Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

आज कार्तिकी एकादशी

र
राजेश कुलकर्णी
Sun, 11/22/2015 - 07:14
🗣 103 प्रतिसाद
आज कार्तिकी एकादशी . सकाळपासून प्रह्लाद शिंदे यांची विठ्ठलावरची गाणी रेडिओवर ऐकू आली. त्यावरूनच वाटले की आज एकादशी असेल. एके काळी त्यांची विठ्ठलावरची काही गाणी पाठ होती. १) परवा एके ठिकाणी ‘ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस’ हे वचन पाहण्यात आले. सामान्यपणे ज्ञानेश्वरांचे कार्य तुकारामांच्या काही शतके आधीचे असल्यामुळे तसे म्हटले जात असावे. पण सध्याच्या असहिष्णुतेच्या काळात हे वचन भविष्यात झाकून ठेवावे लागते की काय असे वाटते. कळसापेक्षा पाया मोठा व महत्त्वाचा मानतात, म्हणजे तुम्ही तुकारामांना ज्ञानेश्वरांहून कमी लेखता? असे नाहक वाद निर्माण करणारे हे पाहणार नाहीत की कळस म्हणणे हे काम पूर्णत्वाला नेण्याचे प्रतिक, त्यामुळे त्यात लहानमोठे असा भेद करण्याचे कारण नाही. २) मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास। कठीण वज्रास भेदूं ऐसे। भले तरी देऊ कासेची लंगोटी। नाठाळाचे माथी हाणू काठी। आजच्या काळात कोणाच्या डोक्यात काठी घालणे तसेही बेकायदेशीर आहे. शिवाय कितीही दानशूर असले, मदत करण्याची इच्छा असली तरी स्वतःची लंगोटी काढून देणे हा अतिरेक. परोपकाराची परमावधी समजली तरी. शिवाय दुसऱ्याने तरी ती लंगोटी का व कशी घ्यावी? 'कासेची' ऐवजी मूळ शब्द वेगळाच आहे असे म्हणतात. शिवाय हा व्यवहारीपणा संत लक्षणांमध्ये मोडतो का? मुळात हे असे म्हणणे तुकारामांच्या एकंदर प्रकृतीत बसते का? की ते कोणीतरी घुसडले असावे? तुकाराम तर हे सांगून गेले. पण आजकाल विविध चर्चांमधून दिसणारी आधुनिक विष्णुदासांकडून दिली जाणारी ही धमकी झाली आहे. अगदी काही जातीयवादी व शिवसेनेचे गुंडही त्याचा स्वत:च्या सोयीप्रमाणे सर्रास वापर करताना दिसतात. वर म्हणायला मोकळे, की हे आम्ही म्हणत नाही, तुकारामच सांगून गेले आहेत. तर मग त्या काळातील पद्धतीप्रमाणे यांना हत्तीच्या पायाखाली देणे, कडेलोट करणे, शिरच्छेद करणे अशा शिक्षा द्यायला हव्यात. अर्थात, कोणा संतांनी काही सांगितले तरी त्यातले निवडक काही आपल्या सोयीपुरते उचलणे व वापरणे हे अगदी नाठाळाचेच लक्षण. आता तुकारामांनी नाठाळ कोणाला म्हणावे हे न सांगून आपली पंचाईत केलेली आहे. आपण मात्र आपल्याला कोणाचे काही पटले नाही की त्याला नाठाळ समजून त्याच्या डोक्यात काठी मारायला तयार. किती सोपे. असो.
वर्गीकरण
स्फुट

प्रतिक्रिया द्या
13614 वाचन

💬 प्रतिसाद (103)
अ
अत्रुप्त आत्मा Sun, 11/22/2015 - 13:28 नवीन
तांब्या भरा राजी ....... तांब्या भरा राजी टाका जिल्बी ताजी...तुम्मी टाका जिल्बी ताजी.. Image removed.
  • Log in or register to post comments
अ
अजया Sun, 11/22/2015 - 15:51 नवीन
पु जि शु.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
प
प्रमोद देर्देकर Mon, 11/23/2015 - 06:18 नवीन
बघा राकु तुम्हाला आमच्या "तांब्याधीपतींकडुन" आशिर्वाद मिळालाय. आता मागे पाहु नका. जेवढ्या पाहिजे तेव्हढ्या जिलब्या पाडा. राकुनी पाडल्या जिलब्या आम्ही नाही पाहिल्या, पोट बिघडले, जिल्ब्या खावुन, सगळे वाचक गेले वाहुन, मट्ठ्याने पोट फुगले, राकु अमचे रुसले. राकु म्हणे संपा या हो धावुन, प्रतिसादाने मी गेलोय छळुन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
व
विवेकपटाईत Sun, 11/22/2015 - 14:14 नवीन
संत म्हणजे केवळ प्रवचन करणारे, अशी भ्रांती पसरलेली आहे. संत हा अन्यायाचा विरुद्ध आवाज हि उठवितो. हि बाजू लक्ष्यात घेतली पाहिजे. बाकी आज कार्तिक एकादशी, बटाट्याची भजी, साबूदाण्याची उसळ , शेंगदाण्याची आमटी, भगर, या शिवाय सकाळी दूध, एक संत्र, एक सेब आणि काही सुखा मेवा. आता रात्री काय मिळणार त्याची वाट पाहतो आहे. बहुतेक उद्या खरा उपवास करावा लागेल. असो.
  • Log in or register to post comments
ह
हेमन्त वाघे Sun, 11/22/2015 - 15:17 नवीन
हे संशोधन आपण पहिले का? http://www.misalpav.com/node/३०२६५ पण आज दरी दय आहे आणि घरात व्होडका आणि बीअर नाही . पण ओल्ड मंक आहे . तरी नावात मंक असल्याने ती चालेल का ? तसेच आज दुपारी कोंबडी खाल्याने मी भ्रष्ट झालो आहे च .. राजेश कुलकर्णी, आपले मत काय ? मी हिंदू आहे असे मला वाटते ...
  • Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज Sun, 11/22/2015 - 15:34 नवीन
बाकी तेल चांगलं पडत आहे!!! """""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""" निवडक phuphata.blogspot.com
  • Log in or register to post comments
च
चाणक्य Sun, 11/22/2015 - 16:02 नवीन
पण चर्चेचा विषय काय आहे? मला कळला नाही.
  • Log in or register to post comments
न
नाखु Mon, 11/23/2015 - 05:53 नवीन
अगदी रंगाचा बेरंग केला तू/तुम्ही असं विचारून !!!! आकाशातला बाप्पा कद्धीद्धी माफ करणार नाही अश्यानं !! पिटातला प्रेक्षक नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चाणक्य
च
चाणक्य Mon, 11/23/2015 - 07:55 नवीन
आणि हो.....'तू' बरोबर आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
च
चाणक्य Mon, 11/23/2015 - 07:55 नवीन
आणि हो.....'तू' बरोबर आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 11/22/2015 - 16:09 नवीन
लिहित राहा ! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज Sun, 11/22/2015 - 16:54 नवीन
हेच म्हणतो!! चार जिलब्यांची अॉर्डर दिली होती!! दोनच आल्यात!! """""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""" निवडक http://phuphata.blogspot.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
र
राजेश कुलकर्णी Sun, 11/22/2015 - 19:05 नवीन
धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
प्रभाकर पेठकर Mon, 11/23/2015 - 08:52 नवीन
बिरुटे सर गेटच्या बाहेर भेटा. (चर्चा करायची आहे.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
परिकथेतील राजकुमार Sun, 11/22/2015 - 16:59 नवीन
आला गं बाई आला गं... आला आला आला... माझ्या राकुंचा लेख हो आला. राकु राकु राकु.... राकु म्हणजे मिपावरचे ज्ञानदेव __/\__ राकु प्लिज प्लिज प्लिज पुढचा लेख (म्हणजे आता पुढच्या तासाला जे लिखाण कराल ते) प्लिज 'निर्लज्जम सदासुखी' किंवा 'मुर्खांची लक्षणे' ह्यावरती करा ना. :) आणि हो, आय लौ यू.
  • Log in or register to post comments
प
पैसा Sun, 11/22/2015 - 17:04 नवीन
काहीही हं प! त्यांच्या आयडीमधे राकु, तुझ्या आयडीमधे राकु, म्हणून ते लौ यू का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
प
परिकथेतील राजकुमार Sun, 11/22/2015 - 17:09 नवीन
काहीही हं प! त्यांच्या आयडीमधे राकु, तुझ्या आयडीमधे राकु, म्हणून ते लौ यू का?
तसे नै कै तै. हे म्हणजे शिष्याचे गुरुवरचे प्रेम. मी रेडा ते ज्ञानदेव मी चिखलू ते भूत्या मी शागिर्द ते नाना मी सुरेश ते शरद मी देवेंद्र ते नरेंद्र मी टायगर ते सलमान मी बिका ते लादेन पळा आता......
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा Sun, 11/22/2015 - 17:12 नवीन
मी बिका ते लादेन
=)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
म
मितान Mon, 11/23/2015 - 00:20 नवीन
अरे देवा ! प रा ! तब्येतीची अशी हेळसांड करू नको रे बाबा ! तरी सांगत होती न आई..जिलब्या कमी खा म्हणून !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
अ
अत्रुप्त आत्मा Sun, 11/22/2015 - 20:26 नवीन
@राकु राकु राकु.... राकु म्हणजे मिपावरचे ज्ञानदेव >> आंSSSSSssss :-/ llllllluuuuu :-/ त्यांना राकू नै... राजि म्हणाचं!!! :-/ जसे एक ते मोजी,तसे हे एक राजी जे टाकतात जिल्बि ताज़ी! टुर्रर्ररर्र्रर्रर्रर्र!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
भ
भाऊंचे भाऊ Sun, 11/22/2015 - 17:06 नवीन
लेखकसाहेब तुमच्यात मिपा गाजवायचं जबरदस्त पॉटेन्शीअल हाये. फक्त... तुम्ही स्वतःला बदलले पाहिजे, तुमीच्य हो तुमारे जिवन का शिल्पकार. काळ काम आणी वेग याच सुत्र जर तुमी शिकाल तर उतक्रुश्ट मिपासदस्य वाल. असो, नुसतेच कौतुक करणे योग्य नाही काही खड्डे बोलही सुनायला हवेतच नाही तर पोरं शेफारुन जायची भिती असते. तर जरा कठोर होउन इतकेच सुनावेन की शान्या मानसा परमानं लिवायला शिका की राव, का उगा ब्वॉर करालाय ?
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sun, 11/22/2015 - 17:18 नवीन
भंडारा डोंगरावर कट्टा झालाच पाहिजेल. हेल्मेट सक्तीचे आहे.नाठाळ समजून माथ्यावर काठी पडू शकते.सर्व जबाबदाय्रांतून आयोजक मुक्त आहेत. देहूच्या पुढे इक्सप्रेसवे झालाच पाहिजे.
  • Log in or register to post comments
ज
जेपी Sun, 11/22/2015 - 17:29 नवीन
हाफशेंच्युरी निमीत्त श्री.राकुचां सत्कार पुढील आषाढी एकादशी निमीत्त पंढरपुरचा विशेष दर्शन पास देऊन करण्यात येत आहे. शुभेच्छुक- जेपी आणी तमाम 'वार'करी कार्तकर्ते.
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Sun, 11/22/2015 - 17:38 नवीन
हाफशेंच्युरी निमीत्त श्री.राकुचां सत्कार पुढील आषाढी एकादशी निमीत्त पंढरपुरचा विशेष दर्शन पास देऊन करण्यात येत आहे.
अहो खुद्द तेहतीस कोटी ज्यांच्या दर्शनाला ताटकळत असतात त्यांना कसले विशेष दर्शन घडवताय? डोंबलाचे? राकु माझा 'लेखु'रवाळा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
म
मांत्रिक Sun, 11/22/2015 - 18:03 नवीन
कहर आहेस पराण्णा!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
अ
अजया Sun, 11/22/2015 - 18:48 नवीन
=))=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मांत्रिक
स
संदीप डांगे Mon, 11/23/2015 - 05:01 नवीन
विशेष पास दर्शन ला घाईघाईत चुकून विषप्राशन वाचले, म्हटले जेपीची संपादकिय कार्किर्द सुरू झाली का का...?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
भ
भंकस बाबा Sun, 11/22/2015 - 18:14 नवीन
प्रतिसाद लवकर द्या, मंजी सेंचुरी जाली की अजुन लाइनीत उभे असलेले एकनाथ, सावता माळी, बहिणाबाई, रवीन्द्रनाथ टागोर, जनार्दन डम्बवनेकर उर्फ़ जमदग्नि(भुरंडीवाडी बुद्रुक) यांचा नंबर आहे. जमदग्नि यांचे "मी सूर्याला गिळून टाकले" हां काव्यसग्रह लई फेमस हाई. कापी पाहिजे असल्यास भेटावे. ते राकुचे सांगू नका आम्हाले, त्याच्याकडे समद हाय ०
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Sun, 11/22/2015 - 19:37 नवीन
एकादशीनिमित्त मटण खायचे सोडून लेख काय पाडताय राकुशेठ? एकादशीला मटण खाल्ल्याने निधर्मधर्म पाळला जातो हे माहिती नाही काय?
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sun, 11/22/2015 - 20:29 नवीन
आहो,पण टनाटनी असतील..तर कस खाणार चार चौघात मटण?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
म
मोदक Sun, 11/22/2015 - 21:12 नवीन
पण सध्याच्या असहिष्णुतेच्या काळात ओक्के... म्हणजे तुम्हाला पण अखिलयुवारत्न राहुल गांधी पंप्र हवे आहेत म्हणून इतका खटाटोप सुरू आहे का?
  • Log in or register to post comments
अ
अरुण मनोहर Sun, 11/22/2015 - 23:43 नवीन
अरे ते टा.कु. च्या पुष्प - कुंडीत टाकण्या ऐवजी इथे मुद्दाम कचरा कुंडी दिलीय, तेथे टाका ना? लोक पण काय नै ! कळतच नाई ! http://www.misalpav.com/node/33793
  • Log in or register to post comments
ज
जेपी Mon, 11/23/2015 - 04:58 नवीन
मिपावर एक नवी फॅशन आली आहे. आधी फालतु लेख टाकायचे ,त्यावर तशाच प्रतिक्रीया आल्या की,मिपा टवाळखोरांचा अड्डा आहे.अश्या शिव्या घालत निघुन जायच. राकु तुम्ही पण फॅशनेबल आहात का ?
  • Log in or register to post comments
म
मृत्युन्जय Mon, 11/23/2015 - 05:46 नवीन
लेख समजला पटला असे काही म्हणवत नाही. पण असो. सर्वांना वेगळी मते ठेवायचा अधिकार आहे आणी त्याचा मी आदरच करतो. आनंद एवढाच की पुर्वी संक्षीचे धागे वाचुन काहिच कळायचे नाही. आता काय लिहिले आहे ते तरी कळते आहे किमान. पुलेशु लिहायची खूप इच्छा होती पण तुम्हाला त्याची गरज आहे असे वाटत नाही. तुम्ही कुणाच्याही विरोधाला न जुमानता लेख पाडत राहणार याची खात्री आहे.
  • Log in or register to post comments
व
विवेक ठाकूर Mon, 11/23/2015 - 08:53 नवीन
सदर लेखकाची तुलना संक्षींशी होऊच शकत नाही. वर देखील एका सदस्येनं संक्षींचा अपरोक्ष उल्लेख केलायं. चाकोरीबद्ध जगणार्‍या सदस्यांची स्वच्छंद जगणार्‍या बद्दलची आसूया आणि इथली कंपूबाजी हे माझ्या मते तो आयडी ब्लॉक होण्याचं खरं कारण आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
स
सुबोध खरे Mon, 11/23/2015 - 06:58 नवीन
सुरुवातीला कुलकर्णी विरुद्ध कुलकर्णी विरुद्ध कुलकर्णी असा तिरंगी सामना चालला होता. ते वाचताना गोंधळ झाला. कोणते कुलकर्णी कोणत्या कुलकर्ण्यांची चंपी करताहेत ते समजत नव्हते नंतर इतर जण कोणत्या कुलकर्ण्यांची? जाऊ द्या उगाच डोक्याला शॉट. तेंव्हा कुलकर्णी साहेब( सर्व कुलकर्णी यांना ) तुम्ही लिहित राहा/ टीका करीत राहा/ जिलब्या पाडीत राहा.
  • Log in or register to post comments
P
pacificready Mon, 11/23/2015 - 07:02 नवीन
प्रतिसाद आवडला नाही. - फिका
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
न
नाखु Mon, 11/23/2015 - 07:04 नवीन
उप प्रतीसाद सम्जला नाही. ===घट्टमण (प्यारभौंचा पंखा)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: pacificready
P
pacificready Mon, 11/23/2015 - 07:57 नवीन
मिपा वर फ़क्त दोनएकशे कुलकर्णी असताना कुलकर्णी लोकांना टारगेट केलं गेलं म्हणून....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
न
नीलमोहर Mon, 11/23/2015 - 07:19 नवीन
प्रतिसाद खूप आवडला. - टिका
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
ब
बॅटमॅन Mon, 11/23/2015 - 07:44 नवीन
असेच म्हणतो. कौन कुलकर्णी क्या बोलरा वहीच कळेना....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
प
प्रभाकर पेठकर Mon, 11/23/2015 - 08:57 नवीन
डॉक्टर साहेब, कुलकर्णी विरुद्ध कुलकर्णी विरुद्ध कुलकर्णी असा तिरंगी सामना चालला होता. ते वाचताना गोंधळ झाला. कोणते कुलकर्णी कोणत्या कुलकर्ण्यांची चंपी करताहेत ते समजत नव्हते ही, इंद्राणी मुखर्जीपेक्षाही, खतरनाक समस्या आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Mon, 11/23/2015 - 07:03 नवीन
तुम्ही कुलकर्णी आहात काय? आय माय स्वारी बर्का
  • Log in or register to post comments
प
प्रसाद१९७१ Mon, 11/23/2015 - 07:26 नवीन
डॉक्टर साहेबांना पण खाली उतरवलेत तुम्ही राकु साहेब. असे प्रतिसाद कधी बघितले नव्हते त्यांच्याकडुन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सतिश पाटील Mon, 11/23/2015 - 07:48 नवीन
हागणदारीमुक्त गाव आणि राकू मुक्त मिसळपाव..
  • Log in or register to post comments
प
पगला गजोधर Mon, 11/23/2015 - 07:51 नवीन
हागणदरी आणि मिसळपाव यांचा एकत्र उल्लेख पाहून, मला एक मिपाकर म्हणून शरम वै …….
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश पाटील
व
विशाल कुलकर्णी Mon, 11/23/2015 - 08:01 नवीन
तो प्रतिसाद नीट वाचा गजोधर मिसळपावची तुलना गावाशी केली आहे. ते चष्म्याचा नंबर ज़रा चेक करून घ्या बघू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
प
पगला गजोधर Mon, 11/23/2015 - 08:09 नवीन
चिडु नका असे
हागणदरी आणि मिसळपाव यांचा एकत्र उल्लेख पाहून
असे आहे. 'तुलना केलिय' असे लिहिलेले नाहि.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशाल कुलकर्णी
ज
जेपी Mon, 11/23/2015 - 07:59 नवीन
शंभर
  • Log in or register to post comments
न
नाखु Mon, 11/23/2015 - 08:20 नवीन
ही घे सत्काराची वस्तू अगदी फिल्मसहीत.यथोचीत सत्कार वस्तू तुला थोडा वेळासाठी साधू बनावे लागेल प्लीज नाही म्हणू नको सदस्य सत्कार समीती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा