एक माणूस मिशी काढून..............
एक माणूस मिशी काढून शाळेमध्ये पोहचला
बघता बघता खिडक्यांमधून वर्गात जाऊन बसला.
वर्ग भरला मुलामुलींनी
सुरेख हसणे पानांमधूनी
हळूच पाही शाई सांडूनि,
बघते का ती मान वळवूनी!
हातचा राखून गणित चुकले
नजर चकवून भाषा हुकली
कितीक राजे आले गेले
इतिहासाच्या पानोपानी....
छंद जीवाला एकच लागे
रिबिनीमागचे भोळे कोडे!
इकडे तिकडे बघून झाले
मास्तर सगळे येऊन गेले
मधली सुट्टी चिंचा बोरे
मैदानावर सुटली पोरे.....
वर्गासहित उठून गेले
साधेभोळे हळवे कोडे!
भान आले, बाहेर आला....
एक मुलगा मिशी लावून शाळेबाहेर पडला
हरवलेले हळवे कोडे पुनःपुन्हा शोधित राहिला .
💬 प्रतिसाद
(71)
म
मांत्रिक
Sun, 11/08/2015 - 15:18
नवीन
अनेक वेळा सहमत....
- Log in or register to post comments
म
मंदार दिलीप जोशी
गुरुवार, 11/05/2015 - 16:15
नवीन
मस्त.....आवडली!
- Log in or register to post comments
आ
आनंद कांबीकर
गुरुवार, 11/05/2015 - 17:25
नवीन
मस्त हे
- Log in or register to post comments
ए
एक एकटा एकटाच
Fri, 11/06/2015 - 03:52
नवीन
जबरदस्त
- Log in or register to post comments
इ
इशा१२३
Fri, 11/06/2015 - 09:23
नवीन
सुरेख कविता.
- Log in or register to post comments
र
रंगासेठ
Fri, 11/06/2015 - 13:09
नवीन
आवडली कविता
- Log in or register to post comments
अ
अनन्त अवधुत
Sat, 11/07/2015 - 03:09
नवीन
आवडली कविता
- Log in or register to post comments
श
शिव कन्या
Sat, 11/07/2015 - 09:44
नवीन
मिशी इतकी आवडते? म्हैती नवतं!
तुम्ही सगळे त्या मुलाबरोबर आलात, छान वाटले!
- Log in or register to post comments
अ
असंका
Sat, 11/07/2015 - 09:57
नवीन
फारच सुरेख!!
धन्यवाद!!
- Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते
Sun, 11/08/2015 - 15:06
नवीन
इतके दिवस हा धागा वाचला नव्हता. आत्ता माझ्या शाळेत एका कार्यक्रमाला आहे. मुलींना शाळा दाखवली. सहज धागा उघडला तर हे दिसले!!! जबरी योगायोग. कविता आवडलीच.
- Log in or register to post comments
श
शिव कन्या
Sun, 11/08/2015 - 23:03
नवीन
बिका, शाळा खुश!!
- Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते
Mon, 11/09/2015 - 05:23
नवीन
मी पण.
- Log in or register to post comments
र
राघव
गुरुवार, 02/04/2016 - 09:13
नवीन
निसटली होती.
उत्तम कविता. थेट भिडते. :-)
रंगाशेठनं पाणी आणिक गहिरं केलं.. तेही मस्तच!!
राघव
- Log in or register to post comments
व
विजय पुरोहित
गुरुवार, 02/04/2016 - 12:34
नवीन
सहमत...
शिवकन्या आणि चतुरंग या दोघांच्यामुळे दोन उत्कृष्ट टाईमलेस क्लासिक्स मिपावर दाखल झालेत...
- Log in or register to post comments
य
यशोधरा
Fri, 02/05/2016 - 04:22
नवीन
दोनही कविता उत्तम! खूप आवडल्या..
- Log in or register to post comments
म
माहितगार
Fri, 02/05/2016 - 05:06
नवीन
कविता आज तिसर्यांदा वाचली. कवितेतील रुपक आणि अर्थछटांकडे नव्याने लक्ष गेले.
उपरोक्त शालेय वय ते युवावस्थेतील बदल सुरेख टिपला आहे, त्यातल्या 'भान आले' ला दोन अर्थछटा आहेत आणि दोन्ही अर्थ छटांसहीत वाचताना मस्त वाटले.
या ओळीपण मस्त आहेत.
- Log in or register to post comments
श
शिव कन्या
Sat, 02/06/2016 - 05:49
नवीन
अरेच्या! अजून त्या मुलाबरोबर !!
छान वाटले.फार सहज येता जाता लिहीलिय ही कविता!
- Log in or register to post comments
म
माहितगार
Sat, 02/06/2016 - 08:14
नवीन
मिशी हे रूपक घेऊन अलिकडे मी सुद्धा एक मिशी नृत्य नावाची कविता लिहिती झालो. कदाचित पब्लिकला फारशी लक्षात आली नसावी.
- Log in or register to post comments
श
शिव कन्या
Fri, 04/08/2016 - 19:38
नवीन
वाचली, विचार करूनही अर्थ बोध झाला नाही......
- Log in or register to post comments
स
समयांत
Sat, 12/02/2017 - 08:31
नवीन
मस्तच!
- Log in or register to post comments
स
समयांत
Sat, 12/02/2017 - 08:31
नवीन
मस्तच!
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2