बिहारच्या निकालाचा अर्थ.
आताच बिहार निवडणूकीचे निकाल स्पष्ट व्हायला सुरुवात झालेली आहे. दिल्लीप्रमाणे बिहार्मध्ये देखील भाजपाचे पानिपत होणार आहे हे आता स्पष्ट झालेले आहे. या निकालाचे अर्थ आणि त्याचे भारतीय राजकारणावर होणारे दूरगामी परिणाम यांवर चर्चा करण्यासाठी हा धागा.
मला दिसणारा या निकालाचा अर्थ -
भाजपासाठी -
१. अजूनही भारतात जातीय समीकरणांच्या पलिकडे जाऊन विजय मिळवणे कोणालाही शक्य नाही.
२. भाजपा विरुद्ध इतर सगळे असा सामना झाला तर अजूनही भाजपा जिंकू शकत नाही. भाजपाला जनाधार अजून वाढवण्याची गरज आहे.
३. मतांच्या टक्कीवारीत भाजपा अजूनही पहिल्या क्रमांकावर आहे. म्हणजेच बहुरंगी लढत झाली असती तर भाजपाला वाव होता. त्याचबरोबर भाजपाच्या टक्केवारीत घट पण आलेली दिसते. लोक्सभा - २९.क्ष. याचाच अर्थ नवमतदारांनी भाजपाच्या विरोधात कौल दिला आहे. भाजपाला याचा गांभीर्याने विचार करावा लागेल.
इतरांसाठी -
१. वर लिहिल्याप्रमाणे जरी भाजपा विरुद्ध इतर सगळे असा सामना झाला तर भाजपा हरू शकतो, ही गोष्ट खरी असली. याचे कारण स्थानिक युत्या हे आहे. भविष्यकाळात भाजपाला पर्याय म्हणून सगळ्यांनी एकत्र यायचे की आपापली ताकद वाढवायची याचा देखील या सार्यांना विचार करावा लागेल.
२. नितीशकुमारांना या सार्याचे आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे असे वाटते. त्यांनी आपल्या हातांनी राजदला सुकणार्या झाडाला खतपाणी घालून पुनरुज्जीवीत केले आहे. त्यांच्या खेळ्या आत्ता तरी योग्य वाटतायत. सर्वनाशे समुत्पन्ने अर्धं त्यजति पंडितः., अर्थात बहुरंगी लढत झाली असती तर संजदला दुसरे स्थान देखील मिळणे कठीण होते असे दिसतेय.
३. काँग्रेसला या निवडणूकीतून पुनरागमन करायची संधी मिळाली आहे, त्याचा ते कसा उपयोग करून घेतात यावर सारे अवलंबून आहे.
मला दिसणारे परिणाम -
१. या सार्याचा विचार करता उत्तर प्रदेश भाजपासाठी खूपच कठीण जाणार असे वाटते. भाजपा आता अधिक आक्रमक होईल, असे माझे वैयक्तिक मत आहे. त्यांच्यासाठी डू ऑर डाय अशी परिस्थिती आलेली आहे.
२. वैयक्तिक मोदींच्या करिश्म्यापेक्षा देखील रिझल्टला अधिक महत्व आहे ही आता तरी त्यांना कळेल अशी आशा आहे.
३. २०१९ मध्ये भारत पुन्हा त्रिशंकू लोकसभेच्या द्रूष्टीने वाटचाल करत आहे असे वाटते.
४. नितीशकुमारांच्या पंतप्रधान होण्याच्या आकांक्षेला त्यांच्याच कर्मांनी ब्रेक लागला आहे असे सध्या तरी वाटत आहे. आता परत ते गाडी कशी सोडतात ते पहायचे.
जाणाअरांची मते समजून घेण्यास उत्सुक.
💬 प्रतिसाद
(63)
ल
लालगरूड
Sun, 11/08/2015 - 10:57
नवीन
अच्छा है
- Log in or register to post comments
भ
भंकस बाबा
Sun, 11/08/2015 - 12:20
नवीन
जातीय समिकरणे जर बिहार राजकारणात यशस्वी ठरली असतील तर मांजी ला बरोबर घेणेच भाजपा ला नडले असणार . त्यामुळेच ना त्याना दलितानी साथ दिली ना यादवानी , मांजीचे मुल्यमापन करण्यात भाजपाची चूक झाली
- Log in or register to post comments
आ
आनन्दा
Sun, 11/08/2015 - 13:55
नवीन
बाकी अजून एक सांगायची राहिले - हळूहळू काँग्रेसचे स्थान भाजपा घेत आहे असे दिसते.. नाहीतर भाजपाविरोधात एव्हढी महाआघाडी झालीच नसती.
परंतु भाजपाला यातून एक मोठा धडा शिकण्याची गरज आहे -
सध्या भाजपात सबकुछ मोदी असा जो प्रकार चालू आहे तो हळूहळू थांबवून भाजपाने हळूहळू दुसरी फळी सांभाळणारे आणि जनाधार असलेले नेते उभे करण्याची गरज आहे. अन्यथा जी गत बिहारमध्ये झाली तीच गत उत्तरप्रदेशमध्ये पण होईल.
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
Sun, 11/08/2015 - 15:29
नवीन
सहमत आहे. वाजपेयी आणि अडवाणी नेतेपदी असताना त्यांनी जाणीवपूर्वक दुसरी फळी निर्माण केली होती. या दुसऱ्या फळीत प्रमोद महाजन, अरूण जेटली, सुषमा स्वराज, व्यंकय्या नायडू इत्यादींचा समावेश होता.तशी दुसरी फळी निर्माण व्हायला हवी. प्रत्येक वेळी मोदींच्या नावावर लोक मते देणार नाहीत हे जाणून घ्यायला हवे. आणि नुसत्या मोदींच्या नावावर मिळणारी मते यापुढच्या काळात law of diminishing marginal returns प्रमाणे कमी होत जाणार आहेत हे ध्यानात घेऊन अशी दुसरी फळी निर्माण करणे खूपच गरजेचे आहे हे नक्कीच.
उत्तर प्रदेशात भाजप जिंकला तर मला खरोखरच आश्चर्य वाटेल.मला असे वाटते की उत्तर प्रदेशात पक्षाचा पराभव व्हायची शक्यता ९९.९९% आहे. एक तर राज्यात भाजपकडे स्थानिक नेतृत्व अजिबात नाही. कल्याणसिंग आता ८५ वर्षांचे आहेत.ते राजस्थानचे राज्यपालपद सोडून उत्तर प्रदेशात येतील ही शक्यता तशी कमीच. आणि १९९० च्या दशकात कल्याणसिंगांना जो जनाधार होता त्याच्या पावही जनाधार आता राहिलेला नाही. लक्ष्मीनारायण वाजपेयी, कलराज मिश्रा यांनाही तितका जनाधार नाही हे नक्कीच. आदित्यनाथांचा तर सगळाच आनंदी आनंद आहे.सध्या तरी राजनाथसिंगांना उत्तर प्रदेशात मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून पाठविणे हाच त्यातला त्यात बरा पर्याय दिसत आहे.
दुसरा धोका म्हणजे भाजपविरोधी आघाडी उभी राहिली तर मते एकत्र होऊन भाजपचा जोरदार पराभव करता येतो हे बिहार निवडणुकांनी दाखवून दिले आहे. कॉंग्रेस समाजवादी पक्ष किंवा बहुजन समाज पक्ष यांच्याशी आघाडी करायची शक्यता आहेच.कॉंग्रेसला उत्तर प्रदेशात स्वबळावर विशेष स्थान नाही पण कॉंग्रेसची ७-८% मते जर सपा किंवा बसपाबरोबर आली तर ती एक मोठी भक्कम मतपेढी ठरू शकते.आणि त्यापेक्षा मोठा धोका (याची शक्यता त्यामानाने फारच थोडी आहे) जर १९९३ प्रमाणे सपा-बसपा परत एकत्र आले तर.मायावती आणि मुलायमसिंगांचे वैर आहे. पण मायावती आणि अखिलेश यांच्यात वैर असायचे काही कारण नाही. आणि दुसरे म्हणजे मायावतींवर जून १९९५ मध्ये समाजवादी पक्षाच्या गुंडांनी हल्ला केला तेव्हापासून मायावती आणि मुलायमसिंग यांच्यात वैर आहे. त्यानंतर २० वर्षे उलटली आहेत.दरम्यानच्या काळात मायावतीही अधिक परिपक्व झाल्या असतील आणि जर लालू आणि मुलायम २० वर्षांचे वैर सोडून एकत्र येऊ शकतात तर सपा-बसपा का नाही या दृष्टीने वाटचाल सुरू झाली तर मात्र भाजपला उत्तर प्रदेश विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद मिळण्याइतक्याही जागा मिळायच्या नाहीत. हे व्हायची शक्यता त्यामानाने फारच थोडी आहे पण कॉंग्रेसने एका पक्षाबरोबर हातमिळवणी करायची शक्यता बरीच जास्त आहे. २०१० च्या बिहार आणि २०१२ च्या उत्तर प्रदेश निवडणुका स्वबळावर निवडून कॉंग्रेसच्या हातात काहीच मिळाले नाही.त्यापेक्षा तरी जास्त कोणाबरोबर तरी हातमिळवणी करून मिळेल.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Mon, 11/09/2015 - 18:47
नवीन
२०१७ मधील उ.प्र. मधील विधानसभा निवडणुक मायावतीच्या अस्तित्वाचा प्रश्न असणार आहे. त्यामुळे सपाशी उघड किंवा छुपी युती करण्यासाठी मायावती नक्कीच तयार असेल. ऑगस्ट २०१४ मधील विधानसभेच्या ११ जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत मायावतीने उमेदवार उभे न करता आपली मते सपाकडे वळविल्यामुळे ११ पैकी ८ जागा सपाने जिकल्या होत्या. २०१७ मध्ये राजद व संजद प्रमाणेच उघड किंवा छुपी युती होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
- Log in or register to post comments
आ
आनन्दा
Tue, 11/10/2015 - 02:23
नवीन
परंतु का कोण जाणे मला असे वाटते की या अश्या आघाड्या होण्याचा अप्रत्यक्ष फायदा समोरच्या पक्षाला होतो. कारण अश्या वेळेस एक म्हणजे त्याची मतपेढी एकवटते, दुसरे म्हणजे तो पक्ष जर व्यापक जनाधार असलेला असेल तर त्याचा जनाधार अश्या परिस्थित पण वाढतच जातो.
आतापर्यंतच्या अनुभवातून मला असे लक्षात आले आहे की भारतात तरी प्रत्येक पक्षाची स्वतःची मतपेढी असतेच. बिहारचेच उदाहरण द्ययचे झाले तर लालूप्रसाद यांची १८% मते कायम त्यांच्याबरोबर आहेत. २०१०मध्ये पण तेव्हढीच होती, २०१५ मध्ये पण तेव्हढीच आहेत. काहीही झाले तरी ती मतपेढी त्याच्यासोबतच राहते. ती मतपेढी फुटण्याची कारणे सर्वसामान्यपणे नेत्रुत्वातील बदल, किंवा पक्षामधील फूट हीच असू शकतात. जशी ही मते वेळोवेळी काँग्रेसमधून फुटली आहेत, किंवा मांझींना फोडून भाजपानेही नितीशकुमारांची मते फोडायचा प्रयत्न केला होता, पण तो असफल झाला.
आफ्टर दॅट इट्स प्लेन अॅरिथ्मॅटिक.
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Tue, 11/10/2015 - 04:58
नवीन
यांची युती होऊ नाही शकत? मुलायमसिंग जनता परिवारातून बाहेर पडले हा काय केवळ मानापमानाचा प्रयोग नसणार. उलट भाजप आणि सपा एकत्र येण्याची शक्यता जास्त वाटते आहे. मायावतींचं अखिलेश यादवशी वैर असण्याची शक्यता नाही पण पक्ष अजूनही मुलायमच चालवत आहेत. आपण एकटे पडू नये आणि आपल्या युतीतील भागीदारांनी आपल्याला तोंडघशी पाडू नये (बिहारप्रमाणे) असा प्रयत्न भाजपसुद्धा करणार. शिवाय ही निवडणूक २०१७ मध्ये आहे. तोपर्यंत अनेक उलथापालथी होऊ शकतात. बिहारमध्ये लालूने जर त्याचे खरे रंग दाखवले तर अनेक समीकरणं बदलूही शकतात.
- Log in or register to post comments
ज
जयन्त बा शिम्पि
Sun, 11/08/2015 - 15:54
नवीन
बिहारच्या निकालाचे परिक्षण भाजपा आपापल्या परिने करीलच, पण नरेन्द्र मोदिंना जे कमवायचे होते, ते त्यांच्याच पक्षाच्या वाचाळांनी घाल्विले हे नक्की. असल्या वाचाळवीरांना आपली खासदारकी पाच वर्षे टिकली तरी पुरेसे आहे, त्यांना पक्षाची कसलिहि फिकीर नाही
.
.
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
Sun, 11/08/2015 - 16:09
नवीन
त्यांना पक्षाची कसलीही फिकिर नसली तरी मोदींना तरी आहे ना? मग ते असल्या वाचाळवीरांना वेसण का घालू शकलेले नाहीत हा प्रश्न महत्वाचा आहेच. मनमोहनसिंगांना टूजी आणि कोळसा घोटाळ्यावरील मौन भोवले तसे मोदींना असल्या गणंगांविरूध्दचे मौन भोवणार की काय ही भिती आहे.
- Log in or register to post comments
र
राजाभाऊ
Tue, 11/10/2015 - 00:01
नवीन
अर्थात भोवणार आहे, पण करतील काय बिच्चारे - आपलेच दात आणि आपलेच ओठ...
दुसरी गोष्ट - पंतप्रधान या नात्याने मोदिंनी लालु, नितीशकुमार यांचं अभिनंदन केलं त्याचप्रमाणे भाजपाचा वरीष्ठ नेता या नात्याने पराभवाची संपुर्ण जबाबदारी जाहिररीत्या स्वत:च्या शीरावर घेणं उचित ठरलं असतं...
विक्टरी हॅज मेनी फादर्स, डिफिट इज ॲन आॅर्फन...
- Log in or register to post comments
व
विकास
Tue, 11/10/2015 - 01:22
नवीन
विक्टरी हॅज मेनी फादर्स, डिफिट इज ॲन आॅर्फन...
आजच चेपुफेम शेफाली वैद्य यांनी तयार केलेली म्हण वाचली...
Success has many fathers, failure has many analysts... :)
- Log in or register to post comments
र
राजाभाऊ
Tue, 11/10/2015 - 16:47
नवीन
शेफाली वैद्य कोण आहेत, कल्पना नाहि; पण त्यांनी जेएफकेच्या कोट्ची चिर्फाड केलेलीच आहे तर हे सुधारीत कोट जास्त समर्पक आहे असं वाटतं:
सक्सेस हॅज मेनी फादर्स, फेल्युर हॅज अन्सॉलिसिटेड मंडे मॉर्निंग क्वार्टरबॅक्स... ;)
- Log in or register to post comments
भ
भंकस बाबा
Sun, 11/08/2015 - 17:06
नवीन
आज बिहारमधे लालू व् नितीशकुमार जिंकले असले तरी त्यांचा मधुचंद्र किती महीने टिकतो याला महत्व आहे. ज्या काँग्रेसचे समूळ उच्चाटन होणार होते तिच्या पंखात आता हवा भरली आहे . भाजपने आतापासूनच तयारी ठेवलेली बरी. बिहारमधे नाही हो , उत्तरप्रदेशमधे . अन्यथा पानिपत निश्चित !
आता उद्या शेयर बाजारात पण पानिपत ठरलेले आहे. विसरा आता भुमिसम्पादन बिल , रिफॉर्म.आणि हो महाराष्ट्रात जरा शिवसेनेला कुरवाळा. नाहीतर mim दहाबारा नगरसेवकाच्या खुर्च्या बळकाउन बसतील .
- Log in or register to post comments
र
रमेश आठवले
Sun, 11/08/2015 - 22:32
नवीन
---महाराष्ट्रात जरा शिवसेनेला कुरवाळा---
म्हणजे त्यांच्या मागणी प्रमाणे त्याना खायला वाव असेल अशी मलाइदार खाती द्या असेच ना ? बिहारच्या निकाला नंतर संजय राउत म्हणतात की आज महाराष्ट्रात निवडणुका घेतल्या तर शिवसेनेला १७५ जागा मिळतील. असे असेल तर ते वाट कसली बघत आहेत ? सरकारमधून सरळ बाहेर पडून पुन्हा निवडणूक घ्यायला का लावत नाहीत ?
- Log in or register to post comments
भ
भंकस बाबा
Mon, 11/09/2015 - 04:21
नवीन
दत्ताजी शिंदे रणात पडलेला असताना अब्दाली ने त्याला खिजवून विचारले होते क्या और लढेगे? दत्तजीचे बाणेदार उत्तर होते "बचेंगे तो और भी लड़ेंगे" हेच ध्यानात ठेऊन भाजपने पुढील रणनिती अवलंबिलि पाहिजे नाहीतर त्यांचा कांग्रेस व्हायला वेळ नाही लागणार.
आणि खातात ते शिवसेना वाले व् स्वच्छ ते भाजपा असे समीकरण कोणी सांगितले तुम्हाला ?
जो तळे राखणार तो पाणी चाखणार!
- Log in or register to post comments
उ
उगा काहितरीच
Mon, 11/09/2015 - 11:52
नवीन
हे चालेल हो ! पण "जो तळे राखणार तो तळेच विकणार!" इ ना चॉल्बे ! ;-)
रच्याकने , एम आय एम ज्या प्रमाणे सरळ सरळ मुस्लिम मते मागून जिंकून येऊ शकतो . तर एखादा पक्ष (शिवसेना / भाजप) सरळ सरळ हिंदू मते मागून का जिंकून येऊ शकत नाही ?
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Mon, 11/09/2015 - 12:06
नवीन
भय्यो...!?
ओवेसीची जहाल भाषणांनी तुम्हीपण भुलले काय?
एमआयएम चे "काँग्रेसने अल्पसंख्य असलेल्या मुस्लिमांचा फक्त मतांसाठी वापर केला, मुस्लिमांचा खरा विकास होऊच दिला नाही. त्यामुळे आता आम्ही स्वतःचा विकास स्वतः घडवण्यासाठी पक्ष काढला आहे. त्यास मतदान करा". एमआयएम ह्यांना जो काही पाठिंबा मिळतोय तो 'इस्लाम खतरेंमें'च्या चालीवर मिळत नसून 'मुस्लिम विकास व हक्क' चे ते दाखवत असलेल्या गाजरामुळे मिळत आहे. या देशात मुस्लिमांवर अन्याय होतोय असे चित्र उभे करून एमआयएम मुस्लिमांसाठी लढणारी पार्टी म्हणून नावारूपास येण्यास बघत आहे.
याउलट शहा अँड कंपनी सरळ सरळ 'हिंदू खतरेंमें' च्या आरोळ्या ठोकत मतांची भीक मागतांना दिसत आहेत. बहुसंख्य असलेल्या हिंदूंवर कोण अत्याचार वा अन्याय करतं ज्यासाठी शहा-ठाकरे कंपनीने धर्माच्या नावावर मते मागावीत? त्यासाठी विकासाचे गाजर पुरेसे नाही का?
- Log in or register to post comments
भ
भंकस बाबा
Mon, 11/09/2015 - 13:59
नवीन
ओवैसी खुलेआम इस्लाम खतरेमें बोलूंनच मत मागत आहे. यु ट्यूब वरील त्याची भाषणे ऐका. आता जेव्हा तो राष्ट्रिय पातळीवर उतरला आहे तेव्हा त्याचा सुर बदलला आहे कारण फ़क्त एकच निवडणूक आयोग. मुस्लिम सुधारणा , मुस्लिम कायदा संशोधन या गोष्टी औवेसी आपल्या भाषणात चुकुनदेखिल आणनार नाही. हे सर्व मुस्लिमांच्या पचनि पडत नाही.
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Mon, 11/09/2015 - 14:07
नवीन
तोगडीया, इत्यादी लोकही त्याच्या तोडीस तोड बोलतात हो. त्यांच्याबद्दल आपले काय मत आहे?
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Tue, 11/10/2015 - 04:48
नवीन
अजिबात पटत नाही आणि म्हणूनच तोगडियांनी हार्दिक पटेलच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. अर्थात त्याच्यात जातीचा मुद्दाही होताच. शिवाय तोगडिया संघपरिवारातल्या विहिंपचे असले तरी भाजपने त्यांना दूरच ठेवले होते आणि तेच बरोबर आहे.
- Log in or register to post comments
उ
उगा काहितरीच
Mon, 11/09/2015 - 20:33
नवीन
अंशतः सहमत ! कारण औवैसी कधी इस्लाम खतरेमे है । तर कधी मुस्लिमांधील सुधारणेच्या गोष्टी करतात .("करतो" असे लिहीण्याचा मोह टाळतोय) ते बहुतेक पब्लिक पाहून असावे. पण सरळ सरळ "मुस्लिमांसाठी" असे असते. उगाच ताकाला जाऊन भांडे लपवणे वगैरे प्रकार नसतो. याउलट भाजप वगैरे मुळात हिंदू पक्ष आहेत , हे कुणीही मान्य करेल. पण मग आम्ही बुवा मोठे सेक्युलर असा भाव सोडून सरळ सरळ हिंदूंचे मते मागितली तर जिंकतील का ? असे म्हणायचे होते मला.
(डिसक्लेमर: भारतात लोकांनी "हिंदू" /"मुस्लिम" असे राहण्यापेक्षा "भारतीय" म्हणून राहणे सगळ्यांनाच फायद्याचे आहे. असे माझे व्यक्तीगत मत आहे.)
- Log in or register to post comments
भ
भंकस बाबा
Mon, 11/09/2015 - 13:44
नवीन
आपल्या देशात हिन्दू मते हिंदुत्वाच्या नावावर मिळणे फार कठिन आहे. मुख्य कारण आहे आपला बहुसंख्य हिन्दू समाज मुस्लिमबहुल वसाहतीत रहात नाही. इथे राहून बघा मग तुम्हाला अंदाज येईल . मुंबईतील मालवणी,बेहरामपाडा , भेंडीबाजार हे एरिया मिनी पाकिस्तान म्हणून ओळखले जातात. गणपति, दसरयाला , असलेली माइकबंदी इथे मोहरमच्या वेळी खुले आम धुड़कावली जाते. मेणबत्त्या घेऊन फिरणार्या सेलेब्रेटिंना हयांचे कधीच वावडे नसते . इदच्या नमाजच्या वेळी सकाळी सरळसरळ वाहतूक बंद केली जाते. अजुन कोणीही मुस्लिम नेत्यांनी हे बरोबर नाही ऎसे बोललेले आठवत नाही. मशीदित नव्हे तर मदरशावर देखील भोंगे लावुन मुस्लिम गाणी लावली जातात. अरे आपण सककाळि गणपतिस्त्रोत्र देखील भोंग्यावर एकायचि मानसिकता ठेवत नाही. आणि भाजपा नसेल नमो नसेल तर पर्याय काय? तर राहुल गांधी ? नितीश कुमार? लालू यादव? मी काही भाजपचा समर्थक नाही पण आपल्याला जर best among from worst पाहिजे असेल तर मोदिला माझे मत असेल
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Mon, 11/09/2015 - 14:04
नवीन
मुसलमानांना सरळ करण्यासाठी तुम्हाला भाजपा व मोदी हवेत तर...? आम्हाला वाटलं भारताचा विकास व प्रगती ह्यांच्यासाठी पाहिजेत. अंमळ गैरसमज झाला हां भारतीय जनतेचा...? स्वॉरी.
- Log in or register to post comments
भ
भंकस बाबा
Mon, 11/09/2015 - 19:55
नवीन
मुस्लिमाना सरळ करण्यासाठी नाही तर त्यांचे लाड थांबवण्यासाठी!
मशिदीच्या बाजूला घर घेऊन बघा मग पटेल.
- Log in or register to post comments
म
मोगा
Tue, 11/10/2015 - 01:36
नवीन
गणपतीची आरती तुम्हीही लाउडस्पीकरवर लावा.
मशीदीशेजारी घर असले की बरे असते. दिवसातून पाच वेळा अल्लाचे नाव आपसूक ऐकायला मिळते.
- Log in or register to post comments
भ
भंकस बाबा
Tue, 11/10/2015 - 11:51
नवीन
लौडस्पीकरवर गाणी लावणे हे शोबाजीचे लक्षण आहे. त्याला माझ्यासारखे असंख्य विरोधच करतील. किंबहुना अनेक हिंदूच याला विरोध करतात. आत्ताच झालेला दहीहंडी उत्सव याचे उत्तम उदाहरण आहे. आता मला एक सांगा आतापर्यन्त किती मुस्लिमानि कानठळया फोडण्यार्या बांगेला विरोध केला आहे?
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Tue, 11/10/2015 - 05:35
नवीन
दिवाळीच्या हर्दिक शुभेच्छा.... मजबूत फटाके फोडा.
- Log in or register to post comments
र
रमेश आठवले
Mon, 11/09/2015 - 18:39
नवीन
गेल्या दीड वर्षाच्या दिल्लीतील आणि वर्ष भराच्या महाराष्ट्रातील भाजपाच्या कारकिर्दीत त्यांच्या विरुद्ध अजून तरी एकही भ्रष्टाचार आरोप झालेला नाही. दुसऱ्या बाजूस शिवसेनेच्या मुंबई आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील कारकिर्दी बद्दल काय काय प्रसिद्धीत आले आहे ते पहा.
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Mon, 11/09/2015 - 18:59
नवीन
भ्रष्टाचाराची प्रकरणं पहिल्या वर्षात बाहेर येत नाहीत असं ऐकलंय कुठेतरी... चार-पाच वर्षांनीच प्रकरणं (काढली तर) बाहेर येतात. 'जर गर्भ राहिला तरच व्यभिचार झाला असे म्हणू शकतो अन्यथा नाही' असं असतं का..?
सत्त्ताधार्यांकडून भ्रष्टाचार रोखण्यासाठी एकच गोष्ट केली जाऊ शकते. ती म्हणजे कामच न करणे. पृथ्विराज चव्हाण हे त्याचे उत्तम उदाहरण आहे.
- Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश
Tue, 11/10/2015 - 07:19
नवीन
व्यापम घोटाळा कोणी कोणी नाही ऐकलाय?
- Log in or register to post comments
र
रमेश आठवले
Tue, 11/10/2015 - 14:59
नवीन
व्यापम घोटाळा कॉंग्रेस च्या कारकिर्दीत सुरु झाला. आजही गवर्नर राम नरेश यादव व त्यांचे नातेवाइक त्यात गुंतलेले आहेत असे सांगितले जाते. भा ज पा चे सरकार हे या बाबतीत आरोपी नाही. याची चौकशी आधी हायकोर्ट आणि सध्या सीबीआय करत आहे .
- Log in or register to post comments
स
सागरकदम
Mon, 11/09/2015 - 18:50
नवीन
कारण राष्ट्रवादी सरकार टिकवेल
- Log in or register to post comments
त
तिमा
Sun, 11/08/2015 - 17:34
नवीन
यापुढे भाजपाला संसदेत कुठलेही बिल पास करता येणे अवघड आहे. तिथेही सर्व विरोधकांची फौज एकत्र होऊन भाजपाने जे केले त्याची परतफेड करेल. यापुढचे राजकारण म्हणजे केव़ळ, एक सूडाचा प्रवास ठरणार आहे. सामान्य जनतेने आपले भले होण्याची स्वप्ने सोडून द्यावीत.
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Sun, 11/08/2015 - 19:16
नवीन
+१
मी अतिसामान्य असल्याने, ही असली स्वप्ने बघायची चैन, फार वर्षांपुर्वीच सोडून दिली आहे.
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Mon, 11/09/2015 - 19:02
नवीन
बोलावून बिले पास करु शकतात
- Log in or register to post comments
अ
अर्धवटराव
Mon, 11/09/2015 - 03:09
नवीन
लोकसभा निवडणुकीचेवेळी भ्रष्टाचाराचा मुद्दा शेवटपर्यंत जागा होता. तोंडावर का होईना, सुरुवातीला बिहार निवडणुक प्रचार 'विकास' वगैरे मुद्द्यांवर होत होता. पण लवकरच बिहारी बाणा जागा झाला व जात-धर्म वगैरे महत्वाचे मुद्दे ऐरणीवर आले. मुळातच तकलादु असणारे विकासाचे मुद्दे आता लवकर निकाली निघतील. इलेक्शन मॅनेजर्स आता जातीय मुद्द्यांना परत प्रथम क्रमांकावर आणतील. दॅट्स बॅड.
- Log in or register to post comments
म
मोगा
Mon, 11/09/2015 - 04:13
नवीन
बिहारमध्ये भाजपचा पराभव ही माझ्या वडिलांना श्रद्धांजली... दादरी हत्याकांडातील बळी मोहम्मद इकलाक यांच्या मुलाची प्रतिक्रिया..
- Log in or register to post comments
ग
गॅरी शोमन
Mon, 11/09/2015 - 10:43
नवीन
घाल कुत्र्याला नावाचा प्रयोग गेले कितीतरी वर्षे रंगतो आहे. एके काळी व्ही पी सिंग, देवीलाल आणि चंद्रशेखर यांनी काँग्रेस नको आणि भाजप नको यासाठी असले प्रयोग करुन देश मागे नेला. आता मुलायम , लालुप्रसाद , शरद पावर आणि मंडळी नितीशकुमारांना पुढे करुन आपली स्वप्न साकार करण्याचा मार्ग शोधतील.
देशव्यापी पक्ष नाही. विचारधारा म्हणाल तर ती ही नाही. भाषा आणि स्थानिक प्रश्नांना कुरवाळत ही आघाडी उभारतील आणि भाजप च्या कच्च्या दुव्यांच भांडवल करुन त्याला जातिय समीकरण जोडुन औट घटकेच राज्य करतील.
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Mon, 11/09/2015 - 11:23
नवीन
गॅरी शोमन तुमच्या आयडीचे एका जुन्या आयडीशी नामसाधर्म्य आहे .
२ दिवसात फारच सुद्ध लिहिता ओ ! कौतुक आहे
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Mon, 11/09/2015 - 11:54
नवीन
कौन है वो कौन हे वो ... कहांसे वो आया. चारो दिसाओंमे तेजसा वो छाया. (सौजन्य: बाहुबली द बीग-इनिंग)
- Log in or register to post comments
आ
आनन्दा
Tue, 11/10/2015 - 02:14
नवीन
हायला मी ते शोमन वाचलेच नव्हते. नुसतेच गॅरी वाचले..
कपिल्मुनी असे काय असंबद्ध लिहितात म्हणून परत वाचले तेव्हा कळले.
गॅरी सर तुम्ही पण डु आयडी - डु आयडी खेळायला लागलात की काय? आणि कोणाशी खेळताय काकासाहेबांशी?
(मिपावरील क्लिंटन आणि गॅरी टुमन यांचा पंखा, अजून शोमन यांचा पंखा झालेलो नाही, त्यांनी कर्तृत्व दाखवले की होईन.)
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
Tue, 11/10/2015 - 05:50
नवीन
तो मी नव्हेच.
संपादकमंडळाला विनंती आहे की नवे सदस्यनाम देताना सध्या मिपावरील अन्य कोणत्या सदस्याच्या नावाशी साधर्म्य असलेले नवे सदस्यनाम देऊ नये. गॅरी शोमन यांनी प्रतिसाद देताना साधारण मी तिसर्या आघाडीविरूध्द लिहित असतो त्याप्रमाणेच लिहिले आहे त्यामुळे इतर मिपाकरांचा गॅरी शोमन हा माझाच डु.आय डी आहे असा गैरसमज व्हायची शक्यता आहे. आणि गॅरी शोमन यांनीही ते सदस्यनाम घेताना अशा कुठल्या हेतूने घेतले असेल असे नक्कीच नाही.पण मिपावरील सदस्यनामाबरोबर इतर सदस्यांच्या मनात त्या सदस्याविषयीची एक प्रतिमा नकळत तयार होत असते.अशावेळी साधर्म्य असलेले दुसरे नाव येण्याने थोडा गोंधळ उडू शकेल.
मान्य आहे की मिपावर २५-२६ हजार सदस्य आहेत त्यामुळे सगळ्या नावांशी साधर्म्य नसलेली नवी सदस्यनामे मंजूर करणे थोडे जिकरीचे काम आहे. पण सगळे २५-२६ हजार नाही तरी मिपावर नियमितपणे लिहिणार्या सदस्यांच्या नावांशी साधर्म्य असणारे नवे नाव मंजूर करताना तरी याचा विचार करता आला तर बघावा अशी विनंती. अर्थातच संपादक आपले नोकरी-व्यवसाय सांभाळून मिपाचेही काम सांभाळतात आणि ते काम सोपे नाही हे पण मान्य आहे. तेव्हा सहजासहजी जमले तर हे करावे ही विनंती.
धन्यवाद आनन्दा
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Tue, 11/10/2015 - 14:10
नवीन
बाडीस
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Tue, 11/10/2015 - 05:21
नवीन
common minimum programm (ल सा वि ) = ०
- Log in or register to post comments
न
नाना स्कॉच
Tue, 11/10/2015 - 02:50
नवीन
तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
- Log in or register to post comments
ग
गॅरी शोमन
Tue, 11/10/2015 - 18:38
नवीन
मी शुध्द लिहितो हा प्रश्न आहे की तीन दिवसाच्या सदस्यतेच्या जोरावर तिसर्या आघाडीच्या विरोधात लिहीतो हे चुकतय ? बहुतेक जशी राजकारणात कंपुबाजी आहे तशी मिपावर पण आहे का त्यांना धक्का बसतो आहे ? गॅरी ट्रुमन तुम्ही लिहीता ते सर्व ट्रुच असत असा तुमचा समज आहे ?
जॉनी वॉकरने कधी जॉनी लिवरला त्याच्या मुळे गैरसमज होईल असे म्हणले नाही. गॅरी ट्रुमन तरी वर्जनल नाव आहे का ?
प्रश्न देशाच्या राजकारणात एक नवी दिशा येऊ घातल्याचा. एक भ्र्ष्टाचाराच्या आरोप सिध्द झालेला नेता पॅरोलवर असताना निवडणुका चालवतो. सत्तेची समीकरण बांधतो. जातिय समीकरण चालवुन यशस्वी होतो. कायदा बनवणारी संसद/ विधानसभा, त्याला शिक्षा सुनावणारे हाय कोर्ट आणि लोकशाहीचा तिसरा चवथा स्तंभ लोकशाहीची क्रुर थट्टा फक्त सुप्रिम कोर्टात प्रलबिंत आहे म्हणुन ?
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Tue, 11/10/2015 - 19:02
नवीन
उदाहरण चुकले साहेब. जिथे जे बरोबर ते बरोबर. इथे फक्त नाव हीच आयडेंन्टीटी आहे लेखकाची. चेहरा दिसत नाही. नाव दिसतं. प्रत्यक्ष जगातही एकसारखं नाव दिसत असेल तर कारवाई होते. कोलगेट ला कोलजेट, बिसलरी ला बिसपरी, सॅमसंग ला सॅमगंज असे हुबेहुब दिसणारे प्रॉडक्ट काढलेत तर पब्लिक गंडतं, इथे तर फक्त नाव आणी प्रतिसाद दिसतात. तेव्हा नामसाधर्म्यामुळे घोळ होऊ शकतात. मीच कित्येक पहिलं नाव संदीप (उदा. संदीप चित्रे) असलेल्या आयडीने टाकलेल्या प्रतिसादांना बघून एका क्षणासाठीतरी गोंधळतो की हे आपण कधी टंकलंय... माझं स्वतःचं स्वतःबद्दल असं होतं तर इतरांचं काय? तसेही आपण नाव बदलून दुसरं घेतलं तरी विचार आपलेच असणार आहेत. तुम्हाला स्वत:ला काय फरक पडेल? तसेही गॅरी शोमन हे तुमचे खरे नाव तर नाहीच. गॅरी ट्रुमन यांनी ते नाव घेण्यामागे काही भूमिका मांडली होती. तसाच साधर्म्य असलेले नाव आपण मुद्दाम घेतले आहे असा संशय आला तर साहाजिक आहे. त्यात तुम्ही चिडण्यासारखे काय आहे?
मिपावर लिहा, बिन्दास. कुणाही विरूद्ध. त्याला काय ना नाय. पण वाचकांचा गोंधळ उडू नये म्हणून हा प्रतिसाद प्रपंच. बाकी तुम्ही आणि संपादक मंडळी जाणोत...
- Log in or register to post comments
र
रमेश आठवले
Tue, 11/10/2015 - 21:45
नवीन
सध्या सोयीस्कर आहे म्हणून मोदींवर हिरीरीने तोंडसुख घेणाऱ्या सर्वांनी त्यांना स्क्याम फेम सोनिआ आणि लालू यांनी परत दिल्लीत सत्तेवर यावे असे वाटते आहे का याचाही विचार केला पाहिजे.
- Log in or register to post comments
व
विकास
गुरुवार, 11/12/2015 - 00:38
नवीन
आली रे आली सहिष्णूता आली!
गेल्या दिड वर्षात या असहीष्णुतेने नुसता उच्छाद मांडला होता. त्यामुळे बिचार्या लालूला सर्वजण टाकून बोलत होते. मात्र आता केजरीवाल यांनी असल्या असहीष्णूतेस लगाम लावायचे ठरवले आहे. म्हणूनच आआप चे शिकागो मधे प्रतिनिधित्व करणार्या मुनिष रायझादा हे लालूंच्या विरोधात बोलले म्हणून त्यांच्या तात्काळ स्थगिती आणली. ते अमेरीकेत असले म्हणून काय झाले? त्यांच्या स्वातंत्र्याच्या नावाखाली आता भारतीय असहीष्णुता चालवून घेणार नाहीत हे या निमित्ताने स्पष्ट झाले आहे. - हा देखील बिहारच्या निकालाचा अर्थ आहे! ;)
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sat, 11/14/2015 - 10:36
नवीन
लालूकडे ८० आमदार आहेत व काँग्र्सकडे २७. दोघांकडे एकूण १०७ आमदार आहेत. त्यांना बहुमतासाठी फक्त १५ आमदार हवे आहेत. अपक्ष व इतर छोट्या पक्षाच्या आमदारांची संख्या १२ आहे. हे १२ आमदार लालू सहज खिशात घालू शकतो. म्हणजे फक्त ३ आमदार कमी पडतात. हे ३ आमदार संजद किंवा भाजपकडून मिळविले तर लालूकडे बहुमत येते. लालू त्यासाठी जोरदार प्रयत्न करणार हे नक्की.
आमदार फोडाफोडी मान्य होण्यासाठी सभापतीच्या मान्यतेची गरज लागते. दुर्दैवाने सभापतीपद लालूच्या पक्षाकडे गेले तर हा फोडाफोडीचा खेळ काही काळातच सुरू होऊन नितीशकुमारांना घालविण्याचे प्रयत्न सुरू होतील. लालूसारखा महाकारस्थानी माणूस गप्प न बसता आमदारांची जमवाजमव करून आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री करण्याचा जोरदार प्रयत्न करणार हे नक्की. नितीशकुमारांनी कोणत्याही परिस्थितीत सभापतीपद व गृहमंत्रीपद स्वतःच्याच पक्षाकडे राखावे.
- Log in or register to post comments
- 1
- 2
- ›
- »