Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मिपाकरांनो तुमचे वय काय?

प
परिकथेतील राजकुमार
Sun, 11/08/2015 - 15:18
🗣 94 प्रतिसाद
'मिसळपाव डॉट कॉम' नावाच्या सोशल साइटचा दिवाळी अंक गेली अनेक वर्षं निघतो आहे. तरुण-हौशी मंडळींनी केलेलं संपादन आणि लेखन ही या अंकाची जमेची बाजू. धीरगंभीर चर्चात्मक विषयांचा वाराही या दिवाळी अंकाला लागलेला दिसणार नाही. पण उत्साही, अनौपचारिक भाषा वापरणारं, दिलखुलास दाद देणारं, स्वागतशील वातावरण हा या अंकाचा विशेष. त्या मानानं तो तसा फार प्रोफेशनल वा प्रमाणलेखनाचे निकष काटेकोरपणे पाळणारा असेलच असं नव्हे. त्याच्या वाचकाचं वय मात्र निश्चितपणे कमी आहे, आणि ते प्रतिक्रियांमधून लगेच लक्षात येतं. -------------------------- आजच्या मटामध्ये मेघनाताईंचा 'दिवाळी अंकांची ऑनलाईन आतषबाजी' हा लेख आलाय, त्यातील ही मिपा दिवाळी अंकाची दखल. हा पॅरा वाचून काही प्रश्न पडले म्हणून हा लेखन प्रपंच. ढिस्क्लेमर :- १) मेघनातै आणि आमचे काय वैर नाय. (गतसाली त्यांच्याकडून वट्ट रकमेचा लेखनाबद्दलचा चेक आपल्याला मिळालेला आहे.) २) प्रा. डॉ. मिपा दिवाळी अंकाचे मुख्य संपादक असताना देखील 'तरुण-हौशी मंडळींनी केलेलं संपादन' असा उल्लेख केल्याने मला जळजळ झालेली नाहीये. तर आता सुरुवात करतो.
तरुण-हौशी मंडळींनी केलेलं संपादन आणि लेखन ही या अंकाची जमेची बाजू.
ह्या अंकाचे संपादन तरुण आणि हौशी लोकांनी केल्याने नक्की जमेची बाजू काय घडली हे कुठेही सांगण्यात आलेले नाही.
धीरगंभीर चर्चात्मक विषयांचा वाराही या दिवाळी अंकाला लागलेला दिसणार नाही. पण उत्साही, अनौपचारिक भाषा वापरणारं, दिलखुलास दाद देणारं, स्वागतशील वातावरण हा या अंकाचा विशेष.
संपादन तरुण आणि हौशी लोकांनी केल्याने हे असे घडले आहे असे म्हणायचे असावे काय? धीरगंभीर विषय अंकात आले तर त्याला दखलपात्र म्हणता येईल काय? किंवा 'उत्तम' दिवाळी अंकाची व्याख्या नक्की काय असते? ६०+ वर्षाचे संपादक आणि उगाच जागतिक चर्चा, संस्कृतीचा उपापोह इ. विषय अंकात आले की त्याला दर्जा मिळतो? ताईंनी म्हणल्याप्रमाणेच 'उत्साही, अनौपचारिक भाषा वापरणारं, दिलखुलास दाद देणारं, स्वागतशील वातावरण' हे पुरेसे नाही काय? 'धीरगंभीर चर्चात्मक विषयांचा वारा' जिथे वाहतो त्या संस्थळांची गेली काही वर्षे जी अवस्था आहे, ती योग्य संदेश देणारी नाही काय?
त्या मानानं तो तसा फार प्रोफेशनल वा प्रमाणलेखनाचे निकष काटेकोरपणे पाळणारा असेलच असं नव्हे. त्याच्या वाचकाचं वय मात्र निश्चितपणे कमी आहे, आणि ते प्रतिक्रियांमधून लगेच लक्षात येतं.
प्रोफेशनल वा प्रमाणलेखनाचे निकष काटेकोरपणे पाळणारे अनेक छापील दिवाळी अंक काही कालावधीत 'राम' म्हणायला लागले. अनेक उदाहरणे तर आपण जाणतोच. मुळात ई-दिवाळी अंकांना निकष कशाला हवेत? उत्स्फूर्त लेखन आणि मायमराठीची सेवा ही निकषांमध्ये बसवायचीच कशाला? मनमोकळे लेखन आणि नवलेखकांचा हुरूप हीच खरेतर अशा अंकांची देणगी असते. नावाजलेल्या लेखकांना आणि त्यांच्या 'दवणीय किंवा मला पहा फुले वाहा' प्रकारच्या लेखनाला कंटाळूनच गेली काही वर्षे वाचक सातत्याने नवलेखकांना आवर्जून वाचत आहेत. एखाद्या अंकात असे नावाजलेले लेखक नसतील तर त्याची पात्रता खालावते का? आणि सगळ्यात खटकला तो वाचकांच्या वयाचा उल्लेख. फक्त प्रतिक्रिया देतात तेवढेच त्या अंकाचे वाचक असतात का? किती तरी लोक निव्वळ वाचनमात्र असतात. त्यात सर्व वयोगट आणि प्रोफेशनमधील वाचक असतात. त्यांना फक्त प्रतिक्रिया दिली नाही म्हणून गणतीत घ्यायचेच नाही का? मुख्य म्हणजे वाचकांचे वय आणि प्रतिक्रिया ह्यांचा संबंधच काय येतो? आणि वाचकांच्या वयाचा आणि अंकाच्या दर्जाचा संबंध काय? 'चांदोबा' आज सर्व वयोगटातील लोकं वाचतातच ना? का तिथे इयत्ता ५वी ते ८वी च्या विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिल्याने तुम्ही त्याला 'फक्त बालगोपाळांचे' असे मानणार आहात? तर महत्त्वाचा प्रश्न असा आहे, की मिपाकरांनो तुमचे वय काय? लेखात बौद्धिक का शारीरिक ते स्पष्ट केलेले नसल्याने, कृपया दोन्ही वयं सांगा.

प्रतिक्रिया द्या
15052 वाचन

💬 प्रतिसाद (94)
प
पैसा Sun, 11/08/2015 - 15:29 नवीन
चारचौघांत वय काय विचारता हो परा काका?
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Sun, 11/08/2015 - 15:31 नवीन
एक कुठले तरी सांगा की पण. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा Sun, 11/08/2015 - 15:32 नवीन
मेघनातै पुणेकर आहेत का? (पळून जाते हां आता.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
ग
गॅरी ट्रुमन Sun, 11/08/2015 - 16:10 नवीन
मग आपला परा काय चंद्रावरचा आहे का? (चला मी पण पळतो आता :) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
ट
टवाळ कार्टा Sun, 11/08/2015 - 15:37 नवीन
वय घेउन त्या माहितीचा काय उपयोग करणार आहात?
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Sun, 11/08/2015 - 15:40 नवीन
वय घेउन त्या माहितीचा काय उपयोग करणार आहात?
तुच्छता दर्शविणारी स्मायली. अजून पाचशे वर्षांनी मानवी संस्कृतीचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळी पराने गोळा केलेल्या विद्याचे महत्व समजून येईल. रेफरन्स न कळल्यास व.पु.काळ्यांचे स्टॅटिस्टिक मराठे ऐकावे ही विनंती. (हे मिपावरील स्त्री सदस्यांनी वाचले नाही तरी चालेल :) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Sun, 11/08/2015 - 15:46 नवीन
आयला...तुम्हीसुध्धा?? तुम्ची हि बाजू म्हैत नव्हती =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
प
परिकथेतील राजकुमार Sun, 11/08/2015 - 15:52 नवीन
तुच्छता दर्शविणारी स्मायली. अजून पाचशे वर्षांनी मानवी संस्कृतीचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळी पराने गोळा केलेल्या विद्याचे महत्व समजून येईल.
ह्याला म्हणतात 'द्रष्टेपणा'. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
प
प्रचेतस Sun, 11/08/2015 - 15:39 नवीन
ह्या मेघनाताई कोण? कुणी पोक्त बाई आहेत काय?
  • Log in or register to post comments
स
सोत्रि Sun, 11/08/2015 - 15:39 नवीन
कोणा 'खास आयडींचे' वय जाणून घेण्याकरता चक्क एक लेख पाडण्याचा वयस्कर अट्टाहास का बौद्धिक दिवाळखोरी? - (वयस्कर पुणेरी) सोकाजी
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Sun, 11/08/2015 - 15:51 नवीन
कोणा 'खास आयडींचे' वय जाणून घेण्याकरता चक्क एक लेख पाडण्याचा वयस्कर अट्टाहास का बौद्धिक दिवाळखोरी?
तुम्ही जेष्ठ आहात का? हा प्रश्न विचारायचा तुम्हाला अधिकार आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि
व
विशाल कुलकर्णी Sun, 11/08/2015 - 19:21 नवीन
हा प्रश्न विचारायचा तुम्हाला अधिकार आहे का सोत्रिंच्या आगामी पुस्तकाला (चावडीवरचे कॉकटेल) मिळू घातलेला पुरस्कार परत करण्याच्या निर्णय सोत्रिनी घेतलेला आहे. त्यामुळे त्याना कुठल्याही मुद्द्यावर काहीही प्रश्न विचारण्याचा हक्क आपोआपच प्राप्त झालेला आहे परागुर्जी , उगाच शंका घेवू नये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
स
सोत्रि Mon, 11/09/2015 - 00:59 नवीन
विशल्या, तुमाखमि!! - (विशाल पुरस्कृत जेष्ठ) सोकाजी ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशाल कुलकर्णी
स
सोत्रि Mon, 11/09/2015 - 01:03 नवीन
तुम्ही जेष्ठ आहात का?
सुरूवातीला एकदा वय विचारल्यावर परत हा प्रश्न अस्थानी आहे! इतकं साधं तुमच्या ध्यानात येऊ नये? अशाने मेघनाकाकूंच्या म्हणण्याला दुजोराच देताय की!! - (अधिकारी) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
म
मांत्रिक Sun, 11/08/2015 - 15:40 नवीन
मुद्दे छान मांडलेत. त्याबद्दल सहमत. पण एक प्रश्न. माझ्या माहितीत, चांदोबा गेली ३-४ वर्षे तरी बंद आहे.चांदोबा नक्की मिळत असेल तर सांगा. मलाही आवडेलच वाचायला. सर्व जुन्या चांदोबांच्या डिजिटल काॅपीज archive.org येथे आहेत. हौशी वाचक येथे वाचू शकतात.
  • Log in or register to post comments
म
मांत्रिक Sun, 11/08/2015 - 16:35 नवीन
अर्र. या लिंकवरचे चांदोबाचे अंक उडवलेत. तीन ते चार महिन्यांपूर्वी मी येथूनच जवळजवळ जुने २०-२५ अंक डाऊनलोड केले होते. पण मोबाईलची स्टोअरेज कमी पडू लागल्याने पुन्हा डिलिट केले. मोठी चूक झाली माझ्याकडून. आता हा ठेवा पुन्हा मिळणे नाही... एक अनमोल सांस्कृतिक ठेवा हरवला... शेवटी शेवटी चांदोबातील लेख व चित्रे यांचा दर्जा राखता आला नव्हता. शंकर, चित्रा, जया यांची चित्रे आयुष्यात कधीच विसरु शकणार नाही. कुणाकडे आहे का असा जुन्या चांदोबाच्या अंकाचा संग्रह. विकत घ्यायची इच्छा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मांत्रिक
ड
डॉ सुहास म्हात्रे Sun, 11/08/2015 - 15:41 नवीन
मिपाचा या वर्षीचा दिवाळी अंक अजून प्रकाशित झालेला नसताना तो कसा असेल याबद्दल खात्रीचे मत पाहून (महाभारत फेम संजयाच्या एक पाऊल पुढे जाणारी) भविष्यातले लेखन वाचणारी दिव्यदृष्टी आस्तित्वात असल्याचा संशय येऊ लागला आहे ;) :) =)) तसेच, मुक्त संस्थळावरच्या वाचकांचे वय शोधून काढण्याचा अल्गोरिदम आस्तित्वात असल्याचाही संशय येतोय =))
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Sun, 11/08/2015 - 15:52 नवीन
इतके दिवस खुबीने गुप्त ठेवलेले आमचे वय अश्या रितीने उघड झाल्याने ते सगळे श्रम व्यर्थ गेले की हो Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ग
गवि Sun, 11/08/2015 - 15:54 नवीन
+१.. अगदी, अगदी.. मेघनाताईने मिपाचं थोडं कौतुक, थोडं मूल्यमापन केलेलं असलं तरी एकंदरीत प्राध्यापक येरकुंडकरांच्या सत्कारातल्या भाषणाची आठवण झाली हे खरं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ब
बॅटमॅन Sun, 11/08/2015 - 19:12 नवीन
एकंदरीत प्राध्यापक येरकुंडकरांच्या सत्कारातल्या भाषणाची आठवण झाली हे खरं.
असेच म्हणतो. (जालीय इतिहासात सुवर्णफॉण्टाने लिहिल्या जाणार्‍या प्रसंगांचा फॅन) बॅटमॅन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
उ
उगा काहितरीच Sun, 11/08/2015 - 15:45 नवीन
चंग्या अन् आम्ही सोबतच झेड पीच्या शाळेत जात होतो . पुढे हा चंग्या हठयोग शिकला अन चांगदेव म्हणून प्रसिद्ध झाला . आता यावरून आमचे वय लक्षात येत असेल तर चांगली गोष्ट आहे.
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Sun, 11/08/2015 - 15:48 नवीन
म्हणजे तू माझ्या नंतरच्या बॅचचा की रे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच
ज
जेपी Sun, 11/08/2015 - 16:10 नवीन
उगा चा षटकार!! _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच
प
पियुशा Sun, 11/08/2015 - 16:21 नवीन
मेघना काकू किती वर्षाच्या आहेत नक्की ६० + काय ? ;) हे म्हणजे असय आपला तो बाब्या न दुसर्याच् ते कार्टा(टवाळ ) नै ब्र का ;) असो..... मिपा बाळस धरायला लागल काला टिका तो बनता है :)
  • Log in or register to post comments
ल
लाल टोपी Sun, 11/08/2015 - 16:32 नवीन
मेघनाताई/काकूंचे मनःपूर्वक आभार त्यांच्यामुळे ब-याच दिवसांनंतर 'परा' लिहीते झाले. वेलेकम बॅक.
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 11/08/2015 - 16:45 नवीन
उत्साही, अनौपचारिक भाषा वापरणारं, दिलखुलास दाद देणारं, स्वागतशील वातावरण हा या अंकाचा विशेष. त्याच्या वाचकाचं वय मात्र निश्चितपणे कमी आहे, आणि ते प्रतिक्रियांमधून लगेच लक्षात येतं.
(मधलं वाक्य काढून) ही दोन वाक्यं एकत्र केली की मेघनाताईंना काय म्हणायचंय ते लक्षात येतं. बुढ्ढे उत्साही, अनौपचारिक आणि दिलखुलास असत नाहीत. उत्साह, अनौपचारिकता, दिलखुलासपणा ही मनाने तरुण असणाऱ्यांची लक्षणं असतात.
  • Log in or register to post comments
च
चिंतामणी Sun, 11/08/2015 - 18:11 नवीन
दिलखुलासपणा ही मनाने तरुण असणाऱ्यांची लक्षणं असतात. एक सांगाल का वरचे वाक्य लिहीता आणि " बुढ्ढे उत्साही, अनौपचारिक आणि दिलखुलास असत नाहीत." असे सुद्धा म्हणता. म्हणजे "जे उत्साही, अनौपचारिक आणि दिलखुलास नसतात ते बुढढे असतात" असा निष्कर्श काढायला हरकत नसावी. बरोबर?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
३
३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 11/09/2015 - 05:13 नवीन
बरोबर. आता मुखपृष्ठ किंवा दोन चित्रं पहा. 'मिसळपाव'च्या या वर्षीच्या अंकाची जाहिरात उजवीकडे दिसत आहे, त्यात दंगामस्ती, गंमत, उत्साह, घराबाहेर पडून करायची मौजमजा, असं दर्शवणारे फटाके आहेत. पार्श्वरंग काळा वापरूनही मला त्या फटाक्यांमधला लाल, निळा, हिरवा, पिवळा, सोनेरी उत्साह दिसतोय. 'रेरे'च्या अंकाचं मुखपृष्ठ पहा, वाचणाऱ्या दोन मुली दिसतात. त्यातून शांत, (बुढ्ढा) पोक्तपणा डोकावतो. त्यातले रंगही तसे फिकट, मातकट, किंचित पेस्टल प्रकारचे, शांत आहेत. मिसळपावचा दिवाळी अंक फटाक्यांसारखा, उत्साहाने फसफसणारा असतो/असेल असं वाटतं का गपचूप, घरात लोळत पुस्तकं वाचणाऱ्यांतला असतो/असेल असं वाटतं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी
च
चांदणे संदीप Sun, 11/08/2015 - 16:48 नवीन
म्हणजे बगा ते आपले प्रसिद्ध हंगल नाहीत का? ते माझ्यानंतरच्या पाचव्या भावाच्या वर्गातल्या मित्राच्या लहान बहीणीच्या मैत्रीणीच्या आतेभावाच्या लहान भावाच्या सोबत असलेल्या विडी कामगार युनियन संघाच्या अध्यक्षांचे मुलगे होत. आता माझे वय सांगायची गरज नसावी! Sandy (तसा मी अज्जून्न ल्हानैच्च!)
  • Log in or register to post comments
म
माम्लेदारचा पन्खा Sun, 11/08/2015 - 16:52 नवीन
(जी अजून उघड व्हायची बाकी आहे).... गतवर्षीच्या अनुभवावरून आगामी अंकाचे सरसकटीकरण हा विषय नक्कीच दखलपात्र होऊ शकला असता पण
मटामध्ये
ह्याची चर्चा आल्यामुळे निर्धास्त झालोय.... रंगीत चित्रांपलीकडे काहीही न छापणार्या वृत्तपत्राची अशी बातमी किती जण वाचतील ही शंकाच आहे !!
  • Log in or register to post comments
म
मित्रहो Sun, 11/08/2015 - 16:52 नवीन
पैसे दिले तर दर्जा सुधारतो, आमच्या ज्ञानात अमूल्य भर पडली. दुसरे म्हणजे जे ना-वाजलेले असत ते दर्जेदार असत.
संस्थळावरच्या वाचकांचे वय शोधून काढण्याचा अल्गोरिदम आस्तित्वात असल्याचाही संशय येतोय
पीचइ, झुकेरबर्ग बघताय ना, मोदी उगाचच म्हणत नाही Next Big thing is in India.
मिपाकरांनो तुमचे वय काय?
तुम्हाला किती पाहीजे, करुन देऊ.
  • Log in or register to post comments
ज
जेपी Sun, 11/08/2015 - 17:02 नवीन
टक्या म्हणुन गेलाय, Age is just a number
  • Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी Sun, 11/08/2015 - 17:06 नवीन
च्यायला, वय कमी आहे असं म्हटल्याबद्दल तक्रार करतोय परा! भेंडी आपण तर सगळ्यांना आपण कॉलेजकुमार असल्याचंच सांगतो. फेसबुकचा प्रोफाइल पिक बदलण्याची लोक अहमहमिका बाळगतात. दर वेळी बदलला की साला 'मस्त, हॅंडसम हां, एकदम ष्टाइलमध्ये...' असे मेसेजेस पुर्षांना तर 'अय्या कित्ती गोड, सो स्वीट, काय सुंदर दिसत्येस गं - जळजळ, सुंदर' असे मेसेज बायकांना पडतात. पडतात म्हणजे खचच पडतो त्यांचा. पण या सगळ्या फुकटच्या प्रसिद्धीकडे पाठ फिरवून आपण गेली सहा वर्षं तोच फोटो ठेवलाय! का, तर आपलं वय वाढलंच नाही असा भास निर्माण करायला. आणि हा परा लहान म्हटल्यावर खवळतोय! कोणाला कशाचं आन् कोणाला कशाचं!
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sun, 11/08/2015 - 17:12 नवीन
मटा संवादमधला तो लेख इथे वाचा. लेखकाचे नाव दिसत नाही.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Sun, 11/08/2015 - 17:31 नवीन
अंकाचं संपादन, प्रमाणभाषा वगैरेंबद्दलच्या कॉमेंट्स उथळ वाटल्या विशेषतः नवीन अंक अजून आला नसताना तर अवेळी केल्यासारख्या. वाचकांच्या वयाबाबतचा अंदाजही असाच पोरकट आहे. तसेही ई-दिवाळी अंकाच्या वाचकांचे सरासरी वय हे कागदी अंकांच्या वाचकांच्या सरासरी वयापेक्षा कमी असण्याची शक्यता बरीच जास्त आहे कारण हे माध्यम हाताळण्यातला त्यांचा आत्मविश्वास, सवय इ. एकूण दिवाळी अंकांचे संपादन हे यथातथाच असते हा शेराही अनावश्यक वाटला. अनाहिताच्या रुची अंकाकडे बघून यथातथा संपादनातून हे काम होऊ शकेल असे नक्कीच नाही इतके कोणीही सांगू शकेल. तेव्हा लेख लिहून त्यात ऐसीअक्षरे आणि रेषेवरची अक्षरे या संस्थळांची जाहिरात करण्यामागचा हेतू लक्षात न येण्याइतके मिपावाचकांचे वय कमी नाही इतके लक्षात घेतले तरी पुरे! :) (बालके)रंगा
  • Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज Sun, 11/08/2015 - 18:27 नवीन
ऐसीअक्षरे आणि रेषेवरची अक्षरे या संस्थळांची जाहिरात करण्यामागचा हेतू लक्षात न येण्याइतके मिपावाचकांचे वय कमी नाही इतके लक्षात घेतले तरी पुरे! :)>>>>>>>>>>> Image removed. सो क्लॉऊडतै Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
ब
बॅटमॅन Sun, 11/08/2015 - 19:14 नवीन
अंक न वाचता जुन्या प्रतिमेवर आधारित लेखन केल्यासारखे वाटले. वर गवि म्हणतात तसे ते प्राध्यापक येरकुंडकरांच्या भाषणाची आठवण आली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
ग
गवि Mon, 11/09/2015 - 09:30 नवीन
येरकुंडकरांचं भाषण नव्हे रे मेल्या. भांबुर्डेकरांचं भाषण. सत्कार येरकुंडकरांचा.. ते सरदार पंचपात्रीकरांच्या वाड्यात ज्यांचे वडील आहारविभागात सेवक होते नाही का?.. ते.. किंवा शिक्षणमंत्री ज्यांचे शाळूसोबती आहेत ते. किंवा आता आरण्येश्वर कॉलनीतल्या प्रशस्त बंगल्यात तंगड्या पसरुन झोपाळ्यावर बसतात आणि रोज शिक्रण मटारउसळ खातात ते.. किंवा म्युन्सिपाल्टीच्या शाळेत इयत्ता चौथीपर्यंत (चि.) भांबुर्डेकरांना जे मास्तर शिकवायचे ते.. दिवस सुवर्ण नाही तरी जस्ती किंवा कथिलाक्षरांत कोरुन ठेवण्यास हरकत नाही. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Mon, 11/09/2015 - 09:33 नवीन
हाहाहाहा रैट्ट.....गुरुवर्य येरकुंडकरांचा सत्कार म्हणजे विद्वत्तेच्या सूर्याचा सत्कार!!!! मित्रहो, ही घटना पुणे महानगराच्या सांस्कृतिक इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवण्यासारखी आहे. =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
ट
टवाळ कार्टा Mon, 11/09/2015 - 09:45 नवीन
चक्क वाल्गुदस्वामी चूकले???? हिच्च घटना सोन्याच्या* अक्षरात लिहिण्यासारखी आहे *खरे** सोने न मिळाल्यास सोन्या नावाच्या मुलाकडून लिहून घेण्यात यावे **खरे म्हणजे खर्यांकडचे नव्हे...शुध्ध मराठीत पिव्वर :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Mon, 11/09/2015 - 09:47 नवीन
गप्राव्रे =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Mon, 11/09/2015 - 10:25 नवीन
ख्या ख्या ख्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
न
नाखु Mon, 11/09/2015 - 10:30 नवीन
"सुवर्ण" संधी साधली तर !!!! निरिक्षक नाखुस चिमण हटेला गँग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
स
सुबोध खरे Sun, 11/08/2015 - 17:45 नवीन
"मिपा च्या उलट "उपक्रम डॉट ऑर्ग" चा अंक उत्तम पण २०१२ नंतर बंद पडला." याचा अर्थच हा आहे कि मिपा प्रवाही आहे आणि जास्तीत जास्त ज्ञान देण्याच्या प्रयत्न करणारे बंद पडले. ज्ञानासाठी दिवाळी अंक का वाचावे? गुगल कशासाठी आहे? ललित साहित्य हे कमी दर्जाचे मानणारे दुद्धाचार्य कमी नाहीत. त्यांची मते त्यांच्यापाशी. कोणी आपल्या पाठीमागे "कानगोष्टी करतो आहे याचा अर्थच मी त्याच्या पुढे आहे" हे मानणारा मी आहे. बाकी आम्ही तरुण आहोत हे ऐकून आनंदच झाला. हाथी चलत अपनी चाल कुत्ता भुकत हो तो भूकवा दे
  • Log in or register to post comments
च
चिंतामणी Sun, 11/08/2015 - 17:49 नवीन
परा लगे रहो.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 11/08/2015 - 18:08 नवीन
सध्या रुमाल टाकून ठेवतो. :) -दिलीप बिरुटे (तरुण, [वाचनवयही तरुण] हौशी, स्मार्ट, आणि देखणा कट्टर मिपाकर ) ;)
  • Log in or register to post comments
स
सायकलस्वार Sun, 11/08/2015 - 18:15 नवीन
मिपाच्या अंकातली मिसळ कशी का असेना निदान ताजी तरी असते. तिकडे 'वेशीवरची लक्तरे' नावाच्या अंकात मेजवानी देत असल्याचा आव आणून कधीच्या उष्ट्या पत्रावळीच वाढल्या आहेत.
  • Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज Sun, 11/08/2015 - 18:46 नवीन
तिकडे 'वेशीवरची लक्तरे' नावाच्या>>>>>> Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सायकलस्वार
अ
अत्रुप्त आत्मा Tue, 11/10/2015 - 05:29 नवीन
'वेशीवरची लक्तरे' Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज
प
पैसा Sun, 11/08/2015 - 18:15 नवीन
'मिसळपाव डॉट कॉम' नावाच्या सोशल साइटचा दिवाळी अंक
म्हणजे मिपा फेसबुकच्या लैनीत बसते काय?
त्या मानानं तो तसा फार प्रोफेशनल वा प्रमाणलेखनाचे निकष काटेकोरपणे पाळणारा असेलच असं नव्हे.
हे वाचले त्यावरून ताईंनी आधीचे अंक वाचले नसावेत असा निष्कर्ष बहुधा काढता येईल. श्री सुधांशु नूलकर हे प्रशिक्षित आणि अनेक छापील दिवाळी अंक तसेच पुस्तके, माहितीकोष यांचा अतिशय विस्तृत अनुभव असलेले मुद्रितशोधक स्वतःच्या घरचा अंक असल्यासारखे अगदी मनापासून मेहनतीने गेली तीन वर्षे मिपा दिवाळी अंकातील लेखांचे मुद्रितशोधनाचे काम जवळपास एकट्याने करत आहेत. त्यांनी हे काम या वर्षीही तसेच केले आहे. त्याबद्दल आम्ही त्यांचे नेहमीच ऋणी आहोत. आजपर्यंत मिपा दिवाळी अंकात काही खूप चुका असल्याचे कोणी निदर्शनाला आणून दिलेले नाही.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा