आस्तिक वैज्ञानिक
काही वैज्ञानिक आस्तिक असतात हे खरे आहे. मात्र सर्व सामान्य जनतेत आस्तिकांचे प्रमाण 90% हून अधिक आहे; तर भौतिक शास्त्रज्ञांत ते 10% हून कमी आहे, असे अनेक विश्वासार्ह सर्वेक्षणे दाखवतात. म्हणजे 90% वैज्ञानिक नास्तिक असतात. ज्यांनी मूलभूत (बेसिक) विज्ञानाचा अभ्यास केला आहे त्यांत 100 तील 10 जण तरी आस्तिक का असावेत ? याचे स्पष्टीकरण पुढीलप्रमाणे देता येते.:-
पूर्वी माणसाला निसर्गनियमांविषयी निश्चित असे ज्ञान नव्हते. नैसर्गिक घटनांचे कार्य-कारणभाव कळत नव्हते. अनुभवाने जेवढे समजत होते तेवढेच. भूकंप, वणवे, महापूर, वादळे अशा आपत्तींनी भेदरलेल्या माणसाला या संकटांत कुणाचा तरी आधार हवा होता. हे उत्पात कोण घडवतो हे समजत नव्हते. पण तो कोणीतरी महासामर्थ्यशाली, अलौकिक पुरुष असला पाहिजे असे वाटत होते. अशा परिस्थितीत माणसाला देवकल्पना सुचली असावी. या काल्पनिक देवाला त्याने आपला रक्षणकर्ता मानले. हे बारा/पंधरा हजार वर्षांपूर्वी घडले असावे. देवाने संकटातून वाचवायचे तर त्याला शरण जायला हवे. त्याची स्तुती करायला हवी. त्याला संतुष्ट ठेवायला हवे. त्यासाठी काही अर्पण करायला हवे. त्यांतून ईशस्तवन- देवपूजा-गंध-फूल-अक्षता-नैवेद्य-बळी- अशा प्रथा पडल्या.
ही देवकल्पना माणसाला आश्वासक वाटू लागली. आवडली. ती मागच्या पिढीकडून पुढच्या पिढीकडे संक्रमित होत गेली. बालपणी मुलगी जे पाहायची, ऐकायची, करायची ते आणि तसे पुढे आपल्या मुलांना सांगायची. आजही आई ,"देवबाप्पाला नमो कर . तो तुला बुद्धी देतो. यश देतो. आयुष्य देतो. संकटातून वाचवतो. " असे आपल्या मुलांना सांगते. कारण तिने तसे आपल्या आईकडून ऐकलेले असते. आपले माता-पिता काय करतात, काय सांगतात. आजूबाजूची मोठी माणसे काय बोलतात, काय करतात. ते बालक पाहाते. देवदर्शनासाठी जमलेल्या गर्दीची दृश्ये टी.व्ही.वर बघते. वर्तमानपत्रात भक्तांच्या गर्दीचे फोटो न्याहाळते. देवाचा जयजयकार ऐकते. मोठे झाल्यावर देवाविषयी वाचते, ऐकते, पाहाते. समाजात सर्वत्र देवाचा उदो उदो होतो असे त्याला दिसते. त्यामुळे मेंदूत संस्कार दृढ होतात. डोक्यावर चढलेले हे भ्रामक संस्कारांचे गाठोडे झुगारून देणे अवघड असते. जगप्रसिद्ध नास्तिक रिचर्ड डॉकिन्स म्हणतात, "आपल्या बाळाला देवा-धर्माच्या संस्कारांचे विष आई स्वमुखातून पाजते. त्याचा परिणाम आयुष्यभर टिकू शकतो."
काही वैज्ञानिकांची देवावर श्रद्धा असते त्याचे कारण या लहानपणीच्या संस्कारात आहे. बालपणी मेंदूत कोरले गेलेले हे संस्कार दृढमूल होतात. मेंदूच्या एका कप्प्यात कायम राहातात. भांड्यावर कोरलेले नाव पुसून टाकणे जसे अवघड असते तसे हे मेंदूतील स्मृतिकेंद्रात कोरलेले संस्कार घालवणे दुरापास्त असते. या कारणाने बुद्धिमान वैज्ञानिकसुद्धा आस्तिक असू शकतात.
ईश्वराची संकल्पना प्रामुख्याने दोन स्तरांवर आहे. एक म्हणजे जगनिर्माता, जगन्नियंता, पूजा-अर्चा-प्रार्थना-स्तवने यांनी प्रसन्न होऊन भक्तांवर कृपा करणारा, संकटसमयीं धावून येणारा देव. हा उपासनेचा देव होय. बहुसंख्य आस्तिक हाच देव मानतात. त्याच्या कृपेसाठी व्रत-वैकल्ये, हवने-अनुष्ठाने करतात. दुसरा म्हणजे विश्वनिर्माता, निर्गुण, निराकार ईश्वर. त्याने केलेल्या नियमांनुसार विश्व चालते. विश्वरहाटीत तो कोणतीही ढवळाढवळ करीत नाही. या ईश्वराशी माणूस कोणत्याही प्रकारे संपर्क साधू शकत नाही. त्याचे केवळ अस्तित्व मानायचे. असा ईश्वर मानणार्या आस्तिकांचे प्रमाण अल्प आहे. त्यांत या आस्तिक वैज्ञानिकांचा समावेश होतो. म.फुलेसुद्धा असे आस्तिक होते. त्यांनी या परमेश्वरासाठी "निर्मिक" असा शब्द आपल्या लेखनात योजला आहे.
ईश्वराच्या अस्तित्वाविषयीं ज्यांचे कोणतेही ठाम मत नसते ते अज्ञेयवादी होत. विश्वनिर्माता परमेश्वर असेल अथवा नसेल असे ते म्हणतात. सुधारककार आगरकर अज्ञेयवादी होते. डार्विनपूर्वकालीन कांही वैज्ञानिक अज्ञेयवादी होते. कारण इतके आश्चर्यकारक वैविध्य असलेली जीवसृष्टी निसर्गत: निर्माण झाली हे त्यांना पटत नव्हते आणि कशी निर्माण झाली याचे बुद्धिगम्य स्पष्टीकरण मिळत नव्हते. डार्विनच्या उत्क्रांतिवादातील यादृच्छिक उत्परिवर्तन (रॅंडम म्युटेशन ) आणि अयादृच्छिक नैसर्गिक निवड (नॉन रॅंडम नॅचरल सिलेक्शन) या तत्त्वाने ते स्पष्टीकरण आता मिळते. किंबहुना या तत्त्वानुसार हे वैविध्य अपरिहार्य ठरते. डार्विनच्या तत्त्वांमुळे बौद्धिकदृष्ट्या समाधानी नास्तिक होता येते. म्हणून डार्विनच्या उत्क्रांतीच्या सिद्धान्तामुळे ज्ञानाच्या क्षेत्रातून ईश्वराची हद्दपारी अधोरेखित झाली असे म्हटले जाते.
हे लिहायचे नव्हते, पण सांगावे लागते. मी पूर्ण नास्तिक आहे, पण कोणाला तू नवस का करतोस, देवळात का जातोस वगैरे विचारत नाही. मी साधारण बारावीत नास्तिक झालो. त्या नंतर ३-४ वर्ष मित्रांशी वाद वगैरे घालायचो ह्या विषयावर, तेंव्हा माझी भुमिका यनावालांसारखी असायची. पण नंतर मी नास्तिक च राहीलो पण लोकांच्या मतांमधे नाक खुपसुन त्यांना अक्कल शिकवणे बंद केले. कदाचित यनावालांना ते शहाणपण यायचे आहे.वरील प्रतिसादकाच्या जर मी चुकत नसेल तर वरील दुसरा जो प्रतिसाद आहे त्याच्याशी आपण सहमती दर्शवलेली आहे. या अगोदर यनावाला यांच्याच मंत्रसामर्थ्य धाग्यावर परा यांनी जो ७८६ व होली वॉटर चे बुरखे फाडण्याच्या प्रतीक्षेत ते आहेत म्हणजे यनावालांकडुन ते आता या अनुक्रमे इस्ल्माम व ख्रिश्चन धर्मातील अंधविश्वांसा संदर्भात चिकीत्सेच्या ते प्रतीक्षेत आहेत. असं ते म्हणालेले त्या प्रतिसादावर पण तुम्ही जोरदार सहमती दर्शवत प्रतिसादाची तारीफ केलेली होती. याचा अर्थ तुम्ही यनावाला केवळ हिन्दु विश्वासावरच नेहमी नेहमी बोलतात इतर धर्मांवर नाही इतर धर्मांची चिकीत्सा करत नाहीत वा करायला कचरतात या अर्थाने सहमती दर्शवलेली. आता तुम्ही म्हणता वरील प्रतिसादाचा हा परीच्छेद लाजवाब आहे. याचा अर्थ असा आहे का की इस्लाम व ख्रिश्चन मध्ये नाक खुपसलं जात असेल तर चांगल आहे नव्हे ते आवश्यकच आहे आणि भीतीपोटी टाळल जातय. मात्र हिन्दु धर्माचा विषय असेल तर नाक खुपसु नका तुमच्या भुमिकेत जी विसंगती आहे ती कशी याचं सखेच आश्चर्य व्यक्त करुन थांबतो. तुमच्या विषयी आदर आहे हे आवर्जुन नमुद करतो. म्हणुनच खेद अधिक वाटला.निषेध जागच्या जागी नोंदवला नाही तर साय्लेंट मेजॉरिटीला काही अर्थच राहात नाही. केवळ म्हणून.निषेध नोंदवण्याची निकड लक्षात आणुन देण्यासाठी धन्यवाद ! पुर्णपणे सहमत आहे यनावाला विरोधी विचार मांडत आहे जे आवश्यक आहे. सतत एकांगी विचारांचा मारा झाल्याने विरोधी विचार जणु अस्तित्वात नाहीच अशी काहीशी धारणा तयार होते. कम्युनिस्ट शासनात काही ठीकाणी जसं विरोधी मत व्यक्त करणंच फार मोठं पाप मानल जायच अस काहीसं वातावरण निर्माण करणं फार चुक आहे. हे विचार बीजपेरणी या द्रुष्टीने महत्वाचे आहेत. एक विरोधी विचार मनासमोर आल्यावर जरी त्याला बळजबरीने विना तर्क भावनिकतेने च उडवुन लावला तरी तो कुठेतरी अंतर्मनात खोलवर जाऊन रुजलेला असतोच. तो नंतर अनुभव चिंतन आदीत पुन्हा उफाळुन वर येत असतो. विचार-बीज रुजवणं महत्वाचं ते काम यनावाला उत्तम संयत शैलीत करत आहेत. त्यांना प्रतिवाद न करता सतत व्यक्तीगत हल्ले करण्यातुन तो त्यांचा विचार कीती आतपर्यंत रुजलाय व अस्वस्थ करतोय. हे दिसुन येत आहे. पुर्वीचे प्रतिवाद काही किमान काही तरी मुळ मुद्द्याच्या जवळपास तरी होते. आता तर एक नविनच असंबद्ध कीती असावा प्रतिसाद याचा एकेक उच्चांक बघायला मिळतोय. यनावाला यांना दिल्या जात असलेल्या व्यक्तीगत व असंबद्ध प्रतिसादांचा निसंदिग्ध निषेध नोंदवतो. यनावाला तुम्ही लिहीत रहावे ही विनंती.एखाद्या वैयक्तिक गोष्टीसाठी माणूस जगप्रसिध्द वगैरे होतो?अभिमान बाळगणे चुकच या तुमच्या मुद्द्याशी पुर्णपणे सहमत आहे. आस्तिक वा नास्तिक वा कोणती विचारधारा असल्याचा अभिमान बाळगणे चुकच आहे यात काहीच शंका नाही. आता ते रीचर्ड डॉकीन्स जगप्रसिध्द नास्तिक म्हणत आहेत ते अशासाठी की रीचर्ड डॉकीन्स एक शास्त्रज्ञ म्हणुन एक अनेक विख्यात ग्रंथांचा लेखक म्हणून अनेक जाहीर वाद विवादांत विशीष्ट विचारसरणीच्या बाजुने मते मांडण्यासाठी खरोखरच प्रसिद्ध आहे. ते अॅज अ मॅटर ऑफ फॅक्ट मांडले तर गैर काय ? ती नुसती वैयक्तीक बाब त्याच्यासाठी नाही तो एक वैचारीक लढा आहे. जो तो अनेक वर्षांपासुन लढतोय.