Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

आस्तिक वैज्ञानिक

य
यनावाला
Tue, 12/01/2015 - 17:10
🗣 228 प्रतिसाद
काही वैज्ञानिक आस्तिक असतात हे खरे आहे. मात्र सर्व सामान्य जनतेत आस्तिकांचे प्रमाण 90% हून अधिक आहे; तर भौतिक शास्त्रज्ञांत ते 10% हून कमी आहे, असे अनेक विश्वासार्ह सर्वेक्षणे दाखवतात. म्हणजे 90% वैज्ञानिक नास्तिक असतात. ज्यांनी मूलभूत (बेसिक) विज्ञानाचा अभ्यास केला आहे त्यांत 100 तील 10 जण तरी आस्तिक का असावेत ? याचे स्पष्टीकरण पुढीलप्रमाणे देता येते.:- पूर्वी माणसाला निसर्गनियमांविषयी निश्चित असे ज्ञान नव्हते. नैसर्गिक घटनांचे कार्य-कारणभाव कळत नव्हते. अनुभवाने जेवढे समजत होते तेवढेच. भूकंप, वणवे, महापूर, वादळे अशा आपत्तींनी भेदरलेल्या माणसाला या संकटांत कुणाचा तरी आधार हवा होता. हे उत्पात कोण घडवतो हे समजत नव्हते. पण तो कोणीतरी महासामर्थ्यशाली, अलौकिक पुरुष असला पाहिजे असे वाटत होते. अशा परिस्थितीत माणसाला देवकल्पना सुचली असावी. या काल्पनिक देवाला त्याने आपला रक्षणकर्ता मानले. हे बारा/पंधरा हजार वर्षांपूर्वी घडले असावे. देवाने संकटातून वाचवायचे तर त्याला शरण जायला हवे. त्याची स्तुती करायला हवी. त्याला संतुष्ट ठेवायला हवे. त्यासाठी काही अर्पण करायला हवे. त्यांतून ईशस्तवन- देवपूजा-गंध-फूल-अक्षता-नैवेद्य-बळी- अशा प्रथा पडल्या. ही देवकल्पना माणसाला आश्वासक वाटू लागली. आवडली. ती मागच्या पिढीकडून पुढच्या पिढीकडे संक्रमित होत गेली. बालपणी मुलगी जे पाहायची, ऐकायची, करायची ते आणि तसे पुढे आपल्या मुलांना सांगायची. आजही आई ,"देवबाप्पाला नमो कर . तो तुला बुद्धी देतो. यश देतो. आयुष्य देतो. संकटातून वाचवतो. " असे आपल्या मुलांना सांगते. कारण तिने तसे आपल्या आईकडून ऐकलेले असते. आपले माता-पिता काय करतात, काय सांगतात. आजूबाजूची मोठी माणसे काय बोलतात, काय करतात. ते बालक पाहाते. देवदर्शनासाठी जमलेल्या गर्दीची दृश्ये टी.व्ही.वर बघते. वर्तमानपत्रात भक्तांच्या गर्दीचे फोटो न्याहाळते. देवाचा जयजयकार ऐकते. मोठे झाल्यावर देवाविषयी वाचते, ऐकते, पाहाते. समाजात सर्वत्र देवाचा उदो उदो होतो असे त्याला दिसते. त्यामुळे मेंदूत संस्कार दृढ होतात. डोक्यावर चढलेले हे भ्रामक संस्कारांचे गाठोडे झुगारून देणे अवघड असते. जगप्रसिद्ध नास्तिक रिचर्ड डॉकिन्स म्हणतात, "आपल्या बाळाला देवा-धर्माच्या संस्कारांचे विष आई स्वमुखातून पाजते. त्याचा परिणाम आयुष्यभर टिकू शकतो." काही वैज्ञानिकांची देवावर श्रद्धा असते त्याचे कारण या लहानपणीच्या संस्कारात आहे. बालपणी मेंदूत कोरले गेलेले हे संस्कार दृढमूल होतात. मेंदूच्या एका कप्प्यात कायम राहातात. भांड्यावर कोरलेले नाव पुसून टाकणे जसे अवघड असते तसे हे मेंदूतील स्मृतिकेंद्रात कोरलेले संस्कार घालवणे दुरापास्त असते. या कारणाने बुद्धिमान वैज्ञानिकसुद्धा आस्तिक असू शकतात. ईश्वराची संकल्पना प्रामुख्याने दोन स्तरांवर आहे. एक म्हणजे जगनिर्माता, जगन्नियंता, पूजा-अर्चा-प्रार्थना-स्तवने यांनी प्रसन्न होऊन भक्तांवर कृपा करणारा, संकटसमयीं धावून येणारा देव. हा उपासनेचा देव होय. बहुसंख्य आस्तिक हाच देव मानतात. त्याच्या कृपेसाठी व्रत-वैकल्ये, हवने-अनुष्ठाने करतात. दुसरा म्हणजे विश्वनिर्माता, निर्गुण, निराकार ईश्वर. त्याने केलेल्या नियमांनुसार विश्व चालते. विश्वरहाटीत तो कोणतीही ढवळाढवळ करीत नाही. या ईश्वराशी माणूस कोणत्याही प्रकारे संपर्क साधू शकत नाही. त्याचे केवळ अस्तित्व मानायचे. असा ईश्वर मानणार्‍या आस्तिकांचे प्रमाण अल्प आहे. त्यांत या आस्तिक वैज्ञानिकांचा समावेश होतो. म.फुलेसुद्धा असे आस्तिक होते. त्यांनी या परमेश्वरासाठी "निर्मिक" असा शब्द आपल्या लेखनात योजला आहे. ईश्वराच्या अस्तित्वाविषयीं ज्यांचे कोणतेही ठाम मत नसते ते अज्ञेयवादी होत. विश्वनिर्माता परमेश्वर असेल अथवा नसेल असे ते म्हणतात. सुधारककार आगरकर अज्ञेयवादी होते. डार्विनपूर्वकालीन कांही वैज्ञानिक अज्ञेयवादी होते. कारण इतके आश्चर्यकारक वैविध्य असलेली जीवसृष्टी निसर्गत: निर्माण झाली हे त्यांना पटत नव्हते आणि कशी निर्माण झाली याचे बुद्धिगम्य स्पष्टीकरण मिळत नव्हते. डार्विनच्या उत्क्रांतिवादातील यादृच्छिक उत्परिवर्तन (रॅंडम म्युटेशन ) आणि अयादृच्छिक नैसर्गिक निवड (नॉन रॅंडम नॅचरल सिलेक्शन) या तत्त्वाने ते स्पष्टीकरण आता मिळते. किंबहुना या तत्त्वानुसार हे वैविध्य अपरिहार्य ठरते. डार्विनच्या तत्त्वांमुळे बौद्धिकदृष्ट्या समाधानी नास्तिक होता येते. म्हणून डार्विनच्या उत्क्रांतीच्या सिद्धान्तामुळे ज्ञानाच्या क्षेत्रातून ईश्वराची हद्दपारी अधोरेखित झाली असे म्हटले जाते.
वर्गीकरण
चर्चा

प्रतिक्रिया द्या
68636 वाचन

💬 प्रतिसाद (228)
र
राजेश घासकडवी Wed, 12/02/2015 - 16:17 नवीन
अरे वा, केंट होविंड!! अहो तो म्हणतो की पृथ्वी सहा हजार वर्षांपूर्वी निर्माण झाली! आणि त्याच्या भंपक युक्तिवादांवर त्याचे समविचारीही विश्वास ठेवत नाहीत. Kent E. Hovind (born January 15, 1953) is an American Christian fundamentalist evangelist and tax protester. He is a controversial figure in the Young Earth creationist movement and his ministry focuses on attempting to convince listeners to deny scientific theories including evolution, geophysics, and cosmology in favor of a literalist interpretation of the Genesis creation narrative found in the Bible. Hovind's views, which combine elements of creation science and conspiracy theory, are dismissed by the scientific community as fringe theory and pseudo-scholarship. Moreover, he has been criticized by Young Earth Creationist organizations like Answers in Genesis for his continued use of discredited arguments that have been abandoned by others in the movement. तुम्हाला मी चांगले संदर्भ दिले, त्यात तुम्हाला उत्तरं सापडतील अशी आशा होती. तर ती उत्तरं शोधण्यापेक्षा कोणीतरी वायझेड माणूस काय म्हणतो आहे याच्या लिका काय देताय मला? तुम्हाला उत्तरं सापडल्याने अधिक आनंद होईल की काही न तपासता यनावालांचं म्हणणं खोडायचंच म्हणून खोडण्यात आनंद मिळेल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
म
मांत्रिक Wed, 12/02/2015 - 16:18 नवीन
दुसरेच वायझेड आणि तुम्ही तेवढे माझी लाल वाले....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
र
राजेश घासकडवी Wed, 12/02/2015 - 16:25 नवीन
केंट हॉविंडला मी जरूर वायझेड म्हणेन. सहा हजार वर्षांपूर्वी पृथ्वी निर्माण झाली यावर तुम्ही तरी विश्वास ठेवाल का? बायबलच्या जेनेसिसचा शब्दशः अर्थ घेणाऱ्याला काय म्हणायचं? एकंदरीत तुम्हाला उत्तरं शोधण्यात आनंद आहे की व्यक्तिगत हल्ले करण्यात आनंद आहे ते कळलं. धन्यवाद. आणि हो, मी दिलेल्या लिंका कृपा करून जरा नजरेखालून तरी घाला हो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मांत्रिक
म
मांत्रिक Wed, 12/02/2015 - 16:33 नवीन
साहेब केंट हाविड आमचा आदर्श नाहीये. एक उदाहरण दिलं गेलं असेल. जौ देत. आमचा आदर्श ज्ञानोबा तुकोबा नामया हेच आहेत. हे तीन ग्रेट सोल्स काय म्हणले हे तुम्हाला कळत नसेल तर तुमची जिणगाणी व्यर्थच म्हणेन. नीट वाचा त्यांना. बाकी तुमची हिंदु धर्माविषयी संस्कृतीविषयी पुराणी मळमळ जळजळ माहितेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
र
राजेश घासकडवी Wed, 12/02/2015 - 16:42 नवीन
त्यांनी उत्क्रांतीविषयी काय लिहिलेलं होतं ते वाचायला आवडेल. आणि यात हिंदू धर्माचा काय संबंध आला? तुम्ही विचारलं की 'घंटा एकाही शास्त्रज्ञाला माणूस कसा झाला हे माहीत नाही.' मी म्हटलं नाही, हे चुकीचं आहे - आणि ते सांगणाऱ्या लिंका दिल्या. त्या मुकाट्याने वाचून प्रतिवाद करण्याऐवजी कोणीतरी यडपट त्याला होक्स म्हणतो हे सांगितलं. नंतर तुमचीच लाल, हिंदू धर्माविषयी मळमळ, जळजळ वगैरे काहीतरी निरर्थक बडबड करत आहात. असो. तुमच्यासमोर गीता वाचायची नाही असं ठरवलं आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मांत्रिक
म
मांत्रिक Wed, 12/02/2015 - 16:46 नवीन
तुमाला गीता वाचताच येणार नाही कारण तुमी स्वमतांध गा** आहात....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
म
मांत्रिक Wed, 12/02/2015 - 16:51 नवीन
त्यांनी उत्क्रांतीविषयी काय लिहिलेलं होतं ते वाचायला आवडेल. त्यांनी उत्क्रांतीविषयी का लिहावं. ज्ञानोबाला तुकोबाला जो विषय समजत होता त्याविषयी त्यांनी लिहिलं. त्यात चुकिचं काय? तसंही ज्यातील आपल्याला काय कळत नाही त्यावर लिहायला ते स्वमतांध दांभिक नाहीत....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
म
मांत्रिक Wed, 12/02/2015 - 17:04 नवीन
एकंदरीत तुम्हाला उत्तरं शोधण्यात आनंद आहे की व्यक्तिगत हल्ले करण्यात आनंद आहे ते कळलं. धन्यवाद. सर तुम्ही किती व्यक्तिगत हल्ले केले व त्यावर काय काय भयानक प्रतिसाद दिले गेले हे चांगलंच माहिते. तुमी तरी दुसर्याला व्यक्तिगत हल्ले करणारा म्हणू नये!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मांत्रिक
म
मारवा गुरुवार, 12/03/2015 - 12:15 नवीन
आपण दुसरी बाजु वाचण्याचीही गरज समजत नाही ठीक आहे. आपण वरील ज्या संतांची नावी सांगितली त्या संदर्भात आपली चर्चेची तयारी आहे का ? म्हणजे मी आपणास असे सांगुन उपयोग नाही की आपण गॉड डेल्युजन वाचावं म्हणुन मी म्हणतोय ठीक आहे तुमच्या निर्देशीत केलेल्या वरील संताच्या संदर्भातुन चर्चा करण्याची आपली तयारी आहे का? तुम्हाला प्रश्न ही कमीत कमी विचारतो सरळ विधाने मांडतो तुम्ही त्यावर काय भुमिका आहे ती मांडावी. आहे तुम्हाला खरोखर गंभीरपणे रस ? मला तुमच्याविषयी अजुनही पुर्ण खात्री आहे की तुम्ही अजुनही एका सकारात्मक दिशेने चर्चा कराल कदाचित तुम्ही मला एखादा नविन विचारही देऊ शकता यावीषयी देखील माझ्या मनात शंका नाही हे प्रामाणिकपणे सांगतो. अजुन एक आवर्जुन सांगतो राजेशजी तुमच्याशी अत्यंत पोटतिडीकीने संवाद साधण्याचा प्रयत्न करत होते. मी त्यांना व्यक्तीगत ओळखत नाही मी त्यांना तुमच्याइतकाच केवळ आंतरजालीय वावरातुनच ओळखतो त्यावरुन सांगतो त्यांचा उत्क्रांती या विषयाचा अत्यंत सखोल असा अभ्यास आहे. तुम्ही किमान एकदा तरी त्यांनी दिलेल्या लिंका संदर्भ तपासुन पाहण्याची तसदी घेतली असती तर कदाचित तुम्हाला एक नविन विचार मिळू शकला असता. अजुन एक मी कधीही असे म्हणत नाही की तुम्ही माझ्याच विचारांशी सहमत व्हाच कधीच नाही मात्र मी असे म्हणतो की तुम्ही किमान एका सकारात्मक रीतीने असंबद्धता व्यक्तीगतता टाळून गंभीरतेने वरील प्रकारच्या विषयांवर संवाद अ‍ॅक्टीव्हली तरी साधावा म्हणजे अशी नम्रपणे सुचवणी करतो. तुम्ही असहमत पुर्णपणे झाला अशा चर्चेअंती तरी त्याने काहीच फरक पडत नाही म्हणजे त्यात काहीही गैर नाही, मात्र एकदा स्वतंत्रपणे तुम्ही विषयाला भिडुन तर बघा असे सुचवितो मांत्रिक जी मी तुम्हाला वेगळा किंवा शत्रु कींवा आस्तिक गटातला यापैकी काहीही समजत नाही. मला तुमच्याविषयी आस्था एक व्यक्ती म्हणुन आहे. आणि राहील तुमची कुठलीका विचारधारा असेना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मांत्रिक
म
मांत्रिक Wed, 12/02/2015 - 17:15 नवीन
बायबलच्या जेनेसिसचा शब्दशः अर्थ घेणाऱ्याला काय म्हणायचंयातूनच कळतं की तुम्ही पवित्र बायबलच्या गहन गूढ अर्थावर विश्वास ठेवता. मग भगवान येशू ख्रिस्त म्हणाला कीः 'अहो कष्टी व भाराक्रांत जनहो! तुम्ही मजकडे या! मी तुम्हाला विसावा देईन!!!' हे वाक्य कुठलाही स्वमतांध दांभिक विज्ञानी म्हणेल काय? नाही! तो म्हणणार की प्रत्येक जीव डीएनए अनुसार भिन्नच आहे. मी त्याला आपला का म्हणू????? ही बात आहे सर. विज्ञान बरोबर असून पण भेदभाव निर्माण करते तर अध्यात्म त्या भेदभावाला कवेत घेऊ बघते!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
म
मांत्रिक Wed, 12/02/2015 - 17:20 नवीन
भगवान कृष्ण म्हणतो: अनन्याश्चिंतयतो माम् ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानाम् योगक्षेमम् वहाम्यहम्!!! हे आश्वासन स्वमतांध दांभिक विवेकवादी, विज्ञानवादी किंवा त्यांचे हिरवे चिल्लेपिल्ले, आपल्यासारखे, देऊ शकतात? खरंच सांगा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मांत्रिक
ग
गवि गुरुवार, 12/03/2015 - 04:30 नवीन
श्री.रा.रा.रा.घासकडवी, तुमचे खालील म्हणणे योग्य आहे.
सहा हजार वर्षांपूर्वी पृथ्वी निर्माण झाली यावर तुम्ही तरी विश्वास ठेवाल का? बायबलच्या जेनेसिसचा शब्दशः अर्थ घेणाऱ्याला काय म्हणायचं?
वास्तविक जग समुद्रमंथनाच्या वेळी तयार झालंय. चौदा रत्नं म्हणजे मूळ चौदा जीवजाती. तुम्ही समुद्रमंथनाचा अभ्यास केलाय का? नसल्यास आधी करुन या आणि मग बघू. उगीच सगळीकडे उत्क्रांती उत्क्रांती करत असता. सोडा ही आंधळी डार्विनपूजा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
र
राही Sun, 12/06/2015 - 06:26 नवीन
नाय तर काय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
स
संदीप डांगे Wed, 12/02/2015 - 16:41 नवीन
अहो सर. मी फक्त एक मुद्दा मांडला आहे. तुम्ही ज्या लिंका दिल्यात त्याविरोधातही काही आहे हे सांगण्यासाठी. बाकी डिटेलमधे चर्चा करायला एक वेगळा धागा हवा असे मीच म्हटले आहे. मी विडियो दिला म्हणजे मला त्याचे सगळेच दावे मान्य आहेत असे नाही. पण बिगबँग थेरी व हुमन एम्ब्रायो बद्दल आहे तो एक विचारात घेण्यासारखा मुद्दा तर आहे की नाही. तो पृथ्विचं वय सहा हजार वर्षे सांगतो म्हणून त्याचे सगळेच विचार नाकारले पाहिजेत का? हजार वाक्यातले दोन तर ग्राह्य असतीलच की. मी फक्त चर्चेसाठी मुद्दा दिलाय. त्यात अधिक अभ्यास करून विस्तृत लेख लिहिता येइलच. आजवर इवॉल्युशन थेरी हीच नेहमी समोर येत राहिली आहे. त्या विरोधात विचार आहेत (भले ते चुकीचे, बरोबर कसेही) हे कधी सांगितल्या जात नाहीत. निदान शाळेत तरी. इवॉल्युशन थेरीचा विरोध करणारे अनेक आहेत, त्यांचेही अभ्यासपूर्ण दावे आहेत हे आमच्यासारख्या सामान्य लोकांपर्यंत कधी पोचले नाहीत. त्यांच्या दाव्यांचा मी अभ्यास करत आहे. काही समजलं अन् जमलं तर लेख टाकेन. नेहमीच इवॉल्युशन थेरी तोंडावर फेकून मारणारे पाहिलेत पण त्याच्यातही लूपहोल्स आहेत असे सांगणारे, त्यावर चर्चा करणारे आजवर कुणी भेटले नाही. म्हटलं आपण करुया सुरुवात. तर वैज्ञानिक विचारसरणीचे लोक लगेच वायझेड म्हणून मोकळे होतात. बाकी, कुणाला वायझेड म्हणायचे हा सर्वस्वी तुमचा प्रश्न आहे. मी तरी कुणालाच वायझेड म्हणत नाही. अस्तिक असो वा नास्तिक. वैज्ञानिक असो वा सामान्य. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
र
राजेश घासकडवी Wed, 12/02/2015 - 17:34 नवीन
जरूर. असं करूया, मी एक उत्क्रांतीविषयी लेखमाला लिहितो, तुम्ही उत्क्रांतीतली लूपहोल्स सांगणारी लेखमाला लिहा. आपली जी चर्चा होईल त्यातून अनेकांना शिकायला मिळेल. पण कृपया त्यासाठी केंट होविंड वगैरेंसारख्या बोगस लोकांचे आधार घेण्याची गरज नाही. उत्क्रांतीवादाचं सध्याचं स्वरूप असं आहे की त्यातल्या मूलभूत तथ्याला कोणीच विरोध करत नाही. काही बारीकसारीक गोष्टी नक्की कशा घडल्या असाव्यात याबद्दल वाद आहे - आणि अशा वादांतूनच कुठचंही ज्ञान हळूहळू पुढे जातं, थियरी फाइन ट्यून होत जाते. पण आत्तापर्यंत उत्क्रांतीवादाला इतके प्रचंड आणि भक्कम पुरावे आहेत की उत्क्रांती झाली हे नाकारणं अशक्य आहे. मूळ मुद्दा असा आहे की 'वैज्ञानिकहो, तुम्ही एवढे शहाणे समजता, तर याचं उत्तर द्या पाहू!' अशा आव्हानांना बहुतेक वेळा अर्थ नसतो. कारण बऱ्याच प्रश्नांची उत्तरं सापडली आहेत हेही लोकांना माहीत नसतं. उत्तरं शोधण्यापेक्षा त्या प्रश्नांच्या गूढपणातच वावरायला आवडतं. हे मी तुमच्याविषयी नाही, तर काही लोकांमध्ये दिसणाऱ्या प्रवृत्तीविषयी बोलतो आहे. तीनशे वर्षांपूर्वी माणूस कसा निर्माण झाला, उत्क्रांत झाला हे कोणाला माहीत नव्हतं. त्यावेळी कोणी न्यूटनला म्हटलं असतं 'आलाय मोठा शहाणा आम्हाला गुरुत्वाकर्षण शिकवायला. म्हणे सूर्याभोवती पृथ्वी फिरते! अरे भल्या माणसा, आधी तुझा जन्म कसा झाला ते सांग. नाही येत ना सांगता, मग तुझ्या विज्ञानाला काय अर्थ आहे? यावरून देवच श्रेष्ठ आहे, त्यानेच सूर्यचंद्रपृथ्वी बनवले आणि सूर्य पृथ्वीभोवती फिरतो हेच सिद्ध होतं' पण या युक्तिवादाला अर्थ आहे का? त्याने त्याचा गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत खोटा ठरतो का? असो. स्वतंत्र लेखनच होऊन जाऊदेत या विषयांवर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
श
शब्दबम्बाळ Wed, 12/02/2015 - 22:37 नवीन
लिहाच तुम्ही, विज्ञान हे माणसाला प्रश्न विचारायला शिकवत आणि त्याची उत्तरे शोधायला प्रवृत्त करते. पण धर्म मात्र जणू प्रश्न विचारण्यालाच आक्षेप घेतो (इथे धर्मापेक्षा त्याचे 'रखवालदार' असे म्हणणे योग्य ठरेल) माणसाला सृष्टीविषयी सगळी माहिती नक्कीच नाही पण ज्या गोष्टीविषयी माहिती नाही अशा गोष्टींची माहिती मिळवण्याची धडपड वैज्ञानिकांनी थांबवलेली नाही. वेगवेगळी प्रमेय सिद्धांत मांडले जातात त्यांवर चर्चा होते, काही टिकतात तर काही कालबाह्य होतात. आणि हाच मोठा फरक आहे! विज्ञान कालबाह्य झालेल्या गोष्टीना सोडून देण्यास मागेपुढे पहात नाही. समोर दिसणाऱ्या सिध्द झालेल्या सत्याला स्वीकारण्याची त्याची वृत्ती आहे. Conspiracy theories ना सत्य मानणारेदेखील बरेच असतील आणि त्याकडे दुर्लक्ष्यदेखील करता येत नाही कारण जोपर्यंत एखादी गोष्ट नाही हे सिध्द होत नाही तोपर्यंत विज्ञान त्याकडे दुर्लक्ष्य करू शकत नाही. म्हणूनच आस्तिक-नास्तिक वाद अजूनही आहे. आणि वाद असण्यात काहीच गैर नाही पण आपण नकळत सत्याला नाकारून केवळ धर्म संरक्षण तर करत नाही ना हे सुद्धा बघितलं पाहिजे. कारण केवळ धर्म संरक्षणासाठी चर्चनी गलिलेओचे हाल हाल केले आणि धर्माच्या पगड्यामुळे लोकांनीही विरोध केला नाही. तब्बल ४०० वर्षांनी चर्चनी माफी मागितली! परंतु इतकी वर्ष त्याच्या महत्वाच्या लेखनाला प्रसिद्धी न मिळाल्याने माणसाचेच नुकसान झाले...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
आ
आनन्दा गुरुवार, 12/03/2015 - 04:23 नवीन
जोपर्यंत एखादी गोष्ट नाही हे सिध्द होत नाही तोपर्यंत विज्ञान त्याकडे दुर्लक्ष्य करू शकत नाही. म्हणूनच आस्तिक-नास्तिक वाद अजूनही आहे.
जोरदार सहमत.. आणि म्हणूनच मी अजून आस्तिक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शब्दबम्बाळ
स
संदीप डांगे Sun, 12/06/2015 - 06:56 नवीन
विज्ञान हे माणसाला प्रश्न विचारायला शिकवत आणि त्याची उत्तरे शोधायला प्रवृत्त करते. बरोबर. माझेही हेच मत आहे. पण काही लोक प्रश्नच चुकीचे आहेत हे सिद्ध करण्याच्या मागे असतात. पण धर्म मात्र जणू प्रश्न विचारण्यालाच आक्षेप घेतो (इथे धर्मापेक्षा त्याचे 'रखवालदार' असे म्हणणे योग्य ठरेल) धर्म विचार करण्याच्या प्रक्रियेलाच आक्षेप घेतो. कारण कळप सांभाळण्याची गरज धर्माच्या रखवालदारांना असते. आणी असा कळप टिकून राहण्याची गरज कळपातल्या मेंढ्यांना असते. माणसाला सृष्टीविषयी सगळी माहिती नक्कीच नाही पण ज्या गोष्टीविषयी माहिती नाही अशा गोष्टींची माहिती मिळवण्याची धडपड वैज्ञानिकांनी थांबवलेली नाही. वेगवेगळी प्रमेय सिद्धांत मांडले जातात त्यांवर चर्चा होते, काही टिकतात तर काही कालबाह्य होतात. माणसाच्या आकलनाला मर्यादा आहेत. पुराव्यांचे इंटरप्रीटेशन करून सिद्धांत/प्रमेये मांडल्या जातात. काही टिकतात, काही टिकत नाहीत याचा अर्थच हा आहे की इंटरप्रीटेशनवर सिद्धांत अवलंबून आहेत. पुराव्यांवर नाही. कारण पुराव्यांना मर्यादा पडतात. कुठल्याही थेरीला नाकारतांना त्यात झालेली नवी संशोधने पुर्वीच्या संशोधनातल्या पुराव्यांच्या उणिवा शोधून काढतात. जरी एखादी थेरी प्रयोग करून निष्कर्ष काढून कितीही समर्थ दिसत असली तरी ती त्या विवक्षित वेळेपुरती समर्थ असते. पुढचे वेगळी संशोधने तिला बाद करतात. हेच विज्ञान आहे. त्यामुळे विज्ञानात कुठलाही शब्द अंतिम नसतो. आणि हाच मोठा फरक आहे! विज्ञान कालबाह्य झालेल्या गोष्टीना सोडून देण्यास मागेपुढे पहात नाही. समोर दिसणाऱ्या सिध्द झालेल्या सत्याला स्वीकारण्याची त्याची वृत्ती आहे. बरोबर, धर्म आणि विज्ञानात फरक आहेच. पण लोक धर्म आणि विज्ञान ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत हेच मान्य करत नाहीत. बदलत्या काळानुसार लोकांची धार्मिक आचरणं व त्यामागचे विचार बदलत आहेत. यश न देणार्‍या खुळचट मान्यतांच्या मागे न लागता लोक विज्ञानावर आधी विश्वास ठेवतात. पण जिथे विज्ञान उत्तर देऊ शकत नाही तिथे त्यांना धार्मिक आधार लागतोच. पण काही विज्ञानवादी हे समजून न घेता विचित्र वागतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शब्दबम्बाळ
स
संदीप डांगे गुरुवार, 12/03/2015 - 05:05 नवीन
या प्रतिसादाबद्दल धन्यवाद! माझेही काहीसे असेच मत उलट प्रकारे आहे. असो. आस्तिकांच्या घट्ट धर्मसंकल्पना, विश्वाबद्दलच्या संकल्पना ह्या मुळापासून उखडण्याचा प्रयत्न झाल्याने हा झगडा उभा राहिला आहे. हा विषय मोठा आहे. एक दोन प्रतिसादात एवढा पसारा मांडणे शक्य नाही. तसेच, बोगसपणाबद्दल म्हणाल तर उत्क्रांतीवाद्यांनीही बराच बोगसपणा केलाय. विस्तृत माहितीपूर्ण लेखांतून चर्चा आवश्यक आहे. याविषयावर मिपावर आधी चर्चा झालेली असेल तर कृपया लिंक द्यावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
स
संदीप डांगे Wed, 12/02/2015 - 17:23 नवीन
ही थेरीही बाद झाली म्हणे. Image removed. शाळेत आजवर लाखो मुलांना जे शिकवले गेले ते परत करेक्ट केले का शास्त्रज्ञांनी? कारण मला ही थेरी बाद झालीये हे आजच कळते आहे. माझ्यासारख्या करोडोंना तर गंधही नसेल. वैज्ञानिक विचारसरणीचा पुरस्कार करणार्‍या स्वयंघोषित विज्ञानपंडीतांनी ह्याबद्दल खरेतर योग्य ती माहिती प्रसाराचे हे काम करणे इतर गोष्टींपेक्षा जास्त आवश्यक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
प
प्रसाद१९७१ गुरुवार, 12/03/2015 - 05:45 नवीन
एकुणच एव्होल्युशन ची एकपेशीय जीवा पासुन हळु कळु माणसा पर्यंत चे जीव निर्माण झाली ही थियरी ज्यांना पटते ते चांगलेच अंधश्रद्ध आहेत असे माझे मत आहे. तो सर्व प्रकार म्हणजे कोडेच आहे आणि अजुन तरी त्याला लॉजिकल्/रॅशनल उत्तर सापडले आहे असे मला तरी वाटत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
म
मार्मिक गोडसे Wed, 12/02/2015 - 16:45 नवीन
Evolution च्या वरील चित्रामुळे अशा शंका काढल्या जातात. मुळात Evolution हे एकरेषीय पद्धतीने झालेले नाही, त्यामुळे एकपेशीय पासून पुढे अनेकपेशी प्राणी तयार झाले तरी एकपेशी (अमिबा) अजुनही अस्तित्वात आहेच की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Wed, 12/02/2015 - 16:57 नवीन
now we are challenging our knowledge about things we learned. इथे दोन गोष्टी आहेत. माझ्या माहितीनुसार: १. परिस्थितीशी जुळवून घेण्याच्या गरजेतून सजीव उत्क्रांत होत गेले. २. अनेकपेशी प्राणी तयार झाले तरी एकपेशी अजुनही अस्तित्वात आहे वरच्या पैकी कोणतेही एक वाक्य सत्य असू शकेल. जर परिस्थितीशी जुळवून घ्यायचे तर अमिबा राहणारच नाही. अमिबाही राहत असेल तर परिस्थितीशी जुळवून घेण्याची गरज का भासावी? अकरावी सायन्सला येईपर्यंत माझा पक्का समज होता की अमीबा ही एक्स्टिंक्ट स्पीसीज आहे. कारण त्याच्यापासूनच आपण उत्क्रांत झालोना? नंतर कळले की असे काही नाही, अमिबा आहे आणि त्यामुळे काही आजारही होतात. ;-) (ही चर्चा ह्याव धाग्यावर करायची की कुणी जाणकार वेगळा धागा काढण्याची कृपा करेल?)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
अ
अर्धवटराव Wed, 12/02/2015 - 21:47 नवीन
इव्हॉल्युशन हे रॉ मटेरीयलवर प्रक्रिया करुन प्रॉडक्ट बनवण्यासारखं नाहि. बीज->अंकुर->रोपटं->ओंबी->गहु->कणिक->पोळी असं त्यात होत नाहि. ते झाडाच्या मुळासारखं असतं. एखाद्या सजीव शरीतात १० क्वालिटी असतील. त्यातल्या ४ नवीन परिस्थितीशी जुळवुन घ्यायला म्हणुन बदलतील. किंवा मूळ सजीव शरीर त्या ४ क्वालिटी रद्द करेल. म्हणजे या तीन संभावना - मूळ शरीर, ४ क्वालिटी बदललेलं शरीर, ४ क्वालिटी रद्द केलेले शरीर - स्वतंत्र शरीर रचना म्हणुन पुढे टिकुन राहायला धडपडतील. स्थल, काल, परिस्थिती आणि शरीर रचनेच्या अनंत कॉम्बीनेशन्स आणि प्रकियांचा परिपाक म्हणजे आज दिसतय तसं सजीव शरीर. अर्थात, हे फार ढोबळ मानाने सुलभीकरण झालं. अवांतराबद्दल क्षमस्व.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
आ
आनन्दा गुरुवार, 12/03/2015 - 04:33 नवीन
१. परिस्थितीशी जुळवून घेण्याच्या गरजेतून सजीव उत्क्रांत होत गेले. २. अनेकपेशी प्राणी तयार झाले तरी एकपेशी अजुनही अस्तित्वात आहे
दोन्ही वाक्ये सत्य आहेत. कारण पहिले वाक्य आशयाच्या दृष्टीने अर्धे आहे. ते १. परिस्थितीशी जुळवून घेण्याच्या गरजेतून काही सजीव उत्क्रांत होत गेले. असे पाहिजे. उत्क्रांती काही स्विच फिरवून झालेली नाही. विशिष्ट प्रजातींमधील काही जीव बदलत्या परिस्थितीला जसे सामोरे गेले त्यावर त्यांची काय आणि कशी उत्क्रांंती झाले हे अवलंबून असते. आता मला सांगा. तुम्ही आणि मी. तुम्ही नाशिकला राहता. मी पुण्यात राहतो. उद्या समजा (समजा हं कारण अवास्तव उदाहरण आहे) पुण्यात पूर आला, आणि मला ४ दिवस पाण्याखाली रहावे लागले, तर माझ्या शरीरात काहीतरी म्युटेशन्स होतील, आणि माणसाअची नवीन प्रजाती तयार होईल. पण म्हणून सगळी मानवजातच नष्ट होईल असे नाही. पण जर माझी म्युटेशन्स फारच वेगळी निघाली आणि जर मी जाऊन बाकी सगळ्यांना मारून टाकले, किंवा जगबुडी आली आणि सगळेच मेले तर मग मात्र मानवजात नष्ट होईल आणि ही नवीन प्रजातच शिल्लक राहील. सगळा प्रोबॅबिलिटीचा खेळ आहे हो. मुळात उत्क्रांती म्हणजे परम्युटेशन्स असतात. त्यामुळे एखादा अंतरिम सिद्धांत असा केवळ हायपोथिसिसवर काढणे शक्य नसते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे गुरुवार, 12/03/2015 - 07:49 नवीन
आहे हो, भरपूर गोंधळ आहे. निदान माझ्या मनात तरी. ह्या विरुद्ध बाजूने विचार आणि अभ्यास करायला सुरुवात आता आता केली आहे. आधी उत्क्रांतीवाद नीट पूर्णपणे समजून घ्यायला लागेल, नंतर त्याचे लूपहोल्स. शाळेत असतांना जेवढे शिकलो तेवढंच माहित असतं. आणि शाळेत कुठे पूर्ण थेरी शिकवतात? डार्विनच्या सिद्धांताप्रमाणे असे आहे म्हटले की संपले, चिकित्सा नको, प्रश्न नको. बराच काळ तर 'सर्वायवल ऑफ द फिटेस्ट' म्हणजे 'बलवान असतात तेच टिकतात' असा चुकीचा अर्थ असलेलं वाक्य जनमान्य होतं. आता 'सर्वायवल ऑफ द फिटेस्ट' ह्या थेरीमधेही बराच गोंधळ आहे असं जाणवतं. असो. ह्या चर्चेसाठी वेगळा धागाच लागेल असं दिसतंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
म
मार्मिक गोडसे गुरुवार, 12/03/2015 - 08:29 नवीन
मुळात उत्क्रांती म्हणजे परम्युटेशन्स असतात
. अगदी योग्य शब्द. तुमचा वरील प्रतिसाद वाचल्यावर आतातरी 'हे' अजुन अस्तित्वात कसे किंवा 'हे' मिलियन कुठे गेले असे प्रश्न कोणी विचारणार नाही. ज्यांचे मुळ पुर्वज एकच आहे असे आपल्या अवती भवती मल्टी ड्रग रेझिस्टंस असलेले व मल्टी ड्रग रेझिस्टंस नसलेले अनेक टी.बी चे जिवाणू एकाचवेळी आढळतात हे कोणाला खटकत का नाही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
प
प्रसाद१९७१ गुरुवार, 12/03/2015 - 08:47 नवीन
आतातरी 'हे' अजुन अस्तित्वात कसे किंवा 'हे' मिलियन कुठे गेले असे प्रश्न कोणी विचारणार नाही.
प्रश्न हा आहे की खूप पूर्वीचे आणि आत्ताचे "हे" जर अजुन अस्तीत्वात आहेत तर मधल्या काळातले "हे" कसे गायब झाले? कोणी जेलीबीन ची कीटकॅट ऑपोऑप होताना बघितली आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
म
मार्मिक गोडसे गुरुवार, 12/03/2015 - 08:52 नवीन
तुमचा वरील प्रतिसाद वाचल्यावर आतातरी 'हे' अजुन अस्तित्वात कसे किंवा 'हे' मिलियन कुठे गेले असे प्रश्न कोणी विचारणार नाही.
नीट समजून घ्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१
भ
भृशुंडी Tue, 12/01/2015 - 20:07 नवीन
दुसरा म्हणजे विश्वनिर्माता, निर्गुण, निराकार ईश्वर. त्याने केलेल्या नियमांनुसार विश्व चालते. विश्वरहाटीत तो कोणतीही ढवळाढवळ करीत नाही. या ईश्वराशी माणूस कोणत्याही प्रकारे संपर्क साधू शकत नाही. त्याचे केवळ अस्तित्व मानायचे.
हे आवडलं.
  • Log in or register to post comments
अ
असंका Wed, 12/02/2015 - 04:17 नवीन
बिकट वाट वहिवाट... आपल्या चिकाटीला सलाम!!
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Wed, 12/02/2015 - 05:18 नवीन
बाकी सगळे जाऊ दे. मला माझ्या २ प्रश्नांची समर्पक उत्तरे द्या म्हणजे मी सुटलो.. १. या ठिकाणी लिहिलेल्या अनुभवांचा कार्यकारणभाव स्पष्ट करा. वर लिहिलेले अनुभव १००% सत्य आहेत, आणि जखमेत किडे पडणे म्हणजे नेमका कोणता आजार आहे हे एखाद्या गावाकडच्याला विचारा. तो त्या आजारचे गांभीर्य सांगेल. एखाद्या बैलाच्या अंडकोषात झालेल्या जखमेत किडे पडले तर त्यावर काय उपचार करतात ते ही विचारा. २. माणूस संमोहित नेमक्या कोणत्या कारणाने होतो? मोठ्या सभागृहात संमोहनाचे प्रयोग करणारे नेमकी कोणती वैज्ञानिक क्रिया वापरतात? आणि जाता जाता अजून एक प्रश्न, संमोहनाला आपण अंधश्रद्धा मानता का? हो तर का? नाही तर का? हो असेल तर मग त्याच संमोहनाचा आधार घेऊन अंधश्रद्धा निर्मूलन करणारे श्रद्धाळूंवर आरोप का करतात?
  • Log in or register to post comments
प
प्रसाद१९७१ Wed, 12/02/2015 - 05:47 नवीन
वैताग आला हो यनावाला तुमच्या ह्या लेखांचा. आता तरी एखादा दुसरा विषय हातात घ्याना.
  • Log in or register to post comments
प
पगला गजोधर Wed, 12/02/2015 - 06:03 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे Wed, 12/02/2015 - 06:08 नवीन
लेख आवडला. माझे स्वतःचे विचार याबाबत बदलले आहेत गेल्या काही वर्षात. अजूनही बदल आहेत. ते असे लेख वाचूनच.
  • Log in or register to post comments
म
मृत्युन्जय Wed, 12/02/2015 - 06:32 नवीन
बाकी सगळे ठीक आहे. पण तुम्ही विशेषत" भौतिकशास्त्रज्ञांबद्दल लिहिले आहे म्हणुन विचारतो "God does not play dice with the universe.” असे कोण म्हणाले होते? ;) शिवाय खालचे वाक्य कोणाचे आहे ते देखील सांगा आणि हा माणूस डार्विनच्या आधीचा की नंतरचा ते पण सांगा. “I want to know how God created this world. I am not interested in this or that phenomenon, in the spectrum of this or that element. I want to know His thoughts; the rest are details.” असले काही बोलणार्‍या माणसाला भौतिकशास्त्राबद्दल फार काही माहिती नसणार असेच आपले मत असेल अशी अपेक्षा करतो.
  • Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे Wed, 12/02/2015 - 06:58 नवीन
"God does not play dice with the universe.”
याचा अर्थ आइन्स्टाइन देवावर विश्वास ठेवणारा होता असा घेता येत नाही. खालील चर्चा वाचा. https://www.quora.com/What-did-Einstein-mean-by-God-does-not-play-dice-with-the-universe
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
म
मृत्युन्जय Wed, 12/02/2015 - 07:18 नवीन
म्हणुनच मी अजुन एक वाक्य दिले आहे. ते देखील त्याचेच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
स
सुबोध खरे Wed, 12/02/2015 - 06:53 नवीन
आपल्या लेखात काही गृहितके आहेत जी कदाचित बरोबर नाहीत. उदा. पूर्वी माणसाला निसर्गनियमांविषयी निश्चित असे ज्ञान नव्हते.याचा अध्यारुथ अर्थ असा आहे कि आता माणसाला निसर्ग नियमांबद्दल "बरेच"( सर्व शब्द टाळला आहे) काही माहित आहे. दुर्दैवाने ( दैव मनात असतील त्यांच्यासाठी ) आजही विज्ञानाला ९९.९९ % निसर्गातील गोष्टी माहित नाहीत. जे ज्ञान आहे(असे वाटते) ते बरेचसे वरवरचे आहे. यामुळे कितीही वैज्ञानिक झाला तरी तो एका विशिष्ट टप्प्यावर येतो तेंव्हा त्याची मती कुंठीत होते आणि मग तो एखाद्या अमानवी शक्तीला शरण जातो. मग त्याला तुम्ही जग नियंता म्हणा परमेश्वर म्हणा किंवा अल्ला म्हणा. उदा. चंद्र पृथ्वी भोवती फिरतो याचे कारण गुरुत्वाकर्षण आहे. पण हे गुरुत्व आकर्षणच का?अपकर्षण का नाही? मी जन्माला का आलो? माझे जवळचे नातेवाईक मृत्युमुखी पडले म्हणजे काय झाले. पार्थिव तेथेच आहे पण त्यातील "प्राण" गेला. हा प्राण गेला म्हणजे काय? आपल्या जन्माच्या आधी काय होते? आणि आपले मृत्युच्या नंतर काय होते ? हा शेवटचा प्रश्न तर सर्वानाच भयाकारी वाटतो. अतिशय बुद्धीप्रामाण्यवादी आणि पराकोटीचे नास्तिक असे एक उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश आपल्या बायपास शल्यक्रियेनंतर आय सी यु मध्ये ventilator वर होते तेंव्हा त्यांचे हृदय नीट चालत नव्हते हृदयाची क्षमता २५ %(ejection fraction) होती. तेंव्हा मी त्यांच्या छातीत पाणी झालेले काढण्यासाठी गेलो होतो. त्याच्या अगोदर त्यांच्या पत्नीने त्यांना कोणत्या तरी गुरूचा अंगारा लावला त्यानंतर त्यांनी भक्तिभावाने त्या गुरुना( किंवा ईश्वराला) नमस्कार केला. आता आता मी त्यांना परत "असहिष्णुता आणि निधार्मिकतेवर" हिरीरीने वादावाद करताना पाहिले. म्हणजे शेवटी स्वतः वर पाळी आली कि असंख्य नास्तिक लोक "आस्तिक" होतात कि नाही ते माहित नाही पण "अगतिक" होताना मात्र पाहिले आहे. नाही देखिले पंचानना तोवरी जंबुक करी गर्जना
  • Log in or register to post comments
प
पगला गजोधर Wed, 12/02/2015 - 07:21 नवीन
तोवरी जंबुक (आस्तिक आणि नास्तिक, दोन्ही) करी गर्जना Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
संदीप डांगे Wed, 12/02/2015 - 07:37 नवीन
हे हे.... लय भन्नाट आवडलं. शंभर प्रतिसादाची ताकत एकाच जिफ मधे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
अ
असंका Wed, 12/02/2015 - 07:32 नवीन
अध्यारुथ की अध्याहृत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
श
शब्दबम्बाळ Wed, 12/02/2015 - 23:51 नवीन
मुळात निसर्गनियमांविषयी आपल्याला किती माहिती आहे हे टक्केवारी मध्ये काढणे शक्यच नाही कारण त्यासाठी आधी निसर्गनियम किती आहेत याची पूर्ण कल्पना असणे आवश्यक आहे! आणि हा निसर्ग नियमांचा आकडा कोणी आपल्याला देऊ शकणार नसल्यामुळे अशी टक्केवारी कधी काढता येईल का, हा हि प्रश्न आहे. पण जर सगळे निसर्गनियम माणसाला कळाले तर तो देव होईल का? बाकी तुम्हाला पडलेल्या गुरुत्वाकर्षणाच्या प्रश्नावर थोड लिहितो. या विश्वातल्या कुठल्याही दोन वस्तुमान असलेल्या वस्तू एकमेकांना ओढण्याचा प्रयत्न करतात त्याला आपण गुरुत्वाकर्षण म्हणतो. आता पृथ्वी सूर्याभोवती का फिरते? या दोघांना एकमेकांत काय बांधून ठेवते हा प्रश्न पडणे साहजिक आहे आणि बर्याच जणांना तो पडला देखील. याचे उत्तर एका पद्धतीने देत येते. आपण वेळ(Time ) पाहू शकत नाही. पण वेळेला देखील भौतिकीचे नियम लागू होतात! आपण त्रिमितीय (3Dimensional ) जगात राहतो त्यामुळे यापेक्षा जास्तीच्या मिती आपण पाहू शकत नाही. यातूनच space -Time या संकल्पनेचा उगम झाला. त्यामुळे आपल्या विश्वाला ३+१ D असे म्हणता येत. ३ Dimesnions for Space and १ Dimension for Time हा स्पेस टाइम सगळीकडे आहे. आता विचार करा कि अधांतरी एक सगळ्या बाजूनी घट्ट ताणलेला कापडाचा एक तुकडा आहे. सगळीकडून समान ताण असल्यामुळे तो सध्या सपाट आहे. आता त्याच्या मध्यभागी एक छोटा गोल ठेवा, काय होईल? मध्यभागात खड्डा तयार होईल आणि सपाट असलेल्या कापडाचा खोलगट आकार तयार होईल. या खोलगट आकारात विशिष्ठ वेगाने अजून एक गोळा सोडला तर तो वर्तुळाकार फिरत मधल्या खोलगट भागाकडे जाऊ लागेल. हाच सिद्धांत आहे गुरुत्वाकर्षणाचा! Image removed. खूप मस्त आहे फिजिक्स, जनरल रिलेटिविटि, स्पेशल रिलेटिविटि, क़्वाण्टम फिजिक्स यावर स्वतंत्र लेख लिहावे लागतील म्हणजे हे सगळे सोप्प करून सांगता येईल...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
अ
असंका गुरुवार, 12/03/2015 - 03:34 नवीन
काय भारी सांगितलंत!! (म्हणजे कळल्यासारखं वाटलं तरी.) धन्यवाद!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शब्दबम्बाळ
व
विवेक ठाकूर गुरुवार, 12/03/2015 - 13:49 नवीन
आपण वेळ(Time ) पाहू शकत नाही. पण वेळेला देखील भौतिकीचे नियम लागू होतात! वेळ हा पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यामुळे होणारा भासमान उजेड-अंधाराचा खेळ आहे. केवळ सोयीसाठी आपण, एका परिभ्रमणाला एक दिवस असं कल्पून त्याचे २४ भाग वगैरे केलेत. त्यामुळे जी गोष्ट अस्तित्त्वातच नाही तिला भौतिकीचे नियम लागू होत नाहीत. वेळ या संकल्पनेनं प्रक्रियेला लागणारा कालावधी मोजला जातो. आपण त्रिमितीय (3Dimensional ) जगात राहतो त्यामुळे यापेक्षा जास्तीच्या मिती आपण पाहू शकत नाही. आपण चौमितीय जगात राहातो. ज्या मितीत सगळ्या घटना घडतात ती चवथी मिती स्पेस आहे. या विश्वातल्या कुठल्याही दोन वस्तुमान असलेल्या वस्तू एकमेकांना ओढण्याचा प्रयत्न करतात त्याला आपण गुरुत्वाकर्षण म्हणतो. हे बरोबर आहे पण कापडाचे उदाहरण गंडले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका
श
शब्दबम्बाळ गुरुवार, 12/03/2015 - 14:23 नवीन
इतक्या आत्मविश्वासाने आपण हे बोललात हे पाहून गम्मत वाटली! आपले मुद्दे आणि त्यावर स्पष्टीकरण देत आहे १. "वेळ हा पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यामुळे होणारा भासमान उजेड-अंधाराचा खेळ आहे". इत्यादी.... आपण सापेक्षता सिद्धांत वाचला आहे का? वेळ (Time ) गुरुत्वाकर्षण यावर देखील अवलंबून असतो. तसेच त्याचे प्रसरण किंवा आकुंचन देखील होऊ शकते. आकाशात फिरणाऱ्या उपग्र्हांसाठी देखील वेळ(TIME ) हळूहळू पुढे सरकतो (पृथ्वीवरील वेळेच्या सापेक्ष), अर्थात हा फरक फार लहान असतो. पण जर तुम्ही कृष्ण विवारासारखी प्रचंड घनता असलेल्या गोष्टीजवळ असाल तर हि तफावत प्रचंड मोठी होते! तसेच वस्तूच्या गतीवर देखील TIME अवलंबून असतो. या वरूनच आइनस्टाइनचे प्रसिध्द प्रमेय आले आहे. E = M * C ^२ (C = प्रकाशाचा वेग, M = वस्तुमान, E = एनर्जी) २. "आपण चौमितीय जगात राहातो. ज्या मितीत सगळ्या घटना घडतात ती चवथी मिती स्पेस आहे." याचे काही स्पष्टीकरण मिळेल का? कुठलीही मिती (Dimension ) हि इतर उपलब्ध मितीना काटकोनात (perpendicular ) छेदते. त्यामुळे स्पेस हि चौथी मिती कशी सिध्द करता येईल हे ऐकायला आवडेल. -> तसेच आपण चौमितीय जगात राहतो हे ही कसे सिध्द होते? स्ट्रिंग थेअरी नुसार १०मिति असू शकतात आणि १ मिती TiME साठी. अर्थात तेही अजून खात्रीलायक नाहीये. आपण त्रिमितीय जीव आहोत कारण आपण चौथ्या मितीमध्ये फेरफार करू शकत नाही किंवा तिचा विचार देखील करू शकत नाही. ३." हे बरोबर आहे पण कापडाचे उदाहरण गंडले आहे." हाहा, बर मग सांगा तरी काय गंडले आहे! कस आहे, तुम्ही चूक आहात हे बोलायला काहीही लागत नाही पण ते सिध्द करायला उदाहरण लागत! त्यामुळे, कृपया स्पष्टीकरण द्यावे कि आपले विचार काय आहेत याबाबत...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर
व
विवेक ठाकूर गुरुवार, 12/03/2015 - 15:07 नवीन
१) एक साधी गोष्ट सांगा, घड्याळ नसेल तर वेळ मोजता येईल का? आणि घड्याळ पृथ्वीच्या परिभ्रमणावर आधारित आहे. वेळेचा उपयोग सोयीसाठी आहे पण वस्तुतः वेळ हा निव्वळ भास आहे. भासाचं प्रसरण किंवा आकुंचन असंभव आहे. तसेच वस्तूच्या गतीवर देखील TIME अवलंबून असतो. तुम्ही पुन्हा तेच सांगतायं. गती ही प्रोसेस आहे आणि ती मोजायला वेळ उपयोगी आहे पण मुळात वेळ असं काहीही नाही. २) कुठलीही मिती (Dimension ) हि इतर उपलब्ध मितीना काटकोनात (perpendicular ) छेदते. ज्या आवकाशात हा छेद जातो ते आवकाश म्हणजे स्पेस. दुसरी साधी गोष्ट पाहा. स्पेस नसेल तर कोणतिही हालचाल किंवा प्रक्रिया असंभव आहे. ३) बर मग सांगा तरी काय गंडले आहे! कापड आधांतरी आहे, त्यात पहिला गोळा टाकला आणि कापड खोलगट झालं, मग दुसरा गोळा विशीष्ट वेगानं सोडला....कशाला एवढा उद्योग ? पृथ्वीवर कोणतिही वस्तु हातातून सुटल्यावर खाली पडते कारण, तुम्ही म्हटल्याप्रमाणे "या विश्वातल्या कुठल्याही दोन वस्तुमान असलेल्या वस्तू एकमेकांना ओढण्याचा प्रयत्न करतात त्याला आपण गुरुत्वाकर्षण म्हणतो ".
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शब्दबम्बाळ
श
शब्दबम्बाळ गुरुवार, 12/03/2015 - 15:35 नवीन
तुमचा प्रचंड मोठा घोळ होतोय! पुनः तुमचे मुद्दे आणि स्पष्टीकरण: १. "एक साधी गोष्ट सांगा, घड्याळ नसेल तर वेळ मोजता येईल का? आणि घड्याळ पृथ्वीच्या परिभ्रमणावर आधारित आहे. वेळेचा उपयोग सोयीसाठी आहे पण वस्तुतः वेळ हा निव्वळ भास आहे. भासाचं प्रसरण किंवा आकुंचन असंभव आहे." मला सांगा वजनकाट्यशिवय वजन मोजता येईल का? ध्वनिलहरी उपकरण न वापरता मोजता येतील का? मग या गोष्टी देखील अस्तित्वात नाहीत म्हणायला पाहिजे नाही का? आपण जिथे राहतो ती जागा स्पेसचाच एक भाग आहे आणि या स्पेस मधील कोणत्याही वस्तूच्या जागेला आपण ३ अक्षांच्या सहाय्याने नोंदवू शकतो. पण त्याशिवाय अजून एक गोष्ट लागते ती म्हणजे Time चंद्र आत्ता ज्या जागी आहे ते आपण ३ अक्षांवर मांडू शकतो पण अजून एक काळाचा अक्ष घेतला तर त्याचा संपूर्ण प्रवास दर्शवता येतो. आणि मी स्पेस टाईम बद्दल बोललो होतो. ते म्हणजे एकमेकांशी गुंतलेल प्रतल समजू शकता. २. "ज्या आवकाशात हा छेद जातो ते आवकाश म्हणजे स्पेस. दुसरी साधी गोष्ट पाहा. स्पेस नसेल तर कोणतिही हालचाल किंवा प्रक्रिया असंभव आहे." अहो आपण त्या स्पेस मधेच राहतोय जे आपल्यासाठी त्रिमितीय आहे आणि आपली हालचाल देखील तेवढ्याच मितीन्पुरती मर्यादित आहे!! ३. "कशाला एवढा उद्योग ?पृथ्वीवर कोणतिही वस्तु हातातून सुटल्यावर खाली पडते" तुम्ही खूपच लहान उदाहरण घेत आहात. मग मला सांगा पृथ्वी सुर्याभोवतो चौकान किंवा त्रिकोण आकारात का फिरत नाही हो? किंवा कुठलाच ग्रह इतर आकारात का फिरत नाही? धप्प करून पडायचं ना सरळ तार्यामध्ये जाउन!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर
व
विवेक ठाकूर गुरुवार, 12/03/2015 - 18:18 नवीन
म्हणजे चर्चा लाईनवर राहिल. २. अहो आपण त्या स्पेस मधेच राहतोय जे आपल्यासाठी त्रिमितीय आहे आणि आपली हालचाल देखील तेवढ्याच मितीन्पुरती मर्यादित आहे!! आपलं शरीर त्रिमितीय आहे आणि त्याची हालचाल स्पेसशिवाय असंभव आहे. ३ कुठलाच ग्रह इतर आकारात का फिरत नाही? प्रश्न गुरुत्वाकर्षण म्हणजे काय असा होता, परिभ्रमणाच्या आकाराचा नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शब्दबम्बाळ
श
शब्दबम्बाळ गुरुवार, 12/03/2015 - 20:16 नवीन
तुम्हाला खरच चर्चा करायची आहे कि उगीच टंगळ मंगळ करत आहात? कारण तसे असेल तर माझा "वेळ" कृपया वाया घालवू नका मी लिहिलेला मुद्दा क्र १ हा Time (वेळ) याविषयीच होता त्याकडे सपशेल दुर्लक्ष्य करून चकार शब्दही न काढता मला मुद्द्यावर चर्चा करायला सांगताय? मुद्दा २ विषयी बोलतच नाही कारण तुम्ही एकाच वाक्य परत परत लिहिताय, कुठल्याही स्पष्टीकरणाशिवाय! आता मुद्दा क्र ३: पृथ्वी सूर्याभोवती गम्मत म्हणून फिरते का? गुरुत्वाकर्षणमुळेच फिरते ना! मग सांगा कि आता, त्रिकोण किंवा चौकोन आकारात का फिरत नाही? हा प्रश्न विचारण्याचे कारण म्हणजे तुम्ही मी दिलेलं कापडाच उदाहरण गंडले आहे हे म्हणाला होतात. स्वतः लिहिलेल्या प्रतिक्रिया तरी लक्षात ठेवा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा