सिंहलव्दीपाची सहल : ०७ : कौडुल्ला राष्ट्रीय उद्यान
डॉ सुहास म्हात्रे यांचे मिपावरचे इतर लेखन...
==================================================================तिवांका प्रतिमागृह हे ठिकाण मूळ आराखड्यात असले तरी त्याच्याबाबत मला फारशी माहिती नव्हती. अचानक समोर आलेला हा कलेचा खजिना सुखद आश्चर्य देऊन गेला. त्यामुळे खूश होऊन, श्रीलंकेचे प्राणीवैभव पाहण्यासाठी कौडुल्ला राष्ट्रीय उद्यानाच्या दिशेने, पुन्हा एकदा हिरवाईने भरलेल्या रस्त्यावरून प्रवास सुरू केला.
इ स २००२ मध्ये उद्घाटन झालेले ६६५६ हेक्टर आकाराचे कौडुल्ला राष्ट्रीय उद्यान हे श्रीलंकेतले पंधरावे आणि सर्वात नवीन राष्ट्रीय उद्यान आहे. राजा महासेनाने बांधलेल्या प्राचीन कौडुल्ला तलावाच्या सभोवती पसरलेला हा परिसर राष्ट्रीय उद्यान, वन्यप्राण्यांसाठी अभयारण्य आणि पर्यावरण पर्यटनस्थल आहे. हे विविध सदाहरित वृक्षसंपत्ती व प्राणीसंपत्तीने भरलेले आहे. हरिणे, बिबटे, अस्वल इत्यादी अनेक प्राण्यांचे, पक्षांचे आणि विविध विषवृत्तिय वृक्षवल्लींचे घर असलेले हे अरण्य त्यात विहरणार्या जंगली हत्तींमुळे जगप्रसिद्ध पर्यटक आकर्षण झाले आहे.
या अभयारण्याच्या माहितीपत्रकाप्रमाणे तेथे सस्तन प्राण्यांच्या २४ प्रजाती आहेत, सरपटणार्या प्राण्यांच्या २५ प्रजाती, पक्षांच्या १६० प्रजाती आणि तेथील तलावांत माश्यांच्या २६ प्रजाती आहेत. हे सगळे असले तरी पर्यटकांसाठी मुख्य आकर्षण इथले सुमारे २५० हत्ती आणि बिबट्या हेच असते ! येथील हत्ती बघण्यासाठी ऑगस्ट-सप्टेंबर हे सर्वात उत्तम महिने समजले जातात, कारण या कालात इतर कमी पाण्याच्या ठिकाणांहून कौडुल्ला तलावातील पाण्यामुळे हत्ती येथे आकर्षित होतात.
चला तर मग सफारी जीपमध्ये बसून आपल्या मार्गदर्शकासह कौडुल्ला उद्यानाच्या सफरीला...
उद्यानाच्या ऑफिसातून तिकिट काढून आपली सहल सुरू होते. हिरव्यागार जंगलातून जीपचा जवळ जवळ अर्ध्या तासाचा प्रवास झाल्यावर आणि अनेक लहान मोठी तळी गेली तरी हत्ती नजरेस न आल्याने जरासे नाराज व्हायला झाले.
कौडुल्ला राष्ट्रीय उद्यान ०१
कौडुल्ला राष्ट्रीय उद्यान ०२
कौडुल्ला राष्ट्रीय उद्यान ०३ : टस्कर (सुळे असलेला नर हत्ती)
कौडुल्ला राष्ट्रीय उद्यान ०४ : टस्कर (सुळे असलेला नर हत्ती)
कौडुल्ला राष्ट्रीय उद्यान ०५
...
कौडुल्ला राष्ट्रीय उद्यान ०६ व ०७
कौडुल्ला राष्ट्रीय उद्यान ०८
कौडुल्ला राष्ट्रीय उद्यान ०९
कौडुल्ला राष्ट्रीय उद्यान १०
कौडुल्ला राष्ट्रीय उद्यान ११ : कोल्हा
कौडुल्ला राष्ट्रीय उद्यान १२ : कासव
कौडुल्ला राष्ट्रीय उद्यान १३ : माकडे
कौडुल्ला राष्ट्रीय उद्यान (संग्रहालय) १४ : चितळांची शिंगे व सापाची कात
कौडुल्ला राष्ट्रीय उद्यान (संग्रहालय) १५ : अभयारण्यातल्या लहान आकाराच्या प्राण्यांचे सांगाडे
कौडुल्ला राष्ट्रीय उद्यान (संग्रहालय) १६ : फॉर्मॅलिनमध्ये ठेवलेले हत्तीचे नवजात अर्भक
कौडुल्ला राष्ट्रीय उद्यान (संग्रहालय) १७ : हत्तीची कवटी
कौडुल्ला राष्ट्रीय उद्यान (संग्रहालय) १८ : प्राण्यांच्या पायांचे ठसे
कौडुल्ला राष्ट्रीय उद्यान १९ : परतिच्या वाटेवर
कौडुल्ला राष्ट्रीय उद्यान २० : परतिच्या वाटेवर
पोलोन्नारुवामधले संध्याकाळचे जेवण
Book traversal links for सिंहलव्दीपाची सहल : ०७ : कौडुल्ला राष्ट्रीय उद्यान
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments