Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मी हिंदू आहे म्हणजे नक्की काय आणि कोण आहे? आपल्या हिंदू धर्माचे मुख्य प्रतिनिधी नक्की कोण?

र
राजेश कुलकर्णी
Fri, 11/20/2015 - 11:10
🗣 92 प्रतिसाद
मी हिंदू आहे म्हणजे नक्की काय आणि कोण आहे? आपल्या हिंदू धर्माचे मुख्य प्रतिनिधी नक्की कोण? इतर धर्मातील (उदा. बौद्ध, जैन, ख्रिस्ती, मुस्लीम, शीख, बहाई, पारशी) लोकांना त्यांच्या धर्माशी संबंधीत वरील प्रश्नाचे उत्तर देण्यात फार अडचण यायला नको. किंबहुना काही धर्मात थोडीफार तशी परिस्थिती असली तरी त्याचा येथे संबंध लावायला नको. हिंदूंना मात्र लहानपणापासून याबाबतीत स्पष्ट मार्गदर्शन केले जात नाही. मी आतापर्यंत अनेकांना याबाबत विचारलेले आहे. त्यात १) काय फरक पडतो, २) मी द्वैतवाद वा अद्वैतवाद मानतो, ३) मी भगवद्गीता या ग्रंथाचा पूजक, ४) फार तर भगवद्गीतेबरोबर रामायण हाही माझा धर्मग्रंथ, ५) या भूमीत रुजलेला आणि वाढलेला सनातन धर्म, ६) हिंदू धर्माची व्याख्या करता येत नाही यातच त्याचे महानपण-वेगळेपण वगैरे आहे, ७) मी सर्वांना समान मानतो, ८) हिंदुत्व हा धर्म नसून ती एक जीवनशैली आहे अशी विविध उत्तरे मिळतात. अशा मोघम उत्तरांमुळे कोणाही जिज्ञासू व्यक्तीचे समाधान होणे शक्य नाही. उलट असे प्रश्न विचारून धार्मिक बाबतीतील तज्ज्ञ म्हणवणा-या सदर व्यक्ती त्यांना अडचणीत आणणारे प्रश्न विचारले म्हणून नंतर फटकून वागतात किंवा भेटायचे टाळतात. अशा परिस्थितीत येणा-या पिढ्यांना हिंदुत्वाबद्दल अनास्था वाटेल अशी परिस्थिती निर्माण होईल असे वाटत नाही का? वरील मांडणीत जातीव्यवस्थेला (ज्याचे चातुर्वर्ण्य हे गोंडस नाव आजही वापरले जाते आणि क्वचित त्याचे समर्थनही केले जाते) कोठे स्थान आहे याचा सहसा कोणालाच पत्ता लागत नाही. सर्व शंकराचार्यांनी मिळून चातुर्वर्ण्य पद्धत मोडीत काढलेली आहे हे मात्र मधूनमधून ऐकू येते. पुढचा प्रश्न: हिंदू धर्माचे प्रतिनिधी नक्की कोण? शंकराचार्य म्हणावेत तर अतिशय कर्मठ अशी त्यांची प्रतिमा, सामान्य जनतेशी संपर्क शून्य, त्यातही अनेक पीठे आणि श्रेष्ठत्वावरून त्यांच्यामध्येच मधूनमधून होणारे वाद. हे प्रतिनिधी हिंदू समाजातील कोणत्या घटकांचे प्रतिनिधित्व करतात? त्यांच्यात दलित समाजाचे प्रतिनिधित्व करणारा एक जण तरी आहे का? की आरक्षण लागू नसल्यामुळे तेथेही फक्त उच्चवर्णीयांचे वर्चस्व आहे? आणि त्यामुळे समाजातील हे अनेक मोठे घटक या धर्मात सामावलेलेच नाही? कोणाला प्रश्न पडेल निश्चितपणे कोण प्रतिनिधी आहे हे सामान्य हिंदू व्यक्तीला माहीत नसले तर काय फरक पडतो? तर फरक पडतो. हे आजवर कोणाच्या लक्षात आले नाही का? की विविध कारणांनी ‘जैसे थे’ परिस्थिती लादली गेली? जातीपातीमुळे संपूर्ण हिंदू समाज मुळात यांचे प्रतिनिधित्व नाकारतो हे कारण आहे का? धर्माचा इतक्या सहस्त्रकांचा डोलारा केवळ त्याच्या जडत्वामुळे (inertia) चालू आहे का अशी शंका यामुळे वाटते. फरक का पडतो? १) प्रतिनिधित्वाची भूमिका स्पष्ट नसल्यामुळे विविध बाबा-बुवा-महाराज यांचे फावते. प्रसंगी ते विविध अवतार अहेत म्हणून कमकुवत मनाच्या लोकांना आपल्या कच्छपी लावतात. हा प्रकार कल्पनेच्याही बाहेर बोकाळलेला आहे. २) हिंदू धर्मात अनेक पंथ असल्यामुळे विस्कळीतपणा आणखी वाढतो. लिंगायत समाज मोठ्या प्रमाणात आहे. तर आम्हाला हिंदू धर्मातून वगळा ही या समाजातील काहींची मागणी मधूनमधून वृत्तपत्रात दिसते. ३) शीख, बौद्ध धर्मीय हेदेखील हिंदूधर्मीयच आहेत असे हिंदू त्या धर्मांच्या पोटच्या जिव्हाळ्यामुळे म्हणतात. परंतु या धर्मांची याबाबतची प्रत्यक्ष भूमिका वेगळी असते. ४) तेहेतीस कोटी देव ही संकल्पनाच मुळात चुकीची आहे असे अनेकदा ऐकतो. कित्येकदा कृष्णाच्या राधा वा गोपींबरोबरच्या शृंगाराचे वर्णन तिखटमीठ लावून सांगितले जाते तर तसे काही नव्हतेच असेही म्हटले जाते. कोणतीच सुसुत्रता नसल्यामुळे धर्म बदनाम होतो, चुकीच्या संकल्पना बोकाळतात. ५) हिंदूह्रदयसम्राट अथवा हिंदू या शब्दाचा समावेश असलेली तत्सम बिरूदे लावून घेऊन काही स्वयंघोषित नेते लोकांचा मानसिक गोंधळ वाढवतात. त्यांचे वा त्याच्या संघटनेचे अनेकदा होत असलेले धर्मविरोधी, झुंडशाहीचे आणि गुन्हेगारी स्वरूपाचे वर्तन पाहून हाच तो हिंदू धर्म का असा काहींचा समज होतो आणि हिंदू धर्माची त्यामुळे बदनामी होते. त्यात काही राजकीय लोकदेखील सामील असल्यामुळे अर्थातच राजकीय कारणांसाठी त्याचा वापर केला जातो. ६) राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारख्या प्रमुख संघटना हिंदूंच्या हिताचे रक्षण करण्याचा दावा करतात. परंतु ती काही धार्मिक संघटना नाही. त्यामुळे त्यांना मोठाच राजकीय विरोध होत असल्यामुळे धर्माच्या पातळीवर हिंदू समाज विभागला जातो. विभिन्न राजकीय विचारसारणी असण्यात काहीच गैर नाही, परंतु त्यामुळे एकाच धर्मातील लोकांचे धृवीकरण होणे योग्य नाही, किंबहुना धर्मासाठी ते धोक्याचे आहे. ७) भगव्या रंगाचा ध्वज वापरून काही राजकीय संघटना/पक्ष लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात. भगव्या रंगाचे कपडे घातलेले काही जण वारंवार वादग्रस्त विधाने करतात, त्यामुळे देशातील धार्मिक तेढ वाढते आणि देशाची प्रगती खुंटते.हे लोक खरोखरच हिंदूंचे प्रतिनिधित्व करतात का हे त्यामुळे शोधणे आवश्यक आहे. ८) अगदी अलीकडेच चालू झालेल्या गुढी उभारण्याच्या पद्धतीला धार्मिक स्वरूप देऊन त्याचेही शास्त्र निर्माण करण्यात येते आणि त्यामुळे भोंदूपणा वाढतो. अशा कितीतरी गोष्टी दाखवता येतील. ९) हिंदू धर्मियांमध्येच एकमेकांचा जातीय आणि जातीच्या आधारावरील तुच्छतेने सतत केला जाणारा उल्लेख एके दिवशी कोणते रूद्र रूप धारण करेल याचा नेम नाही. याबाबतील कितीही कायदे केले तरी धार्मिक आणि सामाजिक पातळीवर लोकांची मानसिकता बदलेपर्यंत हा बदल होणे शक्यच नाही. हा धोका असताना दुसरीकडे मात्र धार्मिक पातळीवर याची जबाबदारी कोण घेणार हेच निश्चित करता येत नाही. १०) कोणतीच सुसुत्रता नसलयामुळे आपापल्या जातीपुरत्या संघटना निर्माण केल्या जाऊन धर्म सोयिस्करपणे वा-यावर सोडला जातो. यात जातीय कट्टरपणा वाढीला लागतो हे वेगळे सांगायची गरज नाही. ११) मी वर उल्लेख केल्याप्रमाणे समाजातील विविध घटकांना या प्रतिनिधींमध्ये समाविष्ट केलेच गेलेले नसेल तर आगामी काळात धर्मालाच त्यापासून मोठा धोका निर्माण होऊ शकेल. १२) कोणी हिंदू धर्मातील प्रथांना विरोध करायला गेले तर ते काय सांगतात – का सांगतात, याकडे लक्ष देण्याऐवजी त्यांना इतर धर्मातील विसंगती दाखवण्याची त्यांची हिंमत आहे का असे म्हणून त्यांच्या भुमिकेवर धर्मविरोधी असा ठप्पा मारण्यात येतो. धार्मिक पातळीवर या गोष्टींचा योग्य त्या प्रतिनिधीकडून या बाबतीत काही निर्णय घेता आले तर कितीतरी गोष्टी संघर्षाच्या थराला जाणारच नाहीत. यामुळे समाजातील सौहार्द्रता वाढेल हे सांगायची गरज नाही. १३) धर्माच्या प्रतिनिधित्वाबाबत काहीत निश्चित नसल्यामुळे विविध जातींमधील विविध पातळीवरील राजकीय नेतेच या जातींचे प्रतिनिधित्व करत असल्याचे दाखवून त्यावर आपली राजकीय पोळी भाजून घेतात. अलीकडे जातींच्या आधारावर मागितली जाणारी आरछणे त्यांपैकीच एक. धर्माच्या प्रतिनिधित्वाची संकल्पना निश्चित झाली तर अशा संधीसाधूंना आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे सतत गढूळ होणा-या सामाजिक वातावणाला पायबंद बसेल. १४) आज देशातील मोठी लोकसंख्या धार्मिक जाणीवेच्या बाबतीत खरे तर निद्रिस्त आहे. मग ते सुशिक्षित वा अशिक्षित असोत वा गरीब असो. कारण रोजच्या जीवनसंघर्षातून त्यांना या गोष्टींचा विचार करायला वेळ नाही. पण यातील काही टक्के लोक तरी या गोष्टींचा डोळसपणे विचार करू लागले तर मोठी कठीण परिस्थिती उद्भवेल. आणखी शोधल्यास अशी अनेक कारणे आढळतील. असे झाले तर धर्माचे प्रतिनिधी एक प्रकारचा माफिया निर्माण करतील अथवा आचार-विचार स्वातंत्र्यावर गदा येईल असा समज करून घेण्याचे कारण नाही, कारण देशाची घटना, कायदे यांना यापासून धोका पोहोचणारच नाही. कोणाला या बाबी गांभिर्याने घेणे गरजेचे आहे असे वाटत असेल तर त्यांनी यात जरूर भाग घ्यावा. फक्त त्यात जातीय/धार्मिक आवेश नको. कारण त्यामुळे चांगली चर्चा होऊ शकणार नाही आणि त्याला भलतेच वळण लागेल. शिवाय ज्यांना यातली तळमळ दिसते त्यांनी त्यांच्या परीने विविध पातळींवर या विषय न्यायलादेखील माझी काहीच हरकत नाही. मला याची निकड वाटते. कारण या घडीला मी हिंदू आहे म्हणजे नक्की कोण व काय आहे हे मला सांगता येत नाही. कारण या बाबतीतली स्पष्टताच नाही. मग मी मला हिंदू का म्हणवून घ्यावे? एकविसाव्या शतकात याबाबतीत मोघमपणा परवडणार नाही. कारण वर उल्लेख केलेले धर्माच्या व देशाच्या एकतेला, सामाजिक सौहार्द्रतेला याबाबतच्या अनिश्चिततेमुळे त्यामुळे निर्माण होऊ शकणारे धोके. होऊ शकणारे काय, ते तर आपण रोजच पाहत आहोत. ही पोस्ट चकाट्या पिटणा-यांसाठी नाही. तशी सवय असणा-यांच्या कमेंट्ना उत्तर देण्याची तसदी घेतली जाणार नाही. गांभिर्याने चर्चा करण्याची इच्छा असलेल्यांचे स्वागत व आगाऊ धन्यवाद.
वर्गीकरण
स्फुट
धार्मिक
मनोरंजन
लेखन

प्रतिक्रिया द्या
28287 वाचन

💬 प्रतिसाद (92)
आ
आदूबाळ Fri, 11/20/2015 - 11:17 नवीन
ही पोस्ट चकाट्या पिटणा-यांसाठी नाही. तशी सवय असणा-यांच्या कमेंट्ना उत्तर देण्याची तसदी घेतली जाणार नाही.

आता पुढचा प्रतिसाद वाचू नका.

मागच्या धाग्यावरचा मोदकरावांचा सल्ला मनावर घेणेचे करावे. उत्तर देण्याची तसदी घेतली नाहीत तरी चालेल. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद१९७१ Fri, 11/20/2015 - 11:23 नवीन
हे लेखक महाशय कुठला तरी विचारजंती अजेंडा घेउन मिपा वर आले आहेत. त्यांच्या लेखांकडे दुर्लक्ष करणेच चांगले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
त
तात्या Fri, 11/20/2015 - 11:18 नवीन
हा नेमाडेंचा डु आयडी आहे काय ?
  • Log in or register to post comments
र
राजेश कुलकर्णी Fri, 11/20/2015 - 12:05 नवीन
आपण पोस्टमधील कशावरच लिहिण्याची तसदी घेतलेली नाहीत. नेमाडे ही अतिशय विद्वान व्यक्ती आहे. कमीत कमी त्यांचा तरी उद्धार करू नका ही विनंती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तात्या
त
तात्या Fri, 11/20/2015 - 12:12 नवीन
तुम्ही मिपाचा नेमाडे करत आहात तेवढा पुरे आहे. बाकी पोस्टमधे जे लिहलय त्याबद्दल नेमाडेंचा हिंदू वाचा ! टेम्पो बोलवा रे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश कुलकर्णी
र
राजेश कुलकर्णी Fri, 11/20/2015 - 12:22 नवीन
टेम्पो कशासाठी बोलवायचा हो तात्या. तेवढे सांगा ना क्ृपया.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तात्या
_
_मनश्री_ Fri, 11/20/2015 - 11:31 नवीन
मी हिंदू आहे म्हणजे माणूस आहे आणि मी हिंदू नसते उदा.बौद्ध,जैन,ख्रिस्ती, मुस्लीम, शीख, बहाई,पारशी कोणीही असते तरी माणूसच असणार होते इतकचं पुरेस आहे
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Fri, 11/20/2015 - 11:32 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Fri, 11/20/2015 - 13:13 नवीन
इकडे पॉपकॉर्न घेऊन बसण्याइतकं मट्रेल नै टका, च्यामारी कुठल्यातरी सत्यशोधक समाज वा तत्सम सभेच्या मैदानात भोंग्याशेजारी बसल्यासारखं वाटतंय मला... तु आपला मल्टीप्लेक्स मधे बसल्यासारखा बसलायस... चल जाऊ, चनावाल्याकडं. (एकेरीसाठी क्षमस्व, त्याशिवाय विधानात मजा नै)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Fri, 11/20/2015 - 15:13 नवीन
खि खि खि... बाकी एकेरीतच चालूद्या....ते काही आयडींसारखे उग्गीच्च सीलेक्टीव्ह शिष्ट्पणा जम्णार नै मला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
उ
उगा काहितरीच Fri, 11/20/2015 - 13:15 नवीन
थोडे शेअर करणार का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Fri, 11/20/2015 - 15:13 नवीन
करू की :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच
म
मोदक Fri, 11/20/2015 - 12:38 नवीन
आपल्या हिंदू धर्माचे मुख्य प्रतिनिधी नक्की कोण? अहो.. सर्वोच्च न्यायालय म्हणते की "हिंदू हा धर्म नसून एक जीवन पद्धती आहे" पहिलेच वाक्य चूक आहे. पुढचा लेख का वाचावा आणि काय चर्चा करावी?
  • Log in or register to post comments
र
राजेश कुलकर्णी Fri, 11/20/2015 - 13:21 नवीन
हरकत नाही. मग त्या जीवन पद्धतीमुळे जर काही समस्या निर्माण झाल्या असतील तर त्यावर चर्चा नको करायला? तेव्हा शब्दश; अर्थ घेऊ नये. 'फरक का पडतो' याखाली अनेक गोष्टी नोंदवल्या आहेत त्या त्यासाठीच. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
म
मोदक Fri, 11/20/2015 - 13:28 नवीन
हरकत नाही. हरकत आहे. हिंदू धर्मच नाहीये; जीवनपद्धती आहे. मग प्रत्येकाने स्वत:ची जीवनपद्धती सुधारावी. धर्म आपोआप सुधारेल. मग त्या जीवन पद्धतीमुळे जर काही समस्या निर्माण झाल्या असतील तर त्यावर चर्चा नको करायला? नुसते चर्चा करून काय होणार? तुम्ही काही बदल घडवले आहेत का तर बोला. चुकीच्या गृहीतकावर चर्चा करण्यासाठी ही जागा वाया घालवायला नको.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश कुलकर्णी
र
राजेश कुलकर्णी Fri, 11/20/2015 - 13:47 नवीन
चर्चेतूनच जमत बनते ब बदल घडतात हे आपल्याला मान्य आहे का? कोणत्या त्रुटी आहेत, त्यामुळे काय फरक पडतो आहे हे तर मी दाखवलेलेच आहे. आपण आणखी काही कारणांचा विचार करू शकता का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
म
मोदक Fri, 11/20/2015 - 14:19 नवीन
चर्चेतूनच जमत बनते ब बदल घडतात हे आपल्याला मान्य आहे का? नाही. चर्चेतून जमत बनायला लै वेळ लागतो. आजच्या युगात अभ्यासाने खूप लवकर सामाजिक बदल घडू शकतात. उदा - डॉ. अभय बंगांनी केलेला किमान मजुरीच्या दराचा बदल, आमटे कुटुंबियांच्या तिसर्‍या पिढीने केलेला कुष्टरोगी मदत योजनेच्या दराचा बदल. चर्चेतून किमान एक वर्षांमध्ये बदल घडलेली उदाहरणे द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश कुलकर्णी
र
राजेश कुलकर्णी Fri, 11/20/2015 - 14:31 नवीन
तुम्ही दिलेली बदलांची मूर्त उदाहरणे उत्तम आहेत. त्यालाही काही वर्षे काही काळ तर लागला असेलच. शिवाय मी व्यक्त केलेल्या मुद्द्याची व्यापती (मी म्हणतौ म्हणून नव्हे) खरोखरच खूप मोठी आहे. मात्र बदल व्हायला हवा असे वाटत असेल तर काही चर्चा तर व्हायला हवी. चर्चा न करता काही बदल घडवायचा म्हणजे हुकूमशहाच हवा. त्यालाही तसे करताना अडचणी येणार. काही बदलांना मोठा काळ जावा लागतो. काही बदल तेव्हाच्या परिस्थितीनुरूप लगेच होतात. प्रत्येक बदलामागे चर्चा असतेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
म
मोदक Fri, 11/20/2015 - 14:33 नवीन
डॉ बंग किंवा आमटे परिवार यांनी केलेल बदल चर्चा न करता केले. मग हुकूमशाहीचा काय संबंध आला येथे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश कुलकर्णी
अ
अभ्या.. Fri, 11/20/2015 - 14:37 नवीन
मोदकराव त्यांना चर्चा करायचीय, तुम्ही कंडका पाडायला निघालात. कसे व्हायचे? एकदाचा मिपायक्ष हा किताब देऊन टाका. ;) मोकळे सगळेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
म
मोदक Fri, 11/20/2015 - 14:46 नवीन
अर्रर्र.. असे आहे होय? स्वारी हा अभ्याजी.. माझी चूक झाली. ;) कुलकर्णी सर.. ब्रह्मा, विष्णू हे देवगण हिंदू होते का? यावर तुमचे काय विचार आहेत यावर कृपया (याच धाग्यावर!) चर्चा करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
अ
अभ्या.. Fri, 11/20/2015 - 14:54 नवीन
महेश साठी वेगळा धागा काढला तरी चालेल. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
स
संपत Sat, 11/21/2015 - 12:12 नवीन
उलट डॉ. बंग ह्यांनी मिळवलेल्या माहिती आधारे तत्कालीन मंत्र्यांशी चर्चा केली आणि मंत्र्यांनी बदल केले. डॉ. बंग ह्यांनी नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
म
मोदक Wed, 12/02/2015 - 15:21 नवीन
बरं.. आता एक सांगा, तुम्ही दिलेला प्रतिसाद तुम्ही लिहिला की तुमच्या संगणकाने? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संपत
ख
खटपट्या Fri, 11/20/2015 - 14:32 नवीन
तुम्हाला जनमत म्हणायचे आहे का? मला माहीत नाही मी कोण आहे. माझे आइ वडील हींदू आहेत. पण मी लहानपणापासून देवळात जाणे वगैरे काही केले नाही. पूजा करत नाही. देवाला नमस्कार करत नाही. मी हींदू आहे का? नसेन तर हींदू होण्यासाठी मी काय करावे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश कुलकर्णी
म
मोदक Fri, 11/20/2015 - 14:40 नवीन
सर्वप्रथम "हिंदू" असे लीहायला शीका. तूमच्यासारख्या लोकांमूळे धर्म बूडायला लागला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
ख
खटपट्या Fri, 11/20/2015 - 14:44 नवीन
कीती वेळा लीवू गुरुजी हिंदू ? बाकी ते धर्म का काय ते आधी सांगा,,,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
ट
टवाळ कार्टा Fri, 11/20/2015 - 15:20 नवीन
ओ...असे नै करायचे....वर तुम्हीच लिव्लेत ना...हिंदू ही जीवनपध्धती आहे म्हणून....या तो जीवनपध्धती बोलो या तो धर्म बोलो :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
ख
खटपट्या Fri, 11/20/2015 - 15:36 नवीन
काय ते सांगा आधी म्हणजे मी ठरवतो मी कोण ते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
प
पगला गजोधर Fri, 11/20/2015 - 14:44 नवीन
जीवनपद्धती म्हणजे काय ? मला वाटायचे की उदा. शाकाहार हि जीवन् पद्धत, म्हणजे ती पद्धत अवलंब करणाऱ्यांनी शाक म्हणजे वनस्पतीजन्य पदार्थ खाऊन जीवन व्यतीत करणे. मग हिंदू जीवनपद्धती म्हणजे काय ? कोणी काय खावे, कसे कपडे घालावे, कोणी काय शिकावे / शिकू नये, बोलावे / बोलू नये, लिहावे / लिहू नये , धागा काढावा / काढू नये इ प्रत्येक गोष्टीत ढवळाढवळ करणे, असा आहे का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
य
यनावाला Sun, 11/22/2015 - 17:06 नवीन
श्री.मोदक लिहितात,"
"हिंदू हा धर्म नसून एक जीवन पद्धती आहे" पहिलेच वाक्य चूक आहे. पुढचा लेख का वाचावा आणि काय चर्चा करावी?"
एखाद्या फॉर्म मध्ये आपली माहिती भरताना "धर्म:--" या सदरात तुम्ही काय लिहिता? याचे प्रामाणिकपणे स्वत:शीच उत्तर द्या. भारतातील ८५% लोक तिथे "हिंदू" हाच शब्द लिहितात. जगातील प्रमुख धर्मांत हिंदुधर्माची गणना होते. ख्रिश्चन, इस्लाम,बौद्ध, हिंदू, ज्यू, जैन इ.सर्व धर्मच आहेत. हिंदू हा एक धर्म आहे हे आज जगन्माम्य आहे. श्री.राजेश कुलकर्णी यांचा लेख तुम्ही वाचा अथवा वाचू नका, पण "हिंदू हा धर्मच नव्हे. लेखातील पहिलेच वाक्य चुकले. लेख का वाचावा." असे म्हणणे अज्ञानमूलक आणि अशोभनीय आहे. * वस्तुत: श्री. कुलकर्णी यांचा लेख अभ्यासपूर्ण आहे. सखोल विचार करून लिहिला आहे. त्यांनी मांडलेले सर्व मुद्दे हिंदुधर्माच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहेत. कृपया थोडे गांभीर्य धारण करावे. लेखातील विचार समजून घ्यावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
म
मोदक Sun, 11/22/2015 - 20:35 नवीन
तुम्ही पण झक्कास सर्टिफिकेट देता की. आम्हाला वाटले होते आमचे एक सर होते तेच एकमेव. आता कंटाळा आला आहे त्यामुळे सध्या इतकेच. नंतर इच्छा झाली तर प्रतिसाद देईन. अज्ञानमूलक - मोदक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यनावाला
म
मराठी_माणूस Fri, 11/20/2015 - 13:01 नवीन
पु.लं. नी संस्कृती वर काय सुरेख भाष्य केले आहे ते पहा https://www.facebook.com/116170530788/photos/a.132880410788.105988.116170530788/136880505788/ हींदू म्हणजे सुध्दा अनेक गोष्टींचा समुदाय आहे त्याला एखाद्या चौकटीत बसवणे कठीण आहे.
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Fri, 11/20/2015 - 13:45 नवीन
असा सगळा प्रकार झाला तर, फार वाईट झाले.
  • Log in or register to post comments
न
नाखु Sat, 11/21/2015 - 05:09 नवीन
असा प्रकार आहे तर ! विलक्षण मौज आहे वगैरे वगैरे !!! नाखोक मिपागावकर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
श
शलभ Fri, 11/20/2015 - 13:57 नवीन
मग मी मला हिंदू का म्हणवून घ्यावे?
मग काय ठरवलं.
  • Log in or register to post comments
ज
जयन्त बा शिम्पि Fri, 11/20/2015 - 14:01 नवीन
माझ्या वाचनानुसार, काथ्याकूट करण्याजोगा हा विषय असला , तरीही सोप्या भाषेत सांगावयाचे झाल्यास , पुढील श्लोक वाचावा. स्मृती भिन्न: श्रुतयो विभिन्ना नैको ॠषिर्यस्य मतं प्रमाणम् । धर्मस्य तत्वं निहितं गुहायां महाजनो येन गतः स पन्थाः ॥ अर्थः- स्मृती भिन्न आहेत, श्रुती भिन्न आहेत, ( म्हणजे त्यांच्यातील तत्वज्ञानाचा एक्मेकांशी काही संबंध नाही ) कोणत्याही एकाच ॠषीचे मत प्रमाण म्हणून स्वीकारले जात नाही. खरं म्हटलं तर धर्माचे तत्व , अज्ञात गुहेत दडवून ठेवण्यात आलेले आहे. ( त्यामुळे ते शोधण्याचा कोणीही प्रयत्न करू नये , असे सुचविण्यात आले आहे). मग जीवनाचा म्हणा अगर सत्याचा मार्ग कोणता ? तर आपल्या अगोदर जे महा जन म्हणजे ज्ञानी , मुनी, मोठे लोक , ज्या मार्गाने गेले , त्याच मार्गाने आपण जावे हेच खरे. ! ! अधिक माहितीसाठी खालील लिंक पहावी. http://sanskritdocuments.org/doc_z_misc_vaakyasangraha/vaakyaexamples.html?lang=sa
  • Log in or register to post comments
य
यनावाला Mon, 11/23/2015 - 09:41 नवीन
संस्कृत श्लोकातील पहिली पंक्ती अशी हवी: "तर्कोsप्रतिष्ठ: श्रुतयो विभिन्ना: । तसेच १." ॠषिर्यस्य..." हे "ऋषिर्यस्य...." असे हवे. (म्हणजे ऋ ह्रस्व हवा. दीर्घ[ॠ] नको.)२."तत्त्व" असा असा शब्द हवा.तो "तत्व" असा पडला आहे. अन्य सर्व शब्द व्याकरणशुद्ध आहेत. संस्कृत लेखनात व्याकरणदोष क्षम्य नाहीत म्हणून लिहिले.राग नसावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयन्त बा शिम्पि
ब
बॅटमॅन Fri, 11/20/2015 - 14:06 नवीन
मग मी मला हिंदू का म्हणवून घ्यावे?
नका म्हणवून घेऊ, हाकानाका. इथे कोणी दगड मारून जीव थोडीच घेणारे तुमचा?
  • Log in or register to post comments
र
राजेश कुलकर्णी Fri, 11/20/2015 - 14:16 नवीन
बॅटमॅन, मी जर आज तसे म्हणवून घेण्याचा प्रयत्न केला तर अापली व्यवस्था सामाजिक व कायद्याच्या पातळीवर ते चालवून घेईल असे खरंच वाटते तुम्हाला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
म
मोदक Fri, 11/20/2015 - 14:28 नवीन
मी जर आज तसे म्हणवून घेण्याचा प्रयत्न केला तर अापली व्यवस्था सामाजिक व कायद्याच्या पातळीवर ते चालवून घेईल असे खरंच वाटते तुम्हाला? न घ्यायला काय झाले? बरोब्बर १०० वर्षांपूर्वी असा एक प्रयोग झाला होता "अजात" नावाचा. त्याची माहिती शोधा. बरीच उत्तरे मिळतील. जी उत्तरे मिळणार नाहीत त्यावर प्लीज येथेच लिहा. नवीन धागा काढू नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश कुलकर्णी
ब
बॅटमॅन Fri, 11/20/2015 - 14:29 नवीन
इकडे बघा. https://en.wikipedia.org/wiki/Irreligion_in_India#Legal_status.2C_rights_and_laws तूर्तास तरी जन्मतानाचा धर्म कन्सिडर केला जातो, मात्र अपॉस्टसी- अर्थात मी कुठलाही देवबीव मानत नै असे सांगणे- अलाउड आहे. हे झाले कायद्याचे. बाकी लोकही जरा बोलतील पण तेवढ्याकरिता कोणी जीव घेणार नाही. आता लगेच दाभोळकर वगैरेंचे मर्डर इ. आयसोलेटेड केसेस तोंडावर फेकणार असाल तर त्याला कै अर्थ नाही. अनेक नास्तिक लोक परिचयाचे आहेत आणि आस्तिक लोक कायम त्यांना त्रास देतात असे कै पाहिलेले नाही. प्रत्यही आस्तिकांवर टीका करून तुच्छतेने बोलणे हीच जर तुमची नास्तिकता असेल तर गोष्ट वेगळी, पण शांतपणे आणि ठामपणे जर फक्त "मी नास्तिक आहे" इतकेच सांगितले तर लोक फार तसदी घेत नाहीत असा अनुभव आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश कुलकर्णी
र
राजेश कुलकर्णी Fri, 11/20/2015 - 14:41 नवीन
धर्माचा व आस्तिक-नास्तिकतेचा तसा संबंध नाही. तो विषय वेगळा. मी कोणताही धर्म मानत नाही असे सांगणे कि्वा देव मानत नाही हे वेगळे. पण उद्या एखाद्या 'धार्मिक' उत्सवामुळे मला जर उपद्रव होत असेल, पण केवळ लोकांना मूर्ख बनवणा-या आयोजकांमुळेच नव्हे तर भलत्याच धार्मिक कल्पना असणा-या जनसामान्यांमुळे मला नक्कीच विरोध होईल. मुळात अशा धर्माचा गैरवापर करणा-या राजकारण्यांचा आधारच असे जनसामान्य असतात. त्यामुळे धार्मिक भावना भडकणे असे जे दावे केले जातात ते त्यांच्या जीवावरच केले जातात. तुम्ही दाभोळकरांचा संदर्भ नको म्हणालात. ते तर मोठेच वास्तव आहे. पण तुम्हाला कोणी मारणार नाही असे जे म्हणालात तेही अशा उदाहरणावरून तितकेसे खरे नाही. तुम्ही कायद्याच्या द्ृष्टीने जे अथिस्ट किांवा अपोस्टसी याबद्दल मला कल्पना आहे. पण व्यावहारिक बाबतीत तुम्ही म्हणता तसा जन्माचा धर्म वा नंतर बदललेला असेल तर तो धरला जातो हे वास्तव आहे. पण तो विषय वेगळा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Fri, 11/20/2015 - 15:42 नवीन
मग काय म्हणायचे आहे नक्की? स्पीकरवरून तक्रार केली तर पोलीस येऊन बंद करायला लावतातच की. भले सगळीकडे आणि सर्व काळी ही यंत्रणा काम करत नसेल मनासारखे म्हणून काही होतच नाही असे आहे का ? मुद्दा इतकाच की दाभोळकरांसारखी हाताच्या बोटांवर मोजण्याइतकी उदाहरणे देऊन आपला सिलेक्शन बायस उघडा पडतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश कुलकर्णी
प
परिकथेतील राजकुमार Sun, 11/22/2015 - 07:00 नवीन
नका म्हणवून घेऊ, हाकानाका. इथे कोणी दगड मारून जीव थोडीच घेणारे तुमचा?
+१ रे सध्या धर्म आणि देश सोडायला परवानगी लागत नाही. फायदा घ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
म
माईसाहेब कुरसूंदीकर Fri, 11/20/2015 - 14:11 नवीन
विचार करण्यासारखे प्रश्न आहेत रे राजेश.नेमके उत्तर सापडत नसल्याने 'हिंदू धर्म नसून विचारशैली,जीवनपद्धती..'असली वेळ मारून नेणारी उत्तरे देण्यात येतात असे वाटते.
  • Log in or register to post comments
त
तात्या Fri, 11/20/2015 - 14:15 नवीन
माई, बेअरींग सुटतय !! राजेशा किंवा राजा म्हणा ! आणि तुमची इकडची स्वारी निजधामास गेली काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
र
राजेश कुलकर्णी Fri, 11/20/2015 - 14:44 नवीन
धन्यवाद. खरोखर तशी परिस्थिती आहे. उत्तरे शोधण्यापेक्षा त्यातील अाव्हानांवर पांघरूण घालण्याचा प्रयत्न केला जातो. पण जितके दाबले जाईल किंवा दुर्लक्ष केले जाईल तेवढे ते उफाळून येईल व सा-यांनाच त्याचा त्रास/उपद्रव होईल असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
आ
आनन्दा Sun, 11/22/2015 - 11:42 नवीन
प्रश्न असा आहे की तुम्ही नुसते हिंदू या शब्दाभोवती अडकून पडला आहात. मुळात मुसलमान आक्रमक भारतात येण्यापूर्वी हिंदू हा शब्द तरी अस्तित्वात होता का असा प्रश्न आहे. त्यामुळे मुळात "हिंदू" आणि "धर्म" या शब्दांच्या व्याख्याच सुस्पष्ट नाहीत. तुम्हाला धर्म या शब्दाचा नेमका कोणता अर्थ अपेक्षित आहे ते बघणे रोचक ठरेल. धर्म म्हणजे रिलिजन की गीतेमध्ये श्रेयां स्वधर्मो मध्ये सांगितलेला धर्म? रिलिजन म्हणजे खरेतर भारतीय भाषेत पंथ, पण त्यालाच आपण धर्म समजून बसायची चूक करतो आणि मग पुढे त्याच्यावर लेखात साअंगितल्याप्रमाणे इमले चढवतो. एव्हढेच म्हणायचे की पाया कच्चा आहे. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
र
राजेश कुलकर्णी Sun, 11/22/2015 - 14:39 नवीन
आनन्दा, इतिहासात काय झाले त्यापेक्षा अाज हिंदू धर्म म्हणून जे आपल्यासमोर अाहे त्याबद्दल मी बोलत आहे. त्यामुळे धर्म की रिलिजन यात गल्लत नको कि्वा त्यामुळे आणखी गोंधळ वाढायला नको. आपण सरकारी कागदपत्रांमध्ये जो लिहितो तो हिंदू धर्म. वर म्हटल्याप्रमाणे तीन भाग अाहेत १) मी हिंदू अाहे म्हणजे काय अाहे, २) माझ्या धर्माचे प्रतिनिधी कोण (सुसुत्रता येण्यासाठी/आणण्यासाठी) आणि ३) यागोष्टी नसल्यामुळे होत असलेले दुष्परिणाम व ते करण्याची गरज. क्र. ३ चे तपशील 'फरक का पडतो' याखाली दिलेले आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा