सलाम.
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर Wed, 11/04/2015 - 09:27 नवीन
कल्पनाच किती सुंदर!! फार आवडली कविता! चतुरंग ह्यांची कविताही आवडली!
  • Log in or register to post comments
श
शब्दबम्बाळ Wed, 11/04/2015 - 19:52 नवीन
आता पर्यंत बर्याच वेळा हि कविता वाचून काढली तरीही प्रत्येक वेळी खूप मस्त वाटते! :) कित्ती सहजपणे भूतकाळात घेऊन जाते आणि संपता संपता आम्हाला मिशी लाऊन वर्तमानात आणते! ;) खूपच छान, लिहित राहा...
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा