पिंगा, बाजीराव मस्तानी, भन्साळी इत्यादी
पिंगा.
येऊ घातलेल्या बाजीराव मस्तानी या हिंदी चित्रपटातील हे गाणं काही दिवसांपूर्वी प्रकशित झालं. या गाण्याविरोधातल्या पोस्ट्सनी कायप्पा, चेपूवर पिंगा घातलेला असताना, मिपावर धागारुपी पिंगा कसा झाला नाही या विचाराने डोक्यात पिंगा घालायच्या आत म्हटलं विषयास वाचा फोडू.
मी गाणं बघितलं. पेशवाई, बाजीराव पेशवे, मस्तानी, काशीबाई यांबद्दल मला जे कमीअधिक ज्ञान आहे, त्या आधारे मी म्हणतो, की हे गाणं म्हणजे अचरटपणा आहे. मुळात भन्साळी ने बाजीराव-मस्तानी वर पिक्चर बनवणे, रणवीर सिंग नामक इसमाने बाजीरावाची व्यक्तिरेखा साकारणे, यातूनच समोर येणा-या गोष्टींचा टोन सेट झाला होता.
बाजीराव पेशवे हे त्यांचं कर्तृत्व, पराक्रम, साहस, निष्ठा, इत्यादी गोष्टींसाठी कमी आणि मस्तानीसाठी जास्त ओळखले जातात हे आपलं दुर्दैव आहे. त्यांचं नव्हे. बरं, मस्तानीच्या नात्याकडे ज्या हीन नजरेने बघितलं जातं ते क्लेशदायक आहे. हे नातं, किंबहुना बाजीरावांबद्दल जितकं मला माहिती आहे त्या आधारे त्यांनी जोडलेल्या प्रत्येक नात्यात निष्ठेचं, कमिटमेंटचं उदाहरण घालून दिलेलं आहे. मस्तानी, काशीबाई, समशेर, कुणालाही वा-यावर न टाकता जपण्यात स्वतःची तगमग करून घेतलेली आहे. पण तरीही; मस्तानीकडे चीप या नात्याने आणि बाजीरावाकडे लफडेबाज या नात्याने बघितलं जातं. असो. हा विषय मोठा आहे आणि मी जाणकार नाही. गाण्याकडे येतो.
गाण्यासंबंधी, पेशव्यांसंबंधी काही प्रश्न, काही विधानं. पुढे काथ्याकूट करण्यास मिपाकर समर्थ आहेच.
भन्साळीला पेशव्यांबद्दल किती माहिती आहे? ती घेण्याचा त्याने किती प्रयत्न केला?
मस्तानी आणि काशीबाई एकत्र नाचतात? वा!
तेही उद्दीपित करणा-या साड्या घालून? वा!
असं वाचलेलं आहे की काशीबाईंना पायाची व्याधी होती. त्यामुळे त्या नाचणं दुरापास्तच. (यावर कुणीतरी प्रकाश टाका)
तेही ठीक; पेशवे घरंदाज होते, त्यांच्याकडे कलेची कदर होत असे. थिल्लर नाचांची नाही.
पिंगा नेमका कधी घालतात?
या गाण्यात एक दोन ठरलेल्या लावणीच्या अदा सोडल्यास त्याला लावणी म्हणण्यासारखं त्यात काही नाही.
या गाण्याकडे बघता पिक्चर कसा असेल, काय दिवे लावले असतील, इतिहासाची विटंबना कशी केली असेल याचा अंदाज येतोच. त्यात दैवदुर्विलास असा की भन्साळीने म्हणे पेशव्यांच्या १०-११ व्या पिढीला जेवायला आमंत्रित केलं होतं आणि त्यांनी या चित्रपटाची स्तुती केली. प्रमोशनचा भाग असेल हा कदाचित. तसं असेल तर अजूनच दुर्दैवी आहे हे. आता हा पिक्चर आला की बाजीराव पेशव्यांबद्दल किती आणि कसे गैरसमज अमराठी (कदाचित मराठीही) लोकांत पसरतील हे चिंताजनक तरीही अटळ आहे.
मिपाकरांनी अजून सुचतील तसे मुद्दे मांडावेत असं आवाहन करतो.
पिक्चरला जाण्याचा प्रश्नच उद्भवत नसलेला
वेल्ला भट
💬 प्रतिसाद
(344)
म
मांत्रिक
Wed, 11/18/2015 - 12:42
नवीन
सहमत!
अगदी दुर्दैवी प्रकार आहे!
इतिहासाची धडधडीत चेष्टा करणारा हीन आणि हिणकस सिनेमा..
- Log in or register to post comments
न
नया है वह
Wed, 11/18/2015 - 12:56
नवीन
- Log in or register to post comments
न
नाव आडनाव
Wed, 11/18/2015 - 12:59
नवीन
भंसाळींच्याच देवदासमधलं गाणं चाललं, म्हणून तसंच इथेही करायचंय त्यांना. इतिहास काय आपण दाखवतोय काय, काही लॉजिकंच नाही. फक्त पैसा मिळाला पाहिजे, मग तो कसाही मिळाला तरी चालेल असं दिसतंय. नॉर्थ इंडियन लोकांना शाळेत (सीबीएसई) मराठी इतिहास कमी असतो, म्हणजे आधीच कमी माहिती त्यात अजून बाजीराव बघून असा नाच इतिहासात झालेला आहे हे एक आणि असे लावलेले अजून काही शोध हा असाच इतिहास आहे असंच वाटेल त्यांना. पेशव्यांच्या वंशजांना जेंव्हा पार्टिला बोलावलं होतं तेंव्हा (आणि आत्ता पण) ह्यात काहीच चूक वाटलं नाही का?
- Log in or register to post comments
म
मारवा
Wed, 11/18/2015 - 13:05
नवीन
१- चित्रपटातील गाण्यात दाखवल तशी टोपी ती खरच घालत असे का ?
२- ती त्यात दाखवलं तशी मॅन्डोलीन वाजवत असे का ?
३- त्यांच्या कडे तसा शीश महल वास्तवात होता का ?
४- दोन्ही स्त्रीयांमध्ये मैत्रीपुर्ण स्पर्धा दाखवलेली दिसते तशी खरोखर च होती का ?
५- लास्ट बट नॉट द लीस्ट मस्तानी ने खालेल्ला पान गळ्यातुन आरपार ते दिसत असे ते खर होत का ?
आणि ते खर होतंच तर ती काही भयानक रोगग्रस्त वा अगदी आतल्या वाहीन्या दिसाव्या इतकी कृश होती का ?
आणि असं शरीर असणं यात सौंदर्य कुणाला काय आढळल असावं.
की हे आपलं नाजुकी उनके लब की क्या कहीए एक पंखुडी गुलाब की सी है
इन पॉवो को जमीन पर ना रखना मैले हो जाएंगे
की ते बोसा हमने लिया था ख्वाब मे आरीज उनके नीले पड गये
टाइप शायरीइश कविकल्पनाच आहे ?
बाकी बाजीराव बाजीराव सारखाच वाटतो दिसतो यात दुमत नसावे.
- Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर
Wed, 11/18/2015 - 13:17
नवीन
पिंगा ह्या गाण्यानी माझंही डोकं फार फिरवलं आहे आणि चेपुवर करायची ती चिडचिड करुन झालेली आहे.
नऊवार नेसण्याचेही प्रकार असतात. पैकी मला आठवतय की मी जेव्हा पहिल्यांदा कॉलेजमध्ये असताना एका आजींकडुन साडी नेसुन घेतली होती तेव्हा त्यांनी "पेशवाई" की "ब्राह्मणी" अशा प्रकारची समोरुन काठ परत कमरेला खोचायचा असतो अशी नऊवार नेसवली होती. अर्थात पदर दोन्ही खांद्यावर होता आणि पोट सोडा, पोटरी सुद्धा मागुन दिसत नव्हती.
आता इथे साक्षात काशीबाई आपल्या सवतीच्या कौतुकाची गाणी गात, तिच्याकडे प्रेमभरल्या नजरेने पहात.. "मंगळागौरीची" गाणी गात लावणीच करत आहेत! क्या बात है!! लगे हाथो आयटम नंबर पण होऊन गेला पेशवाई साम्राज्यात. जिथे बायकांना दरबारी सुद्धा एका विशिष्ट दालनात, पडद्यामागे वगैरे बसण्याची पद्धत होती (ही माझी ऐकीव माहिती बर का) तिथे डायरेक्ट राणीच दणादणा नाचतेय.. मराठमोळा, जुन्या पद्धतीचा पदरेला कंबर खोचुन केलेला पिंगा नाही तर उघडी कंबर कचाकच हलवत आणि लावणीचे हावभाव करत!!! आहात कुठे..??
एका गटाचे असेही म्हणणे आहे की कसा का होईना, तुमच्या मराठी लोकांचा इतिहास तर जगभर पोहचवला ना...
खरंय.. आम्ही दळभद्री लोक, तुमचे उपकार मानायचे सोडुन चिकित्सा करत बसलोय.. जोड्यानं दोन हाणा गालात, पण पिक्चर काढा आमच्या इतिहासावर.. तसंही तुम्ही काहिही दाखवलं तरी गल्ला भरणारच आहात. आम्ही पण मग "पिंगा"च्या रिमिक्स व्हर्जनवर गणपतीत नाचु.. हाकानाका..
- Log in or register to post comments
व
वेल्लाभट
Wed, 11/18/2015 - 13:20
नवीन
सणसणीत.
- Log in or register to post comments
स
स्रुजा
Wed, 11/18/2015 - 14:58
नवीन
अगदी १०० % सहमत. बुकलुन काढणार आहे मी त्या भन्साळ्याला !! काय त्रास आहे यार ! एक तर त्याने लावणी आणि पिंगा या दोन नाच प्रकारात जाम गोंधळ घातला आहे. लावणी ही मुख्यतः पुरुषांनी भरलेल्या रंगमंदिराला भुलवण्यासाठी म्हणुन केली जाते त्यामुळे ती नृत्यशैली पण थोडी प्रोव्होकेटिव आहे. पिंगा मंगळागौरी चा असतो, मुली मुली एकत्र येऊन जे खेळ खेळतात ते पिंगा !! इतके सुंदर खेळ असतात ते, आणि त्यात देखील मजा असते. जिची मंगळागौर असते तिला मध्यवर्ती ठेवुन अनेक लाडीक, खोडकर गाणी म्हणली जातात , आणि एंजॉय करतात. यात एक तर काशीबाई आणि मस्तानी लावणी स्टेप्स करतायेत. त्यात त्यांचा शेला गायब आहे. तू म्हणते आहेस तसं नौवारी नेसायची पद्धत अगदीच गंडली आहे. ९ वारी स्टाईल मध्ये घागरा चोळी वाटते आहे.
मुळात वर वेल्लाभट म्हणतात तसं ती काही एक चीप प्रेमकथा नाही, तो काही कुणी छंदी फंदी माणुस नव्हता. एवढ्या मोठ्या राज्याची जबाबदारी उचलणारा, मनस्वी नायक होता. त्याला परिवार पण हवा होता आणि तो मस्तानी मध्ये पण गुंतला होता. काशीबाई देखील या दोन्ही मध्ये खुप भरडल्या गेल्या असणार. एवढा कर्तबगार नवरा , त्याची २ तितकीच हुशार मुलं पदरात; असं असताना प्रेम आणि त्यांचं स्वत्व यात सतत युद्ध चालू असणार. मी कल्पना देखील करु शकत नाही की त्या मस्तानी बरोबर लावणी म्हणतायेत , ते ही पिंगा पिंगा करत !! देवदास सिनेमामध्ये ही लिबर्टी चालून गेली कारण बोलुन चालुन तो एक कल्पनाविलास होता. इथे प्रत्यक्ष घडलेल्या इतिहासामध्ये हा माणुस काय विचार करुन स्वत :ची भर घालतोय देव जाणे.
त्यात ही , मुळात तो इतिहास आहे तसाच अत्यंत नाट्यपूर्ण आणि विस्मयचकीत करवणारा आहे. त्यात शौर्य आहे, प्रेम आहे, राजकारण आहे, कारुण्य आहे आणि सगळं अगदी ठासुन भरलं आहे. त्याला आणखीन ड्रामेबाज करायची गरज च का पडावी? दिपीका कितीही सुंदर असली तरी "मस्तानी" नक्कीच दिसत नाही. चिमाजी अप्पांच्या भुमिकेत वैभव तत्ववादी आहे ते योग्य पण बाजीराव म्हणुन रणवीर !!! पेशवे चित्पाव्॑नी गोरे नव्हते, युद्धाने रापले होते हे जरी मान्य केलं तरी घारे डोळे??? ते पण काळे झाले का? जरा देखील सत्याच्या जवळ जाणारं कास्टिंग नाहीये.
हे असा भेसळ केलेला इतिहास लोकांसमोर येऊन काय उपयोग? बॉलिवुडी डान्स आणि शीश महल आणि बाकी चकाचौन गोष्टींशिवाय देखील मराठी इतिहास अत्यंत भव्य दिव्य होता कारण ती भव्यता कपड्यांवर आणि आजुबाजुच्या गोष्टींवर च फक्त अवलंबुन नव्हती. "लार्जर दॅन लाईफ" आयुष्य जगलेली माणसं तेंव्हा अस्तित्वात होती आणि खरं तर त्या मुळेच इतिहास घडला.
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Wed, 11/18/2015 - 13:20
नवीन
साला, पिच्चरच्या निमित्ताने पेशव्यांना तेवढीच प्रसिद्धी मिळेल म्हणून मी याची वकिलीच करत होतो आजवर...पण हे गाणे पाहून भ्रमनिरास झाला फुल्लच. देवदास काय सुटत नाय भन्साळीचा. दोन बायका पटकथेत आहेत म्हणून पारो आणि चंद्रमुखीच असाव्यात? अडाण** साले. हाड तेच्यायला.
- Log in or register to post comments
म
मारवा
Wed, 11/18/2015 - 13:30
नवीन
बॅटमॅन जी
बाजीराव एक उत्कृष्ठ योद्धा होता. व मस्तानी प्रकरणाकडेच त्याचा उल्लेख वळवला जात असतो.
तुम्ही एकदा आपल्या इतिहासाच्या ज्ञानाने आम्हाला बाजीरावचं युद्ध लढाया आदी बाबतीतलं कर्तुत्वाची
ओळख करुन द्यावी.
आम्हाला ते ३९ लढाया एकही न हरता इतकीच एका ओळीची माहीती असते.
आपण आपल्या इतिहासाच्या ज्ञानाने आम्हाला बाजीरावाच्या अॅज अ वॉरीयर ओळख करुन द्यावी.
ही विनंती
- Log in or register to post comments
र
रमेश आठवले
Wed, 11/18/2015 - 17:14
नवीन
दुसऱ्या महायुद्धातील ब्रिटीश जनरल मोन्टगोमरी यांनी त्यांच्या The Concise History of Warfare या पुस्तकात बाजीराव पेशव्यांनी घोड दळा चा चपळतेने व सुरेख वापर करून नाशिक जवळ पालखेड येथे १७२८ साली निजामावर मिळवलेल्या विजयाची तारिफ केली आहे .
फक्त वीस वर्षाच्या कारकिर्दीत बाजीरावांनी ३९ लढाया लढल्या आणि सर्वच्या सर्व जिंकल्या.
- Log in or register to post comments
क
काकासाहेब केंजळे
Wed, 11/18/2015 - 18:06
नवीन
पालखेडच्या लढाईचे मॉडेल अमेरीकन सैनिकाना शिकवले जाते असे निनाद बेडेकरांच्या एका व्याख्यानात ऐकले होते ,गल्फ वॉर १ व २ मध्ये या तंत्राचा वापर झाला होता हे हि त्यांनी सांगितलेले आठवते.
- Log in or register to post comments
र
राजाभाऊ
Wed, 11/18/2015 - 18:42
नवीन
पालखेड लढाई आणि अमेरिकन मिलिटरी स्कुल्स याचा संबंध शोधायचा प्रयत्न केला, हाती काहिहि लागलं नाहि. लाॅंग रेंज मिसायल्स, ड्रोनच्या (बी२ बाॅंबर तर दुर) जमान्यात हे थोडं फारफेच्ड वाटतंय...
वाचण्यात आलंय कि हे बेडेकर साहेब, बाजीराव मस्तानी प्रोजेक्टवर भंसाळीचे ॲडवायजर होते. "पिंगा" गाण्यात प्रदर्शित केलेलं इतिहासाचं विक्रुतीकरण त्याना खटकलं नाहि?
- Log in or register to post comments
म
मालोजीराव
Wed, 11/18/2015 - 19:03
नवीन
युनायटेड स्टेट्स मिलिटरी अकादमी,वेस्टपॉइंट,न्यूयॉर्क...हि माहिती डॉ. स्टुअर्ट गॉर्डन (मराठा इतिहासकार) यांनी एका भाषणात दिली आहे.
- Log in or register to post comments
S
sagarpdy
गुरुवार, 11/19/2015 - 04:40
नवीन
दुर्दैवाने निनाद बेडेकरांचे ६ महिन्यापूर्वी निधन झाले.
तसेच ॲडवायजर ने कितीही सल्ले दिले तरी, दिग्दर्शक व निर्माते त्यांना काय करायचं ते करतातच. उदा. इंटरस्टेलर साठी कीप थोर्न ॲडवायजर म्हणून होते. तरीदेखील चित्रपटात भौतिकशास्त्राशी निगडीत चुका आहेतच.
- Log in or register to post comments
र
राजाभाऊ
गुरुवार, 11/19/2015 - 16:49
नवीन
बेडेकर गेल्याचं माहित नव्हतं. ते हयात असते तर त्यांनी नक्किच निषेध नोंदवला असता; तो कुठे दिसला नाहि म्हणुनच वरची शंका बोलुन दाखवली.
बाकि सिनेमॅटिक लिबर्टीच्या संदर्भात, इंटरस्टेलर या चित्रपटाच्या दरम्यान झालेली किप थोर्न, क्रिस नोलन ची मुलाखत बरंच काहि सांगुन जाते...
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
गुरुवार, 11/19/2015 - 05:50
नवीन
पालखेडच्या लढाईचा उल्लेख माँटगोमेरीच्या पुस्तकात आहे. तो स्वतः निनाद बेडेकरांकडूनच अस्सल पुस्तकात पाहण्याचे भाग्य लाभले आहे.
मात्र मिलिटरी स्कूलमध्ये शिकवले जाणे इ. ला काही पुरावा आहे असे दिसत नाही.
- Log in or register to post comments
म
मारवा
गुरुवार, 11/19/2015 - 06:41
नवीन
बॅटमॅन राव
थोडंस निनाद बेडेकरांची या लढाई संदर्भातील वक्तव्ये मते
आपल्या बरोबर झालेला संवाद थोडा आमच्याही वाट्याला येऊ द्या ना.
अस तुम्ही सांगितल नाही तर दुसरी बाजु उजळ बाजु कशी समोर येणार मग ?
अप्रचलित झाकलेला भाग समोर येणं हे कधीही सर्वात जास्त महत्वाचं नसत का ?
१०० तील १०० स बाजीराव म्हटला की मस्तानी माहीती असते मात्र पालखेडची लढाई कदाचित
१०० तील १ स च माहीत असते.
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
गुरुवार, 11/19/2015 - 08:21
नवीन
विशेष चर्चा झाली नव्हती. माँटगोमेरीचा उल्लेख त्यांनी केला तेव्हा आम्ही पुरावा विचारला, लगेच हातासरशी त्यांनी काढूनही दाखवला. तेवढीच त्यासंदर्भात झालेली चर्चा.
- Log in or register to post comments
म
मालोजीराव
गुरुवार, 11/19/2015 - 08:49
नवीन
The Palkhed Campaign of 1727-28 in which Baji Rao [I] out-generalled Nizam-ul-Mulk , is a masterpiece of strategic mobility -British General Field Marshall Bernard Montgomery
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
गुरुवार, 11/19/2015 - 09:00
नवीन
येस्सार, हेच ते वाक्य त्यांनी त्यांच्याकडच्या हार्ड कॉपीतले काढून दाखवले होते.
- Log in or register to post comments
म
मित्रहो
Wed, 11/18/2015 - 14:21
नवीन
एखादी भव्य दिव्य लढाई दाखविली असती तरी प्रेक्षक मिळाला असता हे भिकार गाणे करायची गरज नव्हती.
- Log in or register to post comments
S
sagarpdy
Wed, 11/18/2015 - 14:31
नवीन
पिच्चर आंतरजालावर येण्याच्या प्रतीक्षेत
- Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते
Wed, 11/18/2015 - 15:44
नवीन
"हाड तेच्यायला."
+१
हे वाक्य बॅट्या जेवढ्या त्वेषाने बोललाय तेवढ्याच त्वेषाने बोलतो.... हाड तेच्यायला.
- Log in or register to post comments
स
सर्वसाक्षी
Wed, 11/18/2015 - 13:22
नवीन
सहिष्णु वृत्तिने लोक चित्रपट पाहतील, भरपूर गल्ला जमेल. लोक चित्रपट गृहात शिट्या मारतील, बाहेर पडताना आजुबाला दिसणार्या मुलींकडे पाहुन 'ए मस्तानी' अशा हाका मारतील. नामवंत लोक 'या निमित्ताने आमचे बाजीराव पेशवे सार्या देशाला दिसले' असे भरभरून कौतुक करतील. झालच तर काशीबाई मस्तानी हे दोन धर्माच्या ऐक्याचे प्रतिक आहे असे म्हणत निर्मात्याला एखादं राष्ट्रिय एकात्मका पारितोषिक मिळावं अशी शिपफारसही करतील.
मुळात चित्रपट पाहायला जाणारे दिपीका आणि प्रियांका पाहायला जातील, त्यांना बाजीरावाचा इतिहास कितपत माहित असेल कोण जाणे. अर्थात त्यांना त्याच्याशी सोयरसुतक नसेल. तीन तास टाईमपास धमालमस्ती. मध्यंतरात पॉपकॉर्न.
तुम्हा आम्हा सारखे बाजीरावाचे प्रेम असलेले चित्रपट पाहायला जातील की नाही शंकाच आहे पण त्याने निर्मात्याला फरक पडणार नाही, जसा मूठभर सुशिक्षित लोकांनी मत न दिल्याने उमेदवारांना पडत नाही.
- Log in or register to post comments
स
सुहास झेले
Wed, 11/18/2015 - 13:42
नवीन
सहमत...
- Log in or register to post comments
अ
अभिजीत अवलिया
गुरुवार, 11/19/2015 - 05:22
नवीन
सहमत ...
- Log in or register to post comments
प
प्रसाद१९७१
Wed, 11/18/2015 - 13:32
नवीन
अहो हे गाणे सिनेमात मधे नाहीये. सिनेमा संपल्यावर श्रेय-नामावली दाखवताना बाजूला हे गाणे दाखवणार आहेत.
हल्ली तशी स्टाईल आहे ना. अश्या गाण्यांचा सिनेमाच्या कथेशी संबंध नसतो. पब्लिसीटी साठी अशी गाणी तयार करतात पण ती तशीच सिनेमात घालत नाहीत. हे पण तश्याच गाण्यांपैकी आहे.
त्यामुळे कावून जाऊ नका.
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Wed, 11/18/2015 - 13:51
नवीन
गाणे सिनेमात मधे नाहीये. ?
मग त्याने काय फरक पडतो ?
पात्रे तर तीच आहेत ना ?
बाकी रीलीजच्या अगोदरच तुम्हाला असलेली माहिती बघून तुम्ही सेन्सॉरमध्ये असता काय असा प्रश्न पडलाय
- Log in or register to post comments
प
प्रसाद१९७१
Fri, 11/20/2015 - 05:37
नवीन
नाही, सिनेमात नाही. प्रसिद्धी साठीचे गिमिक आहे.
असते कोणाला आतली बातमी माहीती.
- Log in or register to post comments
प
पैसा
Wed, 11/18/2015 - 13:48
नवीन
मी त्या गाण्याच्या ऑफिशियल व्हिडिओ यूट्यूबच्या पानावर शिव्या घालून आलेय. १३०० प्रतिक्रियांमधे शिव्या देणारी मी एकटीच असावी बहुधा.
नुकताच लावणी-तमाशाचा इतिहास वाचला, http://digitalkatta.com/2015/11/01/%E0%A4%AC%E0%A5%88%E0%A4%A0%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%98%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%9C-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A5%80/ त्यानुसार तमाशात बायका नाचण्याच्या प्रकार पेशवाई संपून नंतर विसाव्या शतकाच्या सुरुवातीला सुरू झाला. बाजीरावाच्या काळात शाहिरी तमाशात नाचे पोरे असत. अशा परिस्थितीत बाजीरावाच्या दोन बायका लावणीचे हावभाव करत नाचतात तेही नऊवारी साडीच्या नावावर चिंध्या पांघरून हे सहन करण्यापलिकडचे आहे. नऊवारी साडी नेसून लावणी कशी सादर करतात हे बघायचे असेल तर सुरेखा पुणेकर, छाया माया खुटेगावकर वगैरेंचा कोणताही प्रोग्राम बघावा.
बरे ज्याला पिंगा म्हटलंय तो पिंगाही नाहीच. मंगळागौरीला "दिंडा" नावाचा खेळ खेळतात. त्याच्या जवळपास जाणारे काही हातवारे आहेत खरे. या "फिल्मी स्वातंत्र्याच्या" नावाखाली जे काय दाखवले आहे त्याचा त्रिवार धिक्कार. शिरीष कणेकरांनी म्हटल्याप्रमाणे बाजीराव आणि निजाम "इमली का बुटा" म्हणत नाचतात का एवढेच बघायचे राहिले आहे.
- Log in or register to post comments
र
रेवती
Wed, 11/18/2015 - 15:49
नवीन
येस्स! पिंगा हा कमरेत वाकून गोल फिरण्याचा प्रकार आहे. त्यात पाय न हलवता तसे घुमणे बरेच कठीण असते. त्या दोघी ज्याप्रकारे नाचल्यात तो पिंगा नव्हे.
- Log in or register to post comments
व
वेल्लाभट
Fri, 11/20/2015 - 06:00
नवीन
बेस्ट. मीही केलं ते.
- Log in or register to post comments
म
मारवा
Wed, 11/18/2015 - 13:52
नवीन
दिंडा खेळावर कृपया विस्तार करावा.
- Log in or register to post comments
प
पैसा
Wed, 11/18/2015 - 14:02
नवीन
या व्हिडिओमधे ०.५० ते १.० हात कोपरावर आपटून फट फट असा आवाज काढत जो खेळ आहे त्याला दिंडा मोडणे असे म्हणतात. या व्हिडिओमधे हे गाणे कोळी नृत्यासारखे बसवले आहे. पण त्यातला हाच भाग दिंड्याचा आहे.
- Log in or register to post comments
प
पगला गजोधर
Wed, 11/18/2015 - 13:54
नवीन
शिवाजीमहाराज व थोरला बाजीराव, हे जात धर्म यांच्या पलीकडे पाहणारे संघटक, सहकाऱ्यात भावंड भावना जोपासणारे नेतृत्व, आणि उत्कृस्थ योद्धे होते. ( बारकाईने पहा त्यांचा जीवाला जीव देण्यार्यात दुसर्या जात धर्माचे होते, व त्यांच्या मार्गात काटे पसरवणारे त्यांच्याच जाती/ धर्माचे होते )
अश्या रण धुरांदाराच्या पराक्रमाकडे दुर्लक्ष करून, केवळ प्रणयजिवना विषयी लफडेबाजी म्हणून राळ उडवण्याचा करंटेपणा करणाऱ्यांची कीव येते.
- Log in or register to post comments
श
शब्दबम्बाळ
Wed, 11/18/2015 - 14:02
नवीन
अहो मस्तानी तर त्यांची बायको होती!(बरोबर आहे ना?) मग कोणाला काय कारण लफडेबाजी वगैरे म्हणायचं?
आणि तरीही म्हणत असतील तर ती त्यांची चुकी आहे...
- Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर
Wed, 11/18/2015 - 14:01
नवीन
हिंदी चित्रपटवाल्यांनी तर्क्,ईतिहास वगैरे वापरून चित्रपट बनववेत अशी अपेक्षा म्हणजे एखाद्या कट्टर मौलवीने घरी सत्यनारायण केल्यासारखे..चित्रपट फक्त चालला पाहिजे हेच व अगदी हेच ध्येय असते त्यांचे. असो.
चित्रपटाकडे फक्त मनोरंजन म्हणून बघावे असे ह्यांचे मत.
- Log in or register to post comments
म
मांत्रिक
Wed, 11/18/2015 - 14:24
नवीन
माई, बरेच दिवसांनी दिसलात.
- Log in or register to post comments
म
मोगा
Mon, 12/21/2015 - 17:03
नवीन
अगो ते मौलवी , सत्यनारायणवाले , राजे अन पेशवे सगळे आपापला व्यवसाय फायदेशीर कसा होइइल हेच बघायचे ना ? कधी युद्ध काय , कधी तह काय , कधी कुणाला मुलगी देणं काय आणि मुलगी घेणं काय , स्वतःचं सैन्य न वापरता दुसर्याच्या वानरसेकडुन सेतू बांधुन घेणं काय ... आपापला व्यवसाय किफायतशीर करण्याचेच हे सगळे प्रयत्न होते !
अन हेच सगळं भन्साळीनं त्याच्या व्यवसायात केलं तर तो मात्र वैट्ट !
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Mon, 12/21/2015 - 17:53
नवीन
काहीही हं मोगा. तुम्ही म्हणता तसे शिवाजी महाराज नव्हते बरंका.
आ.न.,
-गा.पै.
- Log in or register to post comments
म
मोगा
Mon, 12/21/2015 - 20:13
नवीन
मग त्याना सन्माननीय अपवाद असे माना.
- Log in or register to post comments
क
काळा पहाड
Mon, 12/21/2015 - 19:44
नवीन
तुम्ही अजून मोकळेच आहात? 'आत' घातलं नाही वाटतं!
- Log in or register to post comments
उ
उगा काहितरीच
Wed, 11/18/2015 - 14:02
नवीन
अरेरे! असं आहे तर एकंदरीत ! मला वाटलं होतं की बाजीराव या काहीशा दुर्लक्षीत योद्ध्याच्या जीवनावर आधारित , मोठमोठे युद्धप्रसंग असलेला भव्य चित्रपट पाहायला मिळेल . आता केवळ बाजीरावांची बदनामी होऊ नये इतकीच माफक अपेक्षा ...
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Wed, 11/18/2015 - 14:05
नवीन
पंचतारांकित हॉटेल मध्ये जेवणे, कधी पण उत्तम....
आपण बरे आणि आपले हॉलीवूड बरे.
- Log in or register to post comments
म
मारवा
Wed, 11/18/2015 - 14:26
नवीन
खाणावळीत मित्राच्या खाणावळीत कधीमधी फिस्ट असली
तरी तुम्ही जात नाही का ?
म्हणजे स्पेशल आयटम असला तर अस म्हणतो.
शेवटचे खानावळी कधी गेलेला ?
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Wed, 11/18/2015 - 18:33
नवीन
एका महान खानावळीत शेवटचे गेलो.
सध्या तरी पंचतारांकित जेवण मिळत असल्याने आणि ते आता आयुष्यभर परवडत असल्याने, मुद्दाम वेडी-वाकडी वाट करून खानावळीत कशाला जाईन?
राहता राहिला प्रश्र्न स्पेशल आयटम बाबत.... स्पेशल आयटम देखील आजकाल कुठले बुरखे आणि कुठली कुठली ठिगळे लावलेली वस्त्रे नेसून येईल ते काही सांगता येत नाही....
- Log in or register to post comments
भ
भाऊंचे भाऊ
Fri, 11/20/2015 - 14:32
नवीन
ब्रॅड् पिटच्या ट्रॉयमधेही ही सिनेमॅटीक लिबर्टी बरीच घेतलेली आहे.
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Fri, 11/20/2015 - 15:25
नवीन
आग्गाग्गा....कुठे तो ट्रॉय पिच्चर आणि कुठे बालिवूडातला पिच्चर
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Fri, 11/20/2015 - 16:07
नवीन
आता ते ससा आणि गंडस्थळ न आण्ल्याबद्दल धन्यवाद.
.
वासुकी आणी गांडूळ
पाल आणि डैनासॉर
किरडू आणि शेषनाग
नेक्ष्ट टैम ह्या उपमा वापरल्या तरी चालेल.
- Log in or register to post comments
म
मोगा
Mon, 12/21/2015 - 15:47
नवीन
हिमालय व मुतखडा
- Log in or register to post comments
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- ›
- »