Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

भावना दुखावणे

य
यनावाला
Fri, 11/20/2015 - 09:01
🗣 105 प्रतिसाद
"मंत्रसामर्थ्य " या लेखामुळे काही वाचकांच्या भावना दुखावल्या असतील तर त्या सर्वांची मी क्षमा मागतो. या भावना दुखावण्यावर अधिक विचार केला. भावना का दुखावतात? माणूस हा मूलत: तर्कनिष्ठ प्राणी आहे. (मॅन इज अ रॅशनल अ‍ॅनिमल) प्रत्येकाला तर्कबुद्धी असते. (मतिमंद अपवाद). कुतूहल असते. त्यामुळे तो निसर्गाचे निरीक्षण करतो. घटनांवर विचार करतो. त्यातून अनुभव मिळतो. त्याने अनुभव-विवेक (कॉमनसेन्स) येतो. त्याचा उपयोग व्यावहारिक जीवनात होतो. पण देवा-धर्माचे संस्कार बालपणापासून मनावर बिंबवलेले असतात. त्यात आई-वडील, शिक्षक, समाज, प्रसारमाध्यमे इत्यादींचा सहभाग असतो. बालपणीचे संस्कार दृढ असतात. भांड्यावर ठोक-ठोकून कोरलेले नाव जसे सहजी पुसता येत नाही तसे बालमेंदूवर झालेले संस्कार पुढे सहजीं पुसले जात नाहीत. मुलगी मोठी होते. मग आपल्यावर बालपणी झाले तसे संस्कार ती आपल्या मुलांवर करते. असे पिढ्यानुपिढ्या चालते. या संस्कारांमुळे श्रद्धा निर्माण होतात. त्या मुख्यत्वेकरून देव, धर्म, आत्मा, पुनर्जन्म इ.संबंधी असतात. श्रद्धेमुळे तर्कबुद्धी ठप्प होते. जे धर्मग्रंथांत आहे, धर्मगुरू सांगतात ते सर्व खरे मानण्याची मानसिकता बनते. याचा गैरफायदा घेऊन समाजातील लबाड लोकांनी ज्योतिष, मुहूर्त, भाग्यरत्‍ने, ग्रहांचे खडे, वास्तुशास्त्र अशा अनेक गोष्टी निर्मून त्या देवा-धर्माशी जोडल्या. त्यामुळे श्रद्धाळू त्यांना बळी पडतात. हे विषय सोडले तर अन्य क्षेत्रांत श्रद्धाळूंची तर्कबुद्धी चांगली चालते. समजा त्यांच्या वाचनात पुढील मजकूर आला:--
"मूर्तीची समंत्रक प्राणप्रतिष्ठा केली की तिथे देवतत्त्वाचा संचार होतो,असा समज रूढ आहे. पण त्याचा अनुभव कधी आला आहे का? प्रचीती कधी दिसली आहे का? मूर्तीच्या समक्ष दानपेटी फोडली. देवीच्या अंगावरचे दागिने चोरले, मुकुट पळविला, दिवेआगर येथील मंदिरात चोरटे शिरले, प्रतिकार करणार्‍या रक्षकाला जीवे मारून सुवर्ण-गणेश चोरला, देवाने निष्ठावंत सेवकाला वाचवले नाही. या सत्य घटना आहेत. यावरून कोणता निष्कर्ष निघतो? देवमूर्तीत काही सामर्थ्य आहे असे दिसते का? प्रत्येकाने प्रामाणिकपणे आपल्या मनाशी विचार करावा."
हे वाचल्यावर श्रद्धाळूंच्या भावना दुखावतात. ज्याची सत्यता कुणाही सुबुद्ध व्यक्तीला पटावी असे सत्य सुसंस्कृत भाषेत निदर्शनाला आणल्यावर श्रद्धाळूंच्या भावना का दुखावतात? मूर्तीमध्ये देवत्व असते ही श्रद्धा अतूट असेल तर हे विधान त्यांना हास्यास्पद वाटायला हवे. असे लिहिणार्‍याची त्यांनी कीव करायला हवी. ज्यात एकही अपशब्द, असभ्य, असंसदीय शब्दप्रयोग नाही, तसेच कुणाचे चारित्र्यहनन नाही, असे अभिव्यक्तिस्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. तेव्हा श्रद्धावंतांच्या दृष्टीने निरर्थक असलेल्या लेखनाकडे त्यांनी दुर्लक्ष करावे. मग भावना का दुखावतात? मला वाटते श्रद्धाळूंनी असे लेखन वाचले की त्यांच्या उपजत तर्कबुद्धीमुळे लेखातील तर्कसंगत युक्तिवाद आणि निष्कर्ष त्यांना पटतात. ते योग्य आहेत असे बुद्धीला वाटते. पण बालपणापासून जोपासलेल्या श्रद्धेचा त्याग करायला भावना तयार होत नाही. मग बुद्धी आणि भावना यांच्या द्वंद्वांत ते सापडतात. हे खरे मानावे का ते याचा निर्णय होत नाही. ते अगतिक होतात. आपले काहीतरी चुकते आहे हे कळते. पण वळत नाही. मन प्रक्षोभित होते. उद्विग्न होते. मग "या लेखामुळे आमच्या भावना दुखावल्या." असे ते म्हणतात. ज्या लेखातील विचार सुसंस्कृत शब्दांत मांडलेले आहेत, ज्यातील विधाने वस्तुस्थितिदर्शक म्हणजे सत्य आहेत, ज्यात चारित्र्यहननाच्या हेतूने वृथा दोषारोप केलेले नाहीत, ते लेखन आपल्याला कितीही कटु आणि अप्रिय वाटले, तरी तो अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा आविष्कार आहे हे समजणे योग्य ठरेल. त्या लेखनावर टीका करावी. मात्र टीकेत लेखनशुचिता अवश्य पाळावी.
वर्गीकरण
चर्चा

प्रतिक्रिया द्या
39585 वाचन

💬 प्रतिसाद (105)
अ
अर्धवटराव Sun, 11/22/2015 - 19:38 नवीन
मूर्तीच्या समक्ष दानपेटी फोडली. देवीच्या अंगावरचे दागिने चोरले, मुकुट पळविला, दिवेआगर येथील मंदिरात चोरटे शिरले, प्रतिकार करणार्‍या रक्षकाला जीवे मारून सुवर्ण-गणेश चोरला, देवाने निष्ठावंत सेवकाला वाचवले नाही. या सत्य घटना आहेत. यावरून कोणता निष्कर्ष निघतो? देवमूर्तीत काही सामर्थ्य आहे असे दिसते का? प्रत्येकाने प्रामाणिकपणे आपल्या मनाशी विचार करावा.
हे वाचल्यावर श्रद्धाळूंच्या भावना दुखावतात. ज्याची सत्यता कुणाही सुबुद्ध व्यक्तीला पटावी असे सत्य सुसंस्कृत भाषेत निदर्शनाला आणल्यावर श्रद्धाळूंच्या भावना का दुखावतात? मूर्तीमध्ये देवत्व असते ही श्रद्धा अतूट असेल तर हे विधान त्यांना हास्यास्पद वाटायला हवे.
प्राणप्रतिष्ठा, मुर्तीपूजा वगैरे एक विशिष्ट प्रकारची साधना आहे (ति कशी हा वेगळा विषय आहे). प्राणप्रतिष्ठा करुन एखादा रोबोट निर्माण करावा व त्याने आपल्या मालमत्तेचं रक्षण करावं अशी कुठलिही प्रोव्हिजन त्यात नाहि. रेडीओसंचात बॅटरी घालुन आकाषवाणी केंद्राशी ट्युन करतात. आता त्या रेडीओची प्लॅस्टीकची केस बदलुन चामड्याची घातली, किंवा तो रेडीओसंच चोरीला गेला, तुटला तर आकाषवाणी केंद्राने आपलं "सामर्थ्य" दाखवावं असा 'वैज्ञानीक' दावा कोणि करत नाहि. आपण जे आर्ग्युमेण्ट करत आहोत त्यातल्या प्रमेयांची किमान वैधता तपासुन बघणे इतकंहि करु नये 'विज्ञानवाद्यां'नी ? आपले समज चुकीचे नाहितच या वैज्ञानीक अंधश्रद्धेच्या निर्मुलनाकरता कुणी आनेवाले है क्या दुनीयामे ??
  • Log in or register to post comments
P
pacificready Sun, 11/22/2015 - 19:49 नवीन
हमें आपके रेडियो के गाने बहुत पसंद है. हमें वो परेडसी परेडसी जाना नहीं सुनना है. कब सुनायेंगे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
अ
अर्धवटराव Sun, 11/22/2015 - 20:12 नवीन
कृपया प्रतिक्षा किजीये :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: pacificready
स
संदीप डांगे Mon, 11/23/2015 - 05:09 नवीन
An atheist method: This is the conclusion, why we need any facts to prove it?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
स
सप्तरंगी Mon, 12/14/2015 - 15:09 नवीन
अतिशय मुद्देसूदपणे मांडले आहे, सहमत !
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा