Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

थोरले बाजीराव

प
पालीचा खंडोबा १
Sat, 11/28/2015 - 12:32
🗣 66 प्रतिसाद
सध्या बाजीराव मस्तानी चित्रपटाची चर्चा जोरदार सुरु आहे. त्यात प्रेम महत्वाचे आहे असे प. पु. श्री संजयजी लीला भंसालीजी म्हणतात. म्हणोत बापुडे. पण महत्वाचा मुद्दा दुर्लक्षित राहतो ते. श्रीमंत बाजीरावांचे मराठी आणि त्याहून महत्वाचे म्हणजे भारतीय इतिहासातील योगदान. सर जदुनाथ सरकार फार मोठे इतिहासकार होवून गेले त्यांनी असे म्हंटले आहे कि छत्रपति शिवरायांनंतर मराठी इतिहासात जर कोणी पराक्रमी असेल तर ते बाजीराव साहेब होत. १७१९ साली वारसाहक्काने बाजीराव साहेबास पेशवेपदाची वस्त्रे मिळाली परंतु सातारा दरबारात त्यास विरोध होता. बाळाजी विश्वनाथांच्या प्रेमापोटी छत्रपति शाहू महाराजांनी बाजीराव साहेबास वस्त्रे दिली . तदनंतर बाजीराव साहेबांनी मागेवळुन वळुन पाहिले नाही . दिल्ली तख्त काबीज करणारा तो पहिला मराठी पुरुष होता. ब्रिटीश इतिहासकारांनी त्यांच्या विजयाचे श्रेय त्यांच्या हुशारी आणि रणनितिस दिले आहे. क्षणाचीही उसंत न घेता अविरत प्रवास करून अंतर वेळेआधी कापून बाजीरावशत्रूस शत्रूस चकित करत असे. निजामाचे सैन्य भारी असूनही त्यापेक्षा ३०% कमी फौजेसह त्यांनी निजामास टक्कर दिली आणि त्याचा पराभव केला. उत्तर हिंदुस्थानात मराठेशाहीचा विस्तार हा त्यांच्याच काळात झाला. शिंदे , होळकर, पवार, गायकवाड असे नामांकित सरदार त्य्नच्याच काळात उदयास आले. आपले दुर्दैव इतकेच कि इतक्या थोर योध्यास आपण जातीच्या चौकटीत अडकवून ठेवले. त्यांच्या युद्ध कौशल्याबद्दल त्यांच्या शत्रूंनी पण गौरव उद्गार काढले आहेत. त्यांच्या प्रत्येक लढायांचा अभ्यास केला आहे आणि केला जातो त्यांच्याच कारकिर्दीत वसई काबीज केली गेली आणि तेथील स्थानिकांची धर्मछळातुन सुटका करण्यात आली.

प्रतिक्रिया द्या
15794 वाचन

💬 प्रतिसाद (66)
प
प्रसाद१९७१ Mon, 12/07/2015 - 12:40 नवीन
यात साहेबाचा शिक्का घेण्याची काय गरज?
तुम्हीच माँटेमोगरी (!) ची साक्ष काढली होती, म्हणुन मी लिहीले होते की साहेब शिक्का कशाला? नसते लिहीले माँटेमोगरी ( !) तरी काही फरक पडला नसता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंत लाटकर
भ
भंकस बाबा Sat, 12/05/2015 - 10:32 नवीन
आजच्या पिढीचे काय घेऊन बसलायेत् गेल्या ३/४ पिढ्यातील लोकांना देखिल थोरल्या बाजीरावाविषयी फार कमी माहिती आहे. पुण्यातील लोकांना शनिवार वाड्यामुळे थोडेफार माहीत असेल पण बाकिचा आनंदि आनंद आहे. अगदी आपल्या शालेय इतिहासात देखिल बाजीरावचा नाममात्र उल्लेख आहे
  • Log in or register to post comments
अ
अभिजीत अवलिया Sat, 12/05/2015 - 15:52 नवीन
समीर आणी पालीचा खंडोबा ह्यांचे धन्यवाद. अतिशय चांगली माहिती दिली आहे दोघांनीही.
  • Log in or register to post comments
म
मनो Mon, 12/07/2015 - 04:40 नवीन
प्रतिसाद टाकावा की नाही अश्या द्विधा मनःस्थितीत होतो. त्यामुळे कुणाच्या श्रद्धास्थानाला माझ्या प्रतिक्रियेने धक्का बसत असेल तर आधीच आगावू माफी मागतो. बाजीराव पेशवे यांच्याबद्दल मला आदरच आहे आणि मीही त्यांच्या पराक्रमाच्या कथा वाचूनच मोठा झालो आहे. काय असते की आपण आपल्या मनात एक सुरेख असे कल्पनाचित्र तयार करतो आणि त्याचा नायक म्हणजे बाजीराव अथवा शिवाजी अथवा अजून कोणीतरी एक ऐतिहासिक व्यक्तिमत्व असते. पण जसे आपण त्यांच्याबद्दल जास्त माहिती जमा करतो तसे आपले कल्पनाचित्र आणि सत्य यांची फारकत होते. त्या काळातला नायक आपल्या दृष्टीने देव असला तरी त्याला त्या काळाच्या मर्यादा लागू पडतात आणि त्या मानायची आपली तयारी नसते कारण आपले सुंदर कल्पनाचित्र त्यामुळे विसंगत होते. बाजीरावचरित्राच्या अश्या अनेक मर्यादा आहेत. बाजीरावाची मुख्य चिंता दिसते ती कर्जाची. कधीही पराभूत न झालेला असा हा योद्धा असला तरी त्याची सर्व हयात या स्वार्यांचे कर्ज निवारण्यात गेली. सावकारांच्या मनधरण्या करणारी त्याची अनेक पत्रे उपलग्ध आहेत. आता प्रश्न असा पडतो की दिल्लीपर्यंत धडक मारणाऱ्या बाजीरावास दिल्ली लुटणे का शक्य झाले नाही - तसे पहिले तर १७३९ साली नादिरशहाने दिल्ली लुटून अमाप संपत्ती नेलीच की (त्यात मुघल मयुर सिंहासनहि होते). त्या वेळीची हकीगत अशी. पहिला हल्ला होळकरांनी चमेलीपर केला, तो मुघल फौजेने मारून काढला आणि बाजीरावाने नदीअलीकडे माघार घेतली. खानाने खुश होऊन विजयाची अतिशयोक्तीपर पत्रे मुहम्मदशहाला दिल्लीला पाठवली. तर बाजीराव ज्या वेळी दिल्लीसमोर उभा होता त्या वेळी त्याने फक्त खानदौरान आणि सादतखान यांच्या फौजेला हूल दिली होती. मुघल सैन्य अजूनही पराभूत झालेले नव्हते. आणि तसेही बाजीरावाकडे लालकिल्ला हल्ला करून घेण्यासाठी तोफा नव्हत्या. त्यामुळे बाजीरावाचे हे यश खूप मर्यादित होते आणि त्यातून फार काही सध्या होऊ शकले नाही. याच्या तुलनेत नादिरशहाने कर्नालजवळ मुघल फौजेचा संपूर्ण पराभव करून खुद्द मुहम्मदशहालाच कैद केले होते. त्यामुळे त्याला दिल्लीची यथेच्छ लूट करून २०० वर्षे जमवलेली मुघल संपत्ती सहज लुटता आली. तीच गोष्ट निजामाची. अनेकदा पराभव करून निजाम पुन्हा पुन्हा हल्ले करायला जिवंत राहिला. अफझलखान अथवा शाहिस्तेखान जसा एकाच फटक्यात निष्प्रभ झाला तसे इथे झाले नाही. मग बाजीरावाची तशी इच्छा नव्हती का? तर मला असे वाटते की निजाम हा शस्त्रबलात मराठ्याना भारी होता कारण त्याच्याकडे असलेला तोफखाना (आणि नंतर फ्रेंचांनी उभे केलेले गाडदी) त्यामुळे त्याची रसद रोखून आणि त्याच्याकडून खंडणी हबकून त्याला जाऊ देणे मराठ्यांच्या हिताचे होते. त्याला ठार करून हैदराबाद ताब्यात घेण्य इतके बळ त्या वेळी तरी मराठ्यात नव्हते, नाही तर त्यांनी ते नक्कीच केले असते. (जसे त्यांनी माळव्यात केले) अजून एक मर्यादा म्हणजे व्यवस्थापनाची. बाजीरावाचे शिंदे होळकर आणि पवार हे मुख्य सरदार. नागपूरकर भोसले आणि बडोदेकर गायकवाड, दाभाडे यांची स्वतंत्र संस्थाने उदयात आली ती बाजीरावाच्या काळात. त्याला या राज्यांना एक संरचना देणे सहज शक्य होते. पुढे या राज्यातील अंतर्गत कलहाने पेशवाईचा अंत जवळ आला. बाजीरावाला हे थांबवणे शक्य होते. तीच गोष्ट मस्तानीची. कथा कादंबर्यात हि विषय मुख्य असला तरी बाजीरावच्या चरित्रात एक सहचारिणी याशिवाय मस्तानीचे असून काही विशेष स्थान असलेले दिसत नाही. याउलट माळव्यातले बाजीराव आणि चिमाजीअप्पाचे यश तसे तुलनेने कमी वाटले तरी महत्वाचे आहे. हा भाग अनेक वर्षे मराठ्यांच्या ताब्यात राहिला आणि नानासाहेब आणि इतर पेशव्यांच्या स्वार्या (पानिपत वगरे) त्यामुळे शक्य झाल्या. ग्वाल्हेर, इंदूर, उज्जैन, झाशी यातील मराठी लोक बाजीरावाशिवाय तिथे स्थायिक होऊ शकले नसते एकूणच बाजीरावाचे चरित्र स्फूर्ती देणारे तर नक्कीच आहे, पण त्यातल्या मर्यादा नक्कीच विचारात घ्याव्यात. त्याने त्याचे माणूसपण लख्ख उठून दिसते.
  • Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध.वैद्य Mon, 12/07/2015 - 11:49 नवीन
छान लिहीलेय! इतिहास असेच सांगतो. खरेतर दिल्ली बाजीरावाने लुटली नाहीच (कारण काही उरलेच नव्हते) ते निव्वळ दिल्लीस धडक प्रसंगी मराठे दिल्ली काबीज करू शकतात अशी जरब बसवून माळव्यास परतला. निजामाविषयी माझे मत काहीशे असेच आहे. त्यास इतक्यांदा हरवून सोडून का दिले समजत नाही. कर्जांविषयी तेच. उत्पन्न काय होते काय कळावयास मार्ग नाही. शिवाय चौथाई सरदेशमुखीच्या हक्कांसाठी दरवेळी झगडत राहिलेत. नेमक काय निजाम हा शस्त्रबलात मराठ्याना भारी होता कारण त्याच्याकडे असलेला तोफखाना (आणि नंतर फ्रेंचांनी उभे केलेले गाडदी) त्यामुळे त्याची रसद रोखून आणि त्याच्याकडून खंडणी हबकून त्याला जाऊ देणे मराठ्यांच्या हिताचे होते >> ह्यास अनुमोदन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनो
S
sagarpdy Mon, 12/07/2015 - 11:52 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनो
S
sagarpdy Mon, 12/07/2015 - 12:00 नवीन
रच्याकने, निजामाला न संपवण्याचे माझ्या वाचनात आलेले कारण हे अन्य मराठी सरदारांची पाय खेचण्याची वृत्ती होय. जर निजामाचा संपूर्ण पराभव करण्यात बाजीराव यशस्वी झाले असते तर दक्षिणेत त्यांना अमाप राजकीय शक्ती प्राप्त झाली असती व अन्य सरदारांचा प्रभाव व दरबारी महत्त्व नगण्य झाले असते. परिणामतः काहीतरी करून निजामास न संपवण्याबद्दल या सरदारांनी सातारच्या गादीचे मन वळवले (डीटेल्स माहित नाहीत). व शाहुनी बाजीरावांना परत उत्तरेस पाठवले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनो
म
मालोजीराव Mon, 12/07/2015 - 12:32 नवीन
तुम्ही मांडलेल्या सर्व गोष्टी विचार करण्यासारख्या आहेत, काही मुद्द्यांबाबत तत्कालीन परिस्थिती पाहता स्पष्टीकरण द्यावेसे वाटते किंवा तुमच्या मुद्द्यांना जोड समजा
बाजीरावचरित्राच्या अश्या अनेक मर्यादा आहेत. बाजीरावाची मुख्य चिंता दिसते ती कर्जाची. कधीही पराभूत न झालेला असा हा योद्धा असला तरी त्याची सर्व हयात या स्वार्यांचे कर्ज निवारण्यात गेली.
कर्ज तशी सगळ्यांवरच असतात छत्रपती,औरंगजेब हि यातून वाचले नाहीत . बाजीरावांवर वैयक्तिक आणी स्वाऱ्यांमुळे झालेले कर्ज सुमारे २० लाखाच्या आसपास होते, बाजीरावांच्या मुळे गडगंज झालेले शिंदे,होळकर,पवार यांनी स्वार्यांचे पैसे देण्यास टाळाटाळ केली असे दिसते. बरेच पैसे ब्रम्हेन्द्रस्वामिंकडून घेतले होते , त्यांनीही तगादा लावला होता. बाजीरावांची कर्जाची चिंता शाहू छत्रपतींना ज्ञात झाल्यावर त्यांनी नामी युक्ती लढवली आणि गर्भश्रीमंत अश्या रास्तेंच्या गोपिकाबाई शी नानासाहेबांचे लग्न लावून दिले. त्यामुळे नंतर परिस्थिती काहीशी सुधारली (शाहू आणि रास्ते अत्यंत घरचे संबंध होते, या लग्नाची छानशी गोष्ट रास्तेंच्या कडूनच ऐकली वाई ला ती नंतर कधीतरी सांगेन )
आता प्रश्न असा पडतो की दिल्लीपर्यंत धडक मारणाऱ्या बाजीरावास दिल्ली लुटणे का शक्य झाले नाही - तसे पहिले तर १७३९ साली नादिरशहाने दिल्ली लुटून अमाप संपत्ती नेलीच की
१७१९ च्या सनदा मिळाल्यावर मोगल मराठ्यांचे बाहुले झाले, त्यामुळे मोगल हे प्रमुख शत्रू नसून राजपूत,जाट ,निजाम हे मराठ्यांचे खरे शत्रू होते. मोगल सत्ता उखडली असती तर केंद्रीय व्यवस्था खिळखिळी झाली असती आणि मोठा सत्तासंघर्ष दिल्लीसाठी उद्भवला असता. शाहूंना हे नको होते, त्यांनी बाजीरावांना लिहिलेल्या पत्रात म्हंटले आहे "पातशाही बरखास्त करू नये, नियंत्रणात आणली तर मोठाच जय होईल ,तिचा जीर्णोद्धार करावा " . या राजकारणाची फलश्रुती अशी झाली कि १७४८ ला शाहूंनी नानांना दिल्ली ला पाठवले ज्यात नादिरशाह आणि अब्दाली च्या आक्रमणापासून मोगलांचा बचाव करण्यासाठी १७४८ ला बोलणी आणि १७५२ ला तह झाला त्यानुसार पूर्ण हिंदुस्तानची चौथाई वसुलण्याचे हक्क मराठ्यांना मिळाले.
माळव्यातले बाजीराव आणि चिमाजीअप्पाचे यश तसे तुलनेने कमी वाटले तरी महत्वाचे आहे. हा भाग अनेक वर्षे मराठ्यांच्या ताब्यात राहिला आणि नानासाहेब आणि इतर पेशव्यांच्या स्वार्या (पानिपत वगरे) त्यामुळे शक्य झाल्या. ग्वाल्हेर, इंदूर, उज्जैन, झाशी यातील मराठी लोक बाजीरावाशिवाय तिथे स्थायिक होऊ शकले नसते
अगदी बरोबर
तीच गोष्ट मस्तानीची. कथा कादंबर्यात हि विषय मुख्य असला तरी बाजीरावच्या चरित्रात एक सहचारिणी याशिवाय मस्तानीचे असून काही विशेष स्थान असलेले दिसत नाही.
विशेष स्थान असायला हवे कारण मस्तानी संदर्भात तब्बल १२-१५ हून अधिक पत्रे उपलब्ध आहेत, मस्तानी मुळे त्याकाळी कौटुंबिक, सामाजिक उलथापालथ झालीच पण राजकीय पडसाद पण उमटले कारण घरगुती प्रकरण असून छत्रपतींना दोनदा दखल द्यावी लागली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनो
अ
अनिरुद्ध.वैद्य Mon, 12/07/2015 - 15:12 नवीन
नादिरशहाचा उल्लेख झालाच आहे तर, दस्तुरखुद्द नादिरसाहेबांनी बाजीरावाच्या काड्यांची दखल घेऊन त्यांना एक छान छान पत्र धाडले होते, ते खाली देत आहे. त्यांच्यात नंतर काय पत्रव्यवहार झाला ते माहिती नाही, पण पत्र मस्तय. ह्यावरून बाजीरावांचे उपद्रवमूल्य इराणच्या शहास दखल घेण्यास पात्र पाडते, हे लक्षात घेता येते :) Letter of Nadirshah to Bajirao Peshwa: I begin with the name of God who is gracious and merciful. I begin with the name of God. A precious stone of two religions had gone. By the help of God he made himself known by the name of Nadir, Iran. Baji Rao possessing a charming face and being a man of good luck, a devotee towards Moslem faith, being a candidate for the royal favour, is informed that this time with the help of the Almighty Delhi is the capital and military place, and is the rising star of the great kingdom : as the great Nawab is, of the Turks. To Emperor Muhammad Shah whose greatness is like that of the heavens, who is the fulfiller of all hopes who is highly respected and noble, whose noble birth is from a Turkish mother, and whose forefathers were of the Guijanis tribe, the kingdom and crown of India is entrusted, treating him as brother of the same religious profession and as a son ; and as you having a sweet face, and being a leader of the brave tribe, who maintains himself, always by the wealth of the state. It is necessary for you to serve the emperor honestly and well, keeping in mind his rights. But up to now it is not reported that you are serving just as you thought, but done is done. As at the present juncture on account of the affection, perfect, noble and hearty friendship between our states having taken place, we understand as if Muhammad Shah's state given by God is connected with ours for putting down the rebels and the invadcre of the said state of the Gurjanis, a brave and courageous person is necessary to be appointed. When, therefore, you will be informed of the contents of our noble command. Raja Shahu of great nobility, of good visage, well-experienced and obedient to the Musalman religion, has been appointed to that post, after this you would send news of your good health and safety remembering always that you are to be obedient to the royal order, which order should be received by Shahu for the performance of the services, heartily and without neglect and fail, he (Shahu) should try his best to act accordingly. By the help of God, every one far or near, if he be obedient to the state would be regarded as worthy of service and deserving of rewards and gifts, but whoever should try to rebel against the state, a victorious friend of religion is ready for war to defeat such an enemy and to suppress him and such a large army will be sent, that by going to the boundaries of the place of rebellion, necessary punishment will be inflicted upon them (rebels). In these matters you must be aware of good warning and act according to your position. Dated 27th month of Mohurrum 1152. Source: History Of Maratha People, Vol 2 - DB Parasnis and Kincuoff
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनो
व
वेल्लाभट Mon, 12/07/2015 - 12:51 नवीन
बाजीराव - मस्तानी किंवा बाजीराव - काशीबाई या दोनही नात्यांतून बाजीरावांच्या स्वभावातला निष्ठा हा गुण दिसतो. काशीबाईशी झालेलं लग्न हे अतिशय लहान वयात झालेलं असल्याने ते समजून, निवडून जोडलेलं नातं नव्हतं. मस्तानीवर प्रेम होतं, कळत्या वयात, स्वेच्छेने जोडलेलं ते नातं होतं. या दोनही नात्यांना जपताना बाजीरावांची तगमग झाली. तरीही कुणालाही बाजीरावांनी वा-यावर सोडलं नाही; ना काशीबाईंना, ना मस्तानीला. मस्तानीला 'ठेवलं' नाही तर तिच्याशी लग्न केलं, पत्नीचा सन्मान दिला. अर्थात आपले, परके सगळेच विरोधात गेले. तरीही; एकट्याने सगळ्यांना विरोध केला. प्रचंड आणि प्रचंड निष्ठा, मग ती नात्यांशी असो, तत्वांशी असो, विचारांशी असो. बाजीरावांचा हा गुण माझ्या मनातला बाजीरावांबद्द्ल असलेला आदर नेहमीच वाढवत राहतो.
  • Log in or register to post comments
प
पर्ण Mon, 12/07/2015 - 13:21 नवीन
बाजीरावांची कर्जाची चिंता शाहू छत्रपतींना ज्ञात झाल्यावर त्यांनी नामी युक्ती लढवली आणि गर्भश्रीमंत अश्या रास्तेंच्या गोपिकाबाई शी नानासाहेबांचे लग्न लावून दिले. त्यामुळे नंतर परिस्थिती काहीशी सुधारली (शाहू आणि रास्ते अत्यंत घरचे संबंध होते, या लग्नाची छानशी गोष्ट रास्तेंच्या कडूनच ऐकली वाई ला ती नंतर कधीतरी सांगेन )
आम्ही उत्सुक आहोत याबद्दल जाणून घ्यायला...
  • Log in or register to post comments
R
rahul ghate Mon, 12/07/2015 - 14:16 नवीन
श्री अविनाश धर्माधिकार्यांच्या भाषणात ऐकले आहे कि थोरले बाजीराव ११० लढाया जिंकले , जाणकारांनी कृपया खुलासा करावा राहुल
  • Log in or register to post comments
अ
अभिजित - १ Mon, 12/07/2015 - 15:04 नवीन
बाजी मारली , बाझीगर इत्यादी शब्द "बाजीराव" नावावरून / त्यांना आदर म्हणून वापरणे सुरु झाले असे कुठेतरी वाचले ? ते खरे आहे का ?
  • Log in or register to post comments
ह
हेमंत लाटकर Mon, 12/07/2015 - 18:12 नवीन
@ राहुल बाजीरावांनी 41 लढाया जिकल्या. @ अभिजित खरे आहे
  • Log in or register to post comments
म
मनो Tue, 12/08/2015 - 01:32 नवीन
लाटकर साहेब, अभिजित, बाझी ( بازی ) हा फारसी शब्द आहे. त्याचा अर्थ खेळ (play, game, sport, fun, action). बहामनी आणि सुलतानी काळात हा शब्द मराठीत शिरला तसाच तो इतर भारतीय भाषांमध्येही गेला. शिवकालीन बाजी पासलकर प्रसिद्ध आहेत. त्यामुळे बाजीराव हे नाव तसे पेशवेकाळापर्यंत तसे जुने झाले होते. बाजी मारली आणि बाझीगर यांचा बाजीराव पेशव्यांशी तसा काही संबंध नाही.
  • Log in or register to post comments
अ
अभिजित - १ Tue, 12/08/2015 - 14:34 नवीन
बाजी नाव जुनेच आहे / होते ( पेशवे किवा शिवाजी महाराजांच्या वेळेला पण ) तुम्ही बाझी = खेळ हा फारसी शब्द सांगितलात. पण बाझी / बाजी = विजय , जसे कि युद्धात किवा खेळात बाजी मारली. हा अर्थ बाजीराव पेशवे च्या कारकिर्दी नंतर सुरु झाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनो
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा