शेअर बाजार – काही IPO कथा
लेखक माल्कम ग्लॅड्वेल यांनी आपल्या 'Outliers' नावाच्या पुस्तकांत '10,000 hours rule' अशी एक संकल्पना मांडली, ज्यानुसार एखाद्याने कोणत्याही गोष्टीकरिता आपले 10,000 तास खर्च केल्याशिवाय त्याला त्या गोष्टीत प्राविण्य मिळत नाही.....या न्यायाने तर मी एव्हाना बाजाराविषयक सर्वज्ञच असावयास हवे, पण ..... मात्र एवढे खरे, की कोणास ज्ञान देणे वा 'यशोकथा' सांगणे नाही, पण उपयुक्त ठरावे असे काही अनुभव सांगण्याची माझी पात्रता असावी असे मी मानतो, आणि प्रसंग व्यक्तीगत स्वरुपाचे आहेत हे मान्य करुनही, त्यातील तर्क महत्वाचे व आजही लागु असल्याने येथे ते देण्याचे धाडस करतो आहे
सन 1991 मधे महाविद्यालयीन शिक्षणाचे निमित्ताने मुंबईत गेल्यावर माझा या जादुई अर्थविश्वाशी संबंध आला. बाजारांत दररोज उलाढाली करणारा सकाळच्या 9.01 च्या फास्ट गोरेगांव लोकल मधील एक समवयस्क गुजराथी तरुणांचा ग्रुप...त्यांच्या मुळे खरे तर मी या वाटेकडे आकर्षित झालो. अर्थात वातावणांत हर्षद मेहता नावाची तगडी चुंबकीय शक्तीही होतीच. मनाचा हिय्या करुन एके दिवशी जीजीभॉय टॉवर्सच्या लिफ्ट्मध्ये शिरलो तेंव्हा 13व्या मजल्याच्या क्रमांकाऐवजी फक्त '--'असे लिहिलेले, ही त्या गर्दीमध्येही मनांत नोंदली गेलेली पहिली गोष्ट.!! पुढे प्रामुख्याने BSES(आत्ताची रिलायन्स इन्फ्रा),SBI, बिनानी झिंक अशा शेअर्सच्या नवीन इश्शुज मधुन फायदा मिळवला. मात्र ह्या क्षेत्राकडे व्यवसाय म्हणुन पहायला लागलो ते पुण्याला सुदर्शन केमिकल्स लि. मध्ये नोकरीला लागल्यावरच. सुरवातीस तेथेही निवडक IPO मध्ये सहकार्यांना अर्ज करायला लावणे, हाच माझा प्राधान्यक्रम होता.
1999 मध्ये पुण्याच्याच ‘KPIT Infosystems Ltd’ ने 90 रु. किंमतीने IPO जाहीर केला. मी ही एक चांगली संधी आहे याची खात्री असल्याने सुदर्शन मधील माझ्या वरिष्ठांकडुन अर्ज भरुन घ्यावे या विचारात होतो. दुपारीच आमच्या कंपनीतील 5/6 मॅनेजर्स कॉफी मशीनजवळ गप्पा मारताना मला दिसले. कंपनीतील वातावरण तसे खेळीमेळीचे व अगदी अनौपचारिक असे, मी ही संधी साधुन तेथे पोहोचलो आणि हळुच विषय काढला. आमच्या EDP विभागाचे प्रमुख आणि तीव्र बौद्धिक क्षमता असलेले एक व्यवस्थापकही तेथे होते. त्यांनी मला प्रश्न विचारला "साहेब(?)..आपल्याला काय माहिती आहे या कंपनीचे कामकाज आणि त्याच्या दर्जा बद्दल??" मी चाचरत काहीतरी पुटपुटलो. तो जमानाच असा होता की Information Technology वा Computer याबद्दल मलाच काय, माझ्या वरिष्ठांनाही क्वचितच माहिती होती. झाले..पुढचे 10/15 मिनिटे झाडाझडती होवुन ही कंपनी कशी दुय्यम आणि सुमार दर्जाची कामे करते हे विस्ताराने सांगितले गेले. मी व्दिधा मनाने माझ्या टेबलाशी आलो. मात्र संध्याकाळी सकाळचा प्रसंग आणि माझ्या मनातील घालमेल माझ्या व्यवसायांतील एक जेष्ठ मार्गदर्शक व्यक्तीला सांगितली आणि 'अर्ज करु की नको??" असा सल्ला विचारला. ते हसले आणि म्हणाले "XX सर या विषयांत 'Last word' आहेत या बद्दल वाद नाही, सबब ते म्हणतात हे खरेच असले पाहिजे..पण तुला एक सांगतो, या शेअरला भाव किती मिळायला हवा हे सरांसारखे विद्वान नाही तर तु, मी, तुझे मित्र यांच्यासारखे सामान्य लोक ठरवणार आहेत..जसे हे बघ ना..मी येथे प्रभात रोडला रहातो, अगदी लिज्जत पापड बनविणार्या कारखान्यासमोर, सहाजिकच 'अतिपरिचयामुळे' म्हणा, किंवा तोच तोच गंध सतत आल्याने म्हणा... आम्ही ते पापड कधीही खात नाही. पण म्हणुन कंपनीचा खप कमी झालाय का??..तेंव्हा खुशाल अर्ज कर"..मी आश्वस्त होवुन अर्ज केले. त्यातही नशीबाचा भाग म्हणजे या इश्शुला 40 पट अधिक प्रतिसाद मिळुनही मला हे शेअर्स मिळाले आणि 90 रु. ला मिळालेले शेअर्स 200 रु. च्या पलिकडे विकुन मी घरांतील फर्निचर केले.
2003 मध्ये जेंव्हा 'मारुति लि' चा पब्लीक इश्शु बाजारांत आला तेंव्हा आलेला अनुभव मात्र एकदम उलटा होता. ह्या इश्शुचे फॉर्म्स घेवुन मी काही निवडक क्लायंट्स कडे जायचो आणि 'बघा...चांगली कंपनी आहे' वगैरे पोपट्पंची करायला सुरवात करायचो, तोच ज्या कोणा साहेबांकडे मारुतीची गाडी असायची, ते मलाच उलट ती गाडी किती चांगली चालते, रिलाएबल कशी आहे, कोणताही त्रास नाही ई. गोष्टी सागायचे, '......अर्ज करायलाच हवा' असे म्हणुन फॉर्म भरायचे.
हा प्रकार पाहुन मीही ओढुन ताणुन चंद्रबळ आणले आणि चक्क ओव्हरड्राफ्ट वापरुन मोठ्या रकमेचा अर्ज भरला. सांगावयास आनंद वाटतो की मारुति 800 नव्हे पण एखादी उत्तम टु व्हीलर घेता येइल एवढा फायदा महिनाभरांतच झाला.
(केवळ माहितीसाठी - त्या वेळी अर्ज केलेल्या जवळपास प्रत्येकाला मारुतिचे शेअर्स फक्त रु 125 मध्ये मिळाले होते. मध्यंतरीचा भाव रु. 4700+ होता.)
IPO पुराणामधीलच मला हटकून आठवणारी आणखी एक गोष्ट सांगतो.....
29 जुलै हा उद्योगक्षेत्रांतील ध्रुवतारा भारतरत्न श्री. जे. आर. डी टाटांचा जन्मदिवस,आणि माझ्या कन्येचाही... सन 2004 मध्ये हा मुहुर्त साधून टाटा समुहातील सर्वात मोठी कंपनी TCS ने आपला बहुचर्चित पब्लिक इश्शु बाजारंत आणला. मी माझी, कुटुंबातील सदस्यांचे वाढ्दिवशी खरेदी करावयाची, पद्धत म्हणुन TCS साठी दोन वेगळे अर्ज भरले. त्याच बरोबर व्यवसायाचा एक भाग म्हणुन पुण्यांतील एक यशस्वी व्यावसयिक म्हणुन नामांकित असलेल्या माझ्या 'एक्स-बॉस'कडेही पोहोचलो. "या...प्रसाद या, इकडे कसे काय?? कसे काय चाललेय??".. सरांनी मिठ्ठासपणे चौकशी केली.(सर कधीच कोणाचाही उल्लेख एकेरीने करित नसत, अगदी ज्युनियरचाही) मी लगेच TCS च्या फॉर्म्सचे भेंडोळे काढुन त्यांना अर्ज करण्याची विनंती केली. थोडेसे विचारमग्न झाल्याचे दाखवत साहेबांनी विचारले..' किती रुपयाला आहे हो एक शेअर??'..'900ला सर" - मी..."10रु.चा एक शेअर 900 घ्यायचा.??"- साहेब, "नाही सर, शेअर 10 रु चा नाही,...01 रु.चा आहे"… मी मध्येच त्यांचा गैरसमज दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला (खरे तर मार्केटिंग कसे करु नये याचा उत्तम नमुनाच सादर केला !!!) "अहो, काय सांगताय काय?? इथे आम्ही नेहमीपेक्षा 2/5रु जास्त नफा घ्यायला गेलो तर बाजारांत कोलाहल होतो आणि कोण घेणार हो 01 रु. चा शेअर 900ला ??..असे सल्ले देताना नीट अभ्यास केला आहे् ना तुम्ही?? लक्षांत ठेवा, नवीनच आहात तुमच्या व्यवसायांत अजुन.. एवढ्या महाग किंमतीला या शेअरसाठी अर्ज करण्याचा माझा बिलकुल विचार नाही. आणि तुम्हीही जरा सावधपणेच करा..." "साहेबांनी माझ्याबद्दलच्या काळजीपोटीच सल्ला दिला.
अर्थात मी 'बाबा वाक्यं..बॉसं वाक्य प्रमाणम..' विचारसरणी मानणारा नसल्याने 02 अर्ज केलेच आणि मला 35 शेअर्सही मिळाले. 850 रु ला मिळालेल्या या शेअरने पहिल्याच दिवशी बाजारांत जवळपास 1200 रु चा भाव दाखवला. नंतर मिळालेला एकास एक बोनस लक्षांत घेता 2004 साली गुंतविलेल्या उण्यापुर्या 30,000 रुपयांचे कालचे बाजारमुल्य रु 3,50,000 पेक्षा अधिक आहे. आणखी एक सांगावयाची गोष्ट म्हणजे गेल्या 05 वर्षांत या कंपनीने कधीही 2000% पेक्षा कमी (होय 2000% च) डिव्हीडंड दिलेला नाही.
अर्थात केवळ IPO च्याच माध्यमातुन फायदा मिळवता येतो असे मात्र बिलकुलच नाही. किंबहुना 'वाट पाहीन पण IPO नेच कमवीन" असे असण्याचे अजिबात कारण नाही....
मध्यंतरी सोशल मिडियात विप्रो कंपनीचे 1980 साली घेतलेले 100 शेअर्स बोनस व स्प्लिट्स मुळे 96,00,000 एवढे वाढुन मुळ 10,000 रु. गुंतवणुकीचे मुल्य 30 वर्षात(2010 साली) 455 कोटी झाले असा एक पोस्ट फिरत होता…… आणि ही अन्य अनेक पोस्टप्रमाणे अफवा वा अतिशयोक्ती नव्हती तर वस्तुस्थिती होती. !!
कॅस्ट्रॉल या (आता डीलिस्ट झालेल्या) कंपनीने 1990-2012 दरम्यान तब्बल 10 वेळा बोनस दिले, 'मदरसन सुमी लि.' ही अशीच एक कंपनी...जिने 1997-2015 या काळांत 07 वेळा बोनस शेअर्स वाटले. ईन्फोसिसनेही बोनसवाटपाची अशीच चमकदार कामगिरी आजपर्यत 07 वेळा केली आहे. ITC ने 1978 पासुन 07 वेळा तर कोलगेट(ई)ने 1982 पासुन 06 वेळा बोनस शेअरची भेट दिली, आणी या प्रत्येकाने याशिवाय दरवर्षीच्या घसघसीत लाभांश दिलाच आहे.
जाता जाता....'एशियन पेंटस'च्या ताज्या वार्षिक अहवालात लिहिल्याप्रमाणे 1983 साली घेतलेल्या एका शेअरचे आता 184 शेअर्स झाले आहेत. आणि या कालांत गुतवलेल्या 1000 रु.चे मुल्य 31 मार्च 2015 रोजी रुपये 65,00,000 च्या आसपास आहे……. यादी खुप मोठी आहे विस्तारभयास्तव आटोपतो.
….एकदा एका भल्या पहाटे एक निरिश्वरवादी तरुण गौतम बुद्धांची भेट घ्यायला आला. त्याला पहाताक्षणीच बुद्धांनी तो काय विचारणार हे ओळखलेच होते, त्याने बुद्धांना 'तो' नेहमीचा प्रश्न विचारलाच ‘..ईश्वर खरेच आहे का?" "होय,आहे"..उपासनामग्न बुद्ध शांतपणे उत्तरले. तो निघुन गेला. नंतर एके दिवशी एक पापभिरु सज्जन बुद्धांना नेमका हाच प्रश्न विचारते झाले 'खरेच ईश्वर आहे का?" यावेळी मात्र बुद्धांनी तितक्याच तटस्थपणे उत्तर दिले - "नाही" .....हे सज्जनही विचारमग्न होवुन निघुन गेले. पुढे काही दिवसांनी आणखी एक भाविक बुद्धांना म्हणाला "महात्मन, मी गोंधळुन गेलो आहे, अनेक जण असे मानतात की परमेश्वर नाहीच मुळी, उलट बरेच लोक परमेश्वरावरच प्रगाढ विश्वास ठेवतात. आपल्याला काय वाटते ?? तो आहे की नाही?? कृपया मला मार्गदर्शन करावे."....यावर भगवान बुद्धांनी आपल्या अर्धोन्मेलित डोळ्यांतुन त्या साधकाकडे पहात एक प्रसन्न मंद्स्मित केले, आशिर्वाद दिला आणि काहीही न बोलता ते दुसर्या भिक्षुकडे वळले...बुद्धांनी उच्चारलेला शब्द-नी-शब्द लक्षपुर्वक ऐकणार्या त्यांचा एका पट्टशिष्याला मात्र रहावले नाही आणि सावकाशीने ह्या तीनही प्रसंगांची आठवण बुद्धांना देत त्याने विचारले "भगवान, तीन साधकांना तीन वेगळी उत्तरे?? आपण असे का केलेत ??".....यावर हसुन भगवान म्हणाले "अरे, मी काहीही वेगळे केलेले नाही. उत्तरांचे बाह्य स्वरुप वेगळे असेलही पण हेतु एकच आहे, प्रत्येकाला त्यांच्या कोषांतुन बाहेर काढुन विचा्र करण्यास प्रवृत्त करणे, जेणे करुन ते माझ्यासारख्या त्रयस्थाऐवजी स्वतःच सत्याचा अनुभव घेवु शकतील..
सांगावयाचा मुद्दा हा, तुम्ही भगवान बुद्ध असा की माझ्यासारखा सामान्य पामर, काही प्रश्नच असे असतात की जे तुम्हाला वारंवार विचारले जातात..रोज प्रातःसमयी अतिव प्रेमाने विचारला जाणार्या "ईतका वेळ त्या पेपरांत डोळे खुपसुन काय वाचतोयस ?? अशा केवळ दुर्लक्षिण्यायोग्य प्रश्नांबरोबरच व्यवसायानिमित्ताने "शेअर बाजारातुन चांगले रिटर्न्स मिळतील का?? 'बाजारांत गुंतवणुक करावी का?? असे प्रश्न मला वारंवार विचारले जातात. मी भगवान बुद्धांएवढा स्थितप्रज्ञ व तत्वचिंतक नसल्याने कधी हसुन तर कधी वैतागुन उत्तर देत असतो आणि तेही वेगवेगळे नव्हे तर एक आणि एकच. ते म्हणजे……….. "होय, दीर्घकालीन गुंतवणुकीकरीता शेअरबाजारास पर्याय नाही!!!'
अर्थात पहिल्यांदाच सांगितल्याप्रमाणे मी स्वतःला गुंतवणुक क्षेत्रातील तज्ञ वगैरे अजिबातच समजत नाही मात्र माझ्यापुरत्या आखलेल्या भविष्यदिशा थोड्क्यांत पुढीलप्रमाणे सांगता येतील. - (१) Will not Invest for Short Term. Will not Save for Long Term...(२) बाजारांत नियमितपणाने गुंतवणुक करेन (३) शेअरबाजारांत गुंतवणुकीची सुरवात करणेपुर्वी किमान 06 महिने पुरेल एवढा आणिबाणी निधी बाजुला ठेवेन (४) केवळ पुर्ण माहितीवर आधारित निर्णयच घेइन, भावनावश होवुन वा घाई गडबडीने व्यवहार करणार नाही (५) उपलब्ध पर्यांयांची सखोल माहिती घेइन. उदा. फिक्स डीपॉझिट ऐवजी लिक्विड फंड्स वा टॅक्स वाचविण्याकरिता ELSS....
चार्ल्स डार्विनने म्हटले आहे की ‘It is NOT the strongest of the species that survives, NOR the most intelligent, but the ones most responsive to change …’ तेंव्हा बद्ल घडविणे अपरिहार्य्च आहे तर उशीर कशाला?? चला, येत्या नव्या संवतापासुनच बदलाला सामोरे जावुया !!!
Book traversal links for शेअर बाजार – काही IPO कथा
💬 प्रतिसाद
(128)
प
प्रसाद भागवत
Fri, 06/10/2016 - 15:50
नवीन
धन्यवाद.
- Log in or register to post comments
प
प्रसाद भागवत
Wed, 06/15/2016 - 07:28
नवीन
Mahanagar Gas Limited IPO details are announced..
Issue Open: Jun 21, - Jun 23,
Issue Price: Rs. 380 - Rs. 421 Per Equity Share
Minimum Order Quantity: 35 Shares
Can be applied through ASBA only..
Seems to be a issue worth applying.. will try to post updates on this..
Interested ones should contact me if need some help.- Prasad Bhagwat
- Log in or register to post comments
म
माझीही शॅम्पेन
Tue, 06/21/2016 - 09:40
नवीन
हा आय पी ओ का घ्यावा आणि का घेऊ नये ह्या बद्दल काहीतरी लिहिल तर फार बर होईल
- Log in or register to post comments
प
प्रसाद भागवत
Tue, 06/21/2016 - 10:28
नवीन
हा आय पी ओ का घ्यावा ...
बाजारात सर्वाधिक महत्वाचे तत्वज्ञान आहे 'भाव हाच देव'. बाजारांतील प्रतिसाद पहाता चांगला भाव मिळेल असे दिसते. या निकषावर हा घ्यावा.. मिळाल्यास आपले सगळे वा शक्य तेवढे मुद्दल काढुन घावे. (अर्थात हे माझे व्यक्तिगत मत. कसलीही हमी नाही)
बाकी कीस काढ्णे आवश्यक वाटत नाही.
- Log in or register to post comments
व
वेदांत
Tue, 06/21/2016 - 08:52
नवीन
एकंदरीत आयपिओ अॅट्रॅक्टीव वाटतोय ..
- Log in or register to post comments
व
विअर्ड विक्स
Wed, 06/29/2016 - 06:22
नवीन
L & T इन्फोटेक IPO ११ जुलैला येतोय . पूर्णतः online मध्ये IPO साठी गुंतवणूक करता येईल का ? ASBA फॉर्म physically न भरता online भरायचा पर्याय असल्यास माहिती द्यावी. कारण सध्या कामानिमित्त गुरगावात वास्तव्य आहे नि बँकर ब्रोकर मुंबईतले आहेत .
- Log in or register to post comments
प
प्रसाद भागवत
Wed, 06/29/2016 - 12:16
नवीन
काही विषिष्ट ठिकाणीच IPO ची online सुविधा उपलब्ध आहे..उदा कोट्कमध्ये फक्त. 3-in-1 Trinity Account holders नाच ही सुविधा आहे बाकीच्यांना नाही.
बँकर ब्रोकर मुंबईतले आहेत..हा मुद्दा खरेतर अडचणीचा नसावा. कारण पुण्यांतुन मुंबईच्या क्लायंटसनी अर्ज भरल्याचे मला माहित आहे. मात्र आपली बॅके ASBA सुविधा पुरवित असावी. करणारच असाल अर्ज तर गोंघळ टाळण्याकरिता पहिल्याच दिवशी अर्ज भरावा असे सुचवेन..
- Log in or register to post comments
व
वेदांत
गुरुवार, 06/30/2016 - 10:10
नवीन
महानगर गॅस आयपीओ साठी ३ लॉट्सचा अर्ज केला होता, पण एकही शेअर मिळाला नाही ..
- Log in or register to post comments
म
माझीही शॅम्पेन
गुरुवार, 06/30/2016 - 10:37
नवीन
अरेरे कधी अलॉटमेंट झाली ? ४ लॉट्सचा अर्ज केला होता हायला मला पण एक शेयर मिळाला नाही , मला वाटल अजुन अलॉटमेंट व्हयायची आहे , स्टॉक कोड काय आहे ? सेकेंडरीला कितीला ओपन झालाय ?
- Log in or register to post comments
प
प्रसाद भागवत
गुरुवार, 06/30/2016 - 11:49
नवीन
जरा धीर धरा साहेब.. फक्त ॲलॉट्मेंट झाली आहे.. लिस्टींग नाही. .ते येत्या आठवड्यांत आहे..
- Log in or register to post comments
प
प्रसाद भागवत
गुरुवार, 06/30/2016 - 11:48
नवीन
Oh..better luck next time...एक सुचवु का ?/ हल्लीच्या वाटप पध्द्तीत ०३ लॉटसच्या एका अर्जापेक्षा एका लॉटचेच पन तीन वेगवेगळॅ अर्ज केल्यास फायदा होतो असे कराने शक्य नसल्यास मग अर्ज ०१ लॉटसाठीच करावा.
- Log in or register to post comments
प
प्रसाद भागवत
गुरुवार, 06/30/2016 - 11:52
नवीन
क्षमस्व.. आपले प्रतिसादाचे उत्तरासाठी दिलेला प्रतिसद खाली वेगळा प्रकाशित झाला आहे. तो वाचावा..
- Log in or register to post comments
प
प्रसाद भागवत
गुरुवार, 06/30/2016 - 11:54
नवीन
क्षमस्व.. आपले प्रतिसादाचे उत्तरासाठी दिलेला प्रतिसद खाली वेगळा प्रकाशित झाला आहे. तो वाचावा..
- Log in or register to post comments
म
मोहन
गुरुवार, 06/30/2016 - 11:54
नवीन
उद्या लिस्टींग आहे. अलॉटमेंट पण उद्याच कळेल असे वाटते.
- Log in or register to post comments
श
शुभां म.
गुरुवार, 06/30/2016 - 13:12
नवीन
मी 2 लॉट्साठी अर्ज केला होता, 1 अलोकेट झाला आहे ,तसा मेल आला आहे BSE कडून.
मी या क्षेत्रात नवी आहे, मिसळ पावच्या अनेक लेखांमधून खूप माहिती मिळाली त्या बदल खरंच खूप आभारी आहे मी सर्वांचीच , असेच मार्गदर्शन मिळत राहीन हीच अपेक्षा.
महानगर IPO मधून या क्षेत्रात पाहिले पाऊल टाकले आहे.
- Log in or register to post comments
प
प्रसाद भागवत
गुरुवार, 06/30/2016 - 14:18
नवीन
शुभां म...आपल्याला शुभेच्छा !!
- Log in or register to post comments
ख
खाबुडकांदा
गुरुवार, 06/30/2016 - 13:26
नवीन
भागवतसाहेबांचे लेख चांगले असतात पण त्यावरील प्रतिक्रिया मला मर्णाच्या आवडतात वाचायला.
- Log in or register to post comments
प
प्रसाद भागवत
गुरुवार, 06/30/2016 - 14:19
नवीन
धन्यवाद..कांदासाहेब.
- Log in or register to post comments
म
मोहन
गुरुवार, 06/30/2016 - 14:16
नवीन
अलॉट्मेंटचे मेसेज येत आहेत. १०% अलॉट्मेंट असावेत बहुतेक.
- Log in or register to post comments
प
प्रसाद भागवत
गुरुवार, 06/30/2016 - 14:22
नवीन
basis of allotment is 21/83.
- Log in or register to post comments
भ
भंकस बाबा
गुरुवार, 06/30/2016 - 21:33
नवीन
तीन व् चार लॉटसाठी माझ्या व् बायकोच्या अकॉउंट मधून अर्ज केला होता,
पैसे परत,
- Log in or register to post comments
प
प्रसाद भागवत
Fri, 07/01/2016 - 05:34
नवीन
Oh..better luck next time...एक सुचवु का ?/ हल्लीच्या वाटप पध्द्तीत ०३ लॉटसच्या एका अर्जापेक्षा एका लॉटचेच पन तीन वेगवेगळॅ अर्ज केल्यास फायदा होतो असे कराने शक्य नसल्यास मग अर्ज ०१ लॉटसाठीच करावा
- Log in or register to post comments
भ
भंकस बाबा
Fri, 07/01/2016 - 15:24
नवीन
हे कसे शक्य आहे? माझ्या माहितिप्रमाणे एका डीमैट अकाउंटवर एकच अर्ज आपण करु शकतो, आता मी तर अर्ज आयसीआयच्या वेबसाइट वरुन भरतो, मग हे कसे शक्य होईल?
हां प्रश्न मुद्दाम मिपावर विचारत आहे, म्हणजे बाकीच्याना पण मार्गदर्शन होईल
- Log in or register to post comments
प
प्रसाद भागवत
Sat, 07/02/2016 - 09:15
नवीन
बाबाश्री..एका डीमैट अकाउंटवर एकच अर्ज आपण करु शकतो हे आपले म्ह्णणे खरे आहे. ईतकेच काय, एकाच पॅन क्र. वरुन एकापेक्षा अधिक अर्ज केल्यास ते सर्वच multiple applications म्ह्णौन रद्दबातल ठरतात. मला तीन वेगवेगळे अर्ज म्हणजे (कुटुंबातील) तीन वेगवेगळ्या व्यक्तींनी असे म्हणावयाचे होते..चुकीच्या शब्द्प्रयोगाबद्दल क्षमा असावी.
- Log in or register to post comments
श
शाम भागवत
Sat, 07/02/2016 - 09:53
नवीन
एकच माणूस आपले पैसे अशाप्रकारे गुंतवत असेल तर असे प्रकार बेनामी व्यवहार होऊ शकतात असे वाटते. त्यापेक्षा
१) पैसे रितसर (गिफ्ट टॅक्सच्या नियमानुसार) त्या कुटुंबीयांच्या नावावर करून मग ते गुंतवणे योग्य होईल असे वाटते. किंवा
२) या गुंतवणूकीतून मिळणारे उत्पन्न त्या माणसाने स्वतःचे उत्पन्न म्हणून दाखवले पाहिजे असे वाटते.
तज्ञ अधिक खुलासा करतीलच.
- Log in or register to post comments
प
प्रसाद भागवत
Sat, 07/02/2016 - 16:56
नवीन
मी तज्ञ नाही पण तरीही ... बेनामी व्यवहार, गिफ्ट टॅक्स, करचुकवेगिरी, ज्ञात स्त्रोतांपेक्षा अधिक उत्पन्न, काळा पैसा,...अहो भागवत साहेब, नका एवढी चिंता करु..
हे अर्ज सर्वसामान्यतः आपली अपत्ये, पत्नी वा अशाच अगदी जवळच्या नातेवाईकांच्या नावाने केले जातात. ASBA मुळे असे अर्ज त्या त्या व्यक्तीच्या नावाच्या खात्यातुनच करणे शक्य आहे. आता कोणत्याही IPO च्या एका लॉटला लागणारी सर्वसाधारण 15,000 एवढी रक्कम एखाद्याच्या खात्यात कोठुन व कशी आली याची चौकशी आयकर खाते करायला लागेल, एवढे मुल्य पैशाचे राहिले नाही. आपल्या पाल्याला एखादी गियरवाली सायकल घ्यायची म्हटली तरी एवढा खर्च होतो..असो..
- Log in or register to post comments
श
शाम भागवत
Sun, 07/03/2016 - 12:05
नवीन
:))
- Log in or register to post comments
व
वटवट
Fri, 07/01/2016 - 06:22
नवीन
ईंटरेस्ट निर्माण होत आहे...
- Log in or register to post comments
अ
अव्यक्त
Fri, 07/01/2016 - 07:18
नवीन
भागवत साहेब, मला तुमच्याकडून मार्गदर्शन अपेक्षित आहे. कृपया आपला WA क्रमांक व दूरध्वनी क्रमांक माझ्या इमेल वर टंकवा जेणेकरून आपल्याशी संपर्क साधता येईल ... ईमेल येणेप्रमाणे avyakta11@gmail.com
...अधिक माहिती साठी संपर्क साधणे सुलभ होईल. SHARE MARKET संबधी अधिक माहिती ( UPDATES) email वर पोस्ट कराल काय ?
- Log in or register to post comments
म
मोहन
Fri, 07/01/2016 - 08:40
नवीन
५४० ला लिस्ट झाला. ५२८ भाव चालू आहे.
विकावा का ठेवावा ? तसेही फक्त ३५ शेअर्सच मिळाले आहेत :-(
- Log in or register to post comments
प
प्रसाद भागवत
Fri, 07/01/2016 - 10:25
नवीन
.....मिळाल्यास आपले सगळे वा शक्य तेवढे मुद्दल काढुन घावे. असे मी आधीच लिहिले आहे.मला त्यात बदल करावा असे वाटत नाही. (अर्थात हे माझे व्यक्तिगत मत. कसलीही शिफारस नाही)
- Log in or register to post comments
म
मराठी_माणूस
Sun, 07/03/2016 - 14:30
नवीन
काही माहीती देता येईल का ?
- Log in or register to post comments
व
वेदांत
Mon, 07/04/2016 - 06:45
नवीन
इथे काही माहीती मिळु शकेल..
http://myinvestmentideas.com/2016/06/l-t-infotech-ipo-review-should-you-invest/
- Log in or register to post comments
म
मराठी_माणूस
Mon, 07/04/2016 - 08:58
नवीन
धन्यवाद
- Log in or register to post comments
प
प्रसाद भागवत
Sun, 07/10/2016 - 15:43
नवीन
L&T Infotech IPO - Updates
The issue seems to be aggressively priced & evoking somewhat lackluster response as per the pre open reports..
the mammoth response for the earlier Quess IPO may have a positive impact on this IPO & a rs. 10 discount to the retailers may attract some investors..i still don't expect a heavy over subscription.
I am not expecting any spectacular listing gains. One can apply with the minimum application money. Not covering this IPO further..
Anyone needs some help.. pls do revert.- prasad bhagwat
- Log in or register to post comments
व
विअर्ड विक्स
Tue, 07/12/2016 - 10:33
नवीन
माझेसुद्धा हेच मत .... विप्रो वा HCL याहून स्वस्तात मिळतील.
- Log in or register to post comments
म
मराठी_माणूस
Wed, 07/13/2016 - 10:58
नवीन
हा कधी लीस्ट होईल ?
- Log in or register to post comments
प
प्रसाद भागवत
गुरुवार, 07/14/2016 - 04:35
नवीन
Now a days.. It takes 8/10 working days.. This will too follow the same..
- Log in or register to post comments
ख
खोबाजी
Tue, 07/12/2016 - 20:49
नवीन
पुणे मुक्कामी असलेले फक्त आगाऊ शुल्क घेउन सेवा देणारे प्रमाणित वैयक्तिक आर्थिक सल्लागार (advance fee only Certified Personal Financial Advisor) कोणि आहे का?
- Log in or register to post comments
प
प्रसाद भागवत
गुरुवार, 07/14/2016 - 04:39
नवीन
मी पुणेस्थित असलो तरी प्रमाणित वैयक्तिक आर्थिक सल्लागार म्हणवून घेवू शकत नाही. तस्मात पास...
- Log in or register to post comments
प
प्रसाद भागवत
गुरुवार, 07/14/2016 - 06:49
नवीन
IPO update : Advanced Enzyme Technologies
Issue Opens on July 20 closes on July 22
Bid Size : blocks of 16 shares.
Price band : Rs. 880-896 per share.
Seems to be an interesting issue.. will update my take later.. keep watching..-Prasad bhagwat
- Log in or register to post comments
प
प्रसाद भागवत
Wed, 07/20/2016 - 05:41
नवीन
IPO update : Advanced Enzyme Technologies
Issue Opens Today...closes on July 22
Bid Size : blocks of 16 shares.
Price band : Rs. 880-896 per share. (application in the multiple of rs. 14,336)
In my opinion, a worth applying issue.. Prasad bhagwat
- Log in or register to post comments
म
मोहन
Wed, 07/20/2016 - 08:47
नवीन
L & T infotech IPO कधी लिस्ट होणार आहे ? अलॉटमेंट तर झाली .
- Log in or register to post comments
म
मराठी_माणूस
Wed, 07/20/2016 - 11:01
नवीन
http://www.thehindubusinessline.com/markets/stock-markets/lt-infotech-to-list-on-bourses-on-thursday/article8875297.ece
- Log in or register to post comments
प
प्रसाद भागवत
गुरुवार, 07/21/2016 - 06:53
नवीन
My post before the L&T Infotech IPO on the 10th July says......
'L&T Infotech IPO - Updates
The issue seems to be aggressively priced & evoking somewhat lackluster response as per the pre open reports..
the mammoth response for the earlier Quess IPO may have a positive impact on this IPO & a rs. 10 discount to the retailers may attract some investors..i still don't expect a heavy over subscription.
I am not expecting any spectacular listing gains. One can apply with the minimum application money. Not covering this IPO further..
Anyone needs some help.. pls do revert.- prasad bhagwat'
- Log in or register to post comments
म
मराठी_माणूस
गुरुवार, 07/21/2016 - 06:59
नवीन
नक्की काय म्हणायचे आहे?
- Log in or register to post comments
प
प्रसाद भागवत
गुरुवार, 07/21/2016 - 07:19
नवीन
काहीच नाही साहेब. 'मराठी माणुस' ..मी ही पोस्ट ईंग्रजीतुन लिहिली..या बद्दल क्षमा असावी.
जाता जाता...या शेअरचा बाजारातील प्रवेश निराशाजनक झाला. ७१० रुपयांनी दिलेला ह्या शेअरचा भाव उघडला तोच ६६७ रुपयांवर
- Log in or register to post comments
म
मराठी_माणूस
गुरुवार, 07/21/2016 - 07:22
नवीन
आत्ता ७०६ आहे
- Log in or register to post comments
म
माझीही शॅम्पेन
गुरुवार, 07/21/2016 - 08:29
नवीन
अस झाला का बर झाल जास्त नाही मिळाले ते , फक्त 20 मिळाले
- Log in or register to post comments
R
ray
Wed, 08/24/2016 - 06:25
नवीन
RBL Bank IPO in big demand, subscribed 69.5 times on Day 3-ET
तुमचे मत जाणून घ्यायला आवडेल.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- ›
- »