माहिती हवी -- बारावीनंतरच्या शैक्षणिक संधी
आत्ताच खात्रीलायक सूत्रांकडून कानी आलेल्या बातमीनुसार,
काही शहरांतील अभियांत्रिकी महाविद्यालयांनी आपल्या जाहिरातीसाठी ज्युनिअर कॉलेजच्या प्राध्यापकांची मदत मागितली आहे.
...कारण अभियांत्रिकीच्या शेकडो सीट्स गतवर्षी रिकाम्या राहिल्या आहेत.
...त्याचे कारण गतवर्षीच्या गतवर्षी उत्तीर्ण झालेले हजारो अभियंते अद्यापि बेकार आहेत.
ही बातमी ऐकून मला धडकी भरली आहे.
...कारण माझा लेक यावर्षी बारावी, JEE, CET इ. स्टेजेसमधून जात आहे. आणि ही बातमी ऐकल्यावर मला त्याच्यासाठी इतर अपारंपारिक शैक्षणिक संधी शोधणे आवश्यक वाटत आहे.
मिपाकरांना विनंती, कृपया बारावी(सायन्स) नंतर (अभियांत्रिकी वगळता) उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या करिअर, व्यावसायिक शिक्षण शाखांविषयी कुणाला माहिती असल्यास द्यावी. (मुलाचा बारावीला A ग्रुप आहे.)
तसेच मागे एकदा यासारख्या विषयावर धागा निघाल्याचे आठवते. कुणाकडे त्याची लिंक असल्यास द्यावी.
💬 प्रतिसाद
(124)
स
समीरसूर
Fri, 12/11/2015 - 06:38
नवीन
स्नेहांकिताजी,
थोडे स्वानुभवावर आधारित शब्द:
१. आवड नसेल तर अभियांत्रिकाला मुळीच पाठवू नका. नोकरीच्या संधी असल्या तरी स्ट्रगल खूप आहे. आयटीमध्ये १०-११ वर्षांच्या अनुभवानंतर भय वाटावं अशी परिस्थिती आहे. अगदीच कुशाग्र बुद्धिमत्ता, सतत शिकत राहण्याची हौस, परिश्रम घेण्याची तयारी, सतत न थकता धावत राहण्याची ऊर्जा असेल तरच अभियांत्रिकीचा मार्ग त्याला निवडू द्या असे कळकळीने सांगतो. अभियांत्रिकीमध्ये कुठल्या एखाद्या विशिष्ट क्षेत्रात रस असेल तर मग अजिबात चिंता करू नका. त्याची चिकाटी आणि आवड त्याला जबरदस्त उंचीवर नेतील यात शंका बाळगू नका.
२. अभियंत्यांची संख्या अमाप झाल्याने स्पर्धा प्रचंड आहे. हुशार असूनदेखील संधी मिळतीलच याची शाश्वती नाही. आयटीमधून एका ठराविक कालावधीनंतर बाहेर पडणे दुरापास्त होते. नोकरीमध्ये कंटाळा येण्याचे प्रमाण अभियांत्रिकीमध्ये जास्त आहे असे माझे मत आहे.
३. कुठल्या क्षेत्रात रस आहे हे तपासून बघा. सध्या खूप नवनवीन क्षेत्रे उपलब्ध आहेत. वर सांगितल्याप्रमाणे मास मेडिया, फिल्म, ध्वनी अभियांत्रिकी ही चांगली क्षेत्रे आहेत. पत्रकारिता एक चांगले करीअर होऊ शकते. सी ए हा देखील उत्तम पर्याय होऊ शकतो. अर्थात त्यासाठी आकड्यांशी मैत्री हवी. एकदा वयाच्या २२-२३ व्या वर्षी सी ए झाल्यानंतर अमाप म्हणजे अमाप संधी आहेत. नोकरीच्या आणि व्यवसायाच्यादेखील. तुम्ही नोटा मोजता मोजता थकून जाल आणि शेवटी त्या मोजायला तुम्हाला मला बोलवायला लागेल. माझ्या समोर किमान तीन उदाहरणे अशी आहेत म्हणून खात्रीपूर्वक सांगू शकतो. :-)
४. त्याचा कल एकदा तपासून बघा. तो कसा आहे? नोकरीची ऊब त्याला हवीहवीशी वाटेल की खडतर प्रवास त्याच्या व्यक्तिमत्त्वाची एक ओळख आहे? ९ ते ५ काम करून बाकी वेळ छंद जोपासणे, मित्रांसोबत, कुटुंबासोबत वेळ घालवणे त्याला आवडते की हिमतीने नवनवीन गोष्टी तो करण्याचा ध्यास बाळगतो हे बघणे महत्वाचे आहे. म्हणजे एक ध्येय ठरवून त्यामागे धावणारा आणि ते मिळवण्यासाठी वाट्टेल ते सायास करणारा जर त्याचा स्वभाव असेल तर मग आवडीचे शिक्षण घेऊन तो यशस्वी होणारच यात शंकाच नको. पण जर त्याचा स्वभाव तसा नसेल (म्हणजे थोडक्यात माझ्यासारखा असेल), तर मग चांगला जॉब मिळवण्याच्या दृष्टीने सेफ शिक्षण घेणे केव्हाही श्रेयस्कर!
५. प्राध्यापक होणे हा पण चांगला पर्याय आहे. भरपूर पगार आणि निवांत वेळ. मग राहिलेल्या वेळात संशोधन करा, छंद व्यावसायिक स्तरावर जोपासा, लिखाण करा, किंवा मस्त जगभर भ्रमंती करा. नेट-सेटचे जाळे भेदावे लागेल हे मात्र खरे.
६. अजून काही क्षेत्रे - अक्चुअरे (इन्शुरन्स पोलीसीज डिझाईन करणे), युजर एक्स्पेरिअन्स (अमाप संधी), प्रोडक्ट डिझाईन, हॉस्पिटल एड्मिनिस्ट्रेशन, डिजिटल मार्केटिंग, गेमिंग, फिल्म एडिटिंग, टीव्ही एडिटिंग, होटेल मेनेजमेंट...
तुमच्या मुलास अनेकोत्तम शुभेच्छा! आम्हा सर्वांना खात्री आहे त्याचे भविष्य उज्वल असेल! :-)
- Log in or register to post comments
स
सस्नेह
Fri, 12/11/2015 - 07:20
नवीन
अतिशय प्रॅक्टिकल प्रतिसादासाठी धन्यवाद, समीरसूरजी.
१. प्रथम तर मुलाला फिजिक्स व स्पेस रिसर्चमधे इंटरेस्ट आहे. त्याविषयी एखादी अभियांत्रिकी शाखा माझ्या माहितीत तरी नाही. तुम्ही सांगू शकाल का ?
२. स्पर्धा प्रचंड आहे हे दिसते आहेच. मुलगा स्पर्धेबाबत जरा वीकच आहे.
३. आयटीमधे फारसा रस नाही.
४. कल व प्रकृती पाहता आवडीच्या क्षेत्रात नोकरी मिळाली तर रमेल असे वाटते.
५. प्राध्यापक व्हायला नाही म्हणतो. (कदाचित सध्याच्या त्याच्या प्राध्यापकांना पाहून =) )
६. अक्चुअरे (इन्शुरन्स पोलीसीज डिझाईन करणे), युजर एक्स्पेरिअन्स (अमाप संधी), प्रोडक्ट डिझाईन, हॉस्पिटल एड्मिनिस्ट्रेशन, डिजिटल मार्केटिंग, गेमिंग, फिल्म एडिटिंग, टीव्ही एडिटिंग, होटेल मेनेजमेंट...ही क्षेत्रे नवीन आहेत. यांचे शिक्षण कुठे उपलब्ध आहे ?
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Fri, 12/11/2015 - 10:49
नवीन
गणित चांगलं हवं. इंजिनियरिंग करूनही जाता येतं. In fact, तसं गेलं तर बरंच. Actuarial Society of India ही actuaries च्या परीक्षा घेणारी संस्था आहे. ही आणि हीच संस्था actuaries ना सनद देते. NMIMS मध्ये पूर्वी MBA in Actuarial Science नावाचा एक कोर्स होता आणि लोकांचा तो Actuaries ना समकक्ष आहे असा गैरसमज होता.
FILM AND VIDEO EDITING साठी FTII आहे पण कुणाला सुचवायची भीती वाटते. तिथल्या कोर्सेसना इंडस्ट्रीत मान्यता असूनही.त्यापेक्षा दुसरा मार्ग म्हणजे एखाद्या संकलकाच्या हाताखाली सहाय्यक म्हणून काम करणे आणि मग अनुभव आल्यावर मग स्वतंत्र काम करणे. शिकायलाही मिळतं आणि जनसंपर्क जो मिडियात अत्यंत आवश्यक आहे, तोही वाढतो.
- Log in or register to post comments
स
सस्नेह
Fri, 12/11/2015 - 10:53
नवीन
actuaries म्हणजे कामाचे स्वरूप नेमके काय आणि नोकरी/व्यवसायात कुठे (कंपनी/शहर) संधी असते ?
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Fri, 12/11/2015 - 11:20
नवीन
हे प्रामुख्याने विमाक्षेत्रात काम करतात. Life आणि Non-life असे दोन specializations आहेत. विमाक्षेत्राचे नियंत्रक IRDA च्या नियमांनुसार कोणतीही policy आणि तिचा premium हे actuary ने ठरवणं अत्यंत आवश्यक आहे. त्यांचं मुख्य काम म्हणजे विमा कंपनीसाठी risk assessment करणे आणि त्याप्रमाणे आणि सरकारी नियमांमध्ये बसतील अशा गुंतवणुकीच्या संधी शोधणे. उदाहरणार्थ Life मध्ये आजारपण, व्यावसायिक धोके, वजन/उंचीनुसार होऊ शकणारे आजार आणि त्यांच्यावरून आयुष्याला असू शकणारा धोका - अशा अनेक गोष्टींचा विचार होतो. कोणतीही विमा कंपनी जेव्हा एखाद्याचा विमा उतरवते तेव्हा ती जोखीम पत्करत असते. त्या जोखमीचं आर्थिक मूल्य ठरवणं हे actuaries चं मुख्य काम असतं.
इथे बघा -
http://googleweblight.com/?lite_url=http://www.actuariesindia.org/&ei=vOx10Erm&lc=en-IN&s=1&m=671&ts=1449828321&sig=ALL1Aj7g4cssLcZzZPgJLVt6ARJzurWiog
- Log in or register to post comments
स
समीरसूर
Fri, 12/11/2015 - 12:45
नवीन
एक्चुअरिजची छान माहिती बोका यांच्या प्रतिसादात मिळाली आहेच. ही सनद मिळवणे तसे बर्यापैकी कठीण असते.
युजर एक्स्पेरिअन्स - खूप संस्था युजर एक्स्पेरिअन्सचे अभ्यासक्रम घेतात. सिम्बायोसिस, एमआयटी, वगैरे आहेत पुण्यात. अहमदाबादची नेशनल इन्स्टिट्युट ऑफ डिजाईन जबरदस्त आहे. तिथल्या मुलांना ७ ते ४० लाखांपर्यंतची पेकेजेस मिळतात. प्रोडक्ट डिजाईन चे कोर्सेस नेशनल इन्स्टिट्युट ऑफ डिजाईन मध्ये आहेत. तेथे विविध प्रकारचे कोर्सेस आहेत (डिजाईनचे).
हॉस्पिटल मेनेजमंट चे कोर्सेस मला वाटतं सिंबायोसिस मध्ये आहेत. बड्या हॉस्पिटल्समध्ये कुशल आणि स्मार्ट लोकांची संपूर्ण डोलारा सांभाळण्यासाठी गरज असतेच.
गेमिंग साठी मला डीएसकेंचं इन्स्टिट्युट माहिती आहे. जालावर अधिक माहिती मिळेल.
डिजिटल मार्केटिंग चे अनेक कोर्सेस उपलब्ध आहेत. यात कौशल्य, निरीक्षण अधिक महत्वाचे. मुद्रा इन्स्टिट्युट (अहमदाबाद) मध्ये हे कोर्सेस उपलब्ध आहे. मुद्रा हे जबरदस्त इन्स्टिट्युट आहे. प्रवेश सोपा नाही. येथेच आणखी बरेच कोर्सेस आहेत, ते देखील बघता येतील.
फिल्म एडिटिंग साठी पुण्यात डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे इन्स्टिट्युट आहे. एफटी आय आय आहे. इथे प्रवेश सोपा नाही. पण एफटी चा दरारा जबरदस्त आहे. टीव्ही चे कोर्सेस देखील तेथे उपलब्ध आहेत.
- Log in or register to post comments
स
सस्नेह
Fri, 12/11/2015 - 13:02
नवीन
अगदी उपयुक्त आणि स्पेसिफिक माहितीसाठी धन्यवाद.
वरील संस्थांच्या साईट्स शोधते.
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Fri, 12/11/2015 - 14:17
नवीन
चा दरारा आहेच हो पण ड्रग्ज हा तिथला फार मोठा प्रश्न आहे. त्यामुळे कोणाला सांगायला धास्ती वाटते. Product Design साठी NID, Ahmedabad ही एकदम मस्त संस्था आहे.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Fri, 12/11/2015 - 14:22
नवीन
NID सारखाच कोर्स पुण्याच्या MIT मध्ये आहे. जाणकारांनी मार्गदर्शन करावे.
- Log in or register to post comments
प
पिशी अबोली
Sat, 12/12/2015 - 07:09
नवीन
अॅक्चुअरी- माझी एक मैत्रीण आणि एक मावसभाऊ या दोघांनी या परीक्षा दिलेल्या आहेत. दोघांनीही स्टॅटिस्टिक्स मधे शिक्षण घेतलेलं आहे. दोघंही आता उत्तम जॉब्स करत आहेत. पण मला माहिती काहीच नाही याबद्दल.
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Fri, 12/11/2015 - 07:42
नवीन
आणि उत्तम प्रतिसाद, विशेषतः समीरसूर, टका, बोका, इडली डोसा, सगा, मराठी कथालेखक....इत्यादी....
- Log in or register to post comments
न
नाखु
Fri, 12/11/2015 - 08:21
नवीन
धागा आणि स्नेहांकितातै चे अभिनंदन एक चांगल्या विषयाला वाचा फोडल्याबद्दल..
धाग प्रतीसाद पाहून मला "काखेत कळसा आणि गावाला वळसा" याचा प्रत्यय आला. अनुभवसिद्ध मिपाकर असताना लेकाच्या शिक्षणाचे बाबत इकडे तिकडे न धावता इथे आणि इथेच (निवड कल आणि त्यानुसार संधी) मदत होइल हे पाहून धीर वाटला..
नववीतल्या किशोराचा पालक नाखु
- Log in or register to post comments
स
सिरुसेरि
Fri, 12/11/2015 - 08:28
नवीन
-- स्पर्धा प्रचंड आहे हे दिसते आहेच. मुलगा स्पर्धेबाबत जरा वीकच आहे.----------
--परदेशात बॅचलर्स करण्यासाठी आवश्यक त्या परिक्षांची तयारी व तितका टॅलंट माझ्या मुलामधे नाही.----
--पण मुलगा फारसा मेहनती चिकाटीवाला वगैरे नाही. जाता जाता अभ्यास करून ७०-७५ टक्केवाला आहे.----
तुम्ही तुमच्या मुलाबद्दल जरा जास्तच नकारात्मक विचार करत आहात असे वाटते आहे.
- Log in or register to post comments
स
सस्नेह
Fri, 12/11/2015 - 10:54
नवीन
नाही हो, मी वास्तवदृष्टी आहे. मुलाचे गुण अवगुण चांगले ओळखते.
हुशार आहे खराच, पण मेहनती नाही, हेही खरं.
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Fri, 12/11/2015 - 08:47
नवीन
गणेश लेखमालेतील माझा लेख सोडून उरलेले लेख वाचायला दया. त्याचे तो ठरवेल.
ह.घे. ताय.
- Log in or register to post comments
स
सस्नेह
Fri, 12/11/2015 - 08:49
नवीन
तुझ्या क्षेत्रासाठी स्पेशल कलाकारी अॅटिट्यूड वैग्रे लागते काय ?
(ह घे )
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Fri, 12/11/2015 - 08:57
नवीन
माझ्या आईने जो त्रास माझ्यामुळे भोगला तो तुझ्या वाट्याला येऊ नए एवढीच् सदिच्छा.
- Log in or register to post comments
स
सस्नेह
Fri, 12/11/2015 - 10:55
नवीन
माझी खात्री आहे, तुझी आई आत्ता नक्कीच त्रासात नाही ! :)
- Log in or register to post comments
क
कविता१९७८
Fri, 12/11/2015 - 10:29
नवीन
आमच्याकडची परीस्थीती सांगते, आजकाल मुलांना दहावीला ८०-९०% आरामात मिळतात अभ्यास न करणार्यांनाही मग ते सायन्स घेतात त्यात ४०-५०% पर्यंतच येतात मग रीझर्वेशनच्या आणि मॅनेजमेंट कोटात पैशाच्या जोरावर ते इंजिनियरींग , एम.बी.बी.एस. , फार्मा अशा शाखेत जातात. लांबच्या कॉलेजेस मधे म्हणजे अकोला, कोल्हापुर वगैरे आणि मग यथावकाश ४ चे ६ वर्षात डीग्र्या घेउन बाहेर पडतात. मग वशीला असेल त्याला चांगली नोकरी मिळते. आमच्या बिल्डींगमधला एक मुलगा हा अॅवरेज होता , दहावीत प्रिलियमला २ विषयात नापास असुन दहावीत ७६% मिळाले, सायन्स घेतलं १२ वी ला त्याची बहीण कॉलेज मधे शिक्षिका तिने सुपरवायजर्स ची ओळख करुन माझ्या भाउ या वर्गात असेल असे सांगितले, त्या वर्गातल्या सर्व मुलांना कॉपि करायला मिळाली (हे ते लोक स्वतः सांगतात). १२ ला ६२% मिळाले मग गुजराथेत कुठेतरी १८ लाख भरुन बी.डी.एस. ला अॅडमिशन घेतलय, त्या मुलाचे वडील म्हणतात याने अभ्यास केला नाही केला तरीही डीग्री मिळणार असं कॉलेज शोधलय. आणि मग त्याला लग्नात चांगला हुंडा आणि गाडी मिळेल.
सांगण्याचं तात्पर्य हेच की या सगळ्या प्रकारामधे खरी हुशार मुले तशीच राहतात आणि पैशाच्या जोरावर अशी मुले पुढे जातायत. आणि अश्या प्रकाराने इंजिनियर्स च्या संख्येत वाढ होत चालली आहे. बरेचसे घरी बसलेत यालाही हे कारण असावं अस माझं मत.
नोकरी शोधताना चांगल्या कंपन्या तुम्ही कुठुन इंजिनियरींग केलय ते पाहतात. ज्याला ड्रॉप लागलेला असतो त्याला नोकरी शोधताना थोडं जड जातं , शक्यतो चांगल्या नावाजलेल्या कंपन्या कॉलेज कॅम्पस इंटरव्यु द्वारेच मुलांची निवड करतात.
- Log in or register to post comments
स
स्नेहल महेश
Fri, 12/11/2015 - 10:34
नवीन
मस्त धागा
- Log in or register to post comments
प
पीके
Fri, 12/11/2015 - 11:15
नवीन
स्नेहांकिता ताई, आधी त्याचा ओढा कुठल्या बाजुला आहे ते पहा. माझ्या बहिणीला दहावीला ६५% टक्के मार्क पडले. सर्वांचे मत पडले कि सायन्स तुला झेपणार नाही. पण तिने हट्टाने सायन्सच घेतले. ( गो. जो. रत्नागीरी) १२ वीला ५५% टक्के मार्क पडले. सीइटी वगैरे ला तर विचारयलाच नको. परत तिने हट्टाने BSC ला आडमिशन घेतली. BSC Chemistry with Distinction मध्ये पास झाली. त्यापुर्वीच कॅम्पस इंटर्व्यू मधून फिनोलेक्स रत्नागीरी मध्ये सिलेक्ट झाली. आज तिसर्या वर्षी 40k/pm घेते गावातल्या गावात राहुन.
- Log in or register to post comments
स
संजय पाटिल
Fri, 12/11/2015 - 11:23
नवीन
सहमत!
फक्त अभियांत्रिकी किंवा वैद्ध्यकिय एवढिच क्षेत्रे आहेत असे नाही.
- Log in or register to post comments
स
सस्नेह
Fri, 12/11/2015 - 14:55
नवीन
तुमच्या बहिणीचे उदाहरण खरंच उत्साहदायक आहे.
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Fri, 12/11/2015 - 15:06
नवीन
माझ्या बहिणीचे उदाहरण मला पण अभिमानाने देऊ वाटते.
माझी बहिण (सक्खी नाही) सोलापुरातच नॉर्मल १२ वी सायन्स करुन बीएचएस्सी पुण्याचा एस एन डी टी मध्ये केली. विषय एफ एस क्यु सी. म्हण्जे फूड सायन्स अॅन्ड क्वालिटी कंट्रोल. तिची आई अन्न औशध प्रशासन खात्यात. त्यानंतर एमेस्सी एसपीला.
शासनाच्या एका प्रयोग शाळेत लगेच निवड झाली. नंतर ते सोडून तळवलकर मध्ये डायटिस्ट, कोकाकोला अशा पायर्या चढत एका मोठ्या कंपनीत विराजमान आहे. सतत चे परदेश दौरे करत असताना सुध्दा तिच्या नवरोबाची अन छोट्या मुलाची खूप साथ मिळते तिला.
वेग़ळ्या पधदतीचे शिक्षण घेऊन पण आपला त्यातील रस वाढवून, संधींचा योग्य उपयोग करुन खूप छान करीअर करता येते हे शुअर.
- Log in or register to post comments
स
सस्नेह
Fri, 12/11/2015 - 15:15
नवीन
खरंच कौतुकास्पद !
फूड सायन्स अँड क्वालिटी कंट्रोल बद्दल नवीनच समजले. पुणे सोडून इतरत्र कुठे आहे का हा कोर्स ?
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Fri, 12/11/2015 - 15:19
नवीन
जिथे होम सायन्स शिकवले जाते तिथे असते. सोलापुरात सिध्देश्वर गर्ल्स कॉलेजला आहे. बहुतेक मुलीच असतात ह्याला. मात्र एसएनडीटीची मजा और असते असे तिचे म्हणने पडले.
आताची बीएचएससी ची कथा मला माहीत नाही. चेक करावे.
- Log in or register to post comments
ख
खेडूत
Fri, 12/11/2015 - 15:59
नवीन
थेट तसा नाही, पण एन. सी. एलला असेल तर चेक करून सांगतो. सी एस आय आर पण चेकवा.
यू डी सी टी ज्याला हल्ली आय सी टी म्हणतात असं दिस्तंय. तिथे बी. टेकचे अनेक पर्याय आहेत त्यात अन्न तन्त्रज्ञान शाखा आहे. आपले मुकेस् भाय अंबानीपण तिथलेच आहेत म्हणे. हल्ली मेरिट बरंच जास्त चाललंय. जळगांवला एक शाखा निघाली होती. अजून आहे का पहावे लागेल.
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Fri, 12/11/2015 - 19:31
नवीन
Food Technology specialization हे जबरदस्तच आहे. मुकेसभाय मला वाटतं पाॅलिमर किंवा पेट्रोकेमिकल्स शाखेतले होते. Food Technology साठी B.Sc. in Biotechnology हाही एक चांगला पर्याय आहे.
- Log in or register to post comments
S
sudhir
Wed, 03/09/2016 - 07:18
नवीन
मि पण १२ वि पास(२०१४) विद्यार्थी आहे मला गतवर्षि व या वर्षी पण शाषकिय आयुर्वेदिक वैद्यकीय कॉलेज ला प्रवेश मिळत होता पण वडिलधरयाची इच्छा आहे की मि mbbs ला जावे पण खुप कष्ट करुण पण माझे mbbs ५ मार्कानि गेले. मला १४३/२०० मार्क होते cet मधे.
आपन एक सुद्न्य पालक आहात. मूलांकडुन जास्त अपेक्षा ठेवत नाही.
- Log in or register to post comments
अ
अजया
Fri, 12/11/2015 - 14:50
नवीन
चांगल्या इंजिनिअरिंग काॅलेजांबद्दल बोललं जातंय.सध्या कोणती काॅलेज चांगली समजली जातात ?(आय आय टी सोडून)
- Log in or register to post comments
S
sudhir
Wed, 03/09/2016 - 07:25
नवीन
Nit, coep, walchand engg college sangli
- Log in or register to post comments
र
रेवती
Fri, 12/11/2015 - 15:09
नवीन
चांगली माहिती मिळतिये.
- Log in or register to post comments
म
मारवा
Fri, 12/11/2015 - 15:25
नवीन
एक काम करा प्लीज तुम्ही जरा बाजुला व्हा
तुमच्या मुलाशी बोलु द्या ना जरा सर्वांना
तुम्ही टंका वाटल्यास करीयर त्याला करायच आहे त्याच्या जीवनाचा महत्वाचा प्रश्न आहे आणि तो आता
आवश्यक तितका प्रौढ आहे. तुमची आईची माया मान्य आहे पण थोड त्याला संवाद साधु द्या
तो काय विचार करतो, त्याला स्वतःला काय वाटतं थोड येउ द्या
दोन चार काकांशी ओळख झाली या निमीत्ताने बोलला थोडं तर चांगलच आहे ना ?
त्याला माहीतीय ना आई इथे मिसळपाव वर असते ते ?
मग त्याची थोडी ओळख होऊ द्या तुम्ही थोडं अंतरावरुन मार्गदर्शन करा
त्याला पुढे करा तुम्ही थोडं बाजुला व्हा बरं
लेट हिम फेस हीज लाइफ प्लीज
थोड जास्त बोललो असेल तर सॉरी.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Fri, 12/11/2015 - 16:53
नवीन
+१००
बारावीच्या मुलाला काय कळतंय?
हा प्रश्न चुकीचा आहे.
दहावीत मला डॉक्टर व्हायचे होते हे नक्की होते. माझ्या भावाला इंजिनियर व्हायचे नक्की होते.
माझ्या मुलाला सिव्हील इन्जीनियारीन्ग्च करायचे आहे( सिव्हील्च्या दुसर्या वर्षाला आहे).
मुलांची आकलनशक्ती आपण समजतो त्यापेक्षा किती तरी जास्त आहे, असते.
म्हणून मारवा साहेबांच्या म्हणण्याला बाडीस
- Log in or register to post comments
स
सस्नेह
Fri, 12/11/2015 - 17:34
नवीन
मारवाजी, तो माझ्या समोर बसला आहे, हे सगळं वाचतो आहे आणि सांगतो आहे की मला वेल पेईंग आणि फुल-डे बिझी नसणारा, फॅमिली फ्रेंडस एंजाॅयमेंट करता येण्यासारखा जाॅब हवा असे सगळ्या काका अन मावशांना सांग !
अॅस्ट्राॅनाॅमी, स्पेस रिसर्च यात काम करायला आवडेल असे म्हणतो.
आता बोला !
- Log in or register to post comments
आ
आदूबाळ
Fri, 12/11/2015 - 18:35
नवीन
हैला! माझंही डिट्टो हेच स्वप्न आहे!
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Tue, 12/15/2015 - 11:31
नवीन
आजकालच्या सगळ्या यंग जनरेशनचं हेच स्वप्नं आहे. तेही फ्रॉम द फस्ट डे अॅट द फस्ट जॉब!
- Log in or register to post comments
स
स्रुजा
Fri, 12/11/2015 - 19:53
नवीन
स्नेहा ताई मग एरोनॉटिक्स मध्ये का जात नाही? एरोनॉटिकल ईंजिनीअरिंग हा एक चांगला पर्याय आहे. फिजिक्स मध्ये गती पण आहे म्हणतेस तर. विशाखापट्टणम , बँगलोर मध्ये या ईंजिनीअरिंग चा पर्याय आहे. दिल्ली, चंदीगढ मध्ये पण आहे.
- Log in or register to post comments
स
समीरसूर
Mon, 12/14/2015 - 04:55
नवीन
माझ्या माहितीप्रमाणे एस्त्रोनोमी किंवा स्पेस रिसर्च किंवा अस्ट्रोफिजिक्स या क्षेत्रांमध्ये अभ्यास, संशोधन, मूलभूत तत्वे समजून घेऊन किचकट गणिते सोडविणे वगैरे मोठ्या प्रमाणावर असणार. किंबहुना ही क्षेत्रे अशी आहेत जिथे निरंतर अभ्यास आणि कष्ट असतील. कामाच्या ठराविक वेळा नसतील. आणि अगदी आतून येणारी उर्मी जिथे असते तिथे कामाच्या वेळा सहसा बघितल्या जात नाहीत. शिवाय या क्षेत्रात प्रवेश मिळवणे आणि यशस्वी होणे तसे सोपे नाही. त्यामुळे आवड असली तरी करीअर म्हणून या क्षेत्रात काम करणे कितपत फिजीबल असेल हे तपासून बघणे गरजेचे आहे असे मला वाटते. त्याला जयंत नारळीकर यांचे 'माझे चार नगरातील वास्तव्य' हे पुस्तक अवश्य वाचायला द्या. त्यातून त्याला या क्षेत्रातील कामाची तोंडओळख नक्कीच होईल.
- Log in or register to post comments
स
समीरसूर
Mon, 12/14/2015 - 05:13
नवीन
मोकळा वेळ, कामाचे कमी तास, चांगला पगार - यासाठी प्राध्यापक, शासकीय अधिकारी (एमपीएससी साठी सुरुवातीला कष्ट असतील), बेंकेत प्रोबेशनरी ऑफिसर (बदलीची तयारी असायला पाहिजे), माझ्या आधीच्या प्रतिसादात सुचवल्याप्रमाणे युजर एक्सापीरीयांस डिझायनर (जबाबदारी वाढली की काम वाढते, कलेची आवड महत्वाची, नवनवीन ट्रेंड्सचा अभ्यास महत्वाचा, संवाद्कौशल्ये, गरजा समजून घेऊन डिझाईन करणे, एनेलिसिस करता येणे महत्वाचे), आयटी क़्वालिटी ओडिटर, ट्रेनिंग स्पेशालीस्ट (सोफ़्ट स्किल्स, क्रोस कल्चर वगैरे), ट्रन्सलेटर (चीनी, फ्रेंच, जपानी), मार्केटिंग कम्युनिकेशन्स (डिजिटल मार्केटिंग, लिखाण उत्तम हवे, अचूक भाषाज्ञान महत्वाचे, माफक टेक्निकल ज्ञान आवश्यक) इत्यादी क्षेत्रे आकर्षक आहेत. अर्थातच या सगळ्या क्षेत्रांमध्ये अत्युच्च पातळीवरचे यश मिळवणे शक्य आहे. त्यासाठी कष्ट आणि इनोवेशन हवे, नवनवीन शिकण्याची तयारी हवी. चिकाटी ऑफ कोर्स हवीच हवी. शिवाय यापैकी बर्याच क्षेत्रांमध्ये स्वतंत्र व्यवसायाच्या संधी भरपूर आहेत. अमाप कष्ट ही पहिली अट!
- Log in or register to post comments
स
समीरसूर
Mon, 12/14/2015 - 05:20
नवीन
वर दिलेल्या पर्यायांपैकी बर्याच क्षेत्रांसाठी अभियांत्रिकॆचॆ पदवी चालू/उपयुक्त ठरू शकेल. उदा. शासकीय अधिकारी, प्राध्यापक, प्रोबेशनरी ऑफिसर, आयटी क्वालिटी ओडिटर, मार्केटिंग कम्युनिकेशन्स वगैरे. चांगला अभ्यास करून अभियांत्रिकी चांगल्या कोलेजातुन केल्यास ही क्षेत्रे अधिक सोपी जातील. बाकी युजर एक्स्पीरियंस डिझाईन, प्रोडक्ट डिझाईन साठी पदवी पातळीचे शिक्षण घेऊन सुरुवात करणे श्रेयस्कर. तेच भाषाधिष्ठित अभ्यासक्रमांसाठॆ पण लागू पडते. मी आधीच्या प्रतिसादात सुचवल्याप्रमाणे डिझाईन साठी एन आय डी (अहमदाबाद) उत्तम!
- Log in or register to post comments
स
सस्नेह
Mon, 12/14/2015 - 05:52
नवीन
विस्तृत माहितीसाठी धन्यवाद, समीरसूरजी. याचा नक्कीच उपयोग होईल.
- Log in or register to post comments
स
समीरसूर
Mon, 12/14/2015 - 06:41
नवीन
अभियांत्रिकीविषयी माझं मत -
गणित आणि टेक्निकल विषयांची खूप आवड + पात्रता परीक्षेत चांगले गुण + उत्तम दर्जाचे महाविद्यालय + आपल्या शाखेचे मूलभूत ज्ञान आणि त्याचा भक्कम पाया + विषय समजून घेऊन केलेला उत्तम अभ्यास + चांगले गुण + उत्तम संवादकौशल्य = उत्तम करीअर!
अभियांत्रिकीची नावड + गणिताची धडकी + डोकं फोडलं तरी बेसिक तत्वे डोक्यात शिरणार नाहीत याची हमी + जे मिळेल ते महाविद्यालय + जी मिळेल ती शाखा + वर्गात टाकलेल्या पाट्या + दरवर्षीच्या एटीकेट्या + कसेबसे (भुकेच्या वेळी वडापाव घाई-घाईने खावा तसे) चार वर्षात उरकलेले अभियांत्रिकीचे शिक्षण = भरपूर वणवण, सगळीकडून नकारघंटा, निराशा, स्ट्रगल, स्थिर होण्यास विलंब, नोकरीत लवकर येणारा कंटाळा, गमावलेला आत्मविश्वास, इत्यादी इत्यादी (जोपर्यंत अभियांत्रिकीशी संबंधित नोकरीचा त्याग करत नाही तोपर्यंत).
मग आधीच आवडीचे क्षेत्र घेऊन वर्षे, कष्ट, मनाचा त्रास वाचवणे अधिक योग्य नाही का?
- Log in or register to post comments
स
सस्नेह
Mon, 12/14/2015 - 07:13
नवीन
सहमत आहे !!
- Log in or register to post comments
स
स्रुजा
Fri, 12/11/2015 - 20:00
नवीन
ही यादी आहे भारतातल्या स्कुल्स ची: https://en.wikipedia.org/wiki/List_of_aerospace_engineering_schools#India
सुरुवातीच्या काळात हे थोडं अवघड असतं. एकदा एक एक टप्पा पार करत गेलं की आपोआप स्थैर्य येतं आणि या गोष्टी शक्य होतात. बरोबरच्या लोकांचं पण थोडं असंच होतं. स्थैर्य येईपर्यंत स्ट्रगल असतो, तो पर्यंत थोडं बिझी राहावं लागतं, मेहनत करावी लागते पण नंतर पुन्हा तुमच्या छंदाशी, मित्रांशी कनेकट होता येतं. पुर्वी हे स्थैर्य ४०शीत यायचं आता ३०शी त येतं. कारण सपोर्ट सिस्टीम पण तेवढी तगडी झाली आहे. मात्र तो पर्यंत हे डोक्यातुन काढुन टाकणे योग्य. खास करुन या टप्प्यावर तर हा विचार करुच नये. तो स्थैर्य आल्यानंतरच्याच गोष्टी करत असणार आहे, मान्य आहे पण तिथपर्यंतचा रस्ता "अपहील बॅटल" असु शकतं हे मात्र आवर्जुन सांगण्याजोगी गोष्ट आहे असं मला वाटतं.
त्याला खुप सार्या शुभेच्छा !!
- Log in or register to post comments
इ
इडली डोसा
Fri, 12/11/2015 - 20:52
नवीन
असा जॉब कोणत्याही क्षेत्रात सुरुवातीलाच मिळणे अवघड आहे. आधी तुम्हाला भरपुर मेहनत करुन एक स्पेसिफिक स्किल मधे पारंगत व्हायला लागेल. मग ते स्किल वापरुन हवा तसा जॉब मिळवता येईल किंवा स्वतःचे स्वतः फ्रिलान्स किंवा कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर काम मिळवुन उरलेला वेळ काव्य, शास्त्र, विनोदासाठी वापरता येईल. पण त्याला अजुन खूप म्हणजे खूपच वेळ आहे.
- Log in or register to post comments
ट
ट्रेड मार्क
Fri, 12/11/2015 - 20:53
नवीन
१२वी नंतर भौतिकशास्त्रात B. Sc. करून मग अॅस्ट्राॅनाॅमी मध्ये सैद्धांतिक खगोलशास्त्र (Theoretical Astronomy) हे specialization घेवून मास्टर्स करता येईल.
दुसरा पर्याय म्हणजे Instrumental/ Experimental Astronomy - या साठी मात्र अभियांत्रिकी (इलेक्ट्रिकल वा इलेक्ट्रोनिक्स) करायला लागेल आणि JEST (Joint Entrance Screening Test) देऊन मग अॅस्ट्राॅनाॅमीमध्ये P.Hd. पर्यंत शिकता येतं.
अॅस्ट्राॅनाॅमी मधील काही शाखा
Astrochemistry : A branch of astronomy and chemistry dealing with the chemical composition and evolution of the universe and its parts
Astrogeology : The science dealing with the structure and composition of planets and other bodies in the solar system.
Astrometeorology : The study of the theoretical effects of astronomical bodies and forces on the earth’s atmosphere.
Astrometry : The branch of astronomy that deals with the measurement of the positions and motions of the celestial bodies.
Astrobiology : The study of life beyond the earth’s atmosphere as on the planets.
Astrophysics : The branch of astronomy that deals with the physical properties of celestial bodies and with the interaction between matter and radiation in the interior of celestial bodies and in interstellar space.
यात शिक्षण देणाऱ्या महाराष्ट्र व जवळील भागातल्या काही संस्था -
TIFR Mumbai, IUCAA Pune, Swami Ramanand Teerth University Nanded, Physical Research Laboratory Ahmedabad.
तसेच काही ऑनलाईन कोर्सेस पण आहेत जे सध्या बेसिक पक्कं होण्यासाठी आणि आवड अजून विकसित करण्यासाठी मदत करतील -
या लिंक मध्ये पण थोडी माहिती आहे
तुम्ही राहता तिथे starwatchers चा ग्रुप आहे का बघा, त्यात त्याला सभासद करून द्या.
अजून घेतला नसल्यास आणि शक्य असल्यास एखादा बर्यापैकी टेलीस्कोप घ्या. मी काही दिवसांपूर्वी हा घेतला -
Orion StarMax 90mm TableTop Maksutov-Cassegrain Telescope
या लिंक मध्ये हा नुसता टेलिस्कोप आहे पण याबरोबर जास्तीच्या काही accessories घेतल्या तर खूपच छान अवकाश निरीक्षण करता येतं. मी संपूर्ण Kit $४०० (approx. रुपये २६०००) ला घेतलं. यात संगणकीकृत पण मिळतात. ज्यात जवळपास ३०००० objects चा डेटा फीड केलेला असतो. नुसता चालू करायचा आणि काय बघायचंय ते द्यायचं की आपोआप टेलिस्कोप तिकडे सेट होतो. पण ते महाग असतात आणि त्याला batteries खूप लागतात. माझ्या अंदाजाने ८ AA batteries वर साधारतः ३ तास चालतो. नाहीतर मग adapter मिळतो पण तारे बघायला आपण शहराबाहेर जातो तिथे वीज असेलच याची खात्री नसते.
माझ्या मुलीला पण अॅस्ट्राॅनाॅमीमध्ये करीअर करायचंय म्हणून थोडी माहिती मी पण गोळा करतोय. अजून तुम्हाला काही प्रश्न असल्यास विचारा, मला माहित असल्यास सांगीन नाहीतर काहीतरी खटपट करून माहिती मिळवता येईल.
- Log in or register to post comments
अ
अभिषेक पटवर्धन
Fri, 12/11/2015 - 21:19
नवीन
माझ्या माहितीतल्या एकाने Indian Institute of Space Science and Technology,Thiruvananthpuram इथुन Bachelor of Technology (B.Tech.), Avionics केलय (२०१२ पास आउट). त्यानंतर ईस्रो मधे Summer Internship, मग Tata Institute of Fundamental Research ट्रेनिंग आणि मग २ वर्ष ईस्रो मधेच नोकरी केली. सद्ध्या San Jose State University मधुन मास्टर्स करतोय. अजुन माहिती पहिजे असेल तर मी त्याला ईमेल करुन तुमच्यशी कनेक्ट करु शकीन.
- Log in or register to post comments
स
सस्नेह
Sat, 12/12/2015 - 07:48
नवीन
ट्रेड मार्क आणि अभिषेक पटवर्धन तुमच्याकडून अतिशय मौलिक आणि स्पेसिफिक माहिती दुव्यांसहित मिळाली आहे.
खूप धन्यवाद.
तुम्ही सुचवल्याप्रमाणे मुलाशी बोलून आणखी तपशील विचारेन .
- Log in or register to post comments
अ
अद्द्या
Sat, 12/12/2015 - 10:29
नवीन
काकू .
तुमचे प्रतिसाद पाहता त्याला फिजिक्स मध्ये इंटरेस्ट असेल असं वाटतं .
७०-७५ हे वाईट अजिबात नाहीत. आणि तो "जाता जाता " तेवढे मिळवत असेल . आणि अजून खच्चून मेहनत करायची तयारी असेल तर aeronautics इंजिनियरिंग करता येईल का विचारून पहा . त्यासाठी काय परीक्षा लागतात त्याचा मला अंदाज नाही . नेत वर माहिती मिळेलच किंवा इथले लोक हि सांगतील . पण नेहमी पेक्षा वेगळा फील्ड आहे . आणि सध्या अश्या लोकांची गरज आहे.
कम्प्युटर मध्ये आवड असेल तर नेहमीचा cs आहेच . पण तिथून पुढे नेट्वर्किंग , वर्च्युअल मशिन्स , नेटवर्क सेक्युरिटी इत्यादी विषय घेऊन तो बराच काही शिकू शकतो . आणि सेक्युरिटी एक्स्पर्ट कायम लागतात .
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- ›
- »