Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

भावना दुखावणे

य
यनावाला
Fri, 11/20/2015 - 09:01
🗣 105 प्रतिसाद
"मंत्रसामर्थ्य " या लेखामुळे काही वाचकांच्या भावना दुखावल्या असतील तर त्या सर्वांची मी क्षमा मागतो. या भावना दुखावण्यावर अधिक विचार केला. भावना का दुखावतात? माणूस हा मूलत: तर्कनिष्ठ प्राणी आहे. (मॅन इज अ रॅशनल अ‍ॅनिमल) प्रत्येकाला तर्कबुद्धी असते. (मतिमंद अपवाद). कुतूहल असते. त्यामुळे तो निसर्गाचे निरीक्षण करतो. घटनांवर विचार करतो. त्यातून अनुभव मिळतो. त्याने अनुभव-विवेक (कॉमनसेन्स) येतो. त्याचा उपयोग व्यावहारिक जीवनात होतो. पण देवा-धर्माचे संस्कार बालपणापासून मनावर बिंबवलेले असतात. त्यात आई-वडील, शिक्षक, समाज, प्रसारमाध्यमे इत्यादींचा सहभाग असतो. बालपणीचे संस्कार दृढ असतात. भांड्यावर ठोक-ठोकून कोरलेले नाव जसे सहजी पुसता येत नाही तसे बालमेंदूवर झालेले संस्कार पुढे सहजीं पुसले जात नाहीत. मुलगी मोठी होते. मग आपल्यावर बालपणी झाले तसे संस्कार ती आपल्या मुलांवर करते. असे पिढ्यानुपिढ्या चालते. या संस्कारांमुळे श्रद्धा निर्माण होतात. त्या मुख्यत्वेकरून देव, धर्म, आत्मा, पुनर्जन्म इ.संबंधी असतात. श्रद्धेमुळे तर्कबुद्धी ठप्प होते. जे धर्मग्रंथांत आहे, धर्मगुरू सांगतात ते सर्व खरे मानण्याची मानसिकता बनते. याचा गैरफायदा घेऊन समाजातील लबाड लोकांनी ज्योतिष, मुहूर्त, भाग्यरत्‍ने, ग्रहांचे खडे, वास्तुशास्त्र अशा अनेक गोष्टी निर्मून त्या देवा-धर्माशी जोडल्या. त्यामुळे श्रद्धाळू त्यांना बळी पडतात. हे विषय सोडले तर अन्य क्षेत्रांत श्रद्धाळूंची तर्कबुद्धी चांगली चालते. समजा त्यांच्या वाचनात पुढील मजकूर आला:--
"मूर्तीची समंत्रक प्राणप्रतिष्ठा केली की तिथे देवतत्त्वाचा संचार होतो,असा समज रूढ आहे. पण त्याचा अनुभव कधी आला आहे का? प्रचीती कधी दिसली आहे का? मूर्तीच्या समक्ष दानपेटी फोडली. देवीच्या अंगावरचे दागिने चोरले, मुकुट पळविला, दिवेआगर येथील मंदिरात चोरटे शिरले, प्रतिकार करणार्‍या रक्षकाला जीवे मारून सुवर्ण-गणेश चोरला, देवाने निष्ठावंत सेवकाला वाचवले नाही. या सत्य घटना आहेत. यावरून कोणता निष्कर्ष निघतो? देवमूर्तीत काही सामर्थ्य आहे असे दिसते का? प्रत्येकाने प्रामाणिकपणे आपल्या मनाशी विचार करावा."
हे वाचल्यावर श्रद्धाळूंच्या भावना दुखावतात. ज्याची सत्यता कुणाही सुबुद्ध व्यक्तीला पटावी असे सत्य सुसंस्कृत भाषेत निदर्शनाला आणल्यावर श्रद्धाळूंच्या भावना का दुखावतात? मूर्तीमध्ये देवत्व असते ही श्रद्धा अतूट असेल तर हे विधान त्यांना हास्यास्पद वाटायला हवे. असे लिहिणार्‍याची त्यांनी कीव करायला हवी. ज्यात एकही अपशब्द, असभ्य, असंसदीय शब्दप्रयोग नाही, तसेच कुणाचे चारित्र्यहनन नाही, असे अभिव्यक्तिस्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. तेव्हा श्रद्धावंतांच्या दृष्टीने निरर्थक असलेल्या लेखनाकडे त्यांनी दुर्लक्ष करावे. मग भावना का दुखावतात? मला वाटते श्रद्धाळूंनी असे लेखन वाचले की त्यांच्या उपजत तर्कबुद्धीमुळे लेखातील तर्कसंगत युक्तिवाद आणि निष्कर्ष त्यांना पटतात. ते योग्य आहेत असे बुद्धीला वाटते. पण बालपणापासून जोपासलेल्या श्रद्धेचा त्याग करायला भावना तयार होत नाही. मग बुद्धी आणि भावना यांच्या द्वंद्वांत ते सापडतात. हे खरे मानावे का ते याचा निर्णय होत नाही. ते अगतिक होतात. आपले काहीतरी चुकते आहे हे कळते. पण वळत नाही. मन प्रक्षोभित होते. उद्विग्न होते. मग "या लेखामुळे आमच्या भावना दुखावल्या." असे ते म्हणतात. ज्या लेखातील विचार सुसंस्कृत शब्दांत मांडलेले आहेत, ज्यातील विधाने वस्तुस्थितिदर्शक म्हणजे सत्य आहेत, ज्यात चारित्र्यहननाच्या हेतूने वृथा दोषारोप केलेले नाहीत, ते लेखन आपल्याला कितीही कटु आणि अप्रिय वाटले, तरी तो अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा आविष्कार आहे हे समजणे योग्य ठरेल. त्या लेखनावर टीका करावी. मात्र टीकेत लेखनशुचिता अवश्य पाळावी.
वर्गीकरण
चर्चा

प्रतिक्रिया द्या
39585 वाचन

💬 प्रतिसाद (105)
स
स्पा Fri, 11/20/2015 - 09:06 नवीन
काय याना काका वेळ जात नाहीये वाटत हल्ली :)
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Fri, 11/20/2015 - 09:18 नवीन
जौदे हो, त्यांच्या भावना दुखवतील्ल..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
प
प्रचेतस Fri, 11/20/2015 - 09:08 नवीन
अगदी सहमत.
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Fri, 11/20/2015 - 09:11 नवीन
सहमत आहे. जरा खुट्ट वाजलं तरी दुखावल्या जातील अशा भावना कचकड्याच्या नकोतच.
माणूस हा मूलत: तर्कनिष्ठ प्राणी आहे. (मॅन इज अ रॅशनल अ‍ॅनिमल)
याविषयी मात्र मतेमतांतरे नक्कीच आहेत. इज मॅन रिअली अ रॅशनल अ‍ॅनिमल यावर डॅनिएल कॅनेमान आणि रिचर्ड ट्रॅव्हस्की यांनी केलेल्या प्रयोगांविषयी वेळ मिळेल तेव्हा एक लेख मिपावर जरूर लिहायचा आहे.
  • Log in or register to post comments
म
मृत्युन्जय Fri, 11/20/2015 - 09:14 नवीन
अवघड आहे.
  • Log in or register to post comments
भ
भाऊंचे भाऊ Fri, 11/20/2015 - 09:19 नवीन
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Fri, 11/20/2015 - 09:20 नवीन
काका, गाय दूध देते. पण गाय कापून बघितली तर आत दूध नसते. असे का?
  • Log in or register to post comments
प
प्रसाद१९७१ Fri, 11/20/2015 - 09:26 नवीन
हे वाचल्यावर श्रद्धाळूंच्या भावना दुखावतात. ज्याची सत्यता कुणाही सुबुद्ध व्यक्तीला पटावी असे सत्य सुसंस्कृत भाषेत निदर्शनाला आणल्यावर श्रद्धाळूंच्या भावना का दुखावतात? मूर्तीमध्ये देवत्व असते ही श्रद्धा अतूट असेल तर हे विधान त्यांना हास्यास्पद वाटायला हवे.
हा प्रश्न चुकीचा आआण, उद्धट आहे आणि अतिशहाणपणाचा आहे. हे बघा १. सत्यता "सुबुद्ध" व्यक्तीला पटावी - म्हणजे वाचणार्‍याला ती पटली नाही तर तो निर्बुद्ध किंवा कुबुद्धी. वा रे वा!!! २. दुसरे म्हणजे, कोणी कोणा बद्दल लिहावे च का? कोणी माणुस आपल्या घरात दार-खिडक्या बंद करुन नागडा बसेल, तू ( इथे तू म्हणजे यना वाला नाहीत तर हे दिडशहाणे लोक ) कोण सांगणार त्याला की कपडे घाल म्हणुन. यनावाला - आधी हे स्वताला मी हत्ती वर बसलोय आणि बाकी मूर्ख लोक अनवाणी फिरतायत हे हे समजणे सोडा. तुम्हाला ती लोक अनवाणी फिरतायत असे वाटते पण त्यांना तुम्ही हत्ती वर नाही तर गाढवावर बसला आहात ( आणि ते पण उलटे ) असे वाटतय.
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Fri, 11/20/2015 - 09:47 नवीन
सहमत, म्हणजे अगदी सुसंकृत भाषेत कुणी कुणाला आईवरुन शिव्या घातल्या तर राग का येतो बॉ असे म्हणण्यासारखं आहे. मुळात "तू शिव्या घालतोच का?" हा प्रश्न साफ विसरून जायचा आणि भाषेच्या शुद्धतेबद्दल व सुसंस्कृतपणाबद्दल व्याख्यान झोडायचे. व्वा रे वैज्ञानिक विचारपद्धती. मान गये,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१
क
कविता१९७८ Fri, 11/20/2015 - 10:01 नवीन
लेखन पटतय पण ते ही तुमच्या भावना दुखावल्या गेल्यामुळे लिहिलं गेलय असं वाटतय नाहीतर या स्पष्टीकरणाची गरजच नव्हती, आपण कुठल्यातरी एकाच मतावर ठाम राहावे , एखादे मत मांडावे आणि त्याविरुद्ध प्रतिसाद आले की त्याचे स्पष्टीकरण द्यावे किंवा माझे मत कसे खरे आहे यासाठी प्रयत्न करावे याला काहीच अर्थ नाही असे माझे वैयक्तिक मत. या विषयाचा तुमचा स्वतंत्र धागा आला असता तर जास्त आवडले असते.
  • Log in or register to post comments
म
मांत्रिक Fri, 11/20/2015 - 10:22 नवीन
उत्कृष्ट प्रतिसाद +१११११११११११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कविता१९७८
म
मारवा Fri, 11/20/2015 - 11:59 नवीन
ते संवादाच्या स्तराची एका विशीष्ट पातळीची अपेक्षा करत आहेत. भावना का दुखावतात याचा प्रामाणिकपणे ते शोध घेत आहेत. या शोध घेण्यातुनच व हा मुद्दा वेगळा धागा काढण्याइतपत त्यांना महत्वाचा वाटतो हेच त्यांची संवेदनशीलता व गंभीरता दाखवुन देत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कविता१९७८
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 11/20/2015 - 10:18 नवीन
सहमत. लिहित रहा हो. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
म
मारवा Fri, 11/20/2015 - 12:30 नवीन
जो तुम को हो पसंद वही बात कहेंगे तुम दिन को अगर रात कहो, रात कहेंगे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
म
मारवा Fri, 11/20/2015 - 10:25 नवीन
मला वाटते श्रद्धाळूंनी असे लेखन वाचले की त्यांच्या उपजत तर्कबुद्धीमुळे लेखातील तर्कसंगत युक्तिवाद आणि निष्कर्ष त्यांना पटतात. ते योग्य आहेत असे बुद्धीला वाटते. पण बालपणापासून जोपासलेल्या श्रद्धेचा त्याग करायला भावना तयार होत नाही. मग बुद्धी आणि भावना यांच्या द्वंद्वांत ते सापडतात. हे खरे मानावे का ते याचा निर्णय होत नाही. ते अगतिक होतात. आपले काहीतरी चुकते आहे हे कळते. पण वळत नाही. मन प्रक्षोभित होते. उद्विग्न होते. मग "या लेखामुळे आमच्या भावना दुखावल्या." असे ते म्हणतात. अत्यंत मार्मिक विश्लेषण ! एक तर्काला ते पटलेले असते मात्र कंडीशनींग मराठी शब्द संस्कारबद्धता ही फार खोलवर झालेली असते. हा मुळ राग आपण आजवर जोपासलेल्या श्रद्धेतला फोलपणा समजल्यातुन उदभवत असावा हे खर आहे. कॉग्नीटीव्ह डिसोनन्स् चे संशोधन ही या संदर्भात बघणे उपयुक्त आहे. यातील बहुतांशी विरोध साधारण असा असतो. काही वेळा अत्यंत नकारात्मक पातळीवर भाषा शब्द संबोधन करुन होते ,त्यानंतर जोरदार तर्काच्या बाजुने मोठा प्रयत्न, तो वाया गेल्यावर मग एक वेगळीच भुमिका असते तो म्हणजे एक प्रकारची आम्ही काय बाबा अशेच त्यात एक छानसा तुच्छतावाद असतो. प्रत्येकवेळी तो तर्क मानेलच असे नाही. काही वेळा संभाव्य तर्काच्या भीतीने ही प्रतिरोध होतो. एक अत्यंत अभ्यासनीय प्रतिसाद श्री. मांत्रिक यांचा प्रातिनीधीक स्वरुपाचा असा आहे.
हो, काही ठिकाणी आध्यात्मिक अर्थ सरळसरळ दृग्गोचर होतो. काही ठिकाणी व्यावहारिक दृष्टांत असू शकतात, असतीलच असे नाही. कारण मुळात ज्ञा.कालीन मराठीचा अर्थ चटकन लक्षात येत नाही. ज्ञानेश्वरांचे एकूण साहित्य पाहता व त्यांचे एकूण व्यक्तीमत्व अभ्यासता माऊली जातभेद व लिंगभेद या गोष्टींचा पुरस्कार करत असतील असे मला तर मुळीच वाटत नाही. आपण काटछाट किंवा फेरबदल करण्यापेक्षा जे उपलब्ध आहे त्याचा अभ्यास करुन माऊलींना खरंच कोणता अर्थ अमिप्रेत आहे हे माझ्याप्रमाणे पाहिले पाहिजे. तशी दृष्टी ठेवली तर माऊलींच्या साहित्याचा खरा गहन आध्यात्मिक अर्थ समोर येईल व आपणांस एक नवीनच आनंद प्राप्त होईल. बरे काही आक्षेपार्ह दिसले तरी ते प्रक्षिप्त असू शकते याची जाणीव ठेवणे आवश्यक आहे. अशा गोष्टीकडे खरा साधक तरी दुर्लक्षच करेल. समजा प्रक्षिप्त नसले तरी त्या काळच्या लोकसमजुती स्वतःचा मुद्दा सिद्ध करण्यासाठी, त्याच्यावर भर देण्यासाठी केवळ उदा.मात्र वापरलेल्या असू शकतात. त्याला माऊलींचा पाठिंबा आहे असा अर्थ होत नाही. आता पाहू बाकीचे सदस्य काय मत व्यक्त करतात. मी एकटा तरी किती बोलू?
ज्ञानेश्वरांचे एकूण साहित्य पाहता व त्यांचे एकूण व्यक्तीमत्व अभ्यासता माऊली जातभेद व लिंगभेद या गोष्टींचा पुरस्कार करत असतील असे मला तर मुळीच वाटत नाही. तर्क काहीच नाही मला वाटते मला वाटत नाही इतकचं पुरेसं आहे, एक महत्वाचा दोष म्हणजे आर्बीट्ररीली सगळ विधान असतं हम कहे सो सच हम कहे सो कायदा किंवा बाबा कहे सो सच बाबा कहे सो कायदा. थोडी लव्हर्स लॉजिक ची अपेक्षा असते. दुसरी शैली म्हणजे तुमची लायकी नाही (अ‍ॅड होमीनेम ) तिसरी भुमिका म्हणजे माझी लायकी नाही ( एक गंमत आहे समजा माझी मुल्यमापनाची लायकीच नाही क्ष या व्यक्तीची यात उघडपणे एक बाजु घेतलेली आहे की क्ष व्यक्ती इतकी पुज्यनीय आहे की मला त्याचे मुल्यमापनही करणे शक्य नाही. यावर साधा प्रतिवाद म्हणजे जर मुल्यमापन करण्याची लायकीच नाही मुळात तर या निर्षणावर कसे आलात ? की क्ष व्यक्ती योग्य च आहे. हे येणं वरील सारखं मला वाटत मला वाटत नाही बस. आपण काटछाट किंवा फेरबदल करण्यापेक्षा जे उपलब्ध आहे त्याचा अभ्यास करुन माऊलींना खरंच कोणता अर्थ अमिप्रेत आहे हे माझ्याप्रमाणे पाहिले पाहिजे. हे अत्यंत रोचक वाक्य आहे. आपण माझ्यासारख पाहीलं पाहीजे यातला आवेश बघा. तुम्ही अभ्यास करा काय वाटेल ते करा जेव्हा निष्कर्ष जो येइल तो माझ्या मनासारखाच आला पाहीजेच . पुरावे विरोधात असतील तर असुदेत तर्क विरोधात असेल तर असु देत अ‍ॅट द एन्ड ऑफ डे माझ्याप्रमाणे पाहील पाहीजे. बरे काही आक्षेपार्ह दिसले तरी ते प्रक्षिप्त असू शकते याची जाणीव ठेवणे आवश्यक आहे. अशा गोष्टीकडे खरा साधक तरी दुर्लक्षच करेल. ही पुढील संभाव्य आक्षेपार्ह आढळण्याच्या भीतीचा बंदोबस्त बघा प्रक्षिप्त तपासा किंवा प्रक्षिप्त आहे की नाही याची छानणी तपासणी करा असे नाही. काही आक्षेपार्ह दिसले तर ते प्रक्षिप्त असु शकते याची जाणीव ठेवणे आवश्यक आहे ही जाणीव ह्वीच ही जाणीव नसेल तर तुम्ही कदाचित आक्षेपार्ह भागाला सत्य पुराव्याच्या आधारे जाहीर करणार. समजा प्रक्षिप्त नसले तरी त्या काळच्या लोकसमजुती स्वतःचा मुद्दा सिद्ध करण्यासाठी, त्याच्यावर भर देण्यासाठी केवळ उदा.मात्र वापरलेल्या असू शकतात. आता त्याच्या पुढील तरतुद हे बघा क्रमाने पुढे काय वाढुन ठेवलय याच्या भीतीने व्याकुळतेतुन समजा प्रक्षिप्त तुम्ही आणलचं शोधुन तर माझे मन कशी पळवाट शोधेल त्या काळच्या लोकसमजुती स्वतःचा मुद्दा सिद्ध करण्यासाठी, त्याच्यावर भर देण्यासाठी केवळ उदा.मात्र वापरलेल्या असू शकतात. त्याला माऊलींचा पाठिंबा आहे असा अर्थ होत नाही. त्याला माऊलीने पाठिंबा दिला नाही ते नाही अर्थ असा होत नाही. आता पाहू बाकीचे सदस्य काय मत व्यक्त करतात. मी एकटा तरी किती बोलू? हे विधान स्वयं स्पष्ट आहे. वरील प्रतिसाद प्रातिनीधीक आहे. हे सर्व अस आहे. यावर उपाय काय ? मार्ग काय ? तर आपले विधान आपले तत्व अधिकाधिक तर्काने संयमाने मांडण्याचा प्रयत्न करत राहणे हा तर आहेच. मात्र दाभोळकर व स्टीफन कोव्ही जसे सांगतात तसा एथोज पॅथोज नंतर लोगोज असा क्रम असतो तो नेहमी लक्षात ठेवणे. स्वतःची मते चुकीची असतील तर ती सदैव बदलण्यास तयार असणे, अन्वेषण सतत सुरु ठेवणे, जमेल तितके आपण इतरांकडुन काही चांगले घेण्यासारखे असेल ते घेत राहणे. आवश्यक तेथे थांबणे आवश्यक तेथे भावनांवर संयम ठेवणे आवश्यक तेथे तर्काने आवश्यक तेथे संवेदनशीलतेने वागणे. अतिरेक टाळणे, टोकाची भुमिका घेण्याऐवजी सामंजस्याची भुमिका घेणे असे सर्व आहे. जसे दाभोळकर करत होते ती शैली सुंदर होती तीच योग्य आहे. त्या शैली ला आपण अधिकाधिक सकारात्मक दिशेने विकसीत करत नेले पाहीजे. अजुन दुसर काय करु शकतो आपण या शिवाय ? असच काहीस आपण करु शकतो.
  • Log in or register to post comments
स
स्पा Fri, 11/20/2015 - 12:06 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
म
मांत्रिक Sat, 11/21/2015 - 16:40 नवीन
खिक्क! काय सणसणीत चपराक मारलीये! जौ दे!!! त्यांना पण ते कळणार नाही!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
ग
गॅरी शोमन Fri, 11/20/2015 - 10:29 नवीन
"मूर्तीची समंत्रक प्राणप्रतिष्ठा केली की तिथे देवतत्त्वाचा संचार होतो,असा समज रूढ आहे. पण त्याचा अनुभव कधी आला आहे का? काही संकल्पना सिध्द करायला आजचे शास्त्र प्रगत आहे का ? असल्यास हे तंत्रज्ञान वापरुन केलेल्या संशोधनाचा खर्च उचलणारी एखादी संस्था आहे का ? मागे पुण्यात असे बरेच शास्त्राचे प्रोफेसर्स आणि डॉक्टर्स यांनी मोरगावच्या गोडाबाबाचे हाताच्या स्पर्शाने पाणी गोड होते यावर तपासणी संशोधन केले. प्रत्यक्षात निष्कर्ष काय निघाले हे त्या प्रोफेसर्स ना कळायच्या आत गोडाबाबा हातचलाखीने सॅकरीन मिसळतो अशी बातमी प्रसिध्द झाली. त्या मंडळात माझ्या एका मित्राचे वडील होते. ते मित्राला म्हणाले की एखादी गोष्ट एकदा अंधश्रध्दा म्हणुनच शिक्कामोर्तब करायचे ठरले की मिडीया मॅनेजमेंट आणि त्यात ती प्रसिध्दी मिळवण्याची हौस असलेली मंडळी काय नाही करत. मायबोलीवर http://www.maayboli.com/node/51554 हा धागा वाचा. याला जोडुन पुण्यातल्या काही मंडळींनी मीड ब्रेन नसतोच कारण लाईट बंद असताना डोळे बांधलेल्या व्यक्तीला वाचता आले नाही असा निष्कर्ष वर्तमान पत्रात जाहीर छापला सुध्दा. वास्तवीक वरील प्रयोग जेव्हा डॉ राजेंद्र बर्वे यांच्या समोर दुरदर्शनवरच्या चॅनलवर झाली त्यात त्यामुलीला डोळे बांधुन काही गोष्टी ओळखत्या आल्या हे सिध्द झाले आहे. एखाद्या वस्तुवर प्रकाश पडतो आणि त्या प्रकाशाचे परावर्तन होऊन त्याची एक इमेज आपल्या डोळ्याच्या लेन्स वर येते. त्या इमेजचे मेंदुत वाचन होऊन त्याचा अर्थ आपण काढतो. एखाद्या वस्तुवर प्रकाश पडल्यानंतर त्यातुन कितीप्रकारचे किरण बाहेर पडतात ? जर डोळे कापडाने बांधले तर कोणत्या प्रकारचे किरण डोळ्यात पोचु शकत नाहीत ? कापडाच्या पट्टीतुन काही वेगळ्या प्रकारचे किरण डोळ्याच्या आत जाऊन सरावाने कोणाला ती वस्तु पहाता/ ती अक्षरे ओळखता येऊ शकणारच नाही का? मग लाईटच बंद केल्यावर जर कोणत्याच प्रकराचे किरण त्या वस्तु कडुन परावर्तीत झाले नाहीत तर ती वस्तु डोळे बांधलेले असता पहाता येणारच नाही. हाच प्रयोग आपल्याला त्यावस्तुकडुन डोळ्याकडे जाणार्‍या वेगवेगळ्या किरणांना डोळे बांधलेल्या परिस्थितीत काही फिल्टर्स टाकुन त्या वेगळ्या किरणांना अटकाव करुन पहाता येईल का ? हा शात्रीय प्रयोग होईल. यावरुन ( कदाचित ) असा निष्कर्ष निघेल की सामान्यतः आपले डोळे ह्या प्रकारच्या किरणांची इमेज उघड्या डोळ्याने पाहु शकतात. जर डोळे कापडाने बंद केले असता अभ्यासाने आपण काही वेगळ्या प्रकराच्या किरणांनी तयार होणारी इमेज पाहु शकतो. थोडक्यात संधोधक वृत्ती जागृत ठेऊन कोणत्याही प्रयोगाचे स्वागत करायला अनेक लोक तयार असतील. मी तर परमेश्वर नाही हे मानायला तयार आहे पण मी नास्तीक लोकांचे "मला अनुभव नाही आला" या वाक्यावर भरवसा ठेऊ का सर्व धर्मातले कॉमन तत्व आणि कोणत्याही भौतीक फायदा किंबहुना प्रसिध्दीची अपेक्षा नसलेल्या संतवचनांवर विश्वास ठेऊ ?
  • Log in or register to post comments
र
राजेश कुलकर्णी Fri, 11/20/2015 - 10:33 नवीन
तुम्ही मंत्रसामर्थ्य या शब्दावरून क्षमा का मागितली हे माहित नाही. त्याचा संदर्भ माहित नाही. परंतु या पोस्टमध्ये तुम्ही म्हटलेल्यातले काहीही चूक नाही. देव अाहे यावर कोणाचा विश्वास असेल तर त्यावर तो नसण्यावर चर्चा करण्याची माझी तयारी आहे. मी अगदी साध्या प्रश्नांनी व उदाहरणांनी ते पटवून देऊ शकतो. पण यावर ज्या मोकळेपणाने मी चर्चा करतो तेवढ्याच मोकळेपणाने समोरच्यानेही च्रर्चा करावी ही अपेक्षा. आज शंभरपैकी नव्व्याण्णव लोकांना तुम्ही हि्दू आहात म्हणजे नक्की काय अाहात हे विचारले तर सांगता येणार नाही. याला कारण आपली प्रश्न न विचारण्याची व्ृत्ती. दुसरा करतो म्हणून आम्ही करतो, मग या दुस-यामध्ये आई-वडील अाले, नातेवाईक आले, समाज आला. पण आम्हाला काही पटत नसले तरी आम्ही प्रश्न विचारणार नाही ही आपली पद्धत. त्यामुळे धर्माला गुंडांनी रस्त्यावर आणून ठेवले तरी आपल्याला काही वाटत नाही. प्रत्येक जण आपापल्या समजुतीसाठी स्वत:ला जबाबदार आहे. त्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या तर ती त्याची-तिची वैयक्तिक जबाबदारी आहे. त्यामुळे कोणाची माफि मागण्याची गरज नाही. वर आईवडलांबद्दल कोणी अनुद्गार काढले तर वाईट वाटणार नाही का असा प्रश्न विचारला आहे. बाप दारूडा असेल तरी त्याला कोणी काही म्हणायचे नाही का? तसेच कोणाचा काही संबंध नसला तर कोणाच्या आईवडलांना कोण का नावे ठेवील? पण काही कारणामुळे यांच्या बाबा-बुवा-महाराजांना, नसलेल्या देवांबद्दल कोणी काही बोलले की दुखावल्या यांच्या भावना. जर तो देव खरोखरच असेल व मी त्याच्याबद्दल काही बोललो व ते जर त्याला आवडले नाही, तर तो करेल ना माझ्याशी चर्चा, देईल ना मला शिक्षा. पण यांना जणू त्याच्या वतीने भांडायचा परवाना दिला आहे असे समजून यांच्या भावना दुखावणार आणि हे माझ्याशी भांडणार. एकंदरीत अजब प्रकार आहे हा भावना दुखावण्याचा.
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Fri, 11/20/2015 - 13:07 नवीन
भावसाहेब,,, आधी खालील प्रश्नांची उत्तरे द्या जमलं तर.. १. देव आहे असे तुम्हाला कोण सांगायला येतं काय? २. देव माना नाहीतर तुमच्या माना मुरगाळतो असे कुणी तुम्हाला म्हटले काय? ३. देव आहे असे कुणी म्हटल्याने तुमचे व्यक्तिगत असे काय नुकसान झाले आहे? कोणाचा काही संबंध नसला तर कोणाच्या आईवडलांना कोण का नावे ठेवील? ठिक आहे. मग आस्तिक लोकांच्या भावना दुखावणारे विधान नास्तिकांना करायचा काय संबंध? पण काही कारणामुळे यांच्या बाबा-बुवा-महाराजांना, नसलेल्या देवांबद्दल कोणी काही बोलले की दुखावल्या यांच्या भावना. बाबा-बुवा-म्हाराजांबद्दल, देवाबद्दल नास्तिक बोलत नाहीत तर त्यांच्यावर विश्वास श्रद्धा असणार्‍यांच्या बौद्धिक कुवतीबद्दल बोलले जाते, आस्तिक कसे चु** आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न सतत केला जातो. असे करायचे, नास्तिकांना कुणी आमंत्रण देतं काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश कुलकर्णी
व
वामन देशमुख Sat, 11/21/2015 - 10:47 नवीन
२. देव माना नाहीतर तुमच्या माना मुरगाळतो असे कुणी तुम्हाला म्हटले काय?
हो, इस्लाम असेच म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Sat, 11/21/2015 - 10:53 नवीन
तुम्ही मुसलमान आहात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वामन देशमुख
ब
बोका-ए-आझम Fri, 11/20/2015 - 12:47 नवीन
एकदा लोकशाही म्हटली की या सगळ्या गोष्टी येणारच. प्रत्येकाला भावना असणार, लोकांच्या भावना परस्परविरोधी असणार, एका गटाला आपल्या भावना बरोबर वाटणार, दुस-या गटाला त्या चूक वाटणार, त्यावरून वादविवाद होणार, जर दोन्हीही बाजू आपल्या विचारांवर ठाम असतील तर असे वाद वर्षानुवर्षे चालणार - हे अपरिहार्य आहे आणि याच्यावर लोकांना त्यांच्या भावना आणि विचार व्यक्त करण्यापासून थांबवणं हाच उपाय आहे, पण तो भयंकर अाणि कुठल्याही परिस्थितीत न स्वीकारण्याजोगा आहे. त्यामुळे वाद हे होत राहाणार. जोपर्यंत ते व्यक्तिगत स्वरूपाचे होत नाहीत तोपर्यंत ठीक आहे आणि व्यक्तिगत स्वरूपाचे झाले तरीही काही बिघडत नाही. बाकीच्यांची करमणूक होतेच.
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Fri, 11/20/2015 - 13:54 नवीन
बोकोबांशी पूर्ण सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
अ
अजया Sat, 11/21/2015 - 12:16 नवीन
बोकोबांशी अगदी सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
उ
उगा काहितरीच Fri, 11/20/2015 - 13:54 नवीन
काही प्रश्न आहेत . इच्छा असेल तर उत्तर द्या . १) तुमच्या (किंवा तुमच्या वडिलांच्या / आजोबाच्या) फोटोवर कुणी पान खाऊन थूकत असेल तर तुमच्या भावना दुखतील का नाही ? २) भारताच्या झेंड्याप्रती आपली भावना काय आहे ? तुर्तास इतकेच!
  • Log in or register to post comments
भ
भाऊंचे भाऊ Fri, 11/20/2015 - 14:59 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच
म
मांत्रिक Fri, 11/20/2015 - 15:04 नवीन
मस्तच रे उका.!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच
भ
भाऊंचे भाऊ Fri, 11/20/2015 - 15:25 नवीन
कोणाचेही सदस्यनाम हीच मुळात विज्ञानाच्या नियमाने जिवंत एंटीटी ठरत नाही ( आठवा अकरावी बायोलॉजीच्या पहिल्या धड्यातीलच लिवींग ऑर्गेनीजमची डेफीनीशन, कसयं आज काल लय रेफरंस द्यावे लागतात). पण कसं आहे सगळेच असे विज्ञाननीश्ठ नसल्याने सदस्यनामलिखाणाबाबत हात आवरता घ्यावा लागतो. कधी कोणाच्या भावना दुखावतील काय भरोसा नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच
भ
भृशुंडी Fri, 11/20/2015 - 22:22 नवीन
१) नाही. तुमच्या? २) काहीच नाही. राष्ट्रीय पक्षी मोराबद्दल तुमची काय भावना आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच
उ
उगा काहितरीच Sat, 11/21/2015 - 09:59 नवीन
१) नाही. तुमच्या?
बिलकुल दुखावणार , कारण आम्ही आमच्या वडिलांचा, आजोबांचा आदर करतो. रच्याकने तुम्ही स्वतः हा प्रयोग तुमच्या वडिलांसमोर केला तर तुमच्या वडिलांना तुमच्याबद्दल अभिमान वाटेल , नाही ?
२) काहीच नाही
ज्या व्यक्तीला भारतीय झेंड्याप्रती आदरच नाही. त्या व्यक्तीने भारतात राहूच नये असे प्रामाणिकपणे वाटते .
राष्ट्रीय पक्षी मोराबद्दल तुमची काय भावना आहे?
प्रेमाची भावना आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भृशुंडी
म
मांत्रिक Sat, 11/21/2015 - 10:03 नवीन
अगदी मार्मिक उ.का. साहेब.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच
भ
भृशुंडी Sat, 11/21/2015 - 10:18 नवीन
१) विषय भावना दुखावण्याचा आहे, आदर /अनादराचा नाही. समोरच्या कुठल्याही थिल्लर कृतीमुळे "भावना" दुखावल्या जात असतील तर जरा सांभाळून रहात जा. उदया कुठेही कुणी जर पान खाऊन तुमच्या आय-कार्डवर थुंकला, तर घाण वाटायच्या आधी तुमच्या भावना दुखावल्या जातील. मग कठीण आहे! २) भारताच्या झेंड्याबद्दल आदर असणे ही भारतीय असण्याची पूर्व अट आहे हे सांगितलंत ते बरं केलंत. म्हणजे मग असल्या प्रतीकांमधे एकदा देशभक्तीची हजेरी लावून टाकली की पुढेमागे बघायला नको. बरं, झेंड्याचा आदर असणे/नसणे ह्याचा भावनांशी काय संबंध? ३) मग मोराला जर कुणी शिव्या घातल्या तर तुमच्या भावना दुखावतील का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच
उ
उगा काहितरीच Sat, 11/21/2015 - 12:27 नवीन
१) विषय भावना दुखावण्याचा आहे, आदर /अनादराचा नाही.
माझ्या मते "आदर" ही पण एक "भावनाच" आहे.
२) भारताच्या झेंड्याबद्दल आदर असणे ही भारतीय असण्याची पूर्व अट आहे हे सांगितलंत ते बरं केलंत.
बघा मिपावर आल्याचा फायदा झाला तुम्हाला ! (मनातल्या मनात लाजलो बुवा. )
बरं, झेंड्याचा आदर असणे/नसणे ह्याचा भावनांशी काय संबंध?
मला असे म्हणायचे होते की सामान्य लोकांना झेंडा या 'प्रतिकाबद्दल' आदर असू शकतो तर 'मुर्ती' बद्दल थोडा आदर असेल तर पोट का दुखावे ? असो ! मलाच माझ्या "भावना" पोचवता आल्या नाहीत बहुतेक .
३) मग मोराला जर कुणी शिव्या घातल्या तर तुमच्या भावना दुखावतील का? नाही ! बट तुम्ही जर मोराला मारत असतील तर मात्र माझ्या भावना दुखतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भृशुंडी
भ
भृशुंडी Sat, 11/21/2015 - 20:29 नवीन
सांभाळून रहा हो. तुमच्या भावना दुखावणं हे भलतंच सोप्पं आहे असं दिसतंय. आणि तेवढं आय-कार्ड जपून वापरत जा. ह्यापुढे तुमच्यासाठी सगळे दिवस भावना दुखावणार्‍यांचेच असणार आहेत. नशीब कोंबडी हा भारताचा राष्ट्रीय पक्षी नाही, तसं असतं तर तुमच्या भावना आयुष्यभर कायमच्या दुखावलेल्याच राहिल्या असत्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच
उ
उगा काहितरीच Sun, 11/22/2015 - 09:04 नवीन
धन्यवाद ! मंडळ आभारी आहे. रच्याकने आमच्या भावना दुखावणार्या व्यक्तीच्या भावना कशा दुखवायच्या याचे ट्रेनिंग घेतलेले आहे . त्यामुळे आपण काळजी करू नये. (वेळ पडल्यास भावना दुखावणार्यांना पण दुखावु शकतो , पण काळजी नसावी . ) -नम्र फाटाप्रेमी .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भृशुंडी
प
पगला गजोधर Sat, 11/21/2015 - 11:00 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच
उ
उगा काहितरीच Sat, 11/21/2015 - 12:35 नवीन
सदरील प्रकरणाची चौकशी व्हावी . व दोषीस योग्य ती शिक्षा व्हावी .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
प
प्रकाश घाटपांडे Sat, 11/21/2015 - 05:51 नवीन
कठोर तर्ककर्कश अश्रद्ध माणसाची उत्तरे अशी असतील १) काही दुखावणार नाहीत. २) झेंडा म्हणजे एक प्रतिक आहे बाकी काही नाही. खर तर या सगळ्या अंधश्रद्धा आहेत. स्वत:पुरता अश्रद्ध परंतु इतरांच्या श्रद्धेचा आदर करणार्‍या विवेकी माणसाची उत्तरे १) थोड खटकेल खरं! तरी पण थुंकणार्‍याच्या भावना समजावून घेतल्या पाहिजेत २) राष्ट्रीय प्रतिकांचा आदर असावा. स्वातंत्र्य समता बंधुता याच प्रतिक आहे ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच
स
सतिश गावडे Sat, 11/21/2015 - 11:12 नवीन
म्हणजे मी "कठोर तर्ककर्कश अश्रद्ध" माणूस आहे. :) अर्थात मी "अंधश्रद्धा" हा शब्दच चुकीचा समजतो. श्रद्धा असते किंवा नसते. डोळस श्रद्धा आणि अंध श्रद्धा असे काही नसते. मात्र एक निरिक्षण नोंदवावेसे वाटते. अंनिसचे बरेचसे यश त्यांच्या "अंधश्रद्धा" या शब्दाच्या वापरात आणि "देवाला" अंधश्रद्धेतून वगळण्यात आहे. अंनिसने "देव" आणि "अंधश्रद्धा" या दोन गोष्टी वेगळ्या केल्या नसत्या तर लोकांनी अंनिसला धुतले असते. आणि आजही बळी जात राहीले असते, आजही गावोगवी गोडबाबा, कडूबाबा, आंबटबाबा मोकाट सुटले असते. डॉ. दाभोलकरांच्या द्रष्टेपणाला सलाम. !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
य
यनावाला Sat, 11/21/2015 - 16:17 नवीन
अर्थात मी "अंधश्रद्धा" हा शब्दच चुकीचा समजतो. श्रद्धा असते किंवा नसते. डोळस श्रद्धा आणि अंध श्रद्धा असे काही नसते.
श्री. सतीश गावडे यांच्याशी सहमत. "अंधश्रद्धा" म्हणणे ही द्विरुक्ती आहे. श्रद्धा अंधच असते. म्हणून श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांत भेद (फरक)कोणता ? तर पहिल्या शब्दापेक्षा दुसर्‍या शब्दात अधिक अक्षरे आहेत एवढाच !हे झाले तत्त्वतः. पण व्यवहारात श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांत भेद करता येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
ब
बोका-ए-आझम Sat, 11/21/2015 - 17:41 नवीन
कार्यकारणभाव असल्यावर जी श्रद्धा असते तिला अंध कसं म्हणता येईल? तुम्ही मिपावर पोस्ट टाकलीत. तिला प्रतिसाद मिळतील कारण याआधी टाकलेल्या पोस्टलाही मिळाले होते असं तुम्हाला वाटतं. ही अंधश्रद्धा वाटते तुम्हाला? काहीही संबंध नसलेल्या गोष्टी एकमेकांना जोडणं आणि सर्वांना त्या तशा आहेत असं सांगणं ही अंधश्रद्धा. आणि ती श्रद्धेपासून वेगळी असते. श्रद्धा ही अंधच असते असं म्हणणं हा एकांगी विचार आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यनावाला
स
संदीप डांगे Sat, 11/21/2015 - 17:58 नवीन
I am not saying Faith is Different than Blind Faith. Image removed. but they are different
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यनावाला
स
सतिश गावडे Sat, 11/21/2015 - 07:37 नवीन
तुम्हाला अपेक्षित प्रतिसादाच्या उलट विचार असणारे खुप लोक आहेत. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच
च
चौकटराजा Sun, 11/22/2015 - 08:35 नवीन
प्रामाणिक उत्तर अपेक्षित . प्रश्न:जरा आजोबान्च्या फ़ोटोवर कबूतर हगले तर नातवाची प्रतिक्रया कोणी तरी पानाची पिचकारी मारल्यावर येईल तशीच असेल का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच
क
कवितानागेश Sun, 11/22/2015 - 12:59 नवीन
तुम्ही कोणाला कबूतर म्हणतायत चौराकाका? :):ड
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा
च
चौकटराजा Sun, 11/22/2015 - 15:19 नवीन
आम्ही इथे माहितीच्या देवाण घेवाणी साठी च फक्त येतो कबूतर कोणत्याही आय डी ला उद्देशून नाही .कबुतर हे एका पक्षाचे नाव आहे .कसे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश
अ
अभ्या.. Sun, 11/22/2015 - 17:59 नवीन
ह्या पक्षाची नोंदणी झालीय का. राषट्रीय की प्रादेशिक? कोण आहे कार्यकारिणीत? निवडणूक आयोगाची मान्यता आहे का? पक्षचिन्ह कबूतर हेच आहे का? प्रचारात गाणे वापरायसाठी बडजात्याची परवानगी घेतलीय का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा
स
सुज्ञ Fri, 11/20/2015 - 20:18 नवीन
जगात देव आहे असे मानणारे लोक आहेत व प्रत्येकाची कशावर तरी एक भाबडी श्रद्धा असते हे पाहून स्वतास उगाचच शाहणे समजनार्यांच्या भावना दुखावतात. कारण आपण कोणीतरी जगावेगळे आहोत व बाकीचे लोक कसे अश्रद्ध श्रद्धाळू आहेत असे उगीचच स्वताशी घोकताना आपला मूर्खपणा व महत्वाचे म्हणजे फुकाचा अहंकार जगाला दिसेल हि खंत त्यांच्या मनात कायम असते. म्हणूनच ते नेहेमि ओरडून ओरडून आपली वैचारिक व मानसिक जळजळ जगाला पटवून देण्याच्या प्रयत्नात लेखांवर लेख पाडत राहतात.
  • Log in or register to post comments
स
सुज्ञ Fri, 11/20/2015 - 20:22 नवीन
* तसेच लोकांनी आपल्याला खूप शाहणे समजावे या हव्यासापायी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुज्ञ
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा