Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

आज कार्तिकी एकादशी

र
राजेश कुलकर्णी
Sun, 11/22/2015 - 07:14
🗣 103 प्रतिसाद
आज कार्तिकी एकादशी . सकाळपासून प्रह्लाद शिंदे यांची विठ्ठलावरची गाणी रेडिओवर ऐकू आली. त्यावरूनच वाटले की आज एकादशी असेल. एके काळी त्यांची विठ्ठलावरची काही गाणी पाठ होती. १) परवा एके ठिकाणी ‘ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस’ हे वचन पाहण्यात आले. सामान्यपणे ज्ञानेश्वरांचे कार्य तुकारामांच्या काही शतके आधीचे असल्यामुळे तसे म्हटले जात असावे. पण सध्याच्या असहिष्णुतेच्या काळात हे वचन भविष्यात झाकून ठेवावे लागते की काय असे वाटते. कळसापेक्षा पाया मोठा व महत्त्वाचा मानतात, म्हणजे तुम्ही तुकारामांना ज्ञानेश्वरांहून कमी लेखता? असे नाहक वाद निर्माण करणारे हे पाहणार नाहीत की कळस म्हणणे हे काम पूर्णत्वाला नेण्याचे प्रतिक, त्यामुळे त्यात लहानमोठे असा भेद करण्याचे कारण नाही. २) मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास। कठीण वज्रास भेदूं ऐसे। भले तरी देऊ कासेची लंगोटी। नाठाळाचे माथी हाणू काठी। आजच्या काळात कोणाच्या डोक्यात काठी घालणे तसेही बेकायदेशीर आहे. शिवाय कितीही दानशूर असले, मदत करण्याची इच्छा असली तरी स्वतःची लंगोटी काढून देणे हा अतिरेक. परोपकाराची परमावधी समजली तरी. शिवाय दुसऱ्याने तरी ती लंगोटी का व कशी घ्यावी? 'कासेची' ऐवजी मूळ शब्द वेगळाच आहे असे म्हणतात. शिवाय हा व्यवहारीपणा संत लक्षणांमध्ये मोडतो का? मुळात हे असे म्हणणे तुकारामांच्या एकंदर प्रकृतीत बसते का? की ते कोणीतरी घुसडले असावे? तुकाराम तर हे सांगून गेले. पण आजकाल विविध चर्चांमधून दिसणारी आधुनिक विष्णुदासांकडून दिली जाणारी ही धमकी झाली आहे. अगदी काही जातीयवादी व शिवसेनेचे गुंडही त्याचा स्वत:च्या सोयीप्रमाणे सर्रास वापर करताना दिसतात. वर म्हणायला मोकळे, की हे आम्ही म्हणत नाही, तुकारामच सांगून गेले आहेत. तर मग त्या काळातील पद्धतीप्रमाणे यांना हत्तीच्या पायाखाली देणे, कडेलोट करणे, शिरच्छेद करणे अशा शिक्षा द्यायला हव्यात. अर्थात, कोणा संतांनी काही सांगितले तरी त्यातले निवडक काही आपल्या सोयीपुरते उचलणे व वापरणे हे अगदी नाठाळाचेच लक्षण. आता तुकारामांनी नाठाळ कोणाला म्हणावे हे न सांगून आपली पंचाईत केलेली आहे. आपण मात्र आपल्याला कोणाचे काही पटले नाही की त्याला नाठाळ समजून त्याच्या डोक्यात काठी मारायला तयार. किती सोपे. असो.
वर्गीकरण
स्फुट

प्रतिक्रिया द्या
13614 वाचन

💬 प्रतिसाद (103)
ज
जेपी Sun, 11/22/2015 - 07:23 नवीन
मी पयला. अवांतर - आज एकादशी, उद्या द्वादशी,बुधवारी पोर्णिमा,रविवारी चतुर्थी.. इति राकु क्रुत पंचाग संपुर्णमं... काढा वर्गणी आपल ते दक्षिणा..
  • Log in or register to post comments
म
मांत्रिक Sun, 11/22/2015 - 07:43 नवीन
जेपी बुधवारी त्रिपुरी पौर्णिमेचा लेख आहे. तिथल्या पहिल्या सीटचं आताच बुकींग केलंय मी बरंका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
ए
एस Sun, 11/22/2015 - 07:23 नवीन
प्रतिसाद आवडला. कोणत्या धाग्यावर होता?
  • Log in or register to post comments
स
स्पा Sun, 11/22/2015 - 07:24 नवीन
एकदाशीच्या अनेकोत्तम शुभेच्छा !! अवांतर: शिंची कालपासून माझी एरंडेलाची बाटली कुठेशी हरवलिऐ, दिसली का कुणास
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sun, 11/22/2015 - 13:23 नवीन
शिंची कालपासून माझी एरंडेलाची बाटली कुठेशी हरवलिऐ, दिसली का कुणास
.....................................................Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
म
मितान Sun, 11/22/2015 - 07:26 नवीन
जरा ते... रामदासांनी सांगितलेली लक्षणे पहा बरं ! नाठाळ,पढतमूर्ख मूर्ख सगळ्यांची लक्षणे सापडतील. :)
  • Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज Sun, 11/22/2015 - 07:39 नवीन
मस्त!!! पुलेशु
  • Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज Sun, 11/22/2015 - 07:53 नवीन
दोन-चार वेळा बोर्ड रिफ्रेश केला. काही नवीन दिसलं नाही. कृपया लेख लवकर टाका. असं फँन्सना ताटकळत ठेऊ नका! पुढील लेखाच्या प्रतिक्षेत !!! -घंटेश
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज
क
कपिलमुनी Sun, 11/22/2015 - 07:42 नवीन
ओरिजिनल अभंग लिहा , हे मॉडिफाइड आहे
  • Log in or register to post comments
म
मयुरMK Sun, 11/22/2015 - 07:58 नवीन
भले देऊ कासेची लंगोटी नाठाळाच्या देऊ माथी काठी हे तत्त्व ध्यानात घ्या. मदत करा पण त्या अगोदर त्याची लायकी बघा शब्दशा : अर्थ काढून गैरसमज पसरवू नका
  • Log in or register to post comments
र
राजेश कुलकर्णी Sun, 11/22/2015 - 15:42 नवीन
हा तुम्हाला समजलेला अर्थ तुम्ही सांगितला आहे. तो प्रचलित अर्थ नाही. तेव्हा मी गैरसमज पसरवत नाही. पण हरकत नाही. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मयुरMK
स
संदीप डांगे Sun, 11/22/2015 - 10:31 नवीन
पुधचा लेक लोउकर तका
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Sun, 11/22/2015 - 10:46 नवीन
आजच्या काळात कोणाच्या डोक्यात काठी घालणे तसेही बेकायदेशीर आहे. शिवाय कितीही दानशूर असले, मदत करण्याची इच्छा असली तरी स्वतःची लंगोटी काढून देणे हा अतिरेक. परोपकाराची परमावधी समजली तरी. शिवाय दुसऱ्याने तरी ती लंगोटी का व कशी घ्यावी? 'कासेची' ऐवजी मूळ शब्द वेगळाच आहे असे म्हणतात. शिवाय हा व्यवहारीपणा संत लक्षणांमध्ये मोडतो का? मुळात हे असे म्हणणे तुकारामांच्या एकंदर प्रकृतीत बसते का? की ते कोणीतरी घुसडले असावे? मला वाटते उगाच जिलेबी टाकण्यापुर्वी थोड़ा तुकोबांचा अभ्यास केला असता तर बरे झाले असते. केवळ विठुचे नामस्मरण करा असे सांगणारा माणूस नव्हता तो. तर शिवरायांनी सुरु केलेल्या स्वराज्ययज्ञात आहुती द्यावी यासाठी समाजप्रबोधन करणारा सच्चा राष्ट्रसंत होता तो. आणि संतांनी व्यवहारी असू नये असे कुठल्या शास्त्रात लिहीलेय? समर्थ रामदास, संत तुकाराम यांच्यासारखे व्यवहारी संत होते म्हणूनच स्वराज्याला योग्य ती दिशा मिळू शकली हे सर्वविदित आहे.
  • Log in or register to post comments
र
राजेश कुलकर्णी Sun, 11/22/2015 - 15:15 नवीन
"शिवरायांनी सुरु केलेल्या स्वराज्ययज्ञात आहुती द्यावी यासाठी समाजप्रबोधन करणारा सच्चा राष्ट्रसंत होता तो" भलतेच जोडू नका हो. तेव्हा उगाच आवेशाच्या जिलब्या टाकू नका. मूळात जो भाग तुम्ही हायलाइट केला आहेत त्याबद्दल तर तुम्ही तर लिहिलेलेच नाही. तेव्हा पुढे चर्चा करायची असेल तर मला काय येते, तुम्हाला काय येते, वगैरे सोडून व्यवस्थित चर्चा करू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशाल कुलकर्णी
स
सुहास झेले Sun, 11/22/2015 - 16:42 नवीन
आवेशाच्या जिलब्या... खिक्क !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश कुलकर्णी
व
विशाल कुलकर्णी Sun, 11/22/2015 - 17:12 नवीन
जिलब्या तुम्ही टाकताय एकामागुन एक. तुमच्यासारखे तथाकथित विचारवंत तेवढेच करू शकतात. तुकोबांच्या गाथेचा खरेच अभ्यास करा एवढेच म्हणेन, मग नक्कीच बोलुयात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश कुलकर्णी
प
परिकथेतील राजकुमार Sun, 11/22/2015 - 17:16 नवीन
विशालभौ काय लेका तू पण. गीता कुठे वाचावी हे आम्ही तुला सांगायचे होय आता? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशाल कुलकर्णी
व
विशाल कुलकर्णी Sun, 11/22/2015 - 17:20 नवीन
सॉरी शक्तिमान आपलं पराशेट ! पण तुकोबा हां आमचा वीकपॉईंट असल्याने राहवलं नाही :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
व
विशाल कुलकर्णी Sun, 11/22/2015 - 17:18 नवीन
कोटेड मुद्द्यावर भाष्य केले नाही कारण त्याचे उत्तर मयूरMK यांनी दिले होते. गरज प्रचलित अर्थ शोधण्याची नाहीये. कारण तुकोबांचा प्रत्येक अभंग हे एक श्रेष्ठ रूपक आहे, ज्याचा अर्थ तत्कालीन आणि तत्कालिक परिस्थितीनुसार बदलत राहतो. तुकोबांच्या गाथेतून प्रचलित अर्थ शोधताय तिथेच तुमच्याशी चर्चा करण्याची इच्छा संपली माझी. तरीही एकदा पैसाताईच्या सल्ल्यावर विचार करा अशी विनंती करतो .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश कुलकर्णी
न
नाव आडनाव Sun, 11/22/2015 - 10:59 नवीन
राजेश कुलकर्णी सर, तुम्ही रोजच्या दिवसाचं महत्व सांगणारा / माहिती देणारा एक "लेख" लिहिणार का?
  • Log in or register to post comments
इ
इरसाल Sun, 11/22/2015 - 11:10 नवीन
ज्यायला सकाळी चुकुन अंड्याच कालवण खाल्लं !
  • Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु Sun, 11/22/2015 - 11:22 नवीन
शिवाय हा व्यवहारीपणा संत लक्षणांमध्ये मोडतो का? मुळात हे असे म्हणणे तुकारामांच्या एकंदर प्रकृतीत बसते का? की ते कोणीतरी घुसडले असावे? कसंय न साहेब जातीय संघटना किंवा शिवसेना जर तुकोबारायांमागे लपुन त्यांच्या दाखल्यांचा आधार घेऊन दुसऱ्या बाजुला बोल लावत असेल अन दूसरी बाजुही तेच करत असेल जे तुम्हीही करताय तर हा तुकोबांच्या संतपदाचा सर्वोच्च पुरावा असेल म्हणे मी किंबहुना आहेच मी! अन इतकी निर्णायक कॉमेंट करायच्या आधी गाथा किती वेळा पुर्ण कोळून प्यायला आहात ते ही कळू दे जरा साहेब
  • Log in or register to post comments
र
राजेश कुलकर्णी Sun, 11/22/2015 - 15:19 नवीन
निर्णायक वगैरे काही कमेंट नाही. यात जात वगैरे कोठून आली कळले नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
क
कैलासवासी सोन्याबापु Sun, 11/22/2015 - 17:33 नवीन
अगदी काही जातीयवादी व शिवसेनेचे गुंडही त्याचा स्वत:च्या सोयीप्रमाणे सर्रास वापर करताना दिसतात. वर म्हणायला मोकळे, की हे आम्ही म्हणत नाही, तुकारामच सांगून गेले आहेत. तर मग त्या काळातील पद्धतीप्रमाणे यांना हत्तीच्या पायाखाली देणे, कडेलोट करणे, शिरच्छेद करणे अशा शिक्षा द्यायला हव्यात.
ही कोणाची वाक्यं आहेत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश कुलकर्णी
र
राजेश कुलकर्णी Sun, 11/22/2015 - 18:42 नवीन
मी लिहिलेले मला माहित आहे. तुम्ही त्याचा ज्या अर्थाने उल्लेख केलात त्याचा संबंध नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
प
पैसा Sun, 11/22/2015 - 11:30 नवीन
एका काळात बहुसंख्य कुलकर्णी आडनावाचे लोक टीकाकार ऊर्फ समीक्षक असल्यामुळे लेखक लोक कुलकर्णी आडनावाला घाबरत असत. ते का हे आता चांगले कळते आहे. साहेबमजकुरांनी आपली पोस्ट वाचू नका असा सल्ला दिलेला माझ्या दुर्दैवाने अंमलात आणता येत नाही. सर, तुम्ही चांगले लिहू शकता असे वाटते. मात्र एक विनंती आहे. कोणावरही आणि कशावरही टीका न करता निखळ कौतुकाचा एखादा लेख लिहून दाखवा प्लीज! आपल्या आसपास अशा कौतुक करण्यासारखा खूप गोष्टी घडताना दिसतात. त्यासाठी फार शोधावे लागणार नाही. इथे मिपावर पूर्वी एक ज्ञानी सर होते. मात्र ते सतत मीच मोठा शहाणा अशा अभिनिवेशात लिहायचे त्यामुळे एकूण पब्लिकला नकोसे होऊन त्यांचा आयडी हेवनवासी झाला. त्यांची सध्या तीव्रतेने आठवण येत आहे. थोडा अ‍ॅप्रोच बदलून बघता का?
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Sun, 11/22/2015 - 11:45 नवीन
सर, तुम्ही चांगले लिहू शकता असे वाटते. मात्र एक विनंती आहे. कोणावरही आणि कशावरही टीका न करता निखळ कौतुकाचा एखादा लेख लिहून दाखवा प्लीज! बैलाचा डोळा ! (म्हंजी सुद्द म्हराटीत बुल्स आय बरका)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
र
राजेश कुलकर्णी Sun, 11/22/2015 - 15:27 नवीन
तुम्ही तुमचे नाव सांगत नसताना दुस-याचे नाव दिसते म्हणून त्यावरून फुकट कमेंट करणे आधी थांबवा. त्याचप्रमाणे हे फुकटचे उपदेश थांबवा. गरज असेल त्यावेळी मागेन मी. कोणा ज्ञानी माणसाने कधी काय केले, त्यांचे कोणी काय केले वा त्यांचे काय झाले त्याच्याशी मला घेणेदेणे नाही. निरोप व्यवस्थित पोहोचला असेल अशी अपेक्षा करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
अ
अजया Sun, 11/22/2015 - 15:54 नवीन
आता तुकारामांनी नाठाळ कोणाला म्हणावे हे न सांगून आपली पंचाईत केलेली आहे. आपण मात्र आपल्याला कोणाचे काही पटले नाही की त्याला नाठाळ समजून त्याच्या डोक्यात काठी मारायला तयार. किती सोपे. असो.
किती खरं लिहिता तुम्ही!तुमचा लेख तुम्ही वाचता ना ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश कुलकर्णी
र
रुस्तम Sun, 11/22/2015 - 16:36 नवीन
तुमचा लेख तुम्ही वाचता ना ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
र
राजेश कुलकर्णी Sun, 11/22/2015 - 19:32 नवीन
तुम्ही तर बरेच लेखन केले असेल. तुमच्याप्रमाणेच स्वत:चा लेख वाचण्याबद्दल मीही करतो असे समजा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
प
पैसा Sun, 11/22/2015 - 16:53 नवीन
चालू द्या तुमचं. हा तुमचा ब्लॉग नसल्याने अजून बरेच फुकटचे उपदेश येतील बरं का! तयार रहा. तुमचा जिल्बीचा घाणा चालू ठेवा. आम्ही आमचे काम करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश कुलकर्णी
म
मांत्रिक Sun, 11/22/2015 - 16:55 नवीन
हे हे हे! त्यांचा जिलबी घाणा काही थांबायची चिह्ने नाहीत. करु देत त्यांना निरर्थक अत्मचिंतन!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
र
राजेश कुलकर्णी Sun, 11/22/2015 - 19:24 नवीन
तुम्ही संपादक मंडळापैकी आहात. तरी सदस्यांच्या कमेंट्सना जिलबीचा घाणा वगैरे म्हणू नये, फुकटचे उपदेश येतील वगैरे म्हणू नये, म्हणजे थोडक्यात नि:पक्षपाती रहावे एवढे तरी भान असावे हि अपेक्षा रास्त आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा Mon, 11/23/2015 - 03:44 नवीन
सगळे मिपाकर असेच दुत्त आहेत. जिलबी हा आमचा आवडता राष्ट्रीय पदार्थ आहे. आमचा एक छोटासा संपादक मित्र तर वेरूळच्या लेण्यांवर अप्रतिम लेख लिहितो आणि जिल्बी टाकलीय म्हणून येऊन सांगतो! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश कुलकर्णी
व
विशाल कुलकर्णी Sun, 11/22/2015 - 17:28 नवीन
कुलकर्णी, एखाद्या व्यक्त्तिवर तुम्ही तुमचे नाव सांगत नाही हां आरोप करण्यापूर्वी त्या व्यक्तीबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करावा लागतो. त्यासाठी दुसऱ्याचे लेखनही वाचावे लागते, त्यांच्याशी तिथेही चर्चा करावी लागते. मिपावरील एकातरी लेखावर तुमचा प्रतिसाद आहे का? एकातरी धाग्यावरील चर्चेत तुमचा सहभाग आहे का? राहता राहिला पैसाताईचा प्रश्न तर तिला इथे सगळेजण नावाने ओळखतात, इतर धाग्यावर इतरांशी मिसळलात, बोललात तर तुम्हीही सर्वांना ओळखायला लागाल. बादवे पैसाताई मिपाच्या माननीय आणि क्रियाशील संपादक आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश कुलकर्णी
र
राजेश कुलकर्णी Sun, 11/22/2015 - 18:32 नवीन
माहितीबद्दल धन्यवाद. त्यांची आधीची प्रतिक्रिया ही जशी वाटली त्याप्रमाणे मी उत्तर दिले. प्रत्येकवेळी सभासद कोण आहे वगैरे इतिहास पाहणे शक्य नाही, कोण माननीय अाहे की खरोखरच टवाळखोर आहे हे पाहणेही शक्य होणार नाही. एक मात्र नक्की, की माझ्या मनात कोणाबद्दलही काही किंतु नाही. त्या संपादकांपैकी अाहेत याचा तुम्ही उल्लेख केलात म्हणून सांगतो, येथे मला सकारात्मक प्रतिक्रियांपेक्षा उपदेशात्मक व टवाळखोर प्रतिक्रिया अधिक मिळत आहेत. एक प्रकारची हरॅसमेंट चालू आहे. मी त्याला घाबरतो अशातला भाग नाही. पण ती इथली परंपरा दिसते. एकवेळ उपदेशाकडे मी फेसव्हॅल्युप्रमाणे काय करायचे ते ठरवू शकतो. मात्र टवाळखोर माझ्या पोस्टची मिसळपाववरील जागा अक्षसश: घाण करत आहेत आणि मला ते आवडत नाही. मी येथे नवीन असल्यामुळे माझी येथे कोणाशी ओळखही नाही. त्यामुळे त्यांच्या सार्कॅस्टिक कमेंट्समला ाजिबात रूचणा-या नाहीत. येथे माझी पोस्ट असेल तर मलानको असलेल्या अशा टवाळखोरांच्या कमेंट्स काढून टाकण्याची सोय नाही, त्यांना ब्लॉक करण्याचीही सोय नाही. त्याबद्दलही मी संपादकमंडळाला लिहिलेले अाहे. माझी कालची एक पोस्ट, फुसके बार सदरातील जवळजवळ सा-याच पोस्ट्स दिसत नाहीत. एका पोस्टमध्ये आधुनिक शूद्र हा शब्द वापरल्यामुळे एका महाभागाने ऍट्रॉसिटीचा उल्लेख केल्याकेल्या ती पोस्टच काढून टाकण्यात आली. याबाबतीत मला न कळवता असे करणारे संपादकमंडळ मी याबाबतीत केलेल्या प्ृच्छेला उत्तर देत नाही. ते बांधील नसतीलही. पण हे जे चालले आहे ते अजिबात योग्य नाही. असो. मी येथे फार काळ राहू नये अशी संपादक मंडळाचीही इच्छा दिसते. पोस्ट्स गायब करणे, व त्याबद्दल आपला एकतर्फी हक्क गाजवत काहीही उत्तर न देणे हा अगदी सोपा उपाय आहे. त्यामुळे मला कटवण्यात ते व टवाळखोर नक्कीच यशस्वी होतील. कधी ते पाहू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशाल कुलकर्णी
अ
अभ्या.. Sun, 11/22/2015 - 18:37 नवीन
अगदी खरय कुलकर्णी साहेब. तुमच्या सगळ्या पोस्टंना मी अगदी इमानदारीने पहिल्या नंबराने प्रतिसाद दिला होता. जरा घाई झाली पण दिला होता. माझे पण सगळे प्रतिसाद उडवले हो. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश कुलकर्णी
प
पैसा Sun, 11/22/2015 - 18:48 नवीन
http://www.misalpav.com/comment/774012#comment-774012 अशा प्रश्नांसाठी हे खास धागे आहेत. तिथे लिहीत चला. बाकी धागे लिहिण्यापूर्वी मिपाचे धोरण वाचले असते आणि इतर धागे, प्रतिक्रिया यांचा अभ्यास केला असतात तर तुमचा आणि आमचा त्रास वाचला असता. मिपा हे संस्थळ आहे. ते ब्लॉगपेक्षा वेगळ्या प्रकाराने चालते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश कुलकर्णी
र
राजेश कुलकर्णी Sun, 11/22/2015 - 19:21 नवीन
मला पोर्टल व ब्लॉगमधला फरक माहित आहे. फुसके बार हे सदर तुम्ही म्हणता त्या जागेसाठी सोयीचे नाही. मी ते जेथे टाकतो, ते तेथेच योग्य आहे. त्यात साधारणपणे सात-आठ बुलेट्स असतात. त्यातल्या ब-याच बुलेट्स जर काथ्याकूट सदराखाली वेगवेगळ्या टाकल्या तर तेथे खूप गर्दी होईल. त्यामुळे त्या एकत्रित स्वरूपातच पण काथ्याकूट सदराखालीच असणे आवश्यक आहे. तेदेखील तुमच्याकडे स्फुट नावाचा वेगळा विभाग नाही म्हणून. अन्यथा ते तेथे अगदी चपखल बसले असते. तरी या पोस्ट्स यापुढे न उडवता काथ्याकूतखालीच राहू द्याव्यात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
ज
जव्हेरगंज Sun, 11/22/2015 - 18:54 नवीन
मी येथे फार काळ राहू नये अशी संपादक मंडळाचीही इच्छा दिसते.>>>>>> असं तुम्हाला का वाटतयं? यामागच्या कारणांचाही विचार होऊ द्या!!! """""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""" निवडक http://phuphata.blogspot.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश कुलकर्णी
व
विशाल कुलकर्णी Mon, 11/23/2015 - 03:36 नवीन
मी येथे नवीन असल्यामुळे माझी येथे कोणाशी ओळखही नाही. त्यामुळे त्यांच्या सार्कॅस्टिक कमेंट्समला ाजिबात रूचणा-या नाहीत. येथे माझी पोस्ट असेल तर मलानको असलेल्या अशा टवाळखोरांच्या कमेंट्स काढून टाकण्याची सोय नाही, त्यांना ब्लॉक करण्याचीही सोय नाही. त्याबद्दलही मी संपादकमंडळाला लिहिलेले अाहे. हे मिपा आहे कुलकर्णीसाहेब. त्याचे काही नियम आहेत तसेच काही पॉलिसीज आहेत. ज्या पद्धतीने तुमचे द्वेषमुलक लेखन इथे चालवुन घेतले जातेय त्याच पद्धतीने टवाळखोरीसुद्धा. आणि काय चुकीचे सांगितले हो पैसाताईने. थोड़ा अप्रौच बदलून बघा इतकेच सांगितलेय ना? आणि महत्वाचे म्हणजे तुम्हाला किंवा मला काय आवडते.. त्यावर मिपाचे धोरण ठरत नाही. मिपाच्या जागेची नासाडी होतच असेल तर त्याला कारणीभूत फक्त प्रतिसादक नाहीत, तुम्हीही तितकेच जबाबदार आहात हे लक्षात घ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश कुलकर्णी
र
राजेश कुलकर्णी Mon, 11/23/2015 - 04:41 नवीन
माझे लिखाण द्वेषमूलक अाहे अाहे हा तुमचा समज क्ृपया तुमच्याजवळच ठेवा. त्यात काय द्वेषमूलक अाहे हे सांगितले असतेत तर अधिक योग्य झाले असते. तुमचा वीक पॉइंट काय आहे हे तुम्ही सांगितलेच आहे. तेव्हा त्याबद्दल काही लिहिलेले तुम्हाला काही आवडले नाही की लगेच ते द्वेषमूलक ही तुमची कल्पना निव्वळ हास्यास्पद आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशाल कुलकर्णी
व
विशाल कुलकर्णी Mon, 11/23/2015 - 06:46 नवीन
तुमच्या सर्व धाग्यावर आलेल्या प्रतिसादातून आतापर्यंत हे लक्षात यायला हवे होते की तुम्ही जे लिहिताय ते न आवडणारा मी एकटाच नाहीये, रादर ते आवडणारा कुणी एखादाच असण्याची जास्त शक्यता आहे. या उप्परही मी म्हणतो तेच खरे असे म्हणायचे असेल तर पुन्हा एकदा तटस्थपणे स्वत:चेच इथले लेखन एकदा वाचून पाहा. ही माझी तुमच्या लेखनावरची शेवटची पोस्ट. पुलेशु नाही म्हणणार कारण मिपावरचे माझे कंपुबाज दोस्त मलाच कोपच्यात घेवून मारतील. तरीही शुभेच्छा !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश कुलकर्णी
P
pacificready Mon, 11/23/2015 - 06:58 नवीन
शूद्र म्हणजे क्षुद्र म्हणजे थर्ड क्लास हे गृहीतक आणि तसं विधान द्वेषमूलक नाही का? हेतू तसा नाही हे मान्य केल्यास मराठी संस्कृत चा अभ्यास वाढवावा लागेल ना? शब्द हुकलेत अगदीच मग. अभ्यास करुन जमेल तुम्हाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश कुलकर्णी
भ
भंकस बाबा Sun, 11/22/2015 - 11:47 नवीन
मराठी वाक्प्रचार कसे अस्तित्वात आले ते! भटाला दिली ओसरि..... लोकां सांगे ब्रम्हज्ञान... रिकाम्या..... मूर्खा मूर्खा पाय भरशील, भुरका.... च्यामारि एक नवीन धागा बनतो की राव! कशाचि वाट बगताय? व्हा पुढे, आम्ही आहोत
  • Log in or register to post comments
भ
भंकस बाबा Sun, 11/22/2015 - 11:49 नवीन
ते गेंड्याची कातडि कशाला वो म्हणतात?
  • Log in or register to post comments
प
पगला गजोधर Sun, 11/22/2015 - 12:33 नवीन
रा कु सर, तुम्ही टीकाकारांकडे सपशेल दुर्लक्ष करा. तुम्हाला वाटतंय न धागा काढावा, तर लगेच काढा. तुमच्यावर टीका करणारे जणू स्वतः गाथा कोळून प्यायलेत जणू. तुम्हाला शिकवायला बघणाऱ्या लोकांना रजनीकांत चा डायलॉग मारा 'सुअर तो झुंड में हमाला करते है, लेकिन शेर अकेला आता हैं'.
  • Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु Sun, 11/22/2015 - 13:24 नवीन
असोच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
अ
अजया Sun, 11/22/2015 - 13:22 नवीन
अावरा.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा