सॅन बर्नार्डिनोचे अतिरेकी दांपत्य
सॅन बर्नार्डिनो हे लॉस अॅन्जेलिस ह्या महानगराच्या पूर्वेला असणारे एक शहर. इथे २ डिसेंबर रोजी एक अतिरेकी हल्ला झाला. त्यात १४ नागरिक बळी पडले आणि तितकेच जखमी झाले. हल्ला करणारे अतिरेकी म्हणजे पाकिस्तानी वंशाचे नवरा बायको. एक अत्यंत खळबळजनक, अनपेक्षित घटना असे ह्याचे वर्णन करता येईल. दहशतवादी हल्ल्याचा हा अमेरिकेत तरी आजवर न दिसलेला प्रकार आहे. आता हा भविष्यातील अशाच प्रकारच्या घटनांची नांदी आहे का एकमेवाद्वितीय घटना ते काळच सांगू शकेल.
ह्यातील एक अतिरेकी सैयद फारुक हा पाकिस्तानी आईबापांचा अमेरिकेत जन्मलेला मुलगा. आईबापांचे वितुष्ट आले आणि ते विभक्त झाले. बाप आईला मारहाण करत असे असेही दिसते आहे. पण इस्लामी मूलतत्त्ववाद वगैरे गोष्टींशी ह्या कुटुंबाचा संबंध असल्याचे आढळलेले नाही. यथावकाश शिक्षण वगैरे पूर्ण करून हा माणूस सॅन बर्नार्डिनो शहरात हेल्थ इन्स्पेक्टर म्हणून रुजु झाला. दोन वर्षापूर्वी ह्या माणसाने एका पाकिस्तानी स्त्रीशी लग्न केले. ही बाई म्हणजे तश्फीन मलिक. ही पाकिस्तानी असली तरी दीर्घ काळ सौदी अरेबियात वास्तव्यास होती. ह्यांचे लग्न कसे जमले वगैरे गोष्टी अजून अज्ञात आहेत. ही अत्यंत धार्मिक आणि परंपरावादी होती. सैयद हाही गेले काही वर्षे अत्यंत धार्मिक मुसलमान बनला होता असे त्याचे सहकारी सांगतात. सहा महिन्यापूर्वी ह्या जोडप्याला एक मुलगी झाली.
एकंदरीत हे लोक अतिरेकी असतील असा संशयही आला नसता. पण २ डिसेंबरला सैयदच्या ऑफिसचा हॉलिडे पार्टीचा कार्यक्रम होता. आधी प्रशिक्षण आणि नंतर पार्टी असा बेत होता. सैयद त्या कार्यक्रमाला आला. फारसा बोलत नव्हता. मधेच तो तिथून निघाला. काही लोकांच्या मते त्याची काही सहकार्यांशी वादावादी झाली आणि तो चिडला होता. पण नंतर तो आला तो आपल्या पत्नीसह आणि पूर्ण शस्त्रसज्ज! आल्याआल्या दोघांनी बेछूट गोळीबार करुन अनेक लोक मारले. पार्टीला ९० लोक आमंत्रित होते आणि निदान ७० ते ८० उपस्थित होते. असले भयंकर घडल्यावर प्रचंड गोंधळ उडाला. लोकांनी पोलिसांना बोलावले. मग ही जोडगोळी आपल्या वाहनातून पळून जाऊ लागली. पोलिसानी पाठलाग केला. मोठा गोळीबार केला आणि ह्या दोघांना ठार केले.
ह्या माणसाने तीन पाईप बाँब बनवून तेही त्या पार्टीच्या ठिकाणी लपवले होते. सुदैवाने ते फुटले नाहीत आणि मनुष्यहानी थोडी कमी झाली.
नंतर पोलिसांनी ह्या जोडप्याच्या घराची तपासणी केली तेव्हा तिथे अनेक शस्त्रे, बाँब बनवायची सामग्री मिळाली. म्हणजे केवळ कुणीतरी चिडवले म्हणून हे घडले नसावे तर पूर्ण तयारीनिशी ह्या अतिरेकी जोडगोळीने हा कट रचला असावा असे दिसते आहे. ज्या प्रकारच्या बंदुका, गोळ्या, काडतुसे वापरली गेली त्यातली काही कॅलिफोर्नियात बेकायदेशीर समजली जातात त्यामुळे अशी शस्त्रास्त्रे मिळवण्याकरता अन्यही लोकांनी मदत केली असणे शक्य आहे.
आयसिस ह्या जगप्रसिद्ध इस्लामी अतिरेकी संघटनेशी ह्या लोकांचे धागेदोरे असावेत असा संशय आहे.
१. सहा महिन्यांची मुलगी असूनही तिला वार्यावर सोडण्याइतकी निष्ठूरता हे दांपत्य दाखवू शकले. कदाचित आपला सरळमार्गी असल्याचा देखावा पूर्ण व्हायला मदत व्हावी म्हणून एक मूल जन्माला घातले असणे शक्य आहे.
२. आता एक गैरमुस्लिम सामान्य अमेरिकन माणूस निरुपद्रवी दिसणार्या मुस्लिमावर कसा विश्वास ठेवेल? कुठला मुस्लिम अचानक ज्वालामुखीसारखा उफाळून हल्ला करुन आपल्याला ठार मारणारच नाही अशी खात्री कोण देणार?
३. ह्या फारुकच्या शेजार्यांनी असे सांगितले की त्यांना रात्री अपरात्री अनेक लोक त्याच्या गॅरेजमधे सामानाची नेआण करताना दिसत असत. पण काही तक्रार केली तर आपण वर्णद्वेष्टे असल्याचा समज होईल अशा भीतीने त्यांनी काही केले नाही. अशा प्रकारे अपराधीत्वाची भावना सर्वसामान्य अमेरिकन लोकांच्या मनात भरवून देण्यात माध्यमे व सरकार यशस्वी झाले आहे पण अशा ठिकाणी ते घातकही ठरते आहे.
४. ह्या माणसाच्या कुटुंबियांनी साफ कानावर हात ठेवून असा दावा केला आहे की असे काही घडेल ह्याची सुतराम कल्पना नव्हती. पण हे कितपत खरे मानायचे ते काळच सांगेल.
५. ह्या दहशतवाद्याच्या घराच्या मालकिणीने पोलिस तपास केल्यावर तात्काळ हे घर पत्रकारांना उघडून दिले. या, हवे तो फोटो व्हिडियो घ्या असे आमंत्रण दिले. अशा प्रकारे त्या अतिरेकी घरातले सगळे सामान अमेरिकन लोकांना बघायला मिळाले. त्यात अनेक गोष्टी ज्यांचा ह्या गुन्ह्यात सहभाग असू शकेल अशा आढळल्या. जसे पासपोर्ट, लायसेन्स, अनेक फोटो. पोलिसांनी इतक्या झटपट तपास कसा पूर्ण केला आणि इतक्या त्वरेने ते घर पत्रकारांना उघडून का दिले गेले हे एक गूढच आहे.
६. सरकारी पातळीवरून हा अतिरेकी हल्ला आहे असे अनेक दिवस सांगितलेच जात नव्हते. प्राथमिक लक्षणे इस्लामी अतिरेकाची दिसत असताना हा एका असंतुष्ट कर्मचार्याने आपल्या सहकार्यांवर केलेला हल्ला (अर्थात वर्कप्लेस व्हाय्लन्स) असल्याचा दावा केला जात होता. हा सावधपणा म्हणायचा की बोटचेपेपणा हेही अनाकलनीय.
७. ह्या विध्वंसक कार्यक्रमामुळे अतिरेकी इस्लामी जगताचा नक्की काय फायदा झाला? डझनभर माणसे मेली. त्यांचे जवळचे नातेवाईक उध्वस्त झाले. अनेक लोक जखमी झाले. अनेक लोक संतप्त झाले असतील. पण आयसीस वा तत्सम खिलाफत स्थापनेची चळवळ आपल्या ध्येयाच्या आणखी जवळ गेली का? माहित नाही.
८. आपल्या अपत्यसंगोपनाची एक उपजत ओढ धर्माच्या अतिरेकी प्रभावाने नष्ट करता येते हे खरे वाटत नाही. केवळ स्वर्गप्राप्ती, ७२ कुमारिका वगैरे कारणे इतकी प्रबळ होऊ शकतात?
९. अरबी लोक भारतीय उपखंडातील मुस्लिमांना तुच्छ मानतात. त्यांना दुय्यम समजतात. तरीही अशा अरबी संघटनेकरता आपले सर्वस्व द्यायची तयारी ह्या जोडप्याने कशी बरे दाखवली?
- या हल्ल्याचा मोदींशी वा त्यांच्या सरकारशी संबंध जोडता येईल का? (अगदी बादरायणही चालेल)
- त्या अनुषंगाने काही पुरस्कार परत करता येतील का?
- असहिष्णुता असा थोर प्रकार अमेरिकेत अस्तित्वातच नाही काय?
- इथल्या काही विचारवंताना त्या जोडप्याकडे पाठवून त्यां दांपत्याच्या पाठीराख्यांचे मतपरिवर्तन करता येईल काय?
- दांपत्याच्या मुलीचा सांभाळ करण्यास जास्ती लायक कोण कनवाळू ओवेसी की शांतीप्रिय आझमखान?
- या हल्ल्याचा आपल्याला न आवडणार्या शहराशी संबध जोडून, त्या आड काही चिखलफेक करता येईल का?
- अश्या धाग्यावर मिपावरील शांती दूत विचारवंत कुठल्या वाळूत चोच(मानेसकट) खूपसून बसलेले असतात ?
यथामती-यथाशक्ती उत्तरे द्यावीत..