Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

माहिती हवी -- बारावीनंतरच्या शैक्षणिक संधी

स
सस्नेह
गुरुवार, 12/10/2015 - 11:37
🗣 124 प्रतिसाद
आत्ताच खात्रीलायक सूत्रांकडून कानी आलेल्या बातमीनुसार, काही शहरांतील अभियांत्रिकी महाविद्यालयांनी आपल्या जाहिरातीसाठी ज्युनिअर कॉलेजच्या प्राध्यापकांची मदत मागितली आहे. ...कारण अभियांत्रिकीच्या शेकडो सीट्स गतवर्षी रिकाम्या राहिल्या आहेत. ...त्याचे कारण गतवर्षीच्या गतवर्षी उत्तीर्ण झालेले हजारो अभियंते अद्यापि बेकार आहेत. ही बातमी ऐकून मला धडकी भरली आहे. ...कारण माझा लेक यावर्षी बारावी, JEE, CET इ. स्टेजेसमधून जात आहे. आणि ही बातमी ऐकल्यावर मला त्याच्यासाठी इतर अपारंपारिक शैक्षणिक संधी शोधणे आवश्यक वाटत आहे. मिपाकरांना विनंती, कृपया बारावी(सायन्स) नंतर (अभियांत्रिकी वगळता) उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या करिअर, व्यावसायिक शिक्षण शाखांविषयी कुणाला माहिती असल्यास द्यावी. (मुलाचा बारावीला A ग्रुप आहे.) तसेच मागे एकदा यासारख्या विषयावर धागा निघाल्याचे आठवते. कुणाकडे त्याची लिंक असल्यास द्यावी.
वर्गीकरण
शैक्षणिक

प्रतिक्रिया द्या
38104 वाचन

💬 प्रतिसाद (124)
क
कानडा Sat, 12/12/2015 - 18:01 नवीन
भारत सरकार (MHRD) ने National Institutional Ranking Framework (www.nirfindia.org) सुरू केले आहे. यात एप्रिल-२०१६ मधे भारतातील कॉलेजेस चे पहिले रँकिंग प्रसिध्द होणार आहे. यात खुप मोठा भर faculty वर आहे. त्यातुन चांगली कॉलेजेस कळतील (असा आमचा तरी आशावाद आहे). --- कानडा
  • Log in or register to post comments
क
कानडा Sat, 12/12/2015 - 18:07 नवीन
ईंजिनिअरींग ब्रँच निवडतांना शक्यतो मुलभूत ब्रँच निवडा : मेकॅनिकल, ईलेक्ट्रीकल आणि सिव्हील. आणि ईंजिनिअरींग करायला घाबरू नका. ईंजिनिअर पदवीधारकांची संख्या प्रचंड असली तरी ईंजिनिअर्स खूप कमी आहेत. --- कानडा
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sat, 12/12/2015 - 18:27 नवीन
+100
  • Log in or register to post comments
क
कल्पक Mon, 12/14/2015 - 03:10 नवीन
आवड असेल तर User Experience Design या क्षेत्राचा नक्की विचार करावा. यात जगभर खूप चांगला स्कोप आहे. तंत्रज्ञान आणि डिजाईन अशी दुहेरी आवड असेल तर हे क्षेत्र छान आहे. या विषयावर मी लिहिलेला लेख इथे वाचता येईल: http://misalpav.com/node/27069 मूळ लेख (लोकसत्ता- करिअर वृत्तांत पुरवणी, १० फेब्रुवारी २०१४). (http://www.loksatta.com/career-vrutant-news/usage-of-technology-367435/?...) हा लेख वाचून महाराष्ट्रातल्या बऱ्याच विद्यार्थी/पालकांचे इमेल्स आले होते. अधिक माहिती हवी असेल तर मला निसंकोचपणे निरोप पाठवा.
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Mon, 12/14/2015 - 08:35 नवीन
आपले दोन्ही लेख वाचले. त्याबाबत काही माहिती द्याल का ? १. या क्षेत्रात करिअर करण्यासाठी बारावीनंतर कोणती शिक्षणशाखा निवडावी लागेल ? व बॅचलर्स, मास्टर्स यापैकी कोणते क्वालिफ़िकेशन आवश्यक आहे ? २. नोकरीची संधी कोणत्या प्रकारच्या कंपन्यांमधे आहे ? उदा. जाहिरात, आयटी इ. ३. अभियांत्रिकीशी या क्षेत्राचा संबंध आहे का व कसा ? ४. आपण याच क्षेत्रात काम करता का ? असल्यास तुमचा अनुभव ऐकायला आवडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कल्पक
क
कल्पक Mon, 12/14/2015 - 16:27 नवीन
१. या क्षेत्रात करिअर करण्यासाठी बारावीनंतर कोणती शिक्षणशाखा निवडावी लागेल ? व बॅचलर्स, मास्टर्स यापैकी कोणते क्वालिफ़िकेशन आवश्यक आहे ? बारावी नंतर डिजाईन/फाईन आर्ट मधील डिग्री असेल तर उत्तम. अनेक लोक इंजिनिअरिंग करून सुद्धा मास्टर्सला डिजाईन घेतात (पण त्यातले बहुतांशी लोक बळजबरी इंजिनिअरिंग केल्यावर मनाचा कल ओळखून असं करतात) आणि या क्षेत्रात येतात. आयआयटी मधील इंडस्ट्रीअल डिजाईन सेंटर इथे बॅचलर्स, मास्टर्स असे कोर्स आहेत. त्याची माहिती इथे पाहता येईल (http://www.idc.iitb.ac.in/academics/Bdes-program.html) मास्टर्सला Interaction Design हे specialization घेऊन User Experience Design शिकता येतं त्याची माहिती इथे पाहता येईल (http://www.idc.iitb.ac.in/academics/interaction-design.html). मास्टर्स केले तर उत्तमच आहे. मला स्वतःला मास्टर्स साठी आयआयटीत प्रवेश मिळू शकला नाही पण त्यामुळे काही अडलं नाही. NID ही सुद्धा चांगली संस्था आहे (http://www.nid.edu/education/master-design/interaction-design/p-overview) २. नोकरीची संधी कोणत्या प्रकारच्या कंपन्यांमधे आहे ? उदा. जाहिरात, आयटी इ. नोकरीच्या संधी आयटी कंपन्या (शिवाय प्रत्येक प्रकारच्या संस्थांमध्ये आयटी विभाग असतो), सोफ्टवेअर उत्पादन कंपन्या, बहुराष्ट्रीय बँका, कोणत्याही प्रकारच्या उत्पादन कंपन्या, बहुराष्ट्रीय इन्सुरन्स कंपन्या, मोबईल फोन तयार करणाऱ्या कंपन्या अशा बऱ्याच क्षेत्रात आहेत. अमेरिकेत User Experience Design हे १० सगळ्यात जास्त मागणी असणाऱ्या कौशल्यांपैकी एक आहे. इथे टूथब्रश तयार करणाऱ्या कंपनी पासून नासा पर्यंत सगळीकडे User Experience Design करणारे लोक लागतात. भारतात इस्रो मध्ये सुद्धा असे लोक लागतात. थोडक्यात ज्याठिकाणी तंत्रज्ञान लागते तिथे असे लोक लागतात. एका निष्कर्षानुसार आयटी किवा सोफ्टवेअर कंपनी मध्ये developer लोकांच्या १०% तरी User Experience Design चे लोक असावेत ज्यामुळे उत्पादन user friendly होईल. मी एका बहुराष्ट्रीय आयटी कंपनीत अमेरिकेत काम करतो. आमच्या कंपनीत अंदाजे ३ लाख लोक जगातल्या ४० देशात असणाऱ्या १२०० ग्राहक कंपन्यांसाठी काम करतात आणि आमच्या कंपनीत User Experience Design चे काम करणारे जेमतेम १००० लोक आहेत. यावरून तुम्हाला कौशल्याच्या मागणीची कल्पना येईल. आम्हाला अनेकदा असे लोक लागतात पण पटकन मिळत नाहीत. ३. अभियांत्रिकीशी या क्षेत्राचा संबंध आहे का व कसा ? थोडासा दुरून संबंध आहे. User Experience Designer ने तयार केलेले डिजाईन implement करणारे लोक बरेचदा अभियांत्रिकीशी संबंधित असतात. त्यामुळे अभियांत्रिकी केलेला User Experience Designer असेल तर त्याला दोन्ही बाजूचं ज्ञान असतं. पण डिजाईन शिक्षण सगळ्यात उपयोगी आहे. ४. आपण याच क्षेत्रात काम करता का ? असल्यास तुमचा अनुभव ऐकायला आवडेल. हो, मी गेली १० वर्ष याच क्षेत्रात काम करतोय. माझे वडील डॉक्टर असून सुद्धा त्यांनी आवडीप्रमाणे शिक्षण घेण्याचं स्वातंत्र्य दिलं. लहानपणापासून चित्रकलेची आवड होती. त्यामुळे फाईन आर्ट मधील applied art (कमर्शीअल आर्ट) मध्ये डिग्री मिळवली. त्यानंतर जाहिरात संस्थेमध्ये काही वर्षं काम करून आयटी क्षेत्रात आलो. आयआयटी मध्ये मास्टर्स साठी प्रवेश मिळू शकला नाही पण आयआयटी मधील इंडस्ट्रीअल डिजाईन सेंटर मध्ये दोन वर्ष research associate म्हणून User Experience Design शी संबंधित संशोधन प्रकल्पावर काम करण्याची संधी मिळाली. त्या दरम्यान User Experience Design चा छोटा कोर्स सुद्धा तिथून करता आला. या विषयावर ५ शोधनिबंध लिहून ते आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये प्रकाशित करता आले. नंतर आयटी कंपनीत नोकरी करताना चार वर्षांपूर्वी अमेरिकेत यायची संधी मिळाली. Stanford University चा सुद्धा एक छोटा दूरस्थ कोर्स करता आला. आता अमेरिकेतल्या Fortune 500 कंपन्यांसाठी User Experience Design चे काम करतोय. अनेक तरुणांना या क्षेत्रात येण्यासाठी प्रोत्साहन आणि मार्गदर्शन सुद्धा करतो. या क्षेत्रात सर्जनशील कामाचं समाधान सुद्धा मिळतं आणि पैसे सुद्धा चांगले मिळतात. शिवाय हे क्षेत्र खूप Niche असल्यामुळे येणारी २० वर्ष यात कुशल लोकांना जगभर खूप मागणी असणार आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह
न
नीलमोहर Mon, 12/14/2015 - 08:26 नवीन
क्रिएटिव्ह फील्डची आवड असेल तर डिझाईन क्षेत्रात अनेक संधी आहेत. यात अनेक पदवी, पदविका, पदव्युत्तर अभ्यासक्रम येतात, सहसा १२वी नंतर कोणत्याही कोर्सला प्रवेश घेता येतो, हवे ते स्पेशलायझेशन निवडता येते. उदा: ग्राफिक डिझाईन, अ‍ॅनिमेशन डिझाईन, प्रॉडक्ट डिझाईन, फिल्म & व्हिडीओ डिझाईन, टेक्स्टाईल डिझाईन, युझर एक्सपीरीयंस ui/ ux design इ. ui/ ux design सध्या खूप डिमांडमध्ये आहे, त्यात करियरला पूर्ण स्कोप आहे, पगारही जोरदार असतात. आवड असेल तर आर्किटेक्चरल ३डी व्हिज्युलायझेशन/ ३डी मॉडेलिंग हेही एक भरपूर संधी असलेले फील्ड आहे. वरीलपैकी कोणताही कोर्स केल्यावर सर्व्हिस/ व्यवसाय्/ फ्रिलांस काम इ.अनेक पर्याय उपलब्ध असतात. १. http://www.nid.edu/education/bachelor-design २. http://www.mitid.edu.in/ ३. http://sid.edu.in/ ४. http://www.shiksha.com/getListingDetail/119842/course/course-Diploma-In-Advanced-Computer-Arts-Daca-Pune-India, C-DAC-National Multimedia Resource Centre (NMRC): DACA - Diploma-In-Advanced-Computer-Arts वरील साईट्स चेक कराल, mit, symbiosis, C-DAC या पुण्यातील संस्थांमध्ये अनेक कोर्सेस उपलब्ध आहेत, याशिवायही इतर बर्‍याच छोट्या मोठ्या संस्थांमधून हे कोर्सेस शिकवले जातात. स्नेहा ताई, मुलाने अ‍ॅप्टिट्यूड टेस्ट (कल चाचणी) दिलीय का कधी, त्यातूनही कोणत्या फील्डची आवड, कल, क्षमता आहे ते कळू शकतं.
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Mon, 12/14/2015 - 10:37 नवीन
बारावीची परीक्षा झाल्यावर अ‍ॅप्टिट्यूड टेस्ट करायची आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर
आ
आदूबाळ Mon, 12/14/2015 - 11:16 नवीन
अ‍ॅप्टिट्यूड टेस्टबद्दल कोणाचे काय काय अनुभव आहेत? खरोखर कल वगैरे सुस्पष्टपणे कळतो का? त्याला कितपत महत्त्व द्यावं? जे त्या मुलामुलीला / आईबापांना सोळा वर्षात दिसतं / कळतं त्यावरून घेतलेला निर्णय दोन तासांच्या टेस्टच्या निकालांवरून बदलणं योग्य आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर
स
सस्नेह Mon, 12/14/2015 - 11:18 नवीन
अगदी हीच शंका त्या टेस्टबद्दल ऐकल्यावर आली होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
न
नीलमोहर Mon, 12/14/2015 - 13:34 नवीन
अनुभव नाही त्यामुळे जास्त माहिती नाही. अशा अनेक फ्री टेस्ट ऑनलाईन उपलब्ध असतात, एखादी करून बघावी म्हणजे साधारण कल कुठे आहे त्याचा अंदाज येऊ शकेल. अशा टेस्ट्ने नुकसान काही होणार नाही, त्याचा supplementary म्हणून वापर करावा. टेस्टच्या निकालांवरून आपला निर्णय बदलणं अर्थातच बरोबर नाही, मात्र त्याचा योग्य निर्णय घेण्यात उपयोग होऊ शकेल असं वाटतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
क
कल्पक Mon, 12/14/2015 - 16:31 नवीन
तुम्ही सुद्धा User Experience Design मध्ये काम करता का? तुमची ओळख करून घ्यायला आवडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर
अ
अभ्या.. Tue, 12/15/2015 - 07:13 नवीन
कल्पक राव तुमचे प्रतिसाद व माहीती आवडली. तुमचा तंत्रज्ञानाची उपयोगशील रचना हा लेख सुंदर होता. ह्या फिल्डची लोकांना खरेच माहीती नाही. आपण लिहित राहिलात तर आवडेल वाचायला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कल्पक
क
कल्पक Tue, 12/15/2015 - 20:48 नवीन
धन्यवाद. User Experience Design क्षेत्राशी संबंधित बऱ्याच नवनवीन विषयांवर लिहिण्याचा विचार आहे. लवकरच लिहीन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
न
नीलमोहर Wed, 12/16/2015 - 11:47 नवीन
तुम्ही सुद्धा User Experience Design मध्ये काम करता का? - आपण हे मला विचारलेत असं समजून उत्तर देत आहे. मी UI Design मध्ये नाही, ग्राफिक आर्टिस्ट म्हणून खाजगी कंपनीत काम करत आहे. मलाही Ux/UI Design बाबत अजून जाणून घ्यायची इच्छा आहे तरी आपण नक्की याविषयी अजून लिहावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कल्पक
क
कल्पक गुरुवार, 12/17/2015 - 05:45 नवीन
नक्की लिहिन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर
ख
खटपट्या Mon, 12/14/2015 - 08:41 नवीन
सर्व प्रतिसाद वाचले खूप मार्गदर्शक आहेत. जर दहावी नंतर सहजासहजी डीप्लोमाला अ‍ॅडमिशन मिळत असेल तर ते घ्यावे की बारावी सायन्सला जावे?
  • Log in or register to post comments
ब
बबन ताम्बे Mon, 12/14/2015 - 16:07 नवीन
डिप्लोमानंतर इंजीनीयरींग डीग्री (थेट दुस-या वर्षाला प्रवेश) बद्द्ल dte च्या साईटवर पुर्ण माहीती मिळेल. http://dse15.dtemaharashtra.org/dse15/index.php/hp_controller/eligibility काही लक्षात घेण्यासारखे मुद्दे. १. डिप्लोमा केल्यानंतर इंजीनीयरींग डीग्री करायची असेल तर डिप्लोमाच्या शेवटच्या वर्षाला निदान ८५ टक्के मार्क्स पाडावेत म्हणजे चांगल्या इंजीनीयरींग कॉलेजमधे प्रवेश मिळेल.चांगल्या इंजीनीयरींग कॉलेज मधे शिक्षण घेणे उत्तम. (चांगले = जिथे शिकवणारा स्टाफ चांगला आहे, फॅसिलिटीज चागल्या आहेत, कँपस सिलेक्शनला चांगल्या कंपन्या येतात या अर्थाने) २. डिप्लोमा केल्यानंतर डायरेक्ट इंजीनीयरींगच्या दुस-या वर्षाला प्रवेश मिळतो. दुस-या वर्षी इंजीनीयरींगच्या जागा कमी असतात. चांगल्या कॉलेजमधे प्रवेश मिळण्यासाठी दुस-या वर्षी पण खूप हाय मेरीट असते. तरी पण आता इंजीनीयरींग कॉलेज भरपूर असल्यामुळे कुठे ना कुठे प्रवेश मिळतो. पण चांगले कॉलेज असणे उत्तम. ३. बारावीच्या तुलनेत डिप्लोमाचे मॅथेमॅटीक्स बेसिक लेव्हलचे आहे. इंजीनीयरींगच्या दुस-या वर्षी इंजी. मॅथेमॅटीक्स अवघड जाऊ शकते. विद्यार्थ्याला खूप मेहनत करावी लागेल किंवा खासगी क्लास लावावा लागेल. ३. ज्यांना लगेच नोकरीची आवश्यकता आहे त्यांनी डिप्लोमाला जाणे श्रेयस्कर. चांगल्या कॉलेजमधे शिकलेल्या आणि शैक्षणिक प्रगती उत्तम असणा-या विद्यार्थ्याला नोकरी मिळू शकते. त्यानंतर नोकरी करून बरीच मुले AMIE किंवा पार्ट टाईम डीग्री करतात. ४. बारावी सायन्सनंतर इंजीनीयरींग तसेच इतर करीयरचे भरपूर ऑप्शन आहेत. डिप्लोमा केल्यानंतर डीग्रीसाठी तीच साईड घ्यावी लागते. मेकॅनिकल डिप्लोमा वाल्याला आय्.टी. ला जाता येणार नाही किंवा आय्.टी. वाल्याला दुसरीकदे शिफ्ट मारता येत नाही. ५. पहिल्या वर्षीच्या इंजीनीयरींगच्या जागा हल्ली भरपूर आहेत. पण चांगल्या इंजीनीयरींग कॉलेजमधे प्रवेश मिळण्यासाठी बारावीला (सीइटी+बारावी) चांगले मार्कस आवश्यक आहेत. जाणकार अजून भर टाकतीलच. महत्त्वाचे : विद्यार्थी कष्टाळू असेल तर बारावीनंतर इंजीनीयरींग केले काय किंवा डिप्लोमानंतर केले काय, त्याच्यासाठी काही फरक पडत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
ख
खटपट्या Mon, 12/14/2015 - 16:36 नवीन
माहीतीबद्दल धन्यवाद बरीचशी माहीती आधी माहीत होती. व्यनी केलाय...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बबन ताम्बे
क
कानडा Tue, 12/15/2015 - 05:56 नवीन
डिप्लोमा केल्यानंतर डीग्रीसाठी तीच साईड घ्यावी लागते. मेकॅनिकल डिप्लोमा वाल्याला आय्.टी. ला जाता येणार नाही किंवा आय्.टी. वाल्याला दुसरीकदे शिफ्ट मारता येत नाही.
हे आता लागु नाही. डिप्लोमा ला कुठलीही ब्रँच असेल तरी डिग्रीला कुठल्याही ब्रँच ला अ‍ॅड्मिशन घेता येते. --- कानडा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बबन ताम्बे
ब
बबन ताम्बे Tue, 12/15/2015 - 07:16 नवीन
डिप्लोमा ला कुठलीही ब्रँच असेल तरी डिग्रीला कुठल्याही ब्रँच ला अ‍ॅड्मिशन घेता येते हे माहीत नव्हते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कानडा
द
दिपक.कुवेत Mon, 12/14/2015 - 14:29 नवीन
आणि अतीशय उपयुक्त माहिती. नेहमीच्या ईंजीनियर आणि मेडिकल वाटा सोडूनहि करीयरचे एवढे मार्ग उपलब्ध असतात हे नव्याने कळले. थॅक्स टू मिपा आणि मिपाकर्स.....जीयो.
  • Log in or register to post comments
द
दिपक.कुवेत Mon, 12/14/2015 - 14:31 नवीन
मला हॉटेल मॅनेजमेंट करायचं फार मनात होतं पण काही कारणाने राहून गेलं...
  • Log in or register to post comments
क
कल्पक Tue, 12/15/2015 - 21:07 नवीन
"वेल पेईंग आणि फुल-डे बिझी नसणारा, फॅमिली फ्रेंडस एंजाॅयमेंट करता येण्यासारखा जाॅब हवा" User Experience Design क्षेत्रात सुरुवातीला कष्ट करावे लागतात पण एका टप्प्यानंतर बरीच स्थिरता मिळते आणि कुटुंब-छंद यांच्यासाठी वेळ देता येतो (विशेषतः अमेरिकेत तर नक्की). आयटी क्षेत्रातल्या डेवलपर किवा टेस्टर पेक्षा नक्कीच कमी कष्ट करावे लागतात. User Experience Designer चं काम खूप niche असल्यामुळे आणि हे काम करणारे खूपच कमी लोक असल्यामुळे हे काम करणाऱ्या माणसाला बरंच महत्व आणि स्वातंत्र्य असतं. मी कोलोराडो मधून कॅलिफोर्नियाला नोकरी बदलून गेलो तर माझ्या ग्राहक कंपनीला कोलोराडो मध्ये replacement मिळाला नाही आणि न्यूजर्सीतून User Experience Designer आणावा लागला. आम्हाला अमेरिकेतल्या विविध ग्राहक कंपन्यांसाठी अनेकदा User Experience Designer लागतात पण अनेक आठवडे शोधून मिळत नाहीत.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा