Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

टीव्हीवरील मतिमंद कार्यक्रम - मुख्यत्वे मालिका - आणि त्यांचे बहुतेक सारे स्वत:ला विकलेले निव्वळ पोटार्थी पांढरपेशे लेखक(?)

र
राजेश कुलकर्णी
Sat, 11/21/2015 - 05:31
🗣 66 प्रतिसाद
टीव्हीवरील मतिमंद कार्यक्रम - मुख्यत्वे मालिका - आणि त्यांचे बहुतेक सारे स्वत:ला विकलेले निव्वळ पोटार्थी पांढरपेशे लेखक(?) कोणाच्या व्यवसायाबद्दल एरवी बोलू नये असे वाटते. कारण ब-याचदा तो त्यांच्या पोटापाण्याचा मार्ग असू शकतो. माझ्या मते या रेम्या डोक्याच्या सिरियल्स समाजाला मानसिकदृष्ट्या अधु करण्याचे काम करत आहेत; मराठी-हिंदी- बहुतेक सगळ्याच. समाजाला चांगला मार्ग दाखवणारे किंवा स्फुर्तिदायक असे विषय हाताळणा-या अगदी क्वचितच. महिनोंमहिने वा वर्षानुवर्षे हे दळण दळत राहणे हे यामागचे मुख्य कारण आहे असे वाटते. चांगला विषय घेऊन मोजक्या वेळेत तो पूर्ण करणे असे असायला हवे. पण त्याऐवजी प्रेक्षकांना व्यसन लावण्याचे आणि निर्बुद्ध बनवण्याचे काम केले जाते या मतिमंद मालिकांमुळे. तेव्हा टीआरपी हे तांत्रिक वा आर्थिक कारण असो की इतर काही, हे स्वत:ला विकलेले लेखकच या प्रकाराला जबाबदार आहेत यात शंका नाही. एरवी कोणतेच काम कमी दर्जाचे नसते. पण हे पांढरपेशे लेखक (खरे तर लेखक म्हणायला हे नालायक - पाट्या टाकणा-या या जातीला समर्पक काहीतरी नवा शब्द हवा. उदा. पोभपाटालेखक - पोटभरूपाट्याटाकणारे लेखक). मनोरंजनाच्या नावाखाली सतत दुस-याचा मत्सर, कटकारस्थाने, बटबटीतपणा, अतिसोशिकपणा, अचकटविचकट विनोद या गोष्टींचा मारा करत असतात. त्यांना खरोखरच लेखनाची आवड असती तर त्यांनी असे कचरा लेखन केले असते का? त्यामुळे असे विकले जाण्यास त्यांनाच जबाबदार धरायला हवे. चांगले कार्यक्रम दिले तर कोणाला नको आहेत? टीव्ही पाहण्याशिवाय दुसरे काही करू शकत नाही वा करायची इच्छा नाही, अशा लोकांनी तो कार्यक्रम पाहिला काय आणि न पाहिला काय, काय फरक पडतो? वर्तमानपत्रात जे विकते ते छापणा-यांना आपण माफ करतो का? अशांना पोटभरू पत्रकारच म्हणतो ना! क्रिकेटच्या मैदानात केवळ चॅनलला किंवा स्पर्धेच्या आयोजकांना सामना रंगतदार व्हायला हवा म्हणून नको त्या गोष्टी केल्या तर आपण त्या सहन करू का? (मॅच फिक्स्ड की काय हे कळायला सहसा मार्ग नसतो ही गोष्ट वेगळी). प्रत्येकाने आपले काम दर्जा राखून करणेच अपेक्षित असायला हवे ना? तेव्हा हे समाजात उजळ माथ्याने वावरणारे हे समाजद्रोही निव्वळ पोटभरूच आहेत आणि त्यांच्यातले काही जेव्हा उठसुट विविध पुरस्कार स्विकारायला जातात तेव्हा त्या पुरस्काराचे नावही पोटभरू आणि विकला गेलेल्यासाठीचा पुरस्कार असेच हवे. टीआरपीच्या नावाखाली चॅनलला हवे ते द्यायला यांचे डोके तरी यांच्याकडेच असते ना! व्यावसायिकता म्हणजे स्वत:ला असे विकणे असे तरी अपेक्षित नको. कोणी म्हणेल, की दाखवतात ते न पाहण्याचे स्वातंत्र्य आपल्याला आहेच की. मात्र ते सोयीस्करपणे विसरतात की जे सुबुद्ध आहेत ते हे टाळू शकतील, किंबहुना पाहिले तरी विसरून जाऊ शकतील. मात्र येथे बहुसंख्य प्रेक्षक तेवढे सुबुद्ध नसतात. यात कोण किती श्रीमंत, किती शिकलेला किंवा अडाणी, कोणत्या समाजातला, हे अध्याहृत नाही. हा प्रत्येक माणसाच्या स्वभावाचा प्रश्न आहे. तेव्हा असेच लोक बहुसंख्येने असतात. अमेरिकेसह अनेक देशांमधील सामाजिक अभ्यासांवरून लक्षात आलेले आहे की अशा मालिका समाजाला निर्बुद्ध, मठ्ठ बनवतात, स्वत:ची विचारशक्ती गमवायला भाग पाडतात, दुस-याचा हेवा, मत्सर, द्वेष करायला शिकवतात. तेव्हा कोणाला या वरकरणी हार्मलेस प्रकार वाटत असेल तर त्यामागचे सत्य हे आहे. तेव्हा यांचे पोट भरावे म्हणून कामाच्या दर्जात तडजोड करणारे हे लोक समाजाचे गुन्हेगारच आहेत. जे मनापासून वाटते ते लिहीले. शीर्षकातील लेखक या शब्दापुढील प्रश्नचिन्ह यांना लेखक म्हणावे तरी कसे यासाठी आहे. आता धडाडू देत तोफा.....मी यापूर्वी ऐकलेले प्रतिवाद....लिहिणारे लिहितात, पाहणारे पाहतात, माझे काय जाते, टीव्हीचा रिमोट तरी आपल्याकडेच असतो ना...तू नॅशनल जिओग्राफिक पहा, तुला कोणी थांबवलेले अाहे.....यात लेखकाचा/लेखिकेचा दोष नसतो, का तर ते जाहिरातदारांच्या म्हणजे टीआरपीच्या रेट्यामुळे मालिकानिर्मात्यांच्या दबावामुळे तसे लिहितात..........वगैरे. तेव्हा यापेक्षा वेगळा प्रतिवाद पहण्यास आवडेल.
वर्गीकरण
मनोरंजन
स्फुट

प्रतिक्रिया द्या
12195 वाचन

💬 प्रतिसाद (66)
स
सर्वसाक्षी Sun, 11/22/2015 - 06:45 नवीन
या मालिका पाहा म्हणुन अण्णा हजारे आपल्य दारात उपोषणाला बसले का? नाही! दाऊदने दुबईहून फोन केला होता का? नाही! मग का बघता? असंख्य वाहिन्यांवर असंख्य कार्यक्रम अव्याहत सुरू असताना याच मालिका का बघता? दर्जा बाजूला ठेवा. निर्माते मालिका अर्थप्राप्तिसाठी काढतात. अगदी रमाबाई रानडे यांच्या मालिकेतही रमाला पटकन मोठी न करणं, झाल्यावरही प्रत्येक भागाचा बहुतेक वेळ सासवांनी केलेला जाच, सहनशिल रमा हे दाखविण्यात गेला. ते बालपात्र प्रेक्षकांना आवडलं म्हणताना तुकोबांच्या मालिकेतही सुरुवात तुकोबांच्या आणि त्यांच्या पत्निच्या (अगदी लग्नाआधीच्या) बालपणाने केली गेली आणि अनेक महीने तुकोबा बालच राहिले, लोकांनी बहुधा ते आता संत होतील, मग संत होतील या अशेवर अनेक भाग पाहिल्यावर मालिका पाहणे बंद केले असावे. तर सांगायचं तात्पर्य निर्माता आपली मालिका चालावी म्हणून काढतो. यांचा प्रेक्षकांचा अभ्यास उत्तम असतो. मराठी मालिकांचा विद्यमान प्रेक्षकवर्ग म्हणजे साधारण ६०-६५ च्या पलिकडच्या वयाचे मराठी प्रेक्षक. हे बाहेर फारसे जात नाहीत (जाउ शकत नाहीत), घरात यांच्याशी बोलायला कुणी नसतं, घरातले सगळे आपल्या दैनंदिन जीवनक्रमात गुरफटलेले असतात तेव्हा हा वर्ग म्हणजे भरपूर संख्येने उपलब्ध असलेला लक्ष्यवर्ग. मग बहुतेक मालिकात या वर्गानं त्यांचा बालपणात, तारुण्यात जे पाहिलं, जे आजही त्यांच्या मनात अठवणीच्या रुपानं आहे आणि जे आज उपलब्ध नाही ते द्यायला सुरूवात केली. बहुतेक मालिकांत केंद्रबिंदू असलेलं कुटुंब हे एकत्र कुटुंब असतं. हे कुटुंब सदनिकांमध्ये राहात नाही तर घरात राहतं/ वड्यात राहतं, बंगल्यात राहतं. एक वडीलधारं पात्र. एक अगदी 'माठ' म्हणजे महासोशिक पात्र जे अन्याय आनंदानं सहन करतं, वर सर्वांसाठी मरतं. एक महाकजाग, कारस्थानी पात्र. अधून मधून आग लावायला बाहेरचं पात्र. भरपूर योगायोग. नेमक्या होऊ नयेत त्या वेळी चुकामुकी. एकंदर सतत एखाद्या (प्रेक्षकांना सुरुवातीलाच आवड्लेल्या) पात्राच्या वाट्याला उपहास, अन्याय, दु:ख दाखवणं अत्यावश्यक. एखाद पात्र अन्याय करत राहणारं आणि त्याला कुणाचा प्रतिकार न होणं हेही आवश्यक. या पात्राने भरपूर कारस्थानं करायची आणि ती उघडकीला येणार इतक्यात विलक्षण योगायोगानं ती बचावणं हे पाहिजेच. कुणाच्यातरी विषयी अपार साहनुभुती आणि कुणाच्यातरी विषयी अमाप तिरस्कार आणि निदान पुढच्या भागात तरी चांगल्या पात्राला न्याय मिळेल, दुष्ट पात्राचे कारस्थान उघडकीला येईल किंवा या भागात तरी प्रिय पात्रावरचं संकट टळेल अशी परिस्थिती निर्माण केली जाते. थोडक्यात दर्जा गेल्या खड्ड्यात, पण 'पुढच्या डावात नक्की जिंकु' म्हणुन कफल्लक होइपर्यंत डाव टाकत राहणार्‍या जुगार्‍याप्रमाणे प्रेक्षकांना पुढील भाग पाहायला भाग पाड्णे ज्याला जमेल तो जिंकला. तद्दन भिकार कथानक, बट्बटीत अभिनय करणारी पात्र, दिग्दर्शनाची गरज नाही . अनेक विसंगती ज्या कुणालाही पटत नाहीत, तेच ते पण, या सर्वावर मात करते ते प्रत्येक भागात आवड्त्या पात्रावर येणारे नवे संकट आणि कारस्थानी पात्राचा नवा कावा/ पवित्रा. अभिनयाची गरजच नाही - तांत्रिक बाबी ते सांभाळुन घेतात ( म्हणजे चेहरा गरागरा फिरणं, ओव्हर एक्स्पोज करुन पुन्हा नॉर्मल करणं, जोडीला कर्कश्श पार्श्वसंगीत), दिग्दर्शनाची गरज नाही कारण तमाम प्रेक्षक पुढच्या क्षणी काय होणार हे ओळखून असतात. लेखन म्हणजे बहुधा 'आजचा प्रसंग' एवढेच सांगितले जात असावे - कारण मूळ लेखनात फेरफार केल्याने वा शब्द बदलल्याने काही फरक पडत नाही. एक प्रकारे हे सुलभीकरण आहे. कोणी आला वा गेला म्हणुन काहीही फरक पडत नाही. आता या मालिकांविषयी जरा चांगलं. मालिका भिकार असतात, त्या फारशा पुढे सरकत नाही, तोचतोचपणा असतो हे तर वरदानच आहे. संध्याकाळी मालिका चालु असताना आपापसात गप्पा मारताना याची आडकाठी होत नाही, एखादा दिवस बघितली नाही म्हणुन काही फरक पडत नाही, म्हणजेच दिवसभर विखुरलेलं कुटुंब जेव्हा संध्याकाळी एकत्र येतं तेव्हा सर्वांना एकत्र बसून संभाषण करता येतं. जर मालिका अभ्यासपूर्ण, आशयघनं असत्या तर सगळ्यांना आळीमिळी गुपचिळी बसावं लागलं असतं. आणि घरातले लोक आपापल्या खोलीत आपापला मार्यक्रम लावून बसले असते. मागणी तसा पुरवठा. तुम्ही बघू नका, ते दाखवणं बंद करतील. उगाच चर्चा व्यर्थ आहे.
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर गुरुवार, 11/26/2015 - 09:19 नवीन
छान प्रतिसाद. सर्वसाक्षीजी, आता निसर्ग नियमांनाही डावलून वर्ष-वर्ष गरोदरपणं चालताहेत. (संदर्भ सांगितलाच पाहिजे का?)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्वसाक्षी
म
मितान Sun, 11/22/2015 - 07:57 नवीन
हे काय ! सर अजून शांतच ! उपाय पण नै सांगितले न अभिरुची पण नै !! उत्कंठा तरी किती ताणावी म्हणते मी !
  • Log in or register to post comments
भ
भंकस बाबा Sun, 11/22/2015 - 09:59 नवीन
जरा कुठे समाजाचे प्रबोधन करायला निघालो होतो तर या विघ्नसंतोषी लोक्कानि खोड़ा घातला. आता बघा जान्हवी श्री बरोबर फिरायला गेली आहे. तर किमान त्यांना रायगडावर पाठवायचे मग श्री तिला रायगडाचा इतिहास समजावून सांगतो आहे किंवा टकमक टोकावर उभे राहून ते समुद्रासपाटिपासून अमुक अमुक फुट उंचीवर आहे असे सांगतो असे काहीतरी दाखवले तर कीत्ति कित्ती समाज प्रबोधन होते. श्रीचे बॉलणे संपल्यावर "काहीही हां श्री" हां पेटेंट डायलॉग मारायला आमची ना नव्हती. पण मेल्याना कदरच नाही मुळी. भागेश शू करणी रामदेव बनायला गेलो होतो. आसाराम बनवून टाकला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मितान
ब
बोका-ए-आझम गुरुवार, 11/26/2015 - 10:27 नवीन
मी काय म्हणतो, गरज अजिबात नाहीये पण हा धागा टाकण्याआधी एकदा टेलिव्हिजन मालिकांच्या अर्थकारणाचा अभ्यास केला असतात तर बरं झालं असतं. अर्थात प्रेक्षकांनी तो करण्याची गरज नाही पण त्याच्या अनुषंगाने जर आपण मुद्दे मांडले असते त्याच्यावर एवढा गदारोळ झाला नसता.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 11/26/2015 - 13:58 नवीन
जन हो आपण च्युईंग गम खाल्ले आहे का? सुरुवातीला स्वाद चांगला असतो. बराच वेळ चावले तरी पोटात काहीच जात नाही. थोड्या वेळाने स्वादही राहत नाही. मग आपण काय करतो नवे च्युईंग गम चघळायला घेतो. आणि तीच कहाणी परत चालू होते. हीच परिस्थिती सगळ्या धारा वाहिकांची आहे कोण रे ते म्हणतो आहे? हीच स्थिती काही लोकांच्या धाग्यांची आहे. पुढचा धागा बरा असेल या अपेक्षेने उघडतो आणि पूर्ण वाचतो आणि तीच कहाणी परत चालू होते.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ गुरुवार, 11/26/2015 - 16:57 नवीन
सर्वसाक्षी / परा / पेठकर काका / डॉ. खरे भौ. चला एक मालीका तयार करायला घेवुया. बराच कच्चा माल मिळालाय.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ गुरुवार, 11/26/2015 - 16:59 नवीन
अरे हो विचारायचंच राहिले. कसलंही कथानक नसताना किंवा काहीही पुढे किंवा मागे जात नसतानाही "बिग बॉस" चे टी आर पी का वाढते?
  • Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी गुरुवार, 11/26/2015 - 18:23 नवीन
हि मलिका भयानक आहे Image removed.
  • Log in or register to post comments
अ
अन्नू Fri, 11/27/2015 - 21:34 नवीन
मालिका कि मालिकेची हिरॉईन? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाशकुलकर्णी
ब
बोका-ए-आझम Sat, 11/28/2015 - 07:34 नवीन
त्यांनी मलिका म्हटलंय. मालिका नाही. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्नू
प
पर्ण Fri, 11/27/2015 - 19:35 नवीन
मालिका भयानक आहे... :p
  • Log in or register to post comments
D
DEADPOOL Sat, 11/28/2015 - 15:11 नवीन
मालिकेची मलिका भयानक आहे!
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Sat, 11/28/2015 - 22:15 नवीन
खरोखरच भयानक आहे. वस्तूतः खर्‍या नायिका किंवा त्यासारखे दिसणारे नायक उपलब्द असतांना या बाप्याला सहन करणे म्हणजे आपल्या रात्री खराब करण्यासारखे आहे.
  • Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी Mon, 11/30/2015 - 19:27 नवीन
रमेश भाटकर वेडा झाला हिच्या सौदर्यावर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद
प
पर्ण Wed, 12/02/2015 - 20:38 नवीन
हल्ली झी वरच्या मालिकांचा दर्जा ढासळत आहे... पुन्हा एकदा उंच माझा झोका सारखी ऐतिहासिक मालिका सुरू झाली तर बरं होईल... :D
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा